भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते…
भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण..
भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या कुसुमताई च्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….
भाग – 5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते 🙏 रश्मीला आणि कुटुंबियांना…
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि… सदृश्य जीवन.
भाग -7* एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग- 8* आईचं मानस-दर्शन, राजेशची प्रकर्षाने आठवण
भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?
भाग – 10 * साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो-खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवाच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11 * मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टुकाका ? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12* सुचिताची प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कसं टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का ? चंदाला आकाशात काय दिसलं?
भाग -13* रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलने का मारतात?
भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी ? काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना का भेटली? सरानी पेढे का मागितले?
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का ? रश्मी बद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत?
भाग-16* विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटल वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या 🙄 डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?
भाग – 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते ? पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले?
भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं? खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न
भाग -19* आत्या की मैत्रीण, 💮 फिरकी? अतरंगी😂 बंटी
भाग – 20 कोणाची परीक्षा? कोण होता मोनादादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा?
भाग – 21* विनिताचं नेमाक काय आणि कोठे चुकलं? श्याम दादांचं विनिताला आश्वासन..!
भाग – २२ * रश्मीचे नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस ⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग – 23 * कॉलेज, जीम, रक्तदान🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ
भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच भाग – 25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते!, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ.. भाग – 26, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27 * नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली ? काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं? भाग – 28* 👉 आंडं, कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे? महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी, सुकलेलं बकुळफ़ुल
भाग – 29 * सुकलेलं बकुळफुल पार्ट – 2, दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…, प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक, राम नाम…., मदर तेरेसा 🌷, डॉक्टरांसाठी शिबीर, तुम्ही कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर? गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी.
भाग – 30* वा च न, जिओग्राफी टीचर, नाटक, गाणं, सावध मनाची मदत, गुरु तारी त्याला कोण…. ? भेसूर रश्मी, रश्मीची केरळ ट्रिप, “तेथे कर माझे जुळती…🙏”
भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडकांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग, स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच काही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️❓️कोणासाठी खरेदी ❓️❓️
काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️
हातातली कादंबरी इतकी इंटरेस्टिंग होती की, रश्मीने शेवटचं पान वाचलं आणि मगच हातातून खाली ठेवलं पुस्तक. दरम्यान होस्टेलच्या रूममध्ये कसलातरी सुगंध दरवळत होता. शिवांगी शॉपिंग करून आली. जीत आपल्या ताईला भेटून आली. गीत मावशीकडून परतली होती. रोज अंघोळ करून फ्रेश होऊन आपले कुरळे केस सुकवण्याचा प्रयत्न करत होती. गोऱ्या मानेवर काळे कुरळे केस सुकवतांना स्वतःच बडबड करत होती. गंगा आत येतायेता रोजला, नाराज असल्याचे कारण विचारत होती. “काही नाही गं गंगाss; कालच तीनशे रुपयाची शाम्पूची बाटली आणली होती. माझ्या मेलीच्या हातातून निसटून फुटलीन गंss. आता वैतागू नको तर काय करूsss ❓️ नाकातून हेल काढून कोकणी सुरात रोजने नाराजीच करणं सांगितलं तशा रूममधल्या साऱ्याजणी चुटपूटल्या.
दरवाज्यातून मंजुळ पण खणखणीत आवाजात कुणीतरी शायरी म्हंटली, म्हणून सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या.
अत्तर की बोतल, पत्थर से फोड दो ||
जीत, गीत, गंगा सर्वांनी एका सुरात, “वा वा ‼️ वा वा ‼️‼️ ” 😆😄😃 केलं तसं आत येत परमने एका सुरात शायरी पूर्ण केली..
अत्तर की बोतलं पत्थर से फोड दो |
प्यार ♥️ करना नही तो, स्टाईल मारना छोड दो ||
क्या बात हैं परम आज ❓️ एकदम से प्यार, तोडने, फोडने की बाते कर रही हो ‼️ जितने; स्वतःच्या भूवया उंचावत 😏 परमला खिजवलं.
“अरे यार, अत्तर का सुवास पुरे हॉस्टेल को सुगंधित कर दिया हैं | कौनसा पर्फ्यूम था रश्मी ❓️” परमने रश्मीकडे मोर्चा वळवला.
“अरे यार परम, मै तो पॉइझन परफ्युम यूज करती हुं | ये तो रोज की नई वाली, सेन्टेड शाम्पू की बोतलं टूट गई |” रश्मीने अघळ पघळ हात पसरत, जबडा पसरून मोठी जांभई देत बोलली.
“रश्मी आणि जांभई 😩😱हे कसं श्यक्य आहे?” गीतने रश्मीच्या पोटाकडे गुदगुल्या करण्याच्या अविर्भावात हात नेला, तसं रश्मीने पटकन स्वतःचं अंग आकसून घेतलं.
“मी मुलांसमोर, कार्यालयात, किंवा बाहेर जांभई देत नाही. झोपेतून उठल्यावर, घरी असताना ठीक आहे ना गं. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे ❓️” रश्मीने गितला जांभईबाबत समर्थन देण्याचा प्रयत्न केला
“….तरीपण जांभई संसर्गजान्य आहे असं तूच म्हणतेस ना,” रोजने गितला साथ देण्याच्या बहाण्याने बाजी रश्मीवरचं पलटवली.
