मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
अगोदरचे भाग वाचण्या करता लिंकवरती क्लिक करा 👉 भाग (क्रमांक)
👉भाग -31* अर्थात अडचणींवर मात पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरिला जातात. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
👉भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
👉भाग – 33* फरक : एका वेलांटीचा फरक – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
👉भाग -34* बोबडकांदा, मीच शहाणी झाले‼️ मीटिंग, स्ट्रिक्ट टिचर.
👉भाग- 35*वाचन ‼️ वचन ‼️पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️
👉भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, वंदे मातरम 🙏 नाटकी रश्मी❓️
सई का नाचली ❓️ आणि .…
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात..❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले❓️
काय मिळालं साडेचार वर्षात… ❓️
नशीब म्हणजे काय असतं❓️ ते रश्मीकडे पाहून समजते. नशिबानं काय नाही दिलं रश्मीला? अनंत मरणे झेलून, पुन्हा इथेचंं जन्म घ्यावा अशी 🇮🇳🇮🇳 भारत माता🙏. “घे जन्म तू फिरोनि, येईन मी ही पोटी” असे शब्द ओठी यावेत आणि जन्म घ्यावा आणि शून्यातून ⭕️ विश्व् निर्माण🌎🌍 करायची उमेद बाळगावी, फिनिक्स पक्ष्या प्रमाणे राखेतून भरारी 🦅घेण्याचं साहस दाखविणारी जन्मदात्री आई🙏. आपल्या लाडात न्हाऊ घालून रश्मीचं बालपण समृद्ध करणारे पण फार कमी सहवास मिळालेले वडील🙏. उदंड प्रेम करणारी, हट्ट पुरविणारी भावंड. प्रेमळ एकत्र कुटुंबातील समृद्ध बालपण आणि गोड स्मृती. काका, काकु, चुलत भावंड, आत्या, आत्ये भावंड, मावश्या आणि मावस भावंड, आजोबा, तुडुंब भरलेल्या पोटावर लाडाने आणि प्रेमाने दूध, केळी भरवणारी आणि चुकलं तर, कार्टे म्हणून कान पकडणारी आणि नैतिकतेचे धडे देत कुटुंबाला भक्कम आधार देणारी ताई आज्जी, जीवाला जीव कसा लावावा, गरजेला भक्कम आधार कसा द्यावा हे ज्यांच्या कडून शिकावं अशा विशाल हृदयाच्या बहिणी. फक्त शिकवणं हेचं कर्तव्य न समजता नैतिक आधार आणि गरजेला मदत करणारे गुरुजन, मनीचे गुज बोलावे अशा मैत्रिणी. शेजारधर्म आणि माणुसकी दोन्ही हातात हात घालून मदतीला येणारे शेजारी. चांगली शाळा, हायस्कुल, कॉलेज, गुरुजन आणि त्यांच्या असंख्य स्मृती. जीथं काम करायला मिळालं ती संस्था, शाळा, तेथील संस्था चालक, प्रोजेक्ट ऑफिसर्स, सहकारी शिक्षक, पालक, मुलं. तिथंच गुरुमंत्र देणारे आणि योगा, मानसपूजा शिकविणारे स्वामी आत्मबोधानंद सरस्वती🙏 गुरुदेव, या आणि अशाच असंख्य कर्तव्यदक्ष देव माणसांच्या सहवासात मिळालेला अनुभव आणि गाठीशी पुण्य बांधून नव्या कामाची सुरुवात करायला, जन्मदात्री, आईचा आशीर्वाद घेऊन रश्मी निघाली.
