भाग -31* अर्थात अडचणींवर मात मध्ये, पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदे पोहे.
भाग – 33* एका वेलांटिचा फरक – दोन्ही प्रिय, रश्मीला, हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग -34* बोबडकांदा, मीच शहाणी झाले‼️ मीटिंग, स्ट्रिक्ट टिचर. भाग- 35* वाचन‼️ वाचन ‼️पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️ भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचारमंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदीच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकलमधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मीव्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
सर्वगुण संपन्न ❗️💐💐
रश्मीला मार्गशीर्ष गुरुवारची व्रतकथा लिहिणाऱ्या मॅडम आठवल्या आणि त्यांच्या अफलातून कामाबाबत, मुलांनी घेतलेली मॅडमची मुलाखत आठवली. मॅडमच्या मुलाखतीनंतर रंगलेली ट्रस्टीची मुलाखत आणि त्यातून मिळालेले अनुभवाचे ज्ञान भांडार म्हणजे एक सुंदर ठेवाचं मिळाला होता.
मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथेच्या आठवणीच्या निमित्ताने रश्मी, मनाने मुलाखतीच्या ठिकाणी पोहचली.
🎤🎤🎤🎤🎧🎧🎤🎤🎧🎧🎤🎤🎤🎤
हॉल गच्च भरलेला होता. मुलांना वेगळ्या पद्धतीने साजरा करतं असलेल्या दिवसाचे नेमके वेगळेपण अनुभवायचे होते. स्वामींनी आणि साम्राज्ञीने अतिशय सफाईदारपणे अँकरिंगला सुरुवात केली. त्यांच्या आपापसात चाललेल्या खुसखुशीत शब्दांची देवाण – घेवाण, गप्पा आणि स्टेजवरचा वावर एखाद्या अगदी सराईत अँकरसारखा जाणवत होता. सर्वच गोष्टीतील मुलांचा सहज वावर, निर्भयपणा रश्मी मॅडमसहित सर्वांनाच भावत होता. अशा वातावरणात पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मॅडम, तुम्हाला गाणं म्हणायला छान जमते, रांगोळी मस्त रेखाटता येते, रंग आणि त्यांचे महत्व, पिपाणीचे सूर आणि बऱ्याच विषयावर मुले खूप छान ड्रामा बसवताहेत आणि बक्षीस पण घेऊन येतात. जवळपासच्या गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर लेक्चर्स पण देतात, शिकवत असलेल्या विषयांमध्ये तर तुफान काम करताहेत. ग्रह, तारे, ऐतिहासिक घटनांवर नाटक लिहीणे, नाटक बसवणे, डान्स बसवणे, रात्री आकाश दर्शन, ग्रहण काळात मुलांना घेऊन सूर्य, चंद्राच्या ग्रहणाच्या वेगवेगळ्या छटा अभ्यासणे, सहली आणि स्थळे भेटीद्वारे माहिती देणे या गोष्टी सुरु असतात. शिकविण्याच्या पद्धती मध्ये मुलांचा ऍक्टिव्ह सहभाग असतो. या आणि अशाच इतर गोष्टींमुळे; मुले सातत्याने दिवसरात्र, तुमच्या अवती, भोवती राहणे पसंत करतात.
मुलांमध्ये शोध आणि बोध, भटकंती आणि इतिहास जाणून घेणे, शंका विचारून शंका – निरसन करून घेणे आणि प्रश्न विचारून उत्तर मिळविणे या क्रिया सतत चालू राहतात. दुपारी, जेवणाच्या सुट्टीची बेल झाली तरी, तहान भूक विसरून मुले हंस पक्ष्याप्रमाणे ज्ञानमोती चरत राहतात. संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे, मुलांकडून वाचन करवून घेणे आणि त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावणे हा तुमचा ध्यास आहे. या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः मुलांबरोबर करता आणि तिच गोडी मुलांना पण लावतात.