“रोज, वैसे भी कांच का टुटना शगुन होता हैं ❗️ चलो, अच्छी न्यूज आ जायेगी |” परम हसत बोलली.
“यार, मेरा नुकसान हो गया. तीनसो रुपये की शाम्पू बॉटल थी | दो महिनेका शाम्पू गीर गया मेरा |” रोज पुन्हा हळहळली.
दरवाज्यावर टिक टिक झाली तसे, रूममधले आवाज शांत झाले.
काकू मार्केटमध्ये जायच्या तयारीत, हातात पिशव्या घेऊन आत आल्या. “रश्मी तू इथंच आहेस ❓️ गेली नाहीस बाहेर ❓️” काकूंनी विचारले.
“काकूss, आज रविवारची सुट्टी आहे. मी कुठठेsssच जाणार नाही आज”. रश्मी उतरली.
“सुहासचे सासरे आले होते. तेव्हाचं मी हाक दिली होती तुला. तू खाली जाऊन भेटली नाहीस त्यांना❓️” काकूंनी पृच्छा केली.
“काकू, ना मी सुहासला ओळखते ना तिच्या सासऱ्याना.” रश्मी उतरली.
“पुस्तकातला 📚 किडा 🗾 झाली की, कांही भान😇 नसतं हिला” रश्मीकडे नाराजीने पहात काकू स्वतःशीच पण जोरात पुटपुटल्या
“लेकिन, सुहास का ससूर, सुहास को मिलेगा ❗️ रश्मी को क्यूँ मिलेगा 🤣 ❓️” शिवांगी बोलली
“ये शिवांगी, तू रूपा फ्रंट लाईन्स की, ऍडव्हर्टाइज की जैसे क्यूँ बात कर रही हैं ❓️ ये रूपा का पेहनेगी❗️ तो रूपा क्या पेहेनेगी 😜🤣😂😇❓️❓️”
“फालतू पी. जें… असतात या मुलींचे…..😄” रेक्टर काकू मान आणि हात झटकून बोलल्या.
“ये रश्मी, तू ओळखतेस त्यांना. सुरुवातीला तेच तर हॉस्टेलवर घेऊन आले होते तुला”. काकू जोर लावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या.
“काकू तुम्ही सुहासच्या सासऱ्यांचा चेहरा लक्षात ठेवलाय अजून ❓️ अं sss अं sss 😜 ❓️” जीतच्या अंगात मस्ती भारली होती. ती चक्क काकूंची फिरकी घेत होती.
“जीत तू थांब तिथंच 😏, मी कोणाचा चेहरा लक्षात ठेवलाय❓️ ते सांगते, थांब तुला” काकू जितला धोपटायला हातात काय मिळतंय का❓️ म्हणून इकडे तिकडे पहात बोलत होत्या. काकूंचा उत्साह आणि जोश तितकाच सळसळता होता जितका होस्टेलच्या मुलींचा होता. त्यात नवाकाळ न्यूज पेपरची लांब घडी करून गीतने काकूंच्या हातात दिली आणि डोळा बारीक करत बोलली, ” काकूंची चेष्टा 😜 करते म्हणजें काय ❓️झोडा तिला.”
काकूंनी त्याच न्यूज पेपरने गीतला फटका दिला.
“आऊच ❗️ लागलं ना काकू ” खूप मार लागल्याचा अविर्भाव करत गीत बोलली.
जीत कबड्डी खेळण्याच्या अविर्भावात, “आजा, आजा” करत काकूंना आव्हान देत होती.
“चोंबड्या कुठल्या ❓️” म्हणत काकू परमच्या बेडवर बसल्या.
“काकू, माझ्याबरोबर शिवानी दिदी आली होती हॉस्टेलवर सुरुवातीला”. रश्मीला पहिला दिवस स्पष्ट आठवत होता.
रश्मी पटकन खाली जाऊन रजिस्टर चेक करून आली. भेटीबाबत तिथं कोणतीही नोंद नव्हती.
“काकू, भेटीसाठी कोणी आल्याची नोंद नाही. मी स्वतः रजिस्टर पहिले.” रश्मीने काकूंना सांगितले.
रश्मीच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. रेक्टर काकूंनी उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा उजवीकडे मान वाळवून असमाधान 🤥 व्यक्त केले.
“जाऊ दे. त्यांना भेटायचं असेल तर पुन्हा येथील.” म्हणत काकू बाजारात जाण्यासाठी उठल्या.
“काकू, ये सुहास के ससुरजी को और एक लाडका हैं क्या ❓️सुहास जीं का छोटा देवर वगैरा हैं क्या ❓️ मेरी पेहेचान 😜 करावा दो ना प्लीज” रिया एक डोळा बारीक करत रश्मीला खिजवायला बोलली, आणि खसखस पिकली.
तशा काकू🤓 हसत बोलल्या, ” अरे वा ‼️, गुडग्याला बाशिंग‼️”.
