लॉक डाऊन संधीचा कसा उपयोग कराल?

भाग -1

मी रंजना कुलकर्णी राव
शिक्षण विभागात कामं करतेय.
माझं इयता 11 वि पर्यंतचं शिक्षण बेळगाव जिल्ह्यातील खेडे गावांत झालं. पदवी व पदव्युत्तर कोर्सचं शिक्षण पण सीमा भाग आणि महाराष्ट्रामध्ये झालं. कर्जत जवळच्या एका आदिवासी विकास संस्थेत मी शिक्षिका म्हणून जवळ जवळ पाच वर्षे कामं केलं. शासनाच्या विविध परीक्षा, मुलाखती देऊन शासन सेवेत रुजू झाले. गेली सव्वीस वर्षे शिक्षण विभागात ग्राउंड लेवल अधिकारी म्हणून काम करत आहे. लहापणा पासून पाहतेय बदल घडताना. निसर्गाचा मुख्य नियम आहे बदल. बदल स्वीकारले आणखी एक थोर व्यक्तीचं लक्षण. पाय जमिनीवर, विचार उच्च कोटीचे असं फक्त मोठे लोक बोलतात. बाकीना हरभऱ्याचे झाड पुरेसं असतं. किंवा बदल अंगवळणी पडताना त्रास होतो. दोन्ही बाहू पसरून बदलाचं स्वागत करून त्यातून निवडक योग्य गोष्टी आत्मसात करून पुढे चलत राहणं गरजेचं असत. तसेच संकटाच पण. “जीवन सरळ रेषेत चालेल तर जीवन, अन्यथा दुःख”, असं म्हाणून आलेल्या संकटांचा सामना न करता आपण दोष देत राहिलो तर आपली वाढ, प्रगती कुंटेल. म्हणून आव्हानात्मक परीस्थितीला भिडणं जरुरी आहे. संकट आलं तरी, त्यातून संधी शोधण जरुरी आहे. माझ्या घरी जेवण बनवण्यासाठी महाराज / बाई उपलब्ध असत. झाडू, लादी साफ करणे, भांडी साफ करून लावणं, धूळ साफ करणं, प्रत्येक रविवारी टॉयलेट बाथरूम साफ करण्यासाठी वेगवेगळी माणसं सातत्याने उपलब्ध असतात. ऐनवेळी मदतीसाठी वेगळा माणूस असून भाज्या आणण, सामान भरणं मीआणि माझे मिस्टर करत असतो. बोर्ड परीक्षेच्या, अधिवेशनाच्या आणि कार्यालयीन गरजेनुसार माझी कामाची वेळ वाढते आणि बराच वेळ मी बाहेर असते.
आणि अचानक एक दिवस सगळी सेवा देणारी माणसं येऊ शकत नाहीत. सुरु होतो लॉकडाऊन. मी 52 वर्षांची महिला अधिकारी आहे. कोरोनाच्या संकटात मी घर, ऑफिस कामकाज आणि अद्यावत टेकनॉलॉजि v.c., वेबिनार, कॉन्फरन्स अटेंड करते. माझा स्वतःच्या ranjanarao.com या site वर माझी इ कादंबरी लिखाण आणि इतर साहित्य निर्मितीची आवड जोपासते आहे. कसं संभाळतेय सारं ? त्या विषयी बोलणार आहे. आणि या वेळेत काय करायचं ? “What To ✅️Do❓️And What Not… ❌️ या विषयी बोलू. 🙏

