“तू सदा जवळी रहा…” भाग – 31 : अर्थात अडचणींवर मात

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चोरी समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली .

पाचूंची भरली राने…  

एस.  टी.  स्टँड, जीथं बस थांबत  असे,  तिथं  माणसं उभं राहण्यासाठी शेड वगैरे असे काहीही नव्हतं तिथं.  कोणाला जर बसावं वाटलचं तर चार, पाच टेबल्स टाकून कॉर्नरला उभं असलेल्या हॉटेलमध्ये बसत. अन्यथा प्रवासी  तालुक्याला जाणाऱ्या बसची ताटकळत वाट पाहत थांबत. रश्मी केव्हाही बाहेर जाण्यासाठी निघे तेंव्हा,  एस. टी.  स्टॅन्ड गाठण्यासाठी,  दोन किलो मीटर चालावं लागे.  कांही वेळेस तालुक्याला जाऊन वस्तू खरेदी करावी लागत असे.  विशेष करून दिवसा उजेडी परत संस्थेत पोहोचावे लागे.  रात्र झाली की,  टॉर्च असेल तर कमीतकमी रस्ता कापणं सुकर वाटे.  अन्यथा काळ्या  कुट्ट अंधारात  रस्ता  सरावानं पार करावा लागे.  आज रश्मी आणि हिस्ट्रीच्या मॅडम बाहेर गावाहून तालुक्याला पोहोचल्या,   तेव्हां संध्याकाळ होऊन गेली होती आणि कितीही घाई केली तरी रात्री  🕙 दहा वाजण्या पूर्वी घरी पोहोचू शकल्या नसत्या.  नेमकं बॅटरी नव्हती.  आता विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता.   जेव्हा संस्थेजवळच्या गावात बस मधून दोघी उतरल्या तेंव्हा,  रात्रीचे  साडेनऊ 🕥वाजले होते.  समोरून पण लाल एस. टी. 🚒आली, ती तालुक्याच्या दिशेने जाणारी होती.  दोन्ही एस. टी. चे प्रकाश एकत्र मिळाल्यामुळे एकदम प्रखर  झोत तयार झाला. दोन्ही  एस.टी. बस त्यांच्या समोरच्या  रस्त्यावर प्रकाश झोत टाकत निघून गेल्या. बसचा  प्रकाश  एकदम डोळे दिपवल्यानंतर  नाहीसा झाला  आणि  बाजूच्या हॉटेलमधील दिवे मिणमिणीत दिसायला लागले. रस्त्यावरून झप झप पावलं टाकत मॅडम आणि रश्मी निघाल्या आणि शिवम सर  आणि पवित्रा मॅडम  समोर दिसले. चौघे रास्ता कापत  पुढे  पुढे निघाले.  आणि चालता चालता सगळयांची पाऊले एकाच वेळी  थबकली.
  काय झालं असं एकदम थांबायला?  🐕🐶 कुत्रं  भुंकलं?  लांबड  🦠🗾दिसल? पायात  कांही वळवळलं🦂?😏 पण मग इतक्या रात्री मध्येच थांबायला काय झालं?  🤭 पण घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. मग् काय पाहिलं सर्वांनी ❓️❓️❓️❓️


   निरव शांतता आणि काळ्या घुडुक अंधारात चालताना  चौघांच्या चपलांचाच,   काय तो  आवाज येत होता.  पण आता तो पण  बंद झाला होता. समोरच दृश्य बघून निशब्द झाले सारे.  सुंदर ❗️❗️अति सुंदर दृश्य होतं ते❗️❗️ आजूबाजूला  काहीच दिसत नव्हत. पण वेळूच्या असंख्य झाडांचं झुडूप होतं तिथं.  वेळूच्या पानांवर अगणित पाचू चमकत होते आणि त्यांचा  मंद प्रकाश बराच दूरवरून दिसत होता.  इतकं सुंदर मनोहारी दृश्य ❗️❗️ आपल्या शेपटीद्वारे हिरवा प्रकाश सोडत हजारो काजवे एकाच झाडावर बसून हलचाल करताना हिरवे  पाचू  झाडाला लागल्याचा भास  झाला क्षणभर.  सर्वजण तिथेच थांबून हे मनोहारी दृश्य डोळ्यात😍,  मनात, हृदयात♥️ साठवत होते.  आकाशात  अगणित चांदण्या✴️✳️☀️🌟⭐️🌜 चमकत होत्या.  असंख्य तारकांना लाजवेल असा नजराणा पृथ्वीवर होता आणि रश्मी आणि तिचे सहकारी त्याचा आनंद घेत होते.  

आकाशात अगणित तारे 🌟⭐️ नाचत होते☀️ विखरून⭐️ सारे,  खगाय  🌑 सुद्धा लक्ष न देतो; म्हणून का हिरमुसले☹️😕 सारे?  रश्मीप्रकाशात 🌞तारे सारे ; दिसतील फिके अथवा अस्तित्वावर उठेल शंका❓ ताऱ्याना रजनी 🌑 आंदण ||
 निसर्गे  निर्मिले, नटविले,  प्रति तारांगण धरती 🌎 वरती; तारे करिती रश्मीस🌅🌄 वंदन  🙏निशी,   चमकण्यास्तव संधी  ||
आकाशी तारे,  धरेवर 🌎 काजवे,  द्विज भवनी सजे तारांगण,  रजनी पाहून साधिती मतलब, लूकलूकती पाचुं अन चांदणं  ||
आकाशातील पाहू मोती⚪️?  की,  पाहू पाचू धरतीवरचे🌍?  संभ्रम मनी का दाटे  क्षणभर?  असंख्य तारे लूकलूक करिती ||
प्रकाश 🌄काळ्या वाटेवरती,  नको थांबू तू चालत राही,  सातत्याने चालत राही 👣👣तूच निर्मिशी प्रकाश वाटा   ||

