” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वाचे आहेत का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट – मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯प्रेम♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯,घर सोडण पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नाहीं जाना हैं ❗️, दिदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मीसाठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., अण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्.
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडंसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
भाग – 52 * कल 👩‍🦳 – आज💃 – कल 👶, विश्वास – बिश्वास 🤔❓️”कोणती ऐकणार❓️चांगली 👌की वाईट👎‼️” तुमचा हात पकडणार नाहीं, मॅडम ‼️ यांच्या पासून सावध रहा, सूची ‼️
भाग – 53* अर्थार्जन अन् अर्थसाक्षर, तुळसीमाळेतील मणी हसले ‼️
निरक्षरता ❓️ कोणती ❓️❓️ परिणाम 🤭

भाग – 54 * विवाह ❤ विचार, संस्कार 👏‼, अम्हाला माहित आहे रश्मी‼😃😀, गीत ने शब्दातुन काय उलगडले❓, मळवट भरतोस का तू पूर्वेच्या भाळी ?
सांभाळा तुमची फळे ‼🥭🍈🍊🍎, नाते नितळ, लखलखीत‼,चेहरा 🎃 वाचणे, माणसे 👩‍🦰🤰👨‍🦱🤵जाणणे ‼, मी – आम्ही‼ तुझे👈🤰 – 👫👉आपले ‼, ‘दी मॉरलं ऑफ दी स्टोरी इज…..”‼😊,
भाग – 55* ⚫ स्पोठ स्मृती, जिंदगी के साथ‼ — बाद ‼☺, काळ सोकवतो, 🌍 विश्वची माझे घर 🏠 केव्हा वाटेल ? सरस्वतीला शाप ❓
भाग – 56* शिव तत्व ‼, मी नस्तिक, मतभेद⁉️ मनभेद ⁉️ शापाचा परिणाम उशिरा दिसेल, विद्या, ज्ञान – ठळक बदल

शिव तत्व ‼

“आचार्य स्वत:च्या संतापावर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत
आणि त्यांच्या तोंडून ते कठोर शब्द बाहेर पडलेच.”
रश्मीने दीsssर्घ श्वास घेउन समोरचा पाण्याचा ग्लास ओठाला लावला.
“संपुर्ण विश्वाची सिस्टिम् बदलणारे आचार्यांचे कठोर उद्गार नेमके काय होते, रश्मी ? आणि कोणाच्या शापा मूळे सिस्टिम् कशी बदलेल ?” रोज आता संभाषणात सहभागी झाली होती. तिचा सकाळचा मूड बदलला होता. ती बरीचशी नॉर्मल वाटत होती.
जीत ने गीत कडे पाहुन, मैत्रीण रोजच्या बदललेल्या मूड बद्धल डोळ्यांनी समाधान व्यक्त केले.
साधू , संत, भक्त लोकांना सिद्धी प्राप्त होत असते. त्याना सर्वशक्तिमान अशा अदृश्य शक्ती कडून वरदानाद्वारे विशिष्ट सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. त्यांच्या मनाच्या एकाग्रतेचा परिपाक म्हणजेच त्याना प्राप्त झालेल्या सिद्धी होय. त्या सार्‍या सिद्धी जगत् कल्याणासाठी वापरल्या जातात. आचार्य तर जगद् गुरु होते. ते साक्षात शंकराचे अवतार होते.
“जेव्हा शशी, मित्र नव्हते तेव्हा ही शिव तत्व होते. जिथे अवकाश आहे तिथे शिव तत्व आहे. जिथे कांहिच नाही तिथेही शिवतत्व आहे. म्हणजेच शिवतत्व नाही अशी जागाच नाही.
त्यांच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही मग परंपरेमध्ये बदल करायचा असेल तर, त्या अनुषंगाने प्रसंगही तोच घडवून आणणार. जगद् गुरु शंकराचार्य आणि पंडितजींची भेट होणे हा काही योगयोग नव्हताच मुळी. ती सृष्टी रचियेत्याची करामत होती.” रश्मी बोलत होती. जेवण झाल्या बरोबर लगेच हात धुवून खळखळून चूळ भरायची सवय असलेली रश्मी आणि नियती दोघीही वेगळ्या चर्चेत गढून गेल्या होत्या.

