इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली |
इथेच झाडे, पाने अन् फुले
रसाळ फळांची रास इथे |
पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,
इथेच वटणे, भकास होणे |
कोंब, डिर अन् नवपल्लवी,
इथेच हिरवळी पुन्हा बहरणे |
दगड, धोंडे, माती इथेची
खाचा, खळगे रस्त्यावरती |
इथे हिरवळ, सुवास दरवळ,
चरणी गालिचे गार इथे |
चित्र विचित्र त्या गडद सावल्या,
इथेच भिववीती कोमल हृदया |
वाऱ्याच्या झुळूके सरशी,
इथेची पसरतो सुगंध रानी |
गडद रजनी, चमकते तारे,
इथेची येतो चांद कवडसा |
5 Responses
अतिशय सुंदर कविता आहे.
Thank you Vandana ji
Khup chaan
Thank you Abhijit ji🙂
अभिजित सर, आपण “निसर्ग“ कविता वाचून देलेले अभिप्राय शिरोधर्य. माझे इतर साहित्य वाचून सूचनाआणि आभिप्रायदिल्यास पुढील साहित्य निर्मितिसाठी उपयोग होईल. धन्यवाद👏