“तू सदा जवळी रहा…” भाग – 42 अर्थात ये है मुंबई मेरी जान ! !

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते…
भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली चिंता आणि रश्मीला आठवलेलं बालपण..
भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या  कुसुमताईच्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….
भाग – 5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता,  प्रार्थना बळ देते  🙏रश्मीला आणि कुटुंबियांना…  
भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि… सदृश्य जीवन. 
भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सारं अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8* आईचं मानस – दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण  
भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार ? 
भाग – 10 * साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो – खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गावदेवाच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11 * मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका ? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* सुचिताची प्रश्नावली, श्री आणि विनिता, घराचं घरपण कसं टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली ? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  
भाग -13*, रश्मी खोटं बोलते ….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीणबाई चप्पलने का मारते? 
भाग -14 * काय दिलं गुरुजींनी ? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी? काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली विनिता रश्मीच्या सराना का भेटली? सरानी पेढे का मागितले ?  
भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मीबद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश,  सरूताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत होत्या ?
भाग-16*   विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी ?  का वेगळं वाटल वातावरण ? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या 🙄 डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? 
भाग- 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते ? पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी ? कुसुमताई,  सर, विनिता दरवाजा बंध का करतात ? केदारकाका, रश्मी  कुठे गेले ? काका, काकू रश्मी कुठे गेले ? 
भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं ?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न
भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮फिरकी? अतरंगी 😂 बंटी  
भाग -20   कोणाची परीक्षा ? कोण होता मोनादादा ? उपाय काय ? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनादादा?
भाग -21* विनिताचं नेमकं काय आणि कोठे चुकलं ? श्यामदादाचं विनिताला आश्वासन..!  
भाग – २२ * रश्मीचं नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा 💦💦💨, तंबाखू आणि बरचं काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती.
भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदान🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ
भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2 – श्रध्दा असेल तरच..
भाग -25* वॉटर फॉल, डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिंग, फिशपॉंड , महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते !, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ..
भाग – 26* दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27*  नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली ? काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं? भाग – 28* 👉  आंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगडं आहे? महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली भूमी, सुकलेलं बकुळफ़ुल
भाग – 29* सुकलेलं बकुळफुल पार्ट – 2,  दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…,  प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक,  राम नाम….,  मदर तेरेसां 🌷,  डॉक्टरांसाठी शिबीर,  तुम्ही  कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर?   गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी, 
भाग – 30*  वाचन,   जिओग्राफी टीचर,  नाटक,  गाणं,  सावध मनाची मदत,  गुरु तारी त्याला कोण…. ?   भेसू .. रश्मी,   रश्मीची केरळ ट्रिप,  “तेथे कर माझी जुळती…🙏”
भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोऱी .. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडं कांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37* काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचारमंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदीच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकलमधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39* साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40* मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग -42  काय मिस केलं रश्मीनं ❓️ वेगळी, “मी मुंबई “, कोणीच नाही सोबतीला❓️ आहे की ‼️ बालिकांचं अंजनीस्तोत्र,  विनिता  काकु  मरत का नाही लवकर ? रेणुका देवी – लक्ष्मी भेट ❗️

पुढे वाचा …

नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️

कावळ्यांची काव काव, चिमण्यांचा चिवचिवाट, पोपटांचा विटु – विटु, सुतार पक्षांचा टक – टक, भुंग्यांचा भुंगारव, मनीचा म्यूँव – म्यूँव, सापाची सळसळ, नागाचा फुत्कार, माकडांचा हूप – हूप आणि करकर, कुत्तूचा भो – भो, पाण्याची खळखळ, पावसाची टिपटीप – रिपरिप, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट हे आणि असेच सारे नैसर्गिक आवाज मागे पडले होते. जन्माअगोदरपासून जो आवाज रश्मीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही असणारा विनिता आईचा आवाज, शेकडो किलोमीटर दूर राहिला. तो आवाज आणि आणि त्या पाठीमागची भावना, उद्देश्य सगळंच समजायचं रश्मीला. कधी न बोलता विनिताच्या चेहऱ्यावरील हावभावावरून, हालचालीवरून आणि कधी त्याही पलीकडे जाऊन दोघी एकमेकींच्या मनातील गोष्टी न बोलता ओळखायच्या. टेलिपथी असं म्हणतात म्हणे, मनाचा मनाशी चाललेल्या संवादाला.

