भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनीस्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्त्वाचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महा गणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯 प्रेम ♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯, घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️, दिदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम – बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मीसाठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., आण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्…
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
मंथन
बालविवाह 💑 ही पद्धत बंद होऊन जमाना झाला होता. आता मुलीं 👧शिक्षित होत होत्या. नोकरी, व्यवसाय निवडत होत्या. लोणचे🥫 – पापडाच्या🫓 निर्मितीबरोबर इतर व्यवसायात उडी घेऊन यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी नवी, नवी दालने महिलांना खुणावत होती. महिलांची स्पर्धा 💃💃त्यांच्या स्वतःशीच होती. त्या स्पर्धेत यशस्वी होतं होत्या. शिक्षणाने त्यांचा आत्मविश्वास दुणावत होता. निर्णय घेणे, घेतलेला निर्णय स्वक्षमतेने पेलणे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारण्याचे कसब अंगी बाणवत होत्या. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आणि मक्तेदारी फक्त घरच्या पुरुषाचीच असते हा समज अन् समाज – मनात जाणून बुजून घट्ट रुतवली गेलेली पाळे मूळे हळूहळू हलवत होता.
स्त्रियांना विचारला जाणारा आणि त्यांच्या उभारीचं, मनाचं खच्चीकरण करणारा, “तुला काय कळतं ?” हा टिपिकल पुरुषी प्रश्न विचारायच्या आधी खरोखरच विचारपूर्वक उच्चारला जाऊ लागला. आई, बहीण, बायको, मुलगी, सून, नात यांना, “तू गप्प बस😖‼️” म्हणायच्या अगोदर आपण, आपलेच विचार दडपत आहोत याचे भान येताना दिसत होते. मुलींना ग्रॅज्युएशन नंतर व्यवसायिक प्रशिक्षणाची गरज भासू लागली. त्यात पुढाकार घेणारा दुसरा, तिसरा कोणी नसून कर्ता पुरुष अर्थात बाबाच असे. आईची त्यासाठी भक्कम साथ असे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी फक्त घरच्या पुरुषाचीच असते या समज – गैरसमज मधील अस्पष्ट रेषा पुसणारा काळ होता तो. शिक्षण ही कोणत्या एक समाजाची मक्तेदारी नाही हे समजून वर्षे लोटली होती. “पुरुषाचं मन कणखर असतं. पुरुष, कोमल भावनेच्या आहारी जात नाही,” हा विचार सरसकट सर्वच पुरुषांना लागू होऊ शकत नाही हे हळूहळू उमजुन घेतलं जात होते. मृताला अग्नी देताना हवी असलेली अलिप्त वृत्ती, ताठ कणा, कडक स्वभाव, स्मशान वैराग्य हे स्वाभाविक भाव मानले जात होते. पुरुष 😚 हळवा, कोमल मनाचा आणि कमजोर 🤜मनगटाचा असू शकतो हेही पचनी पडत होतं. पुरुषाला, “ए, मुलींसारखं रडतोस😭 काय ❓️”विचारायच्या अगोदर, पुरुष अर्धनारी नटेश्वर असल्याचा विचार मनात येई. खोट्या अहंकारापायी आपल्या भावानांचा निचरा केला नाहीं तर त्याचा मनावर ♥️आणि शारीरिक💪 आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, ते जीवावर बेतु शकतं त्यासाठी पुरुषांनी वेळीच व्यक्त व्हावं. दडपलेल्या भावाना, वाटणारी भीती, खचलेलं मन; हृदय 🫀🫁 कमजोर करून त्यावर हल्ला करू शकते आणि हार्ट अटॅकने बळी जाऊ शकतो हे मानसशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले होते. मुलीं, स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा, “किती पुरुषी वागतेय ❓️ किती बिनधास्त आहे ❓️” असे म्हणण्यापेक्षा त्यांच्यातील गुण हेरून शिक्षण, व्यवसाय निवडीसाठी आणि भविष्यासाठी या गुणांचा वापर कारण्यावर भर दिला जाई.
“समृद्ध जीवन प्रत्येकाचा अधिकार” याची समज आली होती.
