“तू सदा जवळी रहा…” भाग – 20 | Ranjana Rao

आत्ता पर्यंत आपण वाचलात,
भाग -1* एक आईं , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते …….
भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं, विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….
भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग- मदतीचा हात, आणि त्यातून काढलेली वाट….
भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती-कुसुम ताईची, सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….
भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मिच वि….. सदृश्य जीवन.
भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग- 8* आईच, मानस दर्शन,
राजेशची प्रकर्षाने आठवण आली.
भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार?
भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12* मध्ये वाचा, सुचिताची प्रश्नावली, श्री आणि विनिता: घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?
भाग -13* मध्ये वाचा, @रश्मी खोटं बोलते पण…. ? @ चंदा कुठे राहिली? @ चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते?
भाग -14 * वाचा काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबाचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरांना का भेटली? सरांनी पेढे का मागितले?
भाग -15 * मध्ये आपण वाचलात, वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी-पुतळी लायब्ररीत का बसतात?
भाग-16 मध्ये, विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?
भाग- 17 @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले?
भाग – 18 तरुण मुलगी घरात असणं? खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न,
भाग -19, *आत्या की मैत्रीण,
फिरकी? अतरंगी बंटी, आणि
भाग- 20 * कोण आहे मोनादादा? आत्याची फिरकी कशी घेतली?
वाचा, share करा, आपलें अभिप्राय नक्कीच आवडतील🙏🌹

कोणाच्या परीक्षेचा निकाल???

दहावी, बारावी परीक्षा होऊन आता जवळ जवळ महिना उलटून गेला होता. सातवीचा निकाल लागला. आत्त्याचा छोटा मुलगा, आदित्य खूप चांगल्या मार्कांनी पास झाला. वर्गात पहिला आला होता तो. आत्या एकदम खूश झाल्या. आता तो हायस्कुल मध्ये जाणार होता. खूप खुप छान वाटत होतं. आनंदाच्या बातमीनं घरात आनंदलहरी तरंगत होत्या. पुढची तयारी सुरु झाली. पुस्तकं 📖, दप्तर 🎒, युनिफॉर्म आणि इतर आवश्यक खरेदी सुरु झाली. पासपोर्ट साईझ फोटो, झेरॉक्स, प्रवेश फॉर्म, वह्या, कपडे खरेदीची घाई गर्दी दिसतं होती. सर्वत्र आनंद भरून राहिला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला सर्वजण तयार झाले. अवखळ बालकांसारखा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. लहान मुलाची पाऊल, पाऊस असूनही घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होती. रंगीबेरंगी रेनकोट, ☔️छत्री, 🏮दप्तर, टिफिन 🍱, वॉटर बॉटल या आणि इतर वस्तू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत होते.

ओंकार आणि घरी सर्वाना, आता प्रतीक्षा होती, बारावीच्या निकालाची. तारीख जसजशी जवळ येत होती: तशी हुरहूर वाढत होती. ओंकारचं दिवसरात्र अभ्यास करणं डोळ्यासमोर उभं राहायचं. वर्तमानपत्रात निकाल जाहीर केला जाई. किती विद्यार्थी परीक्षेला बसले? रिझल्टची तारीख याची चर्चा वर्तमानपत्रातून व्हायची.

कोण होता, मोनादादा?

आणि एका प्रसन्न सकाळी हातात दैनिक पुढारी वृत्तपत्र घेऊन, मोना दादा; दारातून खणखणीत आवाज देत आत आला.
“अरे पेढे आण ओंकार पेढे. मस्तच मार्क्स मिळाले तुला. अभिनंदन भावा 💐 अभिनंदन.”
मोना दादा, मधल्या आत्याचा मोठा मुलगा. मोना दादा म्हणजे बोलका स्वभाव, प्रचंड उत्साह, सळसळता चालता बोलता आनंदच जणू. ओंकारची मेहनत फळाला आली आणि तो खूप छान टक्के मार्क्स घेऊन पास झाला. ओंकारच्या बारावीच्या निकालाचा आनंद मोनादादा आल्यामुळे द्विगुणित झाला. आता आत्याला खूप आनंद झाला आणि पुढचं ऍडमिशन आणि कॉलेजची पूर्व तयारीचे विचार सुरु झाले. आता ओंकार डिग्री कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होता.

