“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..


भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…
भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण..
भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या, कुसुमताईच्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….
भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते, निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते  🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…  
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वैधव्यसदृश्य जीवन. 
भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सार अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8* आईचं मानस – दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण  
भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? 
भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा🐔, खो-खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गावदेवाच्या 🔱🎪 मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश, रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी 🏰वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका ? विनिता – रांगोळी कला, विनिता – 🎵🎶 गायन कला, लोचन🤹‍♀️ आणि रश्मीचा🧘‍♀️ जन्म.
भाग- 12*  सुचिताची  प्रश्नावली❓️❓️, श्री आणि विनिता 💑 घराचं घरपण कसं टिकवतात❓️ रश्मी झोपेत का घाबरली❓️ दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का ? चंदाला आकाशात काय दिसलं?  
भाग -13* रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलेनं का मारतात? 
भाग -14 * काय दिलं गुरुजींनी ? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी ? काका आजोबांचा दिलासा,  सुट्टी कशी गेली? आई विनिता, रश्मीच्या सराना का भेटली ? सरानी पेढे का मागितले?  
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का ? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज🏬 प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत ? 
भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती ?  काय उपाय मिळाला शेवटी ?  का वेगळं वाटल वातावरण ? रविवारी कुठे गेल्या 👭🏃‍♀️👭 मैत्रिणी ?  शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघीं बहिणी?
भाग- 17* दिवाळी म्हणजे काय ? स्वप्नात रश्मी का 😭 रडते ? पाठी🧔🧔👨‍👨‍ येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी ? कुसुमताई,  सर, विनिता दरवाजा बंध का करतात ?  केदार काका, रश्मी  कुठे गेले ? 👪 काका, काकू रश्मी कुठे गेले👣? 
भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं ?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न🤹‍♂️❓️❓️
भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮फिरकी ? अतरंगी😂 बंटी  
भाग -20*   कोणाची परीक्षा ? कोण होता मोनदादा ? उपाय काय ? रश्मीला घेऊन कोठे गेला मोनदादा ? 
भाग -21* विनिताचं नेमकं काय आणि कोठे चुकलं ? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  
भाग – २२ * रश्मीचे नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस ⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर 🤣💃सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती.
भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदान, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ
भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1* श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच. भाग -25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते !, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ..
भाग – 26*, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27 *  नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली? 
काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं?
भाग – 28* आंडं, कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे❓️ सुकलेलं बकुळफुल पार्ट – 1 
भाग – 29 * सुकलेलं बकुळफुल पार्ट – 2,  दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…,  प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक,  राम नाम….,  मदर तेरेसा 🌷,  डॉक्टरांसाठी शिबीर,  तुम्ही  कुठं, कुठं घेऊन फिरणार तसबीर?   गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी,  
भाग – 30*  वा च न,   जिओग्राफी टीचर,  नाटक,  गाणं,  सावध मनाची मदत,  गुरु तारी त्याला कोण…. ?   भेसूर रश्मी,   रश्मीची केरळ ट्रिप,  “तेथे कर माझे जुळती…🌺🙏”
भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारी ❓️
भाग – 34* बोबडंकांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग, स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेटवस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी
रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदीच, कार्यालय आणि बरच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकलमधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठीनंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष गुरुवार : तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितम् तोय्ंम्…” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो ? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯 प्रेम ♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯, घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पाहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️, दीदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाच घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मीसाठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., अण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्…


पंचवीस रुपये थाळी

वर्किंग विमेन्स होस्टेलमध्ये फक्त रात्रीच्या जेवणाची 🥗🥣🍚🍲 सोय असायची. दिवसभर काम करून थकूनभागून आल्यानंतर बॅग 👜 ठेऊन चक्क बाथरूम गाठले जाई. अंघोळ करून फ्रेश होऊन थोडावेळ रूम पार्टनर्सबरोबर गप्पागोष्टी होतं. दिवसभराच्या घडामोडी, महत्वच्या घटना किंवा एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा झडत असतं. वाचलेल्या एकाच पुस्तकावर प्रत्येकीचा विचार वेगळा असे. गीत बऱ्याच वेळी तिच्या विचारावर आग्रही असे. आपला स्वतःचा विचार ठामपणे मांडत असताना तिची वैचारिक प्रगल्भता दिसून येई. वादविवादात ती नेहमी सरस ठरे.
काही वेळेस मोठमोठ्याने चाललेली चर्चा ऐकून इतर रूममधल्या मुलीं सहभागी होत असत. एकदम मोकळं ढाकळं वातावरण असे.
दरवाजावर टकटक करणं, आत येऊ का❓️ विचारणं वगैरे फारच फॉर्मल वाटे.
“अगं तुम्ही लोक चर्चा करून पोट भरणार आहात का ❓️ चला जेवायला” म्हणून मावशीच्या दोन, तीन वेळेला हाका मरून झाल्या तरी कोणी लक्ष दिलं नाही की, त्या स्वतः रूममध्ये डोकावायच्या आणि म्हणायच्या, “जीत, रोज ही शेवटची हाक आहे हं. दोन पंगती झाल्या आतापर्यंत. चला आता लौकर”. मग मात्र चर्चा, वादविवाद आवरते घेतले जात आणि जेवणाचे टेबल गाठले जाई.
मावशी गरम पोळी, भाजी, भात आणि आमटी प्रेमाने वाढायच्या. तृप्तीची ढेकर देत, मावशीना कधी भाजी, कधी आमटी छान बनविल्याची कॉमेंट देऊन सगळ्याजणी परत आपआपल्या रूमवर जात.
होस्टेलमध्ये सकाळी गरम चहा, नास्ता, दुपारचे जेवण वगैरेची सोय नव्हती. चहा प्यावा वाटला तर पाच – सात मिनिटांच्या अंतरावर पोळी, भाजी केंद्र होते.
ऑफिसला जाताना वेळ असेल तर तिथंच चहा घेतला जाई. बऱ्याच वेळेला मैत्रीण रोज, जित आणि रश्मीचा पोळी भाजी सेंटरवाल्या भैय्याकडे चहा होई. दुकानासमोर गेलं की, न सांगताच भैया आपुलकीने चहा देई आणि म्हणे, “आपके हात से बोहनी होती है, तो माल जल्दी खतम हो जाता है, और गल्ला भर जाता है |”

