पुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3

सिंहावलोकन

रिच डॅड पुअर डॅड या प्रभावी पुस्तका बदद्ल लिहिताना भाग -1, मध्ये नोकरी करत असताना येणाऱ्या आर्थिक समस्या, भावनिक ओढाताण, जागतिकीकरणामुळे बदललेली मानवी मूल्ये आणि त्या मुळे होत असलेली कुतरओढ पहिली.
पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad ” भाग – दोन मध्ये प्रातिनिधिक स्वरूपात
नोकरी आणि व्यापारदार कुटुंबं आणि व्यक्तीचा उल्लेख केला. आलेल्या संकटावर मात करून, सावरून, पुनश्च्य श्री गणेशा करणारे देसाई कुटुंबं पहिले. सर्व सोई सुविधा पायाशी लोळणं घेत असताना कांही वाईट सवयी घरात हळू पावलाने प्रवेश करतात. आपल्या विश्वासाला मोठं भगदाड पडे पर्यंत आपण लक्ष्य देत नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडतो. वेळीच सावध झाल्यास मोठे नुकसान टाळू शकतो. समस्येवर उपाय शोधू शकतो. देसाई कुटुंबावर आलेले संकट, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन सोडविले. आलेल्या प्रसंगातून, तशाही परिस्थितीत वाट काढली. देसाई कुटुंबाला घरगाडा चालविण्यासाठी नव्याने भक्कम आर्थिक स्त्रोत सुरु करता आले.
👣👣👣👣👣👣
आता आला वेगळा संघर्ष. पाटकर कुटुंबाच्या तरुण पिढीला आधुनिकतेच्या नावावर लागलेल्या सवयींवर कांही उपाय मिळणार का ❓️ वृद्ध आणि तरुण पिढीतला संघर्ष, पाटकर कुटुंबातील एकीला तडा घालवणार का ❓️समृद्धची कुटुंबासमवेतची शाळा भेट सहजच आहे का ❓️ ट्रीपचं प्रयोजन नेमकं हॉल आणि ग्रंथालयाचे उदघाटन करण्यासाठीच आहे का ❓️ की, आणखी कांही खास उद्दिष्ट ठेऊन ट्रिपचे प्रयोजन केलंय का ❓️
चला तर आपण जाऊया हॉल मध्ये. मुलांनी सर्वांसाठी केलेला मुलांचा ड्रामा; अर्थात Rich Dad Poor Dad या पुस्तकातील पात्रांना भेटायला आणि
रिच डॅड पैशाला कसे कामाला लावतात❓️ हे पाहायला…. आपण ऐकलंत रिच डॅडची प्रतिज्ञा, ‘मी निश्चितच सिद्ध करेन, “श्रीमंत पैशाला कसे कामाला लावताहेत तें❓️ मुलांची आणि मोठ्यांची, किंबहुना हॉल मधील सर्वांची उत्सुकता ताणली गेली. डोळे मोठे करून आणि कान टवकारून सर्व मुले स्टेजवरचा अविष्कार पाहण्यासाठी सज्ज झाली. समोर बसलेल्यां पैकी कोणीही एकमेकांशी संवाद करत नव्हते. सर्वांचे लक्ष्य स्टेज वरील बंद पडद्यावर होते. वेलवेटच्या मरून रंगाच्या पडद्यावरच्या कानातीवर, सोनेरी अक्षरे सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होती. “कै. दादा आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समृद्ध कडून 🙏…”
आज समृद्धने मुलांकरिता कायम साठी सुंदर हॉल आणि संदर्भ पुस्तकांसह सुसज्ज ग्रंथालय दिले होते. त्याच हॉलच्या त्या स्टेजवर, त्या पडद्या आड मुले Rich Dad Poor Dad वर त्यांनी स्वतःच रचलेल्या नाटुकलीचा पुढचा भाग सादर करणार होते. पुढील पिढीला ज्ञान साधना करण्यासाठी आपल्या कडून होता होईल ती मदत करायला समृद्ध तयार होता. त्याची सुरुवात समृद्धने हॉल, लायब्ररी रूम, संदर्भ ग्रंथ, मैदानावरील बुद्धी आणि शारीरिक कसरतीला चालना देण्यासाठी मोठे व्यापार / बिझनेस गेम आणि Rich Dad Poor Dad चौथरा आणि त्या संदर्भात गेम बनवण्यास मदत केली. आणि आता, मुलांनी स्वतः स्वारस्य दाखवून तयार केलेली नाटुकली पाहून समृद्ध मनोमन थोडासा सुखावला. पण……
आपल्या कुटुंबातील तरुण सदस्यांच्या वर्तणुकीबद्दलचा विचार मनात येताच समृद्धचा चेहरा झाकोळला.
अनिल सर आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरील झरझर होणारे बदल टिपत होते. समृद्ध कडे वारंवार अनिलच लक्ष का जातेय❓️ अनिल नेमकं समृद्धच्या चेहऱ्यारून कोणते भाव टिपतोय ❓️याचा अंदाज समृद्धच्या आई घेत होत्या. अनिल आणि समृद्धच्या आईची नजरा नजर झाली तेंव्हा अनिलने समृद्ध कडे पाहण्याचा इशारा केला. समृद्धच्या आईने मान वळवून समृद्धकडे पहिले तेंव्हाा, तो गहन विचारात दिसला. तो चिंताक्रांत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. माउलीच ती. तिने अनिल या समृद्धच्या मित्रा कडे नजर टाकली. समृद्धची आई आणि मित्र अनिल दोघांना पण समृद्धच्या मनात काहीतरी खदखदत आहे याची जाणीव झाली. पण नेमकं काय खदखदत आहे हे कसं समजणार ❓️❓️❓️
तेवढ्यात माईक वरून अगोदरच्या भागाचा डायलॉग, रिच डॅड झालेल्या पात्राने रिपीट केले.