आणि हिरव्या मंद प्रकाशात सगळ्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले आणि सर्वांनी आपले घर  गाठण्यासाठी झप झप पाऊले उचलली. 
उषा आणि निशा  दोन लहान मुलींना घरी ठेऊन, कामासाठी शिवम सर आणि पवित्रा मॅडम बाहेरगावी गेले होते.  लहान लेकरं सांभाळण्यासाठी गावाहून एक ताई आणली होती.  ती छान सांभाळायची छोट्या छोट्यांना. “एव्हाना जेवून झोपल्या असतील उषा,  निशा दोघी”,  शिवम सर बोलले.  “हं” मॅडमनी हुंकार भरला.  हुंकारातून काय प्रतीत होतं होतं ❓️ की न बाहेर पडलेला उसासा होता तो ❓️
वर्किंग वुमनचे मन दोन ध्रुवावर आंदोळत असतं.  मुलाप्रती ओढ,  प्रेम,  अंगाई, वात्सल्य,  कर्तव्य,  गुंतलेलं मन,  बाळाच्या विविध टप्प्यावरील अपेक्षा  सारं   सारं एका क्षणी  दमन करत,  मनाच्या कप्प्यात दडपून बंद ठेवावं लागतं.  पदर खोचून घरी  साऱ्यांचं मन आणि कामं सांभाळायचं.  शारीरिक कसरत करत, समोरचं  काम उरकून वेळेत इप्सित ठिकाणं गाठायचं.  बाळाला सोडून घरातुन निघताना ठसठसणार मन बाळाला आणि कोणालाच दिसू नये म्हणून हास्याचा मुलामा चेहऱ्यावर चढवायचा आणि  दिवस, रात्र तसंच वावरायचं.  घर सोडून निघताना  पायांना घातलेली लहानग्याच्या कोमल हाताची मिठी सोडवताना हृदयात उठलेली सूक्ष्म कळ आणि मनाची घालमेल आईच जाणते.  आणि भावने पेक्षा कर्तव्य वरचढ ठरत.  आईचं आईपण, आई  होऊन संभाळाताना; आईच जाणे. प्रेमस्वरूप,  वात्सल्य सिंधू,  घोटलेली,  अखंडपणे पाझरणारी,  की धो धो वाहणारी माया,    कडक उन्हातील शीतल  छाया, पृथ्वीवरील देवता,  दुधावरची साय की साई खालचं दूध तिच जाणें.
बाळ कधी नजरेतून,  कधी कट्टीतून,  कधी  रडून,  कधी रागावून,  कधी बोलून, कधी गप्प बसून  निषेध,  नाराजी,  राग या भावना व्यक्त करतं. 
पण आई कोणाजवळ आपलं मन व्यक्त करणार❓️ ते अव्यक्त राहतं. आणि कधी हुंकार,  कधी डोळ्यातून,  मनातल्या मनात व्यक्त होतं राहतं.  वेदनेशिवाय काय  मिळणार?  काही गमावल्याशिवाय  काही कमावता येत नाही. सुस्कारा टाकून पुढे चालत राहायचं एवढंचं  हाती असतं. 

 विचार करता, करता बरंच अंतर कापलं होतं.  आता उजव्या बाजूला असलेल्या हर्बल गार्डन 🌱☘️🌿🌾🌵🥀🌼जवळच्या घरातून लाईट दिसू लागले होते.  हर्बल गार्डनचा लांबलचक  भाग पार करून गुरांचा 🐂🐃🐂🐃गोठा,  आणि डेअरी  जवळून  प्रकाश दिसत होता. दूध डेरीला वळसा घालून खाली उतरल की ट्यूबचा  प्रकाश रस्ता दाखवीत असे.    आता थोडया थोड्या अंतरावर घरं🏠🏡🏠🏡 होती आणि घरासमोर लाईट होते.  ऑफिस🏫 आणि हॉल,  शाळा🏬🎄🎋, 🌱🍀☘️🌳डॉर्मेटरी पार करत उतारावरून चालत राहीलं की,  पेरूच्या बागेतून पायवाटेवरून चालत चालत पुढे येऊन कोपऱ्याला वळसा घालून माटे काकांच घर दिसें. पेरूच्या बागेतून जाताना जरा जास्तच सावध  झाली रश्मी. नं जाणे;  खोडकर मुलांनी सापडयाच्या🐛  किंवा🦂 वृश्चिकच्या शेपटीला धागा किंवा सुतळी बांधून  पाय वाटे लगतच्या पेरूच्या बुंद्याला बांधून ठेवलं असेल तर? त्याच्यावर चपलांचा पाय पडायचा. जखमी सापडं अजून जखमी व्हायचं. पेरूची गार्डन संपली तसं रश्मीने हुशsss केलं.
  पुढे केन,  बांबू आणि आयर्न वर्कशॉप  प्रोजेक्टचं ऑफिस आणि  ऑफिसच्या  खिडकी जवळ जास्वदांचं झाडं दिसें. कधी वाटे कळ्या,  फ़ुलं खिडकीतून आत डोकावत,  काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतं आहेत.   जास्वदांचं कळ्यांनी लगडलेलं झाडं पाहून रश्मीच्या चेहऱ्यावर हसू फुटलं.  सकाळी  सूर्योदयापूर्वी असुदे किंवा कोवळ्या सूर्य किरणांमध्ये हिरव्या रंगावर लाल फुलांचं डिझाईन असलेले कपडे घालून जणू  वनदेवी  उभी आहे असं वाटायचं.  असंख्य हातानी आपल्यावर लगडलेली फ़ुलं पूजेला  देण्यासाठी हसत मुखानं उभी आहे असा भास होई.  दत्त गुरु चरणी आणि अष्ट लक्ष्मीच्या मस्तकी फ़ुलं वाहिली जातील या भावातून मनस्वी आनंद झाल्याचं पुष्प वृक्षाच्या हालचालीतून आणि  पानांच्या सळसळीतून जाणवत असे.   आपल्या जीवनातील एक दिवस सार्थकी लागल्याचं वृक्षराजाच्या स्पर्शातून  जाणवून मन आनंदी होई.  उद्याचा दिवस पण असाच आनंद देणारा असणार हे लगडलेल्या लाल चुटुक कळ्यामुळे जाणवे.   वर्कशॉप पार करून  पुढे आले सर्वजण.  समोर छोट दुकान होतं. दुकाना समोरून वळलं की पवित्रा मॅडमच घर आणि रश्मीचं घर दिसें. 

साजीद आणि मुलं

घराच्या दरवाजातील फटीतून मंद प्रकाश दिसला रश्मीला आणि आश्चर्य वाटलं तिला.  “प्रकाश कसा असेल❓️  घरून निघताना इलेक्ट्रिक स्विच ऑफ करून निघाले होते मी. सकाळी लावलेली समईतील ज्योत रात्रीपर्यंत राहणं अशक्य.  समई होती ती,  नंदादीप नव्हता.   मग हा मंद प्रकाश कसा काय?”  रात्रीचे साडेदहा वाजले होते.  कडी  बाजूला करुन बांबूच्या छप्प्याचा दरवाजा उघडला तर समईच्या ज्योती तेवत होत्या. दत्त गुरु आणि अष्ट लक्ष्मी प्रसन्नपणे आपल्या कडे पाहत आहेत असं वाटलं.  साजिदचं काम होतं हे, रश्मी समजून चुकली.  त्याला कित्येक वेळेस रश्मी  रागं  भरत असे. “साजिद, खाऊचे पैसे वापरून,  दिव्यासाठी तेल अजिबात आणायचं नाही,” रश्मी जरा आवाज चढ़वून बोलली. फक्त डोळे आणि मान झुकवली साजिदनं.  सजिद हॉस्टेलमध्ये राहणारा,  सहावीत शिकणारा मुलगा.  रश्मी, सकाळी पूजा,  प्रार्थना,  जप  आणि संध्याकाळी दिवा,  अगरबत्ती, प्रार्थना या बाबतीत पर्टिक्युलर असलेलं सर्वाना माहिती होतं.   रश्मी मॅडम बाहेर गेल्या की,  देवासमोर दिवा कोण लावणार ?  साजिदला नेहमी प्रश्न पडे❓️ रश्मी मॅडम कधी कामानिमित्त बाहेर गेल्या की,   न सांगता,  न बोलता तो  बरोबर संध्याकाळी  सात वाजता मित्रांबरोबर घरी जाई,  आणि देवापुढे   दिवा,  अगरबत्ती लावून हळद,  कुंकू वाही.  एकदा तेल संपलं होतं तर त्यांन स्वतःला वडिलांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून तेल आणून दिवा लावला होता. 

