“तू सदा जवळी रहा… ” भाग – 29 अर्थात योगा, सूर्य नमस्कार आणि बरचं कांही

भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात🕉️🙏 सुखावते… भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण.. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…
भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या कुसुमताई च्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी…. भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते 🙏रश्मीला आणि कुटुंबियांना… भाग – 6* रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि … सदृश्य जीवन. भाग -7* एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ? अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग- 8* आईचं मानस-दर्शन, राजेशची प्रकर्षाने आठवण भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? भाग – 10* साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो-खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवाच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.भाग -11* मालिनी वहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12* मध्ये वाचा, सुचिताची प्रश्नावली, श्री… आणि विनिता, घराचं घरपण कसं टिकवतातं ? रश्मी झोपेत का घाबरली ? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं? भाग -13* रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलने का मारते? भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी ? काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना का भेटली? सरानी पेढे का मागितले ? भाग -15 * मध्ये आपण वाचलात, वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत होत्या ? भाग-16 * विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी ? का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते? पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं? खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न भाग -19* आत्या की मैत्रीण, 💮फिरकी? अतरंगी😂 बंटी भाग -20* कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा? भाग -21* विनिताचं नेमाकं काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..! भाग – २२ * रश्मीचं नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदान🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤पद्मिनी, 1. श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2- श्रध्दा असेल तरच भाग -25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिंग, फिशपॉन्ड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते !, लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ.. भाग – 26*, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27 * नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली?
काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर, काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं? भाग – 28* 👉 रश्मीला नेमक्या कोणत्या इंटरव्ह्यूची आठवण आली? Order????, आंडं,कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे? महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्रा झालेली भुमी 👏 भाग – 29* सुकलेलं बकुळ फ़ुल पार्ट – 2 श्री दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…, प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक, राम नाम…., मदर तेरेसां… 🙏🌷, डॉक्टरांसाठी शिबीर, तुम्ही कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर? गुरुमंत्र आणि मानस पूजाविधी.

सुकलेलं बकुळ फ़ुलं पार्ट – 2

स्त्री हे स्वत: एक मोठं नातं आहे. अर्धनारीनटेश्र्वर म्हणून शंकर – पार्वतीनं, पत्नीच महत्त्व अधोरेखित केलं आहे. तसेच समुद्रात शेषशय्या बनवून पत्नी; लक्ष्मीच्या माहेरी, सागरात तळ ठोकणारा महाविष्णु; काय विदित होतं त्यातून ? पत्नी ही जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सोदाहरण दाखले पुराण काळापासून मनावर बिंबवले जातायत. मंदिर आणि फोटोमधील देवीची पूजा करायची आणि घरातील देवी ? तिचं काय ? तेवढाच आदर आई, बहिण आणि पत्नीबध्दल आहे का मनात ? कृतीत ? प्रत्यक्षात ? काय दिसतं संसारात ? विचारमंथन करायला लावणारी आहे परिस्थिती.

“जीवनात ही घडी आशीच राहू दे”, गुणगुणत तांदुळाच माप ओलांडणारी बकुळ पुन्हा गाणं ओठावर सोडाच पण मनात तरी घोळवण्याचं धाडस करेल का?