“ओह नो काकू. एकदम बाशिंगवर कुठे मजल मारताहेत❓️” रिया पापण्या झुकवून बोलली. तिचे गाल ☺️ लाल झाले होते. लाजेमुळे पापण्या 😌झुकल्या होत्या.
जीत, रोज आणि गीत तिघींनी एकमेकींकडे पाहून चूटकी वाजवली आणि आणि हातात ताट, चमचा पकडून एकाचवेळी सुर धरला, ” नाने नं निनन, नननाने नीनन, ने नौन नो नीननन नाना, नेना ननं ननं नुननाया, नेना ननं ननं नुननाया ssss ” म्हणत तिघींनी रिया भोंवती फेर धरला, तसं रियान रश्मीला मध्ये खेचल आणि धिंगाण्यात काकूसुद्धा सामील झाल्या. टाळ्या वाजवत ठेका धरला. “रिया क्या बात हैं ❗️ ऐसे शरमा रही हो 😊‼️” परमने पृच्छा केली
“जाने ना नजर sssss पहेचाने जीगर ये कौन जो दिलपर छाया❓️
मेरा अंग अंग मुसकाया sss मेरा अंग अंग मुसकाया sss मुसकाए .”
“ए वरुन बोल आता, एक, दो, तीन वरून बोल. ताटाचा आवाज आणि इतर गोंगाटात रोज जोरजोरात बोलली. रोजने स्वतःच म्युझीक ट्रॅक सुरु केला. “ला ला ला ssss ला ला ला ला ला ला ss ला लाss ला ला ssss… ” आणि इतरांनी साथ दिली. काकू गोल उभ्या असलेल्या मुलींचा ग्रुप सोडून जवळच्या बेडवर बसल्या आणि पायानी ठेका धरला. रोजने त्यांच्या हातात स्टीलंच ताट चमचा दिला.
“टवाळखोर 😃 पोरी, मला ताट वाजवायला लावतात❗️” लटक्या रागाने बोलत पायाच्या ठेक्याबरोबर काकूंनी भांड्यांवर ठेका धरला
“एक, दो, तीनsss चार, पाच, छे, सात, आट, नौ, दसss ग्याराss, बारा, तेरा ssss
तेरा करू दिन, दिन गिन केssss इंतजार आजा पिया आयी बहार sss…….”
वर्किंग विमेन्स हॉस्टेलमधल्या सर्व अठरा रूममधील मुली रश्मी, रोजच्या रूममध्ये जमल्या. एवढ्या आवाजात, गोंधळात रेक्टरकाकूपण सामील आहेत बघून आश्चर्य आणि आनंदात, दाटीवाटीत सगळ्यांनी उभ्या उभ्या जागेवरच ठेका धरला आणि गाण्यात सगळ्यांचा आवाज मिसळला.
शंकरीने जोरात आवाज करून विचारलं, ” ये नाच, ये गाना, बजाना चल रहा हैं ❗️ बहुत बडिया ‼️सिलेब्रेशनकी कोई खास वजह हैं क्या ❓️
“दोन करणं आहेत सिलेब्रेशनची.” रश्मी उतरली. “आं ❓️❓️❓️” रेक्टर काकूंसहित, साऱ्यांचं हॉस्टेल वासियांच्या चेहऱ्यावर करणं जाणून घ्यायची उत्सुकता स्पष्ट दिसत होती……
रेक्टर काकूंसहित सर्वांच्या 😏🤔 भूवया उंचावल्या. सुरुवातीपासून आपण इथं असून आपल्याला करणं माहीत कशी नाहीतं 😏🤔 😇 ❓️ हा भाव गीत, रोज, शिवांगी, रिया, जीत, रेक्टर काकुंच्या चेहऱ्यावर दिसला. करणं ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले. शांतता पसरली आणि नजरा रश्मीवर स्थिरावल्या.
तशी पोझ घेऊन रश्मीनं विचारलं, “सचमुच सिलिब्रेशन की वजह जानना चाहते हो ❓️” “हां बाबा हां ; सचमुच सेलेब्रेशन की वजह जानना चाहते हैं |” गोंगाट करत समोरून एकत्र उत्सुकतापूर्ण आवाजात उत्तर आलं. तसं रश्मी बोलली, “एक आहे, बेबजह 😜 याने निष्कारण आणि दुसरे आहे विनाकारण😜😜.”
हवा काढलेल्या फुग्याची📍🎈 अवस्था झाली सर्वांची. रश्मीच्या पांचट विनोदात आणि खळखळून हसण्यात सर्वजण सामील झाल्या.
कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️
नाच गाण्याचा गोंगाट💃🕺💃🕺 कमी होतोय न होतोय तोच, रोजने कोणालाही विश्वासात न घेता अंऊन्समेंट केली. “काकू आज रात्री आमच्यापैकी कोणीही जेवायला नसणार आहोत. आम्ही बाहेर जेऊन येणार आहोत.”
रश्मीने भूवया उंचावून 🤔 रोजकडे पहिले आणि ग्रुपवर नजर टाकली. कोणीही रोजच्या अनौन्समेंटवर, काहीच प्रतिक्रिया दिली नाही. काहीक्षण शांत राहून सर्वांनी पुनःश्च, “हुर्योsss” केला.