पोळीभाजी केंद्रापासून पुढे दहा मिनिटांच्या अंतरावर लोकल स्टेशन होते.
‘बाहेरच जेवायचे तर डबा कॅरी करून ओझे कशाला वहायचे ❓️ त्या ऐवजी बॅगेत, लोकलमध्ये वाचण्यासाठी एखादं पुस्तक कॅरी करू शकतो’ हा विचार केला जाई. कार्यालयाजवळ कँटीन्स, उपहारगृहे उपलब्ध होती. फिल्डवर्क साठी बाहेर पडले तरी राईसप्लेट सर्वत्र उपलब्ध असे. स्पेशल थाळीमध्ये एखादा गोड पदार्थ मिळे. पैसे देऊन पोटभर अन्न सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल पण ‘चव’ त्याचं काय ❓️ ती बदलणारच. भूक लागली की, पोटात अन्न गेलं पाहिजे हिच भावना असे. क्षुधाशांती हाच उद्देश असे. आता स्वतःच्या आवडी – निवडी पुन्हा बदलाव्या लागल्या रश्मीला. अमुक इतके पैसे दिले की ईतकेच अन्न मिळेल. अनलिमिटेड थाळी, स्वीट डिश जे हवे ते मिळे. आता हा सर्व व्यवहार वाटे. षड्रस अन्न शोभिवंत दिसे. सोडा टाकून शिजवलेलं अन्न भूक भागवत होते.
विनिता आई आणि तिच्या हाताने बनवलेल्या पदार्थांची, चवदार खुसखुशीत भाकरी, मऊ चपात्यांची, भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, चवीच्या आमटी आणि रस्सा भाज्या, कोशिंबीरी, चटण्या आणि असंख्य पदार्थ पण प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी चव जिभेवर रेंगाळत राही. वाटण हा प्रकार विनिता आई, काकू, मावश्या कोणाकडेच नसे. त्यामुळे कदाचित प्रत्येक पदार्थाची वेगळी चव असेल. समोरच्या ताटातील घास जिभेवर ठेवला की, मुंबईत असल्याचे भान येई.
तसं पाहायला गेलं तर जेवण शरीर धर्मासाठी होते.
पंच कोशापासून बनलेल्या शरीराचा अन्नमय कोश हा एक भाग आहे. सारं ज्ञात असूनपण फक्त आणि फक्त जिभेवर काही क्षण रेंगाळणाऱ्या चवीसाठी माणूस किती अग्रही असतो याचे आश्चर्य वाटत राही. ‘स्वाद सोडून दिला की शरीर आणि वाद सोडून दिला की मन निरोगी राहते’, असे म्हणतात. आपल्या सारख्या सामान्य माणसाला स्वाद आणि वाद दोन्हीही चवीने चघळायची सवय जी

जडते ती जन्मभर सोबत राहते.
आपला अन्नमय कोष सुदृढ ठेवण्यासाठी फक्त अन्न ग्रहण करणे महत्वाचे आहे का ❓️ शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे❓️ शरीर चपळ असावे, निरोगी असावे आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असावी. या साऱ्या शारीरिक चापल्य, सुदृढ आणि निरामय जीवनासाठी व्यायाम महत्वाचा असतो. व्यायामाने शरीराची सहनशक्ती वाढविणे अपेक्षित असते. योग्य आहाराने शरीर चपळ राहते. अन्यथा जेवल्यानंतर सुस्त वाटल्यास तो आहार योग्य नाही हे शरीर स्वतः दाखवून देते. आरामाने शरीराला ऊर्जा पुन्हा ( recharge ) मिळते.
अशा या नव्या वातावरणाची सवय अंगी बाणवताना मन आपोआप भूतकाळ आणि वर्तमान काळाची तुलना करत राहते. कितीही टाळलं तरी, काळयाभोर शेतजमिनीत शेणखत आणि कॅनॉल, विहिरीचे पाणी वापरून उगविलेल्या ताज्या भाज्या, नदीकाठच्या भाज्या, धान्य, आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गटाराच्या पाण्यावर वाढविलेल्या भाज्या यांचा तुलनात्मक विचार नकळत होई. आलिया भोगाशी… म्हणून पुढे चालत राहणे क्रमप्राप्त होते.
आणि अशा हिंदोळ्यावर असलेल्या जीवनात न कळतपणे एक बदल होऊ घातला.

नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन

“रश्मी, उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी आहे. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान मी, तुझ्या ऑफिसला येतो. आपण संध्याकाळी बाहेरच जेवण घेऊ.” इति राजेश

“एका अटीवर मी बाहेर जेवायला येईन, राजेश.” सुरुवातीपासून अलिखित नियम असल्यासारखे जिथे तिथे राजेश स्वतःच बिल पेड करीत असे. त्यामूळे रश्मीने आज अग्रही होतं राजेशला अट घातली.
“जेवायला बाहेर जाण्यासाठी कोणती अट, रश्मी ❓️” साशंक मनाने राजेशने हळू आवाजात विचारणा केली.
“जेवणाचे बिल मी स्वतः देणार,” रश्मी उतरली.
“ओके, डन. बरंss; रश्मी, तू दे बिल.” राजेश गालात हसून बोलला. राजेशच्या उत्तराने रश्मीला बरं वाटलं.
सकाळी श्रीकृष्णमध्ये नाष्ट्याचे बिल राजेशने दिले होते. बऱ्याच वेळेला असचं झाले होते. थोडं ओशाळवाणं वाटलं तिला. “आपण फुकट खातोय,” हीं भावना मनात कुठेतरी घर करून राहिली.
आज जेवणाचं बिल दिलं की, त्या ओझ्यातून बाहेर येऊ. साधी इच्छा होती.
साधारणपणे खूप स्पेशिअल थाळीपण शंभर रुपयांपर्यंत येते आणि आईस्क्रीम खाल्लंतरी जास्तीत् जास्त तीनशे रुपयांपर्यंत बिल होईल. रश्मीने विचार केला आणि होस्टेल रूममधील कपाटातून शंभराच्या दहा नव्या, कोऱ्या करकरीत नोटा पर्समध्ये ठेवल्या. त्यावेळी पगार हातातच मिळत असे. शासकीय कार्यालयात पगार बँक अकाउंटमध्ये जमा करण्याची पद्धत अद्याप सुरु झाली नव्हती. रिझर्व्ह बँकेतून नव्या कोऱ्या करकरीत नोटा महिन्याच्या शेवटच्या दिवशीच पगार रूपाने मिळतं.
“सरू, आज संध्याकाळी मी राजेश बरोबर जेवायला बाहेर जात आहे.” रश्मीने आपली जिवलग मैत्रीण सरूला सांगितलं.
“अरे वा ❗️ छान ❗️
रात्री दहाच्या आत होस्टेलवर ये. अन्यथा फुकट पन्नास रुपयाचा दंड लागेल.” रोजने वेळेची आठवण करून दिली.
दहाच्या ठोक्यानंतर होस्टेलची बेल वाजली की, आज बळीचा बकरा कोण आहे❓️ म्हणून अंधारात प्रत्येक रूमच्या बंध दरवाजाआड कुजबुज चाले ती वेगळीच असे.
शिस्तीचे काटेकोर पालन रेक्टर काका – काकू आवर्जून करत असतं.
तिथे कोण ❓️का ❓️कशासाठी❓️ कुठे ❓️ असे प्रश्न किंवा उशिरा येण्याचं कारण विचारले जात नसे. फक्त्त दंडाची पावती फाडली जाई. विविध कामासाठी बाहेर गावाहून आलेल्या मुली, महिलानां राहण्यासाठी पी. जी. किंवा हॉस्टेलचा आसरा घ्यावा लागे.
बँक, शासकीय, खाजगी क्षेत्रात, कामं करून पगार मिळवणाऱ्या मुली, महिला वर्किंग विमेन्स होस्टेलमध्ये राहत असत. मिळणाऱ्या पगारातून स्वतःचा खर्च भागवावा लागे. कधी पगार वेळेवर नाही मिळाला तर काही मुलींना हॉस्टेलचे बिल वेळेवर भरणे अवघड जाई. साधारणपणे हॉस्टेलचे बिल महिन्याच्या सात तारखेपर्यंत भरण्याबाबत दंडक असे. काटेकोरपणे नियम पालन करत हॉस्टेलच्या जीवनाची सवय अंगवळणी पाडून घेत, काही मुलीं दूर निघून जात होत्या. काही मुलींची नव्याने भर पडत होती.
अशातच नागपूरहून सावळीशी निलू पिक्चरमध्ये काम करण्याच्या इच्छेने मुंबईत आली. ती माधुरी दीक्षितच्या, ‘दिदी तेरा देवर दिवाना’ या गाण्यावर मस्त, हुबेहूब डान्स करून दाखवी. निलूनं स्वतःच निवडलेले क्षेत्र तिच्या आई, वडिलांना बिलकुल आवडले नव्हते. त्यामुळे निलू घरातून कपड्यांच्या बॅगेनिशी बाहेर पडली. तिला बऱ्याच वेळी आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागे. कधी, कधी ती दिवस – रात्र कामाच्या शोधात राही. तिच्या हिम्मत्ती स्वभाव आणि चिकाटीचं रश्मीला कौतुक वाटे. तिची जिद्द लौकर फळास यावी असे मनोमन रश्मी आणि इतर मुलींना वाटे.