आज सकाळी बकुळनं सासू, सासरे, नणंद आणि नवऱ्याला न्याहारीसाठी नाचणीची भाकरी आणि वांग्याची रस्साभाजी तयार करून दिली. न्याहारी नंतर चहा घेऊन सासू, सासरे शेतात गेले होते. नणंद नेहमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरी गेली होती.
दुपारचं कडकडीत ऊन तापलं होत आणि सगळीकडे दूरवर उन्हाच्या झळा दिसत होत्या. पावसाळ्यात सुंदर दिसणारे हिरवेगार डोंगर आणि परिसर ओकं ओकं वाटत होते. पानगळीचं जंगल असल्यामुळे हिवाळा संपला तसं निष्पर्ण झाडं सापळ्या सारखी दिसू लागली. छोटे वेल सुकल्यामुळे निष्पर्ण होऊन धाग्या सारखे दिसत होते. मोठे वेल पानगळ झाल्यामुळे दोरी आणि दोरखंडासारखे झाडाला विळखा घालून बसले होते. ना पाना, फुलांना, ना वेली, झाडांना उन्हाळा सोसत होता. संपूर्ण परिसर बेजान वाटत होता. वाऱ्याचा पत्ता नव्हता. पावसाळ्याची वाट पाहण्याशिवाय कोणीच काहिही करू शकत नव्हते. सध्या सकाळी लवकर शेतात जायचं, नांगरणी करून पावसासाठी जमीन तयार करून ठेवायचं काम चालू होतं. अती उन्हामुळे दुपारपर्यंत सासू, सासरे परत येत असत आणि सर्वजण एकत्र जेवायला बसत. दुपारचे बारा वाजून गेले होते आणि एखाद्या तासात सर्वजण घरी परतण्याच्या वेळेआधी संपूर्ण जेवण तयार ठेवायचं होतं. सकाळीच नाचणीची आंबील करुन माठात ठेऊन दिली होती बकुळनं. उन्हातून तापून आलेल्या कोणाही माणसाला माठातील थंडगार आंबील ताजतवानं करीत असे आणि उन्हामुळे आलेली मरगळ दूर होऊन उन्हाळ्याचा त्रास काबूत आणण्याला हातभार लावी.
तीनं डब्यातील तांदूळ पातेल्यात काढून घेतले आणि स्वच्छ धुण्यासाठी त्यात पाणी टाकलं. एकदा हातानं तांदूळ आणि पाणी व्यवस्थित मिसळून घेतलं आणि एका हाताची ओंजळ पातेल्याच्या काठाशी पकडून पाणी निथळण्यासाठी पातेलं अर्ध वाकडं केलं. “कट्ट कट्ट” अचानक आणि अवेळी दरवाजाची कडी वाजली तशी, काळजात लख्ख झालं तिच्या. हातातलं पातेलं खाली ठेऊन साडीच्या पदराला हात पुसत दरवाज्यापर्यंत येईतो तीन – तीन वेळेस जोर जोरात कडी वाजत राहिली. घाईत येऊन तीनं दरवाजा उघडला, समोर नवरा उभा होता.
दुपारच्या वेळी नवरा अचानक घरी आलेला पाहून लज्जेनच तिनं आपली मान खाली घातली. थांबा, थोड्याच वेळात जेवण बनवते म्हणून ती आत जाण्यासाठी वळली तोच…. नवऱ्याने पाठीमागून बाह्यना पकडलं.
बकुळ शहारली. हवासा वाटणारा स्पर्श, ओलावा, क्षणभर गोंधळली.
किंचित घोगऱ्या परंतु प्रेमळ आवाजात तो म्हणाला, ” बकुळ, आता जेवण नकॊ, चहा कर.”
लज्जेने अंगावर शहारे उठलेल्या बकुळनं स्वतःला सावरून विचार करतच चहाच्या तयारीला लागली. उन्हानं प्रत्येकजण तळमळत असताना, दुपारच्या वेळी चहा मागणाऱ्या नवऱ्याचं तिला आश्चर्य वाटलं. रॉकेल स्टोव्हमध्ये घालण्याचं निमित्त करुन त्यानं, बकुळच्या नकळत, तिच्या पदरावर रॉकेल टाकलं होतं. बेसावध बकुळ, चहा साखरेचा डबा घ्यायला वळली होती. तेवढ्यात तिला काडी ओढल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने नजर वळली तीची. अगदी थोड्या वेळापूर्वी शरीराला ओला स्पर्श करणाऱ्या नवऱ्याच्या डोळ्यात आता वेगळेच भाव दृष्टीस पडले. बकुळच्या चेहऱ्यावर क्षणभर असहाय्य भाव उमटले. पोटात भीतीचा गोळा उठला, संपूर्ण शरीरावर सर्र्कन काटा उभा राहिला. पण तितक्यात नवऱ्याने पेटलेली काडी अंगावर टाकलीच. पेठ घेतलेली साडी विझविण्यासाठी बकुळ सैरभैर झाली आणि घरभर धावू लागली. आता पदराला लागलेली आग जास्त भडकली होती. तशातच आडव्या आलेल्या नवऱ्याला ज़ोरदार धक्का देऊन दाराची कडी कढुन बाहेर धाव घेतली बकुळनं. शेजारच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या माधुरीने, इतरांना हाक मारून मदत घेतली आणि प्रसंगावधान राखून बकुळच्या अंगावर घोंगडं टाकून आग विझवली आणि तिचा जीव वाचवला.

बकुळच्या शरीराची जखम तशी मामूलीच होती. औषधोपचाराने ती चार – आठ दिवसात बरी झाली असती. पण बकुळ आतून चांगलीच होरपळली होती. तिच्या मनावर कधीही भरून नं येणारी जखम झाली होती. बकुळचं आता उल्केत रूपांतर झालं होतं. होय, उल्का… आता या क्षणी आकाशात आनंदाने हसणारी पण दुसऱ्याचं क्षणी खळकन तुटून पाषाण होऊन पडणारी तारका.

सप्तपदी चालून नातिचरामी असं वचन देणाऱ्या अपल्या बकुळच्या शरीराची जखम तशी मामूलीचं होती. औषधोपचाराने ती चार – आठ दिवसात बरी झाली असती. पण

सप्तपदी चालून वचन देणाऱ्या अपल्या नवऱ्याचे चित्र जाऊन तिथे हातात फास घेऊन उभा असलेल्या नवऱ्याचे चित्र बकुळच्या डोळ्यासमोर उमटलं. रात्री अंथरुणात नाजूक शरीराला सिगारेटचे चटके देणारा आणि मारझोड करणारा नवरा, नवरा नव्हता. पुष्कळ दिवस भुका राहिलेला कुत्रा अन्न पाहिल्यावर तुटून पडतो तसं वासनेने बरबटलेला होता तो. शरीर सुख आणि पैशाची हाव सुटलेला प्राणी होता तो. “अरे तू नही, तो और सही |” म्हणून दुसरं शरीर आणि पैसा विनासायास मिळणार होता त्याला. स्वार्थी आणि निव्वळ स्वार्थी नर.