न संपणार धन ❗️❗️
नियमित शिकवण्यातून अनुभवाचे न संपणार डब्बोलं हा मोठा ठेवाच मिळाला. खुप वर्षे कामं केले आणि फक्त पाट्या टाकल्या तर सर्टिफिकेट मिळते. पण जे धन रश्मीने कमावले ते, ना चोरी होणार होते , ना कुणी लुटून नेणार होते , ना हिसकावून घेणारे होते , नां डल्ला मारू शकणारे होते . ते फक्त तिचेचं होते. ती कितीही वाटत सुटली तरी नं संपणारे तर होतेच पण जितके वाटू तितकी त्यात भरचं पडत राहील असेच धन होते. अपार कष्टातून आलेला अनुभव होता तो. कांही विचार ठाम बनले तर कांही विचार किती निरर्थक असतात हे समजले. कशाच्या आहारी जावे? कुठं थांबावे? कुठे मागे वळून पाहू नये? कुठे सिंहावलोकन करावे? कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्या? कोणत्या तिथेच सोडाव्यात? समाजासाठी काय करू शकतो? आणि किती करू शकतो? काय उद्देश आहे आपल्या हेतूचा? सगळं स्पष्ट, स्वच्छ होते मनात. कुठे किंतु परंतु नव्हता. दूर पर्यंतचे चित्र स्पष्ट दिसतं होते.
विचार मंथन
विचार आखीव, रेखीव, घोटीव होते. अनुभवातून चांगले , वाईट, बरे याचा आराखडा तयार झाला होता. दोन गुणिले दोन बरोबर चार हा व्यवहार होता. भावने मध्ये असं नसते. त्याचे मापदंड असे नसतात. किंबहुना भावनेमध्ये कसलेच माप आणि कसलेच दंड नसतात.
शड़रिपू : काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि लोभ यांनी आपल्यावर वर काबू करण्याअगोदर सावध असणे गरजेचे असते. छुप्या किंवा उघड पावलांनी मनात प्रवेश करणाऱ्या या सहा भावनाना शत्रू का मानले जाते? ते विकार का वाटतात? त्या काही वेळेस तीव्र रूप धारण करतात आणि आपल्याकडून या अशा अतिरेकी भावनांच्या आहारी जाऊन कांही कृती घडते आणि दृश्य रूपांत झालेली कृती आपलं अस्तित्व धोक्यात आणु शकते. षड्रिपुंचा मनावर अंमल असताना आपण अस्वस्थ असतो. भावना प्रेमाची असली की आसक्ती निर्माण होते आणि मग पझेसिव्हनेस जागा होतो. एखाद्या वस्तुपर्यंत ठीक असतं पण त्याही गोष्टीचा अतिरेक झाला की समस्या निर्माण होतात. प्रीतीला आसक्तीची माया मायेने वेढले की, त्यातून विकृती जन्म घेते आणि मग् या चक्रातून विनाश संभवतो. मायेचे मोहात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. प्रेम ठीक – आसक्ती नको, माया ठीक – मोह नको. पाण्याखाली कदाचित गाळ नसेल, आणि ज्योती खाली छाया नसेल पण प्रीतीला वेढ्लेली आसक्ती ही चिरंतन असणार आहे. “मी”, “माझं”, “मला” म्हणताना, “अहं ब्रम्हास्मि” चा पूर्णपणे विसर पडतो आणि या “मायामय विकाराच्या आधीन” होऊन “केवळ ब्रम्हमय साचार”ला दुरावतो. या साऱ्या विकारांमुळे दुःख निर्मिती होते. बुद्धीची द्वारे खोलून अगदी अलिप्त पणे ते
भावना – विकार आणि त्यांचा कार्यकारण भाव जाणून घेतल्यास, एक स्पष्ट चित्र मन:चक्षु समोर उभे राहील. विचार करून त्यावर अंमल करू शकतो. जो आपली अंतर्ज्योत प्रज्वलित करतो त्याला हे सारं स्पष्ट दिसते. चांगली आणि विचारपूर्वक केलेली, चांगली कृती कधीही चांगलच फळं घेऊन येते.