झालेले बदल उत्क्रांतीमध्ये नव्हे तर क्रांतीमध्ये मोडणारे होते. जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा आणि समोरच्याकडून अपेक्षेचा एक वेगळा आणि ट्रिमेंडेस बदल प्रत्येकजण अनुभवत होता. बदलानां मोठ्या मनाने सामोरे जाणारा, गरज म्हणून सामोरे जाणारा आणि बदल स्वीकारायचाच नाही हा हेका ठेवणारा असे नैसर्गिकरित्या माणसाचे तीन गट स्पष्ट दिसत होते. चौथा गट होता जुन्या – नव्याचा सुवर्ण मध्य साधणारा.
नातेसंबंध, त्यात होत असलेले सकारात्मक बदल, याचा मोठ्या मनाने स्वीकार करून बदल अंगी बाणवताना होतं असलेली तत्कालीन समाजधुरीण, वडिलधाऱ्यांची टीका, त्यांचा दृष्टीकोन या सर्वाना योग्य आणि सडेतोड उत्तर देणे क्रमप्राप्त होते. जन्मजात निर्माण केली गेलेली पुरुषी अहंकाराची झूल फेकून स्वतःला माणूस बनवणे इतके सोपे बिलकुल नव्हते. “अगोदर, मी माणूस आहे; मगच पुरुष आहे” हे समजून घेतले त्यांनी कुटुंब, देश आणि मानवजातीला मोठीच देणगी दिली. पुढील पिढीसाठी आदर्श ठेवला. स्वतःच्या पुरुष पूर्वजांनी “चूल आणि मुल” या लादलेल्या पुरुषी संकल्पनां पुढील पिढीतील पुरुष विचार पूर्वक खोडून कढत होते. “एक स्त्री ✍️ सुशिक्षित तर कुटुंबं सुशिक्षित✍️,” हे ज्यानी जाणले, अमलात आणले त्यांनी समाजामध्ये ही गोष्ट उदाहरणासहित सिद्ध करून दाखवली.
बारा बलुतेदार, अठरा पगड जाती, गावाबाहेरची वस्ती या आता कल्पने बाहेर होत्या.
बलूतेदार – थोडंसं
रश्मीला आपल्या गावातील बलुतेदार नावासहित आठवले. शेती हा मुख्य व्यवसाय असे. शेतीव्यतिरिक्त इतर कामं हे परंपरेने चालत आलेले वाटणी हक्क असल्यामुळे साधारणपणे हे बलुतेदार शेतकऱ्यांचे मित्र बनून गावगाडा चालवत. गांव स्वावलंबी बनवायला बलुतेदार आणि अलुतेदार यांचा मोठाच वाटा असे. काही बलुतेदार जवळपासच्या गावासाठी ठरविलेली कामं करत असतं.
लाकडापासून कोरीव कामं करत भोवरा, खेळणी, बैलगाडी, नांगर, कुळव, शेती आणि घरासाठी लागणारी लाकडी अवजारे बनवणारे बापुकाका सुतार नेहमी खाली मान घालून कामात मग्न असत.
काष्टाची तोड, काप, तास, घास अन् करुनी फोड, चीर
देई उपयुक्त आकार, तोच अमुचा बापू सुतार||
घणाचे घाव घालतो निथळतो घाम तनाचा,
यशोदेवी त्यांच्यासाठी करीते हार कुसुमांचा ||
वरील ओळीना स्मरून जवळच वाडीमध्ये घणाचे घाव घालत तापलेल्या लोखंडाला हवा तो आकार मिळाल्याचे समाधान आणि ते पाहून स्वतःच तोंडभरून हसणारे लोहार, अण्णाप्पा काका शेतकऱ्यांबरोबर गृहिणीचा पण मदतनीस होता. चिमटा, उलथन, झारा, तवा, विळी आणि महिलांच्या सोयीच्या कित्येक गोष्टी ते वेळेत आणि हौसेने बनवून द्यायचे. मेहनतान्याबरोबर बायकांच्या चेहऱ्यावरचे हासू त्यांचा उत्साह द्विगुणित करायचा.