रश्मीच्या पायातल्या पैंजणांचा छम छम आवाज रेल्वेच्या खडखडाटात विरून गेला. दोन्ही आवाजच, पण रिदम वेगळा होता. आता रश्मीचा मुंबईशी संवाद सुरु झाला. मुंबई आणि तिच्याशी संबंधित सर्व गोष्टींची दखल आवर्जून घ्यावी लागायची. लहानपणी पुस्तकात वाचलेली, ‘नको ग नको ग अक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन’ ही रेल्वे आणि जमीन कविता आठवत राही. या अफाट गर्दीत खरोखर ओळखीचे चेहरे दिसतात का ❓️ अन्यथा सारेच मुखवटे. गर्दीला कसला आलाय चेहरा…..❓️❓️

वेगळी “मी, मुंबई”

एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या सुविधा आणि पर्याय असू शकतात आणि ते सर्व पर्याय आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात हा अनुभव सुखद वाटत होता रश्मीला. कांही काळासाठी एकाच छताखाली राहणाऱ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या, मैत्रिणी आणि प्रत्येकीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, चर्चा वादविवाद रश्मीला हॉस्टेलमध्ये सुद्धा अनुभव – समृद्ध बनवत होते. कुठेही जाण्यासाठी पायी तर जाता येत होतेच पण सायकल, स्कुटर, बाईक, मेल, लोकल ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, कॅब, आणि उड्डाणासाठी विमान उपलब्ध होऊ शकत होते. स्कर्ट, ब्लॉऊज, मॅक्सी, चुडीदार, पंजाबी ड्रेस, साडी आणि जीन्स- शर्ट इत्यादी पेहरावाचे पर्याय माहित होते रश्मीला. इथे मुलींसाठीच्या कपड्यांचे पर्याय पाहून स्वतःच्या अज्ञानाची कीव करावी की, नवीन फॅशन डिझायनर आणि ती फॅशन आपलीशी करणाऱ्या आधुनिक तरुणीनां सलाम करावा याचा रश्मी विचार करत राही. नेहमी मैत्रिणींच्या घोळक्यात असूनपण प्रत्येक वेळी एकच जिवलग मैत्रिण असे तिला. एकाच वेळी गुणसंपन्न आणि प्रेमळ इतक्यासाऱ्या मैत्रिणी पाहून जीव हुरळून गेला रश्मीचा. तिच गत स्नॅक्स आणि जेवणाच्या पदार्थांची. नाश्त्याचे हार्डली दहा, पंधरा पदार्थ माहीत असलेल्या रश्मीला जेव्हा “शंभर दिवस शंभर वेगवेगळ्या नाश्त्याचे प्रकार”, हे पुस्तक हातात मिळाले तेंव्हा तिचा स्वतःच्या कल्पकतेचा अभिमान गळून पडला. एखादा पदार्थ बनविण्यासाठी इनग्रेडंट्स बदलून किती प्रकार होऊ शकतात हे विचारप्रवृत्त करायला लावणारे होते. आई, ताई आजी, काकू, आत्या, मावशा या आणि इतर आपल्या घरातील सर्व महिला मंडळ, अक्कू, अनु, सखू आणि कष्टकरी बायका मंडळी आणि शेजारच्या वहिन्या, मावश्या, काक्या, ताया या सुगृहिणी; उपलब्ध धान्य, फळभाज्या व पालेभाज्या आणि फळापासून बरेचं वेगळे आणि चवीचे पदार्थ बनवत असत. हे सर्व पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवत असल्याचे आठवून, लोकल -> ग्लोबल-> लोकल बरोबर ग्लोकल (ग्लोकल- ग्लोबल प्लस लोकल ) हा पृथ्वी गोल असल्याचा पुन: प्रत्यय देणारा रोचक अनुभव खूपच रसपूर्ण होता.

मुंबई, बॉम्बे, बम्बई, माया नगरी म्हणतात मुंबई महानगराला. स्वप्ननगरी म्हणतात मुंबईला. तारकानगरी म्हणतात. स्वप्न पहा आणि त्या दृष्टीने प्रयत्न्य करा, मुंबईत ते पूर्ण होणारच. मुंबई मूळ कोळी लोकांची आहे असे म्हणतात. जगभरातल्या सर्व लोकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे या स्वप्ननगरीत. मुंबई चकाकत्या जगाचं प्रतिनिधित्व करते. मुंबई यंत्रवत माणसांबरोबरच कुशल कारागीरानी भरभरून वाहत असते. येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत असते. रंग – रूप, स्त्री – पुरुष – ट्रान्सजेंडर असे ती भेदभाव करत नाही. श्रीमंत – गरीब असो, मेहनती – आळशी, वास्तववादी – स्वप्नाळू सर्व तिचेच असतात. उंच भरारी घेऊ इच्छिणाऱ्याच्या पंखात बळ देऊन, आकाश हेच मर्यादास्थान असल्याची जाणीव करून देते मुंबई. गगनचुंबी इमारती मान उंचावून पाहायला लावतात. नजर उंचाऊन पाहताना डोळे दीपतात आणि आठवते आकाश आणि क्षितिज. आकाश जमिनीला जिथे मिळते ते काल्पनिक ठिकाण म्हणजे क्षितिज. आकाश म्हणजे नजर जाईल तिथंपर्यंत किंवा नजरे पलीकडेसुद्धा. म्हणजेच अमर्याद प्रगती करा हा संदेश मिळतो मुंबईमध्ये. तसेच जमिनीला सरपटून असणारी झोपडपट्टी राहण्यासाठी छत देते. मुंबईत फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी प्रवेश केलेल्या लोकांच्या प्रगतीच्या कथा थक्क करणाऱ्या आहेत. मुंबई आणि मेहनत, कष्ट यांचे एक वेगळे नाते आहे. मुंबई आणि कष्ट, मेहनत आणि यश यांचे वेगळच गणित असते. इथं कष्ट करणाऱ्याला पोटभर अन्नाची ददात नसते. इथं “पोटा पुरता पसा पाहिजे…..” म्हणून आलेल्या लोकांची झोळी खरोखर दुबळी वाटेल इतकं छाप्पर फाडून मिळत राहते. अठरा पगड जातींना सामावून घेणारी मुंबई, एकाचं जातीला अधोरेखित करते. एकच जात मानव जात. एकच प्राणी माणूस प्राणी, सुधारित अन् समाजशील.

