“तू सदा जवळी रहा…” भाग – 45 अर्थात MOTHER’S LOVE❗️

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी, समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारी ❓️
भाग – 34* बोबडकांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37* काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच काही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकलमधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39* साठी नंतर पण….❗, खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40* मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44* “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️ मार्कस् , मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? MOTHER’S LOVE अर्थात आईचं प्रेम, माझं बाळ मिळालं‼️” करणं समजले ❗️ पुढे काय❓️अनोखा बालदिन ❗️

रश्मी जीवनदात्री कशी ❓️

मावश्या भेटल्या. भावाचा लग्न समारंभ झाला. सावी मावशीला प्रकर्षाने तिच्या अनंत अण्णाची आठवण आली.  आजोबानी आपल्या मुलांच्या लहानपणीच्या उजळवलेल्या आठवणी, विनिता जिथे लहानाची मोठी झाली तो, आचार्यांचा वाडा या साऱ्या गोड आठवणी मनात अजूनही घोळत होत्या. विनिताला आपल्या वृद्ध, एकाकी वडिलांची चिंता, काळजी वाटत असेल. ती गप्प गप्पच होती. एस. टी. तुन उतरून रिक्षात बसल्यानंतर रश्मीने धीर करून शेवटी आईशी बोलायचे ठरवले. घरी परतताना रश्मीला राहवलं नाही. संभ्रमात असलेली रश्मी शेवटी बोलली, “आई, माझ्या मनात एक प्रश्न❓️ निर्माण झाला आहे. रश्मी स्वतःलाचं ऐकू येईल इतक्या हळू आवाजात बोलली. विनितानं ऐकलं पण कानाने. तिच्या मनात आणि डोक्यात वेगळे विचार चालू होते. तिला रश्मीच्या प्रश्नावर बोलावं असं वाटलं नाही. ती वरून शांत होती पण तिच्या मनात कांहीतरी विचार चालू होते हे स्पष्ट जाणवत होते. विनिता आईला डिस्टर्ब नको करायला म्हणून रश्मीने प्रश्न स्वतः जवळचं ठेवला.