रविवारी सकाळी बाहेर गेलेल्या मुली एरवी संध्याकाळी उशिरा होस्टेलवर परतत असत पण आज इतक्या लवकर कशा परतल्या आणि जेवणाचा प्लॅन केव्हां बनवला ❓️ रश्मी आ वासून विचार करत राहिली.
सव्वा चार वाजता बाहेर पडायची अंऊन्समेंट परमने केली तेंव्हा भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह ❓️ रश्मीच्या चेहऱ्यावर दिसलं. रश्मीच्या बाजूला असलेल्या ग्रुपमधून खुसूरपुसूर झाली….
हॉस्टेलमधील प्रत्येक मुलीने बाहेर जाण्यासाठी तयार व्हायला आपआपली रूम गाठली. तशा काकू स्वतःचं बोलल्या, “आता माझ्या सुंदर चांदण्या तयार होऊन बाहेर पडतील.” त्यांच्या चेहऱ्यावर एका पाठोपाठ दोन भाव दिसले. एक तरुण मुलींची काळजी भाव 🤭आणि दुसरं सुंदर तरुण मुलींच्या सहवासानें प्राप्त उत्साह😊 भाव.
“रश्मी, तू व्हाईट आणि ऑरेंज कलरचा ड्रेस घाल ना.” रोज आग्रही आवाजात हेल कडून बोलली.
“तू पिंक ड्रेस घाल.” जीत बोलली
“ए रश्मी, तू शिवानी दिदीने दिया हुआ ग्रीन डिझाईनवाला व्हाईट ड्रेस पेहनो नं | उस ड्रेस मे तुम बहुत सोबर लागती हो | ” परमनं सुचवलं.
सर्वांचे ऐकले रश्मीने पण स्वतःच्या आवडीचा नेव्ही ब्ल्यु ड्रेस घालून तयार झाली. हेअरक्लिप लावून अबोलीचा गजरा केसात माळाला, पॉईझन पर्फ्यूम फवारून रश्मी तयार झाली तेंव्हा, साऱ्यांच्या नजारा खिळल्या तिच्यावर.
“फुलों सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान हैं…” जीत गुणगुणली
“ए, हिला कोणताही रंग शोभून दिसतो.” गंगा बोलली.
शंकरी हसून मान डोलवत बोलली, “सही हैं यार |”
रोज, गीतं, परम, जीत, गंगा आणि इतर मुलींवरून नजर हटत नव्हती. जणू सौंदर्याचा उत्सव अवतरला. वेगवेगळे परफ्यूम्स, फुले🌷🌼🌻🌸💮🏵️, फेस पावडरचे वास एकत्र मिसळून वेगळा माहोल तयार झाला. सर्वजाणी चिवचिवाट करत होस्टेलच्या गेट बाहेर पडल्या तेंव्हा काका, काकूंना वाटलं, आकाशातून उतरून तारकाच 💃👯🧛♀️🧚♀️🧚♀️🧜♀️रस्त्यावरून चालताहेत.
रिक्षा जेव्हा मूवी थेटर समोर थांबल्या तेंव्हा रश्मीला पहिला झटका बसला. म्हणजे हे सारे पिक्चरचे आणि बाहेर जायचे प्लांनिंग अगोदर पासून ठरवून ठेवलेलं होत आणि ते फक्त रश्मीलाच माहीत नव्हते. इतकं कॉन्फीडेनशिअल ठेवलं होत सारे आणि ते पण इतक्या साऱ्यामुलींनी मिळून. बायका आणि मुलींच्या पोटात गुपित कांही राहत नाही, तोंडात तिळ भिजायच्या अगोदर गुपित गोष्टी बाहेर, शेजारणींना सांगितल्या जातात या लहानपणा पासून दृढ असलेल्या समजुतीला छेद गेला. स्त्रिया व मुली कोणतीच गुप्त गोष्ट गुप्त ठेवतं नाहीत ही समजुत पक्की होण्यासाठी काही खास गोष्टी सांगितल्या जातात त्यातली एक गोष्ट राश्मीला आठवली आणि रश्मी खुदकन हसली❗️ तशी जीत आणि रियाने एकाच वेळी प्रश्न विचारला. “ओये रश्मी, अकेली अकेली क्यों हस रही हो ❓️ हमेभी बताओ हसनेकी वजह.” “आत्ता, इथं कावळ्याची गोष्ट सांगू ❓️”रश्मीने प्रतिप्रश्न केला. “ओह, स्टोरी हैं क्या ❓️ तो रात को सुनेंगे.” रिया हसत 😄 बोलली.
आज सर्व मैत्रिणींनी मिळून एव्हढ अफलातून सरप्राइज गिफ्ट दिलं की, दिल ♥️ खुश हुआ रश्मीका |
गोविंदा, चंकी पांडेचा अफलातून कॉमेडी असलेला, आँखे पिक्चरने साऱ्या जणींचा मूड हलका फुलंका बनवला. त्यां नंतर हॉटेलमध्ये जेवण घेऊन परतल्या तेंव्हा रुटीनपेक्षा वेगळे, जरा हसरे, खेळकर वातावरण होते. गप्पा, गोष्टी चेष्टा मस्करी, जोक्स ई. मध्ये हॉस्टेलच्या गेटवर पोहोचल्या तेंव्हा नऊ वाजून पन्नास मिनिटे झाली होती. सर्वजण बाहेर उभ्या राहूनच बोलत होत्या. आणि बरोबर नऊ पंचावन्नला होस्टेलची बेल वाजवली.