सात बेटांचं शहर मुंबई. बेटं बनवणाऱ्या पाण्याला अलगदपणे हटवून नगरी झाली. तिचं महानगरात रूपांतर झालं. शहरात सातत्याने येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेता घेता उपनगरांची संख्या वाढलीं तसेच नियोजनबद्ध नवी मुंबई वसवली गेली. मुंबईला असणाऱ्या प्रत्येक ठिकाणाला आणि स्टेशनला मिळालेल्या नावामागे अर्थ आहे तसाच इतिहासही आहे. मुंबईची जीवनवहिनी या नावाने ओळखली जाणारी लोकल रेल्वे, चर्चगेटपासून दहिसरपर्यंत आणि व्ही. टी. पासून कर्जत, खोपोली, पनवेलपर्यंत धडधड धावत असते. रात्रंदिवस असंख्य प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे कामं करत राहते ही जीवनवाहिनी. ती पण नदीसारखीच आहे. कोणाशीही भेदभाव करत नाही. असंख्य स्टेशन्सनां रोज अव्याहतपणे भेटून, शेकडो फेऱ्या करणारी ही जीवन वाहिनी कोणत्याही कारणाने थांबली की, मुंबई ठप्प झाली समजतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटाचा मुकाबला करून त्वरित पूर्ववत होऊन नव्या उत्साहाने नवा दिवस सुरु करते मुंबई. चौसष्टहुन जास्त कला आणि असंख्य कलाकारांच्या चांदण्या लेऊन स्वतःला झगमगवत राहते मुंबई. इतिहास घडवणाऱ्या माणसानां आणि रेकॉर्ड मोडणाऱ्या वीर बहाद्दरांना प्रेमानं सांभाळते मुंबई. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारी मुंबई महाराष्ट्राचीचं नव्हे तर देशाची शान आहे. प्रत्येक मुंबईकराला तिचा अभिमान आहे.

कोणीच नाही सोबतीला❓️आहे कीsss ‼️

अशा या रंगीबेरंगी स्वप्ननगरीत, नोकरीच्या निमित्ताने रश्मी आली. आणि रश्मी मुंबईची आणि मुंबई रश्मीची कधी झाली समजलेच नाही. तेजोमय मुंबई, रश्मीमय. नकळतपणे प्राप्त परिस्थिती आणि पूर्वकाळाची तुलना होई. गावात सातत्याने खंड पडत चालणारा विज पुरवठा त्यामुळे संथपणे चालणारा गावगाडा आणि येथील झगमगाट आणि डोळे दीपवणारी रोषणाई आणि न थांबता अव्याहतपणे चालणारा येथील व्यवहार जिवंतपणाचं जातिवंत उदाहरण आहे मुंबई. तिला थांबता येत नव्हत. अहोरात्र कर्म करत राही मुंबई.

भिरभीरती नजर आणि नजरेच्या टप्प्यात येईल ते टिपत राहणे, मनाला भावेल ते मन कप्प्यात साठवून ठेवणे, कमी बोलणे आणि ऐकून घेणे रश्मीच्या ज्ञानात आणि अनुभवात भर टाकणारे होते. जीवनाबद्दलचे नवे वास्तव, राहणीमानाचे नवे आयाम, गरजा आणि आवश्यकता यांचे वेगळे सूत्र आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन खुणावत होता. कामाच्या धाबाडग्यात आठवडा संपायचा. स्वस्थ बसणं स्वभावातच नसलेल्या रश्मीला, रविवार रिकामा; रिकामा आणि सुस्त वाटायचा.

“आपण रविवारी नाटक पाहायला जाऊया ❓️” रश्मीने प्रस्ताव ठेवला तसा हॉस्टेलमधील एकएकीने त्यांचे भरगच्चं प्लॅन सांगितले. प्रत्येकीचं रविवारचं नियोजन तयार होतं. गीत मावशीकडे धाव घेई. जित बहिणीकडे निघे. कोणी आठवड्याचे कपडे धुवायला काढतं. कोणी शॉपिंगसाठी रविवार वापरत असतं. “नाही गsss रश्मी. तुला माहित आहे नां ❓️ 😇 मला रविवार सुस्तावलेला आवडतो आणि आराम करण्यासाठी असतो. नो घाई, नो गडबड.” म्हणून रोज आरामात पडून राही बेडवर.