“दादा पाणी घ्या,” रश्मीन दादांना पाणी दिलं
“अरे रश्मी, ये बैस अशी, माझ्या जवळ”. मोना दादा बोलला.
घरातल्या उत्साहपूर्ण वातावरणाने रश्मी उल्हासित झाली होती. आत्या आणि रश्मीने आज आमरस, शिरा, पुरीचा बेत ठरवला होता. जूजबी ख्याली खुशाली विचारता; विचारता, मोनदादाने अचानक मोर्चा प्रणवदाच्या आईकडे वळवला.
“मावशेsss” दादांनी आत्याला जोरात हाक मारली.
“मी इथंच आहे मोना, ओरडतोयस कशाला? बोल, काय झालं?” आत्या, मोना दादाला चहा देता, देता विचारत्या झाल्या.
“मावशे, रश्मीची कुंडली आहे का तुझ्याकडे?” दादांनी आत्याला प्रश्न विचारला.
“मोना दादाsss?”, म्हणून रश्मी एकदम उठून उभी राहिली.
“रश्मे, गोलमटोलsss बैस🤣 इथं, चूप, आवाज नको?” दादांनी हाताला पकडून खाली बसवलं रश्मीला.
आता, आत्या काही बोलणार तेवढ्यात मोना दादाचं बोलले. “रश्मीची पत्रिका दे, मग सांगतो सगळं, मावशी”.
“पत्रिका, विनी वहिनींकडे आहे. माझ्याकडे कशी असेल?” आत्या उतरल्या.
“म्हणजे, मला तालुक्याला जावं लागेल विनी मामीकडे, नाहीतर मामीला बोलवावे लागेल माझ्याकडे.”
हे कुंडलीचं खूळ काही जाईना मोना दादाच्या डोक्यातून.
आणि कुंडली म्हंटल की स्थळ आणि लग्नाच्या गोष्टी हे समीकरण झालं होतं. पण तो विषय सोडून दिला दादानं आणि आत्याकडे मोर्चा वळवलाआणि विचारते झाले,
“मावशी बराचं वेळ झाला. आज जेवणात काय स्पेशल बेत आहे? दरम्यान आत्यानी सर्वाना पोहे खायला दिले आणि पुऱ्या तळायला घेतल्या. काकडीची कोशिंबीर, कैरीची: आंबट गोड चटणी, पापड, लिंबाच इन्स्टंट लोणचं, मसाले भात, सार, साधा भात, गोडं वरण, आमरस सगळी तयारी झाली. आत्यानी रश्मीच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघी सूचक हसल्या. आदित्यला बोलावून, चांदीच ताट काढलं पेटीतून, ताटा भोंवती सुंदर रांगोळी रेखाटली रश्मीने. आणि एका बाजूला ओंकार, आदित्य, आणि दुसऱ्या बाजूला प्रणव आणि मोना दादाचा मुलगा राज, अशी ताटांची मांडणी झाली. आरतीचं ताट तयार केलं. अक्षता, सुपारी, कुंकू, हळदीचा करंडा ठेवला. आदित्यला सांगितले बोलव सगळ्यांना जेवायला. तसा खुशीत येऊन आदित्यनं सर्वांना हाक दिली, “मोनादादा, राज दादा, प्रणवदा, ओंकार अण्णा जेवायला चलाsss”
हात धुवूंन सर्व जण स्वयंपाक घरात आले तेव्हा जेवणाचा थाट पाहून भुवया उंचावल्या मोनादादानं.
दादा म्हणाला,” ओंकार, रोज निकाल लागू दे! रोज पास हो! मावशी, रोज असाच थाट असु दे जेवणाचा!” आणि स्वतःच हसायला लागला.
“आयडिया बुरी नही हैं पपा । ” राजन प्रणवला टाळी दिली आणि सगळे हसायला लागले.
आत्यानी मोनादादाला मधल्या जागेवर बसायला सांगितले. दादाच्या भूवया उंचावल्या. “बस मोना, तुला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा” आत्या बोलल्या. दादानं वाकून आत्याच्या पायाला स्पर्श केला, “उदंड आयुष्यवंत व्हा, असाच आनंद वाटत रहा. सुखी रहा, सर्वाना सुखी करा. ओम श्री गुरुदेव दत्त!” आत्यानी मोनदादाला आणि पाटोपाठ आलेल्या राज, प्रणव, ओंकार, आदित्य, आणि रश्मीला भरभरून आशीर्वाद दिला.
रश्मीला सांगितले, “रश्मी, ओवाळ त्याला”.
रश्मीने, मोनादादाला, औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
“रश्मी, वाकून नमस्कार कर दादाला, ‘नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा!” आत्यानी नमस्काराच महत्व बोलता बोलता सांगितले. दादांना नमस्कार करून, प्रणव, ओंकार, आदित्य आणि राजला ओवाळून, आरतीचं ताट, अक्षता खाली टाकून देवाजवळ ठेवलं आणि वरण भातावर तूप वाढलं. सर्वांनी हात जोडून, डोळे मिटले आणि…

