“तु सदा जवळी रहा….” भाग -2 अर्थात मैत्रीण👭भेट

“तु सदा जवळी रहा….. “
भाग -2

भाग -1 रश्मी, तिची शाळेत जाणारी मुलगी देविशा आणि आपलं मन मुलगीसाठी प्रसन्न ठेवणारी रश्मीमधील आई दिसली. मनावर असलेलं मळभ देवघरात विसरणारी गृहिणी दिसली. घर आणि नोकरी सांभाळणारी रश्मी सतत विचारात असते. का उदास असते रश्मी? चर्चगेट स्टेशन मध्ये कोण हाक मारतं रश्मीला??? पुढे वाचा, “तू सदा जवळी रहा…..

भाग-2 रश्मीला कोण हाक मारतं ❓️ कशामुळे रश्मी उदास असते ? रश्मी आई , मैत्रिणींचा फोन घेणं का टाळत होती ?

रश्मीला कोणी हाक मारली?


“रश्मी ssss”!
“हाय, रश्मी sss”!
पुन्हा तोच आवाज आला. मृदू पण स्पष्ट आलेल्या आवाजाच्या दिशेनं आपली मान वळवली रश्मीने. प्रथम तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तीच सावळी पण स्मार्ट, साधी पण स्पष्टवक्ती आणि लाघवी आवाजात बोलणारी, रश्मीची खास वर्ग मैत्रीण – ज्योती. तिच्या डोळ्यात ज्योतीचे तेज दिसे पाहणाऱ्याला. पाणीदार डोळे आणि धारदार नजर होती तिची. आवाज बाकी साखरेत घोळवल्या सारखा, ऐकणारा मुग्ध होई.
पाहतच राहशील का? की काही बोलशील पण? तंद्रीतून जाग्या झालेल्या रश्मीने झटकाच दिला ज्योतीला प्रतिप्रश्न करून. “ज्योती, अचानक इकडे कुठे टपकलीस?” गोंगाटात पण ज्योती स्तब्ध झाली. जिवाभावाची मैत्रीण ही. पण अशी भाषा? अशी प्रतिक्रिया? कशी आहेस विचारणं नाही. गळा भेट नाही. भावविभोरता नाही. इतक्या वर्षांनंतर भेटून अशी प्रतिक्रिया? सखेद आश्चर्याचा धक्का 😇 बसला ! ज्योती विचारात पडली. रश्मीमध्ये एवढा बदल झालाच कसा?
बोलत बोलता त्यांची पावलं आपोआप कॉफी हाऊस कडे वळली. ज्योतीची कऱ्हाडहुन मुंबईला बदली झाली आणि दोनच दिवसापूर्वी ती मुंबईतील सेल्स टॅक्स कार्यालयात रुजू झाली होती. मंत्रालयातील मिटिंग आटोपून बांद्रा हॉस्टेलकडे रवाना होताना तिनं रश्मीला चर्चगेट स्टेशनवर पाहिल आणि हाक मारली. ज्योती जरी रश्मीशी बोलत होती तरी पण बोलताना सारे लक्ष्य रश्मीच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते. बारकाईने रश्मीचा चेहरा न्याहाळत होती. ज्योतीने पुस्ति जोडली. घरी तिची सासू, सासरे, दोन मुले नवऱ्यासह गावी राहत असल्याबद्दल सांगितले.
मुंबईत रूळायचा प्रयत्न करतेय. ज्योतीचं बोलत होती घडाघडा.