कोणाचीही कंपनी मिळणार नाही या रविवारी, ही खूणगाठ मनाशी बांधून रश्मी, हातात पुस्तकं घेऊन वाचत बसली.

लहानपणी, रविवार असलातरी सकाळी लवकर उठून फुलं, दुर्वा, तुळस आणणे, रांगोळी रेखाटणं, देवमुर्त्या, तसबिरी स्वच्छ करणं या व इतर कामाबरोबर मळ्यात फेरफटका मारणे, देवपूजा करणं, ताजी फ़ुलं वाहणे त्याच बरोबर बँकेची आणि इतर कांही कामं असतील तर आईला मदत करणे अन्यथा मळ्यात या टोकाच्या बांदापासून त्या टोकापर्यंत हुंदडणे यामध्ये बालपण गेलं. कॉलेजमध्ये शिकताना आणि विज्ञान संस्थेत नोकरी करताना सतत काहीतरी शिकत राहिली रश्मी. स्वतःला कामकाजात व्यस्त ठेवलं. मन आणि मेंदू रिकामं राहू नये यासाठी जाणते अजाणतेपणी पूर्वी रश्मीवर मी रविवारी काय करू ❓️ असं म्हणण्याची वेळ आली नाही. पण होस्टेलवरचा रविवार सुस्तावलेला पाहून त्यावर उपाय शोधला.

वाचन रश्मीचा आवडता छंद. खूप छान पुस्तकa हातात असलं की काळ वेळेचं भान विसरत असे रश्मी. ना वेळेचं ना जेवणाचं भान, ना कसले आवाज ऐकू येत. पुस्तकाबरोबर स्वतःचं एक वेगळं जग आकार घेई आणि त्याच विश्वात रममाण होई रश्मी. आज रविवार असल्यामुळे अशीच रेलून पुस्तकात गढून गेली. सकाळी चहा, नाष्ट्यासाठी बाहेर पडलीच नाही. स्वतः पुस्तकात गढून गेलेल्या रश्मीला दुपार झाली तरी भुकेचं भान नव्हतं. वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे, मित्र – मैत्रिणी यांच्याकडून मिळत असलेलं ज्ञान खरोखरच वाचकाला आणि भेटकाला प्रगल्भ बनवते यावर तिचा दृढ विश्वास होता. पुस्तकातील पात्रांचे एकमेकांशी चाललेले संवाद वाचता वाचता रश्मी स्वतः केव्हां पात्रात जाऊन बसली हे तिला समजलेच नाही. हॉस्टेलमधल्या काकूंनी दरवाजा ठोटाऊन रश्मीला हाक दिली आणि त्या त्यांच्या कामाला निघून गेल्या. रश्मीची खास मैत्रीण रोज, बेडमध्ये स्वतःला ताणून देऊन आराम करत होती. काकूंच्या आवाजाने बेडमध्ये चुळबुळ करून रोजने पुन्हा तोंडावरून पांघरूण घेऊन गुडूप केले. एकदम कडत पाण्यात कपडे बुडवून साबण चोपडून चोपडून स्वच्छ धुतले आणि घट्ट पिळून कपड्यांची बादली घेऊन जीत बाथरूममधून बाहेर आली. “काकू कोणाला आवाज देत होत्या❓️” या जितच्या प्रश्नाला कोणीचं उत्तर दिला नाही. कादंबरी वाचता, वाचता एवढ्या सुंदर कादंबरीतील भाची असणारे छोटं पात्र आपल्या स्वतःच्या विधवा मामीबदद्ल घृणा व्यक्त करत होते. आपल्या मामेभावंडांबद्दल आणि मामीबदद्ल भाची वाईट बोलते. “वाणी मामी मरत का नाही❓️” हे छोट्या सुनैनाचे आई, वडिलांशी बोलणे आणि आई, वडिलांचे गप्प राहणे रश्मीला अस्वस्थ करून गेले. तसं पहिले तर पुस्तक होते ते. काल्पनिक पात्रे होती ती. रश्मीला अस्वस्थ होण्याची काहीच गरज नव्हती. रश्मीची चुळबुळ झाली. हातात पुस्तकं असून सुद्धा तिला स्वतःच्या लहानपणीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला.

