पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2


खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….
सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी ही महत्वाची चीज…
आणि
नोकरी करत असताना फक्त पैशाच्या समस्येला तोंड देणारे नोकरदार आपण रोज पाहतो. भाग एक मध्ये उदाहरणा दाखल, दैनंदिन जीवनातील कांही व्यक्तिरेखांचा उल्लेख केला होता. आर्थिक तंगी सहन करताना मातृ भावनेची ओढाताण पहिली. सामाजात होत असलेला बदल, जागतिक अर्थकारणाचे नगरी आणि गावं पातळीपर्यंतच्या लोकांवर होणारे परिणाम आणि माणसांचे बदललेले जीवनमान आणि बदललेली जीवन मूल्ये आपल्याला दिसून आली. सर्वात जास्त परिणाम झाला तो नाते संबंधावर. कांही गोष्टी स्वीकारताना कांही गोष्टी सोडाव्या लागतात अन्यथा मधल्या मध्ये कुतरओढ होते. पण नेमक काय सोडायचं आणि काय जोडायचं हे व्यवस्थित समजलं तर त्यामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी साहजपणे स्वीकारली जाते. “माणूसपण” हे त्यातलंच सर्वात महत्वाचे जीवनमूल्य आहे यात कोणाचेही दुमत असणार नाही. काय असतं हे “माणूसपण” ❓️
“माणूसपणाला” एव्हढे महत्व द्यायला हवे का ❓️
“माणूसपण” नसल्याने खरंच कोणाचे काही बिघडणार आहे का ❓️ जर “माणूसपण” हे मूल्य प्राथमिक आणि तेव्हढेच महत्वाचे मूल्य असेल तर तें माणसापासून दूर कसे होऊ शकते❓️ या साऱ्याचा विचार करताना आपल्यासमोर अशा कांही घटना घडतात आणि पुनश्च आपला “माणुसकीवरचा” विश्वास दृढ होतो. हे चक्र फ़िरत राहिले होते, फ़िरत आहे आणि फ़िरत राहणार. “यदा यदा ही धर्मस्य…” प्रमाणेच. मला कांही वेळेला राग यायचा. ग्लानिर्भवती असताना का ❓️ ग्लानी येऊच नये असा उपाय का नाही ❓️ “त्याला” घाणीत, व्यवस्था ग्लानीत असताना, मलीन वेळीच का जन्म घ्यायचा असतो ❓️ पापाचा घडा पाहिजेच कशाला ❓️ पापाचा घडा भरायची वाट का पाहायची❓️ या साऱ्या गोष्टी इथे चर्चा करण्याची आवश्यकता आहे का❓️ असा प्रश्न इथे विचारावा वाटेल. साहजिकच आहे असा प्रश्न मनात येणे. पण सजग पणे विचार केला की आपल्याला नक्कीच पटेल.

भांडणं दोन गोष्टींमुळे होतात. त्यातली एक गोष्ट, ज्याच्या बदद्ल आपण वाचत आहात. ती म्हणजे पैसा. पैसा आणि त्याचे उपयोग या बद्दल सर्वाना माहित असते. लहानपणी, येरे येरे पावसा, तुला देतो पैसा… इथून आपण “त्याला” ओळखतो. इथे पावसाला; पैशाची लालच दाखवतो. म्हणजेच लाच देण्याची तयारी दाखवतो. पैसा देऊन किंवा पैशाची लालच दाखवून कोणतही काम करून घेऊ शकतो, याचे बाळकडू त्या बडबड गीतातून मिळतात का ❓️ काहीतरी लालूच दाखवले तर काम केले जाते. अगदी असेच कांही नाही. मनुष्य सामान्य असो किंवा असामान्य असो “तो” सर्वाना हवा असतो, अगदी शेवट पर्यंत.
म्हणून सुरुवातीला मी उल्लेख केला जागतिक पातळीवरील घडामोडीचा परिणाम शहरी भागा पर्यंत, गावं – खेड्यापर्यंत पोहोचताना परिणाम दृश्य स्वरूपात होताना दिसतात. भावनिक, कौटुंबिक, व्यावहारिक, सामाजिक पातळीवर उलथा – पालथ होते. आपलं भावविश्व ढवळून निघतं. अचानक कुठे तरी, कांही तरी घडते आणि ‘होत्याचे नव्हते’ अशी अवस्था प्राप्त होते. असेच कांहीसे प्रातिनिधीक प्रसंग…
$$$$$$$$$
मोठे व्यापारी असलेल्या, देसाई कुटुंबियांच्या घरातून
हल्ली पोळी भाजीच्या डब्ब्यांची डिलिवरी का होते❓️


संदेश देसाईंनी पारंपरिक व्यवसायात लक्ष्य घालून केलेल्या मेहनतीला फळं आले. छोट्याशा व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले. अपार मेहनतीचा परिणाम दृश्य रूपात पाहून सारेच सुखावले. व्यवसायात मस्त बस्तान बसले. संदेश आपल्या विधवा बहिणींची जबाबदारी कुरकुर न करता पेलत असतो. अस्थमाची पेशंट असलेली पत्नी, पाच बाळंतपणामुळे 🧔👨🧑👧👶खंगलेली दिसत होती. व्यवसायीक उत्पन्नाला शेतीवाडीच्या उत्पन्नाची जोड
असलेलं खूप सदन कुटुंब म्हणून देसाई सर्व परिचित होते. आर्थिक सुबत्ता असते. मेहनतीला यशाची झालर असते. सर्वार्थाने यशस्वी व्यक्ती आणि कुटुंबं अशी समाजात प्रतिमा तयार होते. हुशार मुलांनी वडिलांच्या मेहनतीचं चीज केलं. सारं सुरळीत चालू होते.

