“तू सदा जवळी रहा… ” भाग – 21 भक्ती🙏, ज्ञान 📖, वैराग्य.

आत्ता पर्यंत आपण वाचलात,   भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  …….  भाग -2*  बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण…. भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी…. भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते; निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचे वि…..  सदृश्य जीवन.  
भाग -7 *  एक सक्षम महिला असून पण रश्मीने गप्प राहून का सहन केलं सारं — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8*  आईचं मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली.  भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीच काय होणार?  भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12* सुचिताची प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कसं टिकवतात ? रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?   
भाग -13*   @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चा चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते?  भाग -14 *  काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबाचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना  का भेटली?  सर नी पेढे का मागितले?  
भाग -15 *   वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसत? 
भाग-16* विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटलं वातावरण ? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?   भाग- 17* @ दिवाळी म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले? 
भाग – 18*  तरुण मुलगी घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न, भाग -19*  आत्या की मैत्रीण,  फिरकी ? अतरंगी बंटी,   भाग 20,   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा?  उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा?  भाग -21,  विनिताचं नेमक काय आणि कोठे चुकलं ? आळवणी, मम गोविंदु रे ! श्यामदादांनी निर्माण केला आशावाद !”आस मजं तव दर्शनाची!!”
  वाचा,  share करा,  आपलें अभिप्राय नक्कीच आवडतील🙏🌹

विनिताचं नेमक काय आणि कोठे चुकलं? 

विनीताला पाच वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. त्या सुंदर दिवसाची. ताई आजीचे,  विश्वनाथ काका, ज्यांनी संन्यास घेतला आणि घरी न सांगता  काशीला निघून गेले होते. त्यांनी वेदाभ्यासाबरोबर ज्योतिष शास्त्राचा पण अभ्यास केला होता. ते परत आले तसे लोक कल्याणाचा वसा घेतला. विना मोबदला  श्रध्दाळू, गरजू  लोकांनां  ऐहिक जीवनामध्ये  येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करत आणि उपाय सुचवत असत. विनीताला लक्ष्मी व्रत करायला सांगितलं आणि परमपूज्य  विश्वनाथ काका, ज्यांनी कठोर तपश्चर्या आणि अविरत साधना केली होती त्यानी विनिताच्या हातात श्रीव्यंकटेश स्तोत्राची पुस्तिका  ठेवली.

भक्ती, ज्ञान, वैराग्य जिच्या मनात रुजलेलं आहे अशी उच्च कोटीची भक्त आहेस तू, विनिता”, काका आजोबा बोलले. जे स्वतः विश्र्वनियंत्याशी प्रत्यक्ष संभाषण करू शकत होते, त्यांच्या हातून  मिळालेलं ते अमृतघट श्रीव्यंकटेश स्तोत्र हातात आलं तसा दिव्य भास झाला. “तुला वर्षभरातचं श्री महाविष्णूचं दर्शन मिळेल, विनिता!” काका आजोबा बोलले. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे मन, कान, हृदय तृप्त करणारा आवाज होता. आत्म्याद्वारे परमात्म्याजवळ पोहोचण्याचा मार्ग सांगितला होता. हवेत तरंगत विनिता घरी आली. रोज मद्यरात्री अंधोळ करून, महाविष्णूची प्रतिष्ठापना पूजा आणि व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं किंवा रोज एकवीस वेळेस तीन दिवसांसाठी वाचायचे. असे तीन दिवसाची एकवीस, एकवीस वेळेस पारायण करत पुन्हा पुन्हा वाचत राहायचं. कसं करायचं? कोणता पर्याय निवडायचा? हे तू ठरवं” आजोबानी, विनिताला सविस्तर माहिती सांगितली.

आजोबानी सांगितलेल्या दोन प्रकरामधील विनितानं दुसरा पर्याय निवडला. अढळ श्रद्धा , अटळ विश्वास, आणि मनामध्ये जिद्ध ठेऊन वसा घेतला.  दिवसभर नेहमीची कामं केली जात होती. 
ध्यानी, मनी, स्वप्नी मज एकच ध्यास,
 सहस्र नावे लेऊन ब्रम्हांडी फिरतोस,
नेती, नेती शब्द नं करिती अनुमान
तव अनंतत्व करण्यासाठी सिद्ध , 
तुला काय म्हणू मी आता ? 
अवतार तुझे युगे युगे,युगातं होती
मत्स्य, कूर्म, वराह सृष्टी हितासाठी,
नारसिंह, वामन, परशू, श्रीराम,
श्रीकृष्ण अन् कल्की, तुक्याचां विठ्ठल
अन् ज्ञानाचा विश्वात्मक की, जनीचा अनंत,
मज लागलीसे आस, तुझ्या दर्शनाची 🙏
.

