“तू सदा जवळी रहा…” भाग -34 : बोबडं कांदा आणि…..

भाग -31*  पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺,  कैलास पैसे चो..  समस्या,  ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,  

भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू,  मेस मधली गजबज,  रश्मीचं भरलं वांगं,   कांदेपोहे.  

भाग – 33* फरक : एका वेलांटीचा -दोन्ही प्रिय,  रश्मीला हातात काठी का घ्यावी  लागली❓️  सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️

भाग – 34* बोबडं  कांदा … , मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर

बोबडं  कांदा …

ज्या दिवशी रश्मी विनिता आईला भेटली तेव्हापेक्षा आईची तब्बेत आता ठीक वाटत होती, पण पूर्णपणे बरी झाली नव्हती. उद्या रश्मीला परत निघायचं होतं म्हणजे बुधवारी नेहमीसारखी शाळेत जाऊ शकली असती. आई आजारी असताना साईवर जबाबदारी टाकून जातोय आपण रश्मीचं मन घर आणि काम यामध्ये आंदोळत राहिलं. सई लहान आहे. तरी पण सई सारी जबाबदारी व्यवस्थित संभाळतेय. तिच्या मुळे आपण बिनधास्त आणि इतक्या दूर राहूनपण निर्धास्त असतो. रश्मीला सईच कौतुक वाटलं. इतक्या लहान वयात केवढया जबाबदारीने वागतेय सई हातातलं कमला मार्कण्डेयची नोवेल पूर्ण वाचून संपलं तरी झोपेचा पत्ता नव्हता. आज रश्मीला आबांची आठवण प्रकर्षाने येत होती. बाबा नसल्याची उणीव रश्मीला वारंवार जाणवत होती. त्यांच्या सहवासात कदाचीत आईची आणि सईची एव्हडी हेळसांड झाली नसती. आईसाठी, तिच्या जोडीदाराचं सोबत असणं खूप महत्वाचं होतं. साथीच्या हातात हात घालून, आबा – आईचा प्रवास सुखकर झाला असता. आपल्या लहानपणी आपल्याला आबांचं अस्तित्वच खूप आनंददायक होतं. निर्भय होतो आपण. मोठा आधार होता. कदाचीत आपलं सर्वाचं एकत्र असणं जीवनाच गणित बदलवून टाकणार ठरलं असतं. आबांचं अचानक निघून जाणं , आईचं भाव विश्व ढवळून काढणारी घटना ठरली. आबांचा अपघात – एकचं घटना – आईचा जीवन प्रवास वेगळ्या वाटेवर घेऊन गेली. एकटी आई, तीनही मुलींना वाढवताना, आव्हान झेलता, झेलता; ताण आणि व्याधी पाठी लागल्या विनिताच्या. लहानपणी इतकीच आता पण आबांची आपल्याला गरज होती. पडल्या, पडल्या रश्मीच्या डोळ्याला धारा लागल्या. डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिसणारी आठवण, मनानं स्पष्ट दिसतं होती. रश्मी एकदम आपल्या बालपणात पोहोचली…..

“बाळ रश्मी,  तयार झालीस  का?  मला फिरायला घेऊन जाणार ना?  आबानी त्यांची बायको विनिताकडून रश्मीसाठी  आणलेला छोटा रुमाल हातात घेतला आणि रश्मीकडे पाहात  तर्जनी पुढे करुन प्रश्न विचारला.  

“आबा,  लश्मी तयाल आहे.  च्यला फिलायला”.

  पायात लाल गोंड्याच्या चपला चढवता,  चढवता  रश्मी बोलली. 

“रश्मी तुझ्या नावात,  आबांच्या नावात आणि आडनावात तिन्हिंमध्ये चार वेळेला ‘र’ चा उच्चार  आहे.  तू  तर ‘र’म्हणत नाहीस. ‘र’ ऐवजी ‘ल’ म्हणतेस. 

जिभेचा आकार ओंजळी सारखा करायचा. जिभेचा शेंडा टाळ्याला  लावून आवाज काढायचा र्रर्रर्र   र्रर्रर्र,  रवी, रिटा,  रश्मी असं म्हणायचं. “काकू,  रश्मीला पहिल्यांदा उजव्या हाताची ओंजळ आणि नंतर जीभेची ओंजळ करुन, उच्चराची पद्धत सोपी करुन समजावून सांगत होत्या.

“हं, बोल, रवी,  रिटा,  रश्मी “काकूंनी ‘र’ अक्षरावर जोर देऊन तीनही शब्द उच्चारले. 

“हं बोल,  लवी ss, लिटा ss, लश्मीss”,  रश्मीनं : काकूंचं वाक्य कॉपी तर केलं पण ‘र’ च ‘ल’ करूनच. 

