“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…
भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई;  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण..
भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या  कुसुमताईच्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….
भाग – 5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते  🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…  
भाग – 6* रश्मीच्या आईबद्धलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं विध.. … सदृश्य जीवन. 
भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सारं अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8* आईचं मानस-दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण  
भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?
भाग – 10 * साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो-खो, तुळशी वृन्दा वृंदावन आणि राजू, गावदेवाच्या मंदीरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश; रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11 * मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12*  सुचिताची  प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कसं टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का ? चंदाला आकाशात काय दिसले?  
भाग -13*  रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते? 
भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी? काका आजोबांचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना का भेटली? सरानी पेढे का मागितले?  
भाग -15 *   वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतकं सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत? 
भाग-16*   विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? 
भाग – 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते? पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? कुसुमताई,  सर,  मामी, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी  कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? 
भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न
भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮 फिरकी? अतरंगी😂 बंटी  
भाग – 20   कोणाची परीक्षा? कोण होता मोनादादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? 
भाग – 21* विनिताच नेमाकं काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  
भाग – २२ * रश्मीच नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग – 23 * कॉलेज, जीम, रक्तदान, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ
भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच भाग – 25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉंड , महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ.. भाग – 26, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27 *  नेत्राने उपोषण का केले ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली? काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं? भाग – 28* 👉  आंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे? महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी, सुकलेलं बकुळफ़ुल
भाग – 29 * सुकलेलं बकुळफुलं पार्ट – 2,  दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…,  प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक,  राम नाम….,  मदर तेरेसां 🌷,  डॉक्टरांसाठी शिबीर,  तुम्ही  कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर ?   गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी. 
भाग – 30*  वा च न,   जिओग्राफी टीचर,  नाटक,  गाणं,  सावध मनाची मदत,  गुरु तारी त्याला कोण…. ?   भेसू .. रश्मी,   रश्मीची केरळ ट्रिप,  “तेथे कर माझी जुळती…🙏”
भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी.. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकलमधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्कस् , मेरिट एव्हडे महत्वाचे ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️

