भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो ? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯 प्रेम भक्ती ❤🌺🙏🔯,घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️, दीदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मीसाठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., अण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्.
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडंसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
भाग – 52 * कल 👶 – आज💃 – कल 👩🦳 , विश्वास – बिश्वास 🤔❓️प्रवास पेपर, कोडे आणि बरचं काही, “कोणती ऐकणार❓️चांगली 👌की वाईट👎‼️” “तुमचा हात पकडणार नाही, मॅडम ‼️”, “…यांच्या पासून सावध रहा, सूची‼️“
कल 👶 – आज 💃 – कल 👩🦳
बदल हा जीवनाचा अपरिहार्य भाग असतो. तो रडत स्वीकारला किवा हसत स्वीकारला तरी बदलाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. बदलाचे फक्त चांगलेच परिणाम असतात असंच काही नाही. काही वाईट परिणामांचा सामना सुद्धा करावा लागतो. तेव्हा खचून न जाता धीराने आणि संयमाने सामना केल्यास उत्तम. काळ हे सर्व दुःख आणि आघातावरचे औषधं असते. दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सर्वात मोठं मलम हे काळाचं पुढे सरकणं असते. जस जशी वेळ निघून जाते तसंतशी भल्या मोठ्या दुःखद घटनेची तीव्रता बोथट होते. चांगले असू देत किवा दुःखद वर्तमान हा भूतकाळामध्ये बदलतो हे सत्य आहे.
आपण कपडे👔🥼🧥 बदलतो, मित्र – मैत्रिणी 🤼♀️🤼♂️ बदलतो, निवास 🏘️🏠बदलतो, नाती🧟♀️👨👨👧👦बदलतो परंतु स्वतःला काळाबरोबर बदलत नाही. कदाचित दुःखाचे करणं हेच असावे.
काल मी दुःखी होतो😞😩. आज मी खुश आहे😚😊. उद्याच काहीच माहित नाही. काल माझ्या हातातून निसटलाय, उद्या माझ्या हातात नाही.
नजर चुकली तर टार्गेट मिस होईल पण चिंतेनं मन डिस्टर्ब झाले तर सगळी राखरांगोळी होते.
माझ्या हातात फक्त आणि फक्त आज आहे. मी कालचा, होऊन गेलेल्या दिवसाचा म्हणजेच भूतकाळाबदद्ल विचार करून किंवा येणाऱ्या दिवसाची म्हणजे भविष्याची चिंता करून माझा वर्तमान म्हणजे आजचा दिवस का खराब करू ❓️ याचा विचार केला पाहिजे.
आजचा दिवस एन्जॉय करू‼️ ही भूमिका माणसाला आनंदी बनवते. फक्त भान सुटता काम नये.
“मुगल ए आजम” असू दे “एक दुजे के लिए”, “लैला – मजनू” असुदे किंवा “सैराट”, “लाल दुपट्टा मलमल का” हे काळाबरोबर न बदलणाऱ्या समाजाचे आणि बदलणाऱ्या तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे पिक्चर्स म्हणूनच तुफान चालले. समाजाला, समाजातील कट्टर वादाला आव्हान देणारी नवी पीढी आणि कट्टर वाद न सोडणारी जुनी पीढी आणि दोघांमधील टोकदार संघर्ष एक दुसऱ्याला घायाळ करतो. आणि याच संघर्षातून त्याचा भीषण परिणाम दाखवणारा शेवट. शेवटी सिनेमा हे समाजातील घटनांचा आरसाचं असतो. यातून काय बोध घ्यायचा❓️ “समय के पास इतना समय नहीं हैं की, दोबारा आपको समय दे सके |”
थोडासा हट्टीपणा, ताठरपणा, मी पणा असायलाच हवा अन्यथा मऊ लागला म्हणून उस मुळापासून खाणारे, कोपराने खणणारे असतातच की. हे इतिहासातील घटनांनी सिद्ध केलंय.