“कित्ती बोबल बोलते आमची लश्मी”, म्हणून छायाताईंन रश्मीचा गालगुच्चा घेऊन दीर्घ पप्पी घेतली,  तसं  आपल्या  छोट्या हातानी गाल पुसून घेत नाराजीच्या सुरात रश्मी  बोलली,  “छाया ताई,  माझी पावडल पुसून जाईल ना,  मी आबां बलोबर फिलायला  जाणाल आहे आता.”  

“आले बापले❗️❗️ पण तुला पावडल पाहिजे कशाला❓️”   म्हणून आबा आणि छायाताई एकदम, एका सुरात आबांच नेहमीच बडबड गीत सुरु केलं.  

“आंबा पिकतो,  रस  गळतो,  नाडकर्णीची पोरं झिम्मा खेळती,   झिम पोरी झिम,  कपाळाचं भिंग,  भिंग गेलं फुटून,  पोरी गेल्या उठून,
पोरीत पोरी,  लश्मीच गोली.” म्हणत,  आबानी  छोट्या रश्मीला उचलून खांद्यावर बसवलं आणि एक, एक पायरी उतरत खाली आले.   छाया ताई,  उमा ताई,  शशी ताईचं घर पार करत वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आले, तसं सवयीनं रश्मीनं आपली मान खाली केली जेणेकरून दरवाजाच्या चौकटीचा भाग डोक्याला लागणार नाही. 

अंबानी रश्मीला खांद्यावरून उतरवला आणि बोटं पकडून चालत तिघे मुख्य रस्त्यावरून फिरायला निघाले. तेवढ्यात उमेशदादाची आई येऊन, नेहमीसारखं रश्मीचं  गळणारं नाक साफ केलं. 

“शेम्बडी   रश्मी,  फिरायला निघाली का?” चला, आम्हीपण येतो फिरायला,” म्हणून शंकर काका वाड्यात जायच्याऐवजी बाहेरच्या; बाहेरचं फिरायला निघाले. रस्त्यावर एकाजागी रश्मी उभी राहिली. पुढं पाऊल टाकेना. आबांनी पुन्हा रश्मीला उचलून खांद्यावर घेतलं.

  “श्री….  दादा;  तुझी मुलगी; रश्मी एकदम तुळतुळीत डोक्याची आहे रे.  डोक्यावर,

एक केस नाही तिच्या.” शंकर काका आणि आबा;  सुळ्यांच्या वाड्यापासून वळणाऱ्या रस्त्यावरून चालताना बोलत होते.  

“हं, चांगलच आहे की, रश्मीच्या डोक्यावर केस येतील की नंतर. काळजी कशाला करायची.  अनंत काका,  घरचेच  वैद्य आहेत.  काहीतरी  उपाय करतील ते.” श्री… , शंकर काकांचा संवाद  चालू असताना रश्मीला दुकान दिसलं. दुकान पाहून रश्मीने,  “आबा मला लिम् लेट गोळी पाहिजे”,  म्हणून दुकानाच्या दिशेने बोटं दाखवलं. 

“ये माझ्याकडे,  आज आमच्या रश्मीला, शंकरकाका,  लिमलेटच्या गोळ्या देणार आहेत.” म्हणत शंकरकाकांनी हात पसरले तसं रश्मीने  शंकरकाकाकडे झेप घेतली. शंकर काका आणि  आबानी,  “अगं, रश्मेss, रश्मे sss हळू,  हळू”,   म्हणून  खाली पडण्यापासून सांभाळलं.   शंकर काका आले की रश्मीला  लिम्लेटच्या गोळ्या मिळण्याचा अलिखित नियम झाला.  
——————————————-
“छाया ताई, तुम्ही सगळे, काचेचा बंगला नंतल कला, मला अगोदल हे पुस्तकं वाचून गोष्ट सांग ना,” रश्मी छायाताईंचा हात पकडून खेचू लागली.
“कोणतं पुस्तक आहे रश्मी?,” छायाताईन एकावर एक अशी पाचवी काचेची बाटली ठेवत रश्मीकडे नं पाहताच प्रश्न विचारला. “हे बघ, पुस्तकं”, म्हणून रश्मीने पुस्तक अगदी ताईच्या चेहऱ्या जवळ धरलं. तशी छायाताई नाराज होऊन बोलली, “पुस्तकं एवढ जवळ धरून कोण वाचू शकेल का रश्मी? आणि माझा तयार होतं आलेला बंगला कोसळेल ना. थांब जरा. बैस इथं बाजूला” तयार होतं आलेल्या काचेच्या बंगल्यावरची नजर न हटवता; जमिनीकडे बोटं दाखवत छायाताई बोलली.
“आं, नाही, अगोदल माझी गोष्ट, नंतल तुझा बंगला” छायाताईंचा हात पकडून जोर लावून खेचत राहिली रश्मी.
शेवटची बाटली ठेवली आणि बंगला तयार झाल्याबरोबर सगळ्या मुलांनी आनंदानं टाळ्या पिटल्या. आणि छायाताईंनं रश्मीच्या हातातलं पुस्तकं घेतलं. “रश्मी, तुला कोणी दिलं हे पुस्तकं ❓️” छायाताईंनं विचारलं. “मला मोट्ट्या दादांनी दिलं, हे गोष्टीचं पुस्तकं.” रश्मीनं छाया ताईच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
दादाच्या पुस्तकं भेटीबद्दल छायाताईला कौतुक वाटलं. एकाच पुस्तकात दोन हेतू साद्य होणार होते : एक स्मरण गीत प्रकारची स्मरण कथा होती. रश्मीच्याबरोबर पाठी उभं राहून मोठया दादानं 🙋‍♂️🧔 छ्यायाताईला 👍👍👍 अंगठा दाखवला.
“मी वाचेन तसं, तुला माझ्या पाठी बोलावं लागेल रश्मी” छाया ताईनं रश्मीला सांगितलं आणि दोघी उमाताईच्या घरासमोरच्या; कट्ट्यावर उंबराच्या झाडाखाली बसल्या.
छायाताईनं वाचायला सुरवात केली….
“एक होता राजा, राजाच नाव श्रीराम.” हं बोल रश्मी
“एक होता लाजा, राजाच नाव श्लिलाम”
छायाताईं पुढं बोलली… ” एक होता राजा, राजाचे नाव श्रीराम. राजाची एक राणी. राणीच नाव रमणी.” रश्मीकडे पाहून बोलायला डोळ्यांनीच खुणावलं.
“एक होता लाजा. लाजाचं नाव श्लीलाम. लाजाला एक लाणी. लाणीचं नाव लमणी.”