तशी बापू सुतार आणि अण्णापा लोहार यांनी एकत्र येऊन लाकूड आणि लोखंडाच्या वस्तूची छान मैत्री बनवायचे. विळा लोखंडाचा त्याची मूठ लाकडाची असे. कुऱ्हाडीचा दांडा, विळीचा पाठ आणि अनंत वस्तू दोघांच्या कलाकृतीचा साज लेवून गरजूंच्या मदतीसाठी सज्ज असत.
रंगीत नव्या वसनाना लावुनी कातर कापे करकर,
आकार त्यांना देण्यासाठी शिलाई मशीन चाले झरझर ||
दिग्गु शिंपी काकांचा जोश वर्षभर जोरात असे. कोणत्याही महिन्यात कपडे शिवायला टाका, ते आपले आठ दिवसांनीच बोलावत असत. त्यानंतर तारीख पे तारीख चालू राही. त्याच्याकडे शिवण्यासाठी कपडयांचा अव्याहत ओघ वाहत असे. युनिफॉर्म असो किंवा फ्रॉक, परकर – पोलकं असो की शर्ट – पॅन्ट असो किंवा सदरा – पायजमा असो शिलाईसाठी ते ठराविक वेळ घेणारच. विनिता आई, सई, चंदा आणि रश्मीसाठी कपडे शिवायला दिग्गु शिंपी काकांकडे गेली की, “हं, वैनी साब, आठ दिवसात देतो जी.” हे ठरलेलं वाक्य पान खाऊन लाल झालेल्या तोंडातून बाहेर पडे. नवीन, वेगळे कांही शिवायला सांगितले की, “शिंपी चुकला मापात, फॅशन आली लोकात,” ही म्हण हमखास खरी असल्याचा प्रत्यय देई.
तावून सुलाखून मिळे झळाळी हेच नशीबी सुवर्णाच्या,
अरुण सोनारची पाहून कलाकृती नजरा न हटती सर्वांच्या ||
अरुण सोनार काकांचा तोरा आणि वट वेगळीच होती. नाजूक नक्षीकाम केलेले दागिने भडक गुलाबी रंगाच्या पातळ कागदामध्ये हळुवार हातानी ठेवून समोरच्या ग्राहकला देताना त्यांचा चेहरा आनंदाने सोन्यासारखा उजळायचा. कोयरीचे, चिमणीच्या पायाचे डिझाईन असलेले पैंजण असू देत किंवा हळद – कुंकू साठी करंडा, कोयरी असुदे, निरांजन जोड असुदे किंवा नथ, चमकी, अंगठ्या असू देत दागिने पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाही.
फ़िरत्या चकावर देऊन आकार, अग्नीत भाजतो मडक्याला,
पूजा असो अथवा अंत्य विधी मडके तयार विधीला ||
ओल्या मृणेला वेगळे, वेगळे आकार देऊन भट्टीमध्ये भाजून तयार केलेली भांडी; तर्जनीची घडी करून टक, टक आवाज करून पक्की भाजल्याची खात्री करून देणारे बसप्पा कुंभार काका पावसाळ्याव्यतिरिक्त नेहमी कामात मग्न असतं. त्यांच्या कलाकार हातातून मातीची खेळणी, छोटी – मोठी मडकी, खरकटी भांडी विसळण्यासाठी मंदाणं, तुळशी वृंदावन, रंगीत नागाच्या मूर्ती, गौरीच्या मूर्ती, बैल जोडी, हत्ती, घोडे, चूल, शेगडी, संक्रांतीसाठी सुडकी आणि असंख्य कलाकृती निर्माण होतं असतं.
मृत प्राण्यांचं लेदर घेऊन वस्तू बनल्या छान,
कलाकृती निर्मितीचा महादू काकांनाच मान ||
रेशमी धाग्याने सोनेरी गोंडे लावलेल्या छोट्या, मोठ्या लालसर करकर वाजणाऱ्या नव्याकोऱ्या चपला, विक्रम वेताळच्या कथेमध्ये विक्रम राजाच्या पायात असतात तशा मोजड्या, सपाता, छोटी – मोठी पाकिटे, पिशव्या, चामड्याच्या बॅगा, बैल, गाई, म्हशींच्या गळ्यात बांधायचे पट्टे या आणि अशाच असंख्य चामड्याच्या वस्तू आकर्षक पद्धतीने मांडणी करून ठेवणारे महादू काका चांभार हसत मुखानं अभंग गुणगुणत कामं करताना दीसत.
