संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️
वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह
🙏आणि सल्ले, मदतीचे हात. आणि आम्ही योद्धे
संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️
2020 चा मार्च एन्ड आणि ती बोचरी शांतता आठवली कीं, अजूनही अंगावर शहारा खडा होतो. मंडळ परीक्षा अगदी अंतिम टप्प्यात असल्याने परीक्षा होणारच या गृहीतकाला बसलेला धक्का. इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर रद्द झाल्याच्या बातमीने परिस्थितीचे गांभीर्य सिद्ध झाले. साडेतीनशे विद्यार्थी संख्या असलेल्या इयत्ता दहावी परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला आणि सगळी सिस्टिम ढवळून निघाली.
शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी म. न. पा., हेल्थ डिपार्मेंटचे लोक, मॅप केलेल्या शाळा🏢, मूले👩🦱🙆♂️🙆♀️🙆👨🦱👩, पालक🧑🦰👨🦰👩🦰, मुख्याध्यपक, शिक्षक, संस्थाचालक या सर्वांची संभाव्य धोका टाळण्यासाठी चाललेली धडपड सारचं विलक्षण. आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन सर्वजण संकटमुक्त झाल्याचे पाहून दीर्घ श्वास घेतला. मनाला मिळालेली सकारात्मक ऊर्जा घेऊन इतर दुसऱ्या कामां मध्ये झोकून दिले.
नमनाला घडाभर तेल‼️ वाटेल पण हे जरा आवश्यकच वाटलं मला.
मनामागे, मनोवेगे ‼️
सगळं कसं सुरळीत आणि रुटीन प्रमाणे चालू होते. वेगवान चक्र आणि आम्ही त्या चक्रावर स्वार. धावतोय, धवतोय न संपणार रुटीन. पण त्या धावण्यात पण गंमत होती. लय होती. गती होती. ध्येय होतं. उद्या काय कामं असणार याचं बऱ्यापैकी गृहीतक होतं.
कुणाच्या मनात, ‘रामू 👨🦲उठला कामाला लागला’ ची भावाना होती. कुठे, ‘गरजवंतला चॉईस नाहीं’ ची भावाना होती. कोण म्हणे, ‘आलिया भोगाशी’, तर कोण म्हणे, ‘आलं अंगावर… आणि कोणी ‘कर्म हिचं पूजा🙏’ म्हणून कामं करी तर कोणाला ‘कामातून😃 आनंद’ मिळे. एकूण काय, जग रहाटी जोमात चालू होती. पण…. अचानक आलेल्या विषाणूच्या लाटे ने ‘कोठे नेऊन ठेवलंय या धावत्या दुनियेला❓️’ असंच म्हणायची वेळ आली. आणि त्या क्षणी जिथे होते तिथेच थांबले….. “माणूस थांबला” थांबणे म्हणजे काय हे जगातील प्रत्येकाने अनुभवले.
वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🎠
कळत असल्या पासून, नकळतपणे, फुटले चक्र माझ्या दोन्ही पायांना,
🌀🌀🧿🧿 ✳️✳️👣
चालतेय गोल पृथ्वीवर 🌍🌎 कि,
फिरतेय मी माझ्या ध्येयाभोवती ❓️ 🚶🏻
…………………….
अवलोकन करते का सिंहा सारख? काही पावलं चालल्या नंतर
ऐटीत उभ राहून 🐅
की धावतच राहते ?
कधीच न थांबण्यासाठी ‼️
…………….
स्पर्धा नाही इतर कुणाशी 🎠🎠
माझी स्पर्धा, माझ्याशी…
तना सारखं, वारं होऊन, वारं पित, स्वार होतं वाऱ्यावर..
मनासारखं, मनच होऊन, मनामागे, मनोवेगे धावडवतो
दिन गेले, महिने गेले,
गेली वर्षे चक्रावर,
………………..
🌀🌀🌀🌀🌀🌀
चक्र पायाना,☸️
चक्र तनाला,☸️
चक्र मनाला ☸️
चिकटलं चक्र विचारांना,☸️
…..