पुन्हा ज्योतीने, रश्मीला टोकलं. “अगं तु काही बोलत नाहीस. शिक्षण पूर्ण करतेस आणि काही वर्षांसाठी खेड्यात नोकरी करतेस. मुंबईत प्रमोशन घेऊन येतेस. श्रीमंत नवरा, गोंडस बाळ, सारं कसं परी कथेसारखं. सारी सुखं तुझ्या पायाशी लोळण घेतात. नवरा तर तळ हातावरच्या फुलासारखा जपतोय तुला. राजेश सारखा रूपवान, गुणवान मुलगा; तुझ्या सारख्या सुंदर आणि समंजस्य मुलीला मिळाल्यामुळे दुधात साखरचं पडली !” ज्योती एकदम भारावून बोलत होती. रश्मी मात्र मनाने दुसरीकडेच होती. चेहऱ्यावर आनंदाचा लवलेश नव्हता तिच्या. रश्मीच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आणि मनातील चलबिचल ज्योतीच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही.
इतकावेळ बालमैत्रिणीच्या अचानक मिळालेल्या सहवासाने उल्हसीत झालेली ज्योती, रश्मीकडे पाहत गंभीर झाली. का? काय झालं? बोलत का नाहीस? ज्योतीने प्रश्नावर जोर देत रश्मीचा हात प्रेमाने घट्ट पकडला आणि विचारलं, “सर्व ठीक आहे ना?”, “देविशा कशी आहे?”,” राजेश कसे आहेत?” …..
आता मात्र रश्मीचा संयम सुटला आणि इतका उशीर जबरदस्तीनं थांबवून ठेवलेला अश्रूंचा बांध 😭 फुटला. … ज्योतीला समजेना, आपलं काय चुकलं ? जीवनात सर्व सुखं पायाशी लोळण घेणाऱ्या रश्मीच्या डोळ्यात आनंदाची कारंजी फुटण्या ऐवजी आंतरिक दुःख 😭 डोळ्यातून वाहतंय. ज्योतीने तिला मन हलके होईपर्यंत रडू दिले. हुंदके ओसरल्यावर रश्मीला पाणी दिलं प्यायला. पाठीवरून हात फिरवला. मैत्रिणीच्या प्रेमळ स्पर्शाने खूप बरं वाटलं रश्मीला. मैत्रीण कसली, सुख – दुःखाची वाटेकरी होती लहानपणापासून तिची. ह्रदयाच्या रम्य वेलीवर उमललेलं फ़ुलं🌺 होतं त्यांची मैत्री. साऱ्यांना कुतूहल आणि आश्चर्य वाटायचं ज्योती – रश्मीच्या मैत्रीच.

रश्मीने; ज्योतीच्या डोळ्यातील तळमळ पहिली. आपली जिवलग मैत्रीण आपल्या डोळ्यातीलं आसुमुळे अस्वस्थ झाली आहे हेही दिसलं आणि तिच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द ऐकून जागच्या जागी थिजली ज्योती. रश्मीच्या दुःखी अश्रू मुळं थरथरणारी ज्योती स्तब्ध झाली. हे काय ऐकतोय आपण❓️आपली जिवाभावाची मैत्रीण कशा स्थितीत आहे? का आले तिच्या वाट्याला हे दुःख? असं होऊच कस शकतं तिच्या बाबतीत? कसं वाटलं असेल तिला जेव्हा हे समजलं?

कशामुळे रश्मी उदास असते ?

“आकाश कोसळून त्या खाली नाहीशी झाले तर बरे झाले असते”. “धरणी दुभंगून गाढले गेले असते तर बरे झाले असते”. “मला नैसर्गिक किंवा अनैसर्गिकरित्या मृत्यू आला तर किती बरं झालं असतं”. अतीव दुःख आणि अगतिकता बाहेर पडली रश्मीच्या तोंडून. प्रत्येक शब्द काळीज चिरत होता ज्योतीचं. आपली ही अवस्था मग रश्मीचं काय झालं असेल हे सर्व ऐकुन? धीर गंभीर, सत्शील, हळव्या स्वभावाच्या माझ्या मैत्रिणीचं जीणं म्हणजे जिवंतपणी नरक यातनाचं. सौभाग्य असून विधवा स्त्री पेक्षा भयाण जीवन. तिच्या अगतिकते मागची दोन कारण न सांगताही ज्योतीला स्पष्ट दिसत होती…

जेव्हा हे समजलं रश्मीला तेव्हा होरपळली ती. कोलमंडली. सगळं जग संपलं तिचं. रडून डोळे सूजले तिचे. कोण सांभाळणार तिला? आकांत केला तिनं . पण रजेशवर झाला का परिणाम ? नाही … उलट रश्मीचे हाल झाले. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक …

आता पुढे काय❓️ ज्योती पुढे प्रश्न आ वासून उभा होता. तिला रश्मीच्या आईचा चेहरा समोर दिसत होता.

