पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1

खास मागणीस्तव 🙏
तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वाले
नुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले आहे. www.ranjanarao.com वर

लग्न म्हणजे चांदण्या रात्री हातात हात घालून फिरणे, एकमेकांच्या ओढीने झुरणे.

जन्मजात रक्त – नात्याच्या

भेटीसाठी माहेरच्या

ओढीने मन भरारी घेणे.

जुन्या आठवणीत लोळणे

नव्या संसारात रूळणे.

सासरच्या जोडलेल्या नीत

नव्या नात्याची उकल होणे.



मन भिरभीरतं, कॉन्फयुजन वाढतं. बरे, वाईट सारे संयमने लागते घ्यायला. जीभ घसरू नये, शब्द ठिणगाऊ नये, ओठ शिवू नये, उचलली जीभ लावली… होऊ नये, कोंडमारा होऊनये, एकाला जपताना दुसरा अश्रूळु नये. हळद आणि मेहंदी फिकी झाली की वेगळे रंग चढवायची गरज असते. प्रेमाच्या तडक्या बरोबर राई फडफड उडायला हवी आणि खमंग तडक्याचा वास दरवळायला हवा. डिग्र्या घेतानाचे वेळेचे मॅनेजमेंट इथे पण ऍपलाय करायला हवे. काय करु 🤔❓️ कस करु  😌😌❓️ काय बोलू❓️ काय घालू❓️ काय रांधू  ❓️कसं सर्वाना प्रेमाने बांधू❓️ प्रेम बंधन नसावे तणावपूर्ण, हसावे निर्मळ अन खळखळून. पण होतं का असं❓️ निश्चितच होईल. पण केव्हा ❓️ माझे विचारमोती असतील जवळ तेंव्हा…. अशावेळी फक्त एक मैत्रीण हवी विश्वासाची, ऐकणारी, संभाळणारी, गुंता सोडवणारी आणि इकडचे तिकडे न करणारी. संधीच सोनं बनवायला मदत करणारी…


वाचन -विचार – आचार..1

‘खूप प्रेम आहे तुझ्यावर’ म्हणून नवरोबाला पेस्ट लावलेला ब्रश हातात द्याल 🤣 आणि मेहनतीने त्याच्या आईने स्वावलंबी बनवलेल्या मुलाला लाडोबा आणि आळशी नवरा बनवायला कारणीभूत व्हाल.  प्रेम व्यक्त करताना तो  शंभर टक्के तुमच्यावर अवलंबून राहिल तर तुम्ही तुमचं  स्वतःचे भविष्य निश्चितच अपंग बनवाल. चांगल्या सवयी मेहनतीने लागतात.


वाचन -विचार – आचार.. 2

‘आता नवे दिवस संपले, घ्या पोळपाट लाटणे हातात’ असं म्हणायला लावू नका, पण सर्व स्वयंपाकाची जबाबदारी घेण्याची घाई करू नका. चांगल्या गोष्टींची सवय मेहनतीने लावून घ्यावी लागते. वाईट गोष्टी काहीच मेहनत न करता अंगवळणी पडतात. स्वतःवर जबाबदारी घेताना समोरच्याला बेजबाबदार करू नका. तुमचं नुसतं सर्व भांडी घासणे पण भांड्याला भांडी लावणार होऊ शकतं.  घर ताब्यात घेतल्याचा feel समोरच्याला होऊ शकतो. 🤣


वाचन -विचार – आचार.. 3

तुमचे आई, वडील, भावंडांवर खूप प्रेम असले तरी अतीउल्लेख टाळा आणि त्यांच्या फक्त चांगल्या गोष्टी प्रसंगनुरूप share करा. तुम्ही आदर ठेवाल तर समोरचे ठेवतील. कांही गोष्टी न share केलेल्याच बऱ्या. वेळ बदलते आणि संदर्भपण बदलतात (जसे तुमचे आई, बाबांशी, भावंडांशी, खास मैत्रिणींशी झालेले वाद, त्यांच्या आयुष्यातील खूप खाजगी गोष्टी,  चुका ई. )


वाचन – विचार – आचार… 4

‘First impression is last imprssion’ म्हणून
‘अहो आईला’ लगेच ‘अगं आई’ बनवायचा प्रयत्न करू नाका. तुम्ही दोघांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला स्वतःकडे वळवलंय.  लोणचं मुरायला वेळ लागतो तसचं नात्यांचं पण असतं.


वाचन – विचार – आचार..  5

लग्न हे बंधन असतं. नाते प्रेमाने,  सहवासाने, ओढीने  निर्माण करावे लागते. बंधनं घालून, अटी लादून, हे कर, ते करू नको, असं वाग, तसं वागू नको असं सांगणं म्हणजे शरीराने जवळ असणे पण मनाने कोसो दूर करणे होय.

स्टेप -2 मध्ये, तुमच्यासाठी नवीन विचार घेऊन येत आहे.😊🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More