भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️
वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह
भाग – 2, चिता आणि चिंता, मदर आणि फादर फिगर, द्वैअर्थ‼️, बालसुलभ प्रश्न ❓️आता माझी कसोटी, पूर्व सुकृते जाण, दुसरा आघात, कला आली कामाला, संवाद आणि विलगीकरण
चिंता 🤭आणि चिता🔥
12, 18, 24, 36 तास झाले तरी नवऱ्याचा ताप हटेना, म्हणून डॉक्टरांना घरी बोलावून आणले आणि इंजेक्शन औषधे दिली. नेहमी गरमीने हैराण होणाऱ्या पतीराजा, ब्लॅंकेट अंगावर घेऊन पण थन्डी आणि हुडहुडी थांबेना. थोडी चिंता वाढली आणि शंका डोकावून गेली. चिता🔥 आणि चिंता😔 मध्ये एका अनुस्वाराचा तर फरक आहे. दोन्ही जाळण्याचेच काम करतात. फरक एवढाचं : चिंता जाळी जित्याला (माणसाला) आणि चिता जाळी मृताला.
मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात. पण अशा विचारांना दमटवून मी स्वतः, कामात व्यस्त रहायचा प्रयत्न करत होते.
रिपोर्टची 📃 वाट पाहता, पाहता आता अठठेचाळीस तास उलटून गेले होते. माझ्या दुखऱ्या टाचेचा🦶 एक्सरे काढण्यासाठी आणि डॉक्टरांच्या कडून माझे स्वतःचे औषधं 😷आणाण्यासाठी मी घरातून बाहेर पडले. दवाखान्यात 🏨 जाताना आणि येताना मला थंडगार पाऊस धारानी 🌨️🌨️ चिंब भिजवून टाकलं. अंगात तापची डिग्री वाढत राहिली.
सोसायटीत प्रवेश करताना छत्री ☂️😷 घेऊन बाहेर जाणाऱ्या चिरंजीवकडे प्रश्नार्थक ❓️मुद्रेनं पाहिल्यावर समोरून उत्तर आले, “मम्मी, आरोग्य सेतूवर बाबांचा रिपोर्ट, कोरोना पॉजिटीव्ह आलाय. मी, डॉक्टर काकांनी सांगितलेली औषधं💊💊 आणण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये जातोय.”
उत्तर ऐकून घर गाठण्यासाठी मी माझा चालण्याचा👣 स्पीड वाढवला आणि माझी पुढील कामं सुरु झाली.
मदर आणि फादर फिगर
मोठया दोन्ही दिरांना आणि मोठ्या ताईंना लगेच फोन करून कल्पना दिली. त्यांच्याकडून काळजी घेण्यासाठी टिप्स मिळाल्या आणि दिलासा पण मिळाला.
संकट काळी 🤕🤭असो किंवा आनंदाच्या क्षणी 😊😃 सर्व भावंड एकमेकांसोबत असणारच हा अलिखित नियम. त्याचा प्रत्यय नेहमीसारखाच आत्ता पण आला. मम्मी – पप्पांचे संस्कार पुढे तिसऱ्या पिढीत उतरवायचं कामं प्रत्येकाने चोख बजावलय. कुटुंबं आणि त्यातील लहान मोठ्या सर्व मेंबर्सकडून कौटुंबिक आपुलकी, प्रेम, मायेच बंधन अगदी मनापासून निभावलं जातय.
मला असलेल्या समस्या मी अगदी निसंकोच पणे माझ्या दोन्ही मोठया दिरां बरोबर शेअर करत असते. दोन्ही मोठठे दीर म्हणजे माझे मोठठे दादाच आहेत. कधीही निसंकोच पणे मदतीसाठी हाक मारू शकते इतका विश्वास, इतकी आपुलकी निर्माण केलीय त्या सर्वांनी. भाऊ म्हणजे काय आणि कसा असतो हे त्यांच्या बहिणींसोबत असलेल्या नात्यातून एकदाच नव्हे तर खूप वेळेला सिद्ध झालय. भावांचे – बहिणींचे कर्तव्य आणि प्रेम वेगवेगळ्या प्रसंगातून अधोरेखित केलं गेलयं. एकमेकांची भंकस करणं असू दे किंवा चेष्टा, मस्करी असो, मदतीला धावून जण असू दे किंवा गरजेला साद घालणे असू दे, सणासुदीला एकत्र येणं असू दे किंवा लग्न, मुंजीचा प्रसंग असू दे त्याच विश्वासाने एकमेकांना सोबत करत असतात.