तुमच्या लहानपणी शाळेतील मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये घडलेल्या गंमती, जंमती आठवतात आणि त्या आम्हा मुलांशी शेअर करता. तशाच कॉलेजमधील मैत्रिणीच्या ग्रुपची धमाल, मजा आणि जीव ओतून रात्री जागून केलेला अभ्यास त्याबद्धल सांगतात. कॉलेजमध्ये असताना तुम्हाला खूप साऱ्या मैत्रिणी होत्या. तुमचा ग्रुप, ‘आनंद पेरणाऱ्या मुलींचा ग्रुप’, म्हणून ओळखला
जाई. कुलकर्णी, नाडकर्णीऐवजी कर्णी घोळका म्हणून संबोधन होई. तुमचं बालपण असो, शालेय किंवा कॉलेज लाईफ असो आणि आता कामाच्या ठिकाणी, तुमची अशी खास ओळख आहे. आनंदाच झाडं. झाडाची मुळे, खोड, पाने, कळ्या, फुले अन सावली सारेच आनंदी. अशा झाडाच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाच झाडं, आनंदच देते. त्याठिकाणी, त्यावेळी, त्या गोष्टी एन्जॉय करण्याचा तुमचा स्वभाव प्रत्येकाला भावतो. अनुभव म्हणून तुम्ही आम्हा मुलांशी कांही गोष्टी शेअर करतात. आम्हाला तुमचा हेवा वाटतो. तुमच्या शाळा, कॉलेजचा काळ खूपच चांगला होता.
तुम्ही साडीत सुंदर दिसता, तेवढ्याच स्मार्ट जीन्स, शर्ट मध्ये दिसता. तुम्ही साडी जेवढ्या आवडीने नेसता, तेवढ्याचं आवडीने वेस्टर्न आउट फिट्स वापरता. तुमच्या बद्धल सर्वांच्या मनात कुतूहल आहे. आणि म्हणूनच संस्थेच्या मॅगझीनमध्ये तुमची मुलाखात छापणार आहोत. अशा सर्वगुण संपन्न,
छोट्या मॅडमना अर्थातच चंदा मॅडमना प्रश्न विचारेल माझी मैत्रिण; स्वामींनी. बोलता, बोलता साम्राज्ञीने स्वामींनीकडे माईक दिला.
दिन विशेष – वेगळी पद्धत 💐
दिन विशेषमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडमना बोलते करूया…….
नमस्कार चंदा मॅडम, मी स्वामीनी. समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला कांही प्रश्न विचाराणार आहे. त्यातील पहिला प्रश्न..
छोट्या मॅडम बोला. माईक तोंडासमोर धरून मॅडमची मुलाखत सुरु झाली ❓️
मॅडम : मुलाखत घेताना सुरुवातीला एवढे प्रश्न विचारलेस❗️ मी कुठून सुरुवातपासून करू ❓️😅 की, शेवटून सुरुवात करू का?
प्रश्न: तुमचे नाव चंदाच्या ऐवजी अक्षयआनंदा ठेवायला हवे होते. असं नाही का वाटतं?
उत्तर : नाही, करणं माझे नाव मला विचारून ठेवलं नाही. 🤣आणि विचारलं असेल कदाचित पण साहजिकच त्यावेळी मला बोलता 👶🤐 येत नव्हते.
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे, जीं तुम्हाला; जिथे असेल तिथे, असेल तशा परिस्थितीत, सतत आनंदी ठेऊ शकते?
उत्तर : मी स्वतः, स्वतःला आनंदी ठेवते.
प्रश्न : आपला आनंद कितीतरी गोष्टींवर अवलंबून असतो. आपण स्वतः, आपल्याला आनंदी कसे ठेऊ शकतो, मॅडम?
उत्तर : मला परिस्थिती, वेळ किंवा ठिकाणं किंवा व्यक्ती कोणीही आनंदी किंवा ख़ुश ठेवतं नाही. मी स्वतः आहे तशी, आहे त्याठिकाणी, सर्वदा खुश असते. मी स्वतः आनंदी राहते. मी, दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी खुश राहते. माझा आनंद, माझी ख़ुशी इतरांवर अवलंबून नाही.