उदर भरणं होता, नाम घ्या श्री हरीचे,
सहज हवन होते, नामः घेता फुकाचे,
जीवन करि जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रम्ह,
उदर भरणं नोहे, जाणिजे यज्ञ कर्म.”

म्हणून हात जोडले. चित्राहूती तटाबाहेर ठेवत, चित्राय स्वाहा, चित्र भुक्ताय स्वाह, ओम यमाय स्वहा, यम धर्माय स्वाहा, सर्विभ्या भुते.. मंत्र पुटपुटत, पाणी सोडलं आणि जेवायला सुरुवात केली. अत्याचा आग्रह आत्याचं जाणायच्या. पूरे, पुरे हेचि ऐकली मात. “मावशी, मला रश्मीसारखं गोलमटोल बनवूं नकोस”. गाल फुगवून, भिवया उंचावत दादा 😅😄 बोलला. “अन्न दाता सुखी भावः! अशा शुभेच्छा हव्या असतील तर, आता परत काहीही वाढु नको मावशी, पोट भरलं, आता परत वाढलीस तर पोट मरेल.😂 किती वाढतेस? किती आग्रह करतेस?” दादा भरलेल्या पोटावरून हात फिरवत म्हणाले. भुवया उंचावून मोनादादा आत्यला प्रश्न?? विचारत होता .
“तू गीता, महाभारत वाचतेस ना मावशी?” दादाला आत्याची खिल्ली उडवण्याची लहर आली.
आत्या समजून चुकल्या आता हा मला डोस देणार. आत्यापण अनभिद्नतेचा आव आणत भुवयाला ताण देऊन धनुष्यकृती केल्या. खालचा ओठ मुडपत बोलल्या, “हं वाचतेय, मग पुढे काय ssss?,”
“त्यामध्ये युधीष्ठर आहे ना, त्याची आठवण झाली. त्यानं यज्ञ, हवन करून अग्नीला एवढं तुष्ट, पुष्ट करून ठेवलं होतं की त्याला समजेना, मला (अग्नीला) यज्ञा, हवानाद्वारे मिळालेली ऊर्जाशक्ती कुठं वापरू? अग्निदेव, अस्वस्थ होऊन श्रीकृष्णाकडे गेला आणि मग अग्नी देवाची उर्जाशक्ती, खांडव वन जाळण्यासाठी वापरावी लागली.”
दादानं फुलपात्रातलं पाणी उजव्या हातांच्या ओंजळीत घेऊन आचमन केलं आणि पुढे बोलू लागला, “धर्मराज, ब्राह्मणांना एवढं आग्रह करून जेवण वाढायचा की, त्यांची पोटं सुटली, सुस्ती मुळं, वेदाभ्यासात खंड पडू लागला. ब्राह्मणांनी समजावून सांगितलं तरी धर्मराज सामजून घेईना, श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, ‘ भूक असेल आणि आवश्यक असेल तेवढंच खावं, अती आग्रह करत जाऊ नको’. ऐकेल तर तो धर्मराज कसला? आता धर्मराजाच्या अन्नाच्या आग्रहाचा ब्राम्हणांना जाच वाटू लागला, आणि परिणाम माहीत आहे काय झाला?” दादानं प्रश्नार्थक मुद्रेनं मावशीकडे आणि रश्मीकडे पाहिलं. आत्या गालातल्या गालात हसत होत्या. सर्वजण कान देऊन ऐकत होते. बहुतेक, आत्या आणि प्राणवदाला, मोना दादा पुढ काय बोलणार हे माहित असावं. त्यांचं वाचन प्रचंड होतं. रश्मीनं डावीकडून उजवीकडे मान वाळवून, दादाच्या प्रश्नच उत्तर माहित नाही म्हणून संकेत दिले.
“बडीशोप दे रश्मी,” दादानं फर्मावलं
“जे घडू नये ते घडलं.” दादाच्या वाक्याने क्युरियासिटी वाढली.
“म्हणजे काय झालं मोनादादा?” रश्मीला उत्तर जाणण्याची घाई झाली.
“एका तपस्वी ब्राह्मणानं, युधिष्ठराला शाप दिला. म्हणाला, ‘अन्नाची नासाडी करायला भाग पाडतोस, स्वतःचं पुण्य वाढावं म्हणून ब्राह्मणांना अजीर्ण होऊन, कर्पट ढेकर येईपर्यंत जेवणाचा आग्रह करतोस. म्हणून आचमनासाठी हातात पाणी घेतलं आणि शाप उच्चारला, ‘तुझ्या तोंडाला खुप घाण वास येईल आणि घाण वास कित्येक योजने दूरपर्यंत पसरेल’, असं म्हणून हातातलं पाणी जमिनीवर सोडलं.”🥺
“मोन्या, मला माहीत होतं तू हे सांगणार ते.🙄🤑 मोना महाराज की जय!”, आत्यानी दोन्ही हात जोडून कपाळाला लावत बोलल्या.