होस्टेलच्या नियमाप्रमाणे साऱ्याजणी दहाच्या आत घरात (हॉस्टेल मध्ये )आल्या होत्या.
किती कावळे उडाले ❓️❓️
पिक्चर झाला, बाहेर जेवण झाले. वेगळ्या मूड्मध्ये नवीन येणाऱ्या दिवसाला उत्साहाने सामोरे जाण्यासाठी साऱ्याजणी गप्पा ठोकत होत्या. तेवढ्यात रिया रूममध्ये आली. रिया आणि जीत रूममध्ये आल्या आल्या, “रश्मी, ओ दोपहर जो बोला रही थी, कौवेवाली स्टोरी बताओ ना ❗️ म्हणून अग्रही झाली आणि सारेच उत्सुक झाले. “वो ❓️ कौवे वाली स्टोरी ❓️ अरे, वो तो बच्चो के लिये हैं | तुम सबकी उम्र तो राजकुमार की स्टोरी सुननेकी हैं |” रश्मीने गोष्ट सांगणे टळावे म्हणून बहाणे बनविले. ओह ❗️ ऐसा तुम सोचती हो, तो ठीक हैं | हम थोडा आगे का सोचते हैं | हैं ना पोला ❓️” रोज डोळे मीचकावत तिची मैत्रिणी पोलाला विचारलं तसं पोला लाजून चूर झाली. पोलाचे लग्न ठरले होते आणि ऑफिसमध्ये एक महिन्याची नोटीस देऊन आली होती आणि शेवटचे तीन दिवस झाले की ती, हॉस्टेल सोडून नव्या जीवनात पदार्पण करण्यासाठी निघून जाणार होती.
एक होता राजा. समृद्ध राज्य होते त्याचे. सर्वजण सुखी होते त्याच्या राज्यात. दुःख दोनच गोष्टीच होते प्रजेला. पण त्यां दोन्ही दुःखावर कोणालाच उपाय मिळेना. उपाय शोधून शोधून सारे हैराण झाले. त्यां दोन पैकी एक गोष्ट होती गरमी. गरमीमूळे दिवसा चैन नाही अणि रात्री आराम नाही. गरमीच्या समस्येमूळे राजा पण बेचैन झाला. शेवटी राजाने दवंडी पिटविली.
“न मोडणारा, न तुटणारा, न खराब होणारा, न दुरुस्तीची आवश्यकता असणाना पंखा कोणी बनवेल त्याला राजा मागेल ते बक्षीस देईल. पण जर पंखा तुटला, मोडला किंवा ना दुरुस्त झाला तर पंखा बनवणाऱ्याला देहदांडाची शिक्षा होईल.” आत्ता पर्यंत पंख्याच्या निर्मितीसाठी भले भले लोक येऊन गेले होते. राजाने पिटविलेल्या दवंडीमधील शिक्षेच्या भीतीने कोणी समोर येईना आणि प्रयोगात्मक वृत्ती खुंटून गेली. बरेच दिवस उलटून गेले तरी असा, “अमर पंखा” कांही मिळेना. कोणी चंदनाचा लाकडी पंखा, कोणी धातूचा पंखा करून आणला होता पण टिकला नाही. कोणी चांदीचा आणला, कोणी सोन्याचा पंखा आणला, कोणी रत्न जडीत पंखा आणला. राजा हे सर्व पाहून खुश होत असे पण कांही दिवसात पंखा नादुरुस्त होई आणि राजा नाराज होई. अमर, अतूट पंख्यासाठी दवंडी पिटून बराच काळ लोटाला. “न जाणो; राजा रागाने देहदंड देईल तर आपले जीवन गमावून बसू”, म्हणून राज्यात सर्वजणं ‘ चिडीचूप ‘ होते. आता दरबारात बसून कामं करणेही कठीण झाले होते. दरबारी कामकाज करणे अपरिहार्य होते म्हणून नियमित दरबार भरत असे.
अचानक एके दिवशी भरल्या दरबारात एक किरकोळ शरीरयष्टीच्या तरुणाने प्रवेश केला. खणखणीत आवाजात राजाचे, “अमर पंख्याचे” आव्हान स्वीकारत असल्याचे बोलला त्यां वेळी सर्वांच्या नजारा त्यां अनोख्या तरुणावर खिळाल्या. त्यां तरुणाने, “अमर पंखा” राजाला भेट देणार असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावरून तो तरुण हुशार तर वाटतं होताच पण त्याच्या धाडसचं दरबारीं जनांना कौतुक वाटलं. राजासहीत सर्व दरबारीं जनांना खूपच आनंद वाटला आणि उत्सुकता ताणली गेली. “राजन, मी तयार केलेला पंखा फाटणार नाही, तुटणार नाही. माझा पंखा मोडणार सुद्धा नाही.” तो तरुण आपल्या पंख्यांची स्तुती करत पंख्यांची वैशिष्ट्ये सांगत होता. “ओह, खूप छान,” राजाने उत्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसें दरबारीजन आणि त्यां तरुणाचा उत्साह द्विगुणित झाला.