गेट वे ⛩️☄️, क्वीन्स नेकलेस🌟🌟 ‼️

ऑफिसमधून निघताना आज पहिल्यांदाच रश्मी तोंड घुवून फ्रेश झाली आणि बॅग घेऊन बाहेर पडली. बाहेर राजेश गाडी घेऊन उभा होता. आपल्या कार्यालयातील सहकार्याशी राजेशची ओळख करून दिली आणि सर्वाना बाय करून रश्मी गाडीत बसली. गेट वेकडे गाडी वळवत राजेशने गाडीतील टेपरेकॉर्डर ऑन केला आणि अलिशा चिनॉयचे, “मेड इन इंडियाss”, गाणे सुरु झाले. हॉटेल ताज, गेट वे, आणि उसळणारा समुद्र, तरफा आणि भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी बोटीमध्ये चढणाऱ्या माणसांची लगबग दिसत होती. वेगवेगळ्या आकाराचे रंगीत बलूनस् लहानग्या मुलांना आकर्षित करीत होते. मुलांसाठी असंख्य खेळणी घेऊन एका बाजूला बरेच लोक बसले होते. चना चोर गरम, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, रानमेवा, कुल्फी घेऊन विक्रेते आवाज करून समुद्र पाहण्यासाठी आलेल्या माणसांना बोलावत होते. गेट वे जवळ उभे राहून फोटो काढून घेण्यासाठी बाहेरून आलेल्या लोकांची गर्दी कॅमेरा घेऊन फ़िरणारे लोकल फोटोग्राफर शिताफिने हाताळत होते. थोडावेळ थांबून रश्मी आणि राजेश गाडीत बसले.

🌊🌊🌊🌊🚗🚗
मरिन ड्राईव्हकडे गाडी वळवत राजेश बोलला, “आज, संध्याकाळी तुला 🤴 क्वीन्स नेकलेस🌟🌟🌟 दाखवतो.”
दहा पंधरा मिनिटांत मरिन ड्राइव्हला पोहोचले राजेश रश्मी. गेट वे ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्हच्या क्राऊडमध्ये बराच फरक दिसत होता. इंटरनॅशनल हॉटेलसमोर अथांग सागर दिसत होता. समोरच्या दगडांवर समुद्राच्या लाटा प्रचंड आवाज करत जोरजोरात आदळून परत समुद्रात जात होत्या. त्यांचा हा खेळ सतत चालू होता. अशा वाहत्या पाण्याकडे, लाटांकडे तासंतास पाहत बसलेतरी कंटाळा येत नाही. सूर्यास्त मनोहारी होता. आता नभात काळोख दाटू लागला आणि एक, एक चांदणी डोकावू लागली. स्पष्ट दिसणारे पाणी सूर्य मावळल्यानंतर थोड्याच वेळात गहिरे दिसू लागले. मगाशी दिसणाऱ्या दुधाळ लाटांचा रंग आता वेगळा दिसत होता. इंटरनॅशनल हॉटेलमधील प्रकाशाचा झोत मारिन ड्राईवचा बराच भाग उजळवत होता. समुद्र जास्त आकर्षक दिसत होता. लाटांवर प्रकाश पडला की पाण्याच्या थेंबाचे आणि लाटाद्वारे असंख्य प्रकाश किरण परावर्तित होऊन वेगळेच दृश्य दिसे. समुद्राच्या पाण्याचा एक विशिष्ट वास सुरुवातीला वेगळा वाटला. समुद्रावरून येणारा फ्रेश वारा, आकाशात चमकणाऱ्या अनंत तारका, मध्येच उडताना दिसणारे विमान आणि दूरवर दिपस्तंभाचे लाईट दिसत होते. जाहिरातीचे होर्डिंग्स आणि रस्त्याचे प्रखर लाईट, दुरपर्यंत लखलखत होते. समुद्राच्या काठावरून जाणारा रस्ता आणि रस्त्यावरील खांबावर असलेले प्रखर लाईट यांचा मोठा अर्धगोल तयार झाला होता. मरिन लाईन्स ते गिरगांव चौपाटीच्या लाईट्सनी चमचमत्या हाराचा आकार धरण केलं होता. सुंदर दृश्य होते ते. राणीचा हार डोळ्यात साठवत रश्मी, राजेश गाडीकडे जाण्यासाठी वळले आणि समोरच्या हॉटेलमधून एक जोडपं बाहेर पडलं.