बालिकांची , प्रार्थना ‼️

वास्तविक पाहता शनिवारची शाळा सुटली की चंदा, रश्मी झपझप रस्ता कापून मळा गाठतं असतं. परंतु आज छोट्या सईला घेऊन विनिता आई मळ्यातून गावात आली होती. शाळा सुटली तशा चौघीजणी शाळेजवळच्या मारुतीच्या देवळात गेल्या. द्रोणागिरी पर्वत उचलून आकाशात उड्डाण करण्याच्या अविर्भावात असलेली काळ्या पाषाणतील हनुमान मूर्ती पाहून नमस्कार केला. हनुमानाची पोजिशन घेऊन उभं राहण्याचा अविर्भाव करणाऱ्या चंदाच्या वर्गातील उदयसिंग नावाच्या लहान मुलाला पाहून छोटी सई जोरजोरात हसायला लागली, तस विनितानं वळून पाहिलं. चंदा छोट्या सईचा हात पकडून तिला मंदिराच्या गाभाऱ्यात चालण्यासाठी खेचत होती. मंदिरात देवदर्शन घेणाऱ्या लोकांना, त्रास नको आणि आपल्या आवाजामुळे शांती; भंग नको व्हायला याची काळजी छोटी चंदा घेत होती आणि सईला हळू आवाजात गाभाऱ्यात चल म्हणून सांगत होती. आता उदयसिंगबरोबर सदा, आणि तुका ही मुलेपण हनुमानासारखे तोंड करून द्रोणागिरी पर्वत तळ हातावर पकडल्याचा अविर्भाव करत होते . “चौरंगला चार पाय, गिड्ड्या तुझं नाव काय ❓️” म्हणून वैजून बुटक्या आप्पाला चिडवलं तस सदा आणि तुक्या हनुमानाची पोजिशन सोडून, “गिड्ड्या तुझं नाव काय ❓️” असा प्रश्न विचारून जोरजोरात हसायला लागले. माळी काका पुज्याऱ्याने, “शू sss शू sss” करून मंदिरात आवाज न कारण्याविषयी दटावलं. चंदा आणि सईने पितळेच्या घंटेचा आवाज केला आणि गाभाऱ्यात प्रवेश करून नमस्कार केला. काळ्या पाषाणाच्या हनुमान मूर्तिसमोर कोणी खडेमीठ ठेवले होते. कोणी काळे अक्खे उडीद ठेवले होते. कोणी ज्वारी, कोणी गहू, तांदूळ ठेवले होते. समईतील ज्योतीच्या प्रकाशाने गाभारा भरूनराहिला होता. प्रदक्षिणा सुरु करून चंदा आणि सई दोघीनी आपल्या कोवळ्या आवाजात मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती || वनारी अंजनी सुता, रामदुता प्रभंजना || महाबली प्रणादाता सकाळ उठवी बळे || सौख्यकारी दुःख हारी दूत वैष्णव गायका ||…….. हे धरा पंधरा श्लोके लाभली शोभली बरी ||…. अकरावी प्रदक्षिणा पूर्ण करत, इति श्री रामदास कृतम् मारुती स्तोत्रम संपूर्णम || 🙏🙏 म्हणून नमस्कार केला.

बालिकांचे, “अंजनीस्तोत्र”

गाभाऱ्यातून बाहेर येऊन सई आणि चंदा मूर्तीसमोर पद्मासनात घालून खाली बसल्या. एकमेकिंकडे पाहून मंदिरातील मूर्तीवर नजर केंद्रित केली. त्यां दोघींचं असं खाली पद्मासनात बसणं एकमेकींकडे पहाण आणि भुवया उंचावून आणि मानेने खुणा करणं ना रश्मीला कळलं, ना विनिताला. अनपेक्षितपणे विनिताला सरप्राईज मिळाले ‼️ एकाच वेळी दोघींच्या बाल आवाजात चौपाई बाहेर पडली, आणि गजबज आणि इतर आवाज स्थब्द झाले.

राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमानकी || 🙏 आता रश्मीपण साईच्या बाजूला बसली. तिघींच्या मुखातून एकाचवेळी पुनश्च्य चौपाई पुकारली,

राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🙏 ||श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || 🙏

लंकेहुनी अयोध्य येता | राम लक्ष्मण सीता | हनुमंते अंजनीमाता | दाखविली रामा || चौघी केला नमस्कार | काय बोले रघुवीर | ‘माते तुझ्या कुमरे थोर उपकार केला’ ||

श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || 🙏

( आता कोरसमध्ये मंदिरात खेळणाऱ्या मुलांनी स्वतः होऊन साथ दिली )

ऐकून पुत्राची ही स्थूती | माता तूच्छ मानी चित्ती || व्यर्थ का बा रघुपती | वाहसी भार || हा की माझ्या उदरी आला | गर्भीहुनी नाही गळला | आपण असता कष्टवीला श्रीराम माझा ||

||श्री राम जय राम जय जय राम | |जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान ||🙏

…… अहिरावण महिरावण जाण, घात करिता अमुचा प्राण देवीरूपे दोघांजण रक्षियले याने ||……. अठरा पद्मे वानर भार, श्रमे युद्ध केले फार | शिळा सेतू हा सागर समाप्त केला ||

श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान ||🙏

ऐकून पुत्राची ही स्थूती, माता तुच्छ मानी चित्ती | रावाणादिकही बापूडी घुंगुरटी काय ……….. वेणीदंड परतवीला | लंकेलागी वेढा दिधला | आणोनी रामाशी दाखविला अंजनी माते ||

श्री राम जय राम जय जय राम || जय हनुमान, जय हनुमान ||जय जय जय जय जय हनुमान ||

सीता बोलें अंजनीशी, ‘का कोपशी बालकाशी ❓️’ रामे आज्ञा हनुमंताशी दिधली नव्हती || अत्यंत जिवलग सखा हनुमंत भक्त निखा रामदास पाठीराखा महारुद्र तो || …………..

