मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
अगोदर चे भाग वाचण्या करता लिंक वरती क्लिक करा 👉 भाग (क्रमांक)
👉भाग -31* अर्थात अडचणींवर मात, पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरी, समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
👉भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदे – पोहे.
👉भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
👉भाग – 34* बोबड कांदा , स्ट्रिक्ट टिचर, मीच शहाणी झाले❗️❗️
👉भाग- 35* वाचन ‼️ वाचन ‼️ पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️
👉भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, वंदे मातरम 🙏 नाटकी रश्मी❓️
सई का नाचली ❓️ आणि ….
👉भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात..❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले❓️
👉भाग – 38 * क्षणचित्रे, दिदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
1. साठी नंतर पण….
मावशी आज जेवणात भाजी कोणती आहे ? जितने जीना चढता, चढता गिरीजा मावशींना विचारले.
“अरजितां मॅडम, आज टिंडाची भाजी आहे. तुम्हाला आवडते त्याचं पद्धतीने ग्रीन मसाला वापरून बनवते. अनंताचं फ़ुल पण आणले आहे. तुम्हाला अनंताच्या फुलाचा वास खूप आवडतो, हे मला माहित आहे.”
जीत खुश होऊन वर जायच्या ऐवजी धड, धड जिना उतरून, खाली किचनमध्ये गेली. अक्षरशः गिरीजा मावशींचा गालगुच्चा घेतला.
“काय गं जीत, बाहेरून आल्यावर हात, पाय धुवायच्या अगोदरच सरळ किचन मध्ये घुसलीस. खुश दिसतेस आज. कांही विशेष आहे का? ” रेक्टर काकु तयार होऊन बाहेर जाता, जाता किचन मध्ये डोकावल्या.
अनंताचं फ़ुलं नाकासमोर पकडून जीतने डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला आणि जीत ने डोळे उघडले. काकूंच्या आवाजाच्या दिशेने मान वळविली आणि तिची नजर कैद झाली. मोठे डोळे🙄 आणि तोंडाचा आँ 😆 करून स्तब्ध झाली.
जीतचा स्टॅचू झालेला पाहून गिरीजा मावशीनी वळून पाहिलं आणि त्या एकदम खुश होऊन बोलल्या, “सुंदर दिसताय तुम्ही❗️”
गेट मधून आत आलेल्या रश्मीने वर जाता,जाता किचन मधून आवाज आला म्हणून झटकन बॅग वरती ठेऊन हात, पाय धुवून खाली आली. पाठमोरी एक सुंदर, नऊवारी साडी नेसलेलं कोणीतरी उभे दिसले. सोनेरी काठ, पदर, आणि बुट्ट्या असलेली डार्क गुलाबी रंगाची साडी चापून; चोपून नेसलेली होती. साडीचा गुलाबी रंग आणि सोनेरी बॉर्डर मुळे किंचित उघड्या दिसणाऱ्या गोऱ्या पोटऱ्या आणखीनच सुंदर दिसत होत्या. पाठीवरून डाव्या बाजूचा पदर वळवून उजव्या खांद्यावरून खेचून हातात पकडला असल्यामुळे बांधा कमनीय दिसत होता. त्यांनी अंबाड्यावर मोगऱ्याचा गजरा वेणीसारखा माळला होता. अंबाड्यावर बरोबर मध्ये तीन गुलाबी रंगाचे बटण – गुलाब फुले माळली होती.
रश्मीने भिवया उंचावत डोळ्यांनीच जितला विचारलं, कोण आहे? म्हणून.
“रश्मी, तू पण नाहीं ओळखलसं ना ❓️” जीत ने रश्मीलाच प्रश्न विचारला.
जितच्या प्रश्नामुळे नऊ वारी साडीतील व्यक्ती पाठीमागे वळली तशी रश्मी आश्चर्य चकित 😍 झाली. डोळे मोठे करून समोर पाहताच राहिली.
“काकु, किती सुंदर दिसताय तुम्ही ❗️ मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकातील लक्ष्मी सारख्या दिसताहेत,” रश्मी बोलली. मोत्याच्या ठराविक दागिन्यामुळे, गुलाबी रंगाची साडी आणखीनच खुलून दिसतं होती.
“ए रश्मी, सुंदर☺️ काय बोलतेस, कातिल बोल, ✂️ कातिल ❗️” जीत अजून मुग्धचं होती.