प्रश्न : तुमच्या स्वभावात असा कोणता गुण आहे की, लोक तुम्ही भेटल्यानंतर खुश होतात आणि तुम्ही नसताना आवर्जून तुमची चांगल्या कामाबद्धल आठवण काढतात❓️
उत्तर : “देखल्या देवा दंडवत,’ बरेच लोकं करतात पण आपण समोर नसताना जर कोणी, आपल्या चांगल्या गोष्टीसाठी आठवण काढत असेल तर खरंच तो त्यांचा चांगुलपणा आहे. आपण न थकता खरोखऱ चांगलेच काम करतं राहिले पाहिजे. थोडे थांबून मॅडमनी पुढे त्यांच्या स्वभावानुसार मिश्किल गुगली टाकलीच.
मी नसताना माझी आठवण काढतात ते मला कसं बर माहित असणार 😅 ❓️ मी तिथे नसते ना.” मॅडम हसत बोलल्या.
प्रश्न : तुमच्यात असा कोणता गुण आहे, ज्यामुळे तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आनंद वाटतो ?
उत्तर : “आपुली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख” असे रामदास स्वामी म्हणतात. ते त्याचं व्यक्ती सांगू शकतील, जें माझ्या सहवासात आनंदी होतात.
प्रश्न : तुम्हाला आवडणारे एखादे खास पुस्तकं सांगा. U
उत्तर : “कृष्ण कारस्थान,” एक खूप सुंदर पुस्तकं आहे. रामायण – महाभारत दोन महाकाव्यातील पात्रांचा सुरेख मेळ साधलाय.
प्रश्न : तुम्हाला आवडलेले गीत कोणते?
उत्तर : “राष्ट्रगीत” आणि तुझे गीत…… तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे.
प्रश्न : तुमचा आवडता रंग कोणता?
उत्तर : अवघा रंग, त्यासाठी माझी रंगांची नाटुकली वाचा.
प्रश्न : विषय शिकविताना नवीन आणि तुफान अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर कसा काय करू शकता ? उत्तर : सब्जेक्ट शिकवताना, तुफान पद्धत म्हणता येणार नाही. त्याला अफलातून म्हणता येईल. शिकवणे हे काम नाही ती आवड आहे. शिकवण्याला व्यासंग म्हणा हवे तर. ग्रह, तारे, आकाश यांचा अभ्यास चार भिंतीत बसून किंवा वेळेचे बंधन ठेऊन कसा काय घेणार❓️ त्यासाठी वर्गाबाहेर पडावे लागणार. शिकविण्याच्या पद्धतीमध्ये वैविध्य असेल तरच मुलांना, शिकण्यात नाविन्य वाटेल आणि शिकणे आनंददायी होईल आणि मुलांना समजेल. अन्यथा तो एक सोपस्कार होईल.
ऐतिहासिक घटनांवर नाटक लिहीणं , नाटक बसवणे, डान्स बसवणे, रात्री आकाश दर्शन, ग्रहण काळात मुलांना घेऊन, ग्रहणाच्या सूर्य, चंद्राच्या वेगवेगळ्या छटा अभ्यासणे, सहलीद्वारे माहिती देणे हा मुलांच्या अभ्यासात त्यांना समजण्यासाठी लावलेला हातभार आहे. त्यांच्या ज्ञानार्जनाच्या कक्षा वेगळ्या पद्धतीने रुंदावण्याचा प्रयत्न आहे.
ज्ञान फक्त पुस्तकातूनच नव्हे तर इतर वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. पण कसे? हे वर सांगितलेले कांही उल्लेखनीय ज्ञानार्जनाचे प्रकार आहेत. मी आज, त्यांतील काही प्रकारांचा उपयोग मुलांसाठी करते इतकेच.
प्रश्न : तुमच्याभोवती सातत्याने मुलांचा वावर का बरं असतो? तुमच्या कलागुणांचा मुलांना फायदा होतो का?