पण बकुळ आता पूर्वाची बकुळ राहिलेली नव्हती. दुःखी मनाने बकुळने माहेर गाठलं. आठ, दहा महिने ती माहेरी राहिली. पण…… लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी आईला पाहुणी असते. तीची अवस्था पाहून आईने तिला धीर दिला. पण शेजारी – पाजारी, गावातील बायकांना चौकशी शिवाय करमणार कसे ? चर्चेला विषय मिळाला. बकुळच्या सुकत चाललेल्या जखमेवर मीठ चोळलं जाऊ लागलं.
वाढता खर्च, कामाचे हात कमी, खाणारी तोंडे जास्त, माहेरी कायम राहायला परत आलेली मुलगी, दुसऱ्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलींच्या लग्नाची काळजी आणि दारुडा, बिनकामी नवरा या सर्व अडचणीमुळे बकुळच्या आईने अंथरुण पकडले. आपल्या आईला भार झालेल्या बकुळच्या मनात आत्महत्येचे विचार आले आणि वेडीने अमंलात आणण्याचा प्रयत्न केला, पाण्यात उडी टाकली तिनं. पण पाण्याचं वागणं विचित्र वाटलं तिला. वाचली ती. बिचारी बकुळ पाण्यावर वैतागली. पोहणाऱ्याला बुडवून प्रेताला तरंगत ठेवणाऱ्या पाण्यावर वैतागली.
आत्महत्या हा कसा काय उपाय होऊ शकतो एखाद्या समस्येवर ? त्यानं आपण आपल्यापुरती सुटका करुन घेतो. समस्या तशीच राहते आणि आपण पळपुटेपणा स्वीकारतो. तिच्या आत्महत्येने आईचे प्रश्न सुटणार नव्हते. ना घराची ओढाताण संपणार होती. खूप विचारानंतर बकुळचे डोळे चमकले. कसल्यातरी निश्चयाने चमकले. “स्वयं रोजगार”.
जवळ असलेल्या “आदिवासी विकास” हे ब्रीद वाक्य असलेली आणि कार्य करणाऱ्या, विज्ञान विकास संस्थेत भीत भीत प्रवेश केला तिनं. मोडक्या शब्दात आपली परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. मध्ये, मध्ये हुंदके येत होते तिला. दादांनी शांतपणे तीची परिस्थिती ऐकून घेतली. वॉटर प्रोजेक्टमध्ये जवळपासच्या पाण्याचे सॅम्पल आणून प्रयोग शाळेत मदत करण्याचं काम दिलं तिला. आता तिनं घरी भाऊ, बहिणीचं शिक्षण पुढे चालू ठेवलं. आईला घर खर्चात मदत केली.
मनानं आणि शरीराने खंबीर बनलेल्या बकुळनें दारुड्या बापाला योग्य उत्तर देऊन गप्प बसवलं आणि दारू सोडण्यासाठी दबाव तंत्र अवलंबलं. औषधोपचार सुरु केले.
बरोबर सप्तपदी चालून गळ्यात मंगळसूत्र बांधणाऱ्या नवऱ्याला डिव्होर्सची नोटीस पाठवलीय. तिच्या शेवटच्या वाक्याने रश्मीच्या मनात विचार आला, “अबला जीवन हाय तेरी यही कहानी, आंचल मे दूध और आखो मे पानी”.
काय असेल ते शेवटचं वाक्य. कल्पना येईल का तुम्हाला? पहा बरं विचार करुन……………………
” ताई, मी निर्माल्य आहे. क्षणभर देवावर वाहिलेलं आणि दुसऱ्या क्षणी वाऱ्याने उडून गेलेलं फ़ुल.”
रश्मीने प्रेमानं बकुळच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला आणि म्हणाली,

“चूक आहे ते बकुळ, साफ चूकं आहे. तू बकुळ पुष्प आहेस, सुकलं तरी सुगंध वाटणारं बकुळ फ़ुलं”.

श्री दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…..

वाडीहून येताना त्रिमुखी श्रीदत्त गुरूंचे आणि अष्टलक्ष्मीचं कॅलेंडर घेतलं सईने. दोनही कॅलेंडर्स बरेच दिवस कपाटात तसंच ठेऊन दिले होते रश्मीने. पण संस्थेमध्ये सुतारकाम करणाऱ्या काकांनी त्याचे खूपच रेखीव फ्रेम लावून सुंदर फोटो तयार केले. सकाळी सहा वाजता उठून लाल जास्वदांची फुल आणि तुळशीं वाहुन पूजा केली जायची. केरळहून आणलेल्या पितळेच्या स्वच्छ समयामधील ज्योतीच्या प्रकाशात दत्त दर्शन आणि अष्टलक्ष्मी दर्शन मन प्रसन्न बनवत असे. सकाळी लावलेल्या झेड ब्लॅक उदबत्तीचा सूगंध संध्याकाळी साडेचार, पाच वाजता घरी पाय ठेवला तरी घरभर पसरलेला असे आणि तसबिरीकडे पहिलं की आपोआप प्रसन्न वाटे.