धंद्याच्या निमित्ताने एका जागेवर बसून काम करून स्थूल आणि सुस्त झालेले संदेशजींचे शरीर चालवायला, हृदयाने♥️💔 हयगय केली आणि सुरु झाली कुटुंबाची फरपट. मोठ्या मुलाने जिद्दीने शिकून खूप चांगली नोकरी मिळविली. दोन नंबरच्या गगनने दहावीनंतर शिक्षणाला रामराम केला आणि आपल्या मित्राच्या शेतात राहायला गेला. गगनला आजारी बापाची, अस्थमाची पेशंट असलेल्या आईची आणि अभ्यासात हुशार लहान बहिणी आणि भावाची चिंता वाटली नाही. संदेशजिंचा म्हणजे वडिलांचा व्यवसाय पुढे चालवावा असे अजिबात वाटले नाही. या संकटावर कडी की काय, “कसेल त्याची जमीन”, अंतर्गत वाटेकऱ्यान कुळ कायद्यात जमीन हडप केली. देसाई कुटुंबाची फरफट सुरु झाली.
आता परीक्षा होती कुटुंबातील स्त्रियांची. विधवा नणंदेला बरोबर घेऊन गगनच्या आईने पदर खोचला आणि आपल्या कुटुंबासाठी उभी राहिली. प्रश्न प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा होता. घरातून पोळीभाजीच्या डब्यांचा छोटा व्यवसाय सुरु झाला. आज दिवसाला वीस हजाराचा टर्नओवर असलेला घरगुती व्यवसाय सुरु झाला. मेहनतीला पर्याय नाही. कष्ट करून मिळविलेल्या जेवणाची चव अमृततुल्य असते.
मोठे व्यापारी असलेल्या, देसाईंच्या कुटुंबातून पोळी बाजींचे डब्बे जातात. सगळे व्यवस्थित सावरले. जीवनात चड उत्तर तर येतच राहणार, हिम्मत सोडायची नाही ‼️

📓📒📋📜📄✒️✏️📝📃📜📄✏️✒️📝📓📒

इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळेतून महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शाळेत आपल्या मुलांना श्रीयुत पाटकर या उद्योगपती कुटुंबियानी का ट्रान्सफर केले❗️❓️

पाटकर कुटुंबियांना न ओळखणारा मनुष्य विरळाच. एकत्र कुटुंबाची मुळे कौटुंबिक स्थरावर घट्ट पक्कड निर्माण केली होती आणि ही कौटिम्बिक माजुबत एकी, परंपरागतपणे पुढे पण चालू राहिली. कुटुंबाच्या एकीत कोणीही फूट पडू शकत नव्हते. भावनिकतेच्या भक्कम पायावर उभी असलेली पाटकर कुटुंबाची इमारत आतून, बाहेरून मजबूत होती. जशी घरात भावंडांची एकी तशीच बाहेर उद्योगात पण एकी. या कुटुंबाने दोन्ही समज खोटे ठरवले. महाराष्ट्रीयन व्यक्ती उद्योग धंद्यात मागे असतात आणि भावंडात भांडणे होऊन घरात आणि उद्योगात फूट पडते. एक नाही दोन, दोन आदर्श देणारे आणि पूर्वग्रह दूर करणारे कुटुंब. भावंडांपैकी एक भाऊ परदेशात गेला. आपल्या कामाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवून साता समुद्रापार कीर्ती मिळविली.

अन्न शुद्ध का हवे ❓️

जग फिरल्यानंतर आपल्या लोकांचे महत्व जास्त समजतं. आपला गावं, आपला देश, आपलं शिक्षण, आपले संस्कार आणि आपल्या साऱ्या गोष्टी किती महान आहेत, विविधतेत एकता म्हणजे नेमकं काय ❓️ पानात असलेलं षड्रस अन्न नेमकं काय सद्य करते ❓️ सण, उत्सवाचे महत्व आणि अर्थ काय ❓️या साऱ्या गोष्टींच्या तळाशी जाऊन त्या पाठीमागचे विज्ञान पहिले की थक्क व्हायला होतं. आपल्या संस्कृतीचे गोडवे इतर देशात गायिले जातात. आपला उर अभिमानाने भरून येतो.
अन्न संस्कार करते म्हणजे काय गं आजी❓️ या लहानग्या समूच्या प्रश्नाला आजीने गोष्टीतुन उत्तर दिले.
🍚🥟🍚🥟🍚🥟🍚🥟🍚🥟