आज माझा देव मला भेटणार!,  हा विश्वास मनी, मानसी  रूजऊन  आपली चंद्र मौळी,  सूर्य मौळी, हवा, पाणी, आकाश सर्वाना सामावून घेणारी  खोप  आणि  परिसर लख्ख करून ठेवायची. दारात  सडा टाकून रांगोळी रेखाटली जायची. लक्ष्मीच्या देवळात ठाणवाई, दारात पणती आणि देवाजवळ समई तेवत राहयची. तबकात दुर्वा, बेलपत्र, तुळसीची पानं,  फुलं, दूध, साखरेचा नैवेद्य सारी सिद्धता करून ठेवी. भेटी लागी जीवा मज लागलीसे आस. सतत तीन दिवस रोज फक्त एक फळ खाऊन उपवास करायचा.  मुली, ताईआजी झोपल्या की, तांब्यावर श्रीफळ ठेऊन महाविष्णुची प्रतिष्ठापना व्हायची. मंजुळ आवाजात प्रार्थना म्हणत पूजा व्हायची. आणि……..

🙏🙏🙏🙏🙏 🌹🙏🙏🙏🙏 🙏
श्री गणेशाय नमः| श्री व्यंकटेशाय नमः |
ओम नमो जी हेरंबा, सकळादी तू प्रारंभा |
आठवूनी तुझी स्वरूप शोभा |
वंदन भावे करीतसे |
नमन माझे हंस वाहिनी |
वाग् वर दे विलासिंनी |
ग्रंथ वदावया निरुपणी |
भावार्थ खाणी जयमाजी |
…………….|| ……………………||
तू अनंत् तुझी अनंत नामे|
तयामाजी अती सुगामे | 
ती मी अल्पमती प्रेमे |
स्मरूनी प्रार्थना करीतसे|
………………………..||
प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी|
त्रैलोक्य भजत त्रीकाळी  |
ध्याती, योगी आणि चंद्रमौळी |

शेषाद्री पर्वती उभा असे ||
………….|| एकाग्र चित्ते एकांती |
अनुष्ठान किजे मध्यरात्री|
बैसोनिया स्वस्थ चित्ती |
प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल ||१०७||
तेथे देह भवासी नुरे ठाव |
अवघा चतुर्भुज देव |
त्याचे चरणी ठेवुनी भाव |
वर प्रसाद मागवा ||१०८||
एक, दोन, दहा, वीस, एकवीस वेळेस संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र पठण व्हायचं. आणि मग पहिली, दुसरी, तिसरी, विसावी  आवर्तन झाली. 

मम गोविंदु रे !

तू कुठे? मी इथे, कसे मिळेल तव दर्शन ? कृष्णा गोविंदू रे,  हरी गोविंद रे मम गोविंदू, गोविंदू रे || धृ  || तुझ गावं खूप दूर,  माझ गावं आहे न्यार, झाली वाट पाहुनी फार, आता दौडत येई बरं || १|| कृष्णा गोविंदू रे,  हरी गोविंदू रे,  मम गोविंदू, गोविंदू रे || धृ  ||
भक्तीला बंधन नाही  ते परमात्म्याचे देणे   दैवाची अघाद लीला  तुझी नित्य वाट पाहणे ||2|| कृष्णा गोविंदू रे, हरी गोविंदू रे 
मम गोविंदू, गोविंदू रे|| धृ  ||
मम् नेत्री झरते पाणी,  मम् हृदय गात विराणी,  अन्त नको पाहू, वेगे वेगे धाव घेई,   जशी माता बालकास भेटी || 3|| कृष्णा गोविंदू रे, हरी गोविंदू रे 
मम गोविंदू, गोविंदू रे|| धृ ||
आर्त भक्तीची हाक ऐकली  आत्मज्योती हरीला मिळाली 
साक्ष परमात्म्याने दिली   याहून वेगळे नको मज काही ||4| कृष्णा गोविंदू रे, हरी गोविंदू रे  मम गोविंदू, गोविंदू रे|| धृ  ||
तुझे रूपं पाहुनी सावळे,  तव चरणी देहभान विरले,  माझे मीपण सरून गेले,  मीच गोविंदु, गोविंदु रे ||5|| तू जिथं,मी तिथं,मज झाले तव दर्शन !! कृष्णा गोविंदु रे, हरी गोविंदु रे,   मीच गोविंदु, गोविंदु रे ||धृ ||