सरप्राईझ‼️ नाना आत्या ‼️

कुरळे लांब केस, कपाळावर आलेली बट आपल्या हाताच्या नाजूक बोटाने 🖕कानापाठी👂 सरकवण्याची स्टाईल, धारदार किंचित बाक आलेलं लांब 👃 नाक, आणि नाकाखाली ओठाच्या 👄 टोकावर असलेला काळा तीळ. उंच, सडपातळ आणि आकर्षक बांधा. रश्मी क्षणभर पाहत राहिली. बाजूला पार्क केलेल्या काळ्या 🚘 मर्सिडीजचा दरवाजा उघडला आणि त्या सुंदरीने निऱ्या पकडून साडी किंचित वर उचलली आणि तिच्या पायात सोन्याचे पैंजण दिसले.
रश्मी एकदम धावत जाऊन समोर उभी राहिली. आता त्या सुंदरीच्या आणि रश्मीच्या चेहऱ्यावर हॉटेलच्या गेटवर आणि बॉर्डर वॉलवर असलेल्या लाईटचा प्रकाश पडल्यामुळे दोघींचे चेहरे एकमेकींना स्पष्ट दिसत होते. आता रश्मीला खात्री झाली आणि तीन हाक मारली.
“ज्ञाना आत्या, आय मीन ज्ञानादा आत्या‼️” म्हणून चेहऱ्याकडे बोट दाखवत हसून हाक मारली. आपल्याला माहेरच्या नावाने ते पण आत्या म्हणून ही कोण तरुणी हाक मारतेय ❓️ आत्याच्या कपाळावर किंचित सुरकुत्या दिसल्या. ती ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करताना रश्मीने तिला मदत केली. “नाना आत्याss ‼️” आणि आत्या रश्मीकडे सरकाली.
आत्या रश्मी समोर येऊन, “अले बापले ❗️ आमची बोबडी लश्मी इतकी मोठी झाली का ‼️ म्हणून मिठी मारली.
“माझ्या श्री… दादा आणि विनिता वहिनींची लाडकी रश्मी.” आत्या रश्मीच्या गालाला हात लावून गोड हसली.

आत्याला विनिता आईच्या गालाला हात लावून बोलताना रश्मीने कितीतरी वेळेस पाहिले होते. तीची आपल्या जवळच्या माणसांशी बोलण्याची स्टाईल बदलली नव्हती. तिच प्रेमळ आत्या, आज रश्मी समोर उभी होती. दरम्यान राजेश जवळ येऊन थांबला होता. आणि भाऊजी – ज्ञाना आत्याचे मिस्टर गाडीतून बाहेर येऊन दोघींची भेट पहात होते. आत्याने तिच्या मिस्टरांची ओळख करून दिली. रश्मीने राजेशची ओळख करून दिली. आत्याने ऍड्रेस आणि फोन नंबर असलेलं कार्ड दिलं आणि जूजबी बोलणं करून दोघी आपल्या वाटेने निघाल्या.

नाना आत्याच्या नाना आठवणी 😇😃

आज रश्मी एकदम खुश होती. कितीतरी वर्षांनी रश्मीला तिची “नाना आत्या” भेटली होती.

नाडकर्णीचा वाडा आणि फेर धरून हदग्याची गाणी मंजुळ आवाजात सांगणारी आपली सुंदर आत्या💃 आणखीनच सुंदर दिसतेय. रश्मीला हादग्याचा प्रसंग आणि तिच्या नाना आत्याची खिरापत ओळखण्यासाठी चाललेली धडपड आणि केलेल्या कलृप्त्या आठवताच हसू आले.

ज्ञानदा…., रश्मीच्या आबांची चुलत बहीण. विनिता आईची नणंद, रश्मी आणि भावंडांची आत्या. नाडकर्णीच्या घरी स्वर्गातली परीच अवतरली. नक्षत्रच जणू. कुंडली पाहून गुरुजी, तिची स्तुती करताना थकेनात. ज्ञाना आत्याच्या जन्मापासून पुढे घडणाऱ्या इत्यम्भूत साऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि गुरुजी एका जागी थबकले. स्वतःचा श्वास रोखून धरला गरुजींनी. त्यांच्या बोलण्याकडे घरातील सर्व लोक लक्ष्य देऊन ऐकत होते. बोलता बोलता त्यांच अचानक थांबण, श्वास रोखणं थोडं खटकलं सर्वाना. “कुंजन बेटा , जरा पिण्यासाठी पाणी आण बाळा,” गुरुजींनी स्वतःच मांडलेल्या कुंडलीतुन लक्ष्य दुसरीकडे वळवत बोलले. शेवटी गुरुजी स्वतःच म्हणाले, “ठेवा हे जन्म टिप्पण. आज एवढेच भविष्य जाणून घेणे पुरेसे आहे.” टिप्पण काका आजोबांकडे देतादेता गुरुजी स्वतःशीच पुटपुटले “या बाळाच्या नशिबी परदेश गमन आणि तिथे स्थयिक होण्याचा योग आहे पण… निच गृह प्रबळ दिसतोय.”
“गुरुजी, संस्कार देणे आपल्या हातात असते. ते मात्र उत्तम रीतीने पार पाडू,” काका आजोबा ठाम पणे बोलले.