“काकु, कुठे चाललात तयार होऊन ❓️ तुम्हाला एकटिला पाठवायला काका कसे काय तयार झाले ❓️ त्यांना भीती वाटतं नाहीं ❓️ एवढ्या कातिल 🥰 सौन्दर्य असलेल्या बायकोला, एकटीला बाहेर पाठवले तर अपघात होईल म्हणून”. जीत खरंच बोलत होती.
“ए, तुमच्या जिभेला कांही हाड – बीड आहे की नाहीं ❓️” काकुनी लटक्या रागाने विचारलं.
“नाहीं, जिभेला बिलकुल हाड नाहीं, 😝🤪😝🤪 काकु”. जितने अक्षरशः जीभ बाहेर काढून डावीकडून उजवीकडे वाळवून दाखविली.
आता पर्यंत परम, गीता, रोज, शिवगंगा, नीती आणि इतर मुली जमल्या होत्या. काकूंचे आरस्पानी सौंदर्यं पाहून सर्वजण थक्क 😬 झाल्या.
“काकु रोज अशाच तयार होत जा तुम्ही.” रोजने प्रस्ताव ठेवला.
“काकू, साठीनंतर पण कोणी इतके सुंदर दिसू शकते, हे तुमच्याकडे पाहिले की समजते”, गीतने बायकांच्या वर्मावर 👈 बोटं ठेवलंच.
“ए, गीत❗️ औरेतोंको कभी,
एज के बारमे छेडना नही |” परमने टिप्पणी केली.
“काकांची पुरती वाट लागेल,” म्हणत गीता वरच्या आणि खालच्या दातामध्ये जीभ 🤪🤪 पकडून हाताची सूरी करून स्वतःच्या गळ्यावर डावीकडून➡️ उजवीकडे फिरविली. आणि साऱ्याजणी ज़ोरजोरात हसायला😁😆😄😃😀 लागल्या.
“साठी, बीटी ऐसे कुछ नही होती |
मै तो सुंदर दिखूंगी ❗️” म्हणत 😍😍 रोजने कमरेखालचा💃💃 भाग हलवत, ठेका धरून जिंगल गुणगुणली
गेट बाहेरून पिंsss, पीं ssss, पीं sss, पीं sss हॉर्न वाजला तसें काकु बोलल्या, “अग बाईsss, हे आले वाटतं.” म्हणत किचन मधून बाहेर पडल्या.
“काकूंssss, काकांना सांभाळा sss. त्यांना ड्रायविंग करायला नका सांगू. ते आज ड्रायविंग करताना समोर बघणार नाहीतsss.” रोजने गाडीत बसणाऱ्या काकूंना सल्ला दिला.
“चावट कुठल्या” म्हणत काकांच्या शेजारी बसत काकूंनी गाडीचा दरवाजा लावला. काकूंचे गाल साडीच्या रंगाच्या 😚 रिफ्लेक्शनमुळे गुलाबी 😚 झाले होते की, लाजल्या मुळे ते समजले नाहीं.
एरवी सुती साडी आणि रेक्क्टरचा स्ट्रीक्टनेस चेहऱ्यावर वागवणाऱ्या काकु पाहिल्या होत्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे आणि आल्हाददायक भाव दिसले.
“आज रात्री एखादी पोळी जास्तीची मागितली तर, काकू खुशीने देतील तुला,” गीतने; जीतला छेडलं.
“काकू, साक्षात मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रत कथा पुस्तकातील लक्ष्मीचं वाटतं होत्या”, रश्मी बोलली.
🌺🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌹🌹🌹🌹🌺🌺
“आम्हाला सांग ना, काय आहे मार्गशीर्ष गुरुवार- कथे बद्दल.” शिवगंगाने रश्मीला आग्रह केला.
इतक्यात, परम आत येत आनंदाची बातमी देत बोलली, “चलीये सब लोकं, आज मेरेसे सबको पाणीपुरी की ट्रीट हैं | आज मुझे नई जॉब का अपॉइंटमेंट लेटर मिला हैं | लेट अस सेलेब्रेट द गुड न्युज.” सर्वांचा मूड बदलला…
बऱ्याच दिवसांनी परम खूप खुश दिसत होती.
तिचा मूड पाहून सर्व मुली तयार होऊन बाहेर पडल्या.
स्ट्रीट लाइट आणि दुकानातील लाईट्स मुळे रात्री सुद्धा झगझगाट दिसत होता. सर्वत्र उत्साह दिसत होता. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत भैयाच्या ठेल्याजवळ गर्दी केली होती.