  बाथरूममध्ये गेली  रश्मी.  संतूर साबणाचा सुवास घेऊन बर वाटलं रश्मीला.  सईनं  नेहमीसारखं इतर वस्तूंबरोबर संतूर साबणपण दिला होता गावाहून निघताना.  संतूर साबण हातात घेतला तर आपली लहान बहीण: सईला स्पर्श केल्यासारखं वाटलं रश्मीला.  आपल्याबरोबर आपली छोटी बहीण सतत असते.  क्षणभर सईचा चेहरा दिसला रश्मीला.  तिच निर्व्याज प्रेम करणारी   नेहमी फक्त प्रेमाची अपेक्षा करणारी सईची नजर.    पाण्याचा नळ सोडून संतूर साबण ओला केलं आणि  हात, पाय व चेहऱ्याला साबण लावून  स्वच्छ धुतला.  सुक्या टॉवेलने चेहरा कोरडा केला.  एकदम फ्रेश वाटलं तिला.  डोळे झाकून देवापुढे उभं राहून हात जोडले,  तसं रश्मीला समोर  साजिद आणि इतर मूलं दिसली.  निष्पाप,  निरागस,  निर्व्याज प्रेम करणारी देवस्वरुप बालकं.  🙏 
प्रार्थना देवा तुला ही “तू सदा जवळी रहा..” मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा,  प्रेम दृष्टीने पहा,  प्रेम दृष्टीने पहाsss
आणि किलबिल किलबिल आवाज वेताचा दरवाजा ढकलून आत आला. साजिद,  रंगीता, संजू, नामा,  बंडू आणि साऱ्या  मुलांनी  रश्मीच्या आवाजात, स्वतःचा आवाज मिसळला..  
खंत नाही मज कशाची आस नाही मानसी तू नभाच्या लोचनाने सर्व कांही जाणीशी देह हा कर्मात शिरुनि सफल होवो जन्म हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा 🙏”तू सदा जवळी राहा…”🙏
“मी तसबीर मधील  देव पाहू की, या मुलांमध्ये?  माझ्या या लहान बालकांवर  तुझा  कृपा आशीर्वाद अखंड राहू दे.” मनोमन प्रार्थना करून रश्मीने  हात जोडले.  🙏🙏

————————————————–
समस्या❓️ उपाय 🌺

हॉस्टेल आणि मुलांच्या वेगळ्या समस्या होत्या ..  
मुलं जशी देवाघरची फ़ुलं तसं  हीच  मुलं कांही वेळेस वेगळाच अनुभव देऊन जायची. अपंग मुलांची समस्या वेगळी,  मुलीचे प्रश्न वेगळे,  लहान मुलांचे प्रश्न वेगळे,  भांडणाची करणं वेगळी.   टिन एज मधल्या मुलांच्या वेगळ्या आणि नाजूक समस्या.  इथं कॉलेज आणि  बी. एड. कोर्स  मधली चाईल्ड सायकोलॉजी काम नाही करायची.  गुंता हळुवारपणे सोडवावा लागे. कुठे अगंठ गाठ बसू नये, बसलेली सुरगाठ अलगद सोडविता यावी, उमलती पौगंडावस्तेतील,  अडनिड्या वयातली मुलं,  छोटया छोट्या चुकांमुळं त्यांच्या आयुष्याला काळी किनार  यायला नको म्हणून जपावं लागायचं. सारं सांभाळूनचं करावे लागे.  कोणाला रश्मीचं  अस्तित्व, कोणाला  तिची  नजर पुरेशी व्हायची.  कोणाला सरळ सांगितलेलं समजायचे,  कोणाला ओरडा पुरून जायचा तर   कोणाला फटका बसत असे. कधी तरी हात उगारायला लागला तर रश्मीच्या हृदयाची घालमेल  चेहऱ्यावर दिसायची.  हाताबाहेरची प्रकरण सेक्रेटरी सरांकडे  कडे जायची. 
संध्याकाळचा खाऊ 
सकाळचा नाश्ता,   दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण हॉस्टेलमधील मुलांना दिलं जायचं.  पण कांही कार्यकर्त्यां, अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की दुपार आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकासा आणि हेल्दी खाऊ मुलांसाठी आवश्यक असल्याचे एकमत झाले.  या सर्वातून मुलांबद्दलची काळजी दिसून येतं होती.    पालकांकडून  शक्य असेल तरच अगदी नॉमिनल रक्कम घेतली जाई,  जी नसल्यात जमा होती.  त्याचा उद्देश फुकट काहीच मिळणार नाही पण महाग पण असणार नाही. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते म्हणून सारा खटाटोप. ज्यांची ऐपत असेल ते पालक मेसचे पैसे भरत होते.  हिस्टरीच्या मॅडम आणि रश्मीनं एक एक मुलगी दत्तक घेऊन हॉस्टेलचा खर्च उचलला.  संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुलं  त्यांच्या आवडीप्रमाणे खेळ खेळत. नदीवर अंघोळीला जात,  अभ्यास करत.  जेवणानंतर  काही वेळेस मोठी मुलं  अभ्यास करत.  आज मूर्तीकाका संध्यकाळी मुलांबरोबर वेळ घालवणार होते.  गप्पा,  गोष्टी,  गाणी,  भजन,  मुलं नुसती धमाल करत. आज अंकलनी  गोष्ट सांगितली. मुलं मन लावून ऐकत होती.  मध्येच प्रश्न❓️ विचारत. आज जेवणाची आठवण नव्हती मुलांना.  भोजन नंतर भजन अगोदर.  मुलांबरोबर बरीच मंडळी जमली.   आणि शेवटी  मुलांबरोबर भजन रंगल. सगळेच साथ देत होते.  ना टाळ,  ना मृदंग,  ना वीणा ,  ना चिपळी,   ना पेटी…  तिथं फक्त मुलं,  देवघराची फ़ुलं,    आणि त्यांचं निरागसपण..   गणेश शरणंsss,  शरणं गणेशाsss… गणेश शरणं,  शरणं गणेशा ssss.. ……  
जेवणासाठी बरेच लोक जमा झाले मेसमध्ये. तसं मुलं पण  निघाली उदर भरणे नोहे जाणिजे यज्ञ कर्म म्हणायला. 