“एक होता राजा, राजाचं नाव श्रीराम. राजाची एक राणी. राणीच नाव रमणी. राजाला एक राजकुमार. राजकुमारचं नाव रोश” रश्मी बोलं म्हणून छायाताईने सांगितले

“एक होता लाजा, लाजाचं नावं श्लीलाम. लाजाला एक लाणी. लाणीचं नावं लमणी. लाजाला एक लाजकुमाल. लाजकुमालचं नाव लोशन.”

रश्मीचे शब्द ऐकून छायाताईने स्वतःची मान एकदा डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवली. र र्रर्रर्र राजा, श्रीराम, राणी, रमणी, राजकुमार आणि रोशन आहे. लोशन नव्हे.

“एक होता लाजा🤴, लाजाचं नावं श्लीलाम. लाजाला एक लाणी👸. लाणीचं नावं लमणी. लाजाला एक लाजकुमाल. लाजकुमालचं🤴नाव लोशन sssss.”

हार न मानता छायाताईन गोष्ट सुरूच ठेवली. “एक होता राजा, राजाचं नाव श्रीराम. राजाची एक राणी. राणीच नाव रमणी. राजाला एक राजकुमार. राजकूमारच नाव रोशन. राजाला एक राजकुमारी👸. राजकूमारीचं नाव रश्मी” हं कर सुरु म्हणून छायाताईन हातानंच खुणावलं.

“एक होता लाजा, लाजाच नावं श्लीलाम. लाजाला एक लाणी. लाणीचं नावं लमणी. लाजाला एक लाजकुमाल. लाजकुमालचं नाव लोशन. लाजाला एक लाजकुमाली. लाजकुमालीच नाव लश्मी” रश्मी न अडखळता सर्व शब्द बोलली. तोंडातून ‘र’ कांही फुटेना.

“एक होता राजा, राजाच नाव श्रीराम. राजाची एक राणी. राणीच नाव रमणी. राजाला एक राजकुमार. राजकुमारच नाव रोशन. राजाला एक राजकुमारी. राजकुमारीच नाव रश्मी. रश्मीचं एक मांजर🐹 मांजरीचं नाव सुंदरी.” छायाताईन सुरूच ठेवलं
रश्मी, “एक होता लाजा, लाजाच नावं श्लीलाम. लाजाला एक लाणी. लाणीचं नावं लमणी. लाजाला एक लाजकुमाल. लाजकुमालचं नाव लोशन. लाजाला एक लाजकुमाली. लाजकुमालीचं नाव लश्मी. लश्मीचं एक मांजल. मांजलीचं नाव सुंदली” रश्मीची बडबड चालू आणि झाडावरुन पडलेलं पानं घेऊन छायाताईकडे देत बोलली,
“उंबराच पानं 🍃 घे ताई”
“काय म्हणतेय लाजकुमाली, लश्मी श्लीलाम नाडकलनी” मोठ्या दादानं विचारलं
“जरा थांब दादा…..,
रश्मी, माझ्या हातात हे पान देताना काय बोललीस तू ❓️ पुन्हा बोल” छायाताई, उंबराच पानं रश्मीच्या हातात परत देत विचारलं.
उंबराच पानं🍃 घे ताई.” म्हणून रश्मीने पानं परत दिलं.
दादूटल्या, लाजकुमाली लश्मी नाहीं, राजकुमारी रश्मी श्लीराम नाडकर्णी.” दादाकडे पाहात रश्मी बोलली.