विश्वास – बिश्वास 🤔❓️
“पुढच्यास ठेच मागचा शहाणा,” ही म्हण फक्त अभ्यासापुरतीच नसते. ती जीवनाच्या वाटचालीत कधी ना कधी प्रत्येकाला वापरावी लागते हे सत्य आहे.
पण हे समजेल तर रश्मी कसली. स्वतः पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय विश्वास वाटणार नाही. पुन्हा, पुन्हा तिच चुक करणार आणि नंतर, “आई तू म्हणतं होतीस तेच बरोबर होतं,” असे बोलून विनीता आईचे अनुभवी बोल, आणि विनिता आईने व्यक्त केलेले अंदाज अगदी बरोबर असल्याचा प्रत्यय आल्याचे कबूल करत असे.
“रश्मी, विश्वास खूप मोठा ठेवा आहे. विश्वास स्वतःवर ठेवला तर आत्मशक्ती वाढवतो आणि परक्यावर ठेवला तर कमजोर बनवतो.” विनिता आई बोलता बोलता असे काही ‘बोल,’ सांगत असे की, रश्मीचं काय, ऐकणाऱ्या कोणालाही विचार करायला भाग पाडेल. विनिता आईने नि:क्षुन सांगून पण काही गोष्टी डोक्यात ठेवायच्याच नाहीत हा हट्टी स्वभाव. आपल्या याच स्वभावामुळे संकट निर्माण होते, हे माहित असून पण त्या दिवशी रश्मीने आपलेच म्हणणे खरे केले. चूक समजली पण उशीर झाला. पुनश्च आपली विनिता आई बोलते ते खुपच मोठ्या प्रमाणात नव्हे तर दोनशे टक्के खरेच असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
🚌🚌🚌🚌
मध्यवर्ती बस स्थानकातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत खिडकीजवळची जागा पकडून आपल्या सीटवर अगदी निश्चिन्त होऊन बसली रश्मी. बाजूच्या सीटवर जाणून बुजून बॅग ठेवली. आता जवळ जवळ गाडी पूर्णपणे भरली होती.
लाल पिवळ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसनी संपूर्ण स्थानक सजले होते. एक एस. टी. 🚌 बस गेली की दुसरी गाडी प्रवेश करीत असे. गाडीत चढण्यासाठी गाडीच्या दरवाजाजवळ एकच गर्दी उसळत असे. स्वतः सीट पकडून बसेपर्यंत प्रत्येकजण अस्वस्थ असे. एस. टी. बसमध्ये एकदा का बसायला जागा मिळाली की प्रवाशाच्या चेहऱ्यावर सुखद लहर झळके. त्यातल्या त्यात खिडकीची सीट मिळाली की चेहऱ्यावरची ख़ुशी लपवता येत नसे. ऑरेंज रंगाच्या आईस् कँडी, कुल्फी, पॉपिनच्या🍬, पांढऱ्या शुभ्र मध्ये छिद्र असलेल्या अर्काच्या, मिंटच्या थंडगार गोळया, बॉबी🍭, उसाच्या रसाचे🥤ग्लास घेऊन एस. टी. बस च्या खिडकीशी रेंगाळत फेरीवाले कोलाहल करत होते. आता बस पूर्ण भरली होती. खाडकरून एस. टी. बसचा दरवाजा कंडक्टरने जोरात बंद केला. जोरजोरात दोरी खेचून टणss, टणss करून घंटी वाजवली आणि ड्रायव्हरने स्टार्टर मारला. घरर्रर्रर्र, घरर्रर्रर्र आवाज करत गाडी स्टार्ट झाली. कुणीतरी ज़ोरज़ोरात गाडीच्या दरवाज्यावर बाहेरच्या बाजूने धपा धप आवाज करत होते आणि एस. टी. चा दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत होते. सर्वांच्या नजरा गाडीच्या दरवाज्यावर खिळल्या. कोण आहे लेट लतीफ म्हणून कपाळावर अट्या उमटवून कंडक्टरने टण करून जोरात एकदाच बेल वाजवली आणि गाडी पुढे निघण्या अगोदरच थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि एक किरकोळ शरीरयष्टीचा मनुष्य गाडीत चढला. पुन्हा टण, टण दोनदा बेल वाजवून गाडी स्टार्ट झाली.