प्रचंड उत्साही विद्यार्थी आणि शिक्षक

विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहात असे. आपला गाव सोडून, आपल्या माणसांपासून दूर असल्यामुळे, तेथील
सर्वांनी खूप आपुलकी दाखविली आणि रश्मी सारख्या दुरून आलेल्या नव्या लोकांना कामाच्या ठिकाणी रुळायला खूपच मदत केली. काही वेळेस रश्मीला प्रश्न पडत असे की, कोण कोणाला शिकवत होते ? पशू , पक्षाचे आवाज, पानांची सळसळ, प्राण्याची पायरव याचे ज्ञान तेथील लहान मुलांना जास्त होते. पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात तात्पुरत्या उगवून नष्ट होणाऱ्या छोट्या, छोटया वनस्पती आणि त्यांचे औषधी गुणधर्म मुलांना ज्ञात होते.

जसं सुरवंटाच्या केसांमुळे सुटणारी खाज कमी करण्यासाठी टिक्का किवा झेंडूच पान चुरून लावणे हा उपाय आहे. गाराचं पाणी विंचवाच्या विषावर उपाय आहे. वांग्याची मुळी सर्प दंशावर उपाय. अर्थात दवाखाना होता. डॉक्टर उपलब्ध होते, त्यामुळं सर्व उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्हायचे.

राम नाम…., मदर तेरेसां… 🙏🌷

आळस, स्वार्थ, भांडण या गोष्टी मुलांपासून कोसो दूर होत्या. खूप पाऊस झाला की आदिवासी खंडू बरोबर प्रकल्प अधिकारी रेडेकरचा सिद्धेश ढेंचावरून समोर उभा राही. वाटेत दिसलेल्या सापाच्या शेपटीला दोरी बांधून पेरूच्या झाडाला अगदी पाय वाटेवर सळसळत राहिल अस बांधून वाटसरूची फजित न्याहाळत राहत. धावण्यातला चापळपणा जबरदस्त. चालण्याची क्षमता लई भारी. अफाट निरीक्षण क्षमता. साळींदर पासून रक्षण कसं करायचं, विषारी, बिन विषारी साप कसे ओळखायचे, कांडार, नानेटी, आणि इतर ज्या सापांची कधी नावं ऐकली नव्हती ते सारे प्रकार मुलांकडून समजायचे. ज्यांच्या नुसतं नावानं आणि समोर पाहिलं तर गाळण उडे अशा नाग आणि भयानक विषारी सापाच्या जबड्यात हात घालू दात न पाडता विष काढून आयुर्वेदिक दवाखान्यात औषधासाठी उपलब्द करुन देत असतं आणि इजा न करता सापांना जंगलात सोडून येणारे कार्यकर्ते आणि मुलं खरोखर आदरयुक्त आणि आदर्श होते.

विद्यार्थी प्रश्न असे भारी विचारायचे की काही वेळेस बोलती बंद व्हायची. बाळाने विचारलेल्या दोन प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी रश्मीला काही दिवस लागले होते. बडबड्या बाळानं एकदम, “राम नाम सत्य है !” अस म्हंटल आणि रश्मी घाबरली. फक्त म्हणाली, अरे बाळा असं नाही म्हणायचं”. आणि त्याचा प्रश्न रश्मीलाच कोड्यात टाकणारा ठरला. पण प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न यश देईना. आणि आपल्या विद्यार्थ्यांने विचारलेला एक साधा प्रश्न आणि त्याचं उत्तर मिळेना म्हणून अस्वस्थ रश्मी. शैक्षणिक असू देत किंवा पौराणिक, सामाजिक असूदेत किंवा बौद्धिक सार्वजनिक असूदेत किंवा धार्मिक काहीवेळेस आपण आणि विद्यार्थ्यानी निर्माण केलेल्या प्रश्नाच उत्तर आपलें सहकारी शिक्षक देऊ शकतील असा विश्वास वाटला रश्मीला.