होस्टेलमधील सर्वांचे जेवण झाले होते पण, एकीनेही डायनींग टेबल सोडले नव्हते. खरकटे हात घेऊन सगळ्याजणी शांतपणे बसल्या होत्या. जेवण वाढणार्‍या मावशी आणि रेक्टर काकू बाजुला खुर्च्या टाकुन शांतपणे बसून मुलींचे बोलणे ऐकत होत्या.

मी नस्तिक ‼️

रश्मी आणि नियतिचे संभाषण मधेच तोडत रीना बोलली, “ए, मी नस्तिक आहे हं. माझा देवावर विश्वास नाही. ना मी उपवास – तापास करते, ना पुजापाठ. मंदिरात जायला मला आवडत नाही.”
शांतपणे चाललेल्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणल्यामुळे जीत, गीत आणि गंगा यानी एकत्रच रिनाला प्रश्न ? विचारला, “पण इथे देव आलाच कुठे ?” अस्तिक, नस्तिकचा प्रश्न येतोच कुठे ?”
“आपल्या धर्मात कुठे ? कोणाला ? जबरदस्ती केलीय. प्रतेकाच्या श्रद्धेने जो तो ठरवतो.” सिया बोलली.
“श्रद्धा, अस्था, पुजा, धर्म या बद्दल बोलत नाहीयेत रश्मी आणि नियती. त्या शिव तत्वाबद्धल बोलताहेत. शंकर, शिव हे तत्व आहे. अपल्या सोयीसाठी, मन केंद्रीत करण्यासाठी आपणच आकार दिलेत आणि आपणच त्यानां नाव पण प्रदान केले आहे.” रोज बोलली.

“ये पोरिनो, अभ्यास, काम संभाळून हे सगळ तुमी कधी वाचतायसा ? त्वांडपाठ करुन जसच्या तसं बोलतायसा. मला नै बै यवढ धेनात ऱ्हाइत.” जेवण करणाऱ्या मावशीनी मध्येच त्याना जे वाटतयं ते बोलून टाकलं.
“रश्मी, नियती, रोज सारख्या मुली पाठान्तर करत नाहीत. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते.” जीत अभ्यास करण्याच्या पद्धती बद्धल बोलत होती.

“ये तू गप्प गंsss. आणि तूम्ही सगळ्या जरा गप्प बसुन रश्मीला आणि नियतीला काय सांगायचे आहे ते अगोदर ऐका. “रेक्टर काकूनी मध्येच बोलणार्‍या रीना, रोज, जीत आणि स्वयंपाक बनवणार्‍या मावशीना दडपायचा प्रयत्न केला.

“तसं नाही काकूsss, बोलू द्या त्यानां, नाहीतर आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला नेमका काय संदेश जातो; ते समजणार कसे ?” रोज बोलली.
“इथे वाद नाही, संवाद चालू आहे. भाषण नाही, संभाषण चालू आहे.” जीत ने आपल्या परीने समजवायचा प्रयत्न केला.
रोज, ज्याच्या मनात स्वत:च्या विचारांबद्धल शंका असते, स्वत:च्या वैचारीक बैठकीबद्धल ठाम मतं नसतात, चंचलता असते त्याना इतरांच्या मतांमुळे, अभिप्राया मुळे फरक पडतो. रश्मी, नियती, रोज, जीत, गीत, रीना आणि इतर मुली त्यांच्या बुद्धिला पटलेली किंवा त्यांच्या स्वत:च्या विचार प्रकियेतून तयार झालेली मतं मांडताहेत. त्यांचे विचार इतरांवर थोपवत नाहीत. त्यातून स्वत:साठी कोणते विचार स्वीकारायचे ? कोणते नाही ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.” काकूनी एका दमात त्यानां स्वत:ला समजलेले विचार व्यक्त केले.