दोन डॅड ❓️❓️ दोन विचार ❓️❓️


रिच डॅड : मी मार्ग धरला वेगळा. रस्ता आहे नवा. थोडा खडबडीत, कधी चढणीचा तर कधी उतार. मला माहित आहे न रुळलेली वाट अशीच असते. कारण ती वाट वेगळी असते.
खूपच कमी लोकं पकडतात ही नवी आणि वेगळी वाट.
करेन मी सिद्ध. निश्चितचं करेन मी सिद्ध, पैशाला कसे कामाला लावतो तें…. ❓️❓️

आणि पडदा उघडला आणि पुअर डॅड स्टेजवर आले.

पुअर डॅड : रॉबर्टचे रिच डॅड, “पैशाला कामाला कसे लावतात “❓️
(याचा छडा लावायचा होता. खूप ज्ञानी आणि मोठे अधिकारी असलेल्या पुअर डॅडना)
पुअर डॅड स्वगत बोलतात. अर्था अर्थी नाही घ्यायचे रिच डॅडचे बोलणे. पण प्रतीकात्मक रूपात पैशा कडून काम करून घेणे असा अर्थ गृहीत धरला जावा, असं तर बोलायचं नसेल ना माईकच्या डॅडना ❓️ आपला मुलगा रॉबर्ट जेव्हा, “मला श्रीमंत व्हायचंय” असं बोलला तेंव्हा, आपण त्याला श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवावा लागेल असं बोललो होतो. बाळ बुद्धीने रॉबर्ट आणि माईक या बाल मित्रानी व्यवसाय सुरु केला होता. अनधिकृत व्यवसाय म्हणून आपण त्याला मज्जाव केला. पण त्यांच्या प्रयत्न्याला दाद दिली. छोटा रॉबर्ट आणि माईक या मित्रानी प्रयत्न सोडू नयेत म्हणून प्रोत्साहनही दिलं. “रॉबर्ट आणि माईक, तुम्ही दोघे काहीतरी करू पाहात आहात‼️, हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. इतर लोक काहीतरी वेगळं करण्याचा फक्त विचार करतात. तो विचार आचरणात आणत नाहीत.” स्वतःच मुलांना दिलेली शाबासकी पुअर डॅडना आठवली. मुलांनी म्हणजे माईक आणि रॉबर्ट यांनी श्रीमंत होण्यासाठी माईकच्या वडिलांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेण्याची इच्छा पण आपण प्रगट केली. (स्वगत बोलताना रॉबर्टच्या वडिलांसारखी म्हणजेच रिच डॅड सारखी एक धूसर आकृती रॉबर्टच्या पुअर डॅड समोर उभी राहून बोलू लागली. )
धूसर आकृती : मिळालेले पैसे साठवून अशा गोष्टीत गुंतवायचे की त्यातून तुम्हाला पुन्हा पैसे मिळू शकतील. त्यामुळे गुंतवणूक केलेली आपली रक्कम किंवा रक्कमेतून खरेदी केलेली गोष्ट आपली राहील आणि त्यातून नवे उत्पन्न सुरु होईल.
पुअर डॅड : तें कसे श्यक्य आहे ❓️ जरा स्पष्ट बोलाल का ❓️ तुमच्या सारखेच अस्पष्ट उत्तर दिलेत. ( पुअर डॅड धूसर आकृतीला उद्देशून बोलले.)
धूसर आकृती : तुम्ही पैसे साठवून एखादी प्रॉपर्टी घेऊ शकता आणि भाड्याने देऊ शकता. किंवा बँकेत ठेऊन व्याज मिळवू शकता. किंवा शेअर मार्केट मध्ये, फंडामध्ये गुंतवू शकता. किंवा तुम्हाला जिथे गुंतवून जादा पैसे मिळू शकतील तिथे तुमचे पैसे गुंतवू शकता.
(धूसर आकृती विरून जाते आणि पुअर डॅड कोपऱ्यातील खुर्चीत बसून विचार करत राहतात )
(स्टेजवर वर्गाचे दृश्य )
अनिल सरांसारखा वेष करून एक मुलगा स्टेजवर येतो. समोर वर्गात मुले बसली आहेत.
सरांना सुप्रभात बोलतात. शाळेमध्ये प्रत्येक वर्गात प्रत्येक महिन्याला मॉनिटर बदलला जातं असे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक काम आलच पाहिजे हा दृष्टीकोन ठेवला जाई. कटाक्षाने या गोष्टीचे पालन केले जाई. या महिन्यातील वर्गाचा मॉनिटर निलेश होता. वर्गातील मॉनिटर निलेश, उभे राहून बँकेतील व्यवहाराची माहिती देतो. त्यामध्ये शाळेतील गार्डनमध्ये मुलांनी पिकविलेल्या फळं आणि पाला भाजी, फुले, मुलांनी टाकाऊ मधून टिकावू वस्तू बनवून त्यातून झालेला खर्च आणि ताळेबंद सांगतो. आणि गेल्या व चालू महिन्यात मिळालेला प्रॉफिट सांगतो. अनिल सर, एकूण गुंतवणूक, नफा आणि शिल्लक रक्कम बोर्डवर लिहायला सांगतात, जेणेकरून वर्गातील सर्व बँक सदस्यांना सर्व नफा समजावा. .
अनिल रिच डॅड पुअर डॅडच्या चौथऱ्याकडे जाऊन नवीन खेळ कसा खेळणार याबाबत वर्गात रिविजन करून घेतात. मुलांना गार्डन मधल्या, दि वे टू फायनांसिअल लिटरसी कडे निघण्यासाठी सांगून स्वतः वर्गातून बाहेर पडतात.
(मुले वर्गातून बाहेर पडतात तसें, पुअर डॅड स्टेजवर मध्यभागी येतात आणि स्वगत बोलतात )
मुलांना शालेय विषया बरोबर बँक चालविण्याचे शिक्षण, मार्केटचे व्यवहार, नफा – तोटा, उत्पादन, टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू तयार करून मार्केटिंग करणे हे शाळेत शिकवताहेत. म्हणजे मुलांना अंग मेहनत, कमाई, जमा खर्च ईत्यादि शिकायला मिळते. म्हणजेच आर्थिक साक्षरता कमी अधिक प्रमाणात शिकविली जातं आहे. मोठे झाल्यावर शिकतील अशी वाट पाहात नाहीत. (पुअर डॅडनी समाधानाचा सुस्कारा सोडला )
पुअर डॅडना आता मुलां पाठोपाठ चौथऱ्या कडे जाऊन, मुले नेमके काय खेळ खेळतात ❓️आणि कसे खेळतात❓️ तें पहlवे अशी तीव्र इच्छा झाली. पुअर डॅड आणि रिच डॅडची धूसर आकृती मुलांपाठोपाठ निघाले. पुअर डॅड, दि वे टू बिझनेस कडून निघणार इतक्यात मुले बिजनेस गेमच्या ग्राउंड वर रेंगाळलेली पहिली आणि तें तिथेच थांबून मुलांचा गेम पाहू लागले.
अरे वा भारतात या शिक्षणाची सुरुवात अगोदर पासूनच केलेली आहे. आधुनिकतेचा स्पर्श आहे. म्हणजेच जुन्या – नव्या; आचार – विचाराची सांगड घालून मुलांचे भवितव्य घडविण्यात येथील शाळा आणि शिक्षक यांनी स्वतःच स्वारस्य दाखविले आहे. अगदी
छोटी छोटी मुलं अगोदर बोर्ड वर लिहिलेले नियम काळजी पूर्वक वाचताना दिसली. लंबगोलाकार चौकोनांजवळ उभे राहून त्या चौकोनावर लिहिलेली ठिकाणांची नावे मोठ्याने वाचून ओळख करून घेत होती. त्यामध्ये गेट वे, साज हॉटेल, मोठी मोठी शहरे, विमानतळे, क्रिकेट मैदान, शंभर एकर शेती, पेट्रोल पम्प आणि बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्यांची किंमत लिहिली होती. ती ठिकाणे आपल्या नावावर कशी करू शकतो❓️ त्यातुन फायदा कसा होतो❓️ कुठे तोटा होतो ❓️ मॉर्गेज कुठे करायला लागते ❓️हे शिकायला मिळणार होते. व्यापार म्हणजे एकदा आपण दुकानं मांडून बसलो, तर त्यातून फायदाच कसा मिळवायचा याचा विचार सतत मनात ठेऊन खेळायचे आणि नियमांचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त, किंबहुना सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर कशी करायची हे गेमचे नियम अनिल सरांनी सांगितले आणि मुले खेळात गुंग झाली…

