“तू सदा जवळी रहा…” भाग – 49


भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…
भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आईं  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण..
भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई…, अनुभूती घ्या  कुसुम ताईच्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….
भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते  🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…  
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मिच वैधव्य सदृश्य जीवन. 
भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सार ? अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना. अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8* आईचं मानस दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण  
भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मिच काय होणार? 
भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा🐔, खो-खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवाच्या 🔱🎪 मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश, रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी 🏰वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – 🎵🎶गायन कला, लोचन🤹‍♀️ आणि रश्मीचा🧘‍♀️ जन्म.
भाग- 12*  सुचिताची  प्रश्नावली❓️❓️, श्री आणि विनिता 💑 घराचं घरपण कसं टिकवतात❓️ रश्मी झोपेत का घाबरली❓️ दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  
भाग -13* रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलने का मारतात? 
भाग -14 * काय दिलं गुरुजींनी ? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी ? काका आजोबांचा दिलासा,  सुट्टी कशी गेली? आई विनिता, रश्मीच्या सरना का भेटली? सरानी पेढे का मागितले?  
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज🏬 प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत? 
भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या 👭🏃‍♀️👭मैत्रिणी?  शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?
भाग- 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते? पाठी🧔🧔👨‍👨‍ येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? कुसुमताई,  सर, विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे गेले? 👪काका, काकू रश्मी कुठे गेले👣? 
भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न🤹‍♂️❓️❓️
भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮फिरकी? अतरंगी😂 बंटी  
भाग -20*   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा? उपाय काय? रश्मीला घेऊन कोठे गेला मोनदादा? 
भाग -21* विनिताचं नेमाक काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  
भाग – २२ * रश्मीचं नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर 🤣💃सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती.
भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ
भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच

भाग -25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ..
भाग – 26*, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईच कॉलेज.
भाग – 27 *  नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली? 
काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं?
भाग – 28* आंडं, कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे. सुकलेलं बकुळफुल पार्ट – 1 
भाग – 29 * सुकलेलं बकुळफुल पार्ट – 2,  दत्त आणि अष्ट लक्ष्मी तसबीर…,  प्रचण्ड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक,  राम नाम….,  मदर तेरेसां 🌷,  डॉक्टरांसाठी शिबीर,  तुम्ही  कुठं, कुठं घेऊन फिरणार तसबीर?   गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी,  
भाग – 30*  वा च न,   जिओग्राफी टीचर,  नाटक,  गाणं,  सावध मनाची मदत,  गुरु तारी त्याला कोण…. ?   भेसू .. रश्मी,   रश्मीची केरळ ट्रिप,  “तेथे कर माझी जुळती…🌺🙏”
भाग -31* पाचूंनी भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी.. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेटवस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी
रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदीच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष गुरुवार : तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळं”आकाशात पतितम् तोय्ंम्…” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बाल दिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯प्रेम♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯,घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नाही जाना हैं ❗️, दिदीचा सल्ला‼️ 🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️

दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️

होस्टेलमधल्या पोला नावाच्या मैत्रिणीचं लग्न झाले होते.
दोघेपण मुळचे केरळचे पण कामानिमित्त एकत्र आले आणि दोघानी लग्न करून सरप्राईझ पार्टी अरेंज केली होती.
रश्मी, रोज, जीत, गीत आणि बऱ्याचजणी आज पार्टीला पोलाच्या घरी गेल्या होत्या. जेवण झाले. पोलाच्या नवऱ्याने मस्त थंडगार आईसक्रीम आग्रहानं दिलं. आणि पोलानं जबरदस्तच सरप्राइझ दिलं. सी. डी. आणली होती तिने.
नाना पाटेकरांचा नवा कोरा “क्रांतीवीर” हिंदी पिक्चर सर्वांनी मिळून एन्जॉय केला. एकाचं दिवसात इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या आणि जवळ जवळ अर्ध्याहून जास्त दिवस मजेत गेला. सर्वाना बाय करून रश्मी घाईत निघाली.
////🌷🌷🌷🌷////