कैलासचे पैसे चोरी, समस्या


कैलाश एक सावळा,  गोड मुलगा,  भोकरा सारखे मोठे काळेभोर डोळे. डोळे एकदम बोलके वाटायचे..  हुशार मुलगा.  अक्षर एकदम मोत्यासारखे होते. मेहनती वृत्ती होती त्याची.  एक पाय बारीक.  पोलिओचा परिणाम होता तो.  पण त्याचा कधी बाऊ नाही केला कैलासनं.  सगळ्या गोष्टी स्वतः करायचा.  जवळच्या पाड्यावर आई वडील राहत होते त्याचे.  शनिवारची शाळा संपली की घरी जाई आणि सोमवारी सकाळी परत  येई.  साहजिकच खर्चासाठी आई पैसे द्यायची.  आणि नेमकं हेच हेरलं कुणीतरी आणि त्याचे पैसे चोरीला गेले.  एकदा,  दोनदा असं झाल्यामुळे घरीपण ओरडा बसला त्याला. 
कैलास सोमवारी सकाळी लवकरच पोहोचला होस्टेलवर.  रश्मीनं दोनदा नाष्ट करायला जा म्हटलं तरी तो जागचा हलला नाही.  नेहमी गोड हसणारा कैलास आज फ्रेश वाटतं नव्हता. विशेषतः हॉस्टेल वरील मुलांना घरून निघताना मन आणि पाय जड होतात.  त्यामुळं त्याला नाष्टा नको वाटत असेल.  रश्मीनं स्वतःची समजूत घातली.

सर्व मुलं बाजूला असलेल्या मेसमध्ये गेली.   धुतलेला पंजाबी ड्रेस दोरीवर टाकायला रश्मी स्टूलवर चढली.   हॉलमध्ये एकदम शांतता होती.  संगीता आणि तिची बहीण जवळच्या पाड्यातून परत आल्या.  ट्रंकेला लागून बॅग ठेवली तीनं.   “मॅडम sss,  मोठ्या मॅडम sss”  दबक्या आवाजात हाक मारली  तीनं  “काय गं संगीता?  आठ वाजले नाष्ट्याला  जा.  उशीर होईल शाळेत जायला”. सलवार झटकून दोरीवर टाकत रश्मी संगीताला सांगत होती.  “मोट्या मॅडम,  कैलास बघा कसं करतोय?  त्याच्या तोंडातून फेस येतोय.” संगीतानं  रश्मीला सांगितलं.  स्टूल वरून उडी मारून धावत कैलास जवळ जाऊन पाहिलं.  त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं.  घामामुळं कपाळ थंड लागलं.  “काय रे कैलास, घरातून इथंपर्यंत येताना वाटेत तुला काही चावलं का ? ” श्यक्य तितक्या शांत आवाजात रश्मीने त्याला विचारल. एकीला पाणी आणायला पाठवलं दुसरीला बाजूच्या दवाखान्यातून डॉक्टर ना बोलवायला पाठवलं.  पाण्याचा हबका कैलासच्या चेहऱ्यावर मारत असताना डॉक्टर आले.  त्यांनी तपासलं आणि तालुक्याला न्यावं लागेल म्हणून सांगितलं. डॉक्टरना कैलास जवळ थांबवून रश्मीनं ऑफिसमध्ये धाव घेतली आणि ताबडतोब जीप नाहीतर मिनीबस हवी असल्याचं सांगितलं.  फॉर्म्यालिटीस मध्ये अडकलेल्या आधिकाऱ्याबरोबर जोराचा वाद झाला. रश्मीचा आवेश बघून समोरचे  अधिकारी- काका अवाक झाले.  ड्राइवरनं गाडी हॉलजवळ घेतली आणि कैलासला उचलून गाडीत ठेवलं.  वेगाने गाडी तालुक्याला निघाली.  कैलास डॉक्टरांच्या मांडीवर डोकं ठेऊन निपचित पडला होतं आणि रश्मीचा चेहरा पार उतरला होता. रश्मीचा मनातच; मृत्युन्जय मंत्र चालू होता.   “मॅडम याला काहीतरी चावलयं.  त्याच्या तोंडातून निघालेल्या फेसावरून समजतंय मला.”

