एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४)

📓📓📓📓📓📓📓📓📓
ग्रंथ कोणी वाचेना
असे का आरोप खोटे?
ग्रंथ महोत्सव , ग्रंथदिंडी,
त्यावरील उपाय वाटेl

समाजामध्ये खरोखरच वाचनाची आवड कमी झाल्याचे दिसून येते का? उत्तर , होय च्यl बाजूने झुकलेले दिसते . काही देशांमध्ये पुस्तकांसाठी रेशनिंग सारख्या रंगा लागलेल्या दिसून येतlत असे आपण वाचतो .ई बुक , ई लारनिंग ई. सुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक ग्रंथालय निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते . “ग्रंथ तुमच्या दारी ” म्हणून फिरती ग्रंथालये उपलब्ध करून दिली जातात . लोकल ट्रेन मध्ये पुस्तक विक्रेते दिसतात . त्या व्यतिरिक्त इतर अनेक मार्गांनी पुस्तकें उपलब्ध असताना वाचन कमी का? अशा विचारात असताना …. ग्रंथ वाचन कमी, फावला वेळ जास्त, मैदाने कमी म्हणून मैदानी खेळ नाहीत .⚽🏈🎾🏑🏏 हाताला काम नाही . मेंदूला चांगले विचार करायला प्रवृत्त करणारी प्रगल्भता नाही.
💋♥🔥😹👹🌚💋♥🔥😹👹
भडक दृश्ये असलेले उतान व उथळ विचारांचे चित्रपट इत्यादीचा भडिमार अशा विचारात असताना माझीच चारोळी लेखात उतरली.
👩‍👩‍👧‍👧🌿🌎
माता, देवता, मायभू
संस्कार सारे मट्ट झाले ,
तेजाब, सडक , खलनायक मात्र
पुण्यभूमी त हिट्ट झाले l

‌ “वाचाल तर वाचाल ” हा संदेश आपण वाचतो पण तितक्याच गांभीर्याने अमलात आणतो का ? वाचालेले किती साहित्य आपले जीवन समृद्ध बनवण्यास हातभार लावते? तात्पुरते सवंग प्रसिद्ध साहित्य आणि माहिती प्रधान साहित्य, ज्ञान प्रदान करणारे साहित्य, विचारला चालना देणारे , विचारमंथन करायला लावणारे साहित्य , चिरंतन साहित्य या मधून कोणती निवड करावी ? सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याला एकाच ठिकणी मिळतील. ते पण मान्यवर साहित्यिकांच्या विचार मंथनातून . महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक शिक्षा अभियााअंतर्गत भरविण्यात येणाऱ्यl ग्रंथ महोत्सवात. शासनाद्वारे प्रत्येक जिल्ह्याला १ लाख रुपयाचे अनुदान मिळत असे . परंतु समाजामधील दात्याना आव्हान करून भरगच्च ३ दिवसांचा कार्यक्रम घेतला जातो.

तिथे असतील शासकीय अधिकारी.
विद्यार्थी⛹🏃 , जे असतील केंद्रस्थनी. पालक👩‍👩‍👦 , भाषाशिक्षक , मुख्याध्यापक , ग्रंथपाल, समाजातील साहित्य प्रेमी आणि साहित्यिक , कवी , विचारवंत , वक्ते, लोकनेते, मान्यवर आणि या सर्वांचा सहभाग. तिथे असेल वाचन संस्कृतीची कार्यशाळा, कथाकथन , काव्यवाचन , ग्रंथदिंडी , ग्रंथतुला , काव्य रचना, बालकवी संमेलन, मुशायारा ,भाषेचे खेळ , कथा वाचन, कथाकथन , वाद्यवृंद , पुस्तक प्रदर्शन , पुस्तक विक्री , ग्रांथतुला असा भरगच्च कार्यक्रम म्हणजे साहित्य प्रेमी साठी पर्वणी .
‌ग्रंथ महोत्सवादरम्यान शाळेतील मुले स्वतःच बनवलेले साखळी वाचनाचे ७२ तासांचे रेकॉर्ड तोडतात आणि नवे रेकॉर्ड बनवतात .
‌अधिकारी , मान्यवरांचे स्वागत बुके नाही तर बुक देऊन करण्याची प्रथा तेव्हाच सुरू झाला.

“दोनच गोष्टी आपल्याला शहाण्या बनवतात , एक भेटलेली माणसे आणि वाचलेली पुस्तके .”
माणसे भेटत राहतील . परंतु आपण पुस्तकांकडे जावे म्हणजेच पुस्तक वाचणे अपेक्षित आहे .

‌उद्देश

१ . समाजात वाचन चळवळ रुजवणे .
२ . पालक-मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.
३. वैयक्तिक ग्रंथालयास प्रोत्साहन देणे .
४. शाळा , कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालये समृद् करण्यास प्रोत्साहन देणे .
५. भविष्यात सहितीक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे .

ही माफक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संबधित सर्व अधिकारी , भाषा शिक्षक , संस्थाचालक , मुख्याध्यापक , ग्रंथपाल मुले ई. प्रचंड उत्साहाने रात्रंदिन झटून महोत्सव
यशस्वि करतात.
आणि महोस्थावाची सांगता होते ते पुढील वर्षाची तारीख ठरवूनच
परंतु आता अनुदान नाही मग कार्यक्रम बंद … परंतु वाचन चळवळ सुरू राहिली पाहिजे … त्या दृष्टीने सर्वजण प्रयत्नशील असावे अशी प्रामाणिक इच्छा … 👏🏻

रंजना कुलकर्णी राव

3 Responses

  1. खूपच छान.
    ह्यावरून सांगावेसे वाटते की दरवर्षी कारदगा (हुपरी पासून जवळ)
    येथे गेले 24 वर्षे मराठी साहित्य संमेलन भरवले जाते.मी आवडीने जातो. महत्वाचा उद्देश साहित्यिकांचे भाषण, कविता आणि पुस्तके खरेदी वाचनासाठी.मी प्रवासात असताना 1 पुस्तक सोबत असतेच.
    धन्यवाद.

  2. लिखाण आणि वाचन चालवळ राबविण्याची नितान्त गरज आहे. वाचन प्रेमींच्या एखाद्या active group च्या माध्यमातून सुरुवात झाल्यास योग्यच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles
vithal

English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”

हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

Read More

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More