उत्तर : भोवती मुलांचा वावर बाबत विचारालं तर, फुले जशी योग्य वातावरणात फुलतात तशी मुले योग्य ज्ञान मिळविण्याच्या मार्गांवर जातात. मुले म्हणजे हंसासारखी असतात. दूध आणि पाणी एकत्र मिसळलं तरी त्यातून फक्त दूध घेणारी. त्यांची पंचेंद्रिये तेच शोधत असतात जिथे काही नावीन्य आहे आणि जिथे शिकण्याजोग आहे. कलाप्रिय मुलांना गाणं छान जमत, रांगोळी मस्त येते त्यांना. मुलांकडून नाटकं खूप छान पद्धतीने बसवून घेतले जातात कारण त्यांच्या सर्वच कलागुणांना वाव मिळावा हा उद्धेश ठेऊन प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे मुले बक्षीस पण घेऊन येतात. मी स्वतः, जवळपासच्या गाव, वाड्या मध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर लेक्चर्स देते . त्याबद्धल बोलायचे तर, महाराजांच्या सहवासाने पवित्र झालेल्या भूमीत आपण पाय ठेवला की, उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर येतात. त्यासाठी फारसे सायास करावे लागतं नाहीत.
तो या भूमीचा गुण आहे. या भूमीत काम करायला मिळणे हे अहोभाग्य आहे.
प्रश्न : निर्णय क्षमता, जबरदस्त असल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय, विचार पूर्वक आणि त्वरित घेता आणि अमंलात आणता असा तुमच्याबद्धल समज आहे. तो खरा आहे का?
उत्तर : हं, आताही माझी निर्णय क्षमता सांगते. संपली मुलाखत. त्वरित नियमित कामाला निघा. (मॅडम खुर्चीवरून उठण्याचे नाटक करतं 🤣 हसत बोलतात. )
स्वामिनी. खुर्चीतून उठणाऱ्या मॅडमना घाईघाईत पुढचा प्रश्न विचारते. मॅडम प्लीज, प्लीज पुढचा प्रश्न : तुमचा हेवा करणाऱ्यांबद्धल तुमचे काय म्हणणे आहे.
उत्तर : याच समर्पक उत्तर तेच देऊ शकतील ज्यांच्याबद्धल तुम्ही प्रश्न उपस्थित करतं आहात.
प्रश्न: आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची बदनामी करणे, टोमणे मारणे किंवा खोट्या अफवा उठवणाऱ्या मंडळींबद्धल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : तुम्ही, माझे मतं विचारताहेत की प्रश्नाचे उत्तर पाहिजे ?
प्रश्न : आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची बदनामी करणे, टोमणे मारणे किंवा खोट्या अफवा उठवणाऱ्या मंडळींबद्धल आपले मतं सांगा मॅडम.
उत्तर : खरं तर तुमच्या प्रश्नातचं त्याचे उत्तर आहे. खुज्या आणि कु – प्रवृत्त मनोवृत्तीचे लक्षण आहे ते. आपला मोठेपणा सिद्ध करायला टोमणे मारणे किंवा अफवा पसरवण्याची गरज नाही. समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण मोठे आहोत, हे दाखवायचे असेल तर त्यांच्यापेक्षा मोठे आणि चांगले कार्य करावे. आपण बोलायची गरज नाही. आपले काम बोलते. काम बोलत राहणार. मॅडमनी प्रात्यक्षिक दाखवले. सहा इंच पट्टी न मोडता त्याच्याजवळ बारा इंच पट्टी ठेऊन दाखविली. समोर असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रश्न : मॅडम, धूर निघतो, कोणीतरी धुमसतं त्याबद्धल तुमचे काय अभिप्राय आहेत.
उत्तर : मुले आहात, मुलांसारखे प्रश्न विचारा. तुमचे बाल्यत्व जपा. मुलाखती मध्ये असे प्रश्न असावेत की त्याचा फायदा ऐकणाऱ्याला व्हावा. वाचकांना व्हावा. चव्हाट्यावर कोणत्या गोष्टी आणायच्या❓️ याचा विचार, अविचारी माणूस करू शकत नाही. हे आपले काम नाही. प्रत्येकाचे कर्म आणि विचार बोलत असतात.