अन्न संस्कार करते म्हणजे नेमके काय ❓️


एका बैराग्याने नेहमी प्रमाणे दुपारच्या वेळी दरात उभे राहून आरोळी दिली. “ओम भवती भिक्षां देही माते ||”
आवाज ऐकून यजमान बाहेर आले. पण भिक्षा मिळाली नाही. “बैरागी बुवा, आज तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्यावी. तुमच्या सहवासाचा लाभ द्यावा आणि आमची सेवा घ्यावी❗️” यजमानांनी अतिशय नम्रपणे बैरागी बुवांना विनांती केली.
कोणाच्या घरी जाण्याचा मोह टाळणाऱ्या बुवांना यजमानांनी अतिशय आग्रहाने जेवणासठी थांबवून घेतले.
स्वच्छ धुतलेल्या हिरव्यागार केळीच्या पानावर सुग्रास जेवणाचा थाट भुकेची भावना चाळवत होता. केळीच्या पानाभोवती सुंदर रांगोळीची कमान रेखाटली होती. बाजूला सुगंधित अगरबत्तीच्या धुराची वलये वेगवेगळे आकार धरण करत वर जाता जाता सुंगंध पसवरत संथपणे लुप्त होत होती. चटणी, कोशिंबीर, पापड, लोणचे डाव्या बाजूला वढले गेले. भाजी, आमटी उजव्या बाजूला वाढली. मध्ये भात, पुऱ्या वाढून शुभ्र भातावर पिवळं गोडं वरण वाढून वर तुपाची धार धरली. यजमानांबरोबर बुवा मांडी घालून पानासमोरच्या पाटावर बसले तेंव्हा पानासमोर चांदीच्या वाटीत खीर ठेवली. अतिशय सुग्रास भोजन, यजमान कुटुंबीयांचा आग्रह आणि दुपारच्या वेळी सपाटून लागलेली भूक सर्वांनी पोटभर जेऊन वर खीर खाल्ली. यजमानांनी पान – सुपारीसह दक्षिणा दिली.
भोजन करून निघताना; अघटित घडले बुवांच्या हातून.
पण बुवांचा ना स्वतःच्या हातावर ताबा होता ना मनावर. बुवा आपल्या मठीत निघाले
दुसरे दिवशी बुवा परत त्याचं दरात उभे राहून आपल्या हातातील काठी जोरात जमिनीवर टेकवत,
“अलssखss निरंजन‼️” बोलले. तसें यजमान, यजमानीण बाहेर आले. त्यांनी बुवांना नमस्कार केला. यजमानीण आता गेल्या. बुवांनी यजमानांना प्रश्न❓️ विचारला.
काल मला, जें जेवण वाढलेत तें अन्न आणि खिरीची वाटी तुम्ही कसे मिळवलेत ❓️ मला कृपा करून खरं खरं उत्तर सांगा. बैरागी बुवांना खोटं कसं बोलणार? मग हृदयावर हात ठेऊन यजमानांनी खरं सांगितलं. “तें सारे चोरीच्या पैशाचे होते. आणि चांदीची वाटी ती पण चोरून आणली होती”. एका दमात यजमानांनी सत्य सांगून टाकलं. आणि कालच्या अघटित घटनेचा बुवांना उलघडा झाला. सर्व संग परित्याग करणाऱ्या माझ्या सारख्या संन्याशाला चांदीच्या वाटीचा मोह का झाला❓️ दक्षिणा आणायला गेलेल्या यजमानांचा डोळा चुकवून अगदी इतक्या सहजपणे चांदीची वाटी आपल्या झोळीत टाकली की बुवांच्या एका हाताने केलेले कृत्य दुसऱ्या हाताला कळले नाही. पण…. पण अन्न नैसर्गीक पणे पोटातून निघून गेले तेंव्हा बुवांना जाणवले की, आपल्या हातून
हे चुकीचे कृत्य घडले. बैरागी बुवांनी ठरवलं की यांच्या मुळाशी जायचं. म्हणून आज बुवांनी यजमानांना प्रश्न विचारला. आपल्या कृत्याचे उत्तर मिळाले बुवांना. बुवांनी आपल्या भगव्या झोळीतून चांदीची वाटी यजमानांच्या हातात ठेवली आणि आपली पावले पुढे जाण्यासाठी वळविली. “बैरागी बुवा; आपली भिक्षा…” म्हणत बाहेर आलेल्या यामानींण बाईंचे शब्द तोंडातच विरले. बैरागी दूर गेले होते आणि यजमान हातात चांदीची वाटी घेऊन निश्चलपणे अंगणात उभे होते.
समृद्ध : “आजी, मॉरल ऑफ द स्टोरी इज…
कोणाचे अन्न फुकट खाऊ नये.” आणि…”मेहनतीने मिळवलेले अन्न हे पूर्ण ब्रह्म असते”
आजीने पुस्ती जोडली.

मित्रांना ओढ, भारत भेटीची ‼️

अशा संस्कार क्षम वातावरणात समृद्ध मोठा झाला.
घरात लाडोबा आणि शेंड्ये फळं असलेला समृद्ध मोठेपणी स्वतःची हुशारी आणि मिळालेल्या स्कॉलरशीपवर फॉरेनला गेला. त्याच्या प्रबंधावर खूप मोठ्या बक्षिसाची रक्कम मिळाली. त्याची कीर्ती जगभर पसरली. आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा होता समृद्ध. “ग” ची बाधा झाली नाही. आपला देश, कुटुंबाचा एकोपा, व्यवसायातील प्रगती आणि आपल्या जीवन पद्धती बदद्ल ऐकून समृद्धच्या परदेशीं मित्राना भारत भेटीची ओढ लागली होती.
परदेशात उच्चभ्रू वस्तीत राहत असलेल्या समृद्धच्या करोडपती मित्रांसाठी, भारतात पंच तारांकित हॉटेल मध्ये बुकिंग करून राहण्याची उत्तम व्यवस्था केली. मित्रानी अगदी नम्रपणे पंच तारांकित हॉटेल मध्ये राहण्यास नकार दिला. त्यांना भारतीय एकत्र कुटुंबा मध्ये जाऊन राहायचे होते. त्यांना आजी – आजोबा, आई – बाबा, काका – काकू, आत्या – काका सारे एकत्र राहतात. चार वर्षांपासून ऐंशी वर्षापर्यंतचे सर्व वयोगातील लोकं कायम प्रेमाने एकत्र राहतात. नेमके हेच जाणायच होते. मित्रांना एकत्र कुटुंबातील एकोपा, प्रेम स्वतः पाहायचा होता, अनुभवायचा होता. भारत भेटीचा घाट घालण्याचे तें एक कारण होते.
समृद्ध जेव्हा आपल्या परदेशीं मित्रांना घेऊन घरी आला तेंव्हा वेगळे दृश्य पाहायला मिळाले. समृद्धचे आई वडील
तीर्थाटनाला गेले होते. फॉरेनहुन काका आणि मित्र येणार म्हणून घरातील तरुण पिढी भलतीच खूष होती. आदरातिथ्य अप्रतिम पद्दतीने केले गेले. सर्व मुलांच्या वेगळ्या वेगळ्या रूम्स होत्या. मुलांच्या रूम मध्ये जाण्यापूर्वी पूर्व परवानगी घ्यावी लागायची. खाण्यामध्ये जंक फूडचा मारा जास्तच होता. कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांच्या रूम मधून येणारा सिगारेटचा वास, तल्लफ आलीतर गुपचूप पणे पिण्यासाठी कपाटातील कपड्या पाठीमागे विदेशी दारूच्या बाटल्या ठेवणारे पुतणे आणि भाचे, आणि सवंग हिंदी चित्रपटात असतात तसें तोकडे कपडे घालणाऱ्या पुतण्या, आणि भाच्या. समृद्ध, स्वतःच्या घरातील नव्या पिढीला लागलेली कीड पाहून हैराण झाला. अवघड जागेच दुखणं. कोणाला सांगू शकत नाही आणि झाकून ठेऊ शकतं नाही. समृद्धने अंदाज घेतला. बहिणी आणि वाहिनीशी बोलल्यानंतर कांही गोष्टींचा उलघडा झाला. पूर्ण विचारा अंती त्याने शक्कल लढविली.
दादा – वहिनी आणि बहिणी आणि भाऊजींच्या मदतीने शक्कल लढवली. एक प्लॅन तयार केलं.
काय असतील समृद्धच्या आयडिया?
त्या साऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
साप तर मरायला पाहिजे पण लाठी तुटता कामा नये. वहिनीं, बहिणींना सतावणाऱ्या प्रश्न आणि त्यावर मुलांचा लाडका काका, मामा, वहिनींचा दीर आणि बहिणीचा भाऊ, समृद्ध करेल का चिंता दूर ❓️ असमृद्धीचा दुर्गंध दूर जाण्या अगोदर सुगंधित समृद्धी येईल का घरी आणि सुगन्ध पसरेल का दिगंतरी ❓️