समृद्धची घालमेल…. उपाय काय ❓️


इतर मुलांचा ग्रुप —> घेऊन अनिल सर जेव्हा
दि वे टू फायनान्शिअल लीटरसी कडे निघाले; तसा अनिल सरना निरोप मिळाला. मुलांना सूचना करून क्लास पी. टी. सरांच्या स्वाधीन करून अनिल सर कार्यालयात पोहोचले.
प्रशस्त केबिनमध्ये मुख्यांध्यापकांच्या खुर्चीकडे तोंड करून समृद्ध खाली मान घालून बसला होता. “जीवनामध्ये यशस्वी मनुष्य, सर्वात हुशार, स्कॉलर, स्व कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालून सुद्धा जमिनीवर ज्याचे पाय घट्ट रोवलेला, समाजभान जपणारा माझा मित्र आज मला चिंताग्रस्त का वाटतोय ❓️ अरे सम्या, बोल तू मनमोकळे पणाने. काहीतरी बोल. तू मनात ठेऊन गप्प बसलास तर कदाचित तुझ्या चिंतेचं कारण दूर होणार नाही. नंतर खंत करून काय उपयोग होणार ❓️”
आपल्या केबिन मध्ये प्रवेश करताना अनिल सरनी समृद्धला सम्या म्हणून हाक मारली तेंव्हा दोघांच्या डोळ्यातील भाव एकमेकांना दिलासा देणारे वाटले. त्याची चिंता जाणून घेण्यासाठी बाल मित्राला “सम्याss” म्हणून घातलेली साद, वातावरण हलक फुलकं करायला मदत केली. समृद्धच्या वडील आणि भांवंडाना त्यांच्या मित्रांबरोबर स्टुडंट्स अकॅडमी पाहायला पाठवून समृद्धची आई केबिन मध्ये आली.