“आईsss, काकुsss, ताईआजी sss, सूचीsss, मोठया काकुsss” म्हणून छायाताई आणि मोठ्या दादानं कल्ला केला. मुलांनी दिलेल्या आवाजाने सर्वजण हातातलं काम सोडून बाहेर डोकावले….
पण तिकडे लक्ष्य न देता रश्मीची बडबड कथा चालू होती… ” एक होता राजा. राजाचं नाव श्लीराम. राजाला एक राणी. राणीचं नाव रमणी. राजाला एक राजकुमार. राजकुमारचं नाव रोशन. राजाला एक राजकुमारी. राजकुमारीच नाव रश्मी. रश्मीचं एक मांजर. मांजरीचं नाव सुंदरी.” रश्मीने बडबडगीत पूर्ण करतं असताना, मोठ्या दादानं ताईच्या हातावर टाळी दिली आणि छायाताईंन रश्मीला उचलून हवेत उडवून झेललं. तशी रश्मी घाबरून बोलली, “ताई sss रश्मी पडेल ना खाली..?
“नाही, छायाताई असताना: रश्मी श्रीराम नाडकर्णी खाली कशी पडेल….”. ❓️❓️❓️
आणि मोठ्या दादानं एक कागद छायाताईंच्या हातात दिला… श्रीराम : नाव, श्रिया राणी, राजधानी… श्रीरंगपूर….. “आता उद्या “श्री…” शिकेल रश्मी…. ” छायाताई आणि मोठादादा….. हातात वही पेन्सिल घेऊन बसले.

अश्रुनी डबडबलेल्या डोळ्यांसमोरून:  आई,  काकु,  छायाताई,  आबा आणि शंकर काकांची आकृती धूसर होतं गेली. आता पडता, पडता सावरणारे आबा नाहीत आणि शंकर काका, छायाताई पण जवळ नाहीत याची जाणीव झाली.  

पण आई आहे. म्हणजे सर्वस्व आहे आपल्याकडे. आई शांतपणे पडून रश्मीच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत होती.  बाजूला हलचाल जाणवली तशी  रश्मी, आठवणीतून बाहेर येत,  आई: विनिताच्या अंगावरच पांघरूण सरळ  केलं.  

“रात्रीचा एक वाजलाय रश्मी,  अजून झोपली नाहीस तू. तुझ्या हातातलं  कमला मार्कंडयेयचं पुस्तक वाचून कधीच पूर्ण झालाय.” विनिता हळू आणि झोपाळलेल्या आवाजात बोलली.  औषधामुळे विनिताच्या डोळ्यावर ग्लानी येत होती आणि ती जाणून बुजून झोप उडवून लावत होती. 

“आई, तू  झोप आता.  मी पण झोपते”,  म्हणून रश्मीने जबरदस्तीने तोंडावर पांघरूण घेतलं. तोंडावर पांघरूण असल्यामुळे रश्मीचा विव्हळणार मनं आणि त्यामुळे चेहऱ्यावर उमटणारे भाव कोणाला दिसत नाव्हतं इतकंच.

आज,  काल  अजब  दिवस  आहेतं. आईला,  सांगितलं मी झोपतेय म्हणून. तोंडावरून पांघरून घेतलं पण डोळे सताड उघडे. जीच्या आठवणीने आपण व्याकुळ होतं होतो, ती आई समोर आहे. आई  जवळ राहायला मिळतंय आपल्याला पण मनात आबांचे विचार येताहेत.

  या मनाचं कांही समजतच नाही.  जेव्हा जे हवं ते मिळतं,  त्यावेळी मिळालेल्या गोष्टीसाठी खूश होण्याऐवजी इतर ठिकाणी का धावत❓️ असं का होतय आपलं❓️ आज आबांची आठवण,  मनं भरून ओसंडून वाहतेय.  आबांचा  आशीर्वाद  होता,  आहे आणि असणार आहे.  बस मनं थोडं ओलं  झालं.  माझे लाडके बाबा,  आणि बाबांची बोबडी रश्मी. ती आता मोठी झाली.  पण त्यांनी तर मोठी झालेली  रश्मी पहिलीच नाही.  सूची अक्काबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट करणार त्यांचं,  ” बोबडं रश्मी, बाळ” होती त्यांची रश्मी.   

“शाळेला जाताना आमच्या रश्मीला काय,  काय आणायचं?” असं नुसतं विचारलं तरी रश्मीचा बोबडपट्टा चालू होई.  मला शाळेत जाताना अंगा( म्हणजे फ्रॉक ) , गळा,  काना, चप्पल,    पाटी,  पुत्तकं,  पेन्सिल  पाहिजे.  