“ती…….”❓️

विनिताची जिद्द कोणात उतरली असेल तर तिच्या “या” मुलीत. कला गुणांचा खजिना मिळालाच होता “तिला”. “तिचा” हजर जबाबीपणा सर्वश्रुत होता. जीवनाकडे हसत – खेळत बघण्याचा दृष्टीकोन “तिच्या” सहवासात येणाऱ्या कोणालाही आनंदच प्रदान कारीत असे. जीवनाबाबत असणाऱ्या “तिच्या” सकारात्मक दृष्टीकोना मूळे “तिच्या” सभोवताली स्वयंप्रेरित चेतनादायी वातावरणाची निर्मिती होत असे. अशी ही छोटी वाटणारी, चुणचुणीत मुलगी, एकदम जबाबदार गृहिणीच्या रूपात पाहून रश्मीला प्रश्न पडला ❓️
नशीबवान या शब्दाचा अर्थ “तिच्या” कडे पाहून कळावा.
जीव लावणे म्हणजे काय ❓️ हे “तिच्या”कडून शिकली रश्मी. भक्कम आधार कसा असावा❓️ हे “तिनं” स्वतःच्या वागण्यातून दाखवून दिले. जबाबदारी कशी पेलावी❓️ हे “तिनं” स्वतः उदाहरण घालून दिले. स्वतः आनंदी राहून, आनंद कसा वाटावा❓️ हे फक्त “तिच्या” कडूनच शिकावं करण “तिला” ते अगदी सहज जमतय. आलं अंगावर तर शिंगावर कसं घ्यावे हे “तिला” चांगलचं माहित आहे. अरे ला, का रे ❓️ म्हणायची हिंम्मत “तिच्यातच” आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी, ही म्हण कुठे वापरायची “तिलाच” माहित आहे. मऊ मेणाहुनी आम्ही… म्हणायला “तिच” समर्थ असे.
“तिच का ही लाडोबा❓️” इतकी समजूतदार, इतकी जबाबदार ❓️ आणि इतकी स्वयंसिद्धा ❓️” रश्मीला स्वतःच्या डोळ्यावर विश्वस वाटेना. पण हे सत्य होतं. अगदी सूर्यप्रकाशा ईतकं सत्य.
एखाद्या मुलीला स्थिर आयुष्य जगण्यासाठी काय हवं असतं आयुष्यात❓️समजूतदार, प्रेमळ जोडीदार. आणखी काय ❓️ समजूतदार अन प्रेमळ जोडीदार. आणखी काय हवं असतं? समजूतदार अन प्रेमात न्हाऊ घालणारा जोडीदार‼️ दोन्ही कुटुंबाना जोडणारा ब्रिज. दोघांना पण कमी अधिक प्रमाणात ऍडजस्ट व्हावं लागतंच. दोन जीवांबरोबर कुटुंबाना जोडायची संधी देणारा प्रसंग.
बालपणापासूनचे असंख्य प्रसंग रश्मीच्या मनात फेर धरू लागले.
स्वतःच्या हातानी बनविलेल्या गरम, गरम पुरणपोळ्या, आई विनिता प्रमाणे आग्रहाने आणि प्रेमाने रश्मीला वाढून घरी बनवलेल्या ताज्या तुपाची धार पोळीवर धारणारी “ती” त्या दिवशी वेगळीच दिसत होती. मेंदी रंगाची साडी, कपाळावर लावलेली ठसठशीत मरून रंगाची टिकली, हिरव्या रेशमी बांगड्या आणि गळ्यातील मंगलमणी हे अनोखे नवे रूप मनात साठवून अगदी तृप्त मनाने रश्मी निघाली होती.
“डोळे मोठे करून, दोन्ही हात लांब पसरून, अक्का आज मी इतका मोठा पिवळा साप पहिला” म्हणून एकाच वेळी आश्चर्य, कौतुक आणि भीती हे भाव डोळे आणि चेहऱ्यावर दाखवणारी, आकाश दर्शन, शिवाजी महाराजांवर लेक्चर, प्रेमाने मुलांचे कान पकडणे असू दे की, मुलाना बरोबर घेऊन नाटक बसवणारी, ऐतिहासिक स्थळ आणि भौगोलिक गोष्टी मुलांना दाखवणारी, नृत्य बसवणारी, आपल्या छोट्या बहिणींची काळजी घेणं असुदे, रश्मीच्या पायात काटे मोडलेले पाहून हैराण होणारी नजर, इंद्र धनुष्य🌈 पाहून स्वतःच स्वछंदपणे गाणं रचून ते गाणं गात 💃 नाचणारी, आणि कामवाल्या बायकांनी चिडवलं म्हणून त्यांना “बाईंनीच्या, बाईंनीच्या, बाईंनीला” म्हणून अर्थ माहित नसताना शिवी हसडणारी छोटुकली आज स्वतःच्या संसारात चंद्रा ⚪️ बरोबर रममाण झालेली रोहिणी 💫 वाटली रश्मीला.
मनाने प्रेमळ आणि वृत्तीने उदार, मूर्ती लहान, विचार आणि कृती महान असलेल्या या विनिता आईच्या काळजाच्या तुकड्याने संसाराचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. असा हा नेटका; आनंदी संसार पाहून रश्मी मनभर आनंद घेऊन निघाली.
