“तू सदा जवळी रहा…” भाग – 48

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी.. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारी ❓️
भाग – 34* बोबडंकांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेटवस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी

नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष गुरुवार : तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळं, “आकाशात पतितम् तोय्ंम्…” 🙏
भाग – 41* सर्वगुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनीस्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वाचे आहे का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46 * ‘.…मुखडा दिखा दो,’ असं संजय कोणाला म्हणतो ? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, प्रेम♥️🌺 भक्ती, घर सोडणं पहिला आघात ❗️
मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात❗️अनोखं बाळंतपण ❗️असा उन्हाळा नाही पहिला ❗️घात झाला 😭

भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग.. 🙏🌺

आज कार्तिक एकादशी. नाडकर्णींच्या वाड्यात वेगळीच लगबग चालू होती. लाडक्या, सावळ्या विठूच्या
पूजेची विशेष तयारी सुरु होती. एकवीस मण्यांच्या गेजावस्त्राला उगाळलेल्या चंदनानं बाविसव्या मण्याच्या सुतपुतलीसह रंगवून ताटात गोल करून ठेवले. वाटीत चंदन, अक्षता, धूप, फुलावत, निरांजन – दीप, अष्टगंध, निळी, पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी सुवासिक फुले आणि मंजिरीसह तुळशीदळे ठेवली. दारात, देवघरात रांगोळी रेखाटून हळद, कुंकू, फ़ुलं वाहिली. मोठ्या वहिनी, छोटी जाऊ दोघींनी बनवलेल्या खमंग, चवदार फराळाचा घमघमाट उपवासा दिवशीसुद्धा भूक चाळवत होता. बच्चे कंपनीचा उपवास खास साबुदाणा खिचडीसाठी असे हे सर्वश्रुत होते. देवपूजा झाली. विठ्ठलाची साग्रसंगीत पूजा, आरती झाली. भजन खुपच छान रंगलं होते. लहान मुलांनी मोठ्यांबरोबर टाळ आणि टाळ्या वाजवून साथ देत विठ्ठलाला साद घातली. कन्नड हेल काढून विनितानं म्हंटलेलं, “कानडाss राssजा पांढरीचाss, ” वेगळीच अनुभूती देऊन गेले. अण्णा काकांच्या आवाजाची ताना, “आम्ही विठ्ठलाsssच्या भजनाsssत न्हाsssलो”, मधल्या काकूंचे “एकतारी संगेsss एकरूप झालो”, कन्होपात्राचा अभंग वातावरण बदलवून गेले.

🔯 🙏🌺प्रेम♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯

काळा सावळा गोड गोजिरा
विठ्ठल माझा रूप साजिरा,
मना भुलवितो, भेटीसाठी झुरवितो,
सदाम्याचे पोहे हा आवडीने चाखतो,
हाची विठ्ठल माझ्या मनी राहतो,
श्री हरी विठ्ठssल जय हरी विठ्ठssल,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss || 1||

टाळ आणि मृदंगाची साथ मिळे अभंगा,
एक तारीतुनी निघे भक्तीचा तरंग,
मृदंगावरी टेकताच बोटे निघे एक धून,
पेटीतुनी सप्तसूर आळवी शुभांगं,
सूर सूर आळवितो, आला माझा श्रीरंग,
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss ||2||

निज भक्तांची हा विठू परीक्षाही घेतो,
विठेवरी तिष्ठितो अन प्रतीक्षा ही करतो,
प्रेम अन भक्तीचे गहिरे हे नाते,
देव आणि कोहंम❓️भक्त दोघेही जाणते,
“सोहम”, “अहंम ब्रम्हास्मि” वदवून घेतो
गोssड गोजिरा साssवळा साजिरा,
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss ||3||

विठ्ठलाच्या पायी आम्ही उतराई,
सावळी विठाई माझी, सखा पांडुरंग
काळा की सावळा, की म्हणू पांडुरंग
आवघाची रंग हृदयी रंगला श्रीरंग
तुझ्यात दंग मी माझ्या भक्तीत तू दंग
भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग
श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलsss ||4||

विठ्ठल, विठ्ठल नामाच्या गजराने नाडकर्णी वाडा भक्तीरसात चिंब भिजला.

नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला गेला. आतून फ़राळ तयार असल्याची वर्दी मिळाली आणि घरातील मोठ्यांबरोबर छोटे कंपनीसुद्धा एकत्रच फराळ करण्यासाठी पंगत बसली.

“इतक्या मोठ्या पंगतीत श्री… दिसतं नाही,” विनिताची नजर शोधक झाली. तिची तगमग झाली. विनिताची उजवी पापणी फडफडली अन् ती अस्वस्थ झाली.
फ़राळ वाढताना विनिताची नजर शोधक झाली. पण श्री.. न बोलता गेला कुठे❓️विठ्ठलाला तुळशी, फुले वाहताना पहिले होते त्याला. आता सर्वजण फ़राळ खाण्यात गढून गेले.
इतक्यात श्री.. बाहेरून आला.
श्री… बाहेरून काही वस्तू घेऊन आला होता. पिशव्या ताई आजीच्या हाती दिल्या आणि हात पाय धुवून सोफ्यावर रेलून बसला. समोर ठेवलेला सोव्हियत (यूनियन) रशियाचा शेतकरी अंक चाळत बसून राहिला.

लहान मुले खेळणी घेऊन बाहेर पडली. सर्व मुले खेळात रमली.

घर सोडणं, पहिला आघात ❗️

नाना काका, अण्णाकाका, छोटू काका सर्व मोठी माणसे बाहेर येऊन बसली.

“…………, ………., श्री…., अजून तू इथंच❓️ कल्लापानं बागानां, उसाला पाणी दिलं की नाही कोण बघणार ❓️ लक्ष्य कोण ठेवणार❓️ तुला आणि तुझ्या मुलींना अन्न पाण्याविना ठेवलं तर❓️ ” अचानक आवाज मोठा झाला म्हणून पण थोडं उशिराच ताई आजी स्वयंपाक घरातून बाहेर आली. बाहेर वातावरण एकदम गरम झाले होते.
“बाकी सर्वांचा फराळ झालाय आताच. श्री.., विनिताबरोबर फ़राळ करायला आत ये. अगोदरच खूप उशीर झालाय.” ताई आजी श्री…ला सांगत होती. ताईआजीने शेवटची दोन वाक्येच ऐकली. अगोदरचे शब्दबाण झेलून श्री…. घायाळ झाला होता.

श्री… चा चेहरा पाहून, ताई आजीच्या काळजाचा ठोका चुकला. माझा श्रीराम खरोखर संयमी आणि मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्री… ला राग येत नाही. राग आला तरी त्यावर नियंत्रण ठेवणं त्याला जमत. तो आपली माणसं जपणारा आणि स्वतःच्या आईला, घराला सांभाळणारा नेहमी व्यस्त असणारा ताई आजीचा मुलगा आहे. आज वातावरण वेगळंच दिसतं होते.
पण श्री… रागाने थरथरत होता. त्याने विनिताला हाक मारली. आवाजात राग, त्वेष, निराशा साऱ्या भावना एकत्र बाहेर पडल्या होत्या.
“रश्मी, चंदाला घेऊन घरातून बाहेर चल विनिता,” श्री..ने फर्मावले.
का ❓️ कुठे❓️ दोन्ही प्रश्न विनिताच्या घशातच विरले.
“श्री…, अरे दोन जीवांची बाई आहे विनिता. तिने सकाळपासून काही खाल्लं नाही. तिच्या पोटात बाळ आहे. थांबा कुठे जाताय तुम्ही सगळे❓️”
ताई आजीचा आवाज श्री… पर्यंत पोहोचला की नाही श्री.. न ऐकून दुर्लक्ष केलं श्री… च जाणे.

दोन लहान मुली, अन पोटातलं बाळ घेऊन विनिता आणि श्री… बाहेर पडले.