“हमारी संस्कृती मे, तुलसी के पौधो को इतना मेहेत्व क्यों देते हैं ? और फंक्शन मे आम के पत्ते का तोरण याने पताका दरवाजे पर क्यों लगाते है ?” मध्येच परमने स्वत:च्या मनातील शंका उपस्थीत केली.
जीतच्या बहिणीकडे सत्यनारायणाच्या पुजेसाठी गेलेल्या परमने भेटीच्या वेळी नेमके काय टिपले ? हे तीने उपस्थित केलेल्या प्रश्नांवरुन स्पष्ट होत होते.
“परम, आपके सवाल का जवाब, रोज अछीं तरह से दे सकती है | क्यों की रोज हर एक चिज मे सायन्स धुन्डति है | रोज का नॉलेज साइन्टीफ़ीक व्ह्यु पर अधारित रेहेता है |” गंगा उतरली. “परम, तेरे सवाल का जबाब है मेरे पास | लेकीन पेहेले, तू बोल गं रश्मी,” आणि हिन्दी, मराठी मिश्रित संवादावर रोज स्वत:च हसली.
“मुळ मुद्दा सोडून भरकटतोय अस नाही वाटत का ?” रश्मी, नियती, जीत गप्प बसुन बाकिच्या मुलींचे प्रश्न, अभिप्राय, दृष्टीकोन ऐकताना पाहुन श्रीयाने प्रश्न ? उपस्थीत केला.
“आपल्याकडे सांस्कृतीक ठेवा प्रचंड आहे. ज्ञान अगाध आहे. त्यावर प्रश्नांचे मोहोळ उठत रहाणार. लिहिणार्‍याने लिहिले पण वाचणार्‍यापैकी प्रतेकाचे मत, प्रश्न, शंका वेगळ्या आसू शकतात.” जीतने आपले मत व्यक्त केले.

“सांस्कृतीक ठेव्यातील तत्वाची खोली न समजता वरवरचे कांगोरे आणि उथळ अर्थ लावले जातील आणि धार्मीक रंग देऊन त्याचे महत्व मर्यादीत केले जाईल.” शिवगंगा उतरली.

“वो कैसे भला ? और उथळ अर्थ का मतलब क्या है ?” परमने प्रश्न उपस्थित केले.
“परम, अभी तुने पूछा ना की, ‘फंक्शन मे आम पत्ते का तोरण क्यूँ लगाते है ?’ शायद आम पत्ते का तोरण लगाने वाले को उसका अर्थ मालूम नही होगा | पूरकों से देखते आये है इसिलिये श्रद्धासे करते होंगे |
आम का पत्ता पेड से निकालने के बाद भी चोबिस घंटे तक ऑक्सिजन रिलिज करता रेहेता है | कोई भी फंक्शन मे बडी संख्या से इकठा हुये लोगोंको सफोकेट न हो, इसिलिये आम के पत्ते का ही तोरण लगाते है | और आंगन मे तुलसी का पौधा लगानेका, गाय को भगवान माननेका’ इसके पीछे भी सायन्स है |” रोज दैनंदिन जीवनात करत असलेल्या कृतीमागची विज्ञान दृष्टी अधोरेखीत करत बोलली.


मतभेद⁉️ मनभेद ⁉️

इथे प्रत्तेक मुलगी 💃 पोस्ट ग्रॅज्युएट आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना त्यांचा स्वत:चा असा एक दृष्टीकोन असतो. वैचारीक बैठक ठाम 👍 झालेली असते. चांगले🥰 – वाईट🥶, उच्च👍 – निच👎, ज्ञान – अज्ञान, खरे – खोटे, बरोबर – चुक याची जाण मुलीनां बऱ्यापैकी असते.
एक तर ‘हो’ किंवा ‘नाही’, ‘असतें’ किंवा ‘नसते’ याबद्द्ल स्पष्टता असते. गुळमुळीत काहीच नसते. पाहुन सांगतो, सांगून पाहतो, पाहुन करतो अशी विशिष्ट कार्यालयातील उत्तरे नाही रुचत आत्ताच्या तरुणाईला.

एखाद्या विषयावर चर्चा करताना कोणी प्रश्न विचारला ? मत मांडले किंवा एखाद्याला चर्चा आवडलीच नाही तर तो त्यांचा लूकआऊट असतो. अशावेळी चर्चा, संभाषण, भाषण, संवाद बंद करायची आवश्यकता नसते. किंबहुना अशा प्रकारचे संवाद, वाद, विवाद घडवून आणावेत. मतभेद असण्यात गैर काहिंच नाही. मनभेद असू नयेत, असलेच मनभेद तर चर्चेने मीटवून टाकावेत.
एखादी केस घेऊन कोर्टात जाताना दोन्ही पार्टीं पैकी कोणीच खूश नसते. खुश असतात ते फक्त वकील 🤣 करण, त्याना कोणाच्या तरी बाजूने भांडण्यासाठी पैसे मिळतात. म्हणजेच न्याय निवडा करताना न्याय मिळतो आणि कोणा एकाचे तरी समाधान होते. सर्वांचे समाधान करण्यासाठी जसे न्यायाधीश बांधील नाहीत तसेच इतरांचे पण आसू शकते. इमाने इतबारे स्वत:चे काम करण्यासाठी बसलेले असतात अधिकारी लोक. नियम धाब्यावर बसवून ते सर्वांचे समाधान कसे करतील?
तसेच संभाषण, संवाद यांच्या बाबतीत असू शकते.