एक सुखद लहर सर्वांगावर लेऊन रश्मी जेव्हा बसमध्ये बसली तेंव्हा, तिच्या गालावरून वाहणाऱ्या अश्रुंची चव गोड वाटली जिभेला आणि प्रसन्न वाटले मनाला.
“रश्मी, तुझ्यासारखी एक बहीण मला पण हवी होती.” हे होस्टेलमधील मैत्रिणी जीत, गीत, रोजचे वाक्य फिके वाटावे इथं. फक्त प्रेमाची उधळण करणारी “ति”ला या साऱ्यांनी पहिली नव्हती म्हणून असं बोलू धजल्या.
रश्मी पासून “तिचे” दूर जाणे उदासवाणे वाटले रश्मीला. “तीला” किती गृहीत धरत होती रश्मी, याची जाणीव झाली रश्मीला. किंबहुना तिच्या दूर जाण्यानंतरच रश्मीला तिचं जवळ असण्याचे महत्व समजले असे म्हंटले तर वावगे ठरवू नये. परंतु तिच्या सहवासातील प्रत्येक क्षणाची आठवण पुनश्च्य आनंद देऊन गेली. आता तिच्या आनंदापुढे बाकी सारे नगण्य होते. “ती”च्या कडून निघताना सकारात्मक ऊर्जा ✴️ घेऊन; आल्या 🚶वाटेने परतली 👣रश्मी.

कोणाला भेटायचा आग्रह ❓️

“तुम्ही एकट्याच घरापासून, आपल्या माणसांपासून खूप दूर राहत आहात. त्यात होस्टेलवर रुटीन चेकिंगसाठी पोलीस येऊन गेले. तुम्हाला रिपोर्टींगसाठी रात्री एकटीलाच पोलीस स्टेशनंला जावे लागले. टाईफाईड होऊन बरा झल्यानंतर पुन्हा टाईफाईड झाला. जवळपास कोणी ओळखीचे नाही. काही अडचण आली तर, कोणी मदतीला नाही. हे काही ठिक नाही.” संगीत सर पालकत्वाच्या भूमिकेतून तळमळीने बोलत होते. रश्मी टिचर आता वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या जॉबला जॉईन झाली तरी, संगीत सर मदतीसाठी नेहमी तयार असत. ते सर बऱ्याच वेळेस आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रमासाठी येत असतं. जमेल तेंव्हा उभ्या, उभ्या का असेना भेटून रश्मीची ख्याली खुशाली विचारून आल्या पावली परत जात. आपल्या व्यस्त कामातून खास वेळ काढुन, सरांनी दिलेली धावती भेट पण रश्मीला दिलासा देऊन जाई. विज्ञान संस्थेत एकत्र काम केल्यामुळे तेथील सर्व लोकांबरोबर रश्मीचा एक बंध निर्माण झाला होता. त्यापैकी एक म्हणजे, संगीत सर. सरांकडून अजूनही त्याच पद्धतीने मदतीचा हात पुढे येई.
बोलत, बोलत रश्मी आणि सर एका कँ कँटीनमध्ये पोहोचले. विज्ञान संस्था, स्टाफ, मूले प्रोजेक्ट ऑफिसर्स, अशा बऱ्याच गोष्टींची खुशाली त्यांच्या बोलण्यातून कळे. संस्थेत होत असलेले बदल आणि बदलांचा परिणाम पाहून रश्मी विचार करत राही.
“मी तुम्हाला एका व्यक्तीची ओळख करून देतो. सुहासचे चांगले मित्र आहेत ते” संगीत सर बोलले.
“सर, इथे रेक्टर काका, काकू आणि खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. त्या माझी शिवानी दीदी, चंदा, सईसारखीचं काळजी घेतात.” रश्मी, सरांना आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत होती.
“हं, तरीच: पारवा रेक्टर काकू, रूम पार्टनर परम : “सुहास का ससूर, असं काहीतरी बोलत होत्या.” रश्मी स्वतःशीच पण जरा मोठ्याने बोलली.
“अनोळखी शहरात, कोणी ओळखीचे असेल तर चांगली गोष्ट आहे. का❓️ केव्हा❓️ कुठे❓️ कशी❓️ गरज लागेल सांगता येत नाही.” समजावणीच्या सुरात सर बोलले.
“सर, तुमची सून सुहास ; त्यांना मी पहिले नाही अद्याप. कशा आहेत त्या❓️ रेक्टर काकू सुहासजीना कशा ओळखतात ❓️” प्रश्न विचारला रश्मीने. तेवढ्यात चहावला चहा घेऊन आला आणि बोलणं मध्येच थांबलं. चहा घेता घेता रश्मी पुढील विचारात गढून गेली.
रेक्टर काकूंची नाराजी, सरांचा आग्रह यात कांही तथ्य होते का ❓️ त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल कदाचित. भेटू पुढे केव्हातरी म्हणून इकडच्या तिकडंच्या गप्पा करताना बराच वेळ गेला. सर आपल्या कामासाठी निघून गेले. रश्मी आल्या वाटेने परतली.