मीच शहाणी झाले… ❗️

  आई विनितानं  सांगितलेली   ब्राम्हणाची आणि त्याच्या तीन  बायकांची अफलातून गोष्ट आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जायची. आईच्या गोष्टी, कधी पंख लावून आकाशात मुक्त सैर करून आणायची तर कधी राजा – राणी, राजकुमार, राजकुमारीच्या विश्वात भटकंती व्हायची. कधी बुद्धिवान आजी आणि तीची चतुर सून यांची गोष्ट सांगे. कधी अकबर – बिरबल, तेनालीरामनच्या गोष्टी सांगे. तीची गोष्टी सांगण्याची शैली आपल्याला बसल्याजागी, मनाने वेगळ्या विश्वात घेऊन जायची. पण तीन बोबड्या बायकांची गोष्ट्च वेगळी होती……. 😅😅

“उद्या  माझ्या  बाबांची तिथी आहे. श्राद्धासाठी,  बाहेरून भटजी येणार आहेत. श्राद्ध व्यवस्थित  पार पडायला हवं.  पण तुमच्या तिघीपैकी एकीनं पण बोलण्यासाठी तोंड उघडायचं नाही.  जीं गप्प- चूप कामं करेल तीच शहाणी असेल. तुम्ही तिघी अजिबात बोलायचं नाही. जरी बाहेरून आलेल्या भटजींनी काहीही विचारलं तरी सर्व प्रश्नांची उत्तर मी देईन.  तुम्ही तोंडातून एक शब्दही काढायचा नाही.” ब्राह्मणानं तीनंही बायकांना पढवून ठेवलं.  निश्चिन्त मनानं श्राद्धाच्या  तयारीला लागला.

  दुसरे दिवशी सकाळी उठून एका ताटातं दर्भ, तुळशी,  पंढरी फ़ुलं,  अबीर, अगरबत्ती,  लोकर,  तीळाचं तेलं आणि  वाती  घालून समई,  आणि फुलावती आणि तूप घालून निरांजन,  पळी,  पंचपात्र,  तांब्या, हळद कुंकूचं  द्विपात्र,  ताम्हण,  जान्हव  जोड ठेवलं. 

अंघोळ करुन उपरणं,  पंचा,  पितांबर  लेवून तयार होता होताच भाटजीं आले.  स्वयंपाक घरात पिंढाच्या भातापासून सगळी तयारी सुरु झाली. उडीद वडे,   ओल्या खोबऱ्याची चटणी, खीर,  पुरी,  भात,  भाजी,  वरण,  आमटी,  आमसूलची चटणी झाली.  

दरम्यान दिवाणखान्यामध्ये  जान्हवे उजव्या  खांदयावरून डाव्या खांद्यावर घेऊन सव्य,  अपसव्य  करत आचमन, प्राणायाम व संकल्प करून घेतला.   शेंडीला, बोटात,  कनवटीला बसायच्या पाटावर  दर्भ लावून, ब्राम्हण यजमानांच, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे  आचमन सुरु झालं.  

ओम केशवाय नमः |

ओम माधवाय नमः |

ओम नारायणाय नमः | 

पळीने पाणी घेऊन दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांना लावलं.

दुसऱ्यांदा पाणी घेऊन, दशदिशांना शिंपडलं.

शिजलेल्या भाताचे मोठे तीन गोळे करुन केळीच्या पानावर एका पाठोपाठ एक ठेऊन मध्ये भात ठेऊन एक मेकाला चिकटवून ठेवले. आणि यजमानांचे बाबा,  आजोबा आणि पणजोबांच्या आत्म्याला आव्हान केलं.   पिंढाला  काळे तीळ,  अबीर लावला  आणि लोकरीचा धागा ठेवला.  माका,  तुळशी वहिली.

इकडं स्वयंपाकघरात मोठ्यां यजमानीण बाईंनी  आता कडीसाठी  रवीनं ताक  घुसळून त्यात मीठ आणि चवीसाठी साखर टाकली.  हिंगाचा खडा फोडून बारीक करुन घेतला. जिरे कुट्टुन  घेतले,  आणि काळे मिरे कुट्टुन घेतले. पातेलं व्यवस्तीत गरम  झालं तसं तूप टाकलं.  तूप कडकडीत तापल्या नंतर त्यात राई,  मेथीचे दाणे,  जिरे,  अख्खे धणे टाकून लाल होईतोपर्यंत परतवले आणि कडीपत्ता टाकला तसा चर्र आवाज झाला. हिंग हळद टाकून बाजूला ताक आणि चणाडाळ पिठाच मिश्रण  तडक्यात  ओतून वाफ काढली आणि  पीठ वाफवून झाल्यानंतर  वरून  पातेल्यात  ताक ओतून एक कड येऊ दिला. घरात सर्वत्र कडीचा घमघमाट सुटला.  