प्रत्येक घरात आणि मनात एक आधार स्तंभ असतो. तसचं राव खानदानात मोठाच आधार देणारी आईस्वरूप मोठी ताई आहे. या मोठ्या नणंदेचे श्रीमान म्हणजे कुटुंबातील सर्वासाठी फादर फिगरच आहेत. आम्ही सर्व मोठी मंडळी त्यांना काळे साहेब या नावाने संबोधत असतो आणि कुटुंबातील छोटयांचे ते मोठे काका आहेत. अडचणीच्या वेळी असो किंवा आनंदाच्या क्षणी, तक्रार असो किंवा ख़ुशी पहिल्यांदा फोन, भेट किंवा बातमी शेअर करायची ती ताईं आणि फादर फिगर : मोठ्या काकांशीच. त्यात माझा नवरा म्हणजे ताईंचा सगळ्यात छोटा भाऊ. घरातला सगळयांत छोटा भाऊ, शेंडे फळच आहे. भावंडांचा खूपच लाडोबा. त्यामुळे माझा नवरा मोठया ताईंना अगदी मुला समानचं आहे.
सर्व भाचेमंडळी चारी अत्त्यांची लाडकी आहेतच. मुलांचे लाड कसे करावेत आणि शिस्त कशी लावावी ❓️ हे त्यांच्याकडूनचं शिकावं. सर्व ( नणंदा ) ताईंची मुले उच्चं विद्या विभूषित आणि निवडलेल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत.
सर्वात मोठी आत्या सर्व भाचरांची लाडकी तर आहेच पण चार चांगल्या गोष्टी आत्याच्या मुखातून ऐकल्या की, त्याचे पालन होणार याची सर्वाना खात्री पण आहे. कधी भावंड कुटुंबाची तक्रार घेऊन गेले की त्यावर उपाय शोधून सुवर्णमध्य साधायचे कसब मोठया ताईंच्या अंगी आहेच. पण कधी कधी मोठ्यांच पाहून छोटी मंडळी पण आपल्या आई, वडिलांबद्दल गोड तक्रार करत असतात. मग आत्याने मोठे डोळे करून रागावण्याचं नाटक केले की, तक्रारदार मुलं आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार केले ती मोठी व्यक्ती दोघे खुश.
द्वैअर्थ‼️, बालसुलभ प्रश्न ❓️
बॉम्बे स्कॉटीश मध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या माझ्या लहान मुलाने, “मम्मी, अत्याचार ना ❓️” या आत्या आणि चार मध्ये पॉज नं घेता त्याच्या लहानपणी नकळत पणे केलेल्या कोटी मूळे त्याच्याकडे मी फक्त डोळे मोठे करून पाहिले. कारण, “बोलणं द्वैअर्थी घेणं हा मोठ्यांचा स्वभाव.”
नेहमी मम्मी, पप्पांच्या फोटोला हार घातला जाई.चिरंजीवचे आजी आजोबा दोघेही हयात नाहीत. श्राद्धाच्या दिवशी बाबांना, त्यांच्या मम्मी – पप्पांच्या फोटोला हार घालताना चिरंजीवाने निरखून पहिले. तेंव्हा बाळ चिरंजीवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
“तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्ही, तुमच्या मम्मी – पप्पांच्या फोटोला हार घालतात ना ❓️ मी मोठा झाल्यावर तुमच्या फोटोला हार घालायला हवा ना ❓️” हा थोडा वेगळा प्रश्न त्याच्या मुखातून बाहेर पडल्या मूळे क्षणभर दिंग्मूढ वाटले. क्षणभर एकमेकांकडे पाहून हसलो 🤣😂आम्ही. त्याच्या बालसुलभ मनाला चिकित्सात्मक वाटले म्हणून त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि त्याने निसंकोचपणे विचारला. त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यावे ही भूमिका मी लिलया निभावली. “घरामधील एखाद्या माणसाच्या मरणामुळे अस्तित्वात असलेल्या कुटुंबियांना कोणतं दुःख झेलाव लागतं हे जोवर समजत नाहीं तोवर बालमनात असे प्रश्न निर्माण होतात. मोठी माणसं असे प्रश्न, विचार, शंका जाणूनं बुजून टाळत असतात आणि अशा विचारांचे पण दमन करत असतात.” पाठीमागून मोठ्या अत्याचा जरब बसवणारा आवाज आला, “काय रे, काय म्हणतोस माझ्या भावाला ❓️”
हाच मुलगा, बाबांचा कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट पाहून लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं आणायला बाहेर पडला तेंव्हा, चिंतेने त्याचा चेहरा आक्रसलेला वाटला.