मुख्याध्यापक, शिवम सरांनी आयोजित केलेल्या शिक्षक सभेमध्ये रश्मीने प्रश्न विचारला. त्याच वेळी एक ओळखीचा वाटणारा भरदार, गंभीर आवाज आला, “रश्मी, मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर”. अचानक आलेल्या आवाजाच्या दिशेने रश्मीसहित सर्वांच्या माना वळल्या. साडे सहा फूट उंच, एकदम शुभ्र गोरा वर्ण, काळीभोर दाढी, पाटीला थोडीशी पोकं काढून चालणारे
डोक्यावरचे काळे केस किंचित विरळ झालेले आणि हिंदी, इंग्रजी मिश्रित मराठी बोलणारे संस्थापक समोर सतरंजीवर सर्वांबरोबरच खाली बसत बोलले. उठून उभे रहात असलेल्या रश्मीसहित सर्व शिक्षकांना हातानंच बसून राहण्याची खुण केली. त्यांची एक खासियत होती. हातातलं काम सोडून किंवा खास उभं राहून आपल्या संस्थेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आपल्याला सन्मानित करावं या संकल्पनेच्या पूर्ण विरुद्ध होते. कर्मचाऱ्यांचे कामच त्यांना वंदना वाटत होतं. ते नेहमी देश, विदेशात दौऱ्यावर असत. त्यांचा शब्द प्रमाण असे. त्यांचं कोणत्याही विषयाचं ज्ञान अगाध असे. रश्मी आणि शाळेतील सर्व शिक्षक असोत किंवा संस्थेतील प्रोजेक्ट ऑफिसर, कर्मचारी असोत त्यांच्या भेटीत त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय येतं असे. त्यांच्या प्रत्येक मीटिंगमध्ये आणि कृतीमधून सर्वांच हित असे. त्या दृष्टीनच त्यांचं कामकाज चालत असे. स्वतःच घर आणि मुलांची जबाबदारी त्यांची पत्नी प्रोजेक्ट सांभाळून व्यवस्थित, समर्थ पणे सांभाळत असे.
सर्व औपचारिकपणा संपल्यानंतर संस्थाचालक रश्मीकडे वळून तिचा प्रश्न रिपिट केला. “राम नाम सत्य है!’ असे सहज आणि केव्हाही का बोलू शकत नाही ?” असचं प्रश्न आहे ना तुमच्या मनात ? सरानी विचारलं. तसं रश्मीनं स्वत:ची अडचण संगितली. “मला एका विद्यार्थ्यांनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येईना, सर. स्टाफमध्ये विचारून प्रश्नचं उत्तर मिळतंय का ते पाहात होते. पण नाही मिळालं उत्तर.

सर्व सामान्य माणूस मरणाला घाबरतो. मरण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी, अशुभ समजत असतो आणि मरणासंबंधित सर्व वस्तूंना किंवा शब्दांना दूर ठेवत असतो. पण जन्मानंतर मरण हे ठरलेलं असतं. त्याला घाबरायचं का ? त्यामुळे त्या अनुषंगाने आलेल्या कोणत्याही गोष्टीला घाबरायचं कारण नाही. ‘राम नाम सत्य होत, राम नाम सत्य आहे, आणि राम नाम सत्य राहणार’. त्याला असे एखाद्या घटनेशी बांधून ठेऊ शकत नाही.” केवढं सुंदर उत्तर मिळालं रश्मील. उत्तर खुपचं समर्पक आणि मनातील किल्मिष दूर करणारं होतं.

जरा चढ्या आवाजात रश्मीच्या कानावर शब्द पडले. तोच धीरगंभीर आवाज पुन्हा आला, “रश्मी, तुमच्या बद्दल तक्रार आहे.” रश्मीसहित सर्वांचे कान टवकारले. “शाळेची प्रार्थना संपल्यानंतर, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांना नमस्कार करतात. तसं करण्याची सूचना संस्थापक या नात्याने, मीच दिली होती. तो संस्काराचा एक भाग होता. आपण नमस्कार न स्वीकारता स्टाफ रूममध्ये निघून जातात. तुम्ही विद्यार्थ्याचा नमस्कार का स्विकारत नाही ?” सरानी पृच्छा केली.
गुरु ही संकल्पना पूर्ण ज्ञान दर्शविते, सर्वज्ञत्व दर्शविते, सर. मी पूर्ण ज्ञानी आहे का ? मी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकते का ? त्यांच्या मनातील प्रत्येक शंकेचं निरसन करण्याची क्षमता माझ्याकडे आहे का ? मग गुरु म्हणून जेव्हा विद्यार्थी चरण स्पर्श करतात तेंव्हा तो माझ्या देहाला नव्हे माझ्यातील ज्ञानाला नमस्कार करत असतात. आणि हेच मला स्वतःला अपराधी वाटतं.” आत्तापर्यंत मीटिंगमध्ये कधीही फारसं न बोलणारी रश्मी घडाघडा बोलतांना आणि प्रश्न❓️ विचारताना पाहून सर्वच आवाक झाले. आता रश्मीचं काहीं खरं नाही हे भाव उमटले. सर्व सभागृह शांत होतं. आता संस्थापक काय बोलणार❓️ रश्मीवर काय ऍक्शन घेणार ❓️ याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. आपल्या दाढीमधून हनुवटीवर अंगठा आणि तर्जनी फिरवत सरांनी “हुंकार” भरला,