संवाद साधताना बोलणारा आणि ऐकणारा हे दोघेही अदृश्य कंपनाने जोडलेले असतात.

ज्ञान, शिक्षण, विद्या या सारख्या पवित्र गोष्टी चांगल्या मार्गाने प्राप्त कराव्यात. त्याचे अधिकार चांगल्या, सुसंकृत लोकांकडे असावेत. ज्ञान, शिक्षण, विद्या देणारे आदर्शच हवेत. पुरस्कार प्राप्त असतील तर ठीक कार्य मात्र महानच असावे.

“शाळेत ज्ञानदान करणारे शिक्षक आणि निसर्ग यांच्या व्यतिरिक्त समानता ठेवणारे लोक आणि ठिकाणे शोधावी लागतील.” रश्मी समोरच्या मुलीना वैचारीक खाद्य पुरवित बोलली.

शापाचा परिणाम उशिरा दिसेल

“सर्वच पदवीधर सुशिक्षीत, विचाराने प्रगल्भ आणि सुसंस्कृत असतात असे म्हणता येणार नाही. सर्वच पदवीधर चांगली माणसे आसू शकतात असेही नाही.” सुजिताने सहज आपले मत व्यक्त केले.

ज्याना पैसे कमवायचे आहेत त्यानी सरळ दुकान थाटावे. दुकान टाकण्याचा ऊद्धेश पैसे कमावणे हाच असतो. पाच रुपयांची वस्तू पन्नास रुपयाना वीकली तरी तो त्याच्या विचारसरणीचा भाग असतो.
शिक्षण क्षेत्र हे दुकानदारी चालवण्यासाठी नाही हे मनी मानसी ठाम हवे. हे गृहीतक कोणत्याही परिस्थितीत बदलता कामा नये.
आपल्या देशात तर नक्किच नाही.
“नफेखोर वृत्ती संस्था चालकांमध्ये असणे चांगले नव्हेच.
शिक्षणाद्वारे “शीघ्र नफा” मिळविण्याचा मानस मुलांमध्ये मोठया प्रमाणात जाणून बुजुन रुजू होऊ घातला जात आहे. “देता – घेता” ही विचारसरणी मुळ धरतेय. “विकाऊ वृत्ती,” हा पवित्र शिक्षण क्षेत्राला पडलेला मगरमछलीच्या मिठीचा विळखा उदात्त विचार गिळ्ंकृत करणार हे उघड्या डोळ्यानी फक्त पहात बसले तर विनाश अटळ आहे.”
ऐहिक गोष्टीना प्रचंड महत्व अधोरेखीत होताना दिसते आहे.
नैतीकता, जबाबदरी, सामजिक भान, मानवहित भाव, जाज्वल्य देशप्रेम आणि देशाप्रती कर्तव्य या आणि अशाच चांगल्या गोष्टींकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष्य होणे ही सुधृड समाजाची लक्षणे नक्किच नव्हेत.

लहान मुल स्वत: शिकते. निर्लेप, पुर्वग्रह आणि दोष विरहित शिक्षणप्रदान करणे हे धेय बदलता कामा नये. नैसर्गिक क्षमता वाढवीणे, निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करणे यासाठी शिक्षकाची भुमिका मदतनीस, सहाय्यकाची हवी. येथे स्पून फीडिंग अपेक्षीत नाही.
“मी सांगते / सांगतो तसे कर” अशी भुमिका मुलांमधील निर्मिती क्षमतेला मारक ठरविणारी आहे.
पाचशे वेळेस झाले तरी नाटकाला प्रयोग असेच म्हंटले जाते. ती आवृती नसते तो प्रयोग असतो. नाटक हा प्रतेक वेळी नव्याने केलेला, नव्याने अनुभवलेला, नव्याने जगलेला प्रयोग असतो.
तसेच नाविन्यपूर्ण प्रयोग शिकण्या, शिकविण्यामध्ये असतील तर शिक्षण जास्त प्रभावी होईल
“ही कविता पाठ कर. पुन्हा लिही. हा लेसन वाच, त्या खाली दिलेले प्रश्न सोडव. मी सांगतो तसे लिही. निबंध मी फळ्यावर लिहुन देतो तसे वहीत उतरवून काढ.
प्रयोग, एकाचे पाहुन बाकीच्या मुलानी प्रयोग वहीत उतरवून टाका. पैकीच्या पैकी मार्क मिळवा,”असे म्हाणणे म्हणजे मुलांमधील सृजनतेवर घाला घालणे होय. एग्ज़ाम ओरियेंटेड पाट्या टाकणारे साचेबद्ध शिक्षण मुलांच्या विचार शक्तीचा, सृजन गुणांचा अक्षरशा खून करते.