अचानक घर सोडणं पहिला आघात. विनितापुढे आ वासून प्रश्नांची मालिका उभी होती. साडेसात वर्षांमध्ये प्रथमच श्री…चा हा अवतार विनितानं पहिला होता.
माणूस आहे तिथं भावना आहे. भावना आहे तिथं सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार असणं स्वाभाविकच आहे. विचारनुसार आचार असणार. आनंद आणि त्रास या जशा नाण्याच्या बाजू तसचं सुखं दुःखाचे पण. सुखाचा सदरा घातलेला माणूस मिळणं दुरापास्त नव्हे तर जवळ जवळ अशक्य. आज असलेलं दुःख कायम थोडचं राहणार आहे❓️ बदल हा निसर्गाचा नियम आहे. तेच इथे लागू होते.
संस्कार आणि सूसंवाद सुखी संसाराचे सार.
सुसंवाद मधील सुसं गेले आणि वाद राहिला, तो वाढला आणि त्याचा परिणाम समोर दिसत होता. वाद कोणाचा ❓️त्याग कोणी केला ❓️ भोग कोणाच्या नशिबी आले❓️ काय दडलंय भविष्यात ❓️ पूर्णतः अनाभिज्ञ्.
विनिताला ना भूत काळात काय झालं याची चिंता होती ना भविष्यात काय दडलंय याचा विचार होता. तिला दिसत होते आज एकादशी, घरातून चौघे निघाले. श्री… आणि ती स्वतः उपवासादिवशी बाहेर पडले. पुढचं काहीच माहीत नाही. वाट तुडवत, तुडवत चालत राहिली, आपल्या श्री… पाठी, दोन मुलींचा हात पकडून.

सात साडेसात वर्षांपूर्वी पेट्रोमॅक्सच्या प्रकाशाची रोषणाई आणि झेंडूच्या फुलामाळानी आणि आंब्याच्या पाना, तोरणांनी सजलेल्या नाडकर्णींच्या वाड्यातील विनिताचा प्रवेश ताई आजीच्या आणि श्री… च्या नजरेने अश्वस्त केला होता.
श्री… विनाकारण बडबड करत नाही अन् निष्कारण व्यक्तही होत नाही याची पुरेपूर कल्पना होती विनिताला.
आज श्री…ची भक्कम साथ असताना सुद्धा विनिता मनातून दचकली, फक्त ते दाखवून दिलं नाही. ‘मी तुझ्या बरोबर आहे’! श्री…ला विनिताची अबोल साथ मिळाली.

मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात❗️❗️

पूर्वी कधीतरी आवळी भोजनासाठी, कधी धान्याच्या राशी पाहायला, कधी उसाचे गुऱ्हाळ चालू असताना फक्त काही वेळासाठी मळ्याला भेट देणारी ही नाडकर्णी घराण्याची सून दोन लहान मुलींना घेऊन कुठे चालली ❓️आज केदारकाकाचं दुकान पाहून रश्मीने लिमलेट गोळ्यांसाठी हट्ट नाही

