तेज गोळ्याच्या प्रखरतेला
काळ्या ढगांनी रोखले
लाही लाही वजाती होऊन
धरेवर गंधीत मोगरे फुलले
हट्टाला पेटलेल्या सविताने
काळ्या मेघांचे पाणी पाणी केले
ध्वनीचा वेग प्रकशाहून हळू
कडाडते विज ढग लागले गळू
टक्कर देत मेघ खाली आले
धारा बनून झरझर बरसले
बरसणे धारांचे तालातोऱ्यात
शुभ्र होड्या तरंगल्या पाण्यात
तप्त धरेवर टप टप वाजंत्री खूप
आसमंती विरतोय मातीचा धुप
शुभ्र मोगऱ्याचा गंध लई भारी
दुर विराजली इंद्रधनुची स्वारी
काळ्या ढगांना सोनेरी फेटा
मधुनच भानू किरणांना वाटा
पावसाच्या थेंबाना सोनेरी साज
झाडा वेलींचे सचैल स्नान आज
ranjanarao.com