डॉक्टर रश्मीकडे पाहून बोलले.  रश्मीनं जबरदस्तीनं पाजवलेल्या पाण्याचा परिणाम म्हणजे कैलास भडाभडा उलटी करू लागला आणि डॉक्टरांची पॅन्ट पूर्ण भिजली.  उलटीमुळं विष तर बाहेर पडलं. पोलिओमूळे एक पाय बारीक असलेला कैलास, तब्बेतीने नाजूक होता. तालुक्याच्या दवाखान्यात डॉक्टरनी शर्थीचे प्रयत्न केले आणि कैलास बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं.  डॉक्टरना मनापासून हात जोडले रश्मीनं. संध्याकाळपर्यंत कैलास बराच फ्रेश दिसत होता.   औषधं   घेऊन रश्मी,  कैलास आणि डॉक्टर परत निघाले तेंव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते.  तहान भूक सार विसरून गेली होती रश्मी.  संस्थेत पोहोचायला रात्रीचे आठ वाजले होते.  “डॉक्टर,  तुमचे खूप खूप अभार🙏” हात जोडत एकदम भरल्या गळ्यानी रश्मी बोलली.  वेळेवर गाडीची व्यवस्था झाली म्हणून तालुक्याचे डॉक्टर,  कैलासला वाचवू शकले, ” म्हणून हसून डॉक्टर आपल्या घरी जाण्यासाठी  निघाले.  रश्मी आणि कैलास  हॉस्टेलमध्ये पोहोचले तेव्हा साजिद, संगीता आणि इतर मुलांनी कैलासाला हाताला धरून हॉलमध्ये नेलं. रश्मीनं गरम भात आणि वरण मागवून घेतलं. जेवणाबरोबर कैलासला गोळ्या आणि पाणी दिलं. जेवून आराम करायला सांगितलं.  मुलं जातीनं लक्ष्य देताहेत हे पाहून,  रश्मी  निश्चिन्त झाली.  चिवचिवाट  ऐकून बरं वाटलं. गाऊन  आणि टॉवेल घेऊन रश्मी, अंघोळीला गेली.   बाथरूममधून बाहेर आली तेंव्हा मावशी रश्मीची वाट पाहात थांबल्या होत्या. 
“मॅडम तुम्ही लई थकलायसा. मी ऊन, ऊन जेवण वाढून  आणतो”  मावशी जिव्हाळ्यानं रश्मीचा हात पकडून म्हणाल्या.  “मी मुलांबरोबरच जेवायला बसेन, मावशी” रश्मीनं  मावशींना सांगितलं. मेसमध्ये, मॅथ्स सर जेवायला आले होते. “कोणीच आलं नाही ना तुमच्या मदतीला?” नाराज सुरात बोलले सर. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जाणवला.  ना मुख्याध्यापक आले ना कोणी प्रोजेक्ट इन्चार्ज.  ना कैलास कसा आहे❓️ विचारलं,  ना रश्मी. नशिबानं कांही  वाईट घडलं नाही. अन्यथा रश्मीचं करिअर घडण्याअगोदर बिघडलं असतं.  कैलासवरचं संकट टळलं हे खूप चांगलं झालं.    इथली आपुलकी,  माणुसकी पूर्वीसारखीच आहे ना?  रश्मीच्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलं.  दुसऱ्या क्षणी डॉक्टरांची वेळेवर मिळालेली मदत आणि संध्याकाळपर्यंत  त्यांचं बरोबर असणं  आपल्याला मोठा दिलासाच मिळाला.   पुढाकार घेऊन सर्व काम त्यांनीचं केलं.  हे काय होतं?  मुलांचं  धावत येऊन कैलासचा  हात पकडुन  हॉलमध्ये नेणं,  हे काय होतं?  
“मॅडम तुम्ही लई  दमल्या आहेत.  मी गरम जेवण घेऊन येतो”, असं मावशीचं म्हणणं  हे काय होतं?”  आपल्या डोक्यात सकाळच्या अधिकाऱ्याचे शब्द होते.  हट्टाने आपण  गाडी घेऊन गेलो.  वेळेत पोहोचलो आणि संकट टाळलं.  फार बर झालं.   एका गोष्टींनं मन खट्टू होतं.  चार चांगल्या गोष्टींनं हुरळून जातं नाही…  आपला स्वभावच असा आहे रश्मीची विचार शृंखला हळुवार, कोवळ्या हातांच्या स्पर्शाने तुटली. “मॅडम चला नं जेवायला,  आम्हाला खूप भूक लागलीय” कृतानं रश्मीचा हात पकडून खेचायला सुरुवात केली.  आणि सगळे जेवायला निघाले…..  ———————————


ऋता आणि रश्मीपुढील पेच 


गोंडस कृता आणि ऋता,   👯‍ दोन छोट्या बहिणी शाळेत दाखल झाल्या. परिस्थितीमुळं आईला मुंबईतून, संस्थेच्या हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. एकलं महिला पालक,  दिवसभर कामासाठी बाहेर पडत असे. हॉस्टेल आणि शिक्षणाची सोय पाहून मुलींची👩‍👧‍👧 आई निर्धास्त झाली.   कृता पहिलीत आणि ऋता बालवाडीत.  कृता रुळली शाळेत आणि हॉस्टेलमध्ये. रुटीन अड्जस्ट करून खूप छानपणे सामावून घेतलं स्वतःला.   

गोड गुबगुबीत गाल,  गोल कमळ पाकळ्यासारखे मोठे डोळे,  बॉब कट केस,  गुलाबी ओठ आणि  नवीन जागी रुळायला नकार देणारी,  भिरभिरती नजर.  कशाचा तर शोध घेणारी.  आई निघून गेली की हैराण व्हायची.  डोळ्यात वेगळे भाव चमकायचे. हरीणीच्या पडासासारखी सैरभैर नजर. बाहुली ! ओठ घट्ट मिटलेले.  जाणू ठरवलेलं,  बोलायचचं नाही.  बाकी साऱ्या मुलांच्या आंगोळी झाल्या तरी अंघोळीचा कंटाळा. अंघोळीसाठी थंड पाणी म्हणून नाराज असेल का?    शाळेत जायला उशीर, इतर मुलांबरोबर जेवायला नकार,   हॉस्टेलमध्ये इतकं लहान कोणीच नव्हतं.  बालवाडीतील मुलं रोज घरून येणारी असल्याने ऋता हैराण,  आणि ऋता रुळेना म्हणून रश्मी हैराण. लहान मुलं  ते,  पण जेवायला नकार देऊन नाकात दम आणलं.  बाल मानस शास्त्राचे  धडे निरुपयोगी झाले.  मुख्याध्यापकाद्वारे संस्थेच्या सचिवांपर्यंत गेली तिची माहिती आणि बाल हट्ट. आणि मिटिंग मध्ये ऋताचा विषय गाजला. सर्वानुमते ऋता खूपच लहान असल्यामुळे तिला घरी परत पाठवायचा निर्णय पक्का झाला. 