श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान, जय जय जय जय जय हनुमान || श्री राम जय राम जय जय राम | जय हनुमान, जय हनुमान || जय जय जय जय जय हनुमान || 🙏🙏🙏🙏 राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🙏 राम लक्ष्मण जानकी | जय बोलो हनुमान की || 🥀🥀🙏🙏

चौघी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन मंदिरातून बाहेर पडल्या.

ती बालपणाची रश्मी, आई विनिता आणि छोट्या चंदाबरोबर आपल्या नातेवाईकांच्या दरवाजात पोहोचली. आज चंदाला आपल्या भावंडानां भेटायची इच्छा होती.

“विनिता .. कू मरत का नाही लवकर ❓”

ती बालपणाची रश्मी, आई विनिता आणि छोट्या चंदाबरोबर आपल्या नातेवाईकांच्या दरवाजात पोहोचली

पहिला आश्चर्याचा धक्का बसला‼️ नातेवाईकांच्या पाहुण्या आणि त्यांच्या बहिणी एकत्र गप्पा मारत होत्या. एक वाक्य ऐकून विनिता आणि तिघी बहिणी हदरल्या. जी लहान मुलं विनिता का…., म्हणून अंगाखांद्यावर खेळली आणि प्रेमाने स्वतःचे लाड पुरवून घेतले त्या लहान बालक असलेल्या मुलांच्या मुखातून बाहेर पडलेले विखारी शब्द ऐकून श्वास थांबला कांही क्षण ❗️ पाऊले थबकली जागेवर ❗️ कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवलाच नसता अशा गोष्टींवर. पण स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि… “विनिता ….कू मरत का नाही लवकर ❓”

कोण बोलत होत असं ❓️ बालबुद्धी एवढी विखारी नसते. बालकांचे विचार पूर्वग्रह दूषित नसतात. मुलं तर निष्पाप असतात. बाल मुखातून देव बोलत असतो. पण इथे वेगळेच रंग दिसत होते. गहिरे❓️ की काळी बाजू. अशा विचारांना थोपवून बाल मनाला वेगळे आणि चांगले सूसंस्कारीत करणे हे पालकांचे, मोठया माणसाचे, घरातील वडिलधाऱ्यांचे पहिले कामं असते.

“आई, नातेवाईक तर्हेवाईक असतात.” चंदा उच्चारली. हे वाक्य की, प्रश्न या विचारात गढली विनिता. कावळ्याच्या शापाने गाय नाही मरत. हे गाईला समजतं. कावळा जाणूनबुजून गाईचा द्वेष करतोय. गाईला नमस्कार करणं, मालकाचे, प्रेमाने गाईच्या पाठीवरून हात फिरवणे, त्याच्या अर्धवट काकदृष्टीला टोचत राहते आणि तो गाईला शाप देतो, अशा विचारांनी तयार झालेली म्हण आहे; पण किती गहिरा अर्थ आहे त्याला. मळ्यातून आणलेली फुले, चिक्कू आणि सीताफळ कर्त्या बाईंकडे दिली चंदाने तेंव्हा त्या चपापल्या. करणं तोपर्यंत विनिता आणि तिच्या तिन्ही मुली आल्याची खबर नव्हती त्यांना. आज लहान मुले आणि मुलींच्या वागण्यातील नकारात्मक फरक मनाला जखमी करणारा वाटला विनिताला. इतरांबदद्ल असाच विचार का करत नसतील हे लोकं❓️ शंका चूकचकली मनात. ते सारे विचार मागे ढकलून आपल्या तिनही मुलींना घेऊन उंबरठ्याबाहेर पाऊले ठेवली चौघीनी. आता आणखी सावध राहायला हवं हा विचार मनात तरळून गेला विनिताच्या. पण या आपल्या नाडकर्णी कुटुंबातील बालकांच्या संस्काराची चिंता मन पोखरत राहिली. अशा विखरी विचाराला खात पाणी मिळालं तर मरणाची वाट न बघता पुढची पायरी चढून काही अघटित करून बसतील. जी मुलं …कू बाबत असा विचार करतात ती आई – बाबाबदद्ल, आपल्यातील, आपल्याच कमजोर भावंड, किंवा इतरांबद्दल असा विचार का करणार नाहीत❓️ कर्त्या बाईंनी मुलांना समज द्यायला हवी…. विचार करत चौघी आपल्या घरी पोहोचल्या. सई, चंदा लहान असल्या तरी त्यांना, “विनिता…..कू मारत का नाही❓️” हे बोलणे समजण्या इतपत नक्कीच जाणत्या होत. आपल्या आईचा हात घट्ट पकडून ठेवला त्या दोघीनी. भेदरलेल्या सईचा हात रश्मीने पकडला होता. अबोलपणे सारं पाहणाऱ्या चंदा आणि रश्मीला, विनिता आईनं, “कितीही भूक लागली तरी स्वतःच्या डब्यातील जेवण जेवायचं. कोणाच्याही घरी जेवण किंवा खाणं काहीही घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद का दिली ❓️” याचा उलगडा झाला. ती आणखी अबोल झाली. ही बोचरी शांतता कशी मोडावी याचा विचार विनिता करू लागली….