आता संकल्प सोडायचा होता; एकविसाव्या आवर्तनाचा.  हुरहूर होती, आस होती आणि  खात्री होती दर्शनाची.  आता एकविसाव्या वेळी पहिल्या वेळेसारखाचं उत्साह ठेऊन उपवास, स्तोत्र पठण  सुरू झालं. पहिला दिवस संपला. पहिल्या रात्री एकवीस वेळेस वाचन झालं. दुसरा दिवस संपला. आज एकविसाव्या आवर्तनाचा  तिसरा दिवस आहे. अर्जुनाला विराट रूप पाहताना श्रीकृष्णाने त्याच्या मनाची पूर्व तयारी करून घेतली होती. 

शंताकारम् भुजंग शयनम् पद्मनाभम् सुरेशम् विश्र्वाधारम् गगन सदृशम् मेघ वर्णंम् शुभांगम् | लक्ष्मीकांतम् कमल नयनंम् योगिभि र्ध्यान गम्यं | वंदे विष्णुम् भवभयहरम सर्व लोकैक नाथं ||
रात्री मुलींची निजानीज झाली.
“ताई, तुम्ही रात्री झोपू नका,  स्तोत्र पठणाच्या वेळी माझ्या जवळ बसा आज!,”  विनितांन ताईआजीला सांगितलं.  मनी हुरहूर होती. भेटीची ओढ आणि दर्शनाची आस ठेऊनच आजची पूजा संपन्न  झाली. प्रथम श्री गणेश, कुलस्वामिनीची पूजा आणि श्रीमहाविष्णूची प्राणप्रतिष्ठा झाली. प्रार्थना झाली. विनिताच्या मनात विचार चमकला. अर्जुनाला विराट रूप दाखवताना श्रीकृष्णाने त्याच्या मनाची पूर्व तयारी करून घेतली होती. 
यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा |अभ्युधानम्
अधर्मस्य

तादात्म्या नं सृजाम्यहम ||🙏🌹 ,🌹
ज्याच्य दर्शनाची ओढ मनात घेऊन सारा खटाटोप करत होती विनिता, ती वेळ जवळ आली तर, ताईला “जवळ बैस” अस का सांगितलं?⁉️ नेमकं काय वाटतं होतं ? मनात काय चालू होतं विनिताच्या. त्या जगनियंत्याला, कणाकणात वास करणाऱ्याला विनिताच्या मनाचा थांग लागला नसेल का ? ⁉️

श्री गणेशाय नमः|
श्री व्यंकटेशाय नमः |  ……… 
आता विनीताचा श्वास जोरात सुरू झाला 
आराटी लागि मृदूता |
कोठोनी असेल कृपावंत ………….. |………………….. ||

वचनोक्ती नाही मधूर |
…… काक विष्टेचे झाले पिंपळ l
………. ||……………………||

मनात काहीच विचार नाहीत. मन श्री विष्णूमूर्तीवर स्थिर होतं. हृदयाची धडधड वाढत होती. छाती  एका लयात जोरजोरात वर खाली होत होती …
अनाथ रक्षका आदी पुरुषा|
……… ते स्वरूप अत्यंत सुंदर | …………….
||जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा |..
वात्साचे परी भक्तासी |
………….. |……………………. |
समोरून डोळे बाजूला  वळवून, ताई बाजूला असल्याची खात्री करायची इच्छा होती पण कशावरच कंट्रोल नव्हता विनिताचा. प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी|त्रैलोक्य भजत त्रीकाळी |………………… |……….….|
आता खोपीमध्ये लावलेला साठ होल्ट, बल्बचा प्रकाश फिका वाटू लागला.  समईची ज्योत  निस्तेज वाटू लागली.  आणि समोरची पूजा अस्पष्ट होत होतं, तिथं प्रकाशतेजाचा मोठा, परातीएवढा गोल दिसू लागला 
ध्याती योगी आणि चंद्र मौळी |
  शेषाद्री पर्वती उभ असे |
देविदास…………..| …………. | ……………… ||

