कोविड १९ लॉक डाऊन काळात काय करावं आणि काय करू नये या बद्दल बऱ्याच लोकांनी आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संपर्क साधलाय. किंबहुना मार्गदर्शनाचा भडिमार झालाय. परंतु तुम्हाला वाचायला नक्की आवडेल म्हणून काही गोष्टी शेअर करते आहे.
वर्षानुवर्षे कामं करण्याची पद्धत, कामाची सर्वसाधारण वेळ, दिवस, कामाचे ठिकाण हे इतकं अंगवळणी पडतं की काही वेळेला त्या पलीकडे जाऊन विचारच केला जात नाही. पण मूळ गोची तर इथंच आहे. प्रशासकीय पदांमध्ये कामं करत असताना वेळेच बंधन, ठिकाण आणि पद्धत या मध्ये इतक रिजिड राहता येत नाही. अचानक आलेला बदल कसा स्वकारला जातो? बदल अटळ असेल तर त्या बदलाचं स्वागत कसं केलं जातं? बदल स्वीकारताना स्वतःमध्ये काही आवश्यक बदल करणे अपरिहार्य आहे आणि मग या बदलासाठी आपण मनाने तयार आहोत का? स्वतः मध्ये बदल करताना खूप प्रयास पडतो का? या साऱ्या विचार मंथनातून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन परिस्थितीला भिडलं पाहजे. आणि एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. कोणता आत्मविश्वास? प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा आणि ती समर्थपणे हाताळण्याचा. आणि हे सगळे होऊ शकत करणं, आपण ज्या फील्ड मध्ये कामं करत आहे तिथं काय काय आहे आणि काय अपेक्षित आहे याची जाणीव असणं….
तिथं चिकित्सक बालकं आहेत. उदंड प्रतिसाद देणारी सळसळणारी, उत्साही, तरुण ऊर्जा आहे, तिथं प्रयोगशील मुलं, प्रयोगशील शिक्षक आहेत, आणि उज्वल भवितव्य आहे. तिथं उद्याचा भारत आहे. राष्ट्र घडविण्याचं कार्य जिथं चालत ते ठिकाण शाळा, कॉलेज. जिथं मना, शरीरावर संस्कार केले जातात. जिथं मुलांच्या मनात शिक्षणाबरोबरच एक उत्तम नागरिक बनविण्यासाठी, एक जाज्वल्य देशप्रेमी, एक पूर्ण माणूस बनवण्याच्या ध्यास जोपासला जातो. आणि शाळेमध्ये गेलेलं बालक शिक्षित, सुसंकृत बनवून, पूर्ण माणूस बनवून कॉलेज मधून बाहेर पडतना पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छांची शिदोरी देऊन बाह्य जगात पाठवलं जात. इथं औपचारिक शिक्षण संपलेलं असतं आणि सुरु होतं जीवन शिक्षण. बदल हा निसर्ग नियम असून शिक्षण क्षेत्रात त्याचं बाहू पसरून स्वागत होतं असतं. अशा ठिकाणी कामं करण्याची संधी मिळणं हेच भाग्य. मग लाभलेल्या संधीचा, भाग्याचा उपयोग आपण सर्वांनी तेवढ्याच उत्साहान आणि त्याच तरुणाईच्या उर्जेने करणे अपेक्षित आहे.
- इथं अडचणींचा पाडा वाचण अपेक्षित नाही.
- इथं नकारात्मकता आजिबात नको आहे.
- इथं प्रश्न, तक्रारी अपेक्षित नाहीत.
- इथं कामावर बहिष्कार, आळस, कामं टाळणे, आजचं कामं उद्यावर ढकलणं अपेक्षित नाही. (अपवादात्मक परिस्थिती वगळता)
- इथं माझ्या ऐवजी दुसरं कुणीतरी करेल हि चाल, ढकल परवडणारी नाही.
मग काय हवं आहे इथं आज, आता…??
$ अडचणीवर मात करून येणं अपेक्षित आहे.
$ सकारात्मक विचार, सकारात्मक कृती आवश्यक आहे.
$ इथं प्रश्नावर उत्तर आणि तक्रारींवर उपाय घेऊन येणं अपेक्षित आहे.
$ इथं कामावर प्रेम करणं आणि ते कामं आताच करणं आवश्यक आहे.
$ हे माझंच कामं आहे. ते मीच करणार आणि प्रतिकूल परिथितीला भिडणार हा दृष्टीकोन हवा.