“मेरे लिये तिखा पुरी बनाना भय्या |, मेरे लीये तिखा, मिठा दोन्हो चाहिये |, भय्या, रगडा मत डालना | भैया तिखा पानी और सुखी पुरी देना |
पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाऊन रेंगाळत होस्टेलवर पोहोचले सगळे.
🍧🍧🍧🍦🍦🍦🍨🍨🍨🍦🍦🍦🍨🍨🍨
खरेदीचा उत्साह‼
“ए टवळेsss, सर की बाजूला. आत मध्ये येऊ दे की आम्हाला. आम्ही काय स्टेशनवर संसार थाटलाय काय? दारातून आत येऊ देत नाहीत. आणि आत डबा रिकामा हाये की. तुझं स्टेशनं यायला वेळ आहे अजून. आत्तापासून मध्येच कशाला थांबतेस गं sss.” एकीकडे चुन्नी, एकीकडे क्लिप आणि हातातली पर्स एकीकडे अशा अवतारात जीत ; मधल्या स्टेशनवर उतरली. धक्के आणि शिव्या, खेचणं आणि ढकलणं आणि शेवटी जोर लावून उतरण. जोर लावल्यामुळे बाहेरून लोकल मध्ये घुसणारा लोंढा थोपवत बाहेर पडताना, जितची आयुधे इतस्थत: विस्कळीत झालेली होती. जितची, युद्ध जिकंलेल्या शिपायाची अवस्था झाली होती.
“म्हशी आहेत नुसत्या. जमेल तश्या; जोरजोरात ढुशा मारतात. रानटी कुठल्या ❓️” विस्कटलेले केस आणि वैतागलेल्या चेहऱ्यावर कधी नं पाहिलेले भाव दिसत होते. ते भाव कोणत्या प्रकारात मोडतील असे एखाद्या मानसशास्त्राच्या अभ्यासकाला विचारले असते तर तो पण गोंधळला असता.
हे, जीत ❗️ तू, इथे मध्येचं उतरून काय करतेस ? ते पण पीक ऑवरला. बघ तुझी अवस्था काय झालीय? ही घे चुन्नी” रोज आणि रश्मीने हसत जितच्या खांद्यावर चुन्नी टाकली आणि प्लॅटफार्मवर पडलेली तिची हेअर क्लिप उचलून हातात दिली.
“तुम्ही दोघी इथं काय करताहेत मध्येच उतरून?” उत्तरा ऐवजी जितने प्रतिप्रश्न केला.
“ए, चला नं. इथेच कुठेतरी कॅन्टीन मध्ये बसू,” जीत विस्कटलेले केस सरळ करून केसाची बट कानापाठीमागे ढकलत बोलली.
“आपण आत्ता इथं बसलो, तर वस्तू खरेदी केंव्हा करणार? मला कांही वस्तू घ्यायच्या आहेत. शनिवारी गांवी जाणार आहे मी” रोजने स्वतःची अडचण मांडली.
“अंग, मग इथंच खरेदी कर ना. जगभरातल्या सगळ्या वस्तू इथं मिळत असताना, तू खरेदीला दुसरीकडे कुठे जातेस?” जितने रोजला चांगला सल्ला दिला.
“आम्ही इथे वस्तू पहिल्या. क्वालिटी माहित नाहीं. मला इथे वस्तू महाग वाटल्या.” रोजने तिला आलेला अनुभव शेअर केला.
“हत्तीच्या, एवढंच ना. मला माहित आहे, चांगल्या वस्तू कुठे मिळतात ते. योग्य दरात वस्तू मिळवून देते मी तुला.” जितचा आग्रह पाहून, रोजचा मूड बदलला.
खरेदी हा शब्द, मूड बदलायला आणि बनवायला पुरेसा असतो. शरीर, मनात नैसर्गिक उत्साह भरून वाहतो. वातावरण चैतन्यमय होत.
स्टेशनमधून बाहेर पडायच्या अगोदरच फेरीवाल्याचा गोंगाट कानी यायला सुरुवात होतो. दोन ते तीन पायऱ्या उतरल्यावर मार्केट सुरु होताना दिसते.
“रोज खरेदी करायचेत का?” जितने रोजची फिरकी घ्यायच्या मूडमध्ये गुलाबाच्या 🌹🌹🌹🌹🌹खूप साऱ्या फुलांकडे पहात विचारले.