कुठं तरी सूक्ष्म कळ गेली रश्मीच्या हृदयातून.  काहीतरी चुकतंय हे स्पष्ट होतं.  पण नेमकं काय?  समजत नव्हतं. लहान ऋताला घरी पाठवून समस्या सुटली का?  की सुटका झाली?  कुणाची सुटका?  जबाबदारी झटकतोय का आपण?  नेमकं कुठं चुकतंय?  ऋता लहान बाळ आहे.  तिला कळणार नाही. पण आपलं काय?   तिचं शिक्षण सुरु होण्यापूर्वीच बंद होणार.  ते कसं चालेल?   मिटिंग संपून चार, पाच तास झाले.  उद्या ऑफिसमधून ऋताच्या आईला पत्रं जाईल. समस्या संपेल.  काय करतोय आपण ?  आपण सर्वात लहान मुल नेमकं कधी पाहिलं❓️ रश्मी, स्वतःच्या लहानपणापासून  धांडोळा घेऊ लागली.  सई नंतर घरी लहान कोणीच नव्हतं.   महेश आठवला.   अख्खा वेळ रश्मीताई, सईताई म्हणून मागेपुढे तीन चार वर्षाचा छोटा मुलगा लडिवाळ पणे फिरत राही.  आपल्यासमोरच मोठा होतं होता तो.  त्याची शारीरिक,  मानसिक वाढ,  जाणिवा,  जिव्हाळा सारं समोर दिसायचं.  त्याच्या सर्व प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी त्याची आई हजर असायची. आवड – निवड,  खाण – पिणं,  शाळापूर्व तयारी,  खेळणं,  फिरणं, अभ्यास  आईच्या प्रेमळ शिस्तीत व्हायचं. गरजेला आई जवळ होती.   घास भरवण्या पासून, पॉटी साफ कारण्यापर्यंत,  उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर पण हक्काची आई असे.  फक्त आपल्या बाळासाठी.  आणि रश्मीला अवघड आणि गुंता वाटणार कोडं अलगद उलघडतय असं वाटलं.  रश्मी, सर्वप्रथम ऑफिस मधून ऋताच्या आईला लगेच पत्रं पाठवू नये,  तिला चार दिवसाचा अवधी देण्याविषयी मुख्याशी बोलली.  आणि कालच्या मिटिंग नंतर ठसठसणार मन जरा रिलॅक्स झालं.  हॉस्टेलमध्ये सर्व मुलं तयार होऊन प्रार्थना करून नाश्त्यासाठी मेसमध्ये रवाना झाली. हॉलमध्ये कोणीतरी पेटीला टेकून बसल्याचं दिसलं, म्हणून रश्मीने पाहिलं.  ती ऋता होती.  पहिली स्टेप : “तू नाही गेलीस नाष्टा करायला?”  रश्मीने हळू आवाजात छोटीला विचारलं पापण्यांची हालचाल झाली.  एक कटाक्ष रश्मीच्या चेहऱ्यावर टाकून परत पापण्या झुकवल्या.  जीवणि बंद.  लाल चुटुक ओठातून एकही शब्द बाहेर नाही आला.  नाष्टा खाण्यासाठी उठण्याची कांही लक्षण दिसेनात. रश्मी टेबलजवळ जाऊन बसली आणि..  दुसरी स्टेप :   “ऋता बाळा,  इकडं ये !” रश्मीने जोरात हाक मारली. ऋता दबक्या पावलांनी जवळ आली आणि टेबल समोर उभी राहिली.  छान आहे तुझा फ्रॉक.  बाहुली सारखी दिसतेस.  पण शाळेचा युनिफॉर्म घालावा लागेल नं ?  सात पन्नास झाले. नाष्टा   करायचाय अजून.” रश्मी घड्याळात पाहात  बोलली.  “संध्याकाळी आपण नदीवर फिरायला जाऊ.”  रश्मीचा एकतर्फी संवाद चालू होता.  “अशी इकडं ये,  माझ्या जवळ बैस,” रश्मी बोलली तशी डोळ्यात बोलकी हालचाल झाली.  पण तिची पाऊले जाणू जमिनीला खिळलेली.  


 चिऊताईचं बाळ 


स्टेप तीन : रश्मीने चष्मा टेबलवर काढून ठेवला आणि स्वतः उठून, ऋताला उचलून घेतलं. थोडं अंग आकसून घेतलं ऋतान  सुरवातीला. पण रश्मीने चिऊताईची गोष्टी सांगायला सुरुवात केली तशी, थोडी सैलावली. स्टेप चार:   रश्मीची वेगळी सायकोलॉजी सुरु झाली.   

एक होती चिऊताई. तिला एक छोटस बाळ होतं.  बाळ हळू, हळू मोठं व्हायला लागलं. पहिल्यांदा चिऊताई त्याला आपल्या चोचीतून दाणे आणून घास भरवायची.  मम्मं  करायला कंटाळा केला बाळानं की चिऊताई त्याला गोष्टी सांगायची.  मध्येचं रश्मीनं ऋताला प्रश्न विचारला,  “तुला माहिती आहे, चिऊताई आपल्या बाळाला काल कोणती गोष्ट सांगितली?  “नाही.  मला नाही माहित चिऊताईनं तिच्या बाळाला कोणती गोष्ट सांगितली ते.  तुम्ही  सांगा ना मॅडम.”   ऋताच्या मनात उत्सुकता,  आणि शब्दात आग्रह होता.  ऋता, चिऊताई आपल्या बाळाला, “ऋता बाळाची”  गोष्ट सांगत होती. रश्मी उतरली. “चिऊताई आपल्या बाळाला, माझी गोष्टी  सांगत होती मॅडम❓️” चेहऱ्यावरचे उत्सुकतेचे भाव स्पष्ट दिसतं होते.

आता ऋताला गंम्मत वाटू लागली.  “हो तुझीचं गोष्ट ऋता.”  रश्मी मॅडम बोलल्या.  तसं ऋतानं डोळे मोठे केले आणि  कान टवकारले.  “चिऊताईचं बाळ  खाऊ खाताना मस्ती केलं तर  चिऊताई काय म्हणायची माहिती आहे?”   रश्मीने ऋताला प्रश्न विचारला” काय म्हणायची चिऊताली आपल्या बाळाला? ” पुनःश्च तोच प्रश्न, ऋतानं मॅडमना विचारला 
 “ऋता बाळासारखा हट्ट करायचा नाही. मी भरवते तेव्हा खाऊ खायचा.  म्हणजे तू हेल्दी होशील,  खेळायला जाशील. वेळेवर अंघोळ करुन शाळेत जाशील. तू लहान बाळ आहेस.   जर  जेवलं नाही तर स्ट्रॉंग कसं बनेल? ते तर ऋतासारखं हट्टी आणि अशक्त बनेल. मग् अशक्त बाळ  शाळेतं कसं जाईल?  म्हणून  व्यवस्थित जेवायला हव, म्हणून चिऊताईनं बाळाला दाणे भरवले”. रश्मीच्या गोष्टीचा परिणाम साधतं होता.  ऋता बरीच सैलावली. 
बाळ व्यवस्तित खाऊ लागल्यामुळं ते खूप स्ट्रॉंग झालं आणि एक दिवस चिऊ ताई  बाळाला घेऊन शाळेत गेली.  आता रोज  चिऊताईचं बाळ सकाळी लवकर उठून ब्रश करायचं, अंघोळ करायचं आणि बॅग घेऊन शाळेत जायचं.   हळू, हळू बाळ खूप मस्ती करायला लागलं.  वर्गात आपल्या मित्रांच्या खोड्या काढायचं.  घरी होमवोर्क करेना.  चिऊताई बाळाला अभ्यास कर,  अभ्यास कर म्हणून सांगून थकली.  बाळ कांही मस्ती करायचं सोडेना.” रश्मीने पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिईतोवर समोरून प्रश्न आला. 
“मॅडम,  वर्गात काय मस्ती करायचं चिऊताईच बाळ?” ऋतानं मध्येच प्रश्न विचारला. “वर्ग चालू असताना,  बाजूला बसलेल्या काऊ बाळाच्या शेपटीचा पंख खेचला म्हणून काऊचं बाळ  “काव sss काव sss” असं ओरडल. टिचरनी चिऊ बाळाला आणि काऊ बाळाला शिक्षा केली.  “उद्या चिऊ, काऊ बाळानं आपल्या मम्मीला शाळेत घेऊन यावं म्हणून सांगितलं” चिऊ ताईनं  काऊताईच्या  कानात एक गंम्मत सांगितली.  घरी गेल्यानंतर,  चिऊताई आपल्या बाळाला मांडीवर बसवून आपले  पंख चिऊ बाळाच्या डोक्यावरून फिरविले आणि गप्पा मारत मारत खाऊ भारावला.  उद्या पासून शाळेत मस्ती करायची नाही.  टिचरनी संगीतलेलं व्यवस्थित ऐकायचं.  रोज अभ्यास करायचा आणि खेळायला पण जायचं.  खोड्या काढायच्या  नाहीत.  चांगले मार्क्स आणलेस तर मी तुला  छुमss, छुमss  वाजणारे पैंजण आणून देईन.  खरंच आई ❓️ मला खरंच छुमss, छुमss वाजणारे पैंजण आणून देणार❓️चिऊच्या  बाळांनं  मम्मीला प्रश्न  विचारला.  “हो बाळा, तुला खरंच नवीन छुमss, छुमss वाजणारे पैंजण देणार.  पण केव्हा माहित आहे ना ?” चिऊ मम्मीने बाळाला प्रतिप्रश्न केला “होsss,  शाळेत जाणार,  खोड्या काढणार नाही आणि अभ्यास पण करणार”,  असं म्हणून आपल्याला पैंजण मिळणार म्हणून मैत्रिणींना सांगायला चिऊताईचं बाळ भुर्रकन  उडून खेळायला गेलं.  लवकर आवरून रोज शाळेत जायचं, चिऊताईचं बाळ. संध्याकाळी खेळायचं आणि वेळेत होमवोर्क पण करायचं.  परीक्षेत खूप छान मार्क्स मिळाले  चिऊ ताईच्या बाळाला. चिऊताईनं आपल्या  बाळाला छुमछुम वाजणारे पैंजण दिले.  चिऊताईचं बाळ पैंजण घालून