“बाजूच्या दुकानातून पान विडा आणूया प्रणव, जेवण जरा जडच झाले.
बारा पुऱ्या, आमरस वाट्या चार, मसाले भात वर दिलं वाटीभर सारं,
पोटाचा पार झाला भोपळा, पानविडा चगळून डुलकी घेतो” मोना दादा म्हणाला
“मोजून चार पुऱ्या खाल्या तर बारा पुऱ्या म्हणतो दादा?”, प्रणवदा बोलला.
“अरे, ते मोठे मोठे भटुरे होते त्याला तू पुऱ्या काय म्हणतोस?” दादानं बाहेर पडता पडता दोन्ही हात पसरूनं पुऱ्यांचा आकार दाखवण्याचा प्रयत्न करत, प्रणवला विचारलं.
दरम्यान बाईनं खरकटी ताटं उचलून नेली आणि फारशी स्वच्छ करून घेतली. आत्यानी बाईला ताटं वाढून दिलं.

उपाय काय ⁉️

विनिताचं संशोधन सुरू झालं. पहिली चाचपणी रश्मीला परत तालुक्याच्या ठिकाणी आणून पूर्वीच्याच कॉलेजला पाठविण्याचा मानस आणि त्यादृष्टीनं प्रयत्न. केवळ अशक्य होतं ते. म्हणजे शक्य नाही ❌. काकांकडे राहून कॉलेजला जाणे, अशक्य ❌. मग आता जिथं आहे तिथं राहून कॉलेजला जाणं शक्य आहे का❌? हॉस्टेलची व्यवस्था आहे का?❌ अजुन काय करता येईल❓️ दरम्यान माहिती काढणं सुरू होत. कोणी काहीही उपाय सांगितला की, विनिताकडून पडतळला जायचा. त्यातून पुढील सर्व शक्यतांचा विचार केला जायचा.