कंडक्टर – ड्रायव्हरमधील सांकेतिक भाषा – एकदा बेल मारणे म्हणजे थांबणे, दोनदा बेल मारणे म्हणजे निघणे,
टण,टण,टण,टण बेल मारत येउदेss, अजून येउदेss. टण टण टण येउदेss, येउदेss असं म्हणून जोरात चार, चार वेळेला बेल मारून रिव्हर्स घेऊन फालटावर गाडी थांबवण दोघांमधल्या मुच्यूअल अंडरस्टॅण्डिंगच कौतुक वाटले. कंडक्टर श्रेष्ठ की, ड्राइवर श्रेष्ठ हा लहानपणापासून रश्मीला पडलेला प्रश्न ❓️ कधीच सुटला होता त्याची आठवण झाली. दोघे आप आपल्या जागी श्रेष्ठच👌👍 होते.
रश्मीने आपली नजर खिडकीतून बाहेर टाकली. एस. टी. स्टॅण्डवर सोडायला आलेल्या आपल्या भावाला ज़ोरजोरात हात👋👋 हलवून हसत हसत😊 बाय केला.
प्रवास पेपर, कोडे आणि बराच काही.
“कोणी बसले नाही ना सीटवर ❓️ बॅग काढा तुमची” किरट्या आवाजात आलेल्या सुचनेने रश्मीने खिडकीतून नजर हटवली आणि मान वळवून पहिले. मगाशी गाडी थांबवून आत आलेला लेट लतीफ, तोच मनुष्य रश्मीला बाजूच्या सीटवरची बॅग उचलायला सांगत होता.
अरे देवा ‼️ रश्मीने मनातूनच कपाळाला🤔 हात लावला. प्रवास एन्जॉय करण्याच्या स्वप्नाचं खोबरं झाल्याने मनातच चूकचूकली. दरम्यान तिची नजर समोरच्या माणसाचा अंदाज घेत होती. सायकॉलॉजीच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे नेहमीच्या पद्धतीने स्थूल निरीक्षणाकडून सुक्ष्म निरीक्षण सुरु झाले.
हाडाच्या सापळ्यावर बिना मांस त्वचा आणि त्यावर चढवलेली राखी रंगाची सफारी दिसली. हनुवटीवर राखलेल्या दाढीवर काळ्या केसांमधून पांढऱ्या केसांचा पुंजका डोकावत होता. आता रश्मीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. डोळे खोल गेलेले आणि लालसर दिसत होते. पुन्हा बॅग बाजूला ठेवण्यासाठी त्या व्यक्तीने हातानेच इशारा केला. गाडीने एक बाकदार वळण घेतले तसं गाडीत उभी असलेली माणसं हेलकावली. पाप्याचे पितर, लेट लतीफ यडबडला, लटपटला, धडपडला आणि तोल गेला. पण मधला पोल आपल्या हातांच्या पंजाने असा काही पकडला की, प्रयोग शाळेतील काचेमध्ये ठेवलेल्या हाडाच्या सपळ्याची आठवण झाली.
सापळ्याच्या हातात सोमण सर, डस्टर ठेवायचे आणि दुसऱ्या पंज्यात चॉक पीस ठेऊन म्हणायचे, “नाऊ इट्स रामूकाका’ज क्लास.” चॉक पीस पकडलेला पंजा सापळ्याच्या जबड्याला लावून म्हणायचे, “रामू इज स्मोकिंग नॉऊ. सो, आय विल कंटिन्यू द क्लास.”