रश्मीबद्दलची तक्रार संस्थाचालकांकडे गेली होती. आणि मीटिंगमध्ये रश्मीकडून उत्तर हवं होतं सराना.
आणि त्यांनी मदर तेरेसंची भेट आणि घटनेचा दाखला दिला.
कलकत्ता भेटीत सरांनी थोर समाजसेविका मदर तेरेसांची अपॉइंटमेंट घेतली होती. मदर तेरेसा यांची कलकत्त्याला एक सभा होती. सभा झाल्यावर बरेच लोक त्यांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार करत होते, त्यांना स्पर्श करत होते. त्यांच्या पाया पडत होते. काही त्यांना स्पर्श करण्यासाठी धडपडत होते. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदरापोटी हे सारं घडत होतं. आदर, प्रेम, आपुलकी व्यक्त करण्याची पद्धत होती ती. जेव्हा मदर तेरेसा यांच्याजवळ असलेली गर्दी कमी झाली तेव्हा सरांनी विचारला त्यांना, “लोक नमस्कार करतात, पाय धरतात, तुमच्या साडीला, साडीच्या पदराला स्पर्श करू पाहतात, तुमच्या प्रती वेगवेगळ्या प्रकारे आदर, प्रेम, आपुलकी या भावना व्यक्त करू इच्छितात, याबद्दल तुम्हाला काय वाटते ?” सरानी मदर तेरेसा यानां सहज पण आदराने विचारलं. मदर तेरेसा उतरल्या, ते सर्व प्रभूला अर्पण.” माझ्यामध्ये असलेल्या माझ्या आत्म्याद्वारे, परमात्मा प्रभूला त्या सर्वांचं प्रेम, आदर अर्पण. रश्मीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अतिशय सुंदर समर्पक आणि उत्तम पद्धतीचं उदाहरणं देऊन सरांनी शंका समाधान केलं होतं. अशा ज्ञानमय, विज्ञानमय, मंगल आणि निसर्गरम्य वातावरणात रश्मीचं काम चालू होते.


एका शुक्रवारी संध्याकाळी वैभवलक्ष्मीच्या पूजेसाठी जास्वंदीची फुल तोडत असताना रश्मीला कोणीतरी आवाज दिला ….
“रश्मी मॅडम, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलय”, साजीद या सहावीत शिकणार्या मुलांने रश्मीला माहिती दिली.
“कोण आहे ? ” म्हणून रश्मीने वळून पाहिलं.
समोर गांधी टोपी, आकाशी रंगाचा शर्ट आणि पांढरी विजार घालून एक सावळेसे गृहस्थ उभे होते.
“नमस्कार मॅडम, मी जवळच्या पाड्यावरून आलोय. आश्रम शाळेचा मुख्याध्यापक आहे.”
“नमस्कार सर”. रश्मी बोलली. बरोबर सिद्धेश, आणि जुई आणि सलीम, साजीद आणि इतर मुलं शाळा सुटल्यावरं खेळण्यासाठी एकत्र जमत होती. बऱ्याच वेळी शाळा सुटल्यावर नदीच्या काठावर जायची रश्मी. कपडे धुवायचं निमित्त होतं ते. पण वाहत्या पाण्यात पाय ठेऊन तासन् तास पाणी न्याहाळत बसायची रश्मी. खळखळतं, दगड, धोंड्यातून स्वतःची वाट काढत उताराकडे वाहणार पाणी शिकवण देतय वाटायचं रश्मीला. वाहत्या पाण्यात पाय वेळ ठेऊन न्याहाळण्यात वेळ आनंदात जायचा. मुलांशी गप्पा गोष्टी व्हायच्या. मुलांना माहित होतं आज शुक्रवार, संध्याकाळी वैभव लक्ष्मीची पूजा, म्हणजे मॅडम कांही नदीवर जाणार नाहीत. रश्मीने घरासमोरच्या शेडमध्ये खुर्ची ठेवून सरांना पाणी दिलं.
सरांनी मुद्यालाच हात घातला. आश्रम शाळेतील मुलांना शिकवायला बोलावत होते. रश्मीने त्यांना पाड्यावर जाऊन शिकवणं या वर्षी तरी श्यक्य नसल्याचं सांगून निरोप दिला. तसं नाराज होऊन सर निघून गेले.

समोर पेरूच्या बागेत असलेल्या बोअरवेलमधून पाणी आणून दारासमोरच्या शेडमध्ये शिंपडलं आणि पायऱ्यांच्या बाजूला रांगोळी काढली. रांगोळीवर हळद, कुंकू टाकण्यासाठी आत जाऊन पंचपात्र घेऊन बाहेर आली. रांगोळीवर हळद वाहिली आणि कुंकू वाहण्यासाठी चिमटीत पकडलं तर बाजूच्या भिंतीवर हालचाल जाणवली. पटकन चिमटीतलं कुंकू रांगोळीवर टाकून रश्मी बाजूला झाली. भिंतीकडे पाहिलं तर दोन विटांच्या मधून साप आपलं तोंड बाहेर काडून पहात होता. जवळच खेळत असलेल्या मुलांच्या नजरेत, रश्मीची सावध हालचाल लक्षात आली आणि बाळ गोपाळांची टोळी धावत आली. पक्कड आणून कोणीतरी त्या सापड्याला बाहेर खेचून काढले आणि जंगलात सोडून दिलं.
हातपाय स्वच्छ धुऊन रश्मीने अष्टदल कमळाची रांगोळी रेखाटून पाट ठेवला. दोन्ही बाजूला तेला, तुपाचा दिवा लावला. पाटावर वैभवलक्ष्मीचं पुस्तकं ठेवलं. पुस्तकावर वाटीत दागिना ठेऊन प्रसन्न मनाने हळद, कुंकू लाल फ़ुलं वाहील. 🙏 नमस्कार करुन स्तोत्र म्हंटल.