👶🙅‍♀️👧👩‍🎤💇‍♀️🤾💃💃
दिसामासांनी वाढणारी ज्ञानदा, आता चांगलीच तरुण दिसत होती. दहावीला बोर्डात प्रथम येऊन पंचक्रोशीत नावं मिळवले ज्ञानाने. पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्रात गेली.
नावाप्रमाणे आत्या खूपच ज्ञानी होती. ती एकपाठी होती. पाढे असू देत किंवा कविता, ऋचा, परवचा, संस्कृत स्तोत्र असू देत किंवा लोकगीतं; तिला एकदा ऐकलेली वाचलेली, कोणतीही गोष्ट अचूक म्हणता येत असे. गळ्यात साक्षात सरस्वतीचा वास होता तिच्या. रूपाने देखणी आणि अभ्यास, व्यवहारात हुशार असून सुद्धा मोठ्यांप्रती अतिशय आदराने वागत असे. कधी किडा, मुंगीला त्रास होईल म्हणून जमिनीवर पण पाऊले जपून टाकायची. घरातली मोठी मंडळी तिला ज्ञाना म्हणून हाक मारत असतं. बच्चे कंपनी ज्ञाना आत्या म्हणतं. एकमेव घरचा मेम्बर जीला आत्याचं नांव घेणं कठीण जाई आणि ती म्हणजे रश्मी. तीनं आपल्या सोईनुसार ज्ञाना आत्याचं नाना आत्या असं नामकरण करून टाकलं होतं.
अशी ही रश्मीची नाना आत्या पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्रात गेली. ती पदवी 👨‍🎓🎓 घेऊनच गावात परतली. ती ज्ञानार्जनाने प्रगल्भ तर झाली होतीच पण उच्च शिक्षणामुळे तीच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास डोकावताना दिसें.

सारी नाडकर्णी मंडळी खुश झाली होती. काका आजोबानी आज ज्ञानदा आत्याला सोन्याचे पैंजण आणले होते. तिच्या गोऱ्या नाजूक आणि सुबक पाऊलांवर 🦶🦶 नाजूक नक्षीकाम असलेले पैंजण खूपच शोभून दिसत होते.

अण्णा, अधुरी एक…?

नाडकर्णी वाड्या बाहेर काही अंतरावर एक सधन शेतकऱ्यांचे⛏️⚒️ कुटुंबं राहत होते. कुणब्याच्या कुटुंबात सातवी पर्यंत शिकून सर्व तरुण मुलं पिढ्यान् पिढ्या शेतीचा व्यवसाय करत. दुधाचा जोडधंदा कांही मुले आवडीने करत असत. मुलींची लग्न लावली जात. अशा या कुटुंबात अण्णा नावाच्या तरुणाने सारा इतिहास मोडीत काढत हायस्कुलच शिक्षण 📗📘📙घेतलं होतं. तालुक्याला जाऊन 👨‍🎓पदवीधर🎓 झाला. शिक्षणाने समृद्ध होतं असलेला अण्णा सुसंस्कृत तर होताचं पण डोळ्यात स्वप्नं 👀 जागवत ते पुरे करण्यासाठी प्रयत्नशील असे. बदकांमध्ये 🦢🦆🦢🦆 हंस असून त्या हंसाला स्वतःच्या हंसत्वाची जाणीव सुरुवातीपासूनच झाली होती. गोरा उंचापुरा तरुण डोळ्यात वेगळीच स्वप्ने घेऊन वावरत असे. पुढील शिक्षणासाठी तो चक्क ✈️अमेरिकेला💲💲 निघून गेला. अण्णा तिथेच स्थायीक झाला. अण्णाने 😎 चक्क पाच वर्षांनी गावात👣 पाऊल ठेवले.