अं ❗️…. मेली, जीत; माझ्या नावावरच कोटी करतेस होय. ते लाल भडक चायनीज गुलाब आहेत. त्यांना गंध नाही. नुसताच भडक रंग. पण दिसतात छान हं ❗️”
रोज, गुलाबांची फ़ुलं पाहून गोड हसली. पुढे निघायच्या अगोदर रोजने चौफेर दृष्टी फिरवत आढावा घेतला. चकचकीत लाल भडक, देशी गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या सफरचंदानी लक्ष वेधलं. बाजूला सरबतवाला ओरडत होता. कांही अँपलस, लिंबू, लिंबू पिळायचे पात्र,
मोठ्या पातेल्यातील सरबतामध्ये बर्फ ठेवला होता. एका मोठ्या अल्यूमिनियमच्या पातेल्यात अँपल जूस ठेवला होता. वरून एक पुदिनाची अख्खी डहाळी जूसच्या पातेल्यात टाकली हाती. ओगरळाने पातेल्यातील जूस ढवळत होता. ग्लास मध्ये जूस ओतून ग्राहकांना बोलावत होता. प्रचंड गरमीमुळे ज्युसवाला घामाने पूर्णपणे भिजला होता. पण येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना थंडावा देणारे सरबत घेण्यासाठी आग्रह करता, करता स्वतः मात्र चहा पीत होता.
कदाचित ‘पिकते तिथे विकत नही’, हे तत्व इथे पण लागू होत असावे.
“ऍप्पल जूस लेss ल्लो sss, ऍप्पल जूस, ऍप्पल जूस ले sss ल्लो sss. लेमन शरबत ले ss ल्लो sss” म्हणून मोठ्याने आवाज करून येणाऱ्या; जाणाऱ्या लोकांना जूस पिण्यासाठी बोलावत होता.
“डाव्या बाजूला फ़ुल मार्केट आहे. पाहायचंय का ❓️” या जितच्या प्रश्नाला रोजने मानेनेच नकार दिला. समोर विविध फळांच्या टोकऱ्या व्यवस्थित सजवून ठेवल्या होत्या. किवी, केळी, पपया, अननस, फणस, कच्च्या कैऱ्या, संत्री, मोसंबी आणि दुनीयाभरची सर्व सिझनची सर्व फळे उपलब्ध होती. पोपटाच्या आकाराची आणि रंगांची मक्याची कणसे आपल्या झिपऱ्या सांभाळत टोकरी मध्ये एमेकाच्या अंगावर रेलून अराम करत होती. दोन्ही बाजूला कपड्याच्या चकचकीत शो रूम्स आरपार काचेतून रंगींबेरंगी कपड्यांचे प्रदर्शन करत दिमाखात, आपल्याच मस्तीत उभ्या होत्या. शोरूमच्या बाहेर, बॅग्स, कपडे, दागिने, क्लिप्स, पिना, कर्ण भूषणे, बांगड्या, आणि असंख्य प्रकारच्या कलाकुसर केलेल्या वस्तू महिलावर्गाला आकर्षित करतं होत्या.
नेहमीच्या मार्केट मधील किंमतीपेक्षा कमी भावाने वस्तू मिळत असताना इथं. अजून भाव करण्याची मुभा होती आणि त्याला बार्गेन नावाचा गोंडस शब्द होता. बार्गेन शब्द आणि कृती शेतकऱ्यांच्या कष्टlची पुरती खिल्ली उडवत होता. फ़ुले, भाज्या, फळे, धान्य साऱ्या गोष्टी इतक्या कमी भावात मागितल्या जायच्या की बस. पुढचं कांही विचार करायला नको.
थोड्या वेळा पूर्वी, वस्त्तु महाग आहेत असा विचार करणाऱ्या रोजचा मूड पूर्णपणे बदलला होता. आता रस्त्यावर फेरीवाल्याकडे स्वस्तात आणि बार्गेन करून मिळत असलेल्या वस्तूकडे लक्ष्य न देता तिची नजर चकचकीत डिपार्टमेंटल स्टोअरवर स्थिरावली. नेहमी काटकसरीत दिवस काढणाऱ्या होस्टेलवासीयांची मनस्थिती बदलायला डिपार्टमेंटल स्टोअर्सवाल्याची वस्तूंची, व्यवस्थित मांडणी कामी आली. एकाच ठिकाणी आवश्यक सर्व वस्तू मिळताहेत. त्या साऱ्या खूपच आकर्षक आणि मनाला भावणाऱ्या आणि आवश्यक होत्या. रोज बरोबर साऱ्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या डोअरकडे वळल्या. अदबीने काचेचा दरवाजा उघडला गेला. आत प्रवेश केल्या, केल्या सुखद गारवा आणि सुवासिक पाण्याचे तुषार एकदम शीण घालवणारे वाटले.
