लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसह
शुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥
कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णा
गोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥
जमला सारा निसर्ग मेळा फुलून तबकात
चला उधळू या पुष्पसमुहा “त्या मंदिरात”॥
“तुझेच” सारे “तुज” अर्पिते स्विकार “तू” करावा
ओंकाराच्या नादातच हर दिन माझा सरावा ॥२॥
श्वास, ध्यास मनी, मम आस दर्शनाची
मज लाभले सौख्य जन्मी या तुला पाहण्याचे ||
विठेवरी तू उभा राहशी नाव तुझे विठ्ठल
पांडूरंग हा भरुन राहिला सार्या विश्वात ॥३॥
👏🥀🌺😊☘🌸😊🌻🌾🙏
3 Responses
उत्तम लिहले आहे.
Thank you sri ram sir for your boosting comment. 🙏
Thank you for sharing this insightful article! I found the information really useful and thought-provoking. Your writing style is engaging, and it made the topic much easier to understand. Looking forward to reading more of your posts!