माझ्या नोकरीमुळे मी सतत बाहेर असते. लहान असताना मुलाना आपली आई आपल्यासाठी अवैलेबल असावी ही साधी सरळ अपेक्षा. पण नोकरीच्या निमित्ताने ही गोष्ट कधी जमलीचं नाहीं. अतिशय गुणी बाळाने त्याबद्दल कधी तक्रार केलीच नाहीं. मध्येच कधीतरी त्याचा आग्रह असे “मम्मी, आज घरी थांब ना गं प्लिज.” पण त्याला जवळ घेऊन समजावलं की समजून घेई तो. आतां पण समजून घेतो तो. बाबांच्या व्यवसायामुळे बाबा हवा तेंव्हा अवलेबल असतो हे त्याला लहानपणापासून समजले होते. आणि त्या मूळेचं बाप आणि मुलगा या दोघांमध्ये घट्ट नातं निर्माण झालय. बाबाच्या कोरोना पॉजीटीव् रिपोर्टचा आघात मुलाच्या चेहऱ्यावरील भावामधून स्पष्ट दिसत होते.
यांच्या कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट बाबत सर्वात प्रथम मातृ स्वरूप असलेल्या मोठ्या नणंदेला/ ताईना फोन केला. त्यांच्याशी बोलुन मनात एक प्रकारची भयमुक्त होण्याची ऊर्जा वाढवून मिळाली
आणि आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्यासाठीचे शब्द मनाला दिलासा देणारे ठरले. सातत्याने येत असलेल्या ताप हटेना. दरम्यानच्या काळात मोठे दीर स्वतः दोन, तीन वेळेस भावाला भेटून गेले.
डॉक्टरांची सक्त ताकीद होती त्या प्रमाणे
सर्व प्रथम नवऱ्याला स्ट्रीक्टली रूम क्वारंटाईन केलं. पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे ताट, वाट्या, पाण्याचा ग्लास, औषधं सारंचं अच्युत अवस्थेत गेले. पॉजिटीव्ह रिपोर्टने मनामध्ये एक प्रकारची चिंता, काळजी तर निर्माण केलीच पण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला पूर्णपणे विराम लावला.
सर्वाना फॅमिली ग्रुप वर मेसेज देऊन चिरंजीव आणि माझी स्वतःची टेस्ट करून रिपोर्टची वाट पाहात थांबलो.
उंबऱ्या बाहेर पाऊल ठेवायचे नाही हा नियम. चार भिंतिमध्ये बंद करून घ्यायचे. “तुम्ही सर्वच जण रिपोर्ट येई पर्यंत घराबाहेर निघायचं नाही,” हा डॉक्टरांचा सक्त आदेश. म्युनिसिपालटीवाले येऊन सॅनिटायझेशन करून गेले.
पूर्व सुकृते जाण‼️
इकडे माझ्या दोघी 💃💃बहिणींकडून सतत 📞📲 फोन वरून चौकशी सुरु झाली. अशा बहिणी फक्त खास माणसांनाच मिळतात. माझं नक्कीच पूर्व संचीत- असणार. निर्मळ, प्रेमळ. निर्हेतुक, निरपेक्ष भावनेने केलेलं प्रेम. आपल्या जीवा – भावाच्या माणसांना असं आजार, आपत्ती कांहीही झालं की काळजात लख्ख होतं. या पूर्वी 2013 च्या दरम्यान मी डेंग्यूने आजारी आहे असं नुसतं समजल्या नंतर पाचशे किलोमीटर पार करून मुंबईत हजर झाली ती. नंदाने दहाव्या तासाला घरात पाऊल ठेवले. ती स्वतः आणि माझ्या नवऱ्याने आठ दिवसात डेंगयुला सळो की पळो करून सोडले. अगदी नवव्या दिवशी मी जोगेश्वरीच्या ऑफिस मध्ये पूर्वीच्याच जोमाने कामं सुरु केले होते. आत्ता पण तिच्या धडसाच कौतुक करावं की वेडा हट्ट म्हणावा समजत नव्हतं. ती अगदी मुंबईला निघायच्या मूड मध्ये होती. वेड्या बहिणीला थोडी दम दाटी करावी लागलीच. कोरोना हा अजार असा आहे की, आपल्या माणसांसाठी कितीही जीव तुटत राहिला, मनाची घालमेलं होतं राहिली, आपली असहायता सहन झाली नाहीं, मजबूर वाटलं तरी स्वतःला जागा सोडून हलता येत नाहीं. पूर्व पुण्याई मुळेच मला माझ्या जिवा – भावाच्या दोन बहिणी मिळाल्या आहेत. अक्का, भाऊजी आणि भाचा लौकर बरे व्हावेत आणि कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह यावेत आणि म्हणून दोघी आस लावून बसल्या होत्या.