“या मॅडम, बसा”, म्हणून स्वागत करून ट्रे मध्ये पाण्याच्या बाटल्या आणून समोर ठेवल्या.
“सारी दिखाईये पेहेले.” रोजने बसल्या, बसल्या घाईत दुकानामधील सेल्समनला सांगितले.
“मॅडम जीं, सारी वारी की खरेदी तो होती रहेगी | पहेले आप कुछ थंडा वंडा लिजिए” स्टोअरवाले आदरातिथ्यात आग्रही होते.
“ए, थंडा ठीक हैं | लेकिन वंडा कुछ समझ मे नही आया | कोल्ड्रिंक के साथ, खाने की कोई चीज हैं क्या ❓️” जीतने स्वतःच्याच 🤣😂 जोकवर जोरजोरात हसत विचारले.
“आप, मजाक बहुत अच्छा करती हैं❗️”, शुभ्र कपडे परिधान केलेल्या स्टोअर मॅनेजरने हसत 😄😃प्रश्नाला टोलवले.
“चाय लेंगे या थंडा. पेप्सी, कोक, मँगोला क्या मंगवाऊ मॅडम?” अदबीनं विचारायची फुरसत, जितने ऑर्डर दिली.
“सिर्फ थंडा, वंडा नही | सब एक, एक लाव” आणि रोज आणि जीतने एकमेकीकडे पाहात डोळे मिचकावले.
समोर कोक, पेप्सी आणि मँगोलाच्या बाटल्या आल्या.
कोक, पेप्सीला ओपनर लावल्या बरोबर फस्सsssss आवाज झाला तसा जीतच्या डोक्यातील अफलातून विचार तोंडातुन बाहेर पडले, “बाटलीतून बाहेर पडताना नुसता फस्सssss, आणि पोटलीतून बाहेर पडताना फुर्रर्रर्रर्र😜, डडाम डेम ss. ते पण दोन्हीकडून 🤑. या गॅसचं कांही खरं नाही.” पेप्सीची बॉटल हातात घेता घेता पोटाला हात लावत जीतने कॉमेंट केली. स्वतःसाठी कोला उचलून रोजने मँगोलाची बॉटल रश्मीला दिली.
खरेदी करतं असताना आईचा, छोट्या भावाचा आणि बहिणीचा चेहरा रोज स्वतःच्या मनासमोर आणत असावी. आई आणि भावंडांसाठी स्वतःच्या आवडी नुसार कपडे आणि वस्तू घेताना रंग निवडताना जास्तच चोखंदळपणा जाणवत होता. नातेवाईक, मैत्रिणी, ओळखीचे अगदी लक्षात ठेऊन सर्वांसाठी कांही नं कांही घेत होती. मनसोक्त खरेदी झाली. रोजचा चेहरा खुलला. एक अनोख्या आनंदाने तिचा चेहरा झळकत होता.
देण्यातला आनंद देणाराच जाणे.
तिच्या गावाकडच्या गप्पांमध्ये घरातल्या माणसांपासून मांजरीपर्यंत आणि अंगणातल्या तुळसीपासून, टायगर नावाच्या कुत्र्यापर्यंत आणि गावातल्या मैत्रिणी, मित्र, शेजारी, शिक्षक, शाळा कॉलेज आणि बरंच कांही बोलत राही. मनाने ती केव्हाचं आपल्या गांवी पोहोचली होती. मातेला जोडलेली नाळ जन्मल्यावर तुटते पण आपण कायमचे मनाने जोडले जातो आणि मातीशी असलेलं नातं आठवणीत रेंगाळते आणि अनावर ओढ निर्माण करते. रोजच्या बोलण्यातून, हावभावातून हे सारे जाणवत होते.
हॉस्टेलवर पोहोचता पोहोचता नऊ वाजले होते. रोजने अबोली फुलांचा गजरा रेक्टर काकूंना दिला आणि आपल्या रूमकडे गेली.