ठरल्या वेळी, ठरल्या ठिकाणी कृष्णा सर येऊन थांबले होते. रश्मी आणि सर घाईत पुढे निघाले.
“मॅडम, चला पटपट, जवळच रिक्षा स्टॅन्ड आहे.” संगीत सर, खूपच घाई करत होते. रश्मी झपझप पाऊले टाकता टाकता एकदम थांबली. “सर पहिल्यांदा भेटायला चालले आहे, तुमच्या ओळखीच्या माणसांना. त्यांच्या घरी लहान मुलं असतील. मी फळे किंवा स्नॅक्स काहीतरी घेते अगोदर. हे काय समोरच डिपार्टमेंटल स्टोअर दिसतय.” आणि रश्मी बाजूच्या स्टोअरकडे वळली.
“अहो मॅडम, एकतर आपण त्यांच्या घरी नाहीं तर ऑफिसमध्ये जातोय आणि दुसरं म्हणजे, त्यांच्याघरी कोणी छोटी मुलं नाहीत. ते स्वतः अन मॅरीड आहेत.” सरांच्या बोलण्यामुळे रश्मी क्षणभर जागीच थांबली. “मोठ्या मॅडम किती आणि कसला विचार करताय ❓️ चला आता.” कृष्णा सरांनी शेवटच्या वाक्यावर जोर दिला तसे रश्मीने समोरून भरधाव येणाऱ्या
रिक्षाला हात दाखवून रिक्षा थांबवली. रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा अशी काही ऑन द स्पॉट थांबवली की, काही क्षण रिक्षा फक्त पुढच्या एका चाकावर उभी होती अगदी नाकासमोर. रजनीकांत ठासून भरलेला भैया, अवतारच वाटला. रश्मी आणि सर रिक्षात बसले. रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा हाय वे ला घेतली. गार वारा वातावरणातल्या उष्म्यामूळे वाढलेलं शरीराचं तापमान नियंत्रण करायला मदत झाली.
एका उपनगरातून दुसऱ्या, तिसऱ्या करत मुख्य शहरात रिक्षा पोहोचेतोपर्यंत एक नवी गोष्ट माहीत झाली रश्मीला.

लेफ्ट, राईट करत मोठ्या वाहनांना असा कांही कट मारायचा की आपण पुढच्या क्षणी नसणार याची हमीच वाटे आणि ब्रह्माण्ड आठवे. बस. काही वेळेस श्वासोच्छ्वास मध्येच अडकून राही. रिक्षा ड्राइवर म्हणून, स्पीड वाढवण्याची पद्धत पाहिल्यावर गप्प बसतील ते संगीत सर कसले. ते अशीच काही तरी गुगली टाकत की समोरचा गार होऊन जाई. “भय्या, हमको कोई दुसरे ग्रह पे, या स्वर्ग मे नहीं जाना हैं | संभाल के चलो | नहीं तो जाते टाइम तीन पव्वे यानी चाकों पे और आगे का प्रवास चार कंदो पे होगा, और हमे पता भी नाहीं चलेगा |” सर नाराजीनेच बोलले.

रिक्षा येवढ्या जोरात चालू नव्हे, तर वाऱ्याहून वेगवान धावू शकते, हे तेव्हाच समजले रश्मीला.

पूर्वेकडून पश्चिमकडे जाण्यासाठी रिक्षा ब्रिजवर घेतली.
“सर, नशिबाची दोरी घट्ट असेल तर प्रवास सुखरूप होईल”. त्याच्या रफ रिक्षा चालवण्यामूळे डोळ्यासमोर काजवे चमकत असताना 🤩🤩🤩 देव आठवलेल्या रश्मी, श्यक्यतो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत बोलली.
रिक्षा वाल्याला पैसे देऊन झाले.
“साल्याने, हाडे खिळखिळी करून टाकली. आय आई गं 🤢‼️” तोंड वेडे वाकडे 😌🤔🤢🥴😵 करत आणि दुखणाऱ्या कमरेवर हातांच्या तळव्याचा जोर देत, विव्हळत सर बोलले.