या रक्तामबुज वासीनी….. .. लक्ष्मीश्च पद्मावती… || ………….
||ओम श्री नमः||

म्हणून प्रार्थना केली आणि दूध, साखर आणि साखर, फुटण्याचा नैवेद्य दाखवला. दरवाजासमोर पायरीवर मुलांचा खेळ पाहात पुस्तकं वाचत बसली.

रश्मीला शिकायला खूप मिळालं संस्थेमध्ये. पहिल्याच वर्षी कार्यकर्ते आणि पालकांनी रश्मी आणि शिक्षकांचा केलेला सत्कार उत्सहात भर टाकणारा तर होताच पण जबाबदारीची जाणीव करणारा पण होता. दरवाज्याला कडी लाऊन दिवसभर बाहेर राहायची. कुलूप हा प्रकार नव्हता तिथं. भीती माहित नव्हती. सर्व वस्तू जागच्या जागी. चोरी हा प्रकार नव्हता. लांडी – लबाडी, चोरी – मरी, खोटं बोलणं , फसवणं, एक दुसऱ्याला नावं ठेवणं, उणं , दूणं काढणं दोष दाखवणं असे प्रकार नव्हते. एकूणच माणसं आणि वातावरणातून सकारात्मक लहरी जाणवत होत्या.

डॉक्टरांसाठी शिबीर…

प्रयोगशील संस्थाचालक सरांनी, संपूर्ण भारतातून आयुर्वेद डॉक्टरांसाठी शिबिर आयोजित केलं होतं.
रश्मीला किंवा कोणत्याही स्टाफला असं नाही वाटलं की यामध्ये आपलं काय काम. प्रोजेक्ट इनचार्ज डॉक्टर आणि स्टाफ यांची प्रचण्ड मेहनत आणि संकप्लना प्रभावीपणे अंमलात येतं होती. मुंबईहुन आलेले आयर्वेद तज्ञ्, वैद्य रमेश नानल हे शिबीर प्रमुख होते. भारतातील प्रत्येक राज्यातून दोन डॉक्टर प्रतिनिधीना बोलावलं होतं. देश भरातून येणाऱ्या बहुतेक डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था कार्यकर्त्यांच्या घरीच केली होती. आणि रश्मीला झारखंड आणि आसाममधून आलेल्या दोन लेडी डॉक्टरांचा सहवास लाभला होता. शिबिरात सामील झालेले सर्व डॉक्टर, तज्ज्ञ तर होतेच पण सामाज्यासाठी झोकून देऊन काम कारत होते. प्रत्येकाचा संशोधनाकडे कल होता. डॉक्टर नानल यांचे आयुर्वेदाचे अगाध ज्ञान, त्यांची ग्रंथ संपदा, त्यांचे प्रयोग सारच अफाट होतं. स्ट्रेचरवरून आलेला कोणताही रोगी, स्वतःच्या पायावर उभं राहून घरी परत जाई ही त्यांच्या औषधाची आणि उपचाराची ख्याती होती. हृदय रोगावर सुवर्ण भस्म आणि इतर औषधी उपचारांनी त्यांच्याकडे आलेले पेशंट ठणठणीत बरे होऊन जात असतं. आणि संस्थेमधीलं कांही लोकांनी त्यांचेकडून उपचार घेतल्याची जिवंत उदाहरणं होती.
केतकी गौर वर्ण, रेशमी कुडता – पायजमा परिधान केलेले
वैद्य नानल, यांचं व्यक्तीमत्व प्रसन्न होतं. या तज्ज्ञ डॉक्टरनी पहिल्याच भाषणात आणि प्रयोगात सर्वांची मने जिंकली.
“उखळत्या तेलात हात घालून दाखवणारे जादूगार हे समोरच्याला कसे नजरबंद करतात परंतु प्रत्यक्षात अशी जादू वगैरे कांही नसतं…..” वैद्य नानल बोलत होते. आणि श्वास रोखूनं सारे समोर पाहात होते.

खूप मोठ्यां पातेल्यामध्ये जवळ जवळ दहा, बारा लिटर तेलं उखळत ठेवलं होतं. तेलं नुसतं तापलेलं नव्हतं तर अक्षरशः खरोखर उखळत होतं. अगदी सहज हात बुडवला तेलात. हात जसाच्या तसा न भाजता बाहेर काढला. कसे काय धाडस केलं ? याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आगीपासूनं रक्षण करणारी वनस्पती, तेल इ बाबत माहिती घेत पहिला दिवस संपला. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात, वैद्य रमेश नानल यांचं नाव आदराने घेतलं जाई.
तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाने चालणार शिबीर संपलं तेंव्हा बाहेरून आलेले सर्व डॉक्टर, विकास संस्थेतील कामानं भारावून गेले. त्या सुंदर वातावरणातून निघताना त्यांची पाऊले जड झाली होती, पण मनं भरली नव्हते.

अरविंद गुप्ता, केसकर, रमेश देव, मुंबई आय. आय. टी., दिल्ली, आणि फॉरेनवरून असंख्य तज्ञ् लोक येतं होते आणि ज्ञानाची अनुभवाची देवाण, घेवाण चालत होती.
मुंबई आय.आय. टी. च्या विद्यार्थ्यांनी इग्लू / डोम हाऊस बनवून दिलं होत ज्याचा उपयोग वर्गासाठी, छोट्या मिटिंग घेण्यासाठी केला जाई.