केला.
काणे, चिले, जीनगर, रावळ, पाटील, केदारी संत, हवालदार, माळी, पंडित, पेशवे, मुतालिक, जोशी, कल्लापा धनगर आणि कोण कोण पाहत होते. श्रीराम भाऊ, राम राम म्हणत दोन्ही हात जोडत🙏🙏 होते. श्री.. आपल्याच विचारात… चालत राहिला. गावची वेस आली तसं विनितानं पाठी वळून पाहिलं….जाणवत होती शांतता. बोचरी शांती❗️
गावच्या वेशीच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली कट्ट्यावर काही माणसं बसली होती. श्री… आणि विनिताला पाहून उभं राहून नमस्कार केला.
श्री… वेशीतून डावीकडे वळला तसं विनितानं चमकून श्री…कडे पाहिलं. श्री…, शांत चित्ताने धिरगंभीर चेहऱ्याने पुढे चालतंच राहिला. बिगा सरकारांचा मळा, एस. टी चौक, मोठ्ठे वडाचे झाड इथंपर्यंत असलेला डांबरी रस्ता सोडून मोठ्या पाय वाटेकडे वळला. आणि तेथून धनगराचा मळा आणि कोनेंचा, लाटेच्या मळ्याची हद्द संपली आणि आता नाडकर्णीच्या मळ्याची हद्द सुरु झाली.
जसा मळ्याच्या जमिनीवर पाय ठेवला तसं दोन्ही डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला विनितानं. तिला श्वासात गुलाबाचा सुगंध जाणवला. डोळे उघडुन पहिले तर डाव्या बाजूच्या बांधावर असलेल्या गुलाबाच्या झाडावर कळ्या, फ़ुलं लगडली होती आणि असंमतात सुगंध उधळत होती. थोडं पुढे दोन पावलावर गुलाबी जास्वंदी फुलानी झाडं भरलेली होती. आत काळ्या मातीत पांढऱ्या गुलाबाच्या फुलांनी वेलं गच्च भरली होती. मधूनच एखाद चुकार हिरवं पान डोकावत होते. पुढे बांधावर मुक्या लालभडक कळ्या लगडल्या होत्या. डाव्या बाजूला मोठा खड्डा होता त्यात सुका झाडपाला, गाई, बैलाचे शेण टाकलेले होते. ऊकिरड्याचा एक वेगळा दर्प विनिताच्या नाकाला स्पर्शून गेला. उसाच्या गुऱ्हाळाची डोण, चुलवण शांत होती. चारी बाजूला उस तरारून आला होता. मध्येच नारळाचं छोट झाडं दिसले. लवणीच्या वेळी जमिनीत उसाच्या वाड्याचा केलेला वाघ सुकला होता. वाघाजवळ पुरलेल्या नारळाचे रोप होऊन डोलत होते.

नारळ बाग, केळीची बाग, पानमळा, बांधावरची आंब्यांची, चिक्कू, पेरू, सीताफळ, इडलिंबू आणि संकेश्वरच्या लाल पिवळ्या फुलांची झाडे कळ्या, फुले आणि फळे अंगावर घेऊन झाडे वाऱ्याच्या झुळूकेबरोबर डोलत होती. मिरची शेती, भुई मूग शेंगा सारे डोलून श्री… विनिताच्या कुटुंबाचे स्वागत करत होते.

अनोखं बाळंतपण… ❗️

म्हणतात पोटातील बाळ हे बांडगुळासारखं असते. त्याला आवश्यक गोष्टी ते व्यवस्थित घेत असतं. बाह्य परस्थितीचा फारसा सरळ परिणाम होत नाही कुसीतील बाल गर्भावर. आईची कूस त्या नवं गर्भाचं व्यवस्थित जतन, संरक्षण आणि संवर्धन करू शकते. भौतिक सुविधांची कमतरता असली तरी पती, पत्नीची एकमेकाला असलेली साथ आणि आवश्यक गोष्टींची मुबलक उपलब्धी, मोकळी हवा आणि सर्वांगसुंदर निसर्ग विनिता, श्री… चा मूड ठीक करून गेला.
त्यातच घरात मोठी आणि छोटी जाऊ दोघीनी काही महिन्याच्या अंतरावर बाळांना जन्म दिल्यामुळे ताई आजीवर घर सांभाळण्याची मोठीचं जबाबदारी आली होती. लहान मुलं, पुरुष माणसं, नवजात बलाकं आणि ओल्या बाळंतीणी या सर्वाना मोठ्या खुबीनं सांभाळत होती ताई आजी. त्या मूळे विनितासाठी घरातून मदत मिळणे शक्य नव्हतं.
ताई आजीने रश्मी, चंदाला वाड्यात ठेऊन घेतलं होते.
बाकी वातावरण जुळवून घेतलं तरी,
प्रश्न होता प्रत्यक्ष बाळंतपणाच्या आवश्यक तयारीचा. त्याची व्यवस्था केली श्री…न.
आणि दोघे बिनधास्त झाले.
नऊ महिने पूर्ण झालेल्या विनिताला आता नवीन बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. बऱ्याच गोष्टींची तयारी झाली होती. डॉक्टरनी तारीख सांगूनपण दवाखान्यात न्यायच्या दोन दिवस अगोदर श्री.. पुढे मोठाच पेच निर्माण झाला.
“मला अचानक बाहेरगावी जावेच लागेल कारण एक खूप महत्वाचे आणि तातडीचे काम आहे,” श्री… अगदी सहज बोलून निघून गेला. नऊ महिने पूर्ण झालेल्या विनिताला प्राप्त परिस्थितीला तोंड देणे एवढंच हाती राहिलं होते. दिवसभर कामं करणारे कामगार पुरुष, बायका संध्याकाळ झाली कीं वाडी वस्तीवर निघून जातं. वाटेकरी कल्लापाच्या आईला मळ्यात रात्री विनिताच्या सोबतीला ठेवली आणि श्री… निघून गेला.