त्यां तरुणाने आपल्या हातातील पिशवी मधून एक कागद काढला. तो कागद बऱ्याच ठिकाणी घड्या करून हातपंखा बनवला होता. “राजन, हा पंखा हातात पकडायचा, चेहऱ्या समोर धरायचा आणि मन उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे हालवत राहायची. पंख्याला अजिबात हलवायचे नाही. तो कधीच तुटणार मोडणार किंवा फाटणार नाही‼️ हा “अमर, अतूट पंखा” आहे. कथा संपवून रश्मीने दीर्घ श्वास घेतला….
“दुसरा फुसका बार.” जीत फुसफूसली. “इधर कौवा कहा हैं ❓️❓️❓️ ” परम धूसपुसली.
यही राजा के राज्य मे दुसरी समस्या थी, जिससे सभी प्रजाजन हैराण | परेशान थें | समस्या का कोई हल नाही था |
ऐसी क्या समस्या थी, जिसका राजा भी, हल नाही निकlल सकता था ❓️❓️ शिवांगीने विचारले. संडास रूम नाही थें लोगोंके के लिये. ऐसेही गांव के बहार जाना पडता था लोटा ले के | उप्पर से सुंवर 🐖🐷🐖 आते थें | ये अच्छी बात थी की, सुंवर की बजह से गंदगी जल्दी साफ हो जाती थी | लेकिन सुंवर की संख्या इतनी बढ गयी थी की, लोगो को शांतिसे टॉयलेट करने नही देते थें |
लोकसंख्येपेक्षा डुकरांचा सुळसुळाट जास्तच झाला होता राजधानीत. जसे कोणी तांब्या, बादली घेऊन बाहेर पडे 🚶♂️🚶त्याच्या पाठी डुक्कर, 🐖🐷🐖 डुक्करीण आणि त्यांची पिल्ले पाठी लागतं.
असाच एका संध्याकाळाच्या वेळी छोटी बादली घेऊन, भीमा टॉयलेटसाठी गावाबाहेर निघाला. जस तो दोन दगडावर बसला तसं डुकरांची फॅमिली त्याच्या मागावर आली. डूक्करांना हाकलण्यासाठी त्याने जवळ पडलेला एक खडा उचलून फेकला तशी आवाज करत डुक्करे दूर गेली पण चिकट आणि जिद्दी स्वभावाची डुक्करे भीमाचा पिच्छा सोडेनात. आता भीमाने जवळचा थोडा मोठा दगड उचलला आणि दुसरया दगडावर आपटतं राहिला, जेणेकरून डुक्कर कंपनी जवळ येणार नाही. जमिनीत असलेला टोकदार दगड वरून होणाऱ्या आघाताने सैल झाला आणि “टणं” असा आवाज आला. जोराचा आणि वेगळ्या प्रकारे आलेल्या आवाजामुळे जवळपास भटकणाऱ्या डुक्करांचा कळप दूर पळाला. भीमाचे कुतूहल चाळवले आणि पुन्हा त्याने जोरात दगड आपटला. पुन्हा तसाच पण जरा जोरात “टणण ssss” आवाज झाला आणि प्रतिध्वनी घुमला जमीनित असलेला दगड भीमाने बाजूला सारून पहिला.
“अबबबबबब sssss”
डोळच्या👀 पापण्या ब्लीन्क 😱 झाल्या नाहीत. श्वास थांबला, वसलेला “आss”😆 तसाच राहिला.
असं काय पाहिलं भीमानं ❓️❓️❓️
न कळत दगड होता तसा ठेऊन,
विचार करत भीमा घरी आला. रात्री जेवण झाल्यानंतर सगळीकडे सामसूम झाली आणि सारा गांव झोपी गेला.
भीमा कुदळ आणि फावडे घेऊन बाहेर पडला आणि घरी “काहीतरी” घेऊन आला. घरी “काहीतरी” लपवून ठेवले
दुसरे दिवशी नेहमी सारखे कामं सुरु केले. दुपारी भीमाच्या बायकोने त्याला जेवायला वाढले. जेवताना “काहीतरी” च्या आठवणीने त्याचे डोळे चमकले. चेहऱ्यावर प्रसन्नत पसरली आणि खुदकन हसू फुटले. आपला नवरा भीमा एकटाच का हसतोय❓️ याचे आश्चर्य वाटले हौसाला. हट्टी, जिद्दी हौसाला माहित होते नवऱ्याकडून सत्य कसं काढायचे. लाडात येऊन तिने नवऱ्याला हसण्याचे करणं विचारले. बायकांच्या मनात कोणतेही सिक्रेट राहात नाही. खरी गोष्ट हौसाला सांगितले तर ती आपल्या सख्याना बढवून चढवून, तिखट मिठ लावून सांगणार आणि आपण अडचणीत येणार. भीमाला पटकन जें सुचले ते त्याने सांगून टाकले…. आणि भीमाची बायको, हौसाचे हसू कांही थांबेना.
