Lady of Dolours

शाळा भेट – एक वेगळा अनुभव

काल शाळा भेटीच्या निमित्ताने, आवर लेडी ऑफ डॉलर्स या मरीन लाइन्स येथील शाळेत गेले होते. सदर शाळा ही ख्रिश्चन धर्मिय ✝, अल्पसंख्याक, शासनमान्य, अनूदानित आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, स्टेशनवर राहणारी मुलं 🏃🏽‍♀🏃🏼🏃🏽‍♀🏃🏼🚶🏻‍♀ येतात. यातील काही मूलांना दोन वेळेस पोटभर अन्नाची 🍚भ्रांत असते. शासनस्तरावरील सर्व योजनंचा लाभ शाळेला मिळतो. चर्च ⛪, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संस्था, व्यक्ती ई. द्वारे शाळेतील मुलांना मदत प्राप्त होते.

गेल्या तीन वर्षांपासून मी सादर संस्था, शाळा, मुख्याध्यापकआणि शिक्षकाना ओळखते. त्या सर्वांचे कामकाज, चिकाटी, जिदद, कर्तव्य, तळमळ पहात आहे .

भेटीदरम्यान सिस्टर, शालेय कार्यालयीन कामकाज , चालू शौक्षणिक सत्रातील वारंवार येणाऱ्या सुट्यांमूळे शिक्षक व त्यांच्या कार्याची झालेली तारांबळा इ. बाबत माहिती देत होत्या .

त्यानंतर मात्र, मुख्याध्यापिका , सिस्टर जोसेफाइन यांनी एक वेगळाच विषय चर्चेत आणला…परंतु आज एेकले ते वेगळेच होते..

सादर शाळा हे मतदान केंद्र असल्याने झोनल अधिकरी, मुख्याध्यापिकाना भेटून गेले. मतदान केंद्र म्हणून त्यांना चार दिवस शाळा हवी होती .

कोल्हापूर, सांगली परिसरात सातत्याने झालेल्या तुफान अतिवृष्टीमुळे 🌩⛈⛈ तेथील लोकांचे संसार उध्वस्त झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे 🌦🌨🌧💧💧समाज ढवळून निघाला. त्याची तीव्रता इथे मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत होती. माझ्या इचलकरंजीत राहणाऱ्या बहिणीचा तिच्या डोळ्यादेखत वाहून गेलेला ३० वर्षाचा संसार आणि फोनवरील दबका हुंदका😭 हृदय पिळवटून 💔💔टाकणारा होता.

सांगलीतील माझी मैत्रीण तिची अवस्था आणि संकटा अगोदर कुटुंबाची करून घेतलेली सुटका ऐकताना चुकलेला काळजाचा ठोका 🖤अजून अंगावर शहारा आणतो. पण अशा परिस्थितीत पण मन थोड हलकं झालं. माझी सर्व माणसं सुरक्षित 😘आहेत यात थोडा स्वार्थ होता माझा. पण दुसऱ्या क्षणी पुन्हा कंठ दाटून आला. घर ,🏡🏡 🥼👚 समान पुन्हा मिळवता अेईल पण
माझ्या इतर बांधवांच काय, ज्यांनी कुणाला तरी गमावलं. निसर्ग कोपला आणि त्याच्या पुढे माणूस किती पाला पाचोळा 🌿🌱🍀🍁 आहे याचा प्रत्यय आला. पावसाच्या पाण्यात गालावर ओघळलेले अश्रू 😥 कोणाला दिसणार ? पण पावसाच्या पाण्यामुळे गरम अश्रू थंड होऊन घरंगळले. या बाबत बोलून आज सिस्टरनी जखम ओली केली आणि नकळत नेत्रकडा पाणावल्या …

महाराष्ट्रातून शाळा, कॉलेजेस आणि बऱ्याच ठिकाणाहून मदतीचा ओघ सांगली, कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता.
सिस्टरच त्या … कशा ठेवतील स्वतःला वेगळ्या …आणि मुलं कशी राहतील वेगळी … सगळेच हात 🤚🤚🤚उठले मदतीला … हाक दिली मुलांना, त्यांच्या दानतिला … त्यातील काही असे आहेत जे स्वतः एक वेळ वडा पाव खाऊन दिवस काडतात.