नाडकर्णीचा मळा जरी मध्यवर्ती असला तरी कोणेंचा मळा पंधरा मिनिटावर, हुद्देचा मळा पंधरा मिनिटावर आणि तेवढ्याच अंतरावर लाटेंचा मळा होता.
आता विनिताला कळा सुरु झाल्या आणि
नेमकी कल्लाप्पाची आई घाबरून गेली. ऐनवेळी प्राप्त एकुलता आधार खूपच कमजोर आणि बिन कामाचा ठरला.

बाळंतपणात सोबत कोणीच नव्हतं विनिताच्या.
विनिताला प्राप्त परिस्थितीला तोंड देणे एवढचं हाती राहिलं होते. मोठ्याचं हिमातीने स्वतःच सारं पार पाडलं. श्रान्त विनितानं जेव्हा समोर
मोठे डोळे आणि खूप सारे जावळ घेऊन आलेली गोड गोजिरी बाळ👶 पाहिली तेव्हा विनिताचे श्रम निमाले अन हसू फुलले🌝. सई बाळ घरात आली. बाळाचा हुंकार घरात घुमला आणि घराचं गोकुळ झालं. बाळ लीलामध्ये घर न्हाऊन निघालं.

असा उन्हाळा नाहीं पाहिला ❗️🌕🌕🌕

सईच्या जन्मामुळे खोप वजा घरात आनंदाचं चांदणं फुलले. एव्हाना रश्मीची शाळा सुरु झाली होती. चंदा तिच्या श्री… आबांच्या लाडात वाढत होती. आबांच्या पाटीवर बसून विहिरीत पोहायला जाणे, आबांच्या खांद्यावर बसून मळ्यात फेरफटका मारणें, घरी आई कडून लाड, कामवाल्या बायकांची खोड काढ आणि दिवसभर हुंदडून रात्री जेवण करून गाढ झोपी जाणे हे चंदाचे रुटीन होते. सुंदर बालपण होते ते. ना कसली चिंता ना काळजी. आई, आबांच्या सहवासात खा, खेळा आणि मजा करा. सारे व्यवस्थित चालले होते.