माणूस हा प्रथम प्राणी होता आणि नंतर समाजशील प्राणी झाला. चांगला व्यक्ती असण्याची व्याख्या काय❓️ आपल्या कडे कोणाचे लक्ष्य असो किंवा नसो खूप साऱ्या लोकात असो किंवा एकांतात असो, लहान बाळासमोर असो किंवा मोठ्या माणसांसमोर आपण प्रत्येक ठिकाणी वेगळे वागत असतो. दाखविण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे का असतात❓️
एकांतात वाईट वागत आणि वाईट विचार करत नसलो तर आपण नक्कीच चांगले आहोत असे समजू शकतो. चांगल्या आचाराची व्याख्या तशीच विचाराची पण.

फक्त आपल्याकडे कोणाचे तरी लक्ष्य आहे म्हणून चांगलं वागण्याचे नाटक करणाऱ्या मुलांना समृद्ध खरंच कांही समजावणार की, खडसावून जाब विचारणार की, गप्प बसणार ❓️❓️❓️ समृद्धच्या डोक्यात कांही वेगळं शिजत आहे का ❗️❓️

कोणाशीही न बोलता समृद्धने आपल्या मित्र मांडळी, बच्चे कंपनी आणि कुटुंबातील सर्वासाठी पहिली सरप्राईज ट्रिप आयोजित केली. खुप दूर नाही, साधारणपणे शंभर एक किलोमीटरवर असलेल्या जवळच्या शाळेत. त्या बद्दल फक्त समृद्ध आणि त्याचा बाल मित्र अनिल यांनाच माहित होते. कोसो दूर राहूनपण अनिल आणि समृद्ध या दोन बालपणीच्या मित्रानी हृदयात जपलेली मैत्री आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली होती. त्यांच्या मध्ये गुपचूप, गुपचूप काय चालले होते नेमके? तें कोणालाच माहित नव्हते.

विस्मरणातील स्मरण गीत ‼️

पहाटे सहा वाजता अतिशय उत्साहाने तयार झालेल्या बच्चे कंपनीने जेव्हा बंगल्याच्या आवारात नॉन ए. सी. लाल – पिवळ्या रंगाची बस पहिली तेंव्हा ओठ वाकडे करून नाकं मुरडली. काका म्हणजे अगदी असाच आहे. आपल्या मित्रांना अशा लाल डब्यातून घेऊन जाणार ❓️ धूळ, वारा, ऊन किती त्रास होईल सर्वाना❓️ पण समृद्धची मित्र मंडळी लगेंचच गाडीत जाऊन बसली. नेहमी शाळा – कॉलेजला आणि बाहेर फिरायला जाताना ए. सी. गाडी शिवाय बाहेर न पडणारे पुतणे आणि भाचरं नाईलाजाने बस मध्ये चढली. पाठोपाठ दादा – वहिनी, बहिणी – भावोजी आले. पहाटेचा अल्हाददायक गारवा बरा वाटला सर्वाना. मित्र मंडळीं बरोबर सारे कुटुंबं एकत्र होते. वेगळे वाटतं होते सर्वांनाच. समृद्धला आपल्या कॉलेज ट्रीपचा धुमाकूळ आठवली. समृद्धने मस्त पैकी धून वाजवली आणि टाळीचा ठेका धरत स्मरण गीत सुरु केलं आणि साऱ्यांचा मूड बदलला. स्वतःपासून सुरु करत गाण्यामध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेतले इतर सर्वानी साथ द्यायचे ठरविले. विस्मरणात गेलेले स्मरणगीत, आजूबाजूची समृद्ध हिरवीगार 🥬🥦🎄🎋🌄शेती, गुरे🐄🐃🦙🐂, वासरे, शेळ्या🐂, मेंढ्या, 🐹कोकरू आणि भातशेती, पेरू, 🍏केळीच्या🌽🍌 बागा, नारळीच्या झाडांच्या रांगा, रानफुले 🎋🎋आणि मधूनच झुळकेबरोबर भातं शेतीतुन येणारा भाताचा सुग्रास वास…
विस्मरणात गेलेले स्मरणगीत
समृद्ध : कोकणची म्हातारी लेकीकडे चालली.
कोरस : कोकणची म्हातारी लेकीकडे चालली
समृद्ध : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा लेकीकडे चालला.
कोरस : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा लेकीकडे चालला.

मध्येच ईशा, समृद्धला साथ देण्यासाठी उठून पुढे आली.

समृद्ध – ईशा : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा लेकीकडे चालला.
कोरस : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा लेकीकडे चालला.
समृद्ध, ईशा : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा, मुलग्याची बायको लेकीकडे चालली.
कोरस : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा, मुलग्याची बायको लेकीकडे चालली.