चरित्र संपन्न, देशहित कार्याप्रती प्रेम, जन्मजात किंवा मुळ गुणांमधे वाढ करणे, चांगल्या भावना, प्रेरणा, विचार यांच्या वाढीला हातभर लावणे, नैतिक बीज रुजविणे, सामजिक जबाबदारीची जाणीव जागृत करणे हे आणि असेच चांगले गुण, “सद्गूण संपन्न” नागरिक निर्माण करतात. गुण संपन्न नागरिक सुदृढ़ समाज निर्माण करेल आणि सर्वार्थाने देश संपन्न असेल.

ज्ञान, शिक्षण, विद्या या सारख्या पवित्र गोष्टी चांगल्या मार्गाने प्राप्त कराव्यात. त्याचे अधिकार चांगल्या, सुसंकृत लोकांकडे असावेत. ज्ञान, शिक्षण, विद्या देणारे आदर्शच हवेत. फक्त पुरस्कार प्राप्त नव्हे तर प्रत्यक्षात त्यांचेसुध्दा कार्य महान असावे. पुन्हा त्याच मुद्द्यावर फोकस करून रश्मी क्षणभर बोलायचं थांबली.

पुढील विचार तत्वानां व्यक्त करण्यासाठी नियती बोलू लागली. सुयोग्य शब्दातून ओघवत्या संयत भाषेमध्ये बोलू लागली.

“सरस्वती❗ निच मुखी / हिन ठिकाणी तुझा वास असेल ‼”
अभक्ष्य भक्षण, सुरापान, धुम्रपान आणि इतर ज्या गोष्टी समाज मान्य नाहीत, अनैतिक आहेत अशाच गोष्टींकडे सरस्वतीचा म्हणजे ज्ञानाचा ओढा आणि उपयोग असेल.
ज्ञान हे दानासाठी नसेल. त्याची विक्री होइल. विद्येचा लिलाव होइल.
पवित्र क्षेत्र, पवित्र काम, दाता पवित्र आणि स्विकारणारा कृतज्ञ अशी आजपर्यंत असलेली शिक्षणाची प्रतिमा बदलेल.


शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी या शापा मुळे बाधित असतील. या क्षेत्राशी संबंधीत चांगले लोक आणि चांगल्या गोष्टी, वाईट प्रवृतीमुळे भरडल्या जातील. श्रेष्ट असेल तो फक्त पैसा. पैशासाठी कोणीही काहीही करायला तयार असेल. विद्यार्थ्याचे लक्ष्य विद्याग्रहणा व्यतिरिक्त चंगळ वादाकडे जास्त कललेले असेल. पेन ऐवजी फोन, शस्त्र हलके वाटेल. निती – अनितीच्या संकल्पना पुर्णपणे बदलून जातील. शिक्षण एक व्यवहार होइल.


“निच मुखी सरस्वतीचा वास असेल याचा अर्थ असा होतो होय ?” रीना शाप वणिचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत उतरली.