मार्ग काही मिळेना,
मन समाधानी होईना,
सर्व वाटा धुंडाळून,
ध्येय साध्य होईना,
काय करू प्रश्नाला?
उत्तरं काही मिळेना.
विनी विचारांती शिणाली.
कोण्या नव्या रूपानं
मार्ग समोर ठाकला,
उघडले नेत्र, सुखावले मन.

“मामी, कसला एवढा विचार करतेस?” दारातूनच मोनादादान, विनी मामीला प्रश्न विचारला .
“अरे, आत तरी ये मोना,” विनितां मामीने हसत दादाचं स्वागत केलं. चंदा, सई बाहेर आल्या.
“चंदा पाणी दे दादांना, ” म्हणून विनीनं सांगितलं.

सईने पेढ्याचा बॉक्स आणि चंदान पाणी दिलं दादाला. आणि नमस्कार केला. सई आठवीला गेली, आणि चंदा कॉलेजला जाणार असं सांगितलं दादाला. मोना दादा आणि आई, दोघांनी बराच वेळ चर्चा केली आणि शेवटी एका निश्कर्षा प्रत आले.
मगाशी पेक्षा विनिताच्या चेहऱ्यावरील ताण बराच निवळला होता. दादा, कोणता उपाय घेऊन आला होता? ते मोना दादा आणि त्याची विनी मामी जाणत होते.
घरावरून नजर फिरविली. फार अवजड, बोजड असं काही दिसलं नाही त्याला.
सई , चांदशी गप्पा मारता मारता दादानं जेवण घेतलं. आणि पुढच्या रविवारी डायरेक्ट तिकडचं भेटू म्हणून रश्मीची पत्रिका घेऊन निघून गेला.

दुसरे दिवशी मोनादादा घरी आला तो घाईतचं. मी गोपाळ मामा, मामीना भेटून येतो, तो पर्यंन्त बॅग भरून ठेव रश्मी आपल्याला लगेच निघायचं आहे. आत्यानी दिलेला चहा घेऊन दादा निघून गेला. तिन्ही भावंडं प्रणव, ओमकार आणि आदित्य कामानिमित्त बाहेर गेले होते. रश्मीने आत्याना नमस्कार केला आणि बॅग उचलुन बाहेर पडली. आत्यांचा स्वर ओला वाटला आणि त्यांनी डोळ्याला पदर लावून मान फिरविली. आत्यानी दिलेली संस्कारांची जन्मभर पुरेल इतकी शिदोरी घेऊन रश्मी नव्या उमेदीने बाहेर पडली.

दादा म्हणजे गावचे इनामदार. त्यांची शुभ्र वस्त्र, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणखीन उठावदार बनवत होती. गावातून घरी जाता जाता कित्येक लोक नमस्कार करून जाताना वाट करून देत होती.

इनामदार म्हणजे नेमके काय काम करायचं असत दादा? रश्मीने दादाला प्रश्न विचारला.
काही नाही गं, आपली नेहमीची कामं पाटील वगैरे लोक करतात ना तशी? दादानं थोडक्यात सांगितलं कारण सलग तीन दिवस सतत बाहेर असण्यान त्यांची काम खोळंबलेली दिसत होती. “आता चार दिवस कामात आहे. भेटलो की करू काम, थोडा धीर धरा. दादांनी समोरच्या काकूंना सांगितलं.”

अगोदर मावशीकडे , मग मामीकडे परत रश्मीला आणण्यासाठी स्वतः आला होता दादा.