चार महिने झाले येऊन. विज्ञान संस्थेत जाऊन मुलांचा राहिलेला पोर्शन शिकवायचा होता, परीक्षेसाठी तयारी करून घायची होती म्हणून शनिवार, रविवारी इतर कोणतेच प्रोग्राम ठेवले नव्हते. पण आता परीक्षा संपल्या होत्या. ‘आता काय करावे आज❓️’ सुट्टी असली की प्रश्न पडे. सई आणि विनिता आईला भेटायला हवे पण कसे ❓️ जायला बारा तास, परत यायला बारा तास. विचारात रविवार गेला. सोमवारी नेहमीसारखी ऑफिसला जाऊन आऊट डोअर ड्युटीसाठी निघाली रश्मी. दिवसभरच्या कामात साऱ्या गोष्टी बाजूला राहत. आज पण तसेच झाले. बाहेरची सर्व कामं उरकून संध्याकाळी जेव्हा कार्यालयात पोहोचली रश्मी तेंव्हा फोनवरून प्राप्त झालेले काहींचे निरोप मिळाले. टेबलवर ठेवलेल्या टपालातील एका पत्राने रश्मीचे लक्ष्य वेधून घेतले. दिवसभराचा शिणवटा क्षणार्धात गायब झाला आणि चेहऱ्यावर हसू फुलले आणि रश्मी सदा्फूलीसारखी टवटवीत झाली. ” हं ‼️ क्या बात हैं रश्मी ❓️ किसका लेटर हैं❓️ लेटर पढा नाही तो, इतनी खुश ‼️ पढने के बाद क्या होगा ❓️” बेबी मॅडम वॉशरूम मधून फ्रेश होऊन स्वतःच्या टेबलकडे जाता, जाता रश्मीकडे पाहत बोलल्या. कित्तेक दिवसांनी, “त्याच्या” हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र मिळाले होते. आतले हळद कुंकूने रेखाटलेलं स्वस्तीक अस्पष्ट असलं तरी रश्मीला शुभ संदेश देऊन गेलं. “आग, ए रश्मी कुठे हरवलीस ❓️ रश्मी बेबी मॅडमनी तुलाच साद घातली.” सियानं रश्मीच्या खांद्यावर हात ठेवतं प्रश्न केला. “ओह, सॉरी, अगं सिया, बातमीचं इतकी आनंददायी 😊 आहे की, मी आता लगेच विनिता आईच्या माहेरी पोहोचले बघ. मावशीच्या मुलाचं लग्न आहे आणि ते पण आजोळी. भावाचं लग्न, ते पण याच महिन्यात ‼️” रश्मी; सिया आणि कार्यालयातील इतर महिला मंडळीना उद्धेशून बोलली.
“अरे वा❗️ आता नाही तरी तुला फिल्डवर काम नसणार आहे या महिन्यात. रजा घेऊन, लवकर निघ तू, लग्नाच्या निमित्ताने सर्वांची भेट होईल. पाच महिने झाले जॉईन होऊन. एकदा पण भेटायला गेली नाहीस आई, बहिणीला. त्यांना खूप आनंद होईल”. सुमा बोलली