दुष्काळ पडला आणि उन्हाचा आगडोंब उसळला. शेत मळ्यातील हिरवेपणा कमी, कमी होत नाहीसा झाला. हिरवे हिरवे गार गालीचे नाहीसे होऊन काळी भेगाळलेली उघडी वाघडी जमीन सर्वदूर दिसू लागली. छोटी छोटी वेली, झुडूपे नष्ट होऊ लागली. मोठी झाडे निष्पर्ण होऊ लागली. खातीपिती जनावरे हाडाची काडे होऊन चारा, पाण्याची प्रतीक्षा करू लागली. नद्या, नाले ओढे, विहिरी, आड, तलावातील पाणी अटून विहिरि आपला तळ दाखवू लागले.
मळ्यातील तुडुंब भरून असलेली आणि अठरा, वीस, एकर जमिनीला पाणी पाजणारी विहीरी या भयानक दुष्काळाचा परिणाम दाखवू लागली. पाणी हळू हळू खोल जाऊन विहीर आपला तळ दाखवू लागली. मोठीच नैसर्गिक आपत्ती येऊन ठेपाली. नारळाची बाग, केळीच्या बागा, पान मळा, बांधावरील फुला, फळांची झाडें, आणि उसाखालची शेती मोठ्या आशेने आपल्या मालकाकडे असं लावून बघत आहेत असा नाडकर्णीच्या चौघा भावांना भास होऊ लागला. प्रेमाने लावलेली, वाढवलेली झाडे, बागा वाचवली पाहिजेत, ती पुन्हा बहरली पाहिजेत आणि त्यासाठी उपाय हा आपणच शोधला पाहिजे म्हणून चौघा भावांमध्ये रात्रंदिवस चर्चा झडू लागल्या. कॅनॉल बाबत शासनाकडून मधूनच कधीतरी बातम्या यायच्या पण पुढे काही प्रगती दिसत नसे.
आसपासच्या मळ्यातून पाणी घ्यावे का ❓️ दुसरी विहीर खोदावी का ❓️ आहे त्या विहिरीत सुधारणा करावी ❓️ कोणता उपाय लवकर अमलात येईल याचा विचार केला गेला. चर्चेअंती एकदाचा निर्णय झाला. पुढची् तयारी मुहूर्त ठरवणे, पाहारी, फावडी, कुदळी, बुट्ट्या खरेदी करणे, कामगाराना पाचरण करणें इत्यादी साऱ्या गोष्टी पटापट जमवून आणल्या. दुष्काळात कामं मिळाल्यामुळे कामगारांचा उत्साह वाढला आणि घाई करून मुहूर्त ठरवला.

मोठे अण्णा काका, मधले नाना काका, छोटू काका, आबा यांनी विचारांती विहीऱीतील गाळ काढून विहीर आणखी खोदुन घ्यायचं ठरवलं. अगदी मुहूर्तापासून सर्व तयारी झाली.


मुहूर्ताचा दिवस ऐकून ताई आज्जी क्षणभर चरकलीच पण तिकडे लक्ष्य कोण देणार ❓️
आणि विनिताच्या हृदयाचा ठोका चुकला. नाग पंचमीच्या दिवशी घरात, शेतात काप – चीर, तोड – फोड असलं काहींच केलं जातं नाहीं मग भटजी बुवांनी हाच दिवस मुहूर्तासाठी का दिला ❓️ ताई आजी आणि विनिता दोघी सुद्धा उत्तरे न मिळणाऱ्या प्रश्नावर विचार करत राहिल्या.
विहिरीतून उपसण्यात येणारा गाळ, गावच्या सडक बांधणीच्या कामासाठी वापरला जाणार होता. तो गाळ नेण्यासाठी ट्रॅक्टर ठरवण्यात आले.
विहीर खोदण्याचा मुहूर्त गाठण्यासाठी धावपळ सुरु झाली. सर्व नातेवाईक, आप्तेष्ठ हितचिंतक सारे जमले. छोट्या काकांच्या हाताने महुर्त केला जाणार होता. पहिली पहार काकाच मारणार होते. त्या नंतर काम सुरू करणार होते. मुहूर्ताचा दिवस ठरला आणि वेळ पण ठरली. पंप सुरु करून विहिरीतील पाणी वारंवार उपसावे लागायचे. जिवंत झाऱ्यातून खळखळून येणाऱ्या पाण्याच्या धारा कमी झाल्या तरी पाण्याचा ओघ चांगलाच होता. फावडे, कुदळ गाळ उचलायला लोखंडी बुट्ट्या विहिरीत नेऊन तयार ठेवल्या. श्रीफळ, फुले, हळद, कुंकू तयार ठेवले. सर्व कामगार तयार होते.
इकडे अनु, अक्कू सर्वांच्या जेवणाची तयारी करत होत्या. पंचमी आणि मुहूर्ताचा दिवस म्हणून सर्वासाठी गोड जेवण होते. चवदार हुग्गी बनवण्यात अनु आणि अक्कू दोघींचा हात कोणीच धरू शकत नव्हते. शेंगदाण्याची चटणी, भात, आमटीची तयारी करून दोघी विहिरीजवळ पोहोचल्या. मुहूर्ताची वेळ झाली, सूर्य माथ्यावर येऊन ठेपला तरी छोटू काका काही पोहोचले नाही. आता समोर माणसं कामासाठी ताटकळत राहिली. मुहूर्त साधणार केव्हा आणि काम सुरु केव्हा करणार ❓️❓️ प्रत्येकाच्या नजरेत अबोल प्रश्न होते. शेवटी, “नाईलाज को क्या इलाज❓️” म्हणून पूजाविधीचे सोपस्कार झाले आणि श्री… ने हातात पहार घेतली. दीर्घ श्वास घेऊन श्री…ने पहार उचलून जोरात विहिरीच्या जिव्हाळ्याच्या बाजूलाच जोरात मारली. भूसभुशीत माती आजूबाजूला उधळली आणि काळाभोर नाग फणा काढुन फुत्कार सोडत राहिला. त्याच्या फण्याजवळ पिवळ्या रंगात दहाचा आकडा स्पष्ट दिसत होता. ‘नाग साsssप, नाग साsssप’ म्हणून आवाज झाला आणि विहिरीच्या तळाशी असलेले सारे लोक जीव वाचविण्यासाठी पायऱ्या गाठून वर जाऊ लागले. प्रसंगावधान राखून कल्लापा वाटेकऱ्यानं श्री… ला बाजूला खेचून घेतलं.
आणि त्या दिवशी पुन्हा काम सुरू केलंच नाहीं.
सर्वजण जेवले पण उत्साह नव्हता.
दुसरे दिवशी पासून काम उत्साहाने आणि पूर्ण वेगाने सुरु झालं. कुदळी, पाहारीचा खणखणीत आवाज घुमू लागला.