कामाची पार्श्वभूमी

मी शिक्षण विभागात फिल्ड वर काम करणारी महिला आधिकारी असून शाळा, महाविद्यालय,भेटी तपासणी, शासनाच्या विविध परीक्षा, कलेक्टर कार्यालयात सभेस उपस्थित राहणं, कोर्ट कामं, 10 वि. 12 वि. परीक्षेसाठी विद्यार्थी बैठक व्यवस्था, परिरक्षण केंद्र, भरारी पथक, मुख्याद्यापक सभा, शिक्षक सभा, मुलांशि संवाद, 11वि ऑनलाईन प्रवेश, तक्रार निवारण, शैक्षणिक शिबीरात उपस्थित राहणं, सर्व शिक्षा अभियान, शासनाच्या वेगवेगळ्या लिंकद्वारे माहिती अद्ययावत करणे, शिबीर आयोजित करणं शासनाचे आदेश आणि योजनांची प्रभावी अंमल बजावणी करणं, कार्यालयीन कामं आणि इतर असंख्य कामं सातत्याने चालू असतात. हल्लीच महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व शनिवारी शासकीय कार्यालायाना सुट्टी जाहीर केली होती. आणि दैनिक कामकाजाची वेळ वाढविली.

झटका -1, 2, 3!!!
गुरुवार दि. 17, मार्च रोजी सकाळी दादरच्या श्री स्वामी समर्थ मठात नेहमी प्रमाणे दर्शनासाठी गेले तर मठ बंध होता. त्या धक्क्यातून न सावरता मी तशीच दादर स्टेशन गाठण्यासाठी चालत पुढे आले तर सारी दुकान बंद. रस्त्यात शुकशुकाट. पोलीस बंदोबस्त. दादर बंद माझ्या कॅमेऱ्यात टिपून घेत असताना पोलीस आले समोर. त्यांना विचारलं तर कोरोना मुळे दादर बंद ठेवलंय सांगितले त्यांनी. टॅक्सी पकडून कार्यालय गाठलं. V.c. अटेंड करून नेहमी सारखी कामात गढून गेले.
दोन, तीन दिवस अगोदरच ऑनलाईन ऑफिस अटेण्डन्स मशीनला कागद चिकटवून प्रिकॉशन घेण्यास सुरुवात केली होती. शुक्रवार दि. 19, मार्च रोजी नेहमी प्रमाण कार्यालयात कामं करताना वातावरणात तणाव जाणवत होता. गाड्या बंद होणार वैगरे चर्चा कानावर पडत होत्या. कामाच्या व्यापात या साऱ्या चर्चांकडे नेहमीसारखं कानाडोळा करून कामावर लक्ष केंद्रित केलं. कामकाज संपवून आम्ही कार्यालयातून सारे बाहेर पडलो. वातावरणात एक प्रकारची वेगळी उदासीनता जाणवली. परेल कार्यालयातून चालत घरी जाण्याचं ठरवून मी मार्गस्त झाले. नेहमी पेक्षा रस्ता शांत वाटला. मोनोरेल, परेल मार्केट, हिंदमाता रस्ता, कपड्याची दुकानं शांत भासली. कसली चाहूल होती समजत नव्हत. दादर पूर्व रेल्वे ब्रिज वरून पश्चिमेला आले. पायरवचा आवाज जाणवावा एवढी बोचरी शांतता अनुभवत, शिवाजी मंदीरच्या समोरच्या लेन मधून माहीम गाठायच होतं. काचवाला बिल्डींग मधून एक वयस्कर मनुष्य बाहेर येऊन काही सांगत होते, पण तिकडे दुर्लक्ष्य करून चालण्याचा वेग वाढवला आणि गंगाविहार हॉटेल दिसलं तसा जोराचा श्वास घेऊन, घर टप्प्यात आल्याच्या जाणिवेनं बरं वाटल.