 Mother’s Love अर्थात आईचं प्रेम  


“फ़ुलं घेते पूजेकरता, हुसेनजी, दोन मिनिटासाठी रिक्षा थांबवा, प्लिज,” रश्मी बोलली. फुलांच्या दुकानाच्या बाजूला रिक्षा थांबली तशी रश्मी रिक्षेतून उतरली.
आश्चर्याने जागीच थबकली रश्मी. ‘Oh My God❗️’ तिच ती, रूपा, आपल्या, पहिल्यावहिल्या कथेची, “Mother’s Love” ची नायिका दिसली रश्मीला.
चमत्कार आहे. आज रूपा सुंदर दिसत होती. केस, तेल लावून व्यवस्थित विंचरून वेणीत गुंफले होते. चेहरा नितळ, स्वच्छ, ताण विरहित दिसत होता. आणि मुख्य म्हणजे, ती स्वावलंबी दिसत होती. “आई ❗️ खूप सुंदर” रश्मीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तसं रूपाने वर पाहिले.
“रश्मी बाळं, माझी जीवनदात्री❗️”. रूपाच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द, हृदयातून आले होते.
रुपाला मायेचा पान्हा फुटला होता. रूपाने जागेवरून उठून रश्मीला घट्ट मिठी मारली. जीवा – शिवाची मिठी होती ती, फक्त दोघीच जाणत होत्या. त्या दोघींच्या दृष्टीने
तिथे त्यां दोघींशिवाय कोणीच नव्हतं.
“मी आता वेडी नाही हं रश्मी.” समोरून रूपा गहिऱ्या आवाजात बोलली.
“म्हणजे, मी नाही समजले? तुला कोण तसं म्हंटल का ❓️” रश्मी प्रश्नार्थक मुद्रा करत विचारती झाली.
“रश्मी, तू सोडून सर्व तसेच, म्हणजे वेडीच समजतं होते मला.” समोर काळ्याभोर डोळ्यात आभाळ दाटून आले होते. केव्हाही सरी कोसळू शकत होत्या.
“तू, स्वतःला काय समजत होतीस ? आता काय समजतेस ❓️” रश्मीने प्रश्न विचारला.
“पूर्वी, मी स्वतःला काय समजत होते, ते मला माहीत नाही. पण आता, मी एका मनाने सुंदर, तरुण आणि माझ्यातल्या आईला पुनःर्जन्म देणाऱ्या मुलीची, रश्मीची आई आहे. बस❗️या व्यतिरिक्त मी कांही जाणत नाही.” समोरून रिमझिम पाऊस बरसला. “आईला पुनर्जन्म देणारी मुलगी”, किती अर्थपूर्ण बोलत होती रूपा. आईपणाला, बाळच जन्म देते. एवढं मोठं तत्वज्ञान किती सहज बोलून गेली ती. “आता हे फार होतय हं.”
रश्मी जरा नाराज होऊन बोलली.
“त्यात फार काय बाळा❓️ तू पण त्यावेळी घाण, वेडी, अभद्र म्हणून दूर गेली असतीस तर, मी अशी आज जशी तुझ्या समोर दिसतेय, तशी दिसले असते का ❓️” आता रश्मीच्या डोळ्यातून आभाळ बरसत होतं. आणि समोरचं अस्पष्ट, धूसर झालं. आणि आठ वर्षांपूर्वीची घटना आठवली रश्मीला…
‘तुला उद्या सकाळी भेटते,’ म्हणून, फुले घेऊन रश्मी रिक्षात बसली. “अरेच्या❗️ रूपाला फ़ुलं पूडीचे पैसेच दिले नाहीत.” रश्मी बोलली.
“रश्मी जी, या वेड्या रुपाला एका कॉलेजला जाणाऱ्या तरुणीने माणसात आणलाय, आठ,दहा वर्षांपूर्वी. ती देवाची सेवा करण्यासाठी फुले विकते. रूपा फ़ुलं विकण्याला, धंदा नाही समजत. प्रत्यक्ष ईश्वर सेवा समजून फुले, पत्री विकते. आणि सतत आपल्या मानस मुलीचं यश आणि कल्याण चिंतत असते. अनाथ मुलांना माया लावते.” हुसेनने वेगळीच माहिती पुरवली. “तिच्या दुकानाचं नाव वाचालत का तुम्ही ? ” हुसेनन प्रश्न विचारला
“नाही… पण हे सारं तुम्हाला कसे माहीत ❓️ काय नाव आहे दुकानाचे ?”रश्मीने हुसेनजींना विचारले. “रूपाश्मी” नाव आहे दुकानाचे’. हुसेनजी उतरले. रश्मी विचार करत असताना हुसेनजी रिक्षा चालवता चालवता पुढे बोलत होते.
“पुढचा चमत्कार वेगळाच आहे. पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळी गुंतागुंतीमुळे सिझेरिअन झाले होते रूपाचे. त्या नंतर, रूपा पुन्हा आई होणार नाही असं डॉक्टरनी स्पष्ट सांगितले होते. इतक्या वर्षानंतर जुळ्या मुलांची आई झाली रूपा. पण हे सारं घडून आलं ते, त्या कॉलेज तरुणीमुळे. अन्यथा काही खरं नव्हतं.
आणि ती कॉलेज तरुणी दुसरी, तिसरी कोणी नसून… ” हुसेनजींचे बोलणे मध्येच तोडत रश्मी किंचित आवाज चढवून बोलली ली,
“हुसेनजीsss..” तसं हुसेननं आपलं तोंड मिटून, रिक्षाला जोरात किक मारली….
✴️🌹✴️🌹🌷💃💃

गज कटी, सिंह गती ?