लेट लतीफचा चेहरा कसनुसा झाला होता. काही बोलायच्या अगोदर रश्मीने आपल्या बाजूला ठेवलेल्या बॅगेकडे नजर वळवली. काळ्या रंगावर अननसाची चित्रे असलेली बॅग थोडी हलून सीटच्या टोकावर स्थिरावली होती. रश्मीची आवडती बॅग होती ती. वेगवेगळ्या गोष्टी, गुपीतं, गुपचूप सांभाळून ठेवणारी जिवाभावाची मैत्रिण होती ती.
“काय गं रश्मी, नोकरी करतेस, व्यवस्थित कमावतेस ना आता❓️ स्वतः करता चांगली फॅशनेबल बॅग नाही का घेता येत ❓️ ही पिशवी कशाला वापरतेस❓️” छोट्या, लाडक्या अत्याचा डायलॉग तिच्या आवाजासह आणि चेहऱ्यावरील हावभावासहित आठवला.
“आत्या, 👜 ही बॅग खूप मस्त आहे. मला खूपच आवडते ही बॅग. चेन आहे. कप्पे आहेत. आतल्या बाजूला साखळीने जोडलेली छोटीशी मनी पर्स आहे. हातात पकडायला आणि खांदयावर लटकवायला दोन वेगळे हॅन्डल्स म्हणजे बंध आहेत. सामान खूप मावतं. आणि रंग खराब होत नाही. स्वच्छ धुतली की नवीन दिसते. मुख्य म्हणजे मला, ही बॅग चंदाने घेऊन दिली आहे. साऱ्या गोष्टी आठवताच रश्मीच्या चेहऱ्यावर हासू आले. रश्मीने हळुवार हाताने बॅग उचलून आपल्या मांडीवर ठेवली. रश्मी किंचित खिडकीकडे सरकून बसली. नेहमीचा प्रवास असल्याने बाहेर बघण्यासारखं नवीन असे काहीच नव्हते. त्यामुळे
बॅगेमधून पेपर काढला आणि शांतपणे वाचत बसली. लघु कथा, बातम्या, संपादकीय, आजचा विचार, “पाहिजेत” जाहिराती, पेपरमध्ये असलेले साप्ताहिक राशींभाविष्य चाळून पेपर घडीकरून ठेऊन दिला. बॅगेतून मासिक काढलं. वेगवेगळी सदरं वाचून झाली. शेवटच्या पनावर पुन्हा मासिक राशी भविष्य लिहिले होते. ते वाचून पूर्ण झाले. साप्ताहिकातील, मासिकातील हे बारा राशीचे
भविष्य म्हणजे आलटून, पालटून ग्रह ताऱ्यांचे नावं घेत लिहिलेले काही लाख लोकाना कधी मार्गदर्शन, कधी भीती, कधी आशेचा किरण तर कधी निराशेच मळभ निर्माण करणार पान वाटे.
कोडी सोडावा हा वेळ घालवण्या बरोबरच विचाराला चालना आणि दिशा देणारा खेळ. शब्द संपत्तीची खातरजमा करणारा शब्द खेळाची संधीच म्हणायला हवी.
1. भ – पासून सुरु होणारा पाच अक्षरी खाण्याशी संबंधित उभा हिंदी शब्द- भटार खाना
2. टा – दोन अक्षरी, आडवा शब्द, मोठा उद्योगपती – टाटा
3. र – आडवा तीन अक्षरी, मराठी चित्रपटातील देव – रमेश
4. खा – तीन अक्षरी ( मुक्ताईला हे मिळाले नाहीं म्हणून ज्ञानाने जठराग्नी तापवून मांडे भाजले.) – खापर
5. आडवा, शब्द. ना – स्टेजवर सदर केली जाणारी कलाकृती – नाटक.
1. भ- पाच अक्षरी आडवा शब्द. (पुढे घडणाऱ्या गोष्टी )
भविष्यवाणी
2. वी – दोन अक्षरी शब्द (बाजीगर छत्रपटातील पत्राचे नाव )- विकी
4. वा – चार अक्षरी खूप मोठा विद्वान – वाचस्पती..