इकडे पुअर डॅड आणि रिच डॅड दोघाना समस्या

कशी सोडवायची याची चिंता करत होते. बिजनेस गेम पाहावा की, रिच डॅड पुअर डॅड चौथरा गेम पाहायला जावे ❓️ अनिल सरांच्या केबिन मध्ये जावे की, मुलांनी बनविलेली शेती पाहावी ❓️ शिक्षण आणि समृद्धी हातात हात घालून चांगले विद्यार्थी किंबहुना भारताच्या भक्कम भविष्या साठी चांगले नागरिक बनविण्याचे काम मनापासून करत आहेत ही बाब खूप समाधान कारक वाटली.
अनिल, समृद्ध आणि समृद्धच्या आईने एक प्लॅन बनवला आणि निश्चिन्त मनाने, स्टुडंट्स अकॅडेमी पाहायला बाहेर पडले. मुलांनी आणि शिक्षकानी बनविलेली शेती पाहताना सगळे इतके तल्लीन झाले की जेवणासाठी बोलावणे धाडून पण मेस मध्ये जाण्यासाठी कोणीच तयार होईना. शेवटी मेस सांभाळणाऱ्या काकांनी दीर्घ बेल वाजवली, तशी सर्व मुले शिक्षक आणि ट्रिप मधील सर्वजण मेसकडे वळले.
मेस मध्ये चुलीवर खिचडी रटरटत होती. गरम ज्वारीच्या भाकरी, खरपूस भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून केलेली जाडीभरडी चटणी, दही कांद्याची कोशिंबीर, वांग्याची देटासहित शेंगदाणा कूट घालून केलेली रस्सा भाजी आणि सोललेल्या वालाची खिचडी. साधे पण स्वादिष्ट भोजन. अन्नाची मांडणावळ डोळ्याची भूक तृप्त करत होती. पोटाच्या भुकेमुळे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं. सेल्फ सर्व्हिस असून पण शाळेतील मुलांचा शिस्तबद्वपणा वाखाणण्याजोगा होता. गडबड नाही. गोंधळ नाही. धांदरट पणा तर अजिबात नाही. मुलांबरोबर ट्रीपच्या सर्व मंडळींनी स्वतः जेवण वाढून घेतलं आणि मुलांच्या पंक्तीत जाऊन बसले. सेल्फ सर्व्हिस मुळे आपल्याला हवे तेवढेच जेवण पानात वाढून घेत होते. अन्नाचा एक घास कोणीही वाया घालवत नव्हते. जेवण झालं तशी तृप्तीची ढेकर दिली आणि अन्नदात्याला सुखी भवं चा आशीर्वाद देऊन मंडळी मेस मधून बाहेर पडली. आता मुलांसमोर रानमेवा आला. मुलंच ती, रानमेवा पाहून थोडीच गप्प बसणार. आजी थंडगार वडाच्या सावलीत पारावर विसावल्या. पण सारी मुले आजींकडे धावली आणि पळसाच्या पानाच्या द्रोणातील रानमेवा आजीसमोर धरला, “आजी तुमच्यासाठी खास हॅण्डलवाला द्रोण बनवला रितुने. प्लीज घ्या ना. प्लिज❗️ प्लिज ❗️ रितू आणि नितु आग्रह करत होत्या. आजी हसून दोघीकडे पाहात एका हाताने द्रोण घेऊन रानमेव्यातील तुकडा हातात घेतला तसा एक पक्षी पंख पडफड करत आजीच्या हातातील रानमेव्याचा द्रोण घेऊन झाडावरील आपल्या घरट्याकडे गेला तसा खाऊ पाहून पिलानी चिवचिवाट केला.