“बाजूच्या कार्यालयातून पर्स अडकवून निघालेल्या चौघीचं टोळकं दारातून रश्मीला आठवण करून देत होतं, “रश्मी, उद्या पावभाजी खायला बाहेर जायचं आहे, तूच ठरवलंस विसरू नकोस. कोठेही असलीस तरी दुपारी एक वाजता नेहमीच्या ठिकाणी पोहोच हं” उज्जू आणि तीर्थानं एकाचवेळी सूचनावजा आदेश दिला.
त्याचं वेळी शिपाई निरोप घेऊन आला आणि रश्मी डायरी, पेन घेऊन साहेबाना भेटायला केबिनकडे निघाली.
“ओह, नो रश्मी, उद्या महत्वाचे काम आहे असं म्हणू नकोस हं. ही तिसरी वेळ असेल. स्वतःच पुढाकार घेऊन बाहेर जाऊन खाण्याचा प्रोग्राम बनवते आणि स्वतः येत नाही.” अनिशाने नाकातून बोलत नाराजी व्यक्त केली.
“अगं अनिशा, मला आजचे रिपोर्टींग करू दे. साहेबांनी बोलावलं म्हणजे कांही महत्वाचं कामं असेल ना.” केबिनकडे वळत रश्मी बोलली.
रश्मीने काही मुद्दे डायरिमध्ये नोंदवले आणि त्या दिवशीच्या कामाचे रिपोर्टींग करून निघाली.
पावणे सहा होऊन गेले होते आणि सगळेजण निघण्यासाठी फाईल्सची आवराआवार करत होते. बॅगेत डायरी ठेऊन, टेबलवरील महत्वाच्या केसीस, फाइल्स कपाटात ठेवल्या. फ्रेश होऊन आली रश्मी. खांद्याला बॅग अडकवून रश्मी इतरांबरोबर बाहेर पडली.
“पिपाणीचे 🎷🎷सूर🎵🎵 आज खुश दिसतात❗️” भूवया उंचावून सावंत बोलले तसा त्यांचा मित्र किशन ने टाळी दिली.
“आजचं नाही नेहमीच खुश आणि गोडं असतात पिपाणीचे सूर” रश्मी हसत उतरली. “अरे, त्या आईला भेटायला निघाल्यात ना. खुश तर असणारच” वाघे बोलले.
“म्हणजे सर्वाना समजले, मी गावी जाणार ते ❓️”रश्मीने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटवत विचारले.
“भाई की शादी मे जाना हैं❗️ मतलब रश्मी खुश तो होगीही | बेबी मॅडम बोलल्या. बोलता बोलता सारेजण आता मुख्य रस्त्यावर आले. कलिंगडच्या लाल भडक फोडी काळ्या बियांचे 🍉🍉🍉टिपके लेवून ओळीने बसल्या होत्या. कापलेल्या रंगीबेरंगी फळांच्या डिश🍊🍏🍐🍈🍇, काचेच्या ग्लासमध्ये वेगवेगळ्या रंगाचे 🍟🍟ज्यूस, कांदा, बटाटा भजी, वडा-पाव, पाणी-पुरी, आईस्क्रीम 🍧🧁🍧🍦🍦आणि वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या गाड्या, शहाळे, रंगीबेरंगी सरबत, चहा खाण्या – पिण्याच्या पदार्थांची रेलचेल होती. पुस्तके📄📗📖📕📑📜, मासिके, न्यूजपेपर्स, अगरबत्ती, धूप, लॉटरी स्टॉल इत्यादी ठिकाणी गर्दी दिसत होती. माणसांचा घरी परतणारा प्रवाह – वाहक रस्ता, ओसंडून वाहत होता. रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची खूप झाडे 🏝️🏖️🏕️🏜️🥦🌴🥀लावलेली हाती आणि जतन केलेली होती. प्रचंड प्रमाणात उन्हाळा असला तरी वेगळ्या प्रकारच्या हिरव्या झाडांकडे बघून तप्त उन्हाची प्रखरता दुपारच्या वेळीसुद्धा कमी जाणवायची. रश्मीला दुपारच्या कडक उन्हाच्या चटक्यांची आणि घामाच्या धरांची आठवण झाली. झपझप पाऊले उचलत माणसांचा प्रवाह वेगाने स्टेशनच्या दिशेने ट्रेनमध्ये लुप्त होण्यासाठी जात होता. वातावरणातील गजबज संध्याकाळ प्रसन्न करत होती.
ही वाहती गर्दीच मुंबईची शान आहे. सतत बिझी रस्ते हे वैशिष्टय प्रेमानं कुरवाळणारी मुंबई जाणत होती, माणसांची गर्दी तिचा प्राण आहे.