“ए चंदा, चल ना लवकर, नाहीतर सात पस्तीसची कॉलेज बस मिळणार नाही. मला माहीत आहे, तुला कुलकर्णी सरांचं लेक्चर मिस करायला अजिबात आवडणार नाही. मग चल, लवकर निघू.” म्हणत रश्मीने चपला चढवल्या, तसं चंदा पण तयार होऊन बाहेर आली. हातात बुक्स आणि नोटबुक्स, छोटी पर्स घेऊन एकापाठोपाठ एक धाड, धाड आवाज करत जिना उतरल्या रश्मी आणि चंदा दोघीजणी. “आता देशपांडे सरांच्या भाषेत सिंह गतीने स्टॅन्ड गाठायला हवे” म्हणत हसतचं बाहेर पडल्या दोघी. तशी शुभा भेटली खाली. छोटी अंग चण असलेल्या डॉली सारख्या दिसणारया शुभाने कॉलेजमध्ये कार्यक्रमात वॉशिंग पावडर निरामच्या जाहिरातीची नक्कल केली होती. तेव्हापासुन शुभा ऐवजी तिला निराम गर्ल म्हणून हाक मरत होते सर्वजणं. ‘वॉशिंग पावडर निरमा गर्ल, गुड मॉर्निंग’, चंदा बोलली तशा तिघी जोरजोरात हसत स्पीड पकडून चालायला लागल्या. “ए रश्मी, देशपांडे सरांबद्दल काय म्हणत होतीस तू ❓️” शुभाने विचारले. “माझ्यापेक्षा; चंदाच चांगले सांगेल तुला.” रश्मीने शुभाकडे पाहत, चंदाकडे प्रश्न सरकवला.

“परवा मराठीच्या पिरियडला देशपांडे सर, अज राजा आणि त्याची राणी इंदुमती बदद्ल सांगत होते. एकदा राजा अज आणि महाराणी इंदुमती; रॉयल गार्डन, आय मिन राजउद्याना मध्ये विहार करत होते. राणी इंदुमतीला तहान लागली म्हणून नोकराने गुलाबाचे सरबत आणून दिले. राणी इंदुमती सरबत पिताना, गुलाबी रंगाचे सरबत तिच्या मुखातून हनुवटी खालून घशाद्वारे आणि गळ्यातून उदरात जाताना स्पष्ट दिसतं होते. इतकी तिची त्वचा गोरी होती. नितळ, आरस्पानी सौंदर्य पाहून आकाशात उडणारे पक्षी तिथेच स्थब्ध होऊन राणीला न्याहाळत होते. बाजूच्या तलावात विहार करणाऱ्या हंस पक्षांनी आपला आहार, विहार क्षणभर थांबवला आणि महाराणी इंदुमतीची चाल न्याहाळत होते. सिंहकटी असलेल्या गजगमिनीची चाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. इतकी नाजूक, इतकी सुंदर राणी गवतावरून चालताना गवताच्या पात्याना कळ्या फुटल्या आणि पाऊल 👣👣🌷🌺🌹🥀🏵️💮🌸 गवातच्या कळ्यांवर ठेवण्याअगोदर कळ्यांचे सुंदर फुलात रूपांतर होई. सुंदर दृश्य होते ते.

आपण मात्र, सिंहकटी आणि गजगतीच्या पूर्णपणे उलटे आहोत. गजकटी युवती, सिहंगतीने बस पकडण्यासाठी आक्रमकतेने धपाधप पाऊले टाकत धावतचं असतात, असे सरांचे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून म्हंटले की, सिंहगतीने बस पकडण्यासाठी निघूया.” चंदाने सिहंगतीचा बस पकडण्यासाठी असलेला उपयोग शुभाला सांगितला.

माझं बाळ मिळालं‼️”