समृद्ध, ईशा : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा, मुलग्याची बायको, बायकोचा मुलगा लेकीकडे चालला.
कोरस : कोकणची म्हातारी, म्हातारीचा म्हातारा, म्हाताऱ्याचा मुलगा, मुलग्याची बायको, बायकोचा मुलगा लेकीकडे चालला…….
……
“समु 🤠मामा, समु 🤠मामा माझे झटपट गीतं ऐक ना प्लिज ‼️🙏” निखिलने 🙇‍♂️काकाला हात जोडून विनंती केली.
हं बोलो निखील भांजे. तुम गीत भी लिखते हो और वो भी झटपट ‼️❓️ सुनाओ भाई सुनाओ |
तुम्हारा झटपट गीत फट से सुनाओ…

निखिल ने प्रश्नार्थक मुद्रा आणि हातवारे करत आपल्या समृद्ध मामाला आणि मामाच्या मित्राला उद्देशून आपले झटपट गीत सुरु केले.
फॉरेनचा समु मामा🤠 आम्हाला कुठे घेऊन निघाला ❓️ कुठे घेऊन निघाला❓️ कुठे घेऊन निघाला👣 ❓️

फॉरेनचा समु मामा 🤠आम्हाला कुठे घेऊन निघाला ❓️समु मामाचे मित्र 👮👮‍♂️आम्हाला, कुठे घेऊन निघाले👣🚒 ❓️❓️
समृद्ध : स्मार्ट बॉय, भांजे ‼️‼️
इट्स सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईझ. वेट फॉर ए व्हईल, वेट फॉर ए व्हईल…

छोटी ईशा 👧गप्प कशी बसेल. तीने आपल्या स्कुल मध्ये शिकलेले गाणे म्हणण्यासाठी आपल्या हातात छोटी पाण्याची बाटली🎤 माईक सारखी पकडली. समृद्ध🤠 काकाला आणि बस मध्ये समोर बसलेल्या सर्वाना उद्धेशून बोलली. मय नेम इज ईशा👧. नाऊ आय विल्ल सिंग इंग्लिश सॉंग. प्लीज फॉलो मी.
🦙🦙🦙🦙
ईशा : मेरी 👸हॅड अ लिट्ल लॅम्ब, लिटल लॅम्ब, लिटल लॅम्ब,
मेरी 👩‍हॅड अ लिट्ल लॅम्ब🦙, लिटल लॅम्ब, लिटल लॅम्ब,
कोरस : मेरी हॅड अ लिट्ल लॅम्ब, लिटल लॅम्ब, लिटल लॅम्ब,
मेरी हॅड अ लिट्ल लॅम्ब, लिटल लॅम्ब, लिटल लॅम्ब,

ईशा : मेरी हॅड अ लिट्ल लॅम्ब ,
इट्स फ्लीस वॉज व्हाईट ऍज स्नो.
कोरस : मेरी हॅड अ लिट्ल लॅम्ब ,
इट्स फ्लीस वॉज व्हाईट ऍज स्नो.

ईशा : एव्हरी व्हेअर दॅट मेरी वेन्ट, मेरी वेन्ट,
एव्हरी व्हेअर दॅट मेरी वेन्ट
दी लॅम्ब वॉज शुअर टु गोsss.
कोरस : एव्हरी व्हेअर दॅट मेरी वेन्ट, मेरी वेन्ट,
एव्हरी व्हेअर दॅट मेरी वेन्ट
दी लॅम्ब वॉज शुअर तो गोsss.

ईशा : इट फॉलोड हर टू स्कुल वन डे, स्कुल🏠🏡🏠 वन डे
इट फॉलोड हर टू स्कुल वन डे,
इट वज अगेन्स्ट द रुssssल.
कोरस : इट फॉलोड हर टू स्कुल वन डे, स्कुल वन डे
इट फॉलोड हर टू स्कुल वन डे,
इट वज अगेन्स्ट द रुssssल
ईशा: इट मेड द चिल्ड्रेन🤣😂 लॉफ अँड 🤸‍♀️🤸‍♂️प्ले, लॉफ अँड प्ले, टू सी अ लॅम्ब अँट स्कुsssल.
कोरस : इट मेड द चिल्ड्रेन लॉफ अँड प्ले, टू सी अ लॅम्ब अँट स्कुsssल.

😁🤣😂🤸🤸‍♂️🤸‍♀️🤣😂🤣🤸🤸‍♀️
सर्वांच्या साथीने लिटल लॅम्बने मस्तच सूर पकडला होता.

पाच वर्षाचा जीत ईशाच्या हातातील बाटली🎤 घेऊन तिची कॉपी करू लागला. धावत्या बस मध्ये चालत पुढे जाऊन उभा राहिला तसा बाजूला बसलेल्या समृद्धचा मित्र, मॅकने उभं राहून त्याला आधार दिला. आपला एक हात मॅक अंकलच्या हातात देऊन दुसऱ्या हातातील पाण्याची बाटली🎤 तोंडासमोर धरली.
आपल्या कोवळ्या आवाजात….

ओल्ड मॅक डोनाल्ड हॅड अ फार्म
ई आय ई आय ओ
अँड इन हिज फार्म ही हॅड सम काऊज🐂
ई आय ई आय ओ
हिअर मू ss देअर अ मू sss🐂
एव्हरी वेअर मू ss मू ss….🐂

आणि पाहिलं सॉंग पूर्ण नं कारता…

द व्हीलस् ऑन द बस🚌 गो राउंड अँड राउंड
राउंड अँड राउंड🚌
राउंड अँड राऊंड
द व्हीलस् ऑन द बस गो राउंड अँड राउंड
ऑल ‘राउंड द टाऊन
हावभाव आणि जोशात झालं.

