ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला सारा निसर्ग मेळा फुलून तबकातचला उधळू या पुष्पसमुहा “त्या मंदिरात”॥“तुझेच” सारे “तुज” अर्पिते स्विकार “तू” करावाओंकाराच्या नादातच हर दिन माझा सरावा ॥२॥ श्वास, ध्यास मनी, मम आस दर्शनाचीमज लाभले सौख्य […]