********************************
घेऊनी पंगू आपुल्यापाठी, आंधळ्यांची होतो काठी, प्रमाणे जिथे, जिथे मदतीची आवश्यकता असेल तिथे अवश्य जावे, मदत करावी. मदतीची अपेक्षा आहे आणि आपल्याला श्यक्य आहे तिथे अवश्य मदत करावी. आर्थिक, मानसिक, आणि शारीरिक कमकुवत मनुष्य, प्राणी यांचा आधार बनवा. आपण जेवत असताना भुकेला मनुष्य किंवा प्राणी समोर आला तर विन्मुख पाठवू नये. साने गुरुजींच्या “श्यामची आई”नं
आपले हृदय, अपार करुणेने भरलेले असावे हे शिकवले. स्वतःच्या मर्यादित गरजा आणि त्यातून वाचलेली गंगाजळी, दुसऱ्याच्या मदतीला अवश्य उपयोगी येते. आज मी चांगलं कोणते काम केले ? समाज विधायक कामात आपण आपला वाटा व्यवस्थित उचलतोय ना? आपण समाज – ऋणातून उतराई होतोय ना? परिस्थिती बदलली तरी सकारात्मक बदल झालेत का? या आणि अशा विचार मंथनातून रश्मीला, आपण “फक्त मोतीचं वेचत नाहीतर मोत्यांच्या माळा धारण केल्याचे, तिला स्वतःला जाणवलं. एखादा दुसरा हिरा किंवा रत्न वेचले नाहीत तर हिऱ्याची खाण मिळाली. रत्न हार गवसला” रश्मीला. ही वैचारिक पातळी वाढवून, विचार प्रगल्भतेकडे घेऊन जाणारी आभूषणे आपण ल्यायली आहोत याची जाणीव ठेऊन मिळालेल्या संधीच सोन करणं, हेच ध्येय ठेऊन पुढील वाटचाल करायची याची मनाशी खुण गाठ बांधली.
स्वामी आणि विंचू 🦂🦂
जोरात पाऊस पडून गेला आणि झाडं वेली सुस्नात मुलींसारख्या निर्मळ दिसू लागल्या. लाल पाण्याचे छोटे, छोटे ओहोळ स्वतःची वाट स्वतःच शोधून वाहत होते. वळण घेणं, अवखळपणा, उतारावर जोराने घरंगळावे थोडीही चढण असेल तर सळसळत सपाट प्रदेश शोधावा आणि उथळपणा आला तर खळखळाट करावा आणि आपल्यापेक्षा मोठया ओहोळाला मिळावं ही आसं घेऊन वाहणारे पाणी पाहून घरीच गप्प बसेल ती रश्मी कसली. कोपऱ्यात ठेवलेली टू फोल्डेड छत्री घेतली. रश्मीने बारावीला ऍडमिशन घेतले तेंव्हा आईने हौसेनं छत्रीचा हा मस्टर्ड कलर शोधला होता. जवळ, जवळ आठ वर्षाची साथ दिली छत्रीने. मूकपणे सर्व प्रसंगांची साक्षी असलेली छत्री, जिवाभावाची मैत्रीण वाटली. छत्रीवरून प्रेमानं हात फिरवला तीने आणि जोर लावून छत्री ⛱️उघडली आणि पायात चपला चढवून नदीचे रोरावणारे पात्रं पाहायला निघाली. नदी, तिची नेहमीची जागा सोडून बरीच पसरली होती. लाल पाणी जोरजोरात आवाज करतं वाहत होतं. आजूबाजूची झाडे तिच्या रौद्र रुपाला भिऊन, झुकून अभिवादन करतं होती आणि लव्हाळे तिला लोटांगण घालून आपला सुगंध तिच्या वाहत्या लाल पाण्यात मिसळत होते. माती, वाळूचे कण आणि जे काही वाहून नेणं श्यक्य होतं ते पाण्याच्या जोरादार असलेल्या प्रवाहाबरोबर वाहून नेत होती ती. वाहण्याचा जोशात तीरावरल्या सुखं – दुःखाची पर्वा नव्हती. जाणीव नव्हती. एक विंचू जिवाच्या आकांतानं वाहत्या पाण्यातून काठावर येण्याचा प्रयत्न करतं होता. आणि लाट त्याला आत खेचत होती.
रश्मीला तिची आई, विनितानं सांगितलेली गोष्ट आठवली.
🦂🦂🦂
स्वामी पूर पाहायला नदीच्या तीरावर उभे होते. वाहतं पाणी पाहून स्वामींच्या चित् – वृत्ती प्रसन्न झाल्या . पाऊस💧💧⛅️⛈️⛈️ पडून गेल्यावर निरभ्र आकाश लक्ष वेधून घेतं तसंच दुथडी भरून वाहणारी नदी चित्तवृत्ती पुलकित बनवते. मोकळ झालेलं आकाश बघून आज असच प्रसन्न वाटतं होतं स्वामींना.