येणार्‍या काळाची चिंता सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होती. आणि याच चिंते पोटी रोजच्या मुखातून प्रश्न बाहेर पडला.
“रश्मी, नियती प्लिज मला सांग ना जगद् गुरुनी उ:शाप दिला का ग सरस्वतीला? प्रश्न प्रतेकीच्या मनात होता. पण उतर ‘नाही’ असेचं होते.
आचार्य, सरस्वती, मंडण मिश्र ही तत्व्ं होती. आणि परिणामाची तीव्रता समजायला काळाचे पुढे सरकणे अपेक्षीत होते.
******************************

विद्या, ज्ञान – ठळक बदल

बदल हा निसर्ग नियम आहे. शिक्षण हे असे क्षेत्र आहे तिथे बदल हे जिवंतपणाचे निर्देशक असतो. बदलाचे, सुधारणांचे, अद्भूततेचे, नाविन्यपुर्ण गोष्टींचे उत्तम स्वागत शिक्षण क्षेत्राइतके क्वचितच इतर कोणत्याही क्षेत्रात होत असेल. निसर्ग बदलतो, माणूस बदलतो. कालचे परिणाम आज आणि आजचे उद्या टाळता येत नाहीत. परिणाम आणि परिमाण यामध्ये अक्षरांची जगा बदलली आणि शब्दांचा अर्थही बदलला. परिणाम कदाचीत कमी वेळे साठी, जास्त वेळे साठी कींवा कायमचा आसू शकतो.
पण परिमाण बदलले की परीभाषा बदलते. अर्थ बदलतात आणि काळानुरूप बदलत्या परिमाणाचे परिणाम ठळकपणे आपले अस्तीत्व दृश्य स्वरुपात दाखऊ लागतात. कालचक्र साक्षी असते सर्वांसाठी
बाकी मनुष्य हा धरेवरील फक्त काही काळासाठी रहिवासी असतो.

काळाच्या ओघात जुन्या म्हणी जशा कालबाह्य होतात, जसे दिव्याखाली अंधार, घरोघरी मातीच्या चुली, पिकते तिथे विकत नाही ईत्यादि…. पण मतितार्थ बदलत नाही. तसेच दैनंदिन जीवनात होत असलेले बदल त्या त्या क्षेत्रातील आयाम बदलतात.
प्रतेक वर्षी नवी पिढी प्रवेश करणारे शिक्षण क्षेत्र एकमेव द्वितीय होय. निरागस बालके सातत्याने शिक्षण क्षेत्रात प्रवेश करतच रहाणार हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
पुर्वी सर्वाना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काही लोकानी एकत्र येऊन शिक्षण संस्था काढल्या आणि समाजाभिमुख कामाला सुरुवात केली.
संस्था चालकांचा शाळा सुरु करण्याचा उद्धेश सामजिक उत्तरदायीत्व हाच होता. तिथे इतर कोणताच विचार नसे. सर्वाना शिक्षण हेच उद्धिष्ट होते यात तीळ मात्र शंकेला थारा नसे.
उद्धेश स्पष्ट आणि स्वच्छ होता. त्यामध्ये दुमत नव्हतेच मुळी.
लोकहितवादी काम असल्यामूळे समाज धुरीणांबरोबर शासन मदतीला आले आणि चांगल्या कार्याला अनुदान स्वरुपात भक्कम अधार दिला.

कांही संस्था चालकांनी काळाची पाऊले ओळखून व्हर्न्याक्युलर लँग्वेज बरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या काहींनी इतर मंडळाच्या शाळा काढल्या. सी. बी.एस. इ., आय. सी. एस. इ. वैगरे. एकाच संस्थेद्वारे अनुदानित, विना अनुदानित अशा शाळा चालविल्या जातात.
जिथे संस्था चालकांचा उद्धेश स्पष्ट आणि स्वच्छ असतो तिथे दोन्ही प्रकारच्या शाळां तेथील शिक्षकवृंद यांच्या कामावर सारखेच लक्ष्य ठेऊन उत्तम आऊट पुट प्राप्त केले जाते. विना अनुदान तत्ववर चालणाऱ्या शाळेतील विद्यार्थांद्वारे मिळालेल्या फी मधून शिक्षकाना आणि कर्मचाऱ्याना नियमानुसार वेतन आणि इतर खर्च भागविले जातात. पण कांही संस्था ज्या फक्त नफेखोर वृत्तीने कामं करतात त्या शिक्षकांच्या कडून कामं तर व्यवस्थित करून घेतात पण पगार देताना कामगारांसारखे वेतन देतात. अक्षरशः केव्हातरी भविष्यात नियमित पगार सुरु होईल या भाबड्या आशेवर शिक्षकांची वेटबिगार सारखी अवस्था पाहायला मिळते.
शिक्षण क्षेत्रात असलेल्या संघटना म्हणजे तिसरा डोळा असतो. अकॅडेमीक आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पॉजिटीव्ह सहभाग क्षेत्राचे बाळकटीकरण कारण्याला हातभार लावू शकतो. शैक्षणिक कामात ऍक्टिव्ह सहभाग अपेक्षित आहे. जिथे खरोखर अन्याय होतो तिथे न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही असणे अपेक्षित आहे. अन्यथा शैक्षणिक कामात अडथळा संप, बंद, हरताळ, टाळे बंदी, पेन डाऊन, मोर्चा दबावगट, एखादे काम करण्याला विरोधा साठी विरोध, दिन जाने दो पगार आने… या गोष्टी नारात्मक मेसेज पसरवू शकतात. मुंबईतील मिल हद्धपार आणि कामगार बेकार आणि त्याचे भयानक परिणाम आपण पाहतो आहोत. तसं शिकण क्षेत्राचे होता कामा नये. तसं झालंच तर इथे फक्त खाजगीकरण होईल आणि शिक्षण सर्व सामान्यांच्या आवक्या बाहेरचं होईल.