रश्मीने शब्द भरले.
शब्दकोडे भरताना बाजूने आवाज आला.
तुमचा हात पकडणार नाही, मॅडम ‼️
लेट लतीफ : ” तुमचा भविष्यावर विश्वास आहे का ❓️”
रश्मी : —– —— ——-.
लेट लतीफ : “तुम्ही टिचर आहात का ❓️”
रश्मी : —— —– —–.
लेट लतीफ: तुमचं वाचन खुप आहे असं दिसतंय ‼️
रश्मी :……………….
“रश्मी मॅडम, तुमच्याकडील पेपर द्या ना वाचायला प्लिज.”
नावानिशी हाक मारताहेत हे महाशय. रश्मीने चमकून बाजूला पहिले.
“मला तुमचं नाव कसं माहित ❓️” असाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला.
रश्मी : ———- ——— ——.
तुम्ही टीचर आहात किवा टीचरशी संबंधित कामं करता ना ❓️
रश्मी : ——– ———- ——-.
आता रश्मीच तोंड ऑ 😲 करून उघडं राहिलं. ते तसंच ठेऊन, चेहऱ्यावर आश्चर्यभाव निर्माण झाला होता.
न्युज पेपर द्यावा म्हणजे तोंड बंद राहिल यांचे. रश्मीने बॅगेतून पेपर काढून डाव्या हाताने बाजूला बसलेल्या लेट लतीफला दिला.
पेपर घेता घेता पुढचा प्रश्न आला.
“या महिन्यात एक चांगली आणि एक वाईट बातमी मिळणार आहे तुम्हाला. पहिल्यांदा कोणती ऐकणार ❓️चांगली की वाईट ❓️”
“वाईट बातमी पहिल्यांदा ऐकेन ❓️” रश्मी सहज बोलून गेली.
“तुम्हाला चांगली बातमी पहिल्यांदा मिळेल आणि वाईट बातमी नंतर मिळेल.” प्रश्न न विचारताच समोरून प्रश्नाचे उत्तर आले.
“तरीपण चालेल.” रश्मी ठामपणे बोलली.
“हात दाखवा. तळ हातावरील रेषा बोलतात.” लेट लतीफ.
“नाही. गरज नाही मला भविष्य जाणून घ्यायची.” रश्मी सावध होतं उतरली.
“मॅडम, मी तुमचा हात पकडणार नाही. हात पुढे करा.” पुन्हा आग्रह झाला.
“पहिली चांगली बातमी तुम्ही राहत असलेलं ठिकाण एका महिन्यात सोडणार.”
“वाईट बातमी तुम्ही रहात असलेलं ठिकाणं लवकरच सोडावं लागणार.”
एकच वाक्य, ‘सोडणार, सोडावं लागणार ‘ चांगलं आणि वाईट दोन्ही. काय अर्थ असेल याचा ?
हे काय वेगळे सांगणार ❓️विश्वनाथ काका आजोबानी सर्व आयुष्याची रूपरेखा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत इत्यंभूत सांगितलीय. त्याहून वेगळं कोण आणि काय सांगणार मला. रश्मी स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत होती.
“तुमच्या हाताची रेषा हे पण सांगते की, वर्ष संपण्याअगोदर एक मोठी घटना तुमचे आयुष्य बदलून टाकेल.” समोरून आलेल्या वाक्याने रश्मी जागेवरून उडालीच. “मी तर हात दाखवलाच नाही.” रश्मी मनातच बोलली.
“तुम्ही पेपर देताना, मी हात पाहिला” रश्मीच्या मनात उमटलेल्या प्रश्नाचे समोरून उत्तर मिळाले. तरी अनोळखी माणूस पाहून रश्मीच्या मनात विचार तरळला.
“स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरायची भीती वाटत नाही तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.”
आता रश्मीच्या मनाची उत्सुकता वाढली. तिने हात हळूच पुढे करून तळवा लेट लतीफ समोर समोर धरला.