मथळा ❗️मतितार्थ ❗️

“आजी गोष्ट सांगा आम्हाला. मग सर्वच मुले गोष्टsss गोष्टss.” म्हणून कल्लोळ करू लागली तसं सर्वाना शांत करत आजीनी मुलांना दोन अटी घातल्या. एक गोष्टीला अनुसरून योग्य नाव द्यायचे आणि मॉरल ऑफ दि स्टोरी सांगायचे. मुलांनी एका सुरात हो sss म्हणून आजीच्या अटी मान्य केल्या. “आई, थांबा प्लीज. आज वर्गात जायला कोणी तयार नाही. ही पाचवी, सहावीची मुलं इथंच येताहेत.” अनिल सर बोलले. मुलांबरोबर पेटी घेऊन संगीत सर पण आले. गोष्ट सांगायला सुरुवात केली.
हे वडाचे झाडं खूप वर्षे जुने आहे. तुम्हाला माहित आहे का ❓️ आजीनी विचारलं. तसं सर्व मुलांनी नाही म्हणून मन डोलावली. “हे वडाचे झाडं तीनशे वर्षे जुने आहे. पूर्वी इथं पूर्ण घनदाट जंगल होत. पण या वडाभोवती दगड रचून बसण्यासाठी पार तयार केला होता. या घनदाट जंगलात वेगवेगळे पक्षी, प्राणी राहत होते. रान फुले, रानमेवा विपुल प्रमाणात उपलब्ध होता. पक्ष्यांना भरपूर फळे फुले मिळत. अस्सल मध प्यायला मिळे. अशा या घनदाट जंगलात एक साधू राहत होते. भगवी वस्त्रे परिधान करणारे साधू या पारावर बसून ध्यान साधना करत. झाडाच्या डोलीत एक शुभ्र नाग रहात होत. तो आपला शांतपणे बाहेर निघून जंगलात फिरून परत संध्याकाळी डोलीत जाऊन अराम करी. कधी दिवसा, कधी रात्री, कधी भल्या पहाटे तर कधी संध्याकाळी बाहेर पडे. झाडावर पक्षी चिवचिवाट करून सांध्याकाळ झाल्याचे संकेत देत. जंगलातील मोर येऊन पिसारा फुलवून नाचत राही. झाडाला लटकलेली वागुळे रात्र झाली की फडफडं करत जंगल सफारी करून येत. आणि घुबड घु ss घु ss आवाज करे. साधू महाराज ओंकार उच्चारण करत तेंव्हा त्याच्या धीर गंभीर ओंकारा शिवाय कोणताच आवाज नसे. हा पार जस साधू बुवांच घर तसंच पांढऱ्या नागोबाच घर होत. काऊ, चिऊ, पोपट, घुबड आणि वट वाघूळ, मोर यांचे पण घर होते. अचानक एक दिवस एक हिरवा साप सरसर सरपटत पारावर येताना दिसला. नेमका या झाडाच्या डोलीत बसलेला नाग बाहेर येताना त्याला हिरवा साप दिसला.
नाग आणि साप एकमेकांकडे रागाने पाहात होते. आणि फुस्सss फुस्स ss आवाज करत होते. पांढऱ्या नागाला हिरव्या सापाचा खूप म्हणजे खूप राग आला. नाग जोरात ओरडला, “ए सापड्याssss, चल निघ इथून❗️ सापाला पण नागाचा खूप राग आला. साप जोरात फुस्स ss करून बोलला, “ए नागss — ss” अजि नुसतं ना ss गss बोलल्या तर मुलांनी शब्द पूर्ण केला आणि जोरजोरात हसायला लागले सर्वजण. तेव्हापासून शुभ्र नागराज लाजून डोलीमध्ये जाऊन बसले तें बाहेर आलेच नाहीत.

एके दिवशी भगवी वस्त्रे परिधान केलेले साधू महाराज वडाच्या झाडाखाली साधना करत होते. लांब वाढलेली काळीभोर दाडी. शीडशीडीत बांधा, लांब नाक आणि चेहऱ्यावर शांत भाव होते. वारा संथपणे वाहत होता. फुले उमलत होती पूर्वेला सूर्य नारायणाचे आगमन झाले होते. निसर्गाच्या नियमा प्रमाणे सर्व व्यवस्थित सुरु होते. दूरवर गुराखी आपल्या गाईंना चारण्यासाठी घेऊन आला होता. साधूना ध्यानस्त बसलेले पाहून गुराख्याने गाईंना जाणून बुजून तिकडे जाऊ दिले नाही. आता सूर्य बराचसा वर आला होता. एकदम झाडावरील एक पक्षी जोरजोरात ओरडला. दूरवर उभ्या असलेल्या गुराख्याचे लक्ष्य गेले तसा झाडाच्या दिशेने चालत जवळ आला. त्याने जें दृश्य पहिले तें भयप्रद वाटले आणि त्याची पाचावर धरण बसली. शांत ध्यानस्त बसलेल्या साधूंच्या डाव्या बाजूला एक सहाफूट लांबीचा, शुभ्र नाग आपले चार फूट शरीर उंचावून फणा बाहेर काढून डोलत होता. त्याच्या शरीरावर सहा इंच लांब आणि शुभ्र केस सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होते. त्याचे डोळे लाल होते. साधूंच्या उजव्या बाजूला पक्ष्याचे ओरडणे इतके वेगळे, विचित्र आणि भयप्रद आणि कर्कश होते. एकदा ओरडून तो पक्षी थांबला नाही. तो अजून जोरात ओरडत होता. त्याला काहीतरी सांगायचे होते. पक्ष्याच्या ओरडण्याने साधू महाराजांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव आले. आता तो पक्षी किंचित खाली आला. तिथेच हवेत पंख पसरून एकाजागी फडफडत जोरात पुन्हा ओरडला तसें साधून महाराजानी त्रस्त होऊन आवाजाच्या दिशेने मन वाळवून डोळे उघडले. पक्षाने आपली समाधी भंग केली साधनेत अडथळा आणला याचा साधूजींना राग आला. त्यांना तो पक्षी झोरजोरात ओरडताना दिसला. आवाजाने त्रस्त झाल्यामुळे, साधू महाराजांनी रागाने डोळे मोठे करून पक्ष्या कडे पहिले तशी एक विचित्र घटना घडली.
ओरडणाऱ्या पक्षाकडे साधू महाराजांनी जशी आपली मान वळवून डोळे उघडून पहिले तेंव्हा डोळ्यातून आग बाहेर पडली. आगीत तो पक्षी जळून भस्म झाला.
बाजूला आपले सहा फुटाच्या शरीरापैकी चार फूट शरीर वर करून डोलणाऱ्या नागराजांने झोराचा फुत्कार टाकला तेंव्हा साधू महाराजानी मान वळविली. समोर विचित्र प्राणी पाहून साधू महाराज आश्चर्याने बोलले.
साधू महाराज: नागराज, हिरवा साप वडाच्या कट्ट्यावर येताना आपण त्याच्याशी भांडलात. प्रथम तुम्ही त्याला सापडया बोललात. रागाने त्याने तुम्हाला नाग –ss म्हणून शिवी दिली. तुम्हाला लाज वाटली म्हणून तुम्ही कितीतरी महिने डोलीत जाऊन बसलात. आणि आता ही केसाची वस्त्रे घालून विचित्र वेषात आलात. चल निघ येथून. तु इथे येऊ नको” म्हणून साधू आपली झोळी घेऊन निघाले.
एव्हाना सूर्य माथ्यावर तळपत होता.