दादांच्या वाड्यात पोहोचलो तसे, दादाकडे काम करणाऱ्या वयस्कर काकांनी बॅग आत नेऊन ठेवली. वाड्याच्या मोठ्या दरवाजावर जाई, जुईच्या वेलीनी तोरण बांधले होते. घराच्या मुख्य दरवाजापाशी मोठं तुळशी वृंदावन होत. बाजूच्या भिंतीजवळ गुलाब पुष्पांची झाडं, मोगऱ्याच्या वेली होत्या. एका कोपऱ्यात दोन नारळाची झाडे व्ही आकार धारण करून उभी होती. समोर भलामोठा सोफा आणि पांढरी शुभ्र वस्त्र लावून खालीच बैठक व्यवस्था केली होती. एका बाजूला लाकडी भला मोठा झोपाळा होता. पितळेच्या कड्या नुकत्याच साफ केल्या सारख्या चकाकत होत्या.

आत्या झोपाळ्यावर बसून हलकेच झोके घेत होत्या. आकाशी रंगाची नऊवारी साडी आणि त्याच रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. हातात बिलावर आणि पाटल्या, गळ्यात जाडसर चेन, कानात हिऱ्याच्या कुड्या घातल्या होत्या. चेहरा, उंची, रंग ताईआजीची प्रतिकृती वाटत होत्या. एकदम मातृ मुखी दिसत होत्या आत्या. ताई आजीच्या चेहऱ्यावर जरा सुरकुत्या दिसायच्या. आत्याचा चेहरा एकदम नितळ होता. हिरवी गोंदणाची टिकली गोऱ्या चेहऱ्यावर उठून दिसत होती.

विमा आत्या आणि (मोना दादाची बायको) वहिनींनी हसत स्वागत केल. आत्या थोड्या वाकलेल्या वाटल्या.

‘रश्मी, गोड आवाजात आत्या बोलल्या. त्यांचं आवाज ओलसर आणि जड वाटला. डोळे पाणावले. त्यांना आपला भाऊ, श्री…ची आठवण आली.
पाठोपाठ दादाचा आवाज आला .
“श्री…. मामाच्या माघारी विनिता मामी खंबीरपणे सांभाळते आहे तुझ्या तिन्ही भाच्यांना. रडून स्वागत करणार का आता?” मोना दादा जरा सडेतोड आवाजात बोलला.
“नाहीरे, तसं नव्हं. पाठचं भावंडं अर्धा संसार सोडून जातो, मग वाईट तर वाटणारच ना?” आत्यांनी बोलता बोलता डोळे कोरडे केले.
नमस्कार करून रश्मी आत्याच्या शेजारी बसली.

दादाचा मुलगा राजू बारावीला गेला होता. तो जवळच्या शहरातून पुस्तकं आणि आवश्यक साहित्य आणायला गेला होता.

दादा सकाळी निघून जायचे आणि संध्याकाळी उशीरा परत यायचे. दोन, चार, सहा दिवस झाले. आणि एकेदिवशी सकाळी दादा बोलले की, “चल, बॅग भर रश्मी”.

मोना दादा आणि रश्मी कोठे गेले?

गाडी चालताना लाल धूळ उडत होती. झाड, वेली बहरल्या होत्या.