  विधी पार पडले.   केळीची छोटी, छोटी आठ पानं  मांडली  आणि जेवण वाढायला सांगितलं.  जेवण घेऊन या  म्हणून यजमानांनी स्वयंपाक घराकडे पाहून हाक दिली तशी मोठी,  मधली आणि छोटी एक एक पदार्थ आणून पानात वाढू लागल्या.  शेवटी भातावर दही वाढलं.

ओम प्राणाय स्वाहा |

ओम अपानाय स्वाहा |

ओम व्यानाय स्वाहा | 

ओम उदानाय स्वाहा | 

ओम ब्रह्मणे स्वाहा | ……  

  जेवायला बसलेल्या काल्पनिक ब्राह्मणांना खिरीचा आग्रह करुन चमचाभर खीर वाढली. आणि कुटुंब कल्याणासाठी प्रार्थना केली.  आणि एक पान गाईला,  एक काकरूपी पूर्वजांना ठेवलं.  आणि गुरुजींसाठी पान वाढून तयार केलं.  दक्षिणा घेऊन गुरुजी आचमन करुन जेवायला बसले तशा घरातल्या तिघी बायका एक, एक पदार्थ वाढत होत्या.  एकदम शांतता होती.  गुरुजींनी कडीचा भुरका घेतला आणि एकदम खूश झाले.

 ” वा❗️ वा  ❗️ वहिनी कडी मस्तच झालीय हं.  खूप चवदार झाली आहे ताकाची कढी,” गुरुजींनी कडी बनवणाऱ्या वहिनींचं  मनापासून कौतुक केलं. 

मोठ्यां यजमानीणसं  एकदम मस्त वाटलं. गुरुजींकडून कौतुक ऐकून. लग्न झाल्यानंतर कित्येक वर्षानंतर घरी कोणीतरी बाहेरच माणूस आलं होतं. त्यांनी वहिनींनी बनवलेली कडी खाल्ली तीही भुरका मारून. मोठीच्या श्रमाचं सार्थक झालं असं वाटलं.  आणि त्या तोंड उघडल्या बोलण्यासाठी.  

त्यांचं वाक्य बोलून पूर्ण व्हायच्या अगोदरचं 

यजमान ब्राह्मणांचं लाजेनं पाणी पाणी झाले आणि ते तोंडावर बोटं ठेऊन बायकोला न  बोलण्याविषयी सांगत होते.  आणि बायको खुशीने एकदम धडाधड बोलत सुटली. 

मोठी एकदम तोंडभरून हसत,  गुरुजींना कडीचा आग्रह करुन वाढता,  वाढता बोलली,  “हिंग,  जिडे,  मिडे  कुट्टुन काडे,  कडी झाडें गोडे.” 

“आँ,  गुरुजींनी   कढीचा घेतलेला दुसरा भुरका  तोंडातच राहिला आणि  तोंड उघडच राहिलं. 😲🥵

यजमान डोक्याला हात लावून बसलेलं पाहून मधल्या पत्नीला खूप वाईट वाटलं. तीनं  मोठीला सरळ प्रश्नच ¿ विचारला,  ” ए, बोडू  नकोस म्हणताना का गं बोडलीस❓️”

तसं तिसरी यजमानीण गुरुजींना खीर वाढता,  वाढता  खूश होऊन बोलली, ” मी बोय्ये नाही,  मी चाय्ये नाही.  मीच शहाणी झाले”.  म्हणून स्वतःची जीभ दाताखाली पकडली.

“एकीच्या बोलण्यात दोष म्हणून दुसरीशी लग्न  केलं आणि पहिल्या दोघी बोबड्या म्हणून तिसरीशी लग्न केलं  गुरुजी,  पण  तुम्ही पाहिलंत ना, मी घरी कोणालाच का बोलावत नाही ते…  ❓️” समोरून उत्तरांची अपेक्षा नं करता, यजमानानी  प्रश्न  विचारला.

आज आईला➡️  रश्मी आणि रश्मीला ➡️विनिता -आई, आणि सईन  एकमेकांची काळजी घ्यायला सांगून, रश्मी आपल्या कर्मभूमीकडे रवाना झाली. 

आणि….  मीटींग. 

रश्मीच्या अचानक गावी निघून जाण्याने,  पोस्टपोन झालेली मीटींग विकेंडला ठेवण्यात आली. 

