पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.
पंच महाभूतांच्या सोहळ्याच्या पाहुणचारात मग्न होते.
आणि आचानक अद्भुत घटना घडली… चक्क महाराज ! छत्रपती, मान हलवून विचारत होते मला, काही हालहवाला… “काय ग, तु गेली होतीस ना कल्याणच्या सुभेदार वाड्यात ? आमची शिकवण आठवली का तुला? करारी बाणा, समर्पण वृत्ती असलेल्या स्त्रियांप्रतीचा आदरभाव. म्हणे तिथे शाळा आहे ! काय, संवाद साधलास का ❓ वेळेचे व्यवस्थापन होते, मार्क्स वर भर दिला जातो, करियर ओरिएंटेडं असतातच
जीवन शिक्षण ❓ त्याचे काय ? प्रतेक मूल हुशार असू शकते पण प्रतेक व्यक्ति माणूस असायला हवी, माणूसपणा जपणारी हवी .
हलणाऱ्या मोत्याच्या जिरेटोपाच्या माळेवरून नजर महाराजांच्या नजरेला मिळाली. त्या नजरेत आस होती. नजर महाराजांच्या चरणावर झुकवून मी गुढगे टेकले अन हात जोडून बोलले, “महाराज, मला घोड्याच्या टापांचा आवाज आला. सरदारांच्या सुनेने, तुम्हाला
दिलेले गुळपाणी दिसले; आणि शिवरायाचा आठवावा प्रताप ! आपण अंगिकारलेले आवु साहेबांचे स्वप्न दिसले. तेच स्वप्न अंगीकारलत आणि जगलात आपण. चलते बोलते शौर्य आहात आपण ! आदर्श पुत्र आहात ! आदर्श राजा आहात ! जनतेचा कैवरी आणि खूप काही. शब्दांकित, शब्दातीत.
आणि सर्वात जास्त भावलेले तुम्ही म्हणजे, तुमचे परस्त्रीला माते समान मानणरे शब्द गुंजले, “अशीच आमची आई असती सुंदर रूपावती…|
‘हं sss! ‘ महाराज सुस्कारले. “हेच तर करायचे आहे तुला. आमचे विचार पुनश्च पेरायचे आहेत. मुख्याद्यापकांमध्ये, शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये समाजामध्ये सर्वत्र. अत्र, तत्र, सर्वत्र गरज आहे आमच्या विचारांची. चल, सुरू कर आता तुझे काम ! ” असे म्हणत महाराजानी हात ठेवला मस्तकावर.
होय महाराज, मी आज; आता पासुनच सुरुवात करते म्हणून पापण्या झुकवून उतरले. नजर वर उचलून “छत्रपती शिवाजी महाराज की जय ! असा घोष करत पुन्हा नजर वर उचलली.
आणि डोळे विस्फारून पाहत राहिले…. महाराजनी त्यांचे विचार आणि काम सांगितले आणि अंतर्धान पावले होते.
आणि सामोर उभे होते बाबासाहेब…. 🙏
ranjanarao.com