विस्कटलेले केस सरळ करत रश्मीने खांद्याला पर्स अडकवली. सरांच्या पाठी पाठी रश्मी आत आली. काचेच्या दरवाजाला आतून फिल्म लावल्यामुळे बाहेरच्या माणसांना आतले काही दिसत नव्हते. पोऱ्याने सोफ्यावर बसायला सांगून त्याच्या साहेबाना निरोप द्यायला केबिनमध्ये गेला. तोपर्यंत पाण्याचे ग्लास घेऊन दुसरा मुलगा समोर आला. आणि बरेच दिवस प्रलंबित असलेली भेट घडून आली.

व्हिजिटिंग कार्ड घेऊन बाहेर पडल्यावर सरांनी सुस्कारा सोडला.

“मोठ्या मॅडम, आता तुम्हाला केव्हाही गरज भासली तर माझ्या जावयाच्या या मित्राची मदत घेऊ शकता.” रश्मीचा निरोप घेता, घेता सर निश्चिन्त झाल्यासारखे बोलत होते.


ओळख, मैत्री आणि घट्ट मैत्री, आणि त्याही पुढे काहीतरी भाव बंध निर्माण होतानाचा तरल अनुभव वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला. रोज फोनवर बोलणं होऊ लागलं. मध्येच भेटी होऊ लागल्या. रश्मीने राजेशला बोलता, बोलता बऱ्याच गोष्टींची कल्पना दिली. स्वतःच्या जबादारीची जाणीव रश्मीच्या वागण्या बोलण्यातून दिसून येई. “आईचा शब्द प्रमाण असेल माझ्यासाठी.” एवढं निक्षुन आणि निर्धाराने बोलली रश्मी.
“आईच्या परवानगी शिवाय मी कोणताच निर्णय घेणार नाही.” अस राजेशच्या लग्नाच्या मागणीला उत्तर देताना दिले रश्मीने.

दीदीचा सल्ला‼️🌺

नेहमीसारखं ऑफिसचे काम उरकून रश्मी आज मैत्रीण रोज बरोबर शिवानी दीदीला भेटायला गेली होती. दीदीने नेहमी सारख प्रसन्न आणि गोड हसून स्वगत केले.
“हं, बोलो रश्मी कैसी हैं तू ❓️ माँ जीं, सई, चंदा कैसे हैं? कब मिली सबको❓️ भाई कीं शादी कैसी रही❓️ बीच, बीच मे मिला करो सबको | उनको अच्छा लागेगा |” दीदीने रश्मीला प्रश्न विचारत सल्ला पण दिला..

“दीदी सब लोग ठीक हैं | चंदा से मिलके आई हूँ | माँ, सई, मासी सब ठीक हैं | और भैया कीं शादी भी हो गई |” रश्मीने एका दमात दीदीला तिच्या खूप साऱ्या प्रश्नाची उतरे दिली.
“शिवानी दीदी, रश्मी खास आपको कुछ बताने के लिये आई हैं | ” रोजने मुद्यालाच हात घातला.

“फोन पे कुछ खास बात करनी हैं, ऐसे बोल रही थी रश्मी | ” रूमला लॉक करून किल्ली पर्समध्ये ठेवत दीदी बोलली.
“दिदी, आपकी रूम पार्टनर रिया; आज दिखाई नाहीं दी |” रश्मीने विचारले.
“रिया की प्रोजेक्ट हेड के साथ मीटिंग हैं आज | थोडी देर मे रूम पर पाहूँच जायेगी |” चालत, बोलली दिदी.