ज्योतीची जेव्हा मुंबईला प्रमोशनवर बदली ऑर्डर आली तेव्हा, रश्मीच्या घरी पेढे देऊन विनिता काकूंना नमस्कार करताना तिनं डोळ्यांनीच काकूंना आश्वासित केलं. विनिता काकू खूप सुखावल्या होत्या. एकतर रश्मीच्या जिवाभावाच्या मैत्रीणीला प्रमोशन मिळालं. दुसरं रश्मीची ख्याली खुशाली कळेलं.
आता ज्योतीला एका एका गोष्टीचा उलघडा होतं होता. अचानक रश्मीचं माहेरी येण का बंद झालं? कॉलेजच्या मित्र- मेळाव्याला का नाही आली ती ?
बहिणीचा, आईचा, मैत्रिणींचा फोनही घेत नव्हती. आणि उचललाच फोन तर काहीतरी बहाणा करून ठेऊन द्यायची. साहजिकच काकू काळजीत होत्या. पण सांगणार कुणाला?
आणि त्या रात्री न सहन होऊन शेवटी ज्योतीला फोन करून आपल्या मनाची उलघाल बोलून दाखवलीच काकूंनी. लहानां बरोबर लहान होऊन बोलणाऱ्या काकू खरोखरच काकुळतीला आल्या होत्या.

रश्मी आई , मैत्रिणींचा फोन घेणे का टाळत होती ?

आपल्या मुलीचा स्वभाव त्या पुरत्या ओळखून होत्या. आईला दुःख होईल असं काही वागणं, बोलणं रश्मी करणार नाही. कितीही दुःख झालं तरी ओठावर आणणार नाही. एरवी आईला भेटायला उतावीळ असणारी, फोनवर बोलणं सुरु झालं की सतत बोलत – ऐकत राहणारी रश्मी एकदा नाही तर दहा वेळेस पुन्हा फोन करते म्हणून फोन ठेवला आणि हे एक वाक्य उच्चारताना तिच्या आवाजातील जडपणा आईला दूरवरून जाणवला होता. जिथं नातं असतं तिथं रश्मी हळवी होते. मग ते रक्ताचं असो किंवा जोडलेलं. एखादी गोष्ट नाही आवडली तरी तसं स्पष्ट सांगत नाही. आतल्या आत स्वतः कुडत राहते. सतत दुसऱ्यांच्या मनाचा विचार करते. आपल्या मुळे कोणी दुखावणार नाही याची सतत खबरदारी घेते.


आईला स्पष्ट आठवलं. हा तिच्या स्वाभावतील बदल होण्यासाठी कारणीभूत घटना. त्या घटनेमुळे तीचं बालपण आणि अवखळपणा दोन्ही कायमचे निघून गेले रश्मीच्या आयुष्यातून. जीवनाकडे एकदम गंभीरपणे पाहायला लागली आणि वागणं पण तसच गंभीर झाले रश्मीचे.
तरी तिच्या मोठ्या संजू आक्काने (काकांची मुलगी ) टोकलचं तिला. अशी काय वागतेस एकदम गंभीर? कुठे गेला तुझा खोडकर आणि अवखळ आणि धांदरटपणा? उलट ¿ सुलट? प्रश्न विचारून आणि मस्तीखोरपणाने खोड्या काढणारी रश्मी एकदम प्रौढा सारखी का वागतेय??… .. संजू अक्का विनिता काकूंकडे मोर्चा वळवायच्या पावित्र्यात असताना, रश्मीच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून संजू अक्का जागीच खिळली. काकूंचा का बाहेर यायच्या ऐवजी आ वासून बघतच राहिली.
“परिस्थिती माणसाला तसं राहायला भाग पाडते,” या रश्मीच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून संजू आक्काच नव्हे तर काका, काकू, आणि आत्या सगळेच स्तब्ध झाले. पण छोट्या सईनं आणि चंदानं एकाच वेळी पुट्टु काकूंच्या मांडीवर बसण्यासाठी धाव घेतली आणि घरात किलबिलाट झाला. दोघी पण इतक्या लहान नव्हत्या की काकूच्या मांडीवर बसू शकतील. पण त्यांना काकू खूप आवडायच्या. काकूंकडून लाड करून घ्यायला खूप आवडायचे त्यांना.
ना रश्मीच्या आईला, काका – काकूंना, ना आत्याला संजू अक्काचा प्रश्न ❓️आवडला, ना रश्मीच गंभीर होणं. चंदा – सईच्या गोंधळात सगळे वातावरण पूर्वी प्रमाणे हसरे झाले…. रश्मी पण गंभीरपणाचा सदरा काढून सगळ्यांच्या बरोबर हास्य विनोदात सामील झाली…