सर्व श्रेष्ठ भक्ती, मातृ सेवा ❗️❗️

एका घरा समोर उभे राहून भिक्षेसाठी साधूंनी आरोळी दिली, “ओम भवती भिक्षां देही.”
बराच वेळ कोणी बाहेर आलेच नाही. साधूने पुन्हा आरोळी दिली, “ओम भवती भिक्षां देही.” या वेळी साधूंचा आवाज वाढला होता. आवाज किंचित राग मिश्रित होता.
पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली. साधू महाराज भिक्षेसाठी बराच वेळ ताटकळत उभे राहिले. दरवाजा उघडा असून सुद्धा ना घरातून कोणी बाहेर आले, ना कोणी थांबण्यासाठी आवाज दिला. आता नाराजीची जागा रागाने घेतली. तिसऱ्यांदा ओम भवती भिक्षां देही चा आवाज आला तशी एक तरुण मुलगी सुपातून ज्वारीचं पीठ घेऊन बाहेर आली. तिचे केस कुरळे होते. केस हाताने चापून चोपून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. अतिशय नम्र आवाजात, “साधू महाराज भिक्षा घ्या.” म्हणून सूप पुढे धरून उभी राहिली. साधू महाराज कांही झोळी मध्ये भिक्षा घेईनात तशी नजर वर उचलून तरुणीने साधूच्या डोळ्यात पहिले. तें रागाने त्या तरुणीकडे पाहात होते. शक्य तितके स्वतःला शांत ठेवत आणि मृदू आवाजात तरुणी बोलली, “साधू महाराज, मी कांही, तुम्ही मगाशी रागाने पाहून, जाळून भस्म केलेला पक्षी नाही❗️ ही घ्या भिक्षा.” आता आश्चर्य करण्याची वेळ साधुजींची होती. क्षणार्धात त्यांचे आग ओकणारे डोळे शांत झाले. शांत आवाजात साधूंनी त्या तरुणीला प्रश्न केला, ” मुली, हे तुला कसे समजले की, मी एक सिद्ध पुरुष आहे ❓️ मला नजरेने भस्म करण्याची सिद्धी प्राप्त झाली आहे हे फक्त मलाच माहित आहे. तू अशी कोणती साधना केली आहे, ज्या मुळे, तुला न पाहता कांही तासापूर्वीची दूर घडलेली घटना समजली ❓️
” नमस्कार साधू महाराज, ही माझी मुलगी कृष्णा. कृष्णा पूजा – पाठ करत नाही. ना जप – जाप्य करते. ही फक्त आपल्या आजारी आईची मनापासून सेवा करते. मातृ देवो भव‼️ हाच भाव मनी मानसी ठेऊन काम करते. आपले कर्म हीच देव पूजा समजते. सर्व कर्म त्या ईश्वरास अर्पण करते. मातृ सेवेहुन दुसरे कोणते मोठे पुण्य असू शकते का ❓️ तुम्ही आलात तेंव्हा कृष्णा, माझे दुखणारे पाय चेपून देत होती. ती तिच्या कामात इतकी तल्लीन झाली की, तुम्ही भिक्षेसाठी तीनदा मारलेली हाक हिच्या मेंदू पर्यंत पोहोचलीच नाही. जेव्हा तिचे सेवा कार्य पूर्ण झाले तेंव्हा, नं सांगता, नं बोलता, स्वतः लगेचच ती तुमच्या साठी अन्न घेऊन आली, साधू महाराज.” हातातील काठी टेकत कृष्णाची माई बाहेर येऊन साधू महाराजाना बोलली. “तिचं मातृसेवेचं पुण्य बोलले, ‘तुमच्या रागाने जळून भस्म व्हायला मी कांही तो पक्षी नाही❗️ हेच शब्द होते ना कृष्णाचे ❓️”
सिद्धी प्राप्ती महत्प्रयासाने होते. षड्रिपू , गर्व क्षणात होत्याच नव्हते करतात. कमवायला खूप वेळ लागतो, गमवायला कांही क्षण पुरे होतात. म्हणून कृती करताना विचापूर्वक केली की नंतर खंत करावी लागतं नाही.” कृष्णा माई बोलल्या आणि साधू विचार करत घरासमोरून निघून गेले.
😇😇😇😇😇😇😇😇
सिद्धार्थच्या आईने पाण्याचा घोट घेत मुलांना त्यांचे उत्तर देण्यासाठी पुनःश्च आठवण केली. मॉरल आणि टायटल ऑफ दि स्टोरी ❗️❗️❗️
“मुलांवर गोष्टीद्वारे संस्कार तर केलेच समृद्धच्या आईने, पण संपूर्ण गोष्टीचा मथितार्थ सांगण्यासाठी