म्हादू काकांच्या घरी लाकडी फ़ळीवर ओळीने मांडलेले पितळेचे पेले आणि लोटे सोन्यासारखे चकचकित दीसत. घरापुढे शेणाने सारवून शुभ्र रांगोळी रेखाटलेली असे. “म्हादू काका, आमच्या गाईसाठी घुंगरू लावलेला पट्टा आणि लाल्यासाठी गळ – पट्टी पाहिजे,” रश्मीने, विनिताचा हात पकडून मैत्रिणीच्या दरात उभीराहून घुंगुराच्या पट्ट्याकडे बोटं दाखवून मागणी केली. “आयो, वैनीसाब तुमी आलायसा ❓️ या जी. बसा जी” म्हणून बाजूच्या बाजेकडे हात करून बसण्यासाठी म्हादू काका आग्रह करू लागले. “इमले पानी आन. तुझी मैतरणी आलिया बघ”.
रश्मीला विमलच्या घरातील स्वछता आणि टापटीप पाहून नुकत्याच शिकलेल्या “तू तर माझ्याही पुढे गेलीस,” हा रेव्हरंड ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळकांचा मराठी पुस्तकातील धडाच आठवला.
स्वच्छ कपडयांना देती घडी करून नीट,
इस्त्रीचा हक्क कोणाला ❓️ फक्त सुंदा अन सदू परीट ||
कितीही मळलेले कपडे, चादरी, वाकळा, जाजम, सतरंजी, रजाई असोत सदू आणि सुंदा या परीट जोडप्याच्या हातात गेले की त्यांना आपटून, धोपटून, भट्टीत घालून लक्ख धुवून आणि इस्त्री करून घरी आणून देत. त्या कपडयांना असलेल्या विशिष्ट कोळश्याच्या निखाऱ्याचा सुगंध आणि उबदारपणा शरीर अन् मन सुखावत असे. सुगंधा किंचित फाटलेले कपडे बेलालुमपणे शिवत की, कोठे फाटले होते ते शोधून सुददा समजत नसे ज्याला आपण आधुनिक काळात रफफू संबोधतो.
गुरव/ भटजी गावदेवाची पूजा करून अभिष्टचिंतन, धार्मिक विधी, सोळा संस्कार करण्याचे कामं करत असत.
गाव पहारेकरी, सफाई दूत, जमीन लवाद, गावची सुरक्षा हे धाडसी लोकां द्वारे केले जाई..
केस कापणे, जवळ काढणे, सांधे जोडणे, मालिश करणे, चंपी ई. साठी संतू न्हावी असे.
साधारणपणे सर्व लोक आपल्या कामात तज्ज्ञ असतं. घराण्यातील परंपरेने चालत आलेल्या कामामध्ये चांगली भर टाकून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असे.
आता हे सारे इतिहास जमा झाले होते. काहींनी मात्र आपल्या छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करवून मोठया प्रमाणात वस्तू अन रोजगार निर्मिती केली होती. घरगुती व्यवसायाचे मोठ्या दालनात रूपांतर केले तर कांहीच्या व्यवसायाचे खेड्यातून शहरात स्थलांतर झाले होते. केस कापण्याची स्टाईल, मॉलिशची पद्धत, फॅशन डिझाईन ई. परंपरेला आधुनिकतेचा साज चढवून हे व्यावसायिक कलाकार लोकांच्या सेवे साठी सज्ज्य झाले होते.
निसर्ग नियम
बदल हा निसर्ग नियम आहे. तो जेवढ्या लवकर स्वीकारणार तेवढा संघर्ष कमी होणार हे जितके बोलायला सोपे तेवढेच आचरणात आणयला अवघड वाटे.