 रश्मीच प्रसंगावधान आणि त्वरित  घेतलेला निर्णय त्यामुळे प्राणावर बेतलेला प्रसंग चांगलाचं धडा शिकवून गेला. कैलास तर वाचला संकटातून पण यामुळे शाळेतील सर्वजण सावध झाले आणि मुलांकरिता खास मार्गदर्शनपर  शिबीर ठेवलं. काहीही अडचण आली तरी अगदी त्या क्षणी समोर असणाऱ्या शिक्षक किंवा संस्थेतील कोणत्याही व्यक्तीकडे नि:संकोच मदत मागायची हे मुलांना सांगण्यात आलं. संस्थाचालक आणि सचिव साहेबांनी  मुलांशी संवाद साधला.  
शरीराने मोठं होणाऱ्या मुलांच्या मनात चालणारी उलथापालथ, बदलणारं भाव विश्व, उडालेला गोंधळ अस्पष्ट आणि धूसर कल्पना आणि अर्धवट ज्ञान, धड ना लहान; ना व्यवस्थित मोठं आणि शरीरात होणारे बदल स्वीकारताना आणि मनात, विचारात होणारे बदल शरीराद्वारे स्वीकारलं जाणं आणि योग्य मेळ साधणं आणि त्यासाठी त्यांना लागणारी मदत, त्यांच्याबरोबर घालवावा लागणारा वेळ, तज्ञाना पाचारण करणं आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणं यावर भर देण्यात आला. आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून घरात असलेलं मुलांचं महत्व आणि पालकांशी असणारे त्यांचे बंद घट्ट करणे किती महत्वाचे आहे यासाठी पालक सभा घेऊन संवाद साधण्यात आला.

मुलं आणि त्यांचं भाव विश्व,  त्यांच्या समस्या,  अडचणी,  त्यांच्या घरची परिस्तिथी,  त्यांची भावंड,  मित्र, मैत्रिणी, शिक्षकांशी असलेलं नातं,  त्यांचे एकमेकांशी असलेले भावबंध,  समज, गैरसमज, शिक्षकांना;  मुलांकडून  अपेक्षित असलेला  होमवोर्क,  त्यांना त्याबद्दल मिळत असलेलं अँप्रिसिएशन आणि शिक्षा,  मॉरल एज्युकेशन,  मुलांचा फावला वेळ आणि त्याचा उपयोग,  मानसिक स्थिती,  ताणतणाव आणि अशाच असंख्य गोष्टीवर सर्व मुलांशी संभाषण होत होतं.   
जरा जास्त टेन्शन होतं ते हॉस्टेलमध्ये होतं असलेल्या पैशाच्या चोरीच. पण आता त्यावर सुद्धा कांही करायची गरज भासली नाही. आता चोरीच्या तक्रारी बंदच झाल्या होत्या.
मुलांनी त्यांचे खाऊचे पैसे हॉस्टेल सांभाळणाऱ्या  आपल्या टीचर जवळ ठेवायचे ठरवलं आणि मुलं निश्चिन्त झाली.  मुलं नियमित फ्रेश मूडनं आपली शाळा,  अभ्यास,  खेळ आणि इतर दैनंदिन गोष्टीत रुळून गेली.   

परीक्षा, लायब्ररी, हॉस्टेल, विषय प्रमुख ई. बरोबरचं शाळेची प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी रश्मीवर सोपवायची
हे ठरविलं गेलं.

मुख्याध्याकाची जबादारी स्वीकारण्या  बाबत, रश्मीच्या नावाला दुसऱ्यांदा सर्वांनी  एकमतानं सहमती दिल्यामुळे प्रस्ताव तयार केला होता आणि प्रस्तावासाठी रश्मीच्या सहमतीची आवश्यकता होती. 
“प्रवेश प्रक्रियेचं ठीक आहे. मे, जूनमध्ये काम असतं, ते मी करेन. पण….. “

” मुख्याध्यापक पदासाठी आपण मांडलेल्या प्रस्तावाचा मी आदर करते. आपण दुसऱ्यांदा दिलेली संधी आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपली ऋणी आहे. मी या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामात व्यस्त झाले की, माझं मूळ कामाकडे दुर्लक्ष होईल. मुलांच्या शिकवण्याकडं झालेलं दुर्लक्ष त्यांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारा असेल. आपण शाळा उघडली ते मुलांच्या कल्याणासाठी, आई वडील मुलांना रोज शाळेत पाठवतात ते आपलं मूलं रोज काहीतरी शिकून येईल आणि त्या मूळ त्याचं भवितव्य सुधारेल, आम्ही शिक्षक मुलांना शिकविण्यासाठी आलो आहोत. त्यामुळं मूळ उद्दे शापासून दूर नेणार काम मला माझ्या मूळ कामामध्ये अडथळा निर्माण करणार वाटतं.
त्यामुळं मी हा प्रस्ताव स्वीकारत नाहीं. जें कोणी मुख्याची जबाबदारी घेईल त्याना कामात जी लागेल ती मदत करू शकते.” एका दमात रश्मी बोलून मोकळी झाली.

कडक स्वभावाची शिक्षिका —❓️


शाळेचं नाव ऐकून जवळपासच्या शाळेतून आणि परिसरातून, शाळा प्रवेशासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी मुलं येऊ लागली.