पात्राने रिच डॅडच्या धूसर आकृतीकडे पाहात आपले मतं प्रदर्शन केले तसें रिच डॅडची धूसर आकृती स्पष्ट होत बोलली, “कांही, जसे गोष्टीद्वारे, प्रतिका द्वारे, आकृती द्वारे जास्तच प्रभावी होते. तोच प्रकार अजमावला आजीनी. टा यट लं आणि मॉरल्स विचारा अंती येतील. खरंच यांच्या शिकविण्याच्या पद्धतीला सलाम करूया.”
म्हणून रिच डड दोघांनी मुलांच्या उत्तरांची वाट पाहात मस्त वेळ घालवत राहिले.

यशस्वी प्लॅन

समृद्ध, समृद्धची आई आणि अनिल सरांनी बनविलेली योजना नुसती यशस्वी नव्हे तर शंभर टक्के यशस्वी झाली. एक दिवसात संपूर्ण स्टुडंट्स अकॅडेमि पाहणे आणि समजणे श्यक्य नव्हते. त्यामुळे समृद्धच्या आईने मुक्काम करण्याचे जाहीर केले आणि सर्व मुले खुश झाली. मुलांचा निरागस आनंद, पूर्ण दिवसाचे एकदम बिझी शेड्युल, सर्वजण निर्मीतीक्षम कामात रममाण, आपलं काम, अभ्यास आणि त्यातून मिळणारा निर्भेळ आनंद पाहून समृद्ध, त्याचे मित्र आणि पाटकर कुटुंबातीत तरुण मंडळी सर्वजण भारावून गेले. सर्वजण अगदी आनंदाने मुक्कामाला तयार झाले. दिवसभरात एकदाही त्यांना शहरी जीवन, तेथील सुविधा आणि इतर अत्यावश्यक वाटणाऱ्या गोष्टींची आठवण आली नाही. मुलांमध्ये मुले होऊन मोठी माणसे ट्रिप एन्जॉय करत होती. लहानांपासून मोठयांपर्यंत संध्याकाळ पर्यंत कोणीही कंटाळा न करता आनंद घेत होते.
संध्याकाळी खळखळ आवाज करत वाहणाऱ्या नदीच्या पाण्याबरोबर सूर्यास्त पहाताना सर्वांची तंद्री लागली. नंतर बराच वेळ लहान मुले वाळूत खेळत होती.
निसर्ग सौंदर्य पाहून मुग्ध झाले सर्वजण. संध्याकाळच्या वेळी, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आकाशाच्या छटा आणि हळू हळू पसरत जाणारा काळोख, काळोखाला छेदत आपले अस्तित्व दाखवायचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या आकाशातील असंख्य तारका आणि पृथ्वीला आपल्या शीतल छायेनं न्हाऊ घालणारा चंद्रमा… आणि हे सारे बदल आपल्या पाण्यात प्रतिबिंबित करण्यासाठी आवाज न करता थोडी संथ झालेली सरिता माई. सुंदर❗️ अप्रतिम❗️ मनोहारी❗️ मोहक❗️ अनुपमेय ‼️ असेच शब्द बाहेर पडले. कांही फक्त स्तब्ध राहून दृश्य डोळ्यात साठवून घेत होते. अनुभवत होते.

वारंवार पटकन ड्रेस बदलून स्टेजवर प्रवेश करणाऱ्या कलाकाराप्रमाणे संध्याकाळी निसर्ग छटा बदलत होत्या. “बदल हा निसर्गाचा मुख्य नियम आहे “याची प्रचिती या सायंछटातून येत होती. निसर्गापेक्षा अप्रतिम नाटकी कलाकार दुसरा कोण असू शकतो ‼️
वारा तोच कधी झुळूक बनून भाजणाऱ्या उन्हात सुखावतो. कधी थोडासा अवखळ होऊन केसांच्या बटा विस्कटतो, कधी कडाक्याच्या थंडीत कुडकुडवतो, कधी वेगवान बनून झाडाना बुंद्यापासून हलवतो तर कधी वादळ बनून होत्याच नव्हतं करतो.
ऊन तेच❗️ कधी सकाळचं कोवळं ऊन, थंडीत उबदारपणा आणत तर कधी कडक पणा धरण करून भाजून काढत. कधी सोनेरी दिसत, कधी सावल्या लांब दाखवून संध्या छाया म्हणून द्वयीअर्थी वापरून हृदयाला भिवंवितात.अर्थाने , आखूड बनवत तर एका क्षणी सावली नाहीशी करत.
तसंच पाण्याचं, पाण्या तुझा रंग कसा ❓️ ज्या रंगात ठेवालं तसा❗️ पाण्या तुझा आकार कसा ❓️ ज्या भांड्यात ठेवलं तसा ❗️पाणी डबक्यात, पाणी विहिरीत, पाणी तळ्यात, पाणी नदीत, पाणी समुद्रात आणि पाणी डोळ्यात कधी दुखाश्रु खारट बनून वाहतात, कधी आनंदाश्रू गोड बनून वाहतात‼️ काय संकेत द्यायचा असतो ❓️
काय शिकवायचं असतं निसर्गाला या साऱ्यातून ❓️