“चलो, कँटीन मे बैठ के, आराम से बात करेंगे |” दिदी चालता, चालता बोलत होती.
छोटे छोटे डांबरी रस्ते नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे स्वच्छ दिसत होते. आय. आय. टी. मधील आतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे होती. वाऱ्यामुळे झाडाच्या पानावरील पाण्याचे थेंब हिरव्या गवतावर पडत होते. गवतावर पडलेले थेंब घरंगळत जमिनीवर पडून लुप्त होत होते. कँटीनमधून बाहेर पडणाऱ्या प्रोफेसर जोसेफ आणि प्रोफेसर मुटाटकरांना रश्मी आणि शिवानी दीदीने अभिवादन केले. “कैसी हैं शिवानी जीं❓️ कशी आहेस रश्मी ❓️” मुटाटकर सरांनी हसतं विचारलं.
“हम दोनो, ठीक हैं सर | ” दीदी उतरली.
“दीss, मुटाटकर सर जी को मै, बॉम्बे युनिव्हर्सिटी मे मिली थी |
” हाँ, तुम बराबर बोल रही हो रश्मी | सर तो बी. यु. से ही हैं |
आय.आय.टी.के जोसेफ सर
और युनिव्हर्सिटी के मुटाटकर सर दोन्हो मिलके एक प्रोजेक्ट पर काम कर रहे हैं |” दीदीने रश्मीचा संभ्रम दूर केला.
कँटीनमध्ये बसून दीदींशी बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. रश्मीला दीदीशी बोलून हलक, हलक वाटत होते.
“जल्द से जल्द ; माँ को मिलो रश्मी |” म्हणून रश्मीला आणि रोजला बस स्टॉपवर सोडून,
बाय करून दीदी निघाली. पाठमोरी दीदी दिसेनाशी होईपर्यंत तिथेच थांबली रश्मी आणि नंतर रोजबरोबर निघाली.
मनकवडी आणि उत्तम मैत्रिण, विश्वस्थ असणारी, उपस्थितीने अश्वस्थ करणारी शिवानी दीदी भेटली की, नेहमी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा शरीरातच नव्हे तर आपल्या आसपासच्या वातावरणाद्वारे मन, मस्तीष्कसुद्धा असच सकारात्मकतेने ओथंबून बरसायचे.
योग्य व्यक्तीशी बोलल्याचं समाधान घेऊन रश्मी पुढच्या ठिकाणी निघाली.

शासन आणि निर्णय बिर्णय

रश्मीच्या मनात खूप सारे विचार चालू असताना आपल्या मैत्रिणी रोज आणि जीत आणि गीत बरोबर गप्पा ठोकत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी नेहमीसारखं ऑफिस आणि फिल्डवर कामं सुरु झालं. संध्याकाळी ऑफिसमध्ये डॉक्युमेंट्स चाळताना निरोप आला.
“रश्मी मॅडम, तुम्हाला बोलावलंय बेबी मॅडमनी, फोन आहे तुमच्यासाठी,” बाळूने निरोप दिला आणि रश्मी पेन डायरी घेऊन टेलिफोन ऑपरेटरच्या टेबल जवळ गेली.
रिसिव्हर उचलून कानाला लावला आणि रश्मी, खुशीने जोरात किंचाळलीच.
बाजूने, बेबी मॅडमनी हातवारे करून “रश्मी, अंग हळू बोल. आत साहेब आहेत, कित्ती मोठ्याने बोलतेस ❓️” म्हणून फोनवर बोलताना रश्मी नेमकी कुठे आहे या वास्तवाची जाणीव करून दिली. तेवड्यात केबिनमधून निरोप आला. मंत्रालयात जाण्यासाठी गाडी बाहेर काढायला सांगत स्वतः सर बाहेर आले.
“नाडकर्णी मॅडम, आजच्या केसची फाईल घेऊन तुम्ही पण बरोबर चला मंत्रालयात.” सर निघता, निघता बोलले.
रश्मीने फोनवर बोलणाऱ्या, समोरच्या व्यक्तीकडून तिचा नंबर डायरीत टिपला आणि टेबलवरची फाईल घेऊन गाडीत बसली.
सचिवांच्या बरोबर बराच वेळ चर्चा झाली. केस बाबतच्या मुद्यांवर वर उलट, सुलट प्रश्न उपस्थित केले गेले. त्याची नियमानुसार उत्तरे तयार होती. त्यावर चर्चा झाली. सदर केस बाबत कोणत्याही अँगलने प्रश्न किंवा समस्या उपस्थित केल्या तरी शासनाकडे त्याची उत्तरे तयार होती आणि एक वेगळ्याचं आणि ऐतिहासिक शासन निर्णयाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती.
केबिन मधून बाहेर पडताना साहेब एक वेगळंच समाधान घेऊन बाहेर पडले.