कुश्चित राजकारण, केबिनमधील खल, स्टाफरूममधील राजकारण ई. पासून दूर राहावे. स्टाफमध्ये एकोपा हवा. विद्यार्थीकल्याणाच्या चर्चा आणि कृती हव्यात. इथे कारखान्यात काम करतं नाही आहोत. नफ्या, तोट्याचा किंवा पाय – गुंत्याचा किंवा खेकड्याच्या प्रवृत्तीचा विचार करायला. संस्कारक्षम मुलांसाठी आपण काम करत आहोत. आपण ज्या फिल्डमध्ये काम करतो, तिथे तर अजिबातच अशा गोष्टींची चर्चा करणे किंवा वागणे वर्ज्य आहे.
धुरामुळे दुसऱ्यांना थोडाबहुत त्रास होतो पण धुमसणाऱ्याला जास्तच त्रास होत असावा.
मोजून प्रश्न विचारायला परवानगी देऊनपण प्रश्नमालिका हनुमानाच्या शेपटीसारखी वाढवतनेण्या अगोदर आटोपती घेतली.
विज्ञान संस्थेचे अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले. मुलांचा स्थुत्य उपक्रम आणि मॅडमनी वेळीच सावधपणे मुलांना दिलेला डोस याचे कौतुक आणि समाधान वाटले सर्वाना. ट्रस्टींच्या चेहऱ्यावर, मुले सक्षम लोकांच्या सहवासात असल्याचे समाधान जाणवत होते.
ट्रस्टीच्या मुलाखतीसाठी शाळेचा स्टॅlफ आणि मोजक्या कार्यकर्त्यांनी खास मिटिंग घेतली होती.
विज्ञान आणि गणित, संस्कृत शिक्षक, रश्मी मॅडम आणि संस्थे मध्ये खूप वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यकर्ते आणि साऱ्या शिक्षकांनी एकत्र बसून जबरदस्त प्रश्नावली तयार केली होती.
पुढची मुलाखत ऐकण्यासाठी सर्वांच्या नजरा संस्थेच्या ट्रस्टींवर स्थिरावल्या.
मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
सम्राज्ञीने मुलाखतीची सूत्रे स्वामींनी कडून आपल्या हातात घेतली. पुढच्या मुलाखतीसाठी रश्मी मॅडमचे नाव अनाऊन्स करण्यात आले. रश्मी मॅडमनी एक माईक ट्रस्टींकडे देऊन समोर बसलेल्या प्रेक्षकांकडे वळली.
मुलाखतीचा हेतू हा फक्त माहिती गोळा करणे किंवा माहिती प्रसारित करणे नसून उपस्थित लोकांना, विशेष करून मुलांना प्रेरणा मिळावी हा आहे. संस्था स्थापन करण्यामागे नोकरी करणे, नोकरी उपलब्ध करून देणे, कारखाना चालवणे, नफा कमावणे हे उद्धेश मुळीच नव्हते. स्वावलंबन आणि त्याचं महत्व हा आणि अशाच चांगल्या उद्धेशाने सुरु केलेल्या संस्थेत लोकल लोकांना, लोकल उत्पादनातू नफा व्हावा. स्वयं रोजगार उत्पन्न व्हावा. स्थानिक उत्पादनातून स्थानिक लोकांचे सबलीकरण व्हावे हाच उद्धेश ठेऊन सुरु केलेले कार्य आणि आज कुठेपर्यंत पोहोचले आहे हे आपण पाहत आहात. हे सारे ना नफा ना तोटा या तत्वावर असले तरी संस्था चालकांचा, प्रोजेक्टला आणि प्रोजेक्ट ऑफिसर्सना भक्कम पाठिंबा आहे. वाचकाला कार्याची ओळख व्हावी. संस्था उभारणी आणि त्यासाठी केलेले अग्निदिव्य समजावे. त्यातून प्रेरणा घेऊन होतकरु तरुणांचे, देश सेवेला वाहुन घेणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तन व्हावे हा उद्देश्य आहेच. तसेच “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” हा भाव जागृत व्हावा हा सुद्धा उद्धेश असून खचितच सर्वाना त्याचा फायदा होईल अशी अशा ठेऊन मी, मुलाखत सुरु करते आहे… आणि