“गुलाबी आहे हात.” भिवया उंचावून चेहऱ्यावर किंचित हास्य आणत समोरून उच्चार बाहेर पडला.
“त्यात वेगळं काय आहे❓️” रश्मी मनात बोलली.
“आहे ना, वेगळंच आहे. शारीरिक कष्ट कमी आहेत तुम्हाला. नॉर्मल, टिपिकल बायकांचा हात नाही हा. कोणावरही पटकन विश्वास ठेवता तुम्ही.”
“सगळेच विश्वास ठेवतात मी वेगळं काय करते? पृथ्वी गोल आहे यावर विश्वास ठेवतोच आपण. ती गोल आहे का❓️ हे प्रदक्षिणा घालून तपासत नाही कुणी.”
रश्मी, समोरून आलेला प्रश्न आणि मुद्दा मनातच खोडून टाकत होती.
“पृथ्वीची गोष्ट वेगळी. कोणी नक्राश्रु ढाळले तरी खरं समजून मदत करता. आणि स्वतःची, जिवाभावाची माणसं जीव तोडून काही सांगत असताना ऐकत नाही.” समोरून दोषारोप झाला.
सहन न होऊन रश्मी बोलली, “असं होत नाही अजिबात. मी माझ्या ठराविक जिवाभावाच्या माणसांवर विश्वास ठेवतेच की.”
“हे, असं वागण्यामागे कारण आहेच की. अर्थात त्याला तुमच्या पूर्व आयुष्यातील घटना जबाबदार आहेत. पण परिस्थिती नेहमी तशीच नसते. मित्र, मैत्रीणी नेहमी खूप चांगलेच असतात. एखाद्या वेळी, मजबुरी एखाद्या सवंगड्याला वेगळं वागायला भाग पाडते.
समोरचा वाईट हेतू ठेऊन वागला तरी, तुमचा हेतू वाईट नसला की, आपोआप तुमचे चांगले कर्म तुमच्या मदतीला धावून येते.
आता रश्मी जास्त सावध झाली आणि बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या बोलण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. आपल् वैयक्तिक आयुष्य आणि काही गोष्टी आपल्या लोकांना माहित असणे ठीक. अनोळखी लोकांना ठराविक अंतरावर रोखलेलेच बरे. हा मनुष्य तर वर्तमान, भूत, भविष्य जाणतो. किंबहुना तसं दिसत खरं. या बरोबरचं मनात उठलेले तरंग आपल्या स्वतःच्या मेंदूपर्यंत पर्यंत पोहोचायच्या अगोदर त्याच्या तोंडून ऐकतोय आपण.
यांच्या पासून सावध रहा, सूची‼️
नेमका कोण आहे ❓️ कोठून आलाय ❓️ निघालाय कोठे ❓️ रश्मी विचार जंजाळत असताना परत आवाज आला.
“इथंच पुण्यात माझ्या मित्राचं घर आहे. तिथे चाललोय मी. तुम्हीही चला.” सहज बोलत होता तो.
त्याची हिंमत बघून रश्मी अवाक् 🤭 झाली. हा माणूस दिसतो तितका साधा नाही. सरळ तर अजिबात नाही. विनिता आईने सांगितलेल्या काही गोष्टी किती तंतोतंत खऱ्या असतात हे आताच्या अनुभवातून सिद्धच झाले होते.
रश्मीला सूची अक्का आणि तिची मैत्रिण बेबीजानबरोबर विनिता आई गप्पा मारतानाचा प्रसंग उभा राहिला.
“काही लोकांपासून नेहमी सावध राहायला हवे, सूची”. विनिता आई रश्मीची चुलत बहीण सूची आणि तिच्या मैत्रिणीं बरोबर बोलत होती.
“कोणत्या लोकांपासून सावध राहायला पाहिजे विनिता काकू❓️” बेबिजानने घाईघाईत विचारले.