आणि सुरू होते
स्पर्धा निसर्गाशी,
स्पर्धा स्वतःशी,
स्पर्धा दुसऱ्याशी,
कधीच न संपणारी ..
आला विषाणू आला विषाणू
घेतली ताब्यात, सारी सूत्र.
धावण्याला लावली वेसण,
अन मन वारूला, केल स्तब्ध,
अन् तन गतीला, केल स्तब्ध
निसर्ग चक्र सोडून, इतर सारी चक्र,
स्तब्ध! ठप्प! गप्प! चुप्प!
चरण चक्र, गप्प!
तन वारू, ठप्प!
रेल्वे, बस, गाड्या, विमाने सारेच सार्वजनिक दळणवळण बंध झाले. माणसे स्टॅच्यू म्हंटल्यासारखी जिथे असतील तिथेच थांबली. दळणवळण/ transport थांबवण 🚈🚓🚔🚐🚍🚙🚘🚗🚚✈️🛬⛴️⛴️ याचाच अर्थ “जीथं आहात तिथं थांबा”. तुम्ही थांबलात तर रोग पसरणार नाहीं या उद्धेशने अमलात आणलेला निर्णय होता तो.
शासनाचे भयानक रोगाला लगाम घालण्याच्या प्रयत्नातील पाहिलं पाऊल होतं ते.
पर दुःख शीतलम् ❓️❓️
अशा या ठप्प झालेल्या जगात एक वेगळीच गोष्ट घडली. आपण जीं गोष्ट जगातून संपली, फक्त स्वार्थ, अप्पलपोटेपणा, स्वतःच्या पलीकडे कोणी विचारच करत नाहीं हीं बोच् भल्या माणसाच्या मनात रुतून बसली होती ती बोथट झाली.
माणुसकीच नव्याने दर्शन झाले. छोट🧑🤝🧑 – मोठे, माझे – तुझे, काळे 👩✈️- गोरे, स्त्री👨🚀 – पुरुष👩✈️, सुंदर👌 – कुरूप👎, उच्च👍 – नीच👎, जात – धर्म या आणि अशा भेदाभेद भावने पलीकडे जाऊन मदतीचा ओघ सुरु झाला….. अत्यंत महत्वाचे असणारे सुंदर सत्य म्हणजे माणुसकी अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले. मदत….. अनंत हातानी, गरजुंसाठी केलेली मदत. दान…. सत् पात्री दान. दानत दिसली. किती देताहेत हे नाहीं पाहिलं कुणी. देताहेत हे महत्वाचे होते.
या नव्याने आलेल्या रोगाने सत्य अधोरेखित केलं, एकटेच आलोय हे त्रिकालाबाधित सत्य माहित होतच तसंचं एकटेच जाणार हे पण माहित होतं. पण एकटं जाणे म्हणजे नेमकं कसं हे सिद्धचं केलं. ‘मरणाच्या आणि तोरणाच्या दारीं वैरत्व विसरून दुःखात, आनंदात सहभागी व्हावं’ हीं म्हण कालबाह्य झाली. चित्कार🤭 तोंडाबाहेर टाकत, माणसं घरातच घुसमटत राहिली. माणसं जोडून ठेवण्यासाठी जन्मभर केलेली तडजोड कोणालाही न दिसणाऱ्या, न समजणाऱ्या आणि न ऐकू येणाऱ्या हुंदाक्यात😨🤫🤭 विरून गेली. जीवन ज्योत संपलेले देह पॅक करून पंच महाभूतांत विलीन होतं राहिले. जीवंत माणसांना भयाण वास्तव दाखवत जितेपणी, ‘आपल्या माणसांचे एकलं मृत्यू’, मनाला विस्तवाचे चटके देत राहिले.
कुटुंबात, बिल्डिंग मध्ये, सोसायटीत, गल्लीत, गावात शहरात, देशात, सर्व जगातच अस्फुट हुंदके फुटत राहिले.
