र ला र, ट ला ट जोडून
रटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.
उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;
अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच उभे करणाऱ्या; मनात, तनात आसमतात झटक्यात बदल करण्याची निर्मिती क्षमता जी वाहते ती कविता.
सरळ, साध्या, ओघवत्या भाषेतून वाचकाला स्वतःचीच कृती असल्याचा भास निर्मिती करते ती कविता.
मनभर तुडुंब भरलेल्या आणि हवेच्या झुळूकेने प्रवाही होणाऱ्या शब्दरूप भावना म्हणजे कविता. भाव – भावनाचा जबरदस्त उमाळा; सुयोग्य अन् उत्कृष्ट शब्दांद्वारे गेयता पकडून प्रसवणं म्हणजे कविता.
मीच मला भावते, मीच मला वाचते, मीच मला गाते, मीच मला आकळते, मीच मला अनुभवते. मी म्हणजे ती, ती म्हणजे मी
काय म्हणावे या स्थितीला?
काव्य जगणे म्हणावे या स्थितीला.
ranjanarao.com
Ranjana Rao