Vada Pav

काहींना स्वतःच् छतच नाही राहण्यासाठी. उद्याच्या जेवणाची भ्रांत असते काहिंकडे. असे कितीतरी हात 🙌 आले मदतीला.. काही मुलांनी आणली अर्धा, अर्धा किलो डाळ, तर काहींनी तांदूळ, काहींनी डबे, काहींनी ताट वाट्या ….🍽🍶.. आणि बरच काही ……
सिस्टर स्वतः, शिक्षक आणि काही मुलं मिळून गेले 🚔 आणि सांगलीतील काही कुटुंबांना भेटून केली मदत ……..
संस्कार म्हणजे आणखी काय असतं? विश्वबंधुत्व म्हणजे वेगळं काय असतं का? मूल्य शिक्षण पुस्तकातूनच मिळतं का? शालेय अभ्यासक्रमा बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजात माणूस म्हणून वावरणारे नागरिक हवे आहेत उद्यासाठी. अभ्यासक्रम आणि व्यवहारज्ञान यांची सांगड हवी. शालेय स्तरावर शिक्षकांसोबत मुले जेवढी वर्षे असतात तेवढा वेळ कोणाच्याच सहवासात नसतात. मुलं , पुस्तक वाचानाबरोबर चेहरा वाचतात. त्यांना शिक्षकांचा चेहरा पाहून मूड कळतो. टी न एज मूळे याच दरम्यान हार्मोन्स मुळे शारिरात होणारे बदल झेलत असतात. कधी हिंदोळ्यावर, कधी जमीनीवर तर कधी आकाशात उडत असतं त्याचं मन. कधी त्यांना समाज मोठा झालास तर कधी केव्हा मोठा होणार? असे प्रश्न ❓❓नजरेतून विचारत असतो.
आपापसातील हेवेदावे, कौटुंबिक कलह, वर्गात भांडणारी मुले, विभागात एणाऱ्या तक्रारी, कोर्ट केसेस, समाज माध्यमावर येणाऱ्या बातम्या, नकारात्मक विचार , ई. बाबत मला वाटणारी उद्याची चिंता … तरुण मुलांची प्रचंड ऊर्जा कशी चानलाईज करावी या बाबत पडलेला प्रश्न अशा वेळी बाजूला जातो आणि सन्माननीय डॉ. प्रकाश अमाटेची प्रार्थना अन मागणे,”माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे” स्मरते. त्या जगानियात्या पुढे माथा झुकतो कारण मला मदतीच्यl हातावर देव दिसतो. अशा शेकोडो सिस्टर्स, मुख्याध्यापक, शिक्षक, चिमुकले देणारे हात आणि त्यांची संस्कारक्षम मने यांच्यापुढे माथा झुकतो … आणि डोळे काही बोलायचे थांबत नाहीत… पण या वेळी अश्रू आनंदाचे असतात . गालावरून ओघळतच ते हसताना पडलेल्या खळी मध्ये मिसळतात.. …

रंजना कुलकर्णी राव,
वॉर्ड ऑफिसर , मुंबई 🙏.

5 Responses

  1. अप्रतिम लेखन, ओघवते आणि सुटसुटीत. 4 वर्ष मुंबई व शालेय परीघ प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे वाचनात जिवंतपणा जाणवतो.

  2. वाचताना एकीकडे डोळे पाणावले तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकी मुलांमध्ये रुजवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न वाचून भरून आलं. मी सुद्धा त्याचाच एक भाग असल्यामुळे जरा जास्तच मन लावून वाचलं.
    तुमचं लिखाण सुद्धा ओघवत्या शैलीतलं आहे. तुम्ही वरील लेख लोकसत्ता पुरवणीसाठी पाठवावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती.
    लिहीत रहा आणि वाचण्यास पाठवत रहा.

    1. प्रिय मॅडम मनीषा, “शाळा भेट, एक वेगळा अनुभव हा लेख वाचून आपण अभिप्राय दिलेत. आपण स्वतः कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पाश्वभूमीतून आलेल्या असंख्य मुलांच्या सहवासात असल्याने आपणास लेख आणि पात्रे जवळची वाटतात. धन्यवाद 🌹 मॅडम मनीषा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More