टी. व्ही. वरील बातम्या आणि मृत्तांचे आकडे मन सुन्न करत होते. अचानक अवेळी🕣🕜 वाजलेला फोन काळजाचे♥️ ठोके चुकवत होते.
दिवस, आठवडे, कांही महिन्यानंतर लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आणि “ब्रेक दि चैन” बरोबर “औषधी मात्रा” साठी सर्वस्तरावरून युद्ध पातळीने संशोधन आणि उपाय शोधले जाऊ लागले.
सुरक्षित अंतर🚶♀️🚶♀️, हात 👏 🚰 स्वच्छ ठेवणे🧤, मास्क 😷😷 वापरणे, सॅनिटायझर , ऑक्सिमीटर📈 या आणि इतर असंख्य उपायांद्वारे प्रत्येकजण स्वतःभोंवती सुरक्षा कवच 🌞निर्माण करू लागला. बऱ्याच गोष्टींचे नव्याने सवयित रूपांतर झाले. जर कांही जाणानी नियम डावलून आगाऊपणा केला किंवा अनवधानाने झालेली चूक कुटुंबियांच्या जीवावर बेतु लागली.
कोरोनाच्या दुसऱ्यां लाटेने मुलां – मोठ्यामध्ये, छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्या मध्ये एक निराश, हताश भावना पसरवू लागली. पण एवढ्या मोठ्या रोगाला काबू करण्यासाठी महाकाय लोक संख्या असलेल्या आपल्या देशात लॉकडाऊन वाढवणे, सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये येथे गर्दी कमी करणे हे उपाय प्रभाविपणे केले जाऊ लागले. कांही नियमांमधून चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीचे परिणाम दिसून येतात.
कोणी कार्यालयाचं 🏦🏠घर केले तर कोणी घराचे कार्यालय केले. ऑनलाईन अभ्यासाच्या रूपाने गेले दीड वर्ष शाळा आणि कॉलेजीस 🏫🏢घरात आली होतीच.
‘अधिकाराचे केंद्रिकरण💪✍️ आणि कामांचे विकेंद्रिकरण’ हा त्याचाच परिणाम.
सातत्याने कामात व्यग्र असणाऱ्या माणसांना आता कामामध्ये मर्यादा दिसायला लागल्या. आणि हे आता नित्याचं होऊन बसले. लोकल आणि ग्लोबल पातळीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं असलेली उलथापालथ स्पष्ट परिणाम दाखवू लागली. सामान्य लोकांवर शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक बदलांचा फार मोठा नकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला…..
आता लॉकडाऊन पूर्णपणे बंद झाले होते असच वातावरण होतं. बाजारात, मॉलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी खूप गर्दी दिसें.
दैनंदिन कामं करत असताना साऱ्या गोष्टीचा विचार मनात येत असे.
धक्का 🤭😨‼️
नेहमी प्रमाणे मी गुरुवारी सहा, वीस पंचंविसच्या दरम्यान कार्यालतून बाहेर पडले. दोन, तीन वेळेस “टॅक्सीsss, टॅक्सीsss” ओरडून पण टॅक्सी कांही थांबली नाहीं. म्हणून चालतंच घरी निघाले. परेल भाजी मार्केट नेहमीसारखचं गजबजलेले होते. दोन्ही फुटापाथ पूर्णपणे हक्काने भाजी, फुलं आणि इतर विक्रेत्यांनी व्यापलेले होते की फुटपाथ वरून चालणं सोडाच पण पाय ठेवण्यासाठी सुद्दा जागा नव्हती. अर्थातचं मुख्य रस्त्यावरून चालण्या शिवाय पर्यायचं नव्हता. दोन्ही कडून गाडयांची ये जा सुरु होती. समोरून आलेल्या मुलीला जाण्या साठी वाट देता देता अगदी रस्त्याच्या खूपच मध्यभागातून चालावे लागतं होते. कांही समजायच्या आतच पायाला पाठीमागून जोराचा धक्का बसला आणि किंकाळी बाहेर पडली. डोळ्यासमोर तारे चमकले. पाठीमागे हाताला काहीतरी गुळगुळीत जाणवले. टॅक्सी धक्कादेवून क्षणभर थांबली आणि मी दुखऱ्यां टाचेकडे पहात लंगडत, लंगडत बाजूला झाले. डाव्या टाचेला टॅक्सीने चांगलाचं ठोकलं होतं.