ज्या पद्धतीने सकाळी ज्युरी समोर आपले कायदे, नियम, आणि त्याची अंमलबजावणी करताना पळवाटा शोधून, नेमणूक अधिकारी समोरच्या उमेदवाराची वर्षानुवर्षे कशी पिळवणूक करतात आणि त्यातून नियमानुसार सुटका करायची असेल तर अशा प्रकारचा निर्णय आवश्यक आहे, हे पटवून दिले. शासन निर्णयाची कशी मदत होऊ शकते हे विचारपूर्वक आणि मुद्धेसूदपणे मांडले गेले. धोरणत्मक बदल आणि तसा शासन नियम सकारात्मक बदल घडवून आणणार याची ज्यूरीना खात्रीच पटली.
आणि संध्याकाळी मंत्रालयीन सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या चर्चेतून एक ऐतिहासिक शासन निर्णय आकारास येऊ घातला.
प्रगल्भ, मेहनती आणि नियम ज्ञात असलेल्या आणि त्याची काटेकोर आंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर काम करताना वेगळ्या आणि समृद्ध अनुभवातून रश्मीचं समाजाभिमुख व्यक्तिमत्व
घडत होते
. एक वेगळी रश्मी तयार होत होती.

ज्ञान – विज्ञान

“नेहरू विज्ञान केंद्रात उद्या तुम्हाला मिटिंग घ्यायची आहे, रश्मी मॅडम. हे पत्र, हा शासन निर्णय आणि हे सर्क्यूलर. विषय आहे, ‘दैनंदिन जीवनातील विज्ञान, कसे ओळखणार ❓️’ आणि हे फोन नंबर आहेत. सेंटरच्या डायरेक्टर साहेबांशी बोलून घ्या. साहेब उद्या पुण्याला मीटिंगला जाणार आहेत. विज्ञान केंद्रात मिटिंगसाठी दोनशे पन्नास लोक येणार आहेत.” रश्मी ऑफिसमध्ये आल्या आल्या साहेबांच्या पी. ए. नी पत्र, सर्क्युलर रश्मीला मार्क करून दिले.
मुलांसमोर आणि मोठ्यांसमोर बोलण्यातल्या फरकाचा मनातच ताळमेळ घालत रश्मीने तयारीला सुरुवात केली.