एकाग्र चित्ते एकांती |
अनुष्ठान किजे मध्यरात्री | बैसोनिया स्वस्थ चीत्ती |
प्रत्यक्ष मूर्ती …….. आता तेजाची प्रखरता वाढली. पुढचे शब्द म्हणायला जीभ वळेना.
आणि …सर्व शक्ती एकवटून तोंडातून जोरात शब्द बाहेर फेकण्याचा, हाक मारण्याचा केलेला प्रयत्न. शब्द…. “ताईssss” आवाज बाहेर पडलाचं नाही. डोळे दिपवून टाकणारा प्रकाश लुप्त झाला… समईची मंद वात तेवत होती. साठ व्होल्टचा बल्बप्रकाश फिका दिसतं होता. आणि विनिता, ताईआजीच्या कोणत्याचं प्रश्नाचे उत्तरं देत नव्हती. निःशब्द शांतता…….
“जोरात वीज होतं होती का? प्रकाशाची प्रखरता जाणवली” एकदम ताई आजी डोळे चोळत स्वतःच बडबडली.
“कसली आली एवढी झोप मला मेलिला⁉️ तू सांगून पण, झोपी गेले मी” ताई आजी बडबडत होती….

श्यामदादांनी निर्माण केला आशावाद !

विनिता नुसते डोळे मोठे करून पापण्यांची उघडझाप न करता एकटक पाहात बसली … “अस होऊ देणार नाही.. ” मनातच बोलत राहिली विनिता. पाच वर्षांपूर्वी घडलेली घटना ….

“मामी sssss”,
“……………..”
“विनिता मामी ssss, काळजी करू नका. मी तुम्हाला दत्तदर्शना शिवाय इथून निघू देणार नाही. श्री व्यंकटेश स्तोत्र पठण आणि दर्शनाच्यावेळी झालं तसं होणार नाही आजिबात. माझा शब्द आहे तुम्हाला”,  श्यामदादा बोलले. आता धक्का विनिताला बसला. कारण तीनं स्वतः होऊन कुठचं वाच्यता केली नव्हती. पण श्यामदादांनी सगळं जणलं होतं.  