मार्कस् , मेरिट एवढे महत्वाचे ❓️

कन्नडमध्ये “सानंद वेड्स सुशा” असे सोनेरी रंगात लिहिलेला बोर्ड मागे लटकला होता. वधू वराना भेटण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. रश्मी खुर्चीत बसून हा आनंद सोहळा पाहत असताना सावी मावशी रश्मीच्या शेजारच्या खुर्चीत बसली. “रश्मी, आमचं मोठं भाऊ अनंत पण असच दिसायचं बघ, सानंदसारखं ❗️आज तेची आठवण येतंय बघ सारखं सारखं.” आपल्यापरीनं बऱ्यापैकी मराठीत बोलण्याला कानडीचा हेल देत मावशीने डोळ्याला पदर लावला. रश्मीला एकदम अवघडल्या सारखं वाटलं.
सावि मावशी ही तिची सगळ्यात कणखर आणि स्ट्रॉंग मावशी होती. सावि मावशीला पहीले की, रश्मीला खळखळून वाहणाऱ्या डोंगर; दऱ्या; खोऱ्यातून स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या नदीचा प्रवाह आठवे. पण आज मावशीला अनंत मामाची प्रकर्षाने आठवण आली. मावशीच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. अनंत मामाच्या आठवणीने भरून आलेल्या डोळ्याना मावशीने पदर लावला. मावशीच्या डोळ्यात अश्रू बघून किंचित अस्वस्थ वाटलं रश्मीला.
रश्मीला; विनिता आईने पूर्वी सांगितलेले प्रसंग आठवले. आजोबानी सर्वात मोठा मुलगा अनंत आणि त्याच्या पाठोपाठ गिरीजा, शांता, सावी, विनिता आणि कुसुम या पाच मुलीना जन्म दिला.
कुसुम मावशीला जन्म दिल्यानंतर आजारपण पाठीच लागलं आजीच्या. चार वर्षाची विनिता, दोन वर्षाच्या कुसुम आणि इतर लेकरांकडे पाहत अखेरचा श्वास घेतला आजीने.
घरात कर्ती बाई नाही. मुलांची हेळसांड होऊ लागली. साहजिकच गिरीजा या सर्वात मोठ्या बहिणीवर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. कधी कधी आजोबांना विनिताच्या लांबसडक घनदाट केसांच्या दोन, दोन वेण्या घालताना तारांबळा उडायची. विनिताची कधी खूप सैलसर, कधी एकदम घट्ट, कधी वेडी वाकडी आणि कधीतरी सुबक वेण्या घालायचे आजोबा. विनिताचा अनंत अण्णा हा सर्वात मोठा भाऊ मॅट्रिकला होता. आईच्या अचानक जाण्याने अनंत मामाच्या मनावर मोठाच आघात झाला. मंडळाच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून घरात आजोबानी केलेली आरडा ओरडा झोंबला त्याला. घर सोडून, निघून जाण्याविषयीचे आजोबांचे वक्तव्य जिव्हारी लागले अनंत अण्णाच्या. तरुण सळसळत्या रक्ताने बंड पुकारले. खरोखरचं घर सोडून निघून गेला तो. आईच्या मृत्यूच्या आघातातून सावरण्या अगोदरचं मोठ्या भावाचं कायमचं घर सोडून जाणं; गिरीजा, शांता, सावी, विनिता आणि कुसुम या बहिणींना मिळालेला दुसरा आघात होता. आघाताच्या जखमा वागवत दिवस जातं होते बहिणींचे.

अनंत मामा की, ऍंथोनी मामा?


एके दिवशी दुपारच्या शांत वेळी वाड्याच्या अंगणात खेळणाऱ्या या बहिणींना कसली तरी चाहूल लागली. खुशीने हसायला लागल्या. अंगणात खेळत असताना; कोणता संदेश मिळाला त्यांना… ❓️ आणि तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली. लहानग्या 👯 विनिता आणि कुसुममध्ये दरवाजा कोण उघडणार यावरून चढाओढ लागली. एकाच वेळी दोघी धावल्या, तसा पाठीमागून आवाज आला.
“विनी, कुसुम निवू आडलीके व्होगू. नानू दरवाजे ओपन माडतेने”. सावी अक्काच्या आवाजाने विनिता आणि कुसुम दोघी छोट्या स्टॅच्यू बनून उभ्या राहिल्या.
काही वेळाने सावी आक्काच्या मागे उभे राहून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करू लागल्या.
सावीने समोर जे पहिले ते अविश्वसनिय होतं.
समोर असं कोणाला पाहिलं आणि तोंडातून शब्द फुटेना तिच्या❓️ असं काय पाहिल आक्कानं❓️ म्हणून हळू पावलांनी विनिता पुढे आली आणि मोठा दरवाजा पूर्ण उघडला.
शुभ्र शर्ट, पॅन्ट आणि त्यावर काळा कोट होता. डोक्यावर काळेभोर केस रूळत होते आणि कपाळावर आलेली झुल्पे त्याचा लालसर गोरेपणा उठावदार करत होती. लांब आणि किंचित बाकदार नाकाचा शेंडा लाल दिसत होता. नाकाखाली छोट्या मिशा ठेवल्या होत्या. गाल स्वच्छ दाढी केलेले होते. खालच्या ओठा खालून हनुवटीखाली काळी छोटीशी दाढी दिसत होती. छोटी विनिता डोळे किलकिले करून पाहत होती. समोरची दाडीवाली व्यक्ती प्रेमभऱ्या नजरेने विनिताकडे पहात होती. विनिताला पाहून समोरून आवाज आला, “नन्न सण्ण तंगी, विनिता द्वड आदर.” म्हणून लहानग्या विनिताला उचलायला खाली वाकला आणि गळ्यातील सोन्याच्या चेनमधील सोन्याचा क्रॉस बाहेर आला.
“वळग बन्नीरी अनंत अण्णा,” म्हणून छोटी विनिता अनंत आण्णाकडे झेपवली. आणि पाठीमागून मंजुळ आवाज आला. “अँथोनी, युअर सिस्टर्स आर सोsss क्युट❗️ सोsss लव्हली‼️” म्हणत समोर फ्रॉक घातलेली डॉली 💃 आली. ती खूपच सुंदर दिसत होती. सावीने अनंत आणि त्याच्या बायकोला आत घेऊन दरवाजा बंद केला. ती थोडी सैरभैर झाली होती. घर सोडून गेलेला भाऊ एकदम इतक्या दिवसांनी समोर पाहून आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला सावीला. अनंताने ख्रिश्चन धर्म स्विकराला होता. लग्न करून, अचानक दारात बायकोला घेऊन उभा होता. “घरी बाबा नव्हते म्हणून बरं झालं”, सावी स्वतःशीच बोलली. तिला पूर्वीचा प्रसंग आठवला.
कांही वर्षांपूर्वी असाच अनंत अण्णा दरात उभा राहिला. आपल्या बहिणींसाठी खूप सारे कपडे, खेळणी आणि वडिलांसाठी कोट घेऊन आला होता तो. अनंत अण्णाला आत घेऊन बोलायच्याऐवजी त्याने आणलेल्या सर्व वस्तू बाहेर फेकल्या. आजोबांचे डोळे आग ओकत होते. तोंडातून बाहेर पडलेले शब्द अनंत अण्णाचे आणि बहिणींचे कोमल हृदय दोन्हीवर आघात करत होते. सर्व बहिणी गप्प राहून अश्रू ढाळत होत्या. सगळ्या वस्तू, पिशव्यासहीत वाड्याबाहेर रस्त्यावर भिराकावल्या गेल्या. ” तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो. परत तुझं तोंड दाखवू नकोस,” म्हणून आजोबानी जवळची थंड पाण्याची बादली स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतली खरी, त्यांना त्यातून त्यांच्या तापलेल्या मस्तकाला गारवा मिळाला की नाही हे फक्त तेच जाणत होते. वातावरण बराच वेळ गरम होते आणि साऱ्या प्रकारमुळे साऱ्या बहिणी चिडीचूप होत्या.