थैनsss,  थैनsss  नाचायचं आणि इकडे  ऋता बाळ पुंई sss,  पुंई sss  पा.. दा…य…ची.”  रश्मी स्वतःचं जोरजोरात हसायला लागली. “अंss मॅडम काहीतरीचं तुमचं” म्हणून ऋता लाजली सॉलिड.  आता  तिचा संकोच निवळला.  तिच्याशी गोड गप्पा चालू झाल्या तशी कळी खुलत गेली.  आणि बराच वेळ दोघी बोलत होत्या.  आता समोरून जास्त बोलणं होऊ लागलं आणि रश्मी ऐकणाऱ्याच्या भूमिकेत शिरली.   कंगवा घेऊन छानशा दोनही  पोनीला रबर लावलं आणि लहान कोवळ्या चेहऱ्यावरून पॉंड्स पावडरचा हात फिरवला.  युनिफॉर्मची बटण लावून तयार झाली डॉली.  मावशींकडून नाष्टा मागवला आणि हळू हळू चमच्यानं भरवला. “ऋता,  तुला काहीही हवं असेल तर मला सांग हं.”  शेवटचा पोह्याचा घास भरवता भरवता रश्मी बोलली. “हो मॅडम,  मी तुम्हालाचं सांगणार ,” समोरून गोड आवाज आला.  “आता तू ही प्लेट मावशीकडे दे आणि पाणी पी,” रश्मी चमचा प्लेटमध्ये ठेऊन प्लेट ऋताच्या हातात देत बोलली.  आता ती सुस्थ आणि अबोल राहिली नव्हती.  हालचालीत चपळपणा जाणवला. चांगला परिणाम साधला होता.  
रश्मीनं बाजूलाच असलेल्या मेसमध्ये चक्कर टाकली तर अजून मुलांचा नाष्ट सुरु झाला नव्हता.  हिस्ट्री टीचर,   संस्कृत मास्टरजी,  मॅथ्स सर नाष्ट्यासाठी मेसमध्ये पोहोचले होते.  
पोह्याच्या प्लेट्स समोर आल्या.
मुलानी प्रार्थनेसाठी हात जोडले 🙏 आणि डोळे मिटले 😑. 
ओम सहना ववतु, सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवा वहै,  तेजस्वी ना मधित मस्तु ओम शांती शांती शांती: 🙏    प्रार्थना झाली  तरी मुलांचा  आवाज  कमी होईना. “ए,  किती आवाज करताय?  तोंड बंद करून खायला सुरवात करा.  अजिबात आवाज येता कामा नये”,  हिस्टरी टीचर बोलल्या.  एकदम चिडीचूप शांतता पसरली.  सर्व मुलं आवाज न करता नाष्टा करू लागली.  लक्ष वेधलं ते संगीतानं.  प्लेटमधून चमचा भरून पोहे घेतले,  चमचा तोंडाजवळ नेला.  ओठ घट्ट मिटलेले🤭🥴.  चमचा प्लेटमध्ये ठेवला. परत चमच्यात पोहे घेऊन, चमचा तोंडाजवळ नेला.  तोंड बंद, ओठ मिटलेले.  चमचा प्लेटमध्ये ठेवला.   “छोट्या मॅडम,  संगीता पोहे खात नाहीयं,” सजिद बोलला. आज  पाणी वाढायची पाळी साजिदकडे होती.  बोलता बोलता तो ग्लासमध्ये काठोकाठ पाणी ओतत होता.    तेवढ्यातं सेक्रेटरी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय नाष्ट्यासाठी मेसमध्ये आले.  
“अरे ! तुम्हाला आवाज बंध करून खायला सांगितलं.  तोंड बंद करून  नव्हे.” हिस्ट्रीच्या मॅडमनी दुरुस्ती केली आणि संगीतानं तोंड उघडुन पोहे खायला सुरवात केली.  काठोकाठ भरलेला पेला न उचलता कल्पनाने वाकून आपलं तोंड पेल्याजवळ नेऊन पाणी प्यायला सुरु केलं.  
मूर्ती अंकल,  राज आंटी आणि शिवानी दीदीनी  सर्वांबरोबर नाष्ट घेतला.   संध्याकाळी मुलांना प्रार्थनेच्या वेळी भेटू असं मूर्ती अंकलनी प्रॉमिस केले आणि मुलं एकदम खुश झाली.  मूर्ती अंकल, गाणं आणि भजन खूप सुंदर शिकवत असतं. 
मुलं नाष्ट व्यवस्थित करताहेत हे रश्मीनं   पाहिलं.  आता मुलांबरोबर इतर शिक्षक होते.


ऋता रुळली 

रश्मी हॉलमध्ये येऊन नेहमीच्या जागी  खाली कमलासनात बसली. डाव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद केली.   डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घेतला,  उजव्या नाकपुडीतून हळुवारपणे श्वास सोडला.  असं पाच वेळेस करून झालं.  आता तर्जनीनं डावी नाकपुडी बंद केली.  उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेतला. हळुवारपणे डाव्या नाकपुडीतून श्वास सोडला. अशा तर्हेने पाच वेळेस अनुलोम विलोम केलं.  
दोन्ही नाकपुड्यानी दीर्घ श्वास घेतला आणि  उच्छवासाबरोबर ओंकार उच्चारण सुरु केलं.  हळू आवाजात सुरुवात करून, हळूहळू आवाज वाढवला आणि नंतर कमीकमी करत आवाज आणि ओठ बंद केले.  पाच वेळेस ओंकार उचरण झालं आणि मानसपूजेसाठी सज्ज  झाली रश्मी.