मना मनात झिरपली बोचरी शांती 👥

दुसरे दिवशी शनिवार 19 मार्च रोजी, दहावीचा भूगोल पेपर होता. मी एकटीच सरस्वती हायस्कुल, माहीम येथे परीक्षा केंद्र भेटीसाठी गेले. सर्व शिक्षकानी मास्क वापरला होता पण, एकही परीक्षार्थीनं मास्क लावला नव्हता. वर्गा, वर्गात फेरी मारून फॉर्म भरला आणि तडक घरी आले. दरम्यान व्हाट्स ग्रुप वर वेग वेगळे पोस्ट व्हायरल झाले होते. प्रत्यक्ष टी व्ही. वर बातम्या पहिल्या आणि सुन्न झाले. लॉक डाउनची घोषणा झाली आणि….
न भूतो न भविष्यती अशी परीस्थिती समोर आली. माझ्या बिनधास्त वावरण्यावर अचानक बंधन आलं. प्रथम या गोष्टीचं गांभीर्य नाही समजलं. ठीक आहे, घरी राहू. तशी हरकत नाही थोडं दिवस. निवळेल परिस्थिती. मनाला समजावलं. पण जसं जशा बातम्या पहायला लागले, चॅनल सर्फिंग व्हायला लागले तेव्हा लॉक डाऊन विचारात, आचारात, मनात मुरत गेलं. इयता दहावीची परीक्षा स्थगित केली आणि पहिला धक्का बसला. प्रत्यक्षात एक पेपर राहीला होता आणि तो होणारच याची 100 नाही तर 110% खात्री होती. पण झालं वेगळच.

दुसरा धक्का बसला ते 10 वी च्या परीक्षा केंद्रात परीक्षार्थीला कोरोनाची लागण झाली. शासन आणि “मनापा” चं नेहमी सारखं “मनापासून” युद्ध पातळीवर काम सुरु झाल. आमचं पुढचं काम. शेकडो विद्यार्थी, विद्यार्थ्याचे कुटुंबीय, संबंधित शिक्षकांची माहिती घेणं. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणूस आणि माहिती उपलब्ध करून देण. अशावेळी करणं न शोधता अगोदर उपचार करणं गरजेचं होतं. आणि तेच काम अविरत, अविश्रांत आणि त्याच आवेगाने सुरु झालं. आमच्या सर्व आधिकारी आणि सर्व संबंधितांनी योग्य वेळी उचललेलं पाऊलं चांगलाच परिणाम होणार याची खात्री बाळगुन आम्ही सर्व पुढच्या कामाला लागलो.

पुढील भागात वाचा संकट काळात पुढील कामाची प्रत्यक्ष तयारी कशी सुरु केली? आणि

आपण कसा विधायक उपयोग करताहेत आपला वेळ?

पुढील लेखात वाचा कोणत्या 5 गोष्टी ज्या करू नयेत?

10 Responses

  1. मॅम तुमचे सर्वच लिखाण खूपच सुंदर आहे,उत्तरोत्तर लिखाणात अशीच प्रगती व्हावी हीच दत्त चरणी प्रार्थना.

    1. पूनम मॅडम आपण माझे लिखाण वाचून त्या वर दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद 🙏🌹. आपण आपल्या मित्र परिवार आणि हितचितंकाना ranjanarao.com भेट देऊ शकतात. पुनःश्च धन्यवाद

  2. मॅम तुमचे सर्वच लिखाण खूपच सुंदर आहे.

  3. अतिशय ओघवत आणि वातावरण प्रत्यक्षात डोळ्यासमोर आणणार लिखाण. इतक्या दूर (आनंदवन, वरोरा ) असूनही लिखाण परिस्थिती जिवंत करते. अत्युत्तम.

  4. अतिशय ओघवत आणि सुंदर. इतक्या दूर (आनंदवन, वरोरा ) असूनही लिखाण परिस्थिती जिवंत करते. अत्युत्तम.

  5. इतक्या दूर (आनंदवन, वरोरा ) असूनही लिखाण परिस्थिती जिवंत करते. अत्युत्तम.

  6. NIRANJAN LIMBRAJ GIRI महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सयोंजक says:

    मॅडम,आपल्या कार्याला व कामाला सलाम,आपण शिक्षण विभागात खूपच कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र अधिकारी आहात,आपली जबाबदारी ओळखून सदैव आपण सगळ्यांना सहकार्य केले त्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.आपली प्रगती अशीच होत राहो ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More