“म्हणजे, जी गोष्ट मी कोणाजवळ बोलू धजले नव्हते, ते तुम्हाला माहित झालं, श्याम दादाsss?⁉️” विनीता बऱ्याच वेळानंतर सावरली आणि तीनं प्रश्न विचारला. तुम्ही शयनगावच्या परिसरात आल्या, आल्या मला थोडीबहुत जाणीव झाली होती”. दादांनी योगाभ्यास आणि भविष्य शास्त्राचा अभ्यास केला होता, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. 
“सतत, एकवीस आवर्तन ! आणि शेवटच्या दिवशी प्रकाशरूपात झालेलं दर्शन ! भीतीनं तुमची झालेली अवस्था आणि शेवटी स्वतःवर, देवावर विश्वास ठेवायच्याऐवजी, ताई आजिना हाक मारायचा केलेला प्रयत्न, मला स्पष्ट दिसला.  परंतु दत्त मंदिरात जेव्हा दर्शन घेतलतं, तेव्हा स्पष्ट संकेत मिळाले. तुमच्यावर महाविष्णुची अखंड  कृपा आहे. आणि म्हणूनच …..मी इतक्या विश्वासानं तुम्हाला सांगितलं. आता दत्त दर्शन किती दिवसात  मिळेल? हे मी नाही सांगू शकत. पण दत्तदर्शन तुम्हाला झेपेल असचं दर्शन मिळेल. तो पर्यंत रश्मीबरोबर तुम्हीपण त्रिवृक्ष प्रदक्षिणा घालत जा!,” श्याम दादांनी वड, पिंपळ आणि औदुंबर एकत्र नदीच्या काठावर  उभे असलेल्या जागेकडे निर्देश करत सांगितलं. आणि तिघेही मंदिराच्या पयाऱ्यांकडे आले.
“मामी, रश्मी बसा इथं ! मोना भाऊजी तुम्ही पण बसा इथचं, “दत्त मंदिरासमोर असलेल्या पायरीकडे बोटं दाखवत श्याम दादा बोलले.  “त्याची” लीला अगाध आहे.  मी ग्रॅजुएशनच्या शेवटच्या वर्षात असताना मीच काय?  कोणीच असा विचार करू शकत नव्हतं की,  मी इथं असं दत्त सेवक, बनून पूजा करत राहीन”. श्याम दादानी वेगळाच विषय छेडला.  “जसं तुमचं इथं येणं हे, आठ दिवसापूर्वी तुम्हाला पण माहित नव्हतं. सगळं अचानक ठरलं आणि आज तुम्ही इथं, माझ्या समोर आहातं. दादांनी मांडलेल्या मुद्द्यावर रश्मीने मनातला प्रश्न ❓️ उपस्थित केला, “पण श्यामदादा,  आपण पूर्णपणे दैववादी झालो  तर कर्म कांडावर विसंबून राहतो आणि कर्म टाळतो, असं नाही का वाटत?”  “मी कुठं म्हंटल जाबाबदारी झटकून रामराम करत बसायला हवं? कलियुगात नामस्मरणाचं महत्त्व आहे” श्यामदादानी रश्मीला प्रश्न? विचारत उपाय  सांगितला. “इच्छा नसताना, हातात जपमाळ घेतली तर, ‘माला फेरत युग गया, फिरा न मनका फेर |‘ असं होतं आपलं. म्हणून काहीही प्राप्त करायचं तर, इच्छा शक्ती जबरदस्त हवी. अन्यथा काही ठरवणं आणि काळाबरोबर विसरून जाणं ओघानंच येतं.” दादा इच्छा आणि कर्तव्य यातील फरक सांगत होते.
नकळत प्राशिता अमृत |  अमर काया होत यथार्थ |  औषध नेणता भक्षित | परी रोग हरे तात्काळ |  म्हणजे काय? हे मी सांगायला नको तुला. तू कुठं इच्छेने किंवा जाणून बुजून पुण्य कमविण्यासाठी शिवलीलामृत वाचलसं? पण म्हणून तुझं पुण्य कमी होतं नाही?”   दादांनी दुसरा आश्चर्याचा धक्का दिला. “मी असच वाचलं. त्यातून बऱ्याच गोष्टी समजल्या.  मी पारायण नाही केली,” रश्मीने नं मागता खुलासा केला.  “पण: संपूर्ण शिवलीलामृत पाठ आहे तुझं. रोज म्हणतेस तू”.  दादांनी रश्मीला आणखी बुचकळ्यात टाकलं.  “दादा, शिवलीलामृतमध्ये,  पंधरा अध्याय आहेत पंधरा❗️ रोज वाचतेय? काय बोलताहेत तुम्ही?” रश्मी गोंधळून उतरली.
कोणी व्यवहारी गुंतत | म्हणोनी वाचवेना सर्व ग्रंथ| कित्तेक ते आळस करत | ग्रंथ विस्तृत्व म्हणोनिया ||” श्याम दादांनी आपण काय? आणि का? बोललो ते सांगण्याचा प्रयत्न केला. आता मोना दादा आणि आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतुहलाबरोबर प्रश्नचिन्ह ⁉️ होतं आणि रश्मी आ वासून ऐकत आणि पाहात राहिली.
“नित्य समस्त नोहे पठण | तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण | वाचिता शुद्ध भावे करून | मनोरथ पूर्ण होतील |  हे  सारं आहे शिवलिलामृताचं आणि ते तुला तोंडपाठ आहे.” आता त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात येत होता रश्मीच्या.  “रश्मी, मध्येच बोलू नको. पहिल्यांदा, ते; जे काय सांगतात ते ऐकून घे, मग तुझे प्रश्न आणि शंका  विचार”, आई आणि मोनादादा एकदमचं बोलले.  

संयम का हवा?
“एक होतकरू तरुण होता. खूप कष्ट करून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानं. कागदपत्रांची फाईल घेऊन नोकरीसाठी फिरत राहिला. काही वेळेस त्याला वाटायचं की एखादा धंदा करू?  पण परत विचार केला की, नको.  भांडवलासाठी  कोणाकडून तरी मदत घ्यावी लागेल. आजोबा, विठ्ठल भक्त होते त्याचे. बाबा पण माळकरी. आई नेहमी घरी लक्ष्मीपूजन करीत असे.  त्याला वाटले, “आपण लक्ष्मीपूजन, जप, जाप्य करू आणि मग इंटरव्यूसाठी निघू.” त्याचा हा दिनक्रम झाला. घरात अगोदर भक्ती आणि वैराग्य दोन्ही आजोबा आणि बाबांच्याबरोबर वास्तवास होते.  “पण आपल्यावर लक्ष्मीकृपा असणं खूप गरजेचं आहे. मला माझ्या आजोबांना आणि आई, वडिलांना सर्व ऐहिक सुख मिळवून द्यायची आहेत.  मला स्वतःला पण ऐश्वर्ययुक्त जीवन जगायचं आहे.  त्यासाठी लक्ष्मीकृपा असायला हवी”. त्याचा आग्रह होता. त्यासाठी तो   दिवसरात्र मेहनत आणि लक्ष्मी पूजा,   व्रत वैकल्ये करायला तयार होता. त्याला नोकरी तर मिळाली पण त्याचं मन रमेना.  त्याची स्वप्नपूर्ती होईना.  कामाबरोबर साधना वाढवली त्याने.  