घात झाला 😭

कामगारांचा प्रचंड उत्साह आणि कामाचा उरक वाखाणण्याजोगा होता. विहिरीतील गाळ धडाधड टोपल्यातून वर येऊन लागला. दगड, मातीच्या विहिरीच्या तळाच्या बाजूवर पाहारी, कुदळ आदळू लागल्या. मोठे दगड फोडण्यासाठी सुरुंग लावले जाऊ लागले आणि शांत मळ्यातून सुरुंगाचे, खणण्याचे आवाज घुमून लागले. आसपासच्या मळ्यातील लोक काम पाहण्यासाठी डोकावून जाऊ लागले.
सकाळी चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी भडंग, भेळ, पोहे, चहा होऊ लागला.

🔨⛏️🛠️⚒️🔨⛏️⚒️⚒️⛏️⛏️
आज सकाळपासून लगबग सुरु होती. नेहमीच्या उत्साहाने सकाळच्या वेळी सर्वकामे सुरु झाली. दुपारच्या जेवणानंतर विनिताचा, ताई आजीचा आणि बाळाचा निरोप घेऊन दुपारीच श्री… बाहेर पडला तो परत तसा केव्हाच दिसला नाही.

विहिरीच्या पायऱ्या उतरताना पायात खडा आला आणि श्री…चा तोल जाऊन पाणी नसलेल्या खोल विहिरीतील दगडावर डोकं आपटले. किंकाळ्या फुटल्या आणि आसमंत थरारला.

किंकाळ्यांमुळे विनिताच्या हृदयाचा थरकाप उडाला आणि ती आवाजाच्या दिशेने धावली. तो पर्यंत काही लोक जखमी श्री..ला गाडीत घालून तालुक्याला निघाले होते. ताई आजी, विनिता बाळाबरोबर गाडीत बसल्या आणि वाड्यात पोहोचल्या. वाड्यासहित सारा गांव, श्री… परतण्याची वाट पाहत होता.

श्री… ला उचलून घेऊन वाड्यात येणाऱ्या लोकांचे हुंदके आणि रडणे विनितापर्यंत पोहोचले आणि किंकाळी फुटली…..

विनितापुढे कितीतरी प्रश्न निर्माण करून श्री…न आपली विनिताशी असलेली साथ स्वतःच थांबवली. एकाकी विनितावर असंख्य जबाबदाऱ्या टाकून शांत पाडून होता. त्याचे डोळे बंद होते. सर्वांवर जीव तोडून प्रेम करणाऱ्या ताई आजीने विनिताच्या गळ्यातील मंगळसूत्राला जोरात खेचले. काळे माणी आणि सोन्याचे मणी आणि वाट्या इतरत्र विखुरल्या.