सारं आठवत होत सवीला. तिने जुन्या आठवणी मन कप्प्यात ढकलून वास्तवात आली. अनंत अण्णा आणि डॉली वहिनीला बसायला पाट दिले विनिताने.
आत आल्यावर अनंताला आपल्या अतिप्रेमळ गिरीजा आक्काची आठवण आली. त्याने जेव्हा मोठी अक्का, गिरीजा लग्न होऊन सासरी गेली. सर्वात मोठी बहीण गिरीजा लग्नानंतर वर्ष पूर्ण होण्याअगोदरचं गरोदरपणात मारून गेली,
हे ऐकलं तेंव्हा बसलेला धक्का खूप मोठा होता. आपली अक्का म्हणजे मूर्तिमंत प्रेम होतं. ती आपल्या भावंडांवर प्रेम करायची आणि लाड पण करायची. तिच्या अशा जाण्याने बसलेला झटका इतका भयानक होता की तो स्तब्ध झाला काहीवेळ. तो उठून न्हाणी घरात गेला. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले तेंव्हा बरे वाटले त्याला.
गिरीजा अक्काचे अचानक जाणं आजोबांना आणि या साऱ्या बहिणींना बसलेला खुपमोठा शॉक होता. लहानग्या विनिता आणि कुसुमला जिव्हारी लागलं, गिरीजा आक्काचं जाणं. त्यातून सावरतांना झालेली सर्वांची तारांबळा सारे समजले तिच्या अनंत अण्णाला. सावी मावशीने परिस्थिती समजूतादारपणे हाताळत, आल्या प्रसंगाचा सामना करू लागली होती हे पण जाणवले तिच्या अनंत अण्णाला. घरच्यांचा आधार बनलेल्या सवीला आधार देऊन अनंत उर्फ अँथोनी निघून गेला. मध्ये कधीतरी आजोबा नसताना बहिणींना भेटून जायचा. आजोबांना कधीतरी याचा सुगावा लागला आणि त्याचं येणं बंद झालं. विनिताच्या मनात लहानपणी आपल्या मोठ्या डोळ्याद्वारे मनात उतरलेली रुबाबदार अनंत अण्णा आणि बाहुलीसारखी फ्रॉक घालणारी डॉली वहिनीची छबी कायम कोरली गेली. अनंत की ऍंथोनी हा प्रश्न पडला नाही. विनितासाठी तो फक्त तिचा अण्णा आहे हेच सत्य होतं. कित्त्येक वेळेस तिच्या डोळ्यात त्याच्या भेटीची आस दिसें. आज सावी मावशीला पण प्रकर्षाने तिच्या अनंत उर्फ अँथोनी भावाची आठवण आली होती.
विनिता आई बऱ्याच वेळी सणावाराला रश्मी, चंदा, सईला आरती ओवाळल्यानंतर रश्मीच्या मिरा, सूची, शिवम आणि इतर भावंडाना आणि तिचा स्वतःच्या बहिणींच्या सावी, कुसुम या नावांबरोबर अनंत उर्फ अँथनीच नाव घेऊन औक्षण करून अक्षता उधळायची. अक्षता टाकून, “जगाच्या पाठीवर कुठे असेल तिथे माझा भाऊ आनंदी असू दे ❗️,” हे तिच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द स्पष्ट ऐकू यायचे.
रश्मीला प्रश्न पडला आपल्या अनंत उर्फ ऍंथोनी मामाला त्याच्या विनिता आणि इतर बहिणींची आठवण येत असेल का ❓️

“फॅमिली फोटोसाठी तुला स्टेजवर बोलावलंय,” हा निरोप घेऊन मावस बहीण राधा आली तेव्हा आई विनिता आणि सावी मावशी बरोबर रश्मी स्टेजकडे निघाली.
सावळी, साजिरी वहिनी सुशा आणि देखणा भाऊ सानंद जोडी मस्त जमली. मनभरून शुभेच्छा उधळून आणि खंडीभर आनंद घेऊन रश्मी, आई विनिता, भावंड आणि मावशीबरोबर जेवणाच्या पंक्तीकडे निघाली.
लग्नाच्या हॉलमधील मावस भावंडांचा निरोप घेऊन रश्मी, आई विनिताबरोबर आजोबांकडे निघाली..