“तर हे स्वानंद महाशय हट्टाला पेटले. आता लक्ष्मीप्राप्ती साठी सतत देवीची आराधना चालू ठेवली. दिवस गेले, सप्ताह गेले. महिने गेले. वर्ष गेलं. स्वानंदनं आपली साधना कठोर केली. शरीराला ताडण केलं. दोन, तीन, पाच  वर्षे आणि सात वर्षे पूर्ण झाली. आता स्वानंदचां  संयम सुटला….आणि अजीब गोष्ट घडली.  स्वानंदने संन्याशाची दीक्षा घेतली आणि त्याचदिवशी साक्षात लक्ष्मी अवतरली. मंजुळ पण भारदस्त प्रेमळ पण ठाम आवाजात कानावर  शब्द  आले. “स्वानंद मी आले आहे.” आवाजाच्या दिशेनं स्वानंद महाराजांनी पाहिलं आणि चकित झाले. पण त्यांना प्रचंड राग आला.  सहसंन्याशी समोरच दृश्य पाहून  चकित झाले. तोपर्यंत महागुरू आले. सकाळीच त्यांनी स्वानंदला संन्यास दीक्षा दिली होती. समोर साक्षात लक्ष्मी होती. जिच्यासाठी

प्रत्तेक मनुष्य रात्रं दिवस प्रार्थना करत असतो ती देवी. तीचं तेज आणि वैभव पाहून डोळे दिपतात ती देवी. समुद्रमंथनातून सापडलेलं रत्न, जीचं अस्तित्व चैतन्य निर्माण करत, ती साक्षात लक्ष्मी स्वानंदला शोधत आली त्याच्या दारात आणि तो सांगत होता, आता मला तुझी गरज नाही, तू परत जा. महागुरूंनी डोळे मिटले आणि नेमकी परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. “काय जाणलं महागुरूनी माहीत आहे रश्मी?” श्याम दादांनी प्रश्न केला. उत्तरं कोणालाच माहित नव्हतं. स्वानंद महाराज ज्या कुटीत राहत होते तिकडे बोट करत महागुरु बोलले, “माता लक्ष्मी, आपण इथं या कुटीत यावं“. आता स्वानंद महाराज चक्रावले. पण महागुरुंना  किंवा लक्ष्मीला प्रश्न? विचारणं प्रशस्त वाटेना. स्वानंद, गुरु आणि लक्ष्मी कुटीत आले. देवीला बसण्यासाठी आसन दिलं. आणि पुत्रवत स्वानंदच्या मस्तकावर हात ठेवून योग मार्गाने त्यांना लक्ष्मीचा इथ पर्यंतचा प्रवास दाखविला. “खूप मोठ्या प्रमाणात तपश्चर्या करून अ प्राप्त  लक्ष्मी प्राप्त केली पण तुझ्या पूर्व कर्माचे डोंगर ओलांडून पोहोचता, पोहोचता तिला आज संध्याकाळ झाली. आज सकाळी तू संन्यास दीक्षा घेतलीस. पण तुझ्या मेहनतीनं आणि पुण्याईनं प्राप्त लक्ष्मी तुलाच उपभोगावी लागेल”. गुरुजी बोलले.

या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी।
आरक्ता रुधिराम्बरा हरीसखी या श्री मनोल्हादिनी।
या रत्नाकर मंथानालप्रगटीता विष्णोश्च् या गेहींनी।
सा मां पा तू मनोरमा भगवती लक्ष्मीश्च् पद्मावती।।
ओम श्री नमः 🙏

“कस शक्य आहे गुरुजी? मी संन्याशी आहे आता. मला हीची आजिबात गरज नाही.” स्वानंद गुरुजी आपल्या विचारावर ठाम होते. 
“मला, यांनच बोलावलं आहे. मी परत जाणार नाही” लक्ष्मीन आपला निश्चय सांगितला. आणि मग स्वानंद महाराजांसाठी दररोज पंच पक्वान्नाचं जेवण आणि बाहेर फिरण्यासाठी सोन्याची पालखी आणि सर्व वैभव प्राप्त झाले. आणि अशा तऱ्हेनं अवेळी लक्ष्मी प्राप्ती झाली.” दादांनी मोठा श्वास घेतला.

आस मज तव दर्शनाची!!”

पहाटे लौकर उठून प्रात:र्विधी आटपायचे आणि मोठ्या चुलवणीवर तापवलेल्या कडत पाण्याने आंघोळ करायची. जवळ असलेल्या त्रिवृक्ष औदंबर, वड 🎄🎄🎍आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या, पहाटे चालणारी शोडषोपचारे पूजा पाहायची. काकड आरती झाली की प्रसाद घेऊन मंदिर 🛕 परिसरातील घरी परत जायचं.