चंदा आणि शुभा बोलता – बोलता मागे राहिल्या. विशाखा, सरू, मंजू एक, एक करत मार्केट गाठेपर्यंत मुलींचा घोळका तयार झाला होता. रश्मीने क्षणभर मागे वळून पाहिले. चंदा, शुभाच्या चालण्याची गती थोडी संथ वाटली. दोघींना हाक देऊन रश्मीपुढे पाऊल टाकणार इतक्यात, बोळातून किंचाळण्याचा आवाज आला. क्षणभर रश्मी दचकली आणि स्तब्ध राहिली. आवाज ऐकून बाकीच्यांनी स्पीड वाढवून बराच पुढचा पल्ला गाठला होता. आणि एक वादळ रश्मीवर येऊन थडकलं. पुतळा होऊन राहिली रश्मी. आणि बराच वेळ, “माझं बाळ मिळालं❗️ माझं बाळ मिळालं‼️” म्हणून रश्मीच्या खांद्यावर अश्रुंचा अभिषेक करत, “ते वादळ” शांत झालं. हळू हळू मिठी सैल झाली. नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर आकाश निरभ्र, स्वच्छ आणि झाडे, वेली नितळ दिसतात तसे तिचे डोळे दिसत होते. निर्भयपणे दोघी एकमेकीना न्याहाळत होत्या. आता रश्मीचं लक्ष गेलं तिच्या सर्वांगावर. काळेभोर, लांब केस बरेच दिवस तेल नसल्याने भुरकट दिसत होते. केसांना कित्येक दिवस कंगवा/ फणी लागलेलं दिसतं नव्हते. सावळी, उंची साधारण पाच फूट एक; दोन इंच असेल. सरळ, लांब आणि टोकाला निमूळतं झालेले नाक. मळलेली साडी. अंघोळ कधी केली माहीत नाही. गाल बसलेले, डोळे किंचित खोल गेलेले दिसतं होते. डोळे इतके बोलके की, तिच्या तोंडातून निघणाऱ्या शब्दापेक्षा जास्त बोलणारे.
कोण आहे❓️, कोठून आलेय❓️, काय करतेय❓️का अशी वागतेय ❓️ कसलेच प्रश्न पडले नाहीत दोघीना.
मागून शुभाने आवाज दिला आणि मनगटाला धरून खेचल “अगं रश्मी, चंदाची अक्का, किती वेळेस मारू हाका, चल आता पटापट, नाहीतर पहिल्या पिरियडला होईल खाडा.”
“पण….,” रश्मी काहीतरी बोलू इच्छित होती.
“आता पण, बिण काही नाही. तू चल.” त्या बघ संघवींच्या दुकानाजवळ पोहोचल्या मंजू, सरू. शुभा, रश्मीची छोटी बहिणं, सई हुन छोटी झाली होती. “चल आता”, तीन पुन्हा जोर लावता, तशी नकळतपणे रश्मीने पंजा हलवून निरोप घेतला. रश्मी पुढे निघाली खरी, इकडे पाठीमागे कोणाचे तरी डोळे, रश्मीचा पाठलाग करत होते. अस्फूट शब्द कानावर आले… रश्मी बाळं❗️ माझं रश्मी बाळं ❗️आणि त्या शब्दांचा प्रतिध्वनी रश्मीच्या कानात, मनात आणि हृदयात गुंजनं करत राहिला.