“आई, मरण म्हणजे काय गं ❓” सईने प्रश्न विचारला विनिताला. म्हणजे सईबाळ अजून त्याच गोष्टीचा विचार करत होती. तिच्या प्रश्नाने बोचरी शांतता तर भंग पावली; पण सईचा प्रश्न❓️ अस्वस्थ करून गेला. आता विनिता आई, सईच्या प्रश्नाला काय उत्तर देते याची सईबरोबर रश्मी आणि चंदा वाट पहात होत्या. विनिता आई; काहीही बोलायच्या अगोदर विशिष्ट प्रकारे तिच्या ओठांची हालचाल व्हायची. ती बऱ्याच वेळी, पूर्ण विचार करून बोलत असे. तेव्हा ताई आजीच्या धारदार प्रश्नाने वातावरण जरा गरम झाले. “एकदम मरणाबद्दल प्रश्न का आला या छोट्या पोरीच्या मनात❓️चांडाळ लोकं भेटली वाटतं ❓️माझ्या स्वतःच्या मुलांनी दुसऱ्यांच्या मरणावर टपलेली नुसती गिधाडं पैदा करून ठेवलीत. माझ्या – एका मुलाच्या जाण्याने हसतं – खेळतं कुटुंब विखरून गेलं. मरणाचा विषय काढायचा नाही घरात.” कोणी काही बोलायची किवा सांगायची गरज नाही पडली ताई आजीला.

“चल सई, तुला मऊ भात, तूप आणि मेतकूट देते. तुम्ही सगळे हात पाय धुवून जेवायला चला. आज, आईने सकाळी अंबाडीची भाजी, दोडक्याची चटणी आणि ओल्या चण्याची आमटी बनवली आहे. आत्ताच उसाच्या रसातल्या तिळ लावून भाकऱ्या बनवाल्यात. जेवण गरम आहे तोवर सगळे एकत्र बसून जेऊया.” ताई आजी बोलली तशा तिघी उठून वाहत्या पाण्यात हात, पाय धुवून परत आल्या.

हिरव्यागार केळीच्या पानावर पहिल्यांदा वाफाळलेला भात, वरण आणि तूप वाढले आणि तळलेली शुभ्र सालपापडी आणि मसाला मिरची ठेवली. कढईमध्ये रश्मीला आवडणारा शेंगदाणे टाकून फोडणीचा बनवलेल्या मसाला – मिरची भातावर हिरवी लुसलुशीत कोथिंबीर टाकून समोर ठेवला….. रश्मीची शोधक नजर पाहून आई लाडात बोलली, “मुंगळी कुठली, हिची नजर, गोडं शोधत असते नेहमी.” तूप आणि काकवीचीं वाटी रश्मी समोर ठेवत ताई आजी बोलली……”उदर भरणं नोहे जणींजे यज्ञ कर्म… “🙏. चवदार जेवण पोटात जात राहिलं तसं वातावरण बदललं आणि इतर विचार बाहेर पडले. सर्वांनी पानातला वरणभात संपावल्याचे पाहून विनिताने उसाच्या रसातली भाकरी मोडून पानात वाढली आणि चटणी, भाजी वाढली.