लाल माती, उंच वृक्ष, फुलवेली आणि फुलझाडं, समोर वाहणारी प्रचंड मोठी नदी, नदीच्या काठावर मोठमोठ्या वृक्षाच्या घनदाट छायेत वसलेलं दत्त मंदिर आणि श्यामदादांकडून मिळणारी जीवन शिक्षण, आत्मविश्वास, गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी त्यांनी सांगितलेला मार्ग सारच अदभूत अगम्य आणि मनामध्ये आनंद लहरी निर्माण करणारं होतं. दादांच्या रूपानं पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी दाखवला जाणारा मार्ग, पवित्र दत्त मंदिर परिसरात वास्तव्य करण्याची मिळालेली संधी, मनीमानसी होतं असलेला निर्धार म्हणजे साक्षात गुरुकृपाचं. सहा महिन्यापासून सुरु असलेली विनिताच्या मनाची खळबळ, सुरु असलेली घालमेल आणि केदार काका, सोमण सर, छोटे काका – काकू, प्रभास दादा – वाहिनी, मोठी आत्या, छोटी आत्या, मोना दादा – वहिनी आणि मधली आत्या, आणि आता श्यामदादा या साऱ्याचं सहकार्य. आज इथं आम्ही दोघी एकत्र शांत निवांत दत्तगुरूंच्या सहवासात आहोत. कळली आपली तगमग त्याला. पोहोचली आपली हाक त्याच्यापर्यंत. इथं मातीच्या कणाकणात, वृक्ष वेलीत, पाना फुलात, सकाळी संध्याकाळी, दिवसा रात्री पाण्यात, पावसात सर्वत्र त्यांचं आस्तित्व जाणवतंय. तन हलक वाटतंय आणि मनभर एक वेगळाचं आनंद, उल्हास भरून राहिलाय. “ब्रम्हानंदी लागलीं टाळी” म्हणजे अशीच अवस्था असेल का मनाची? कित्येक वर्षानंतर किंबहुना प्रथमच आपल्या मनाची अशी उन्मन स्थिती असेल. आज तिसरा दिवस संपला. काही लोकांना पहिल्या दिवशी दत्त महाराजांचे दर्शन होतं इथं. आपल्यानंतर आलेल्या तीन भक्तांना दर्शन झालं. मनं तृप्त झालं होतं. चेहरा उजळून निघाला त्यांचा. आनंद ओसंडून वाहत होता. जीवनाचं सार्थक झालं कित्येक लोकांचं. आपल्याला कधी देतील दर्शन? कोणत्या रूपात देतील? आपल्याला समजेल का ते आल्याचं ? आता दर्शनाची आस तीव्र झाली आणि जास्तीत जास्त वेळ मंदिरासमोर बसून नामस्मरण सुरु झालं. आज चौथा दिवस बुधवार संध्याकाळची आरती झाली. विनिताच्या चेहऱ्यावर व्याकुळता स्पष्ट दिसत होती. श्यामदादांना मनीची खंत बोलून दाखविली विनितानं. त्यांना समजतं होती घालमेल. दत्त नामस्मरण करत केव्हा झोप लागली कळलं नाही विनिताला.

रोजच्यासारखं उठून अंघोळ करुन तयार होऊन प्रदक्षिणेकरीता निघताना शामदादा बोलले, “मामी, आज घराच्या दारातं, आणि मंदिरासमोर तुम्ही रांगोळी काढा.” हातात रांगोळीच साहित्य घेतलं. ते तांदळाच शुभ्र पीठ होतं. पायऱ्या उतरून खाली आली विनिता. अगोदरच सडा टाकून स्वच्छ केलेल्या जमिनीवर सुंदर कलाकृती उमटत होती. रांगोळी पूर्ण करुन हळद कुंकू वाहीलं, उठून उभी राहिली मंदिराकडे जाण्यासाठी. आणि…..

साडेसहाफुट उंच, तेजस्वी, भगवी वस्त्रे परिधान केलेले तीन शिरे, सहा हात, डोक्यावर जटा असलेले साक्षात दत्तगुरु. पण त्यांचे पाय जमीनीला टेकलेले दिसले नाहीत. घरासमोरून मंदिराच्या दिशेने निघाले ते. काही अंतर पुढे गेल्यानंतर मागे वळून विनिताच्या दिशेने पाहिलं आणि नजर कैद झाली विनिताची. त्यांनी विनिताकडे पाहून आपला हात आशीर्वादासाठी हवेत उंचावला.