*************
मैत्रिणी, पिरिअड्स, कॉलेजचे वातावरण यामध्ये नेहमी प्रमाणे रश्मी रमून गेली. कॉलेज संपल्यानंतर आपल्या नेत्रा आणि लता या मैत्रिणीं बरोबर लायब्ररीत बसून संध्याकाळी पाच नंतर घरी परतली. दिवसभराच्या एस. टी. स्टॅन्ड ते कॉलेज अशा फेऱ्या करून शेवटी बस निघून गेली होती. तिघी चालतच घरी निघाल्या. कधी विषयातील गहनतेवर चर्चा होई, तेव्हा लताचे वाक्य प्रमाण असे. तिचं विषयावर असलेलं प्रभुत्व आणि ग्रामरचं ज्ञान अर्थातच वादातीत असे. तीन तासाच्या परीक्षेमध्ये मान खाली करून लता एकदा सरसर पेपर लिहायला सुरुवात करायची ते तब्बल अडीच ते पावणे तीन तासानंतर मान वर करीत असे. लता नेहमी टॉप तीन मध्ये असायची. पण तिचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते. स्पोर्ट्समध्ये नेहमी पुढे असणारी लता अभ्यासात पण हुशार होती. तिच्या शांत आणि गोड स्वभावामुळे रश्मीची आणि तिची मस्त मैत्री जमली होती. नेहमीच्या रस्त्याऐवजी आज, लताला तिच्या घराजवळ सोडून, रश्मी आपल्या घरी आली.
दुसरे दिवशी सकाळी, अगदी त्याचं ठिकाणी, त्याचं वेळी ती पुन्हा दिसली.
“अरे, ही बघ रूपा. अज पुन्हा इथेच आली.” शुभा आश्चर्ययुक्त आवाजात बोलली. रूपा, रश्मीच्या वाटेकडे जणू डोळे लावून बसलेली. रश्मीच्या पाऊलांची गती आपोआप मंदावली.
तिच्याकडे पाहून, रश्मीची जिवणी रुंदावली. रूपा
गहिऱ्या नजरेने रश्मीकडे पाहत होती. फक्त कांही क्षणांचा, शब्दावीण संवाद, गहिरा बंध निर्माण करत होता. दोघींचे डोळे असा कोणता संवाद साधतं होते रश्मीला माहीत नव्हते. म्हणजे स्पष्टता नव्हती. जिवणी आकसून, क्षणभरचं उमटलेलं रश्मीच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह रूपाच्या नजरेने टिपले. घायाळ झाली तिची नजर. ते पाहून नजरेतलं प्रश्नचिन्ह झपाट्याने झटकून रश्मीने स्मितहास्य करून हात उंचावून बाय केला रुपाला. जडपणे हात उचलून तसाच पकडून राहिली रूपा. जणू तिला बाय करायचे नव्हते. तिने पुन्हा ते कालचेच शब्द उच्चारले, “माझं, रश्मी बाळ ‼️”