आता माझी कसोटी‼️
कांही हवं असेल तर ऑनलाईन ऑर्डर देऊन मागवायचे.
सकाळ, दुपार, संध्याकाळ हाताखाली घरातील कामासाठी असलेला मदतीचा ओघ पूर्णपणे बंद झाला. त्यातच आता आई पण मीच आणि बाई पण मीच झाले. झाडू मारा, लादी पुसा, डस्टिंग करा. कपडे मशीन मध्ये टाकण्यापासून घडी करून जागेवर ठेवण्या पर्यंत सारं एक हाती सुरु झालं. म्युनि्सिपालटीच्या लोकानी सॅनिटायझेशन करून गेल्या नंतर ते डाग, चिकटपणा काढण म्हणजे खूप मेहनतीचे कामं होतं.
किचनचा मात्र दूध गरम करणे आणि चहा बनवण्यासाठीचं उपयोग केला जाऊ लागला. आमच्या गोदावरी ताई घरून गरम, गरम जेवण बनवून आणून देत होत्या. दूध, औषधं, फळे आणण्यासाठी स्वतःहून गोदावरी मदतीला आल्या. पण नेहमीच्या आणि आताच्या आहार भक्षणा मध्ये मोठीच तफावत दिसून आली. अन्न खूप वाया जाऊ लागलं. जिभेला चव नसल्यामुळे भूक आपोआप कमी झाली. गरजे प्रमाणे मर्यादित जेवण स्वीकारण्यावर भर दिला गेला. मोठ्या ताईनी फळं औषधं आणि इतर आवश्यक गोष्टीची रेलचेल केली.
दुसरा आघात
मोठी आणि मधली जाऊ, दोघी नणंदा आणि त्यांची फॅमिली, शेजारी, सोसायटी मधील कांही कुटुंबामध्ये कोरोनाचे पॉजिटीव्ह रिपोर्ट आणि त्या नंतरचे परिणाम जवळून पहिले होते. ढवळून निघालेले भाव जीवन, कुटुंबियांची होणारी भावनिक ओढाताण, हॉस्पिटलायझेशन आणि आर्थिक गणित यांचा ताळ – मेळ जुळत नसलेली कुटुंबं मी पहिली होती. माझं माणूस कोरोनाशी झुंजून परत आलं पाहिजे हिचं कुटुंबियांची आणि मित्रगणांची इच्छा असे. पहिल्या लाटेत मोठ्या वहिनींची झालेली अवस्था, फॅमिली फ्रेंड्स चे हृदय विकाराने कांही मिनिटात झालेले मृत्यू आणि त्यांच्या कुटुंबियांची फरपट या अवस्था आणि अशा घटना कांही क्षणात सारे सारे मनात तरळून गेले.
दुसरा आघात : मी पण कोरोना पॉजिटीव्ह. माझा रिपोर्ट मोबाईलवर मिळाला तसं दोघांना घरी सांगितलं आणि कांही मिनिटांच्या अंतरावर चिरंजीवचा रिपोर्ट पण पॉजिटीव आला. खरे पाहता चिरंजीवाला कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. ना कसला त्रास होता ना औषधांची आवश्यकता होती. पण रिपोर्ट पॉझिटिव्ह होता म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे औषधे दिली गेली आणि त्याने स्वतः तब्बेतीची काळजी घेतली.
तिघांना कोरोना पॉजिटीव् म्हणजे आता घर सोडून बाहेर जाऊन राहण्याची आवश्यकता नाहीं हे मात्र पक्क झालं.