बदला बरोबर जशा चांगल्या गोष्टी येतात तशा काही जुन्या गोष्टी, रुळलेले विचार आणि रूढीला छेद देणाऱ्या असतात. काही बदल पचनी पडतात काही रुचत नाहीत, आवडतं नाहीत, पचतही नाहीत. आणि इथेच सुरु होतो नव्या – जुन्याचा संघर्ष, वाद आणि त्याचे अपरिहार्य परिणाम. मनाचे शांत सरोवर जसे ढवळून निघते तसा समाजही ढवळून निघतो.
काही गोष्टी नाटक, सिनेमांत ठीक वाटतात. प्रत्यक्ष जीवनात नाही.
तरुण मुले, मुलीं बदलाचं मोठ्या मनानं स्वगत करतात. परंपरेविरुद्ध बंड पुकारतात, आपला मार्ग आपण निवडतात. कुटुंबं, सखे, सोबती यांच्याबाबत “आलात बरोबर तर ठीक, नाही तर मी एकटाच निघालो बदलाच्या वाटेने” हा विचार पक्का करतात. पुढचा मागचा विचार न करता आपला मार्ग पकडून पुढे निघून जातात. हवे तेच करतात. क्रांतीकारी निर्णय हळूहळू समाज स्वीकारत जातो. कारण बदल हा निसर्ग नियम आहे, तो होणारच.
कुटुंबं पातळीवर हम दो हमारे दो, ऐवजी हम दो हमारा एक | इतका मर्यादित विचार होऊ लागला. एकाचं गावात राहून न भांडता, न झगडाता भाऊ, भाऊ वेगळी कुटुंबं थटून राहू लागले. जवळ राहून, दुरावा ठेवण्यापेक्षा ठराविक अंतर ठेऊन गोडवा शोधू लागलेली कुटुंबं व्यवस्था आणखी मजबूत दिसू लागली. गरजेला एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे कुटुंबीय दूर राहून जळीक साधत होते. रेशमी बंध मजबूत ठेवून बदलाचा अंगीकर करत होते.
लव्ह मॅरेज समाज मान्य झाल्यात जमा होते. आता अंतर जातीय आणि धर्मिय विवाह झाला हे ऐकून अचंबित वाटत नसे. उलट त्यामध्ये आधुनिकतेचा साज दिसे.
दुसऱ्यांच्या भावानांचा, जाती, धर्माचा, कामाचा आदर केला जात असे.
परंतु कांही ठीकाणी आधुनिकतेच्या नावावर नात्यांची चिरफाड पाहवत नसे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर “स्वान्त सुखाय अन् पर दुःख शीतलम” ही नवीन म्हण तयार झाली होती. त्याचा पहिला बळी असे कोवळी लहान मूले.
सिनेमा नाटकामध्ये हिरोची भूमिका करणारे नट जेव्हा सिगरेट शिलगावून धूर सोडतात, घराचा बार करतात, एक्सट्रा मॅरीटल अफेयरचं उदात्तीकरण करतात तेंव्हा समाजमन आणि कुटुंबं व्यवस्थेवर पहिला घाव पडतो.
कांही ठिकाणी कट्टर विचारपंथी सगळेच आधुनिक बदल मोठ्या मनाने स्वीकारताना दिसतं नसत, तिथे हमखास संघर्ष असे. विचारात, आचारात असलेला संघर्ष कुटुंबच नव्हे तर समाजमन ढवळून कढत असे.
आधुनिक बदलामूळे आणि तो बदल आंधळेपणाने जसाच्या तसा स्वीकारण्यामूळे कुटुंबं व्यवस्था ढवळून निघते, या गोष्टी नवीन नाहीत. त्या त्या वेळी त्या त्या कुटुंबाने, समाजाने खूप भोगलंय.
असे बदल झाले आहेत, होतं आहेत आणि होत राहणार हे त्रिवार सत्य. करणं बदल हा निसर्ग नियम आहे. तो होतच राहणार हे त्रिवार सत्य आहे.