❗️❓️🌺🌺🌺🌺❓️❓️❓️❗️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺❓️❗️

लांब नाक, बोलके डोळे, सावळा रंग आणि शिडशिडीत अंग काठी. समोर उभं असलेल्या मुलाला इयत्ता पाचवीत प्रवेश घ्यायचा होता.
“हं, बोल तुझं नाव काय?” रश्मी टीचरने नाव विचारलं.
—————————-.
तू शहर सोडून या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आलास.
चौथीतली एखादी कविता म्हणून दाखव.
———————————–.
घरी कोण कोण आहे तुझ्या?
——————————–.
तुझे वडील काय करतात?
—– 😭😭😭😭😭😭😭. —-

ठीक आहे तू निघ.

नेक्स्ट कॅन्डीडेटला बोलावा.
प्रश्नांची वाट न पाहता समोरून धडाधड बोलणं सुरु…
माझं पूर्ण नाव सिमरन रा….. ले ….
मला… एक भाऊ, तो पाचवीत आहे.
माझे वडील…..
मी तिसरी पास आहे..
मला पाचशे पैकी चारशे तीस मार्क्स आहेत….
रश्मीने चष्म्यातून समोरच्या मुलीकडे रोखून पाहिलं…
रश्मीने समोर एक चिठ्ठी ठेवली…
समोरून: काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार नसलेला जिल्हा चिठ्ठी वाचली. उत्तर नाहीं आलं ————————–
रश्मीकडून दुसरा प्रश्न : महाराष्ट्रात जिल्हे किती?
उत्तर नाही ———————– चेहरा गंभीर झाला.
रश्मी टीचर : नाच रे मोरा आंब्याच्या बनात… असं कोण म्हंटल?
उत्तराच्या ऐवजी… 😭😭😭😭…
ओके ठीक आहे निघ तू..
————
मास्टरजी .. ये बच्चे लोगोंकी इंटरव्हियू सिस्टीम क्यूँ चाहिये ❓️ शिवम सर, या फॉर्मॅलिटी कशासाठी ❓️

“मे आय कम इन सर?” समोर एका गोऱ्याशा गोबऱ्या गालाच्या मुलांना खणखणीत आवाजात दरवाजातून प्रश्न विचारला.
“एस, कम इन…” मास्टरजी बोलले.
शिवम सरांनी मुलाला कविता म्हणायला सांगितली.
समोरून तालासुरात, ” गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणेन आरतीला हे चंद्र सूर्य तारे sss
————————-
“अभी, रश्मी टीचर सवाल पूछेगी” मास्टरजीनी चेंडू रश्मीच्या कोर्टात फेकला.
रश्मी टीचर: हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर? Abcd अशी किती अक्षरे आहेत?
समोरून उत्तर : फोर मॅडम… चार
रश्मी टीचर: 🙄❓️❓️❓️❓️🥵🥵
ऍडमिशन पाहिजे ना तुला?
युअर फेवरीट गेम रमेश?
समोरून : ————————-
हिस्टरी मॅडम : भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं?
समोरून : जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले तेंव्हा.
टीचर : ओके. ठीक आहे. …
नेक्स्ट कॅन्डीडेट ला पाठवा..
——————
विज्ञान शिक्षक: पाणी कशा पासून बनते? फॉर्मुला सांग..
समोरून: बर्फापासून…
प्रश्न : सतरा चा पाडा म्हणून
समोरून : सतरा एके सतरा, सतरा दोनी….
प्रश्न : कंटिन्यू पास्ट टेन्सचं एक वाक्य सांग.
समोरून : आय एम….. .. 🥵¿
ठीक आहे. तू निघ.
पुढच्या मुलाला बोलवा…
………………………

पुढचा नंबर.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

लायब्ररीची पुस्तकं आणि मॅप्स, चार्ट्स आणि इतर शैक्षणिक साहित्य घेऊन रश्मी टीचर संस्थेत आली. शाळेच्या ऑफिस मध्ये कांही पेपर्स ठेऊन घरी जाण्यासाठी वळली तेवढ्यात मागून ओळखीचा आवाज आला. अभिनंदनं ❗️❗️❗️ रश्मी मॅडम 💐. हे घ्या तुमचं पत्र. 📰😊

———————————————————————–

2 Responses

  1. सर्व वयोगटातल्या वाचकाना मनापासुन भावेल असे लेखन आपण करत आहात.
    विशेषतः पालक, शिक्षक, अन विद्यार्थी यांच्या अंतरंगातील तरंग पाहावयास मिळतात.
    एकत्र कुटुंबात असणारा लळा- जिव्हाळा, प्रेमळ सहजीवन याचे दर्शन घडते.

    1. जयश्री मॅडम आपण पूर्ण ब्लॉग वाचून दिलेल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद 🙏. आपल्या अभिप्रायामुळे पुढील लिखाणास प्रेरणा मिळते.🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More