🎷📯📯🎷🎷📯🎷📯🎷🎺🎺🎺🎷🎺🎷📯

आजोबांकडून लाड कोणी करून घेतले ❓️

एकेकाळी मुला बाळांनी भरलेल्या मोठ्या वाड्यात, आता आजोबा एकटेच राहत होते. मोठा दरवाजा आणि भिंती जर्जर वाटल्या. भग्नतेकडे झुकलेल्या भिंती तग धरून होत्या. आत असलेली झाडे, वेली, कुंड्यांसहीत गायब झालेले दिसत होते. विनिताबरोबर कन्नडमधून बोलणारे आजोबा मध्येच, रश्मीबरोबर कानडी हेलमधून मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यातील शिक्षकाची वयाच्या सत्तराव्या वर्षीसुद्धा कांही नवं शिकण्याची वृत्ती त्यांच्या मराठी बोलण्याच्या प्रयत्न्यातून दिसत होती.


एकाच जिल्ह्यात रश्मी राहत असलेला तालुका पूर्णपणे महाराष्ट्राशी जवळीक साधून होता. आणि त्याचं तालुक्याला लागून असलेला दुसरा तालुका विनिता आईच माहेर पूर्णपणे कन्नड भाषिक लोक राहात होते. तेथील रहिवाशांना एखादं वाक्य मराठीत बोलणं म्हणजे दिव्य वाटतं होतं. भाषावार प्रांत रचनेत बॉर्डरवराच्या लोकांची अशीच अवस्था असेल सारीकडे. रश्मीच्या मनात विचार तारळून गेला. पण त्या निमिताने दोन्हीकडील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची आयती संधीच मिळते हे पण एक सत्य होते.
“आजोबा तुमच्या हाताने लिहिलेली माझी जन्म कुंडली अजून आहे माझ्याकडे,” रश्मी आजोबांना बोलली. “तुझंच नाय काय फकस्त, तिघींच पण कुंडली तयार केलंय की. चांगल हाय बग तुमंच नशीब.” विनिता वरची नजर हटवून, रश्मीकडे पाहून आजोबा बोलले. विनिता आणि रश्मी निघाल्या तेव्हा आजोबा स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी हट्टाने निघाले. हातात छत्री घेऊन चालत सोबत येणारे सहा फूट उंच आजोबा किंचित वाकले होते. परीट घडीचा शुभ्र नेहरू सदरा आणि मरून रंगाची बारीकशी बॉर्डर असलेली पांढरी धोती आणि शुभ्र रेशमी उपरण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व ग्रेसफूल दिसत होते. त्यांनी डोक्यावरचे केस जाणून बुजून बारीक केले होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी फरची टोपी डोक्यावर नेहमीप्रमाणे थोडी तिरपी करून परिधान केली होती. याही वयात त्यांच्या डोक्यावरचे केस काळेभोर दिसत होते. दाढी केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुरुकुत्या स्पष्ट दिसत होत्या. आजोबानी एस. टी स्टॅण्डवर नेहमीसारखी फळं आणि खाऊ घेऊन दिला रश्मीकडे. आजोबा नेहमी बसमध्ये बसताना रश्मीला असा काहीतरी खाऊ द्यायचे.
“आजोबा, मी मोठी झालेय आता,” जेव्हा आजोबानी रश्मीसमोर आईस्क्रीक कॅण्डी पकडली तेंव्हा ती पटकन बोलून गेली. “रश्मी, निऊ सण्ण इल्ला, द्वड्ड आगीदे, ननग ग्वत आद. तू कितीही मोठं झालस तर मला ल्हानचं हाय बग तू. मी पण मातार हाय की, पण तुज्या बरबर मी पण कुल्फी खातंय बग,” स्वतःच्या हातातली कुल्फी दाखवत आजोबा बोलले. मे महिन्याच्या रखरखीत उन्हात आजोबानी दिलेली थंडगार कुल्फी मनाला आल्हाद देणारी वाटली. “विनिता आईला उन्हाळ्यात नेहमी थंडगार, गोडं आणि रसाळ खायची सवय आजोबानी, लहानपणीच लावलीय वाटतं” रश्मी बोलली.
आईविना वाढणाऱ्या विनिता आणि बहिणीच्या लहानपणी, आपल्या मुलींकरता वेणीत माळायला गजरे, नेलपेंट, रिब्बन्स आणि खाण्या, पिण्याची लयलूटं करणाऱ्या, लाड करणाऱ्या आजोबांचा स्वभाव अजूनही तसाच होता. जीवनात एवढे आघात होऊनही त्यांच्यातील प्रेमळ बाप त्यांनी अजून जीवंत ठेवला होता. विनिताला कुल्फी खाताना भावंडांची आठवण झाली.
“उन्हाळ्याच्या सुट्टीत, दुपारच्या वेळी बऱ्याचदा, घरात सर्व भावंडांबरोबर बसून बाबांचा पत्ते खेळता – खेळता, किंवा न्यूज पेपरमधील कोडी सोडवताना कुल्फी खाण्याचा कार्यक्रम चाले. अशाच एका सोडवलेल्या कोड्यामुळे विनिताच्या बाबांना हजारो रुपयाचे बक्षीस मिळाल्याची गोष्ट सांगताना विनिताचा चेहरा खूपच आनंदी दिसत होता. आजोबांना पण स्वतःच्या मुलींच्या बालपणीच्या आठवणीने बरे वाटले. आता त्यांचा चेहरा खुलला होता. ते आतून आनंदी दिसत होते. आपली मुलगी विनिताबरोबर मन मोकळ्या गप्पा करताना ते भुतकाळातील चांगल्या आठवणीमुळे प्रसन्न वाटत होते. तितक्यात बस आली. मुलगी; विनिता आणि नातं रश्मीला बाय करून आजोबा निघाले. आपल्या मुलांच्या बालपणीच्या काही गोड आठवणी घेऊन आजोबा आपल्या जर्जर वाड्याकडे निघाले. गाडी सुटली तरी विनिताची नजर तिच्या बाबांवरून हटत नव्हती. हातातली कॅण्डी गोडं रस पाजळत होती आणि विनिता आई आणि आजोबा पूर्वीच्या गोडं आठवणी मनात घोळवत आपल्या आपल्या वाटेने निघाले.
रस्त्याच्या बाजूला फुललेली लाल, पिवळी संकेश्वरची फुले प्रवास सुखावह करत होती. नेहमी दुथडी भरून वाहणारे हिरण्यकेशीच्या पात्रातले पाणी कमी झालेलं दिसत होतं. पत्रातील वाळू, माती, दगड दिसत होते. नदीच्या पत्रातील पाण्याचा प्रवाह संथ गतीने वाहत होता. खिडकीतून येणारा गार वारा चेहऱ्यावर घेत रश्मी आणि विनिता बाहेरची हिरवी पळणारी शेते पाहत प्रवास करत होत्या.
“रश्मी, मी कित्त्येक दिवसांनी गोपाळाचारीना पाहिले. बऱ्याच दिवसांनी इतक्या आनंदात दिसले बाबा.” विनिता अजून बाबांच्या विचारात होती. रश्मी जाणूनबुजून शांत राहिली. आज कितीतरी दिवसांनी विनिताने तिच्या बाबांना लहानपणी ज्या नावानं हाक मारायची, त्या “गोपालाचारी” नावाचा उच्चार केला होता.
छोटा घाट उतरून गाडी गावातील स्टॅंडकडे वळली तेव्हा संध्याकाळ झाली होती. ज्या अक्षराने सुरु होते त्याचं अक्षराने संपणारे तीन अक्षरी नाव कन्नड आणि मराठीमध्ये लिहिलं होतं. पहिल्यांदा रश्मी विनिताबरोबर या गावात आली होती तो दिवस आठवला. “आई, पुढच्या महिन्यात तब्बल दहा वर्षे होतील या गावात शिफ्ट होऊन. मला तो दिवस अजून आठवतोय. शयन गावाहून श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि श्यामदादांच्या शुभेच्छा घेऊन दहा वर्षापूर्वी इथच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु केले होतं.” रश्मी विनिताकडे पाहत बोलली तशी विनितानं मान हलवून प्रतिसाद दिला. ड्रायव्हरने रिवर्स घेऊन गाडी फलटावर थांबवली तसं कंडक्टरने दीर्घ घंटी वाजवली. पर्स खांद्याला अडकवून विनिता आणि रश्मी बसमधून खाली उतरून रिक्षा स्टॅंडकडे वळल्या.
समोर हुसेन आपली रिक्षा घेऊन उभे होते. “हुसेन जीं, चलीये मॉडर्न बेकरीके पास जाना हैं |” रश्मी हुसेनजींना बोलली. “नमस्ते रश्मी जीं, नमस्ते माँ जीं, आईये, बैठीये |” म्हणून हुसेनजींनी रिक्षाला किक मरली. दोघी, रश्मी आणि विनिता हुसेनजींना प्रती नमस्कार करत रिक्षात बसल्या तसा हुसेनजींनी रीक्षाचा वेग वाढवला.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

पुढील भागात वाचा रश्मीच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारी भेट‼️ कोण भेटत रश्मीला ❓️
आणि लवकरच रश्मीच्या भेटीस येत आहेत…..
महान कलाकार दिलीप प्रभावळकर कूठे भेटले ❓️शशिकला यांनी रश्मीला वडे खायला दिले. कुठे ❓️संजय – सुकन्या यांच्यामुळे रश्मी अस्वस्थ का झाली ❓️
लेले दाम्पत्यांनी रश्मीची झोप कशी उडवली❓️
वाचा पुढील कांही भागात….

ranjanarao. Com ला भेट द्या आणि वाचन साहित्य मिळावा …🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAUl5
story time : https://bit.ly/2Z1r33u
poems : https://bit.ly/3lP8OI4

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 53* अर्थात स्थित्यंतर पुर्व स्थिती

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई  आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसून,करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 52

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More