कित्तेक तास मनावर असलेला ताण, बाप्पाच्या आगमनाची तयारी थांबली. बाप्पाच्या आगमनाबाबत संभ्रम आणि पूजे बाबत मनात चाललेली घालमेलं, नवऱ्याचा न हटणारा ताप, जिभेची चव अचानक गायब होणं, जेवणाची इच्छा न होणं, ऍसिडिटी, कंटाळवाणा एकांत, आपण यातून बरे होऊ ना ❓️ अशी प्रश्न वजा शंका या आणि इतर गोष्टींचा मनावर वाढणारा बोजा कमी कसा करणार ❓️
त्यासाठी घरातील एकमेकांशी संवाद सुरु झाला. स्वतःच्या मनाचा, मनाशी संवाद सुरु झाला. संकट आलंय तर खरं, रडत सामोरे जायचे की हसत सामोरे जायचे हे आपण ठरवणार. ताण घालवणार कसा ❓️
आता पॉजिटीव्ह रिपोर्ट आलाय खरा मग न खचता परिस्थितीला सामोर जण हेच योग्य होतं.
रेग्युलर शारीरिक एक्सरसाईज बंद झाली आणि श्वासाचे व्यायाम सुरु झाले.
कला ‼️आली कामाला
पतीराज आणि चिरंजीव नृत्यात एकदम एक्स्पर्ट आहेत. चिरंजीव अगदी सहा महिन्याचा असताना सुद्धा त्याची हालचाल लयबद्द होती. टीव्ही वरील जाहिरातीची जिंगल ऐकली की झोपेतून उठून डान्स करायचा आणि परत झोपी जायचा. पायांची लयबद्ध हालचाल, चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यातील भाव किंबहुना संपूर्ण शरीराचा नृत्यासाठी प्रभावी उपयोग कसा करावा याचे ज्ञान जन्मजातच आहे त्याला.
अगदी दोनचार दिवसावर गणेश चतुर्थी आली होती. रंग काम, सुतार काम पूर्ण झाले होते. जेवणाचे मेनू ठरवले गेले होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कुटुंबातील आप्त स्वकीय, मित्र मंडळी सर्वजणाना दोन दिवस एकत्र येता येत. गप्पागोष्टी होतात. बाप्पचा सहवास आणि आशीर्वाद घेऊन पुढे येणारे पूर्ण वर्ष निरामय आणि चिरंतन आनंददाई होतं असते. “पुढच्या वर्षी लवकर” या म्हणून पुढील वर्षाच्या गणेश चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पहात राहायचं. पण या वर्षी वातावरण कांही रुचेना. शेवटी न राहवून मीच म्हंटले, “वेदांत टी. व्ही. वर गणपतीची गाणी तरी लाव ना रे‼️ थोडं मनाला बरं वाटेल.”आणि
गणपती राया पडते मी पाया👣
काय मागू मागणं…
हे सुप्रसिद्ध गीत लागलं.
चिरंजीवाने जो कांही डान्स केला तो कमाल होता. एकदम टेन्शन फ्री झालं. आरोग्याची काळजी तर घेत होतो, घेत आहे आणि पुढेही घेणारच. प्रिकॉशन घेऊन पण झाला कोरोना. पण म्हणून काय दुःखी राहणार ❓️चेहरा लांब करून बसणार का ❓️ औषधं पाणी वेळेवर केलं की होऊ बरं, हा आत्म विश्वास घेऊन बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली. फरक इतकाच की पूजा, आरतीला तीस ऐवजी फक्त आम्ही तिघेच असणार होतो. तिथं पण हार मानली नाहीं. लादी स्वच्छ पुसून बाप्पाची मूर्ती चकचकित करून ठेवली. बाप्पाचे दागिने स्वच्छ करून ठेवले. गेजा वस्त्र, कुंकवाने रंगावून ठेवले. वाती, फुलावती करून
पंच खाद्य, पंचामृत आणि नैवेद्याची सर्व जय्यत तयारी झाली. मोठ्या ताईंनी फ़ुलं, कंठी, दुर्वा, फळं आणि प्रसादासाठी पेढे, मोदक आणि इतर सर्व आवश्यक गोष्टींची उपलब्धता करून दिली.