‘हातात थोडे थोडके नाही तर तब्ब्ल चोवीस तास आहेत,’ स्वतःशीच बोलली.
///🌷🌷🌷///


ए. सी. हॉलमधील सर्व खुर्च्या ऑक्यूपाईड होत्या. हॉलमध्ये मंद आणि स्टेजवर प्रखर लायटिंग होते. माईकची व्यवस्था उत्तम होती.
नेहरू विज्ञान केंद्र, त्याचा उद्देश्य, आजची मिटिंग, तिचा उद्धेश, आणि साध्य बद्द्ल बोलुन मुख्य विषयाला सुरुवात केली. रोजच्या जगण्यात ज्ञान आणि विज्ञान हातात हात घालू मानवी दैनंदिन जीवन सुकर आणि समृद्ध कसं बनवत ❓️ ओघवत्या भाषेत बोलणं सुरु झालं. समृद्धीकडे नेणारी एकमेव गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन होय. डोळे उघडे आणि बुद्धी चौकस ठेवली तर दैनंदिन जीवनात असणाऱ्या गोष्टीमध्ये किती मोठ्या प्रमाणात नकळतपणे विज्ञानाचा वापर केला जातो हे कळते. किंबहुना विज्ञान नाहीं अशी जागा शोधणे कठीण आहे. त्यासाठी दृष्टी आणि कोन बदलायला हवा. त्यासाठी अगदी सकाळी घडणाऱ्या सहज घटने पासून सुरुवात केली. शुचीर्भूत होण्यापासून, नमस्कार, योगा, नमाज यांचे उदाहरण घेऊन त्या पाठीमागे असलेले आरोग्य विज्ञान आणि त्यांचे प्रत्यक्षिक करवून दाखवले गेले. नमस्कार करण्याची पद्धत असो, किंवा टाळ्या वाजवणे असो. ऋतुनुसार बदलता आहार असो, दळण, वळणाची साधने असोत किंवा सार्वजनिक सण, उत्सव, ट्रेकिंग, पोहणे, आणि केलेली कोणतीही कृती आणि त्यापाठीमागे असलेले विज्ञान बोलण्यातून आणि कांही कृतीतून पाझरू लागले. गॅसवर ठेवलेल्या आमटीच्या पातेल्यात स्टील, पितळ आणि आल्यूमिनियमच्या पळीपैकी लवकर कोणत्या धातूची पळी तापेल❓️ आणि लवकर का तपेल❓️ सांगा त्या पाठीमागचे विज्ञान ❗️, वाकून नमस्कार करण्यापाठीमागे वैज्ञानिक करणं काय ❓️, पोटात दुखत असेल तर कुत्रा गवत का खातो ❓️, विंचवाला स्वतःच्या नांगीतील विष का बाधत नाहीं ❓️साप चावा घेतल्यानंतर उलटा का होतो❓️ विंचू दंशावर गाराचे पाणी उतारा कसा होऊ शकते ❓️पेटवलेल्या काडीची आग वरच्या दिशेने का जाते ❓️ तेल पाण्यावर का तरंगते ❓️ कडधान्ये भिजवताना मीठ का घातले जाते ❓️ जेवताना मांडी घालून जमिनीवर का बसावे ❓️ चालताना ताठ मान ठेऊन का चालावे ❓️ पाठीला बाकी येईल असे का बसू नये ❓️प्रश्न, शंका उपस्थित केले कीं उत्तरे मिळवणे आणि शंका निरसन करण्याच्या बहाण्याने चर्चा रंगते. इथं पण तसेच झाले

समोरून ऐकण्याची उत्सुकता दिसून येत होती. समोरचे मनं लावून ऐकत असल्यामूळे दैनंदिन जीवनातील, रोजच्या घडामोडीतून उदाहरण घेऊन त्या पाठीमागे असलेले वैज्ञानिक सत्य सिद्ध होत होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यावर सुद्धा म्हणजेच जीवनात प्रत्येक क्षणी असणार सत्य होते विज्ञान. काही वेळेस सवयीने, काही वेळा श्रद्धेत आणि कारण भाव न समजता आंधळेपणाने आचरतो आपण. किवा काही वेळेस जुनाट कल्पना म्हणून सोडून देतो. काही वेळेस करणं भाव न समजता परंपरा म्हणून आचरतो. सोदाहरण बोलण्यामूळे
शांत वातावरणात ऐकणाऱ्या व्यक्तीच्या विचारांना चालना मिळाली. अनुभव शब्दरूप घेऊन बाहेर पडू इच्छित होते. आता समोरून प्रश्न येऊ लागले. मतं व्यक्त होऊ लागली आणि अनवधानाने केलेल्या कित्येक गोष्टींपाठीमागे असलेले ज्याचे त्याचे विज्ञान – विचार बाहेर पडू लागले. आता टू वे चर्चासत्र रंगल. माईक वायर सहित हॉल मध्ये चौफेर फिरू लागला. दैनंदिन जीवनाबरोबर आपल्या शरीरापासून ब्रह्मांडा पर्यंत आणि त्याही पलीकडे एकमेकांशी पूरक असलेलं विज्ञानमय सत्य प्रकाशित होत होते. आता रश्मी ऐकत होती. विचार करत होती आणि व्यक्त होत होती. व्यक्त होण्यात, बोलण्यात आपोआप तार्कसंगतपणा प्रतीत होत होता.
दिवस कसा संपला समजलंच नाही.
अचानक आलेली जबाबदारी एक समृद्ध अनुभव देऊन गेली. रश्मीने आपल्या अधिकाऱ्यांचे संयोजक, आयोजक आणि सभेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानत जीवनातील साऱ्या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया अशी सर्वांबरोबर शपथ घेतली. मिटिंग संपली.
कॅबिन मध्ये निरोपाचा चहा घेता घेता फोन खणखणला. “रश्मी मॅडम तुमचा फोन आहे,” म्हणून डायरेक्टर साहेबांनी फोनचा रिसिवर रश्मी समोर ठेवला.
पलीकडून आवाज आला, “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शिबीर आहे. गुरुवारी तेथे उपस्थित रहा.”
“हो, सर.” रश्मी बोलली.
“आणि हो, आजची मिटिंग कम चर्चासत्र छान झाले.” समोरून कौतुकाची थाप मिळाली.
पण मीटिंग संपून पाचचं मिनिट्स झाली आहेत, सर ना इतक्या लौकर समजलं कसं ❓️ रश्मीच्या मनात प्रश्न तरंगला. दूसऱ्याच क्षणी तो दूर पण झाला.
कार्यालयात केव्हाही राउंड न मारता कोण किती वाजता कार्यालयात येतं, किती वाजता जातं याची इत्यंभूत माहिती केबिनमध्ये खुर्चीत बसून साहेबांनां मिळतं असे. साहेबांची कामं करण्याची पद्धत अफलातून आहे. रश्मी स्वतःशीच हसली.
उद्या इतर कामाबरोबर टेबलवरील पेंडिंग कामं पूर्ण करायला हवं. परवा पूर्ण दिवस बाहेर असणार आहोत आपण. रश्मीने विज्ञान केंद्रातून बाहेर पडताना, मनातच पुढील कामाचं नियोजन करून घेतलं.