आपलं लक्ष्य दोन भुवयांच्यामध्ये केंद्रित करून  स्थिर केलं. मन हृदयाकडे वळवलं आणि हृदय कप्प्याची द्वार खुली केली.  
अगरबत्ती,  दीप प्रज्वलन केलं.  कलशामध्ये   पंच नद्यांचं जल एकत्र केलं होतं. कलश वाकडा करून  दत्त पादुकांवर हळुवारपणे अभिषेक केला.  पादुका स्वच्छ कोरड्या वस्त्राने पुसून घेतल्या.  चंदन लेपन झालं. भगवी रेशमी वस्त्र वाहिलं.  फ़ुलं वाहिली.  तुळसी वाहिल्या आणि वर विड्याच्या पानांनी सजवलेला मुखवटा ठेवला.  पुनःश्च सुवर्ण चंपक फ़ुलं अर्पण केली आणि पंचारतीने ओवाळलं. आरती झाली.  दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला. आणि हात जोडले विश्व प्रार्थनेसाठी.  हाताला स्पर्श जाणवला.   कोणीतरी खूप दुरून, “मोठ्या मॅडम” म्हणू हाक मारताय असं वाटलं.  भास म्हणून सोडून दिलं आणि प्रार्थना सुरु झाली.  एवढी प्रार्थना झाली की हळू हळू डोळे उघडून  रश्मी आपल्या नियमित कामाला सुरुवात करत असे.  प्रार्थना संपता, संपता पुन्हा भास झाला स्पर्शाचा आणि आवाजाचा. आता आवाज जरा जोरात आला.  प्रार्थना संपली आणि रश्मीला दंडाला हात लावून खरोखरच कुणीतरी हलवतय असं स्पष्ट जाणवलं.  तो पर्यन्त हॉल मध्ये इतर मुलं आणि टीचर्स आले होते.  त्यांनी जें पाहिलं ते आश्चर्य वाटाण्या जोग होतं.  रश्मीनं  आता डोळे उघडले.  मोठ्या मॅडम ध्यान करत असताना ऋता त्यांना जोरात हाका मारत होती आणि दंडाला धरून हलवत होती.  
“अहो आश्चर्यम,  अहो आश्चर्यम ” संस्कृत मास्टर  बोलले.  एव्हाना हॉलमध्ये बरेचं आवाज यायला लागले होते.  
“काय पाहिजे ऋता❓️ तू मला सांग” हिस्टरी टीचर ऋताला बोलवत होत्या.  
“ऋता, इकडं ये,  मोठ्यां मॅडमना डिस्टर्ब करु नको,” गणित शिक्षक बोलले.  “आ जाना  गुडिया,  इधर आ जाना,” हिंदी मास्टरजी आणि त्यांची मुलगी  दोघे बोलावत होते. तिला हाताला धरून रश्मीपासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला सुरेखा मॅडमनी. 
ऋता रश्मी टिचरला चिकटली.  बाकीच्या  कोणाकडेही जाईना.  

“हं, बोल ऋता बाळा  काय झालं?  काय हवं आहे का?  रश्मीनं  हळू आवाजात ऋताला विचारलं “मॅडम,  मला शीsss  आलीय”  ऋता बोलली. 
मावशींना बोलावून तिला टॉयलेटला पाठवलं.  वेळेत आवरून आपलं दप्तर घेऊन कटकट नं करता ऋता इतर मुलांबरोबर वर्गात पोहोचली.  आता ऋताच्या आईला, ऋताला परत घेऊन जाण्यासाठी पत्रं पाठवलं जाणार नव्हतं.  रश्मीच्या चेहऱ्यावर खुप मोठं समाधान आणि हसू विराजमान झालं होतं.  सकारात्मक ऊर्जा घेऊन दिवसभराच्या कामासाठी रश्मी बाहेर पडली. 
संध्याकाळी आशाताईंनी ऋताबद्दल  तक्रार केली नाही.  आज ती वर्गात शांत होती आणि प्रश्न पण विचारत  होती. आशाताईंनी समाधान व्यक्त केलं.     ———————–

13 Responses

  1. आपली शैली सौंदर्यपूर्ण आहे.
    आपल्याला स्वतः ला गरीब मुले त्यांचे भाव विश्व, त्यांची निरागसता भावते हे कथेतून दिसते.
    सुंदर.

    1. Thank you sir . You read episode and given your comments / openion . Surely it will help to give quality creative in future . Once again thanks . Next episode will be posted on coming Friday .

  2. मॅडम इतकं सुंदर लिखाण आहे कि यावर काय अभिप्राय लिहावे…
    रात्रीचं वर्णन… डोळ्यांसमोर..येतं.. आईचे शब्द वाचून तर नकळत पाणावले डोळे….
    प्राणायाम …तीही आठवण आली.. खूप सुंदर लिहावं तेवढं कमीच…
    प्रत्येकाने वाचावे असंच…क्षणभर का होईना पण नक्कीच मनाचा क्षीण नाहिसा होईल.
    खरंच आज खूप मनापासून वाचलं… आणि वाचून खूप छान वाटलं…
    लिखाणाला तोडच नाही … अप्रतिम…
    मॅडम तुमचा तर महिला दिनाच्या दिवशी खास सन्मान केला पाहिजे… नोकरी,घर, सांभाळून एवढं उत्कृष्ठ लिखाण…
    Ek like to banti hai….🌹🌹👍🏻👍🏻

    1. मनाली मॅडम, आपण मी लिहिलेला ब्लॉग वाचून अभिप्राय दिलात त्या बद्दल धन्यवाद. कांही गोष्टी शब्दबद्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मी. तुमच्या अभिप्रायामुळे मला पुढील लिखाणास प्रेरणा मिळेल. 🌹🙏 पुनश्च्य धन्यवाद.

      1. नमस्कार अजय सर. ब्लॉग वाचुन आपण दिलेल्या
        अभिप्रायाबद्दल धन्यवाद.🙏🌷

    1. Hello Sakina maam, my special thaks to you. I really glad and appreciate you, Though मराठी is not your mothertongue you took time and read entire ब्लॉग. तुमच्या अभिप्रायातून ब्लॉगमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या भावना आणि व्यक्तिचित्र आपल्याला भावलं. It realy made me happy. Thanks once again maam 🙏💐🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More