चार वर्षाच्या सिमरनने ओरडून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले तेंव्हा सर्वाना आश्चर्य वाटले.
पण तिच्या छोट्या तोंडातून मोठ्याने आवाज आला तेव्हा तिच्याकडे लक्ष्य देणे भाग पडले.

वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह
वन्स आय कॉट अ फिश🐋 अ लाईव्ह
सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन
देन आय लेट इट गो अगेन…🐬
आणि गाणे संपता संपता गाडी गेटच्या आता शिरली….

शाळेचे वेगळेपण

अचानक समोर शाळा पाहून सर्वाना आश्चर्य वाटलं. समोर समृद्ध काकाचा मित्र अनिल काकाना🕺 पाहून मुलांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला.
समोर शाळेच्या हॉलला दिलेले नाव पाहून लहान, मोठे सर्वच आश्चर्य चकित आणि उत्सुक झाले.
स्वर्गीय श्री दादोबा पाटकर हॉल, स्वर्गीय श्रीमती वंदना पाटकर ग्रंथालय असे मोठ्या अक्षरांत लिहिले होते.
अरे हे तर आपल्या ग्रेट ग्रँड फादर आणि ग्रेट ग्रँड मदरचे नाव आणि त्यांचे फोटो आहेत.
हे पाहात असताना पाठीमागून गाडीचा हॉर्न वाजला. सर्वांनी वळून पाहिलं तर गाडीतून आजोबा उतरले होते आणि आजीला गाडीतून उतरण्यासाठी पाठचा दरवाजा उघडुन दिला.
सर्वाना आनंद झाला. “आजीss, आजोबा sss “👩‍👧‍👧👩‍👧म्हणून बच्चे कंपनी धावत जाऊन बिलगली.
“काय रे समू, कसा आहेस तू ❓️ वाळलास रे पोरा” म्हणून आईने तोंडावरून हात फिरवताना समृद्दचे डोळे आणि मन भरून आलं. आई आणि बाबांच्या चरणांना स्पर्श करत,
“बाबा तुमच्या हातून हॉलचे उदघाटन आणि आईच्या हातून ग्रंथालयाचे उदघाटन करायचं आहे,” समृद्ध बोलला.
फ्रेश होऊन सर्वजण शाळेचा परिसर पाहण्यासाठी वळले.

समृद्धचा मित्र अनिल, यांनी सर्वांची ओळख करून घेतली. स्वतःची ओळख करून दिली. शाळेच्या प्रवेश द्वारापासूनच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची कल्पक दृष्टी दिसत होती. कोयनेलच्या झुडुपाला वेगवेगळ्या आकारातील प्राणी, पक्षी 🐂🦙🦍🐒🐕‍🦺🦓🐄 🦜🦈🐟🐠🐬🦅🦃🐓🐔🦆यांचे आकार देऊन बनवलेले रेखीव कुंपण मुलांचे लक्ष्य वेधून घेत होते. इंग्लिश मराठी मध्ये प्राण्याची नावे गवताने लिहिली होती. गेटच्या आता येताना गावतने रेखाटलेल्या गणित भूमितीच्या आकृत्या, शाळेच्या भिंतीवर मराठी, इंग्लिश मध्ये लिहिलेले पाढे, ग्रामर, कविता, रंगांची माहिती दिली होती. ग्रह तारे, विज्ञान विषयातील संकल्पाना आणि आकृत्या दिसत होत्या. एका मध्येच बांधलेल्या चौथऱ्याने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. पुढे मुद्दामहून खडी टाकून, खडकाळ रस्ता बनवून घेतला होता. पण पुढे गेल्यावर तो रस्ता खडकाळ का बनवला याचा उलगडा झाला. Rich Dad poor Dad पुस्तकाची ओळख करून देताना रॉबर्ट फ्रॉस्ट यांची “The Road Not Taken ” पोएम लिहिली आहे. मळलेल्या वाटे पेक्षा दुसरी खडकाळ वाट स्वीकारली तर प्रवासाची कल्पना यावी हा उद्देश होता….
रस्त्यावर बाणाकृती चिन्ह काढून लिहिले होते The way to financial literacy ———>
Rich Dad Poor Dad कॉर्नर लिहिले होते. पुस्तकाच्या आकाराच्या चौथऱ्याला सात पायऱ्या होत्या. चारी बाजूनी वर चढता येत होते. प्रत्येक पायरी चढताना एक एक वाक्य लिहिलेलं होत. वाक्य लिहिताना इंग्रजी मराठीचा सारखाच उपयोग केला होता. सारी वाक्ये रॉबर्ट क्यूआसाकी यांच्या पुस्तकातून निवडून घेतलेली होती.

बाजूला मैदानामध्ये क्रिकेट खेळत असलेल्या मुलाने सिक्सर मारला आणि बॉल पहिल्या पायरीवर येऊन थांबला. बॉल पाठोपाठ मुलगा आला. साधारणपणे सहा सात वर्षाचा असेल छोटू. छोटूने बॉल घेता घेता चौथऱ्याच्या पायरीवरचे वाक्य वाचले.
The Poor and the middle class work for money. THE RICH HAVE MONEY AND THE MONEY WORKS FOR THEM .