जोरात येऊन गेलेल्या पावसाने कृष्णा नदी दुथडी भरून वाहत होती. जोरजोरात घोंगावत वाहणारा वारा, पाण्यावर मोठ्या, मोठ्या लाटा निर्माण करत होता. अशाच एक मोठ्या लाटेने नदीकडेवरून चालणाऱ्या 🦂विंचवाला प्रवाहात खेचून घेतलं. लाटेबरोबर जसं पाणी वर खाली होऊ लागलं तसा विंचू 🌊🌊🦂हिंदकळायला लागला आणि जोर लावून आधार शोधू लागला. स्वामींच्या नजरेतून हे दृश्य सुटले नाहीं. जिवाच्या आकांतानं काडीचा आधार शोधणाऱ्या, जहरीला डंख मारणाऱ्या प्राण्याची दया आली. करुणेचा सागर असलेल्या स्वामींचे हृदय, या मरणाच्या दारात पोहोचलेल्या प्राण्याची जिवाच्या आकांतानं चाललेली धडपड पाहून गप्प राहणं त्यांच्या धर्माआड येताना दिसलं. न कळंतपणे स्वामींनी आपला उजवा हात पुढे करून जगण्यासाठी धडपणाऱ्या विंचवाला आपल्या तळ हातावर घेतले आणि तसाच हात बाजूला घेऊन, विंचवाला जमिनीवर सोडण्यासाठी खाली करून हलवला. विंचवांन मारलेल्या डंखेमुळे स्वामींच्या मस्तकात कळ गेली आणि स्वामींनी जोरात हात झटकला. विंचू जमिनीवर पडण्याऐवजी पाण्यात पडला आणि पुन्हा त्याची जगण्यासाठी धडपड सुरु झाली. जगण्यासाठी धडपड करणाऱ्या प्राण्याला पाहुन, आपल्याला विंचू डंखामुळं आलेली कळ किती क्षुल्लक आहे याची जाणीव स्वामींना झाली आणि स्वामींनी पुन्हा स्वतःचा हात पुढे करून विंचवाला, आधाराची बोटं दिलं. जसा पाण्यातून प्राणी बाहेर आला तसा पुन्हा स्वामीना डंखेचा प्रसाद दिला आणि नैसर्गिक क्रिया घडून विंचू परत पाण्यात पडला. आता विंचवाला वाचवायचा सहावा प्रयत्न पाहून गावकरी बोलला, “स्वामी, म्या मगा धरनं बघतुया, तुमी इचवाला🦂 वाचवायचं लई येळा प्रेयत्न केलासा बगा. पण तो काय डंख मारायचा ऱ्हlईत नाई बगा.”
“तो जो पर्यंत त्याचा वाईट गुण सोडत नाहीं, तो पर्यंत मी माझा चांगला गुण का सोडू?” म्हणून स्वामींनी शेवटी त्या विंचवाला पाण्यातून जमिनीवर ठेवला आणि हाताला झालेल्या वृश्चिक🦂 दंशावर वनौषधी🌿🍀 लावायला आपल्या कुटीकडे निघाले.
**********************************
रश्मीने बाजूला पडलेली काठी घेऊन प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या विंचवाला आधार देत पाण्यातून बाहेर काढलं आणि काठी तिथंच ठेऊन दिली.
“आरे, दिसला की ठेचा त्याला, डंख मारून हैराण करणारा इच्चू हाय तो. लई इखारी जातीचा हाय, 🦂काळा इच्चू” म्हणून रश्मीने बाजूला ठेवलेली काठी उचलली आणि त्या विंचवावर सटासट वार केले…”
पाठी उभ्या असलेल्या टोळीकडे बिलकुल लक्ष नसलेल्या रश्मीला प्रश्न❓️ पडला. काळ्या मातीत निपचित पडलेल्या प्राण्याकडे पाहून “रोरावणाऱ्या पाण्यात स्वतःचा जीव वचविण्यासाठी धडपडणाऱ्या प्राण्याला बाहेर काढून चांगलं केलं की वाईट?”