👣👣 काळाची पाऊले -1 👣👣‼️
शामा डिग्री कॉलेजला जाणारी शहाण्णव कुळी मराठा, पाटील कुटुंबियांतली मोठी गोड आणि सुंदर मुलगी. शामाचे गांव निमशहरी तालुक्याचे असले तरी सर्व लोक नावानिशी सर्वाना ओळखत होते. श्रीमंत आणि तालेवर घराणं होतं शामाचं. पाटीलांकडे नांगर जाऊन आधुनिक ट्रॅक्टरचा बदल सहज स्वीकारला गेला. बैलगाड्या, घोडे जाऊन दोन चाक्या गाड्यांचा स्वीकार केला गेला. बायकांच्या डोकयावरचा पदर खांद्यावर आला होता. मुलींचे खूपच लाड करणारे उच्चविद्याविभूषित आणि आधुनिक बाबा, शिक्षण संस्थेद्वारे शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करत असलेले काका आणि आत्या सारेच आधुनिक होते.
रोज इस्त्रीचे कपडे घरपोच करणाऱ्या देखण्या सुदीपवर शामा भाळली. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानक एके दिवशी हिरवी जरिकाठी साडी नेसून, काळ्या मण्यांचं मंगळसूत्र, कपाळाला भलं मोठं कुंकू लावलेली मुलगी ही शामा आहे हे डोळयांतून डोक्यत जाईपर्यंत वेळ द्यावा लागला. गळ्यात फुलांचा हार घातलेले शामा ♥️ सुदीप हातात हात घालून बंगल्याच्या गेट मधून आत पाऊल ठेवले तेंव्हा संपूर्ण पाटील कुटुंबीय “तो सुदीप कुमार का, आवडला आमच्या शामा कुमारीला,” असं म्हणण्याच्या स्थितीत बिलकुल नव्हते.
तालेवर पाटील कुटुंबियांनी शामा – सुदीपला मोठ्या मनाने स्वीकारलं का ❓️
की त्यांच्या पुढे प्रश्न होते ❓️ शामाची बहीण अमीचा विवाह कसा होणार ❓️ समाजा मध्ये उजळ माथ्याने कसे फिरणार ❓️ कामाच्या ठिकाणी प्रश्नांना आणि नजरानां काय उत्तर देऊ ❓️ प्रश्नांची मालिका लांबतच होती.
👣👣 काळाची पाऊले – 2 👣‼️
शिक्षक ही समाजाची सुधारित अवृत्ती. आधुनिकतेचा ध्यास आणि सुधारणांची आस घेऊन गांव, खेड्यातून शिक्षणाबरोबर समाज प्रबोधन करणारी समाजाचा विश्वास संपादन केलेली मंडळी. सदा गुरुजी म्हणजे गावची आन, बान, शान. शाळेतील मुलांवर संस्कार करता, करता सदा गुरुजी स्वतःच एक चालता बोलता संस्कार-वृक्षच बनले होते. सदा गुरुजींची शिस्त कडक होती पण मन प्रेमळ होतं. आई, बायको, मुलगे, मुलीं प्रत्येकासाठी वेगळ्या भूमिकेत असलेले सदा गुरुजी, मुलगा सुजय बाबत जरा जास्तच हळवे होते. सुजयच्या अभ्यासू आणि मेहनती स्वभावाचे गुरुजींना कोण कौतुक. दहावी नंतर आई, वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुढील शिक्षणासाठी सुजयने घर सोडलं. सुरुवातीला असणारी घर, आई, बाबा, भावंडांची ओढ अभ्यासाच्या धाबाडग्यात पातळ झाली. शेवटची परीक्षा देऊन नोकरीच्या शोधात असणारा सुजय मोठया सुट्टीच्या कालावधीत घरी परतलाच नाही. वडील, सदा गुरुजींना यात वावगं काहीच वाटले नाहीं.
वाऱ्यावरून उडत उडत बातमी गुरुजींना मिळाली तेंव्हा खूप वेळ झाला होता. सुजयने नोकरीच्या ठिकाणी गावकुसाबाहेर राहून गावची सफाई करणाऱ्या सोमा बाईची मुलगी शिला या वर्ग मैत्रिणीशी विवाह करून संसार थाटला होता.
👣👣काळाची पाऊले – 3👣👣‼️
दीपांकरच बोलणं ऐकून मित्र हेमंत
चांगलाच चिडला होता.