शुभाने कोंडी फोडली❗️

रूपा आणि तिचा नवरा ज्ञाना यांचा सुखाचा संसार व्यवस्थीत होता. याच गावात, छोट्या घरात राहात होती पती, पत्नी, जशी चंद्र आणि रोहिणी. तोंड देत होते संकटाना आणि नित्य नांदणाऱ्या गरिबीला. अशा या परीस्थितीला न घाबरणाऱ्या जोडप्याकडे अमूल्य असा ठेवा होता. दोघांचं एकमेकावर असणार अपार प्रेम हेच त्यांच्या आनंदाचं, उत्तम आरोग्याचं आणि हसऱ्या चेहऱ्याचं गुपित होते. आपल्या सहवासत येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधीत करण्यासाठी त्यांच्याकडे रामबाण उपाय होता आणि तो म्हणजे हास्य. रोज मेहनत करून कष्टाची भाकर, भाजी अमृताच्या चवीने खात होते. छोटी टपरी मेहनतीनं दुकानात रूपांतरित झाली. रोज घरी जाताना फुलांचा सुगंध शरीराला चिकटून असे. गोड बोलणं, हसून बोलणं आणि फ़ुलं न्यायला जणू देवचं आलाय दुकानात, अशी भावना ठेऊन प्रत्येकाशी बोलणाऱ्या रूपा आणि ज्ञाना यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. कष्ट, मेहनत यांचं फळ म्हणजे छोट्या घराचं मोठं घर झालं ते पण स्वतःच. एके दिवशी चंद्र हसला. चंदण फुललं. चाहूल लागली आनंदाची. कळी उमलली, सुगंधीत केले दोन्ही मनांना. अंगणात येणार दोन चिमुकले पाय, रांगणार, धवणार, मस्ती करणार. लागली चाहूल नव चैतन्याची. आकाश ठेंगण झालं आणि आनंद दरवळला आसमंतात.
परंतु बाळं पोटात फिरल्यामुळे ऑपरेशन झालं रूपाच. या नंतर तिला पुन्हा बाळं होऊ शकतं नसल्याच डॉक्टरांनी सांगितलं. पंख नसलेली परी अवतरली रुपाच्या घरी. नाक, डोळे आईचे आणि रंग वडिलांचा घेऊन आलेली ही बोलकी बाळं, दिसामासांनी मोठी होऊ लागली. बाळाच्या लीला, घर कामं, दुकानं यात दिवस कसं संपायचा, रुपाला समजायचे नाही. ओवी आता चालायला लागली होती. तोंडात दुधाचे दात डोकावत होते. बघता बघता तोंडात मोगऱ्याच्या कळ्यांची माळचं तयार झाली. हसताना दोन्ही गालाला पडणाऱ्या खळ्या तिचं बाळं सौंदर्य अजूनच खुलवत होत्या. अशी ही ओवी आता शाळेत जायला लागली. रोज शाळेतील गंमती सांगत बोलतं बोलत रस्ता कापणारी ओवी त्या दिवशी आईला उचलून कडेवर घेण्यासाठी हट्ट करत होती.
“काय झालं ओवी, लहान आहेस का कडेवर बसायला ❓️” रूपा जरा आवाज मोठा करत बोलली. तीनं दप्तर हातात घेतलं आणि कडेवर घेण्यासाठी ओवीला उचललं. तिला ओवीच अंग एकदम गरम वाटलं. “अंग बाई गं, ओवी तर तापाने फणफणलीय.” रूपा चित्कारली. रूपा घरी घेऊन आली ओवीला. थंड पाण्याच्या घडया ठेवल्या ओवीच्या डोक्यावर. संध्याकाळी ओवीला घेऊन ज्ञाना आणि रूपा डॉक्टर अंजलीकडे गेले. डॉक्टर अंजलीनी तात्पुरती औषधे देऊन त्वरीत जिल्हा रुग्णालयात जायला सांगितले. पण काही करण्या अगोदरच ओवीचा श्वास बंद पडला.
सारा खेळ खल्लास झाला.
आणि तेव्हापासून सैरभैर होऊन फ़िरतेय.स्वतःचे घर कोठे आहे❓️ नवरा कसा आहे ❓️सारं सारं विस्मृतीत गेलाय तिच्या. कोणाशी बोलत नाही. शुद्ध हरपली. विस्मृत होऊन जागतेय. किंबहुना स्वतःच अस्तित्वच विसरून गेलीय रूपा असे म्हंटले तर वावगे वाटू नये. स्वतःचं आणि स्वतःच्या मुलीचं नाव पण विसरलीय रूपा.
नवरा, नातेवाईक, शेजारीपाजारी सारेच तिच्या स्मृतीतून निघून गेले.
काल पहिल्यांदा रडली रूपा, तुझ्या खांद्यावर डोके ठेवून. कित्त्येक वर्षांनी शब्द बाहेर पडले तिच्या तोंडातून, “माझं बाळं मिळालं❗️” बोलता बोलता शुभाचा आवाज कातर झाला. आता तिच्या तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हता. डोळ्यातून गालावर अक्षरश: अश्रूधारा वाहत होत्या. कॉलेजच्या गर्ल्स रूममध्ये असलेला गजबजाट स्तब्ध झाला होता.