***********************************
रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
परीक्षा कक्षातून बाहेर पडून रश्मीने मध्यवर्ती बस🚒 स्थानक गाठले. उन्हाचा मारा प्रचंड होता. वातावरण तापलेलं होतं. मराठवाड्यातला मोठा जिल्हा आणि प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण, जवळच लेण्यासाठी, प्रसिद्ध असलेली गावं होती. सतत प्रवास, अभ्यास आणि परीक्षेचं टेंशन या मूळ चेहऱ्यावर किंचित थकावट दिसली तरी आतून प्रसन्न वाटतं होतं. पेपर मस्त गेला की थकवा पळून जातो आणि नेहमी सारख हलकं वाटतं होतं. पंख पसरून आकाशात झेप🦅 घ्यावी आणि उंच निळ्या आभाळात विहरत राहावं. वरून झाडं🌳, वेली🌿, पानं🍀, कळ्या🌷🌷, फ़ुलं🌺🥀, फळं, डोंगर, दऱ्या, घरे, शेती वाडी, विहिरी, नाले, नद्या, समुद्र सारच जें जें नजरेच्या टप्प्यात येईल ते नजरेखालून जाईल.
अभ्यासाच्या वेळी सातत्याने पाठपुरावा करणारी आणि वेगवेगळ्या उपायांना धुडकावून लावून, डोळ्यावर अंमल करणारी झोप😞, पेपर संपल्यावर कुठे दडी मारून बसते तिचं जाणे.
********************
मध्यवर्ती बस🚒 स्थानकात पोहोचली तेव्हा अशी गोष्ट पाहिली की, नजर हटेना.
पांढर पण थोडे मळल्यामुळे रंग बदललेले धोतर आणि कुडता घातलेला. वयाने ज्येष्ठ वाटावी अशी व्यक्ती. डोक्यावरचे पांढरे पागोटे उन्हापासून डोक्याचं संरक्षण करतं होते. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या 😣जास्तच तीव्र जाणवत होत्या. घामाचे पाठ सुरकुत्यांचे अडथळे पार करतं चेहऱ्यावरून वाहत होते. मळकट कपडे, घामाचा वास आणि भाजून शरीरातून पाणी काढणारे ऊन सारेच असह्य वाटतं होते. चालणारे पाय लटपटताना दिसले. एका क्षणी चालण थांबलचं. त्यांना बस स्थानकाची सावलीपण गाठता आली नाही. आणि लटपटणाऱ्या 🦵🦵पायानी उभं राहायला नकार दिला. तिथंच तळपत्या उन्हात🌞☀️ बसता, बसता संपूर्ण देहाने जमिनीला जवळ केले. सारे डोळ्यांसमोर घडत होते. पण आता रश्मी बसल्या जागेवरून उठून धावत त्या व्यक्तीजवळ गेली. आणि स्वतःचा जोर लावून त्या व्यक्तीला उठवू लागली. स्वतः जवळच्या बाटलीतलं पाणी तोंडावर शिंपडले. “काका, उठा इथं पुण्याला जाणारी गाडी थांबते. प्लीज उठा.” गाडी यायची वेळ झालीय. ड्रायवर गाडी रिव्हर्स घेताना त्याला दिसणार नाही. प्लीज उठा लवकर”. हात पकडून जोर लावला तरीही समोरून काहीच प्रतिसाद मिळेना. काकांनी संपूर्ण शरीर जमिनीवर झोकून दिलं होतं. आणि एका आवाजाने रश्मीच्या जीवाचा थरकाप उडाला.
“टिंग, टिंग…. टिंग, टिंग घ्या पाठीमागे, अजून घ्या पाठीमागे. टिंग, टिंग, टिंग टिंग…. रश्मीचा “थांबाsss, थांबाsss” असे म्हणून जिवाच्या आकांताने काढलेला आवाज गाडीच्या इंजिनाच्या आवाजात विरला. गाडी 🚒पाठी यायची थांबेना, काका जागचे हलेनात. रश्मीने डोळे घट्ट😵 मिटून घेतले आणि बेंबीच्या देठापासून किंकाळी फुटली, “आsssssss” आणि काकांच्या पायाजवळ गाडीचं चाकं जोराचा आवाज करत थांबलं. ड्रायव्हरनं आरशातून मागे पाहिलं आणि जीवाच्या आकांतानं किंचाळणाऱ्या रश्मीकडे पाहून त्यांनी करकचून ब्रेक लावला.