प्रश्न, उत्तरांचा सिलसिला सुरु झाला. प्रश्नातून मिळालेल्या उत्तराने मुलांची प्रगल्भता, जिज्ञासूवृत्ती जागृत व्हायला त्यांच्या भवितव्यासाठी आणि आचार विचारांची बैठक पक्की करण्यासाठी खचितचं उपयोग होणार होता. चाकोरी बाहेर पडून वेगळा विचार करायला किंबहुना विचार कक्षा रुंदावण्याला मदत व्हावी हा उद्धेश ठेऊन कार्यक्रम सुरु राहिला. समोरच्या व्यक्तीमध्ये असलेले अनुभव आणि ज्ञान प्रश्नांना मिळालेल्या उत्तराद्वारे
उद्धृत व्हावे हा उद्धेश सफल होत होता. खूप बरकाइने विचार करून प्रश्नावली तयार केली होती. ज्ञान, अनुभव, या बरोबरच कामाप्रति असणारी निष्ठा, ध्यास, चिकाटी, आत्म विश्वास आणि त्या जोरावर कार्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर केलेली मात हे सारे योग्य शब्दात व्यक्त होत राहिले. जीवनाचे एक, एक पानं उलगडत ट्रस्टीनी यांच्या शैक्षणिक काळात भविष्यातील बीज रोवल्याच्या खाणा – खुणा दाखवत होते. त्यांच्यामध्ये असणाऱ्या चिकित्सक बुद्धीची दखल, त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच घ्यायला लावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीचे दाखले देत, नेमके काय साधायचे होते ते बरोबर साधतं होते. विज्ञान, गणित आणि संस्कृत शिक्षकां बरोबर रश्मी मॅडमनी एकत्र बसून जबरदस्त प्रश्नावली तयार केली होती.
“साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी” याचे उत्तम उदाहरण क्वचितच दुसरे कोणते असू शकेल. स्वतःच्या गरजा कमीत कमी कशा ठेऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या राहणीमानातून दाखवून दिल्याचा उल्लेख
मुलाखतीत अधोरेखित केला होता. उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये कष्टसाध्य यश, ध्येयसाध्य करण्यासाठीची चिकाटी, शून्यातून निर्माण क्षमता आणि बालपणी शाळा, कॉलेजमध्ये रोवली गेलेली उत्तम विचारांची बीजे याबाबत सांगितले गेले. आणि जाणून बुजून क्षमता सक्षम कशा केल्या याबद्दल बोलते केले होते. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जावून केलेला अभ्यास आणि त्यांचा अपेक्षित परिणाम याचा अचूक अंदाज कसा बांधला जातं होता याबद्धल चर्चात्मक मुलाखत रंगली. शेकडो लोकांना काम आणि शेकडो लोकांना प्रेरणा देणारा ट्रस्टींचा प्रवास थक्क करणारा होता. आत्ता नावारूपाला आलेल्या संस्थेच्या उभारणीत, सोबत असलेले कार्यकर्ते, अधिकाऱ्यांचे योगदान खचितच उत्तम होते. किंबहुना कांही निःस्वार्थ अधिकाऱ्यांचा सेवाभावी सहभाग अन संस्था भक्कम करण्यात सिहांचा वाटा, काम करण्याची पद्धतीतून अधोरेखित होत होता. मूळ प्रेरणास्थान भक्कम आणि निस्पृह असल्यामुळे सारा कारभार पारदर्शी आणि वृत्ती सेवाभावी होती हेच पुन्हा सिद्ध होत होते.
भारावलेले दोन तास कसे संपले ते समजले नाही.
नेहमी डान्स, गाणी आणि भाषणाने साजरा होणारा दिन आज मुलाखतीमुळे अनुभवानंदातून, प्रेरणानंद आणि ज्ञानानंद दायक ठरला.