“अरे ये दिप्या, तुला काही संस्कार बिंस्कार आहेत की नाहीत ❓️ सोन्यासारखी बायको, नक्षत्रसारखी दोन मुलं, दृष्ट लागेल असा भरला संसार आहे तुझा. सुखाने राहायचं सोडून ही काय अवदसा आठवली तुला❓️ सुशिक्षित आहेस ना तू ❓️ सोड तिचा नाद. काय पाहिलंस तिच्यात ❓️ अक्कल गहाण ठेवलीस काय मित्रा❓️ वहिनीचा केवढा विश्वास, केवढं प्रेम आहे तुझ्यावर. तू सुरुवातीपासून छाचोर होतास. पूर्वीपासून नोकराणी बरोबरपण लफडी होती तुझी. पण रिया वहिनी भेटल्या आणि तुझी लाईफ स्टाईल ट्रिमेंडस बदलली. दारू🍸🍷, सिगारेट🚬🚬,, 🧑🤝🧑 लफडी सारे एकदम बंद केलंस. तू एक आदर्श पती आणि पिता दोन्ही भूमिका उत्तम निभावताना पाहिलंय तुला. तुझा, आम्हा मित्रांना हेवा 🤭वाटायचा. पण हे काय करून बसलायस ❓️” हेमंत आपला मित्र दिपांकरशी पोट तिडीकेनं बोलत होता. आपला मित्र परत पूर्वीच्या वाईट वळणावर पोहचल्याचे पाहून मित्र हेमंतचा जीव तुटत होता. दिप्याचा नोकरांणी, निम्मी बरोबर असलेल्या संबंधाची चर्चा सोसायटीची हद्द ओलांडून बाहेर पसरली होती. मांजर 🐈 डोळे झाकून दूध🥛🍼 पीतं तसं दिपांकर वहिनीच्या मागे घरी साफसफाईच कामं करणाऱ्या निम्मिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याचा व्यवस्थित आर्थिक🫓 फायदा उठवत, निम्मिने दिप्या शेठला चांगलच नादाला लावलं होतं.
आज अचानक दिप्याने फोन करून हेमंतला हॉटेलमध्ये चहासाठी बोलावलं होतं. चहा पिताना हेमंतचा मित्र दिपांकर जे बोलला ते ऐकून मित्र हेमंतच काय कुणीही अशीच आक्रमक प्रतिक्रिया दिली असती.
आता दीपांकरपासून गर्भवती राहिल्याच सांगून नोकरांणी निम्मिनं लग्नाचा विषय काढून दिपांकर शेठची राणी बनू इच्छित होती. दिपांकरला बायको रिया आणि मुले रवी, शशी पासून लवकरात लवकर सुटका हवी होती. लंगोटी यार हेम्याला अर्जंट भेटायला बोलावण्याचं, दिप्यान सांगितलेलं करणं ऐकून, खुर्चीत बसल्या ठिकाणी हेम्या चेतनाहीन झाला.
बदल बदल बदल बदल बदल बदल
असे बदल चटकन अंगीकार करणारे शहर आणि बदलाने प्रभावित होणारा त्यां शहरातला तरुण राजेश, रश्मीचा जीवन साथीदार बनणार आहे.
नव्याचा स्वीकार करताना काही जुन्या विचारावर ठाम असलेली रश्मी आणि ‘जुने जाऊ द्या मारणा लागुन, जाळूनी किवा पुरुनी टाका’, म्हणणारा राजेश…. खरोखर एकमेकाला अनुरूप आहेत का ❓️ पूरक आहेत का ❓️ आपल्याला काय वाटतं ❓️आपले अभिप्राय अवश्य नोंदवा 🙏😊
ranjanarao.com site वर वाचनासाठी उपलब्ध साहित्य…🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAUl5
story time : https://bit.ly/2Z1r33u
poems : https://bit.ly/3lP8OI4
कृपया आपले अभिप्राय, टिकत्मक परीक्षण, सूचना, सिरीयल मधील पात्रांबाबत आपले विचार कॉमेंट बॉक्स मध्ये शेअर करा, जेणे करून पुढील रचनात्मक निर्मितीसाठी उपयुक्त ठरेलं.🙏🌹