रेणुका देवी – लक्ष्मी भेट

अचानक बाहेरून आवाज आला, “लक्ष्मीअम्माद भेट्टीगे यल्लामा देवी बन्तरी “. गळयात बोरमाळ, मंगळसूत्र, आणि हातात हिरव्या बांगड्या किणकीणत होत्या. सोनेरी काठाच्या हिरव्या साडीचा पदर डोक्यावर रूळत होता. हात चेहरा, पाऊले हळदीने पिवळी झालेली, सावळीशी साधारण पाच फूट उंचीची एक बाई डोक्यावर रुंद टोपली आणि टोपलीत सजवलेला रेणुकादेवीचा मुखवटा घेऊन दरात उभी राहीली. देवीचं आगमन झालं की, देविवरून भाकरीचा तुकडा दोन वेळा ओवाळून बाजूला टाकला जाई. पाण्याचे थेंब देवी वाहणाऱ्या बाईंच्या हातावर टाकल्यानंतर देवीचं घरात आगमन होई. देवींची परडी ठेवायला पट ठेवला जात असे. देवी विराजमान झाली तशी विनितानं त्या बाईंना पाणी प्यायला दिलं. त्या बाईना, त्यांना स्वतः खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी दिलेला पदार्थ देवीला नैवेद्याद्वारे अर्पण करत आणि मगच स्वतः घेत. त्यांच्यासमोर केळीच पान मांडून विनिताने सर्व पदार्थ वाढले आणि पाणी दिले. देवीवाहक बाईंना शांत बसून जेवायला सांगितले. दरम्यान ताईआजी आणि रश्मीचे जेवण झाले होते. “मी बसते बाहेर. तू जेवायला बस; विनी. रश्मी वाढेल काही लागलं तर”, ताई आज्जी हात धुता धुता बोलली. येरवी परडीच्या येण्याने फारशी खुश नसलेली ताई आजी आज चक्क समोर बसून गप्पा ठोकत राहिली. हवं नकोची विचारपूस केली. त्या बाईंचं जेवण पूर्ण झालं, तसं त्यांना काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यानंतर परडीत हात घालून दाणे काढत. त्यापैकी दोन – दोन दाण्यांच्या जोडया बनवत आणि प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असे देत होत्या. दाण्याचीं जोडी जमली नाही किंवा एकच धान्य दाणा शिल्लक राहिला तर प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येई. आज ताई आजीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली. काही वेळेस प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या दोन्ही हातानी पराडी उचलायचा प्रयत्न करत होत्या. एरवी पाटाला घट्ट चिकटून बसलेली परडी आज ताई आजीच्या प्रश्नाचे उत्तर देताना पटकन उचलली गेली. एव्हाना विनिताचं जेवण आणि आवराआवर झाली होती. सगळेच परडी भोवती बसले. ताई आजी रेणुकासाठी चहा बनवायला आत गेली आणि विनिता आणि त्या बाईंच्या कन्नडमधून गप्पा सुरु झाल्या. मळ्यात आल्यानंतर मळ्यातली लक्ष्मी आणि रेणुकादेवी एकमेकीना भेटतात आणि रेणुकादेवी लवकर बाहेर पडायला तयार होत नसे अशी त्या बाईंची गोडं तक्रार असे. परडी जड होऊन जाई आणि जागेची हालत नसे. कांही वेळेस सलग पाच, सहा तास परडी जड होऊन बसे आणि खूप आग्रह करून रेणुकामातेला विनंती करावी लागे. तेंव्हा कुठे संध्याकाळी त्या रेणुकादेवीची मूर्तीवाहक बाईंना मळ्यातून निघायला मिळे. असेच काहीसे विषय असत, त्या दोघींच्या बोलण्याचे. विनिता आई त्या बाईना धान्य, फळे, उस, गूळ ई. उपलब्ध असलेल्या गोष्टी देत असे. त्या बाईना, चहा मात्र खूप आवडत असे. त्या निमित्ताने खूप वेळेस चहा केला जाई. चहाचा नैवेदय दाखवला जातो हे रश्मीला पहिल्यांदा समजले पण उमजले नाही.

आणि एके रविवारी समोर अचानक एका व्यक्तीला पाहून रश्मी खुश झाली का? भाग ४३ मध्ये वाचा...


मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

This image has an empty alt attribute; its file name is vratwork-logo-1.png

Artwork by VRatwork

6 Responses

 1. खूप छान लिहायला episode.
  बर्‍याच दिवसांपासून वाट पाहत होते.
  आठवणीना उजाळा, अन मनात कळवळा
  अश्रू आवरले तरीही ,कठं दाटून फुटत राहीला हुंदका..

  1. नमस्कार जयश्री मॅडम. “तू सदा जवळी रहा…” Bhag42 वाचून आपण दिलेले अभप्राय प्रेरणादाई आहेत. धन्यवाद. अशाच माझे ब्लॉग वाचत रहा आणि अभिप्राय देत रहा. धन्यवाद 🙏🌺🌹

  2. धन्यवाद जयश्री मॅडम. मी लिहिलेले ब्लॉग नेहमी वाचून आपले अभप्राय नोंदवत असता. त्यामुळे मला लिहायला प्रेरणा मिळते. 🙏🌈 अशाच वाचून अभिप्राय देत रहा 🌷🌹

 2. नेहमीप्रमाणे वर्णन खूपच छान.
  मुंबईचं वर्णन यथार्थ.
  मुंबईतील जीवन आणि मुंबईबाहेरच जीवन यांमधील तुलना छानच!
  पेहराव, नाश्त्याचे विविध प्रकार ह्याच वर्णन चपखल. एवढे वैविध्य एकाच भागात तुम्ही सहजतेने मांडता. खुप छान. वाचायला मजा येते. सिरीयल पहातो आहोत असं वाटतं.
  👏👏💐

  1. “तू सदा जवळी रहा…” भाग -42 वाचून आपण दिलेले अभिप्राय मला पुढील साहित्य निर्मितीला खुपच प्रेरणादायी आहेत. आपण वाचत रहा, चांगले कांही सुचवत रहा आणि अभिप्राय देत रहा. धन्यवाद मनीषा मॅडम 🙏🌹🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More