दरवाजात उभं राहून श्यामदादा मंद स्मित करत होते. रश्मी दादांच्या पाया पडली. विनिता, दत्तगुरुकृपाधन घेऊन रश्मीबरोबर पुढील प्रवासाला निघाली.

ज्या अक्षरानं सुरु होत होतं, त्याचं अक्षरानं संपत होतं शहराचं नाव. मराठी भाषा खूप मोठया प्रमाणात बोलली जायची तिथं. प्रशस्थ वाटलं बस स्टॅन्ड. लखोबाशी जोडलं होतं गावाचं नाव. सन्माननीय इंदिरा गांधींनी सोन्याचं तंबाखूचं पान देऊन गौरवलं होतं तिथल्या तंबाखू व्यापाऱ्याला. रश्मीच्या मनातील प्रश्न बाहेर पडण्या अगोदर विनितानं रिक्षाला हात केला आणि नव्या गावात, नव्या आशीर्वादाबरोबर वाड्यात प्रवेश केला. लाकडी जिना चढुन नव्या घरासमोर आली विनिता आणि रश्मी. जिन्याचा आवाज ऐकून दार उघडलं गेलं. समोर चंदा आणि सई उभ्या होत्या. कित्त्येक महिन्यांनी आज विस्कळीत चौकोनी कुटुंब एकत्र दिसत होतं.

केदार काकांबरोबर तालुक्यातून सुरु केलेला प्रवास त्याच तालुक्यातील एका वेगळ्या गावात पोहोचला. सोमण सर आणि मोनादादानी मदत केली. विनिता आणि तीनही मुलींना ईथपर्यंत आणायला. पण पुढे काय?

शुभ्र सरस्वतीची सहाफूट मूर्ती कोठे पहिली? ह….., तारा रो….??? कोण आहे हे त्रिकुट? वाचा भाग 21, ” तू सदा जवळी रहा मध्ये, शुक्रवार दि. 17 जुलै 2020 रोजी. 🙏🌹

11 Responses

  1. धन्यवाद सकिना मॅडम. मराठी वाचून, समजून घेऊन आपण दिलेले अभिप्राय मला नक्कीच प्रेरणा देणारे आहेत . पुनश्च धन्यवाद.🙏

 1. श्री गुरुदेव दत्त.
  अत्यंत मनोहारी वर्णन.
  गुरुविण कोण दाखविल वाट?
  लिहित रहा.

 2. नमस्कार ताई, कर्ज फिटून धन मिळण्यासाठी ३ रात्रीत २१ वेळा, म्हणजे प्रत्येकी ७ -७ वेळा, असे बरोबर आहे ना ?

  आणि ठिकाण कोणत्या राज्यात आहे, दत्त स्थान?

  1. नमस्कार. आपण, तू सदा जवळी रहा… ” भाग – 21 अर्थात भक्ती, ज्ञान, वैराग्य वाचून आपल्या मनातील प्रश्न विचारलेत. कर्ज फिटण्यासाठी तुम्ही संपूर्ण चातुर्मास या पुस्तकातील उपाय करू शकतात. मंगळवारी हातापायाच्या बोटांची वाढलेली नखें कापवीत. अपार श्रद्धा ठेऊन संकल्प करून शुक्रवारी वैभवलक्षमी मातेची पूजा करा आणि त्याच बरोबर मेहनत / कामं चालू ठेवा आणि प्रार्थना करत रहा. रोज एकवीस वेळेस या प्रमाणे तीन दिवरात 21×3×7 श्री व्यंकटेश स्तोत्र श्रद्धापूर्वक वाचावे. कोकणात पाटगाव जवळ शायनगाव इथे दत्तस्थान आहे. शयनगावचे अपभ्रंश होऊन शेणगाव असे म्हंटले जाते.
   आपले क्लेश दूर होऊन दत्त गुरूंचा आशीर्वाद मिळो. एपिसोड वाचून मानशांती लाभो. शुभ भवतु ❗️ 🙏

 3. Great madam आपली भाषा शैली, सादरीकरण 🙏🏻🙏🏻🙏🏻

  1. 🙏🌹 आपण ” तू सदा जवळी रहा… ” भाग 21, वाचून अभिप्राय दिलेत. धन्यवाद. आपण अशाच ब्लॉग वाचत रहा आणि रिप्लाय देत रहा. त्यामुळे मला प्रेरणा मिळते 🌹🌷🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More