घोट्यावरची त्वचा सोलवटून निघाली होती. चालताना कितीतरीवेळ शरीरात कंपनं जाणवत होती.
मी पुढे लंगडत चालताना पुन्हा टॅक्सी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. पण व्यर्थ. वन टू, वनं टू करत निघाले. आता पाऊलाची सूज वाढली होती, पण पर्याय नव्हता. बाहेरून स्वामींचे दर्शन घेऊन, घर गाठले आणि पाऊलाला गरम पाण्याचा शेक दिला.
घरात गणपतीच्या आगमनासाठी सुतारकाम, रंगरंगोटी चालू होती. बाप्पाच्या येण्याची चाहूल वेगळाच उत्साह घेऊन येते. पायाला आराम मिळाल्यामुळे बऱ्यापैकी फ्रेश वाटत होते. नेहमीसाऱखी कामं सुरु असताना नको असलेले एक नव्हे तर दोन , दोन पाहुणे माझा नवरा, दयानंदच्या गळ्यात पडले. एक सर्दी 🗣️😤🤧 दुसरा ताप😱😡😷.
शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह
कोविशिल्डचे दोन डोस नक्कीच शरीराचे कोरोनापासून संरक्षण करतील हा विश्वास मनामध्ये रुतलेला होता. पण माझ्या नवऱ्याचा ताप कांही हटेना. त्यात फॅमिली डॉक्टर उपलब्ध नव्हते. फक्त एक दिवस डॉक्टरांचं डिस्पेंसरित नसणं सुद्धा त्रासदायक वाटलं आम्हाला.
मग सुरु झाली आर. टी. पी. सी. आर. टेस्ट. तब्बल आठेचळीस तासांनी माझे पती श्री दयानंद यांचा रिपोर्ट मिळाला : कोरोना पॉझिटिव्ह…………….
एरवी be positiv, be positive म्हणणारे आपण आता आर. टी . पी. सी. आर.
रिपोर्ट मध्ये जेव्हा पॉझिटिव्ह वाचतो तेंव्हा दिवसा ढवळ्या डोळ्यापुढे तारे चमकतात, पायाखालची जमीन सरकते. तशीच आमची अवस्था झाली.
मग सुरु झाली आमची लढाई.
लगेच रूम क्वारंटाईन करण्यात आले. डॉक्टरांचे फोन, सल्ला आणि औषधं सुरु झाली. मुन्सिपालटीचे फोन, सॅनिटायझेशन, आपुलकीने विचारपूस, मदतीसाठी तत्पर सेवा देण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दाखवली. मनपाच्या आरोग्य विभागातील लोकांच्या बोलण्यातून आपुलकी आणि काळजी, सकारात्मक दृष्टीकोन दिसून आला. एका चांगल्या अनुभवात भर पडली. नातेवाईक, हितचिंतक यांच्याकडून मिळणारा दिलासा आणि मदत… या अजिब रोगाशी लढण्याची हिम्मत देत होती.
पुढील भागात वाचा…..
ऐन गणपतीत, बाप्पाचे स्वागत, पाहुणचार कसा केला ❓️
@ मनातील नकारात्मक विचार काढण्यासाठी मनाचा मनाशी संघर्ष की संवाद ❓️
आमच्या +ve रिपोर्टवर आमची त्वरित उमटलेली प्रतिक्रिया ‼️ आपण कांही तर्क करू शकता का ❓️
आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका..
One Response
Khup chan mandani keli she madam.
Covid19 ani real situation ekdam perfect samjavali ahe
Well written !