कारणं समजले ❗️ पुढे काय ❓️

रश्मीला रूपाच्या दुःखाचे कारण, रूपावर झालेला आघात दोन्ही समजलं. सावंत आणि सालडाणा सरांचे मार्गदर्शन, थोडबहुत सायकॉलॉजीचे पुस्तकी ज्ञान आणि खूप सारी सकारात्मक ऊर्जा घेऊन कामाला लागली. दिवसातील कधी एक तास, कधी दोन तास, कधी पूर्ण रविवार रूपासाठी देऊ केला. कधी कॉलेज शेजारी असलेल्या तळ्यावर, कधी गावाबाहेर असलेल्या रेणुकामातेच्या मंदीर परिसरात, कधी नाक्यावरची बाग, कधी शांत असलेलं राममंदिर ही रश्मी आणि रूपाच्या भेटीची ठिकाणं असतं.
अशी ठिकाणं निवडण्यामागे रश्मीचा हेतू स्पष्ट होता. रूपाशी गप्पा मारता, मारता तिच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं. दोन्ही बाजूनी संवाद होणं गरजेचं होतं. रूपाचं व्यक्त होणं, फार गरजेचं होतं. रूपाने खूपच प्रयत्नपूर्वक रश्मीला साथ दिली.
रुपाला तिच्या अस्वच्छ असण्याची जाणीव झाली. रश्मीला, कधी तिला लहान मुलासारखं जोजवावं लागे. कधी प्रेमाने, कधी रागे भरून समजावावं लागे. रश्मीची भूमिका खरंच आव्हानात्मक होती. कधी अंगाई गीत म्हणाव लागे, कधी हट्टी मूलीची आई होऊन बाल हट्ट पुरवावा लागे. कधी मोठं होऊन चार गोष्टी समजवायला लागायच्या. स्त्री, एक वेगळ्या रसायनाच नाव. भावनांचा गल्ला सतत भरलेला असतो. त्यात भावना आणि भावनाचे विविध पदर असतात. अलगदपणे उलघडत जाणारे पदर, भावनिक गुंता सोडवायला मदत करीत. कधी भावनेचे वेगवेगळे पदर एकत्र आणून त्यातील तरलतेला धक्का न देता कसोशीने, महत्प्रयासाने स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला मदत करी.
कधी जखमेवर खपली येऊन बोथट दिसे. मध्येच तिच्या मनावर झालेल्या आघाताची जखम सताड उघडी दिसे आणि भळभळत राही. कधी, कधी रूपाच्या हट्टापायी आणि असंबध बडबड आणि वागणं यामुळे रश्मीच्या मनात संभ्रम निर्माण होई. पण प्रयत्न चालूच ठेवले. हळू हळू आता तिला स्वतःचचं रया गेलेलं घर आणि काळजीने खंगलेल्या नवऱ्याची जाणीव झाली होती. रोज अंघोळ करणं घराकडे लक्ष देणं आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या मनावर, स्वतःचा ताबा ठेवणं आणि कठीण परिस्थितीला ठामपणे सामोरे जाणे हे रुपाला जमायला लागलं.
“आता सहामाही परीक्षेनंतरच भेटेन तुला.” रश्मीने रुपाला सांगितले आणि ती घरी निघाली. रूपा आणि ज्ञाना दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या रश्मीकडे पाहत राहिले.

अनोखा बाल दिन ❗️

आज चौदा नोव्हेंबर, बाल दिन. मुलांचा चिवचीवाट आज मनसोक्तपणे ऐकायला मिळणार होता. निरागस चेहरे, चिकित्सक डोळे, भिरभिरती नजर, चंचल पाऊले, श्रीकाराची सुरुवात करत समृद्ध भवितव्य घडविणारे हात… आणि त्या स्वप्नांना उभारी देणारे नवं शिक्षण्याची आसं घेऊन येणारी कोवळी मने… मुलांमध्ये असणारे निरागसत्व त्यांच्याकडे आकृष्ठ करते. बाल क्रीडा करणारी बालकं नक्कीच मनाला प्रफुल्लित करतात.