“जीत, गीता, रोज, रश्मी चला जेवायला, साडे नऊ वाजले. मावशीना उशीर होतोय.” काकू घाई करतं होत्या.
एव्हाना बाकीच्या सर्व महिलांचे जेवण उरकले होते. पटापट अंघोळ करून चौघी टेबलवर ताट ठेऊन जेवण वाढायची वाट पाहात बसल्या तसं मावशींनी ताटात पोळ्या आणि भाजी वाढली. आमटीचा मस्त आंबटगोड वास दरवळत होता.
“मावशी एकच पोळी द्या” म्हणून बाकीच्या पोळ्या डब्यात परत ठेवल्या. भात, आमटी वाढुन घेऊन मावशींना घरी जाण्यासाठी फ्री केलं.
☕️🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤🥤
अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
काकूंनी रश्मीला हाक मारून निरोप दिला. “रश्मी, तुला भेटायला कोणीतरी सर आले होते. ही चिठी ठेवलीय त्यांनी. घाऱ्या डोळ्याचे, गोरे गृहस्थ होते. रजिस्टर मध्ये नाव नोंदवलंय त्यांनी. बघून घे रजिस्टर.” काकूंनी घडी केलेला पेपर देत निरोप सांगितला.
चिठी वर अक्षर संगीत सरांचे होत पण पेपर उघडुन पहिला तर निरोपाची चिठी जाई मॅडमची होती.
प्रिय रश्मी मॅडम, नमस्कार 🙏.
कशा आहात तुम्ही? गेले महिनाभर परीक्षा असल्याने आपण शनिवार – रविवारी येऊ शकला नाहीत हे मी जाणून आहे. येता शुक्रवार आपल्या वैभव लक्ष्मी व्रताचा शेवटचा म्हणजेच, उद्यापनाचा असेल. तुम्ही उद्यापन करण्यासाठी संस्थेत या. मी सारी तयारी करून ठेवते. सरांबरोबर निरोप द्यावा.
आपली
गगन जाई.
“चिठी किसकी हैं भाई ❓️” भिवाया उंचावत जितने रश्मीला छेडले. डायनींग टेबलवर ठेवलेली चिठी रश्मीने जितकडे सरकवली.
चिठी वरून ग्लान्स घेत, जितने खात्री करण्या साठी प्रश्न केला, त्याचं जाई मॅडम ना, ज्यांनी तुला अष्ट वैभवलक्ष्मीची व्रत कथा सांगितली होती. किती ग्रेट कलीग टीचर आहेत तुझ्या. अन कंडितशनल लव्ह अँड हेलपिंग नेचर. अशी मैत्रिणी मिळायला नशीब लागतं.”
जीतला हेवा वाटला.
“अगदी तुमच्या सारख्याचं आहेत, जाई मॅडम पण”, रश्मी नॉस्टॅल्जीक होत बोलली. तिला प्रसंग आठवला.
रश्मीने वैभवलक्ष्मीची पूजा करताना पाहून जाई मॅडमनी, स्वतः जवळ असलेले अष्टवैभव लक्ष्मीचे पुस्तक दिले. संकल्प करून व्रत कसं करायचे ते सांगितलं आणि शुक्रवारी प्रचंड उत्साहात आणि श्रद्धेनं व्रताला सुरुवात केली.
हातात अक्षता आणि जल घेऊन अकरा शुक्रवारचा वैभवलक्ष्मी पूजेचा संकल्प केला आणि पूजा मांडली.
त्याचं अटळ विश्वासाने… 🙏
शुक्रवारी संध्याकाळी, दरात सडा टाकून अष्टदल कमळाची 🔆 रांगोळी घातली आणि हळद, कुंकू आणि लाल फ़ुलं वाहिली. स्वच्छ धुतलेल्या उंबऱ्यावर चक्र आणि पादुकांची रांगोळी काढून हळद, कुंकू आणि दोन्ही बाजूला फ़ुले वाहिली.