१. ऑफिस मध्ये जाऊनच काम केलं तरच ते काम अन्यथा काम नव्हे? मला स्वतःला काम केल्याचं समाधान लाभत नव्हतं. प्रत्यक्षात वेबिनार, टेली कॉन्फरंस, व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हॉट्स ऍप मेसेज, पत्र व्यवहार हे सारं घरून सुरू होत. पण मनाला अस वाटत नव्हत की आपण काम करतोय, किंबहुना दैनंदिन नियमित कार्यालयीन कामकाजा पेक्षा खूप काम होत होते. म्हणजेच माझा “माईंड सेट” वेगळा सिग्नल देतं होता. तो बदलायला थोडा वेळ लागला.
२. लॉक डाऊन आहे, म्हणून, उगाचच गादीवर लोळत पडणे, जबरदस्तीने झोपणं, खूप वेळ किचन मध्ये रेंगळण, घराची साफ सफाई टाळण या गोष्टी सफाईन टाळल्या. म्हणजेच सर्व जबाबदाऱ्या व्यवस्तीत आणि वेळेत पार पडल्या. दिवस सुरू तसाच व्हायचा, जसा लॉक डाऊन पूर्वी सुरु व्हायचा, साधारणपणे पहाटे ६-३० वाजता आणि, ९-०० ते ९-३० वाजे पर्यंत सर्व कामं झालेली असत. आणि त्यामुळेच ऑफिसच नियमित कीवा अचानक आलेलं काम करताना मला कोणतीच अडचण आली नाही.
३. माहित संकलन, असलेली माहिती अद्यावत कारण, हव्या त्या फॉरमॅट मध्ये देणं, वरिष्ठ पातळीवरून प्राप्त आदेश आणि त्याबर हुकुम वेळेच्या मर्यादा पळून शाळा कॉलेज लेवल वरच्या, संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, क्लर्क, विभागीय मंडळ, परिरक्षण केंद्र इत्यादी सर्वांना फोन द्वारे अटेंड करण अशी असंख्य कामं सातत्याने चालू होती. बऱ्याच वेळेस, सकाळ पासून सुरु झालेली कामं रात्री पर्यंत चालू राहायची.
४. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेल्या जबाबदाऱ्या, मिळालेली संधी समजून व्यवस्थित पार पाडायला आणि झोकून देवून काम करायला आणि स्वतःला अपडेट ठेवायला चांगलीच मदत झाली, अस मला स्वतःला जाणवलं. दरम्यान कंप्युटरचं असलेलं जुजबी ज्ञान वाढवणं आवश्यक होत. बेसिक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि ऐनवेळी मदत मिळत नाही, हे लक्षात आल्यामुळे त्यामध्ये प्रगती गरजेची वाटली आणि मोर्चा तिकडं वळवला.
५. रिकामा वेळ आहे म्हणून, खूप वेळ टी. व्हीं. पाहणं, सतत बातम्या ऐकणं, सोशल मीडियावर टाईम पास करणं, नकारात्मक गोष्टींवर निरर्थक चर्चा करण किंवा चर्चा ऐकणं मुद्दामहून टाळत होते. आणि म्हणून त्या सर्वांचा चांगलाच परिणाम दिसून येतोय.
दरम्यान मंत्रालयीन स्तरापासून… मा. सचिव, मा. संचालक… आणि इतर यांच्याद्वारे
शिक्षणाशी संबंधित सर्व घटक आणि त्यांचे मन आणि शरीर स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून काय प्रयत्न चालू होते? आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून आवश्यक बदल ई. बाबत संस्था चालक, पालक, विद्यार्थि, मुख्याध्यापक, शिक्षक, तज्ञ, केंद्र संचालक, शैक्षणिक वर्ष, ऑनलाईन शिक्षण ई. बाबत सल्ला मसलत, ऑनलाईन चर्चे द्वारे खूप प्रभावी आणि फलदायक प्रयत्न चालू होते. शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांशी संपर्कात येऊन पुढील वाटचालीची दिशा ठरवण्याचा प्रयत्न चालू होता. म्हणजे नेमकं काय चालू होत? ते वाचा पुढच्या भागात.
पोस्ट वाचून आपल्याला काय वाटल? आपण आपला वेळ कसा घालवताहेत? काय नवीन सुचवावंसं वाटतंय का? जरूर, अगदी निसंकोच पणे लिहा, प्रश्न विचारा? वाचा आणि share करा. You ara always welcome 💐
7 Responses
सर्वांना मार्गदर्शक अनुभव,
खूप inspiring.
Thank you जयश्री.. 🙏💐🌹
Ho chanch
Thank you मॅडम नंदा. लॉकडाऊन दरम्यान काय करावे ❓️ काय करू नये – पाच गोष्टी वाचून आपण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🙏
Thank you Nanda 🙏💐🌹
Accept yourself nice post and video in Fb.🙏🏻
Thank you मॅडम सीमा. मी whatsapp, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर माझ्या ब्लॉगच्यालिंक नेहमी शेअर करते.. वाचत रहा 🙏🌹