रूपाची सकाळपासून घाई गडबड चालू होती. तीनं जरीकाठी, लाल साडी नेसली. डोळ्यात काजळ कोरलं होतं. कपाळाला लाल टिकली चिकटवली. लांब केसांची सुबक वेणी घालून मोगऱ्याचे गजरे माळले. ज्ञानाने पांढरा शर्ट आणि विजार घातली होती. कपाळावर बुक्का लावून तो तयार होता.
रूपा झालीस का तयार❓️किती वेळ❓️ आवरा लवकर, सर वाट पाहत असतील. रश्मीने बाहेरून रुपाला हाक दिली. रश्मीच्या आवाजाने रूपा आणि ज्ञाना एकदम बाहेर आले. रश्मीच्या तोंडाचा ‘आ’ तसाच राहिला. वासलेला, ‘आ’ तसाच ठेऊन स्वतःशीच बोलत राहिली रश्मी. काय म्हणून यांना…❓️ लक्ष्मी-नारायण की, शिव – पार्वती, राम – सीता, विठ्ठल – रखुमाई की, ज्ञाना – रूपा म्हणू ❓️❓️❓️ नको, आपण ज्ञाना – रूपाचं म्हणु. आणि हिच्यासाठी “आई” योग्य शब्द आहे, “ज्ञानाई – रुपाई”, रश्मी मोठ्याने स्वगत बोलली.
आता रूपा लाजत होती. ज्ञानाने भिवंया उंचावून एकदा रश्मीकडे आणि एकदा लाजणाऱ्या रूपाकडे पहिले. रूपा – ज्ञाना दोघांची नजर भेट झाली.
“चला, लवकर निघू,” म्हणून ज्ञानाने आपल्या हातात काही पिशव्या घेतल्या आणि रिक्षेतून तिघे शाळेच्या गेटजवळ पोहोचले. शाळेचे ट्रस्टी आणि मुख्याध्यापक वाट पाहत होते. आज मुलांचा किलबिलाट रूपा आणि ज्ञानाच्या जीवनात पुन्हा चांदणं फुलवत होतं.
रूपा – ज्ञानाने, आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या एका मुलीच्या शिक्षणाची जबादारी स्वीकारली होती. सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी मुलीची आई, रूपा, ज्ञाना, मुख्याध्यापक आणि ट्रस्टी या सर्वांनी आज, “बाल दिनाचा” मुहूर्त साधला. स्वतःच्या हाताने बनविलेल्या जिलेब्या मुलांना देताना, आज रूपा आणि ज्ञाना असंख्य मुलांचे हास्य झेलत स्वर्गीय आनंद उपभोगत होते. दोघांच्या चेहऱ्यावरून
वेगळेच समाधान ओसंडून वाहत होते.
“मानवी सरं, खरंच तुमचे आभार कसे मानावेत ❓️ मला समजत नाही. मी तुमची ऋणी आहे ❗️” म्हणत रश्मीने दोन्ही हात जोडले आणि ती निघाली.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आणि रूपा – ज्ञानाच्या जबरदस्त इच्छेपोटी चमत्कार झाला. अभंग आणि ओवी या बालकांचे एकाच वेळी रुपाच्या घरी आगमन झाले. कित्येक वर्षांनी रुपा मधल्या आईचं प्रेम पुन्हा हसत होतं

रश्मीला आज कित्येक वर्षांनी रूपा, फुलपूडी घेताना समोरच दिसली. रूपाने स्वत:च्या हाताने दिलेल्या फुलांचा सुगंध, रश्मीच्या हाताना सुगंधित करून, सर्वत्र दरवळत होता. “आईचं प्रेम”, ज्यानं रश्मीच्या मनातील पूर्वीच्या संकल्पना बदलून टाकल्या. आईच प्रेम सूर्यासारखं, सकाळच्या कोवळ्या किराणांनी मनाला आल्हाद देणारे, उब देणारे, जीवन देणारे, आनंद देणारे, सर्वाना अगदी मुबालक आणि निशुल्क उपलब्ध असणारे अपार, अमर्याद, अमाप होते. इतर चार महाभूतांपेक्षा वेगळं असणारे तेज – सूर्यप्रकाशाइतके सत्य “आईचं प्रेम”.
आईच्या प्रेमाच्या खोलीला, समुद्राच्या गहराईची उपमा दिली जाई, कधी आकाशाच्या उंचीची, कधी खोली न समजणाऱ्या डोहाची. कधी अथांग वाटे, कधी ब्रह्मांड सामावून जाई तिच्या प्रेमात. ‘आईचं प्रेम,’ भावना एकचं परंतु व्याप्तीची कल्पनाचं नसलेले एक त्रिकालाबाधित सत्य. म्हणून तर विठ्ठलाला ‘विठू माऊली तू, माऊली जगाची sss’ म्हणून आळविले जाते. ज्ञानोबांना “माऊली” संबोधले जाते. जिथे अथांग, अफाट, अमर्याद आणि असचं कांही असते, तिथे आई असते. आणि जिथे आई असते तिथे हे सर्व असते. ज्याला आई आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे ❗️❗️

माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर

इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

2 Responses

  1. खूप सुंदर विचारांची माळ वाचण्यास मिळत आहे.

    1. नमस्कार राधा मॅडम. “तू सदा जवळी रहा…” ही मालिका वाचून आपण दिलेले अभिप्राय मला पुढील साहित्य निर्मितीस प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद मॅडम 💐🌹 . भाग ४६ लवकरच आपल्या भेटीस नवीन काहीतरी घेऊन येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles
vithal

English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”

हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

Read More

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More