आपला बॉल उचलून छोटू खेळायला मैदानात निघून गेला.
समृद्धचे मित्रच नव्हे तर सारेच या चौथऱ्याच्या संकल्पनेने खुश झाले.
“It’s not how much money you make. It’s how much money you keep
. चा अर्थ काय समु मामा ❓️” ईशाने प्रश्न विचारला.
“तुझ्या प्रश्नाचे उत्तर शाळेतील मुलंच चांगलं सांगू शकतील,” समृद्धने प्रश्नाचा चेंडू मुलांच्या मैदानात टाकला. तसें अनिल सर म्हणाले “आवश्य, मुले उत्तर देतील. मुलांनी स्वतःची बुक बँक बरोबर money बँक पण उघडलीय. सारे व्यवहार मुलेच सांभाळतात.” आता आश्चर्याचा धक्का कॉलेजला जाणाऱ्या पाटकर कूटुंबातील सदस्यांना बसला होता. चालत चालत पुढे जाताना व्यापार/ बिजनेस असे लिहिलेलं दिसले, तेंथे पण हिरव्या गवताने अक्षरे कोरली होती. आणि बाणाचे —–>चिन्ह करून The way to The Education of The self employment लिहिले होते. पुढे गेले तर चौकोनी आकार, तुकड्यानी जोडल्यासारखे दिसत होते. परंतु मोठा लंब गोल छोट्या छोट्या चौकोनाने जोडला होता. आणि प्रत्येक चौकोनावर शहराचे नाव लिहिले होते तसेच विमानतळ, अग्निशमन केंद्र, खेळाचे मैदान ई. नावे दिली होती आणि प्रत्येक ठिकाणावर त्याची मूळ किंमत लिहिली होती. बाजूला दोन डायस ठेवलेले होते. डायसच्या आठही बाजूवर एक तें आठ आकडे कोरले होते.
खेळाचे नियम बाजूच्या बोर्डवर ठळक आणि स्पष्ट शब्दात लिहिले होते. “इथल्या मुलांना बिजनेस खेळता येतो ?” साशंक मनाने शशांकने प्रश्न विचारला.
मैदानावर खेळून घाम गळणारी मुले बिजनेस खेळतात, भाजीपाला, फळं पिकवतात, विकतात. गार्डन सांभाळतात, विविध स्पर्धेत भाग घेतात. अभ्यास करतात. तें कविता करतात. पत्र लिहितात. मेल करतात. तें बँक चालवतात. व्यापार खेळतात आणि रॉबर्ट सराच्या पुस्तकावर वादविवाद, चर्चा, परीसंवादाचे आयोजन करतात.

हॉल मध्ये ठेवलेल्या दादाजी पाटकरांच्या तैलचित्राला हार घालताना समृद्धच्या बाबांचे मन आनंदाने भरून आले. कोणतीही पूर्व कल्पना न देता, समृद्धने हॉल आणि लायब्ररीच्या बांधकामासाठी लाखो रुपयाची देणगी दिलीच पण स्वतः जातीने लक्ष्य घालून दहा हजार संदर्भ पुस्तके भेट दिली.
रॉबर्ट क्यूयोसाकी यांच्या Rich Dad Poor Dad च्या तीनही माध्यमाच्या पुस्तकाच्या प्रति दिल्या आणि त्यावर आधारित चौथरा आणि बिजनेस गेम मैदानावर बनवण्याची कल्पना सुचवून ड्रॉइंग बनवून पाठवले होते.
अठ्ठावीस मुलांनी मिळून खेळ खेळायची कल्पना पण समृद्धने दिली.
Rich Dad Poor Dad मध्ये पात्रांवर नाटिका लिहिली. हे सारे मुलांच्या मदतीने आणि सहभागाने केले.
ग्रंथालयाच्या उदघाटना नंतर मुलांनी तयार केलेला ड्रामा पाहून, त्यांच्या पराकोटीच्या प्रगल्भतेची प्रचिती आली.

कसे समजावणार रिच डॅड पुअर डॅड ❓️❓️

छोट्या रॉबर्ट पासून सर्व पत्रे समोर पाहताना सर्वाना वेगळाच अनुभव येत होता.
मुलांनी मुलांसाठी बसविलेली मुलांची नाटुकली होती. अनाऊन्सर, आणि ऍक्टर्स, म्युझिक प्लेयर्स आणि डान्स डायरेक्टर्स, डान्सर्स आणि सिंगर्स सारीच मुले होती. सुरुवात चालना देणाऱ्या वाक्याने करत सळसळणारा उत्साह हॉल भरून वाहत होता.
मुलांची लगभग आणि धडपड वाखाणण्या जोगी होती.
मिळालेल्या स्वातंत्र्याचा जबरदस्त सदुपयोग मुलांनी केला होता. त्याला जोड होती मेहनती शिक्षकांची. कौतुक होत पालकांच्या विश्वासाचे.
By birth if you are poor, Its not your fault. If you die as poor person, of course its your fault……, read the book, Rich Dad Poor Dad
Feel the book. Enjoy the characters of
Rich Dad Poor Dad ..

मी आहे रॉबर्ट, रॉबर्ट, रॉबर्ट ssss❗️
I AM ROBERT, ROBERT, ROBERTsss ❗️
मै हूं रॉबर्ट, रॉबर्ट, रॉबर्टsss❗️

गोष्टी सांगेन युक्तीच्या सात. द्याल ना साथ ❓️
तिथे नको कंटाळा, नको जांभई, नको आळस, नको भंकस अन वेळेचा अपव्यय.
Will tell you seven nacks❗️ Are you ready ❓️
There should not be lazyness, neither yawnning nor timepass.
नही चा..हिए आलस्य, कंटाला, नही चाहिए टाइम पास |

रस्ता आहे नवीन, मी दाखवेन रस्ता श्रीमंतीचा.
The Road is new one. I will show you the path to the riches
रास्ता हैं नया | मै दिखाऊंगा रस्ता अमिरिका |

सोपी करून दाखवेन समृदीची वाट❗️ पैसे कसे वाचवायचे, साठवायचे, आणि वाढवायचे.
Your path Will be easy towards prosperity will be easy if you know the art of investing, saving and
increasing Your wealth.
मै पथ दर्शी समृद्धीका❗️ बताऊंगा कैसे रखना हैं, बचाना हैं और संपत्ती कैसी बढानी हैं |

“अरे ❗️ हे तिन्ही भाषेमध्ये नाटकाची सुरुवात का करताहेत समु मामा”, ❓️ छोटी निनू काकाला बिलगून प्रश्न विचारू लागली तसा काकाने स्वतःच्या ओठांवर बोटं ठेऊन न बोलण्या विषयी सुचविले. हळूच आवाजात बोलला, “रॉबर्ट काकांना काय सांगायचं आहे तें ठसविणासाठी नाटुकली मध्ये मुले सुरुवातीला कांही डायलॉग रिपीट करत आहेत”.