विनिता जिवंत असूनसुद्धा निशब्द, स्थब्द, अस्तित्वाहीन वाटून गेली …..

सई जन्मुन तीन महिने पण होत नाहीत तोवर श्री… चा तो अपघात.
आणि अचानक एकटी विनितावर आलेली तीन लहान मुलींची जबाबदारी.
घर सोडल्यानंतर अगदी एक वर्षभर पण साथ नाही दिली श्री… न.
तीन लहान मुलींना घेऊन विनिताला तब्बल बारा वर्षे मळ्यात राहावी लागली.
“माझ्या गोड, गोजिऱ्या सई, चंदा, रश्मीला बारा वर्षाचा वनवास झाला.” ताई आजी मध्येच कधीतरी खंतावून म्हणायची. परिस्थितीला किंवा माणसांना, दैव किंवा किंवा देवाला दोषी ठरवायचे तोंडातच काय मनात पण डोकावले नाहीं विनिताच्या.

कॉलेजमध्ये असताना समाज कंटकामुळे विनाकारण रश्मीला पुन्हा त्रास झाला. त्यातून आप्तेष्ठाच्या मदतीने बाहेर पडून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं तिने.
जिद्दीने आदिवासी भागात नोकरी करून रश्मी आता शासकीय नोकरीत आली खरी. पण कालचं रश्मीच भोवळ येणं, अशक्तपणा जाणवणं विनिताला भावुक आणि कमजोर बनवलं. त्रस्त करणारा विचार विनिताच्या मनात डोकावला पण काही क्षणच.

विनितासमोरून झरझर जीवन प्रवास सरकात राहिला. रश्मीच्या चिंतेने थोडी खंतावली. स्वतःला सावरून पुन्हा नव्याने हसत उभे राहणं आणि प्रेमाने रश्मीला निरोप देणे गरजेचे होते.

निराशा हा शब्द विनिताच्या डिक्शनरीत नव्हताच मुळी. संघर्षातून तावुन सुलाखून निघालेले बावन्नकशी शुद्ध सोनं होते ते. अगदी झळझळीत.
अगदी आनंदी मनाने रश्मीला निरोप दिला विनिताने. नवी अशा घेऊन नव्या दिवसाचं स्वागत करायला रश्मी निघाली नव्या उत्साहाने नवे, गीत गाण्यासाठी….

“तू सदा जवळी रहा… ” भाग – 49 अर्थात टर्निंग पॉईंट घेऊन लवकरच आहे.

माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

8 Responses

    1. “तू सदा जवळी रहा… ” भाग -48 वाचून आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद सर. 🙏 वाचत रहा, अपेक्षित साहित्य निर्मिती बद्दल सल्ला द्या, आणि अभिप्राय द्या. 🙏🌺

    1. “तू सदा जवळी रहा…” भाग-50 हादगा स्पेसिअल वाचून आपण दिलेले अभिप्राय मला आनंद दायक आणि प्रेरणा देणारे आहेत. आपण माझे ब्लॉग वाचत रहा आणि अभिप्राय, सूचना देत रहा जेणेकरून मला उत्तम साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळेल. धन्यवाद मॅडम 🌹🙏

    1. रश्मी मॅम, “तू सदा जवळी रहा… ” भाग -48 वाचून आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद सर. 🙏 वाचत रहा, अपेक्षित साहित्य निर्मिती बद्दल सल्ला द्या, आणि अभिप्राय द्या. 🙏🌺 🌹

  1. NIRANJAN LIMBRAJ GIRI महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सयोंजक says:

    खूप छान

    1. निरंजन सर 🙏 नमस्कार. “तू सदा जवळी रहा… ” भाग – 48 वाचून आपण दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद सर. 🙏 वाचत रहा, अपेक्षित साहित्य निर्मिती बद्दल सल्ला द्या, आणि अभिप्राय द्या. 🙏🌺

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More

तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले

Read More

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे,

Read More

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More