टाळ्यांच्या प्रचण्ड कडकडाट, ट्रस्टींच्या कार्याला दिलेली सलामी वाटली.
या संस्थेतून कार्य प्रज्वलीत ; कर्म ज्योतीतून दुसऱ्या अनेक ज्योती, प्रज्वलित होण्याची प्रेरणा घेतील ही अशा ठेऊन सांगते कडे वळले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान म्हणण्यासाठी चंदा मॅडम उभ्या राहिल्या आणि पींन ड्रॉप शांततेत, संगीत सरांनी पेटीचे सूर लावले आणि ज्ञानेश्वर माऊली लिखित स्वर घुमले….
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान.
जो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे……..
जो जें वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात…
रश्मीने जेव्हा हॉस्टेलमधील मैत्रिणींना तिचे शिक्षक असतानाचे अनुभव शेअर केले तेंव्हा, अशा प्रकारची माणसे आणि संस्था कार्यरत आहेत या बद्धल त्यांना आश्चर्य वाटले.
“रश्मी, उद्या तुला आलेले इतर अनुभव सांग हं”, म्हणून हॉस्टेलमधील मैत्रिणींचा घोळका गुड नाईट बोलत आपआपल्या बेडकडे वळला.
🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦🕦
15 Responses
Ranjana Ma’am I truly appreciate your blog and look forward to many more
नमस्कार 🙏 शर्मिला संनी मॅडम . आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्या शुभेच्छा नक्कीच प्रेरणदायी आणि गुणवत्तापूर्ण नाव निर्मितीस प्रेरणा देणारे आहेत. पुनश्च आभार.
हॅलो शर्मिला सनी मॅडम 🙏. ” तू सदा जवळी रहा भाग – 41 वाचून आपण दिले अभिप्राय खरोखर प्रेरणादाई आहेत. धन्यवाद मॅडम असेच ब्लॉग वाचत रहा आणि 😄😊अभिप्राय देत रहा. 🌷🌹
सुंदर,कथेत रश्मी बरोबर इतर पात्रे बोलकी होत आहेत,स्वामीनी,साम्राज्ञी आणि चंदा त्यामुळे कथा एकांगी न रहाता फुलत आहे.
धन्यवाद मंगेश कोचारेकर सर . तुमचे अभिप्राय आणि पण सुचविलेले उपाय गुणवत्ता वाढीस नक्कीच मदत करणारे आहेत. पुनश्च आभार 🙏🌹💐
खुप छान. अभिनंदन
धन्यवाद! संतोष तिवारी सर. आपण दिलेल्या शुभेच्छा मला नवनिर्मिती आणि गगुणवत्तापूर्ण साहित्य निर्मितीची प्रेरणा देतील . पुनश्च आभार 🙏🌹
Excellent !
धन्यवाद रश्मी पाटणकर मॅडम. तुम्ही दिलेला अभिप्राय मला नवनिर्मितीची प्रेरणा देईल.🌹
अतिशय सुरेख लेखन आहे .excellent work आम्हाला आमच्या school आठवण आली
तुमचे भावभावनांचे अणि शाब्दिक सामर्थ्य खुप दांडगे
आहे
तुमच्या लेखन सामर्थ्याला आमचा मनाचा मुजरा.
धन्यवाद नंदा madam. “तू सदा जवळी रहा… “भाग 41 वाचून आपण अभिप्राय दिलेत. आपले अभिप्राय मला पुढील चांगल्या साहित्य निर्मितीसाठी खचितच प्रेरणा देतील. पुनःश्च आभार. 🌺🌹🙏
Very well – written Mam !
Beulah Paul Pimento madam, धन्यवाद. “तू सदा जवळी रहा…” भाग 41 वाचून दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद. तुमचे अभिप्राय nav साहित्य निर्मितीस प्रेरणादायी आहेत. पुनःश्च आभार.
👌🏻👌🏻
🙏 धन्यवाद मॅडम 🙏🌹