पण खरोखरच रश्मी खूप विचार करायला लागली होती. कोणतीही गोष्ट करण्याअगोदर, कोणताही निर्णय घेण्याअगोदर सारासार विचार करून मगच अंमलात आणण्याची सवय स्वतःला लावून घेतली होती. आपल्या कोणत्याही कृत्त्यामूळं आपल्या माणसांनाच नव्हे तर कोणालाच त्रास होता कामा नये याची पुरेपूर काळजी घेत होती. त्या मुळे विनिताआईनं फोन केल्यावर असं सातत्यानं बोलणं टाळतेय म्हणजे खरंच काहीतरी गंभीर बाब असेल, जी विनिता आईला कळू द्यायची नव्हती तीला. विनिताआई विचार करून शिणली. ती ज्योतीच्या फोनची वाट पाहत होती.
इकडे रश्मीच्या आईला काय उत्तर द्यावे? या पेक्षा आपल्या मैत्रिणीला कसं सांभाळावं? याचा विचार ज्योतीची पाठ सोडत नव्हता. काकूंची शंका रास्त होती. दूर असूनही त्यांना रश्मी संकटात असल्याचं जाणवत होते.
रश्मीचा नवरा, राजेशचे प्रताप ऐकून ज्योती दिग्मूढ झाली. का त्याला अशी बुद्धी सुचली? रश्मीची काय चूक यात? कोवळ्या मनाच्या देविशाची प्रश्नार्थक❓️ मुद्रा दिसली नाही का त्याला? रश्मीच्या काळजीनं काळवंडलेला विनिता काकूंचा चेहरा आठवला नाही का त्याला? आपली पोझीशन काय? वय काय? जबाबदारी काय?
रश्मीशी बांधलेली गाठ, लग्नातल्या आणाभाका, सप्तपदी या सगळ्यापेक्षा त्याला फातिमाचे प्रेम महत्वाचं वाटत. मग रश्मी सोबतचे प्रेम खोटं होतं? प्रेम की….. ❓️ज्योती विचार करताना पण चाचरली… ……….


वासना………………….. वासनाच ती…. ती माणसाला बेकाबू बनवते. आंधळी बनवते. लाज गुंडाळून ठेवायला भाग पाडते. परिणामाची पर्वा करत नाही. सारासार विवेकबुद्धी काम नाही करत. लग्न संस्थेला तडा जातो. मनमानी करणाऱ्या जोडीदारामुळे आपल्याच जोडीदाराची फरपट होते. वासना फक्त दोन पायांमध्ये नसते. ती दोन कानांमध्ये, डोक्यात असते. प्रबळ भावनेचं वासनेतं रूपांतर होण्याआधी तिच्यावर अंकुश हवा. राजेशचं पण तेच झालं. फातिमाच्या रूपाने आलेल्या मुलीला मिळालेलं अनिर्बध स्वातंत्र्य, तिचा पैशाचा हव्यास, कमी श्रमात मिळणाऱ्या सुविधा आणि तरुणवयात हवासा वाटणारा पुरुषाचा सहवास या पलीकडे तिनं काही विचाराचं नाही केला. तिला ना राजेशच्या मुलीची फिकीर, ना त्याच्या बायकोची. राजेश आणि फातिमा जे प्रेम समजत होते तो व्यभिचार होता. जिभेला जे आवडेल ते खाण , डोळ्याला जे चांगलं वाटेल / दिसेल ते पाहणं आणि स्वतःच्या मनाला जे वाटतं तेच करणारी एक जमात आहे समाजात.
त्यांना ना समाजाची, ना घरातील बुजूर्गांची फिकीर, ना स्वतःची लाज. त्यातलेचं हे दोघे फातिमा आणि राजेश..

परंतु अशा परिस्थितीत आपल्या मैत्रिणीला भक्कम आधाराची गरज आहे हे जाणून
ज्योतीने तिला,”स्वतःला सांभाळ. मी आहेच तुझ्या बरोबर,” असं आश्वासन दिलं.
रविवारी पुन्हा भेटण्याचं ठरवून … निघाल्या दोघी .
रश्मी बरीच सावरली ज्योतीच्या सहवासात. आश्वस्त केलं खरं आपल्या मैत्रिणीला …. तिला शाळेतील आपली बाल मैत्रीण दिसली 👭 रश्मीच्या डोळ्यात .

______________________________________________________________________________

अशी कोणती घटना घडली की ज्या मुळे रश्मीच्या स्वभावात गांभीर्य आल ?
का आठवली ज्योतीला आपली बाल मैत्रीण? 👧👧
“तू सदा जावळी रहा ….. ”
वाचा भाग ३ मध्ये वाचा. 🙏

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

This image has an empty alt attribute; its file name is vratwork-logo-1.png

Artwork by VRatwork
Website: http://vratwork.in/portfolio
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More