वास्तविक पहाता अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर शिक्षण ही पण मुलभुत गरज आहे हे विदित आहेच. प्रचंड लोकसंख्या असलेल्या अपल्या देशात टैक्स भरणाऱ्या नागरिकांची संख्या मर्यादीत आणि टैक्स न भरता सर्व सुविधा हा माझा हक्क आहे अशी धारणा असलेली जनसंख्या या मध्ये मोठी तफावत दिसून येते. साहाजिकच दरडोई उत्पन्न दर खुप कमी दिसून येतो.
देश चालवणे हे जसे आव्हान आहे, तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकाना विना मोबदला सुविधा उपलब्द करुन देणे हे पण आव्हान आहे. साऱ्या बदला बरोबर
खाजगीकरणाचे वारे शिक्षणाच्या विद्येच्या दारात पोहोचले आणि विद्या दान,
समाज सेवेचे व्रत घेतलेले लोक अक्षरशा एकाच ऊद्धेशाने पछाडलेले असत आणि त्याचसाठी जन्मभर झटत. रविन्द्र्नाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे या आणि अशाच असंख्य धुरिणानी मानवाच्या गरजा, शिक्षणाचे महत्व ओळखून मेहनत आणि समाजातील दानशूर लोकांच्या मदतीने “शिक्षण – बीज” रुजवायला सुरुवात केली. जसा संस्था चालकांचा ऊद्धेश स्पष्ट होता तसेच शिक्षक घडत गेले. त्यांच्या सहवासात येणारे विद्यार्थी उत्तम शिक्षण घेउन बाहेर निघतं असतं. पालक, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अगदी बिनघोरपणे शिक्षकांवर सोपवतं असतं. शासन शाळांना अनुदान पुरवत असे. म्हणजेच संस्था चालक, मुख्याध्यापाक शिक्षक, पालक, मुले यांचे उद्देश्य अगदीच मर्यादीत होते. मुलांच्या मनात, हृदयात आणि डोळ्यात अमर्याद स्वप्ने पेरून त्या वाटेवर चालविणे या मर्यादीत ऊद्धेशाने शिक्षक झपाटलेले असत.

शिक्षण भिकेचे लक्षण, शिकुन काय बॅरिस्टर होणार का? शिकुन काय प्रकाश पाडणार? चार बुक शिकुन आलास म्हणून मला शहाणपण शिकवू नको. अशा तऱ्हेची कुश्चीत वाक्ये, टोमण्याचे प्रमाण कमी झाले.

काळ बदलला. वर्ण व्यवस्थेला सर्व स्थरातून विरोध झाला. शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडली गेली. ज्ञानगंगा गावोगावी दाखल झाली. शासनाने प्राथम्याने प्राधान्य देऊन शिक्षण ही मुलभुत गरज असल्याचे लोकमनात बिंबवले गेले. त्यासाठी समाज माध्यमांचा जातीने प्रभावी उपयोग केला गेला. सुशिक्षीत असण्याचे फायदे नजरेच्या टप्प्यात दिसू लगले.
🙏🙏🙏😚😚🙏🙏🙏
पुढील भागात: प्रखर प्रज्ञा प्रकाश प्रत्तेकाच्या प्रांगणात येतो तेव्हा प्रांजळ मनाने, प्रगाढ प्रयासाने, प्रामाणिकपणे बाहू पसरून प्रेमाने स्वागत करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले

Read More

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे,

Read More

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More