घरात स्वच्छ लादी पुसून घेऊन अष्टलक्ष्मी आणि दत्त गुरूंच्या फोटो जवळ बाजूलाच अष्टदल कमळाची ☸ रांगोळी रेखाटली. वर पाठ ठेवला. बाजूला तुपाची निरांजने ठेवली आणि समई प्रज्वलित केली. पाठावर स्वच्छ रुमाल अंथरून तांदूळ राशीं पसरली. कलशाला हळदीचे चार आणि कुंकवाचे चार उभे पट्टे कलशाच्या खालून गळ्या पर्यंत ओढले. कलाशामध्ये पाणी भरले. एक रुपयाचे क्वाईन, हळद, कुंकू, अक्षता आणि फ़ुलं कलाशामध्ये ठेवले. कलश पटावरील तांदुळावर ठेवला आणि वर वाटी ठेऊन सोन्याच्या रिंग्ज आणि अंगठी ठेवली. बाजूला अष्ट लक्ष्मीच पुस्तक ठेवलं. हळद कुंकू फ़ुलं वाहून नमस्कार केला.
लक्ष्मी स्तोत्र म्हंटले.
या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी।
आरक्ता रुधिराम्बरा हरीसखी या श्री मनोल्हादिनी।
या रत्नाकर मंथानालप्रगटीता विष्णोश्च् या गेहींनी।
सा मां पा तू मनोरमा भगवती लक्ष्मीश्च् पद्मावती।।
लक्ष्मी यंत्राला आणि श्री धन वैभव लक्ष्मी, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधी लक्ष्मीमाता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री विरलक्ष्मी माता, श्री धान्यलक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता
या अष्ट लक्ष्मी मातांना नमस्कार करून
जय लक्ष्मी माता 🙏चा जप झाला.
दूध साखर, साखर फुटाणे, तांदुळाची खीर यांचा नैवेद्य दाखवला.
जाई मॅडमनी सांगितलेलं व्रत खूपच प्रभावी होत.
पाच शुक्रवार पूर्ण होताच रश्मी नव्या जॉबला जॉईन झाली आणि उर्वरित शुक्रवारी वैभव लक्ष्मीची पूजा हॉस्टेल रूममध्ये झाली होती. येणारा शुक्रवार अकरावा शुक्रवार होता आणि उद्यापन बाकी होते. जाई मॅडमनी आठवणीने चिठी पाठवली. शुक्रवारी कार्यालातलं काम संपवून इतकं दूर विज्ञान संस्थेत जाऊन उद्यापन श्यक दिसत नव्हत.
रोज आणि गीताने हॉस्टेल मध्येच व्रताचं उद्यापन करण्याच्या प्रस्तावाला दुजोरा दिला आणि उद्यापन पार पडले.
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❗️🙏🌹🙏🌹
“ए, रश्मी तू त्या दिवशी काकूंना पाहून मार्गशीर्ष गुरुवार बद्दल बोलत होतीस सांग ना. त्या दिवशी आपण संध्याकाळी पाणीपुरी खायला बाहेर गेलो आणि पुढे बोलणं झालंच नाही प्लीज
आम्हाला सांग ना, काय आहे मार्गशीर्ष गुरुवार बद्दलची माहिती ❓️.” शिवगंगाने रश्मीला मार्गशीर्ष गुरुवार बद्दल माहिती विचारली.
रश्मीला विज्ञान संस्थेतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार आठवला.
🍎🥭🍏🍋🍊🍅🍓🍒🍇🍈🍑🍐
पहाटे उठून जास्वंदाची फुल आणायला रश्मी नेहमीच्या ठिकाणी पोहोचली. समोर शेजारच्या वहिनी, अर्धोन्मीलित फुलां सहित डहाळी खूडताना दिसल्या. त्यांनी इतक्या पहाटे केसावरुन अंघोळ केली होती.
“वहिनी, इतक्या लौकर अंघोळ केलीत, आज कांही विशेष आहे का❓️” रश्मीने सहज विचारणा केली.
“मोठ्या मॅडम, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे.” सकाळीच पूजा करते मी”. वहिनी उतरल्या.
आणि…..
पुढील भागात वाचा… 🌹🌺🙏
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Website: http://vratwork.in/portfolio
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3
2 Responses
होस्टेल लाईफ रश्मी एंजॉय करते आहे, ग्रामीण भागातुन शहरात आल्यावर अनेक गोष्टी अंगवळणी पडतात मग पाणी पूरी असो की शॉपिंग. कथा लिहिताना आपण आवर्जून हिंदू संस्कृती आणि व्रत वैकल्य याचा उहापोह करत आहात. छान.
“तू सदा जवळी रहा..” भाग 39 वाचून आपण दिलेले अभिप्राय मला चांगले लिखाण करण्यास प्रेरणा देणारे आहेत. धन्यवाद मंगेश सर 🙏🌺