भेटायलाच घेऊन यायचं ❗️

रश्मी, आई विनिताला भेटायला गांवी निघाली.
खात्री होतीच पण, हुरहूर पण होती. अणूपसून बनलेल्या गोळ्याला आकार दिला. रश्मी नावाच्या मुलीला संस्कार देऊन एक उत्तम, जबाबदार नागरिक बनवून केव्हाच मुक्त केले होते विनिताने. स्वछंदी आकाशात विहारायला. त्या आकाशात आणि अवकाशात काय❓️, कसे❓️, कुठे❓️, केव्हां❓️ याचा जवाब स्वतःलाच प्रश्न विचारून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पण बहाल केले होते. साथ होतीच विनिताची निर्मळ, निर्हेतुक, निस्वार्थी.

रश्मी नावाच्या या देह, मनाला स्वेच्छेने कुणा व्यक्तीमध्ये गुंतायला आवडतंय हे ऐकून काय प्रतिक्रिया असेल विनिता आईची असा प्रश्न आलाच नाही मनात. आई कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत असणार हे इतकं खात्रीपूर्वक, आणि मनापासून नुसतच वाटत नव्हतं, तर माहीतच होतं. ते सत्य होते. रश्मीत जीव असून पण ती स्वतःला अलिप्त ठेवतं होती.
“माझी रश्मी खुश असावी, आनंदी असावी, सुखी असावी, यशस्वी व्हावी. जीवनातील सर्व सुखं रश्मीला मिळावीत. तिच्या प्रामाणिकपणाचे चीज व्हावे, कष्टाचे सोने व्हावे, सर्वांर्थाने यशोशिखर गाठावी ,” हिचं इच्छा असायची विनिता आईची.
रश्मी आई विनिताला भेटली. अगदी “त्याच्या” बरोबरच्या, पहिल्या भेटीपासून साऱ्या गोष्टी सांगितल्या. आता विनिता आईच्या उत्तराची किती वेळ वाट पाहावी लागेल माहीत नाही. मनात विचार आणि झुकलेली नजर वर उचलून आईकडे न पाहता रश्मी जमिनीकडे पाहत राहिली.
“आपल्या मुलीला मोठं करायचं, शिक्षण द्यायचं, स्वावलंबी बनवायचं आणि हसत, हसत दुसऱ्याला द्यायचं.” आई हसत बोलली. तरी रश्मीच्या पापण्या झुकलेल्याच होत्या. पापण्या वर करून आईच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळणे रश्मीला अजून जमेना.
“अंग रश्मी, तू राजेशना बरोबर का घेऊन आली नाहीस ❓️” विनितानं असं बोलायची फुरसत रश्मीने झुकलेल्या पापण्या वर उचलल्या आणि आई विनिताकडे पहिले.
विनिताला रश्मीच्या डोळ्यात शेकडो चांदण्या चमकताहेत असे जाणवले. आई विनिताच्या चेहऱ्यावरची झाळाळी, तिला मनापासून झालेला आनंद दर्शवीत होती.
बाजूला उभी असलेली सई पटकन किचनकडे वळली आणि तिने देवघरात तुपाचा दिवा लावला. साखर देवासमोर ठेवून बहीण रश्मीचे आणि आई विनिताचे साखर देऊन तोंड गोड केले.
आई विनिता आणि राजेश यांची भेट झाली तेव्हा, “जावयाच्या रूपात मुलगाच मिळाला, मला,” म्हणून लाड सुरु झाले. त्यांच्या गप्पागोष्टी माहितीची देवाण घेवाण इत्यादीमध्ये ताण विरहित सासू आणि जावयाचे घट्ट बंध निर्माण झाले आणि रश्मी थोडी सैलावली.
सगळे स्वच्छ, निरभ्र आणि छान होते.