हादगा, खिरापत अन्…

आज दुपारी विनिताने दरवाजा बंद करून खिरापत बनवून, डब्बा एका अशा जागी ठेऊन दिला की, जिथे कोणी सहजासहजी पोहोचू शकत नव्हते. डबा गुप्त ठिकाणी असल्याची आणि कोणाला दिसणार नसल्याची खात्री केली आणि त्यानंतरच किचनचा दरवाजा उघडला.
दरवाजासमोर सहा फूट उंच, एकविसीतली तरुण ज्ञाना वन्स आणि चार वर्षाच्या टिल्लू पिल्लू रश्मीला पाहून आश्चर्य वाटलं विनिताला.
“विनी वहिनी, काय बनवलं तुम्ही वेलची घालून❓️ गोड पदार्थाचा वास येतोय.” ज्ञानाने मंजुळ आवाजात प्रश्न विचारून विनिताच्या दोन्ही गालाला हात लावून गालगुच्चा घेतला.
“कुठं काय❓️ काहीच बनवलं नाही वन्स. चहासाठी वेलची कुटटून ठेवली. ही काय वेलची पूड.” असं म्हणून विनिताने काचेची बरणी दाखवली. किचन चकाचक होते. किचनमध्ये पदार्थ बनविल्याचा मागमूस दिसत नव्हता. “आज तुम्ही बनविलेली खिरापत मीच ओळखणार हं, विनिता वहिनी❗️” मान हलवत डोळ्यांच्या 🤭कोपऱ्यातून पाहत, कुरळ्या बटा गालावरून कानामागे 👂सरकवत, गोड आवाजात ज्ञानाने विनी वहिनीला आव्हानच दिले.
“असं आहे का वन्स❓️मला चॅलेंज देताय का ❓️खूप छान.” विनिता किलकिले डोळे करत ओठ मुडपून हसत उतरली.
“ज्ञाना वन्स, तुम्ही आजची खिरापत ओळखलीत तर, मी तुम्हाला गाठीची रांगोळी शिकवेन.” विनिताने नणंद ज्ञानदाला लालूच दाखवली. गाठीची रांगोळी शिकायला मिळणार म्हणून ज्ञानाचे डोळे चमकले. गोड ज्ञानदा डोळ्यात आलेल्या चमकीने आणखीनच गोड दिसत होती.
“माझी साजिरी, गोजिरी नणंद” म्हणून विनिताने ज्ञाना वन्सच्या गाला वरून हात फिरवला.
“वहिनी, रश्मीला पाणी हवय. आम्ही पाणी पिण्यासाठी आलोय.” इति ज्ञाना.
“ते काय, सोप्यामध्ये टेबलवर तांब्या, भांड आहे की. रश्मीss, घे तिथलं पाणी ” विनितानं स्वयंपाक घरातून माजघर ओलांडत सोप्याकडे पाहून बोटं दाखवलं.
“शी, बाईss❗️ मेहनत वाया गेली. वहिनी ताकास तूर लागू देत नाहीत.” ज्ञाना आत्या पुटपुटली.
“वन्स, कितीही लाडी गोडी लावली तरी तुम्हाला नाव नाही सांगणार हं खिरापतीच.” विनिता निर्धाराने बोलली.
🍉🥝🍲🍩🍭🍵🍪🥜🍐🌽

नाडकर्ण्याच्या वाड्यातील हादगा पाहायला आणि शेवटी दिली जाणारी खिरापत ओळखायला गावातील मुले, मुली, मोठ्यांचा सहभाग मजा आणायचा. विनिता काकूने बनविलेली खिरापत ओळखायला नेहमी प्रयास पढतं. नेहमी नवीन नावाचे, नवीन चवीचे आगळे वेगळे कधी गोड, कधी चटपटीत पदार्थ सर्व खिरापतीचा शिरोमणी असे. आज विनिताच्या मोठया वहिनींनी खिरापत बनवली होतीच. उमेश दादाच्या आईने सुद्धा वेगळीचं खिरापत बनवली होती.
🌻🌾🌿🍋🍊🍈🍒🍌🥕🍏🍐🌻

घरात एका काठीला, मळ्यातून आणलेली चिक्कू, सीताफळ, रामफळ, सुपारी, कोवळे नारळ, संत्रे, इ. कच्ची फळे, भाताची काही बोंडं बांधली होती. ती काठी भिंतीवर दोन्ही बाजूला सुतळी बांधून खिळ्यांना लटकवली होती. तिथेच भिंतीवर दागिन्याने मढवलेल्या लाकडी 🐘 हत्तीचे आणि हदगा खेळणाऱ्या मुलींचे👭🕺🏃‍♀️💃 चित्र लावले होते. आज गोंड्याच्या फुलांचा सातवा हार हादग्याला बांधला होता.

ज्ञानदा, मीरा, वनिता, कुंजन, उमा, छाया, सूची, फातिमा, सुब्बा, सुमन, बेबीजान, गंगा, यमुना अशा जवळ – जवळ पंधरा मुलींनी वाड्याच्या अंगणात एकमेकींचे हात पकडून मोठं रिंगण केलं होतं.
रश्मी, लीला, लोचन, उजाला, फातिमा, नसिमा, भागू, चंद्रा, वंदना अशा आठ, नऊ छोट्या मुलींनी मोठ्या रिंगणाच्या आत एकमेकींचे हात पकडून छोटं
रिंगण केलं होतं. रिंगणाच्या मध्यभागी लाकडी पाटावर विनिता काकूने हत्तीचे चित्र काढून हळद, कुंकू अन् फुले वाहिली होती. खाली रांगोळीचे सात ठिपके ठेवले होते. प्रत्येक वेळी एक गाणं म्हणून झालं की, रांगोळीचा एक ठीपका पुसला जाई.

🐘👭🐘💃🐘💃🐘👭🐘💃🕺🐘💃🐘🏃‍♀️


ऐलामा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा…,

हस्त 🐘 हा नक्षत्रांचा राजा, पावतो दुनियेच्या काजा..,

कारल्याचे 🥒बी पेर ग सुने, मग जा आपल्या माहेरा…,

हरीच्या 🦚नैवेद्याला केली जिलबी बिघडली..,

एक लिंबू🍋 झेलू बाई दोन 🍋🍋लिंबू झेलू….,

अक्कणं माती चिक्कण माती खळगा जो खणावा…,

वाजे चौघडा रुणझुणss, आला गं हदगा पाहुणा दारीं तुळस 🌿 घेऊन ….