“आग हौसा, खुळी की काय तू❓️ किती हसतीस❓️❓️ थांब की आता.”
आट दिवस झाले असतील राजाने भीमाला दरबारात हजर राहण्याचे फर्मान काढले. भीमाचा अंदाज खरा ठरला. एका गोणपाटात भीमराव “काहीतरी” घेऊन दरबारात हजर झाला. “काय भीमराव ❓️❓️ काय ऐकतोय आम्ही…. आज काल कावळे उडताहेत संडासला बसल्यावर असं ऐकतोय आम्ही. दहा कावळे उडाले, तुम्ही संडासला बसल्यावर हे खरं आहे का ❓️”
आता भीमरावला त्याची बायको हौसाबरोबरचे बोलणे आठवले. “खुदकन एकटेच का हसताय? मला पण सांगा हसण्याचं करणं,” म्हणून हौसाने लाडात येऊन विचारलेल्या प्रश्नाला भिमरावाने अफलातून उत्तर दिले. “संडासला बसलो तेंव्हा ढुं…. तुन एक कावळा उडाला.” डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणाऱ्या हौसाने तीची मैत्रिण सुमीला दोन कावळे उडाले म्हणून सांगितले. सुमी तिची मैत्रिण, मैत्रिणीची, मैत्रिणी करत करत.. राणीची दासी, आणि राणीकडून राजापर्यंत एक कावाळ्याचे दहा कावळे झाले होते.
राजासमोर खोटं बोलून फायदा नव्हता; हे भीमा समजून चुकला. तेंव्हा भीमरावाने राजाला खरी गोष्ट सांगितली…
“संडासाला बसल्यावर, त्रस्त करणाऱ्या डूकरांना हुसकवायला दगडावर आवाज करता करता त्याला सोन्याने भरलेला एक हंडा मिळाला होता. जर खरी गोष्ट बायकोला सांगितली असती तर एका हंड्याचे दहा हांडे झाले असते. मी कोठून जमा करणार होतो इतके हंडे राजदरबारात ❓️” भीमराव बोलले.
भीमाच्या चाणाक्षपणाचे राजाला कौतुक वाटले. त्याचा हंडा त्याला परत मिळालाच पण राजदरबारात कामही मिळाले. आणि राजाच्या दरबारातील लोकांच्या मदतीने भीमरावाने स्वच्छतागृहे बांधली आणि लोकांना डुक्करांच्या त्रासापासून वाचविले.
कोणासाठी खरेदी ❓️❓️
रश्मीने, बहिणीला भेटायला जायचं आहे आणि तिच्या करता काही खरेदी करायची आहे म्हंटल्यानंतर जीतच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला. ईस्टवरून वेस्टला जाणारा रस्ता क्रॉस कारण्यासाठी सिग्नलची वाट पाहून थकल्या दोघी. खूप मोठा सिग्नल होता. प्रचंड रहदारी, धूळ, गाड्यांचा कर्णकर्कश्य हॉर्न, फुलवल्या मुली, बायका त्यांच्या पोटाला बांधलेल्या झोळीत लहान मुलं. मध्येच फडके घेवून गाडीची काच साफ करणारा पोऱ्या. ए. सी गाडीतून सैर करणारा झिपरा डॉगी, वितभार लांब, लालभडक जीभ बाहेर काढून, तोंडातील दात आणि सुळे दाखवत “हॅ sss हॅ sss” आवाज करत गाडीच्या खिडकीतून तोंड बाहेर काडून श्वास घेणारा बुल डॉग, सिग्नलची वाट पाहणारे प्रवासी…एवढ्या कंटाळवण्या परिस्थितीतही जितची जोक कारण्याची सवय गेली नाही. “आपण, कार्बन खातोय अक्षरशः” तोंडासमोरून डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हाताच्या पंजासहित बोटं फ़िरवत जीत बोलली. क्रॉसिंगसाठी सीग्नल काही मिळेना दोघीना. “बहुदा, इथंच म्हाताऱ्या 🧝♀️🧝♀️होऊ दोघी”, जीत बोलली तसं चमकून, हसत रश्मीने 😄 जितकडे पहिले. जीतनं रश्मीचा हात पकडला आणि दोघीनी रस्ता क्रॉस केला.
समोर भव्यदिव्य शोरूम, चकचकित लाद्या, क्रिष्टल क्लिअर काचा, स्वच्छ आरसे, ड्रेस, ड्रेस मटेरियल, साडया, किड्स वेअर, मेन्स वेअर, एथनिक वेअर, पार्टी वेअर. “अबब” बस. वेगवेगळी दालनं, तेथील कर्मचाऱ्यांचा आदरभाव आणि वस्तू विकण्यासाठी आवश्यक स्किल पाहून रश्मीचा खरेदीचा उत्साह वाढला.