रश्मीचं सारं शरीर थरथरत होतं. कंडक्टरने जोराची उडी मारून मागे घाव घेतली. ड्रायवर आणि इतर लोकं जमा झाले आणि काहींनी काकांना उचलून बस स्टॅन्डमधील बाकड्यावर ठेवलं. रश्मीने बाटलीतील पाणी हातात घेऊन चेहऱ्यावर जोराचा सपकारा मारला आणि “काका” म्हणून खांदा पकडून झोरात हलवलं तसे समोरच्या काकांनी डोळ्यांची उघड झाप केली. पटकन बॅगेतले पैसे देऊन चहा, बिस्कीट, पाणी मागवलं आणि त्यांना खाऊ दिला. नाही, नको म्हणून त्यांनी ओठ🤐😳😩 घट्ट मिटून घेतले. जवळ उभ्या असलेल्या कंडक्टरकडे पाण्याची बाटली आणि चहा, बिस्कीट देऊन समोर बसून रश्मीने त्यांना भरवायला लावलं. जवळची माणस पांगली होती. पाणी घटा घटा प्यायले आणि चहा, बिस्कीट पोटात गेले काकांच्या, तसं रश्मीने उजवीकडून डावीकडे दोन वेळेस मन वळवली. रश्मीच्या डोळ्यातून अश्रू😪 वाहत होते. थोड्या वेळानं तिलाही बर वाटलं. बाटलीतून पाण्याचा घोट घेतला आणि रश्मीने विचारलं, “काका, एवढ्या उन्हात 🌄🌞🔥काय गरज होती बाहेर पडायची❓️ उन परतल्यानंतर निघायचं ना?
आतून गदगदून आले त्यांचे बोलणं ऐकून, “पोरी👧, तीनं दिसापासून पोटात अन्नाचा 🍚 कण न्हाई. काय करू या देहाचं ? गावच्या पवण्याकडं निघालो व्हतो. चालता चालता शक्ती संपली बघ. पत्याचं लागला न्हाई जिमिनीवर पडलो कसं ते.” स्वतःकडचे बिस्कीट पुडा, केळी🍌🍌, पाण्याची बाटली आणि दोनशे रुपये दिले रश्मीने आणि बोलली. “काका पावण्यांकडे जाईस्तोवर पुरतील इतके पैसे”.
काकांनी रश्मीच्या डोक्यावर आपला सुरकुतलेला, 👏थरथरता हात ठेवला आणि अगदी पोटातून शब्द बाहेर आले, “बाई, गुणांची पोर गंsss तू❗️ देव तुझं भलं करो”.
“ताई, मला वाटलं, ते काका तुमचे कोणी नातेवाईक आहेत.” कंडक्टर बोलला
“हं, माणुसकीचं नातनातं सगळ्यात मोठं नाहीं का भाऊ?” रश्मी प्रती सवाल करत उत्तरांची वाट नं पाहता बॅग उचलून पुण्याच्या बस 🚒मध्ये बसली.
“मास्तरनी🧛🧛♀️📃✏️📝हाईसा जाणू”, ड्रायवरनं अंदाजानं वाक्य फेकलं..
पाठीमागून आलेल्या वाक्याने रश्मीच्या जिवणी विलग 👄 झाली आणि बसच्या काचेच्या खिडकीत तिला स्वतःचं हासरं 😄प्रतिबिंब दिसलं.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Website: http://vratwork.in/portfolio
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3
4 Responses
खूप सुंदर.
अगाध अनुभव विश्व .
क्षण क्षण प्रामाणिक कथान.
Thank you, जयश्री मॅडम. ” तू सदा जवळी रहा” भाग 37 वाचून आपण दिलेले अभिप्राय वाचले. पुनःश्च धन्यवाद. 🙏🌺
आजचा भाग अतिशय सुंदर आहे. असेच पुढील भाग वाचायला मिळावेत ही इच्छा आहे. लेखिकेचे मनपूर्वक अभिनंदन,अभिनंदन, अभिनंदन!!!
जयवंत सर , नमस्कार. ” तू सदा जवळी रहा.. ” भाग – 37 वाचून आपण दिलेल्या अभप्राया बद्दल धन्यवाद 🙏🌺