गेली चोवीस वर्षे गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा श्री नितीन बर्वे गुरुजींच्याच हस्ते होतं होती. पण या वर्षी “श्री” ची प्राण प्रतिष्ठा चतुर्थीच्या दिवशी बर्वे गुरुजीच्या ऐवजी स्वतः नवरोबानी पूजा केली. आरतीसाठी झूम द्वारे सर्वाना निमंत्रण देऊन आरती केली गेली. पण खोकल्यामुळे मला स्वतःला आरतीचं धड एक कडव पण म्हणता येईना. खूप धाप लागतं होताच पण सुक्या खोकल्याच्या ढासेने हैराण झाले.
संवाद आणि विलगीकरण
बऱ्याच दिवसांनी तिघांनी एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न केला. जेवताना आमच्या दोघांचा स्वाद, चव आणि वास गायब झाल्याचा नवीन शोध लागला. लवकर बरं होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या रूम मधून शक्यतो बाहेर न पडण्याची खबरदारी घेतली. तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी तिघांच्या फोनवर रोज आरोग्य विभागाकडून फोन येई. फोन द्वारे ऍडमिट करण्या बाबत, रूम कॉरंटाईन, औषधे इत्यादी बाबत विचारणा होऊ लागली. ताप आहे का ❓️ सर्दी आहे का❓️ घासा दुखतो का ❓️डोकं दुःखात का ❓️ या आणि कोरोना संबंधित लक्षणाबाबत रोज अद्यावत माहिती घेतली जाऊ लागली. नेमका फोन यायच्या वेळी मी कामात किंवा झोपलेली असल्या मुळे माझी माहिती अपडेट करणे राहून जाई. शेवटी मी रोजच ऍपवर माहिती अपडेट करू लागले. इतर कोणत्याही कामामध्ये नं गुंतता हेल्दी वातावरण ठेवण्यावर भार दिला गेला. व्यवस्थित आणि वेळेवर औषधे घेणं, आरोग्यास पूरक आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे चिरंजीव आणि आणि नवरोबाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला स्वतःला आजाराची इंटेंसिटी जास्त असल्याने पूर्ण पणे बरे व्हायला बराच वेळ लागला. फक्त खोकला लवकर नाहीसा होणार नाहीं या बदद्ल डॉक्टर ठाम होते. अनुभवाचे बोल होते. आमचे फॅमिली डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांना👩👩👦 या रोगाचा सामना करावा लागला होता.
पोस्ट कोरोना प्रिकॉशन 😊
डॉक्टरांचे बोलणे खरे ठरले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्या नंतर सुद्धा खोकल्याने पाठ सोडली नव्हतीच. कोरोना काळात वापरलेल्या सर्व बेडशीट्स, पिलो कव्हर्स, कपडे इत्यादी वस्तू फेकून दिल्या. अर्बन क्लॅप ला बोलावून सोफा, गाद्या डायनिंग चेअर्स ई. स्वच्छ धुवून घेतलं. स्वतः सम्पूर्ण घर सॅनिटाईझ करून घेतलं. रंग, रांगोटी करताना काचेचे देवघर खराब झाले होते. कोरोना पॉजिटीव् रिपोर्ट मूळे तात्पुरती चौरंगावर देव मूर्तिची स्थापना केले होती. आता सर्व ठीक होते. सर्वप्रथम खारला जाऊन मार्बलचे देवघर आणले आणि देवघरात देव स्थापित केले. आमचं सर्वांचे रेग्युलर रुटीन सुरु झाले.
आपल्या अभिप्राय✍️ वाचायला नक्कीच आवडेल 🙏
ranjanarao.com site वर वाचनासाठी उपलब्ध साहित्य…🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAUl5
story time : https://bit.ly/2Z1r33उ
poems : https://bit.ly/3lP8OI4
4 Responses
Brave family. God bless you dear
जयश्री मॅm 🙏 नमस्कार. आपल्या अभप्राया मुळे खरेच आम्ही ब्रेव्ह असल्याचा फील निर्माण झाला. आपल्या शुभेच्छा मिळाल्या. धन्यवाद. अशाच वाचत रहा. अभिप्राय देत रहा. 🙏🌺🌹
Very nice ma’am…
हॅलो सुनिलकुमार सर, “जिसे डरते थे…” भाग 2 वाचून आपण दिलेले अभिप्राय नक्कीच प्रेरणादायी आहेत. धन्यवाद. असेच वाचत रहा, अभिप्राय देत रहा 🙏🌺.