“राजेश, माझी नोकरी आणि माझ्यावरील जबाबदारी बाबत मी कसलीच तडजोड करणार नाही.” हे रश्मी इतक्या स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलली आणि राजेशने आश्वासक स्मित हास्य केलं.
काही गोष्टी बोलून परिणाम साधतात तर काही मौनातून आणि काही नजरेतून.

“त्या फक्त तुझ्या आई नाहीत. त्या माझ्या पण आई आहेत. सई आणि चंदा या दोघी फक्त तुझ्याचं नव्हेत तर माझ्यापण बहिणी आहेत.” राजेश सहजभाव आणि ठाम शब्दात बोलला. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून आई विनिताबद्दल आदर, आपुलकी दिसून येत असे.
“माझं नाही, आपलं म्हणायला शिक. सुखं, दुखात, आनंदात, जबाबदारीत आपण दोघे एकत्र असणार आहोत.”
लहानपणापासून काका, अण्णा, नाना, काकू, आत्या, भावंड, शेजारी, शिक्षक, मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांनी वेळोवेळी केलेली मदत आणि मिळालेल्या आधारामूळे इथपर्यंतचा प्रवास सुखरूप झाला होता. घरातील आणि अगदी जवळचे असलेले
आई विनिता आणि चंदा, सई नंतर राजेशचा, रश्मीला मिळालेला भक्कम आधार आणि आपुलकीच्या साथीने जीवनाच्या वेगळ्या टप्प्यावरच्या प्रवासाची सुरुवात होणार होती.

माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to






12 Responses

    1. “तू सदा जवळी रहा…’ भाग – 50 वर आपण निशब्द पणे दिलेले अभिप्राय आवडले.. असेच वाचत रहा. लिहिण्यामध्ये आपल्या सल्ल्याने साहित्य निर्मिती आणि आवश्यक बदल करण्यात येतील. धन्यवाद RD🙏

  1. कथा नवीन वळणावर पोचली आहे,रश्मीच्या फुलत्या संसारासाठी अर्थात आपल्या पूढील भागासाठी शुभेच्छा.

    1. “तू सदा जवळी रहा…’ भाग – 50 वर आपण निशब्द पणे दिलेले अभिप्राय आवडले.. असेच वाचत रहा. लिहिण्यामध्ये आपल्या सल्ल्याने साहित्य निर्मिती आणि आवश्यक बदल करण्यात येतील. धन्यवाद RD🙏

    1. हॅलो maam नमस्कार 🌹🙏. ” तू सदा जवळी रहा… ” भाग 50 वाचून आपण दिलेले अभिप्राय शिरोधार्य. आपण नव साहित्य निर्मितीसाठी प्रेरणादायी विषय सुचविल्यास मला नक्की आवडेल. वाचत रहा, नवीन idea सुचवत रहा. अभिप्राय देत रहा. धन्यवाद paul maam 🙏🌹🌺

      1. नमस्कार 🙏 रश्मी मॅडम. असेच वाचत रहा. अभिप्राय आणि सूचना देत रहा. 🌟🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More