“आईये, रश्मी मॅडम | आईये जीत मॅडम |” म्हणून दुकानातील व्यक्तीने आवाज दिला. तेंव्हा रश्मीच्या प्रश्नार्थक नजरेतील, आपल्या दोघींचं नाव समोरच्या व्यक्तीला कसं माहित ❓️हा भाव जीतला कळला.
“अंतर्यामी ❗️ अंतर्यामी ‼️आहेत या शॉपिंग मॉलमधील सर्व लोक ❗️ आता ते तुला काय घ्यायचंय आहे❓️ हे पण न सांगता ओळखतील इथले लोक❗️” जीत वेगळया पण गोड आणि मजेदार आवाजात ओठांचा चंबू करत बोलत होती.
ट्रेमध्ये स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन आले कोणीतरी.
“रेडिमेड कपडोंका डिपार्टमेंट थर्ड फ्लोअर पे हैं मॅडम. ये रही लिफ्ट.” काचेची लिफ्ट आली आणि लिफ्टचा दरवाजा ऑटो ओपन झाला, तश्या दोघी आत गेल्या. थंडा थंडा, कूल कूल लिफ्ट मधून बाहेरच जग स्पष्ट दिसत होत. माणसे, बिल्डिंग्स, झाडे, फुले, आकाश आणि लिफ्टच्या एका बाजूला आरसा होता.
• रेडिमेड कपड्याची मांडणी आणि दिखावा सुंदर आणि पद्धतशीर होती. त्यामध्ये पण सुक्ष्म विभागणी केली होती. कॉटन, सिंथेटिक, जरतारी, सोबर आणि रंगछटा नजरबंद करणाऱ्या आणि अफलातून होत्या. सात रंगाच्या सत्तर छटा कशा होऊ शकतात❓️ हे “रंगो का मेला” पाहिल्यावर लक्षात येई.
•
• पुढील भागात वाचा चंदा 🌕 🌞 रश्मी भेट….
• रश्मीच्या डोळ्यात आनंदाश्रू का आले❓️ वाचा, “तू सदा जवळी रहा…” भाग – 44 मध्ये
ranjanarao. Com ला भेट द्या आणि वाचन साहित्य मिळावा …🙏🌺
how to : https://bit.ly/3jNAUl5
story time : https://bit.ly/2Z1r33u
poems : https://bit.ly/3lP8OI4
8 Responses
Its wonderful portray with full of vivid dramatisatiion …..All characters connected with silken thread of appreciation.
Madamji you are amazing amazing writer.
Meet it up 👍👍👍👍
हॅलो शेख सर. 🙏नमस्कार. “तू सदा जवळी रहा…” भाग – 43 वाचून त्या वर अभिप्राय दिलेत. आपले अभिप्राय मला उत्तम साहित्य निर्मितीला प्रेरणा देतील. पुठवीचे भाग आणि इतर साहित्य वाचण्यासाठी ranjanarao.com या site ला भेट द्या.
तसेच आपल्याला अपेक्षित साहित्य निर्मितीसाठी विषय सुचवू शकता. पुनःश्च धन्यवाद 🙏🌺
रसभरीत वर्णन असलेल्या प्रसंगांची रेलचेल हे आपल्या लेखनाचं वैशिष्ट्य! ह्या भागात सुद्धा आपण क्षणात हॉस्टेलमधल्या धमाल करणाऱ्या मुलींमध्ये वाचकाला नेता तर रस्ता क्रॉस करतानाचा अनुभव तर प्रत्येकाला कधी न कधी आलेला असतोच.
मूड्सचं वर्णन करताना मूड्स छान पकडता.
एक भागात 4 ते 5 एपिसोडसचं मटेरियल असतं. ह्यावर एक छान लोकप्रिय सिरीयल नक्की होऊ शकेल. Main ट्रॅक सोबत Side ट्रॅकस सुद्धा मस्त खुलवता.
अशाच लिहीत रहा.
🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
नमस्कार 🙏 मनीषा भावे मॅडम. “तू सदा जवळी रहा…” भाग 43 वाचून आपण भरभरून दिलेले अभिप्राय खरोखरच प्रेरणादायी आहेत. आपण दिलेला प्रस्ताव हा खरोखरच विचाराना प्रवृत्त करणारा आहे. आपल्या शुभेच्छा सर आखोंपर 🙏🙏🌹
सुरेख मांडणी
हॅलो शेख सर. 🙏नमस्कार. “तू सदा जवळी रहा…” भाग – 43 वाचून त्या वर अभिप्राय दिलेत. आपले अभिप्राय मला उत्तम साहित्य निर्मितीला प्रेरणा देतील. पुठवीचे भाग आणि इतर साहित्य वाचण्यासाठी ranjanarao.com या site ला भेट द्या.
तसेच आपल्याला अपेक्षित साहित्य निर्मितीसाठी विषय सुचवू शकता. पुनःश्च धन्यवाद 🙏🌺
“तू सदा जवळी रहा…” भाग 43 वाचून आपण दिलेले अभिप्राय प्रेरणादायी आहेत. धन्यवाद सीमा मॅडम 🙏🌹
“तू सदा जवळी रहा…” भाग 43 वाचून आपण दिलेले अभिप्राय प्रेरणादायी आहेत. धन्यवाद सीमा मॅडम 🙏🌹