आम्ही कोकणातील एका गावी पोहोचलो. लाल माती, हिरवी झाडं आणि वेली, नदीचं पाणी पण लालसर होत.
आमच्या अगोदर अर्धा तास आईपण पोहोचली होती. आईला पाहून रश्मी एकदम खुश झाली. आणि आईला मिठी मारली. दोघींची भेट घालून देणारा दादा हे दृश्य पाहून हेलवला. त्यानं किती मोठं काम केलं हे जाणून होती रश्मी आणि त्याहून जास्त विनिता.
हे जागृत दत्त देवस्थान आहे! इथ एणारा माणूस दत्त कृपा आणि दत्त दर्शन घेऊनच जातो! गुरुदेव त्याला विन्मुख पाठवत नाहीत!” दादानी थोडक्यात पण मर्मज्ञ माहिती दिली. प्रशस्त जागा. मोठं घर. गाव असून सर्व सुविधा उपलब्ध होत्या तिथं. घरासमोर सुंदर आणि मोठं अंगण होत. अंगणात सुंदर रांगोळी रेखाटली होती.
सुंदर वातावरण होत. संध्याकाळी पश्चिमेकडून आलेला लाल प्रकाश वातावरणात वेगळाच रंग भरत होता.
दादांच्या बोलण्यामुळ दत्त दर्शन घेण्याची ओढ रश्मी आणि विनितला स्वस्थ बसू देईना. दादा बरोबर मंदिराच्या दिशेनं दोघी निघाल्या
तिथं एक सुंदर दत्त मंदिर होत. मंदिरासमोर खळाळून नदी वाहत होती. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला वडाच मोठं झाड होत. वाडाच्या झाडाला लागून पिंपळ आणि औदुंबर वृक्ष होते मंदिरात एक तेजस्वी गुरुजी बसले होते. त्यांचे केस वाढून मानेवर रुळत होते. डोळ्यात एकप्रकारचे वेगळे तेज दिसत होते. भगवी लुंगी परिधान केली होती. इतक्या गारव्यात फक्त बिन बाह्याचा बनियन घातला होता त्यांनी. या मामी, ये रश्मी, प्रसाद घे त्यांनी रश्मीच्या आईच्या कपाळी अंगारा लावला आणि श्री गुरुदेव दत्त ! म्हणून प्रसाद हातात ठेवला. पुनश्च नमस्कार करून रश्मीने प्रसाद भक्षण केला. आईने दत्त गुरूंना आणि गुरुजींना नमस्कार केला.

“हे श्याम दादा, माझे मेहुणे, राजुचे मामा,” मोनादादानी ओळख करून दिली.” पत्रिका यांना दाखवा. ते जे उपाय सांगतील ते कर आता. मोनादादानी श्याम दादा समोरच विनिता मामीना सांगितलं. समईच्या शांत प्रकशात दत्त मूर्ती हसताना दिसली. तिथंच बसून दादा, आई, शामदादा चर्चा करत होते. दादांनी मंदिरात बसूनच काही गोष्टी सांगितल्या. आणि दुसरे दिवशी पहाटे उठून बाजूला उभ्या असलेल्या पिंपळाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितलं. आणि आज पासून नव्या दिवशी जाऊन कॉलेजला एडमिशन घे श्यामदादा बोलले आणि दत्तमुर्तीवरून घरांगळलेली फ़ुलं दिलं रश्मी आणि विनीताच्या हातात. “पांच दिवसाच्या आत तुम्हाला दत्त दर्शन होईल मामी” श्याम दादा बोलले. संध्याकाळी दत्त गुरूची आरती करूनच घरी गेलो सर्व वातावरण हलकं हलकं आणि मन प्रसन्न वाटत होत.
श्याम दादांनी तर सांगितलं ”कॉलेजला जाऊन एडमिशन घे”. पण …. रश्मीच्या चेहऱ्यावर म्हणावे तसे भाव व्यक्त झाले नाही.

अजुन मोना दादा, श्याम दादा आणि आईनी रश्मीला एक गोष्ट सांगितली नव्हती.

कोणती गोष्ट होती ती जी , मोना दादा, श्याम दादा आणि विनितानं रश्मीला सांगितली नव्हती? वाचा पुढील भागात

3 Responses

  1. शब्दचित्र सुंदर आहे.
    श्री गुरुदेव दत्त.

  2. मॅडम तुमची series वाचताना मस्त वाटतं, वर्णन खूप छान करता.

  3. मॅडम आजचा भाग वाचला, खूप छान लिहिता. वर्णनाच detailing इतकं मस्त,जणू तो प्रसंग आपण witness करतोय किंवा त्या ठिकाणी आपण गेलोय.
    तुमच्या लिखाणात ease आहे, वाचायला मजा येते.
    कादंबरी खूप खपणार आणि सिनेमा निघणार, हिट होणार

    इतकं नाट्य आहे, वळणं आहेत एक कादंबरीचं आणि पर्यायाने सिनेमाचं मटेरियल ठासून भरलंय एवढंच मला प्रत्येक भाग वाचताना जाणवत रहातं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More