“वैऱ्याचे मित्र, प्रवासातील अनोळखी व्यक्ती, नेहमी स्तुती करणारे, विनाकारण कोणत्याही गोष्टीला हसणारे आणि अनौरस व्यक्ती यांच्यापासून नेहमी सतर्क असायला हवे.”
विनिता आईच्या बोलण्यातून नेहमी आपली आणि आपल्या सर्व भावंडांची काळजी डोकावत असे. बोलता बोलता अशा कितीतरी गोष्टी विनिता आईने सांगितल्या. त्यातली एकही गोष्ट वायफळ नसे याचा प्रत्यय पुढील आयुष्यात येत गेला. आजच्या प्रवासात हा अनोळखी लेट लतीफ, पाप्याचं पितर मन किती काळ आहे त्याचं. शेवटी वळणाचं पाणी वळणावरच जाणार. प्रवासात अनोळखी व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवायचाच नाही हे मनाशी पक्के ठरवून, रश्मी खिडकीबाहेरच विश्व् न्याहाळत राहिली. विनिता आईचा चेहरा मन भरून राहिला. “विनिता आई, तू खरोखरच किती ग्रेट आहेस गं‼️ किती तथ्य असतं तुझ्या बोलण्यात. मीच कमी पडते तू भरभरून दिलेलं विचार धन सांभाळायला.” रश्मी मनात स्वतःशीच बोलत राहिली.
जागा सोडणार ‼️ सोडावी लागणार ‼️
रश्मी विज्ञान संस्थेत पोहोचली तेव्हा नुकतीच पहाट 🌄 झाली होती. सूर्य असंख्यकिरणांनी थ्वीला उजळवत होता. पटापट अंगोळ करून नेहमीसारखी प्रसन्न मनाने पूजा 🙏🌸🌹🥀🌺केली आणि बॅग कामाला घेऊन निघाली रश्मी. दुपारपर्यंत चार पिरियड्स झाले होते. घाईत सकाळी प्रवासाची बॅग तशीच ठेऊन निघाली होती रश्मी. दुपारच्या एक तासाच्या सुट्टीत रूमवर जाऊन यावे या विचाराने हिस्ट्रीच्या मॅडमना हाक देत रूमवर जाण्यासाठी संस्थेच्या ऑफिसला वळसा घातला आणि पाठीमागून आवाज आला, “मॅडमsss, मोठ्या मॅडमssss. आवाजात उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. अभिनंदन💐. मोठ्या मॅडम”, दोघे नवरा बायको💑 सुरेश आणि सुमुखी खूप खुशीत होते. हसत, हसत त्यांनी एक पाकीट ✉️ रश्मीसमोर धरलं. “आता मॅडम विज्ञान संस्था सोडणार‼️” सुमुखी बोलल्या. “सोडणार काय ❓️ सोडावीच लागणार‼️”, सुरेशजी बोलले.
सुरेशजीनी दिलेलं महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेलं पत्र रश्मी डोळे मोठे करून बघत होती.
जुन्या, नव्या – विचारांची, मिळालेल्या अनुभवाची सांगड घालत रश्मीच्या मनात कसले विचार चालू होते ❓️ नेमक काय शिजतंय ❓️जाणून घेऊया पुढील एपिसोड क्रमांक 53 मध्ये 🙏🌹
ranjanarao.com वर “तू सदा जवळी रहा.. “
भाग – 53 लवकरच आपल्या भेटीस येत आहे.🌹 site वर वाचनासाठी उपलब्ध साहित्य…🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAUl5
story time : https://bit.ly/2Z1r33उ
poems : https://bit.ly/3lP8OI4
🙏आपले अभिप्राय, टिकत्मक परीक्षण, सूचना, सिरीयल मधील पात्रांबाबत आपले विचार कॉमेंट बॉक्स मध्ये शेअर करा जेणे करून पुढील रचनात्मक निर्मितीसाठी उपयुक्त ठरेलं.🙏🌹