रिच डॅड आणि पुअर डॅड झालेली दोन मुले
स्टेजवर येतात आणि आपापले मुद्धे जोशात मांडतात.

पुअर डॅड : मी पकडली वाट रुळलेली. खूप शिकलो. खूप अभ्यास केला. चांगले मार्क्स मिळवले. मी हुशार होतो शाळेत. मला माझ्या शिक्षणाचा अभिमान आहे.

रिच डॅड : शिक्षण तर हवेच. सर्वांनी खूप शिकावे. शिक्षणाला पर्याय नाही मित्रा. “शिक्षण हेच समृद्दीचं लक्षण” यात दुमत नाही मित्रा.
फक्त मी एक गोष्ट वेगळी केली.
मी पण शिकलो शाळेत जाऊन. पुस्तकी ज्ञान घेतलं. डिग्री घेतली. पण त्याचं बरोबर माझ्या घरी शिकलो. तुझ्या कडे नसलेला आणि शाळेत न शिकविलेला विषय.
पुअर डॅड : ए चल, तू काहीही फेकतोस. शाळेतच सगळे विषय शिकवितात. माझ्याकडे नाही किंवा मला माहित नाही असा विषयच नाही. पुअर डॅड मुद्दा खोडून काढत होते
रिच डॅड : मी शिकलो पैशा बदद्ल. जे तू नाही शिकलास. कारण तो विषय शाळेत शिकवत नाहीत. मी पैसा वा च लो. लहानपणापासून हाताळायला शिकलो.
पुअर डॅड : तें तर मी पण शकलो. मी पण लहानपणापासून हाताळले पैसे. आतापण खूप पैसे मिळवतो मी.
रिच डॅड : माझ्याकडे खूप संपत्ती आहे. तीन हॉटेलसं आहेत. कारखाने आहेत. तुमच्या जवळ काय आहे ❓️

पुअर डॅड : माझे घर माझी खूप मोठी संपत्ती आहे, अभिमान आहे मला, माझ्या मोठ्या घराचा.

रिच डॅड : ओळखा तू फरक, जबाबदारी आणि संपत्ती संग्रहामधील. खर्चात टाकणाऱ्या गुंतवणूकींना समजतोस तू संपत्ती.
ती ठरु नये तुझ्या प्रगती मधील आपत्ती
.
काय बोलतोस तू ❓️❓️
कर्ज काढून घेतलेलं राहत घर, स्वतःची गाडी, आणि गॅझेट्सना, आणि वीक एन्ड होमला संपत्ती समजतोस तू आणि या साठी बँकेचे हप्ते फेडण्यात पगार संपवतोस. रॅट रेस म्हणतात त्याला..
पुअर डॅड : तें तर सारेच करतात. लग्न करतात, मोठं घर घेतात. गाडी आणि इतर गॅझेट्स घेतात. मी पण तेच केलं.
रिच डॅड : पैशासाठी काम करतोस तू. मी पैशाला कामाला लावतो.
पूअर डॅड : हॅ, कांही तरीच काय ❗️ पैशाला कुणी कामाला लावत काय ❓️ काहीही बोलतोस तू. सारं निरर्थक. अर्थ असेल तुझ्या बोलण्याला तर सिद्ध कर. वायफळ वाफ का दवडतोस तोंडाची. म्हणे पैशाला कामाला लावतो.
पुअर डॅड न खिल्ली उडवली..
आणि ही नाटुकली हॉल मधील मूलं आणि मोठे लोकं खूप उत्सुकतेन पाहू आणि ऐकू लागली..

रिच डॅड : मी मार्ग धरला वेगळा. रस्ता आहे नवा. थोडा खडबडीत, कधी चढणीचा तर कधी उतार. मला माहित आहे न रुळलेली वाट अशीच असते. कारण ती वाट वेगळी असते.
खूपच कमी लोकं पकडतात ही नवी आणि वेगळी वाट. करेन मी सिद्ध. निश्चितचं करेन मी सिद्ध पैशाला कसे कामाला लावतो तें…. ❓️❓️


पुढील भागात वाचा

रॉबर्टचे रिच डॅड, “पैशाला कामाला कसे लावतात “❓️


6 Responses

  1. खूप छान…
    बोध घेण्यासारखी कथा आहे..
    दररोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचं वास्तव दर्शन झालं…
    प्रत्येक भाग नाविन्यपूर्ण……

    1. धन्यवाद मनाली मॅड्म🙏. माझ्या लिखाणाचा आपल्याला व शाळेतील मुलांना उपयोग झाला तर मला माझ्या लेखाचा हेतू अंशतः सफल झाल्याचे समाधान वाटेल. आपले अभप्राय प्रेरणादायी आहेत. पुनश्च्य धन्यवाद 🙏.

  2. न मळलेली वाट,
    हटके व्यक्तिमत्त्व,
    त्रास होणार आहे हे माहीत असून धाडस करणे आणि धोका पत्करणे,
    नवा विचार, नवे वळण —
    पगार निर्माण करणारी बांधिलकी, अर्थकारण जपणारी समाजव्यवस्था, आणि प्रसन्न मनाने हसत हसत जगायला खूप मोठं भांडार आपल्याकडे असतं.
    आपणही हे भांडार राखीव बल म्हणून जोपासतो तेव्हा आपल्याला त्या शोधामध्ये खूप मोठा आनंद सापडतो.
    छान आणि उत्कृष्ट संदेशवहन यासाठी शुभ चिंतन.

    1. धन्यवाद शशिकांत सर आपण विचार बदलायला लावणार पुस्तक आणि त्यामुळे मिळणाऱ्या संधी यावर केलेलं विचार मंथन वाचून तुमचे मोलाचे अभिप्राय दिलेत त्या बद्दल धन्यवाद. 🙏💐

  3. मी वाचलं खूप सुंदर लिहीलं आहे👌🏻🙏🏻💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More