सातही गाणी संपली. एक, एक जण आपल्याकडील खिरापत भरलेला डब्बा पकडून, इतरांना डब्यातील पदार्थ ओळखण्यासाठी आव्हान देऊ लागले. आज बऱ्याच जणांची खिरापत पटकन ओळखली गेली. पण तीन जण विजयी मुद्रेने उभे होते. त्यांच्या डब्यातील पदार्थ ओळखणे कठीण वाटत होते.
आज एक नवीन मुलगा या कार्यक्रमात सामील झाला होता. त्याच्या हातात स्वच्छ पितळी डबा होता. त्याच्या मराठी उच्चाराला किंचित इंग्रजीचा बाज होता. तो पितळेच्या डब्याला ब्रास बॉक्स म्हणत होता. तो डबा हलवून आतील पदार्थाचा आवाज करत होता जेणे करून समोरच्या मुलांना ओळखायला मदत होईल.
ज्ञाना आणि विनिता वहिनी एकदमच बोलल्या, आवळेsss, डोंगरी आवळे sss. आणि हुर्यो sss आवाज झाला. वहिनी म्हणून ज्ञानाने विनिताला टाळीसाठी हात दिला आणि ” अय्या, आज गोड खायला मिळणार‼️”, ज्ञाना आणि विनिता दोघीही एकाचवेळी बोलल्या.
ओळखलेल्या पदार्थाच्या ओळीत आठव्या जागी अण्णाचा डब्बा ठेवला गेला.
आता दोन पदार्थ राहिले एक गावच्या सरकारांच्या वाड्यतून आलेला पदार्थ आणि विनिताचा पदार्थ.
मोठ्या वहिनी साहेबांनी आज डब्यातून खिरापती
साठी मधातील सुकेळी पाठविल्या होत्या. वेलची आणि गूळ टाकून बनविलेले उडीद डाळीचे गोड वडे ओळखणे कठीण होते. कारण तो पदार्थ बेंगलोरकडे विशिष्ट सणाला प्रसादासाठी बनवला जाई. वडा या उत्तरावर समाधान मानत दहावा पदार्थ खिरापतीच्या ओळीत बसला.
कुंजन आणि मीराने सर्वांच्या हातात केळीची पाने देत सर्वाना गोलाकार बसायला सांगितले. मोठया मुलांनी एक एक पदार्थ वाढायला सुरुवात केली.
बेबीजानने भाजलेल्या 🥜🥜शेंगा आणि नसीमने सुके खोबरे 🥥 आणले होते. सुमनने सुकी भेळ, तर गंगा, जमुनाने साठे बिस्किटचे 🍪🍘पुडे आणले होते. उमेशच्या आईने चिंचेची आळगोळी बळगोळी बनवून छोटे गोळे करून त्यांना हातात धरून लॉलीपॉपसारखे चोखता येण्यासाठी नारळाच्या पानाच्या जाड काड्या लावून ठेवल्या होत्या. तो पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाचं आवडायचा. मोठया काकूंनी पुरणाचे कडबू बनवले होते. आणि ज्ञाना आत्याने पेढ्याच्या पोळ्या आणल्या होत्या. हिरव्या गार केळीच्या पानांवर रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे आणि चवीचे पदार्थ वाढले गेले. सर्वांनी पदार्थ खायला सुरुवात केली तेव्हा चिवचिवाट कमी झाला.
🙆🙆‍♂️🤭🤭🤭
दुसरे दिवशी अण्णाने सरळ येऊन काका आजोबांची भेट घेतली. त्याने ज्ञाना आत्यासाठी घातलेल्या लग्नाच्या मागणीला आजोबानी शांतपणे उत्तर दिले. पुढच्या महिन्यात ज्ञानदाचे लग्न ठरल्याचे सांगून सन्मानाने अण्णाला परत पाठविले.
असे ऐकायला मिळाले की अण्णा अजन्म अविवाहित राहिले….
😔😞


पन्नासावा भाग👆कसा वाटला आपण अवश्या आणि निर्धास्त लिहू शकता. आपले अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील. 🌹🙏

पुढील भागात वाचा रश्मीची फजिती, आजा, मेरे गाडी मे बैठ जा | ‼️ कोण म्हणाले ❓️रक्षाबंधन,
आणि बरच काही….

🌹🙏🌹

ranjanarao.com site वर वाचनासाठी उपलब्ध साहित्य…🙏🌺
How to

Storytime

Poems4 Responses

    1. ” तू सदा जवळी रहा भाग.. 50 हादगा स्पेशल वाचून आपण दिलेले अभिप्राय मला पुढील लिखाणासाठी नक्कीच प्रेरणादायी असतील. अनुप्रिता मॅडम धन्यवाद. वाचत रहा. अभप्राय देत रहा 🌹🙏

    1. नंदा मॅडम ” तू सदा जवळी रहा भाग.. 50 हादगा स्पेशल वाचून आपण दिलेले अभिप्राय मला पुढील लिखाणासाठी नक्कीच प्रेरणादायी असतील. मॅडम धन्यवाद. वाचत रहा. अभप्राय देत रहा 🌹🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More