मी बदलतो सतत, देत असतो संदेश नवे
जाणता का इशारे❓️ जाणता का बदलाचे वारे ❓️
की सारेच फोल❓️ शून्य बदलाचे मोल,
सोनाराने फुंकली नळी, इकडून तिकडे गेले वारे ❗️
बदल नेहमी आवडतात, जेव्हा पचनी पडतात…
मी बदलतो सतत, देत असतो संदेश नवे
तरुणांना मस्त हवे, नित्य नियमित बदल नवे
अन्यथा आपण थांबतो, डबक्यातल्या पाण्या प्रमाणे
सुखं दुःख समे कृत्वा | जपत बसतो जुन्या तत्वा. आमच्या वेळी असे, आमच्या वेळी तसें ‼️
असेल हरी तर, देईल खटल्या वारी ❗️
तत्व, जर, तरं,असे, तसें; कसे पेलू बदलाचे घुमारे ❓️
बनव सक्षम ‘स्व’ ला, अन्यथा पाचोळा की पाला…
बदल स्व ला, निसर्गाला ज्ञात आहे कसा घ्यावा बदला.
निसर्ग म्हणतात मला ‼️ सोडत नसतो ढिला ‼️..

🌱🥀🌈🌀⛅️☁️🌙🦜🦚🌲🌳🌟⭐️🌴🌾

शॉर्ट ट्रीपसाठी गेलेल्या पाटकर कुटुंबीयांनी काय दिलं शाळेला हे सर्वाना माहित आहे. पण त्या चार दिवसाच्या ट्रिप मध्ये अनिल सर आणि इतर शिक्षक मंडळी, मुलांच्या आणि पालकांच्या, निसर्गाच्या आणि स्टुडंट्स अकॅडेमिच्या सहवासात काय मिळवलं पाटकर कुटुंबियांनी ❓️ जाणून घ्यायचायं❓
अतुलनीय गिफ्ट होत ते. समृद्धच्या चेहऱ्यावरचं निर्मळ हास्य परत मिळालं. नितांत सुंदर निसर्गाच्या सहवासात चिंतामुक्त झाला तो. मुंबई शहरात सर्व सुविधांनी युक्त असलेल्या कुटुंबात निर्माण झालेली आणि सतत बोचत राहणारी गोष्ट मुळासहित नष्ट कारण्यासाठी स्वतः तरुण पिढी दोन हात करायला तयार झाली. स्वतःमधील भरकतलेला स्व: चा भाग ताळ्यावर आणण्यासाठी कंबर कसलेल्या या बच्चू कंपनीला साथ दिली ती कुटुंबियांनी आणि हितचिंतकानी. कमीत कमी सामान घेऊन स्टुडंट्स अकॅडेमीच्या हॉस्टेलवर राहायला आली सर्व मुले. त्यांना माहित होत इथं इतर मुलांप्रमाणे सेल्फ सर्विस असेल. सकाळी लवकर उठाव लगेल. तिन्ही ऋतू कडक असणाऱ्या या भागात बाराही महिने नदीच्या पाण्यात अंघोळ करावी लागेल. स्वतःची कामं स्वतः करायची. लहान आणि आजारी मुलांना लागेल ती मदत करायची. अकॅडेमीकतील इतर मुलांसारखं स्वतःमधील अंगीभूत गुण वाढीसाठी प्रयत्न करून कौश्याल्य संपादन करायचं. या आणि इतर असंख्य गोष्टीची माहिती घेणे कांही कौश्याले आत्मसात करणे आणि स्वतःला एक पूर्ण व्यक्ती म्हणून घडविण्याचा सोहळा अनुभवायला कुटुंबियांच्या कोशातून बाहेर काढलं. अनावृत धरती, मोकळे आकाश आणि अष्ट दिशा सारे आपलेच आणि आपण सर्वांचे.
अशा या वातावरणात आपल्या नातवंडाना सोडताना आजीचा एक डोळा हसत होता आणि दुसरा डोळा अश्रू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना सुरकुत्या पडलेला गाल ओला झालाच.
” दोन्ही डोळ्यातून पाणी येत नाही म्हणजे, तुला मनापासून वाईट वाटत नाही आज्जे❗️तरीपण चिल्ल यार आज्जी.” म्हणून निरोप देताना पायाला स्पर्श करणाऱ्या निखिल, ईशा, निनू आणि सर्व नातवंडाना आजीने मिठी मारली आणि डोक्यावरून प्रेमळ हात फिरवला. प्रत्येकजण आपापल्या वाटेकडे वळला….
• 👣👣👣👣👣👣👣👣👣
ज्ञान आणि संस्कार तेवढेच महत्वाचे असतात जेवढे जगण्यासाठी श्वास महत्वाचे असतात. समोर सगळं असतं, आपल्याला त्यातील योग्य, अयोग्य समजायला हवे. योग्य त्याच गोष्टीचा स्वीकार करून पुढे जातं राहणे आपल्या हातात असतं.
बदलांची योग्यायोग्यता तपासून काळाची पाऊले ओळखून त्याला अनुसरून निर्णय घेणारे विविधतेत एकता जपणारे भारतीय लोकं पाहून रॉबर्ट, त्यांचे रिच, पुअर डॅड आणि इतर पात्रे त्यांचे विचार अगोदरच आत्मसात केल्याचे पाहून समाधानाने आपल्या कामासाठी इतर ठिकाणी निघून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More