तुम्ही कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर?

नेहमी जुन्या नव्याची सांगड घालणाऱ्यां
संस्था अधिकाऱ्यांनी, यावेळी स्वामी आत्मबोधानंद सरस्वती यांना बोलावलं. स्वामी आत्मबोधानंद सरस्वती या योगी पुरुषाला बोलावून योगा, सूर्यनमस्कार, योगनीद्रा, गुरुमंत्र देणे आदी प्रकार सर्व कार्यकर्त्यांसाठी, मुलांसाठी शिकविण्याची व्यवस्था केली होती

स्वामी आत्मबोधानंद सरस्वती एक महान योगी पुरुष.

तांबूस गोरा रंग, काळीभोर ट्रिम केलेली दाडी, साधारण चाळीस बेचाळीस वय असेल त्यांचं. शुद्ध मराठी उच्चार होते. इंजिनीयर पदवीधर आसलेल्या स्वामींचे हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होत. त्यांना बोलावून योगा, सूर्यनमस्कार, योगनिद्रा याचं प्रशिक्षण देणे आदी प्रकार, सर्व कार्यकर्त्यांसाठी, मुलांसाठी शिकविण्याची व्यवस्था केली होती. स्वामींनी मुलांशी आणि कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत योगा आणि सूर्य नमस्काराचे महत्व सांगितलं. प्रचंड उत्साहवाहक मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळतंय हे पाहून खूष झाले आणि सुरु झाला बेसिक प्राणायाम. आणि महत्व पण सांगितलं योगा आणि सूर्य नमस्काराचं. स्वतः इंजिनिअर असलेले स्वामी आत्मबोधानंद सरस्वती मराठी, हिंदी, इंग्रजीतून सर्वाना समजेल असं सोपं करुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत योग आणि सूर्यनमस्काराचं महत्व सांगत होते. सोळा वर्षे तपश्चर्या करुन कांही सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्यांनी. त्यांच्या बोलण्यातून तसा प्रत्यय येतं होता.

गुरुमंत्र आणि मानस पूजाविधी

अनंत हस्ते देता कमला वराने,
किती घेशील रश्मी, तव दोन कराने !

रश्मीच्या घरी जेव्हा स्वामींनी प्रवेश केला, तेव्हा प्रथम त्यांचं लक्ष दत्त गुरूंच्या तसबिरी कडे गेलं. खाली पाट ठेऊन, भिंतीचा आधार घेऊन उभ्या होत्या दोन तसबिरी. खाली रांगोळी काढली होती. बाजूला दोन समया होत्या आणि तुपाच निरंजन ठेवलं होत. भल्या सकाळी लावलेला झेड ब्लॅक अगरबत्तीचा सुवास अजून रेंगाळत होता. सकाळी वाहिलेली जास्वदांची फ़ुलं अजून टवटवीत होती. “श्री गुरुदेव दत्त” म्हणून, पुढे त्यांच्या तोंडून सहजच एक वाक्य बाहेर पाडलं. दत्तभक्त, रश्मीकडे पाहून स्वामी बोलले, “तुम्ही या तसबिरी कुठं कुठं घेऊन जाणार? तसबिरी ठेवणार कुठे? पूजा कशी श्यक्य होईल? मी तुम्हाला मानस पूजा कशी करायची ते शिकवतो” म्हणून…. स्वामींनी मानस पूजा विधी शिकविला आणि रश्मीला गुरुमंत्र दिला. मन आणि शरीर स्वच्छ ठेऊन गुरुमंत्र उठता, बसता, जागेपणी, झोपेत, घरात, बाहेर, मंदिरात कोठेही केव्हाही उच्चारला तरी चालतो. स्वामींचा आशिर्वाद आणि गुरुमंत्र घेऊन राश्मीनं प्रसन्न मनानं दिवस सुरु केला. आठ, पंधरा दिवसात मुलं सूर्य नमस्कारात एकदम एक्स्पर्ट झाली. रश्मी आणि मुलांनी मिळून एक हजार सूर्य नमस्काराचा संकल्प सोडला आणि पूर्ण केला. जेव्हा संस्था अध्यक्षाना एक हजार सूर्य नमस्काराबाबत समजलं तेव्हा त्यांनी मुलांना चांगल्या उपक्रमाबाबत शाबासकी दिली. “पुढील आयुष्यात तुम्हाला सूर्य नमस्काराचा लाभ होईल रश्मी”, असा अभिप्राय दिला.

या गोष्टी मुलांना आणि शिक्षकांना आणि संस्थेतील प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिकवल्या जात होत्या. स्वतः होऊन गुरूंचा आशीर्वाद मिळणं, गुरुमंत्र मिळणं म्हणजे कमलावराचा वरदहस्तचं वाटला रश्मीला !.

“तुम्ही या तसबिरी कुठं कुठं घेऊन जाणार? तसबिरी ठेवणार कुठे?👇

असं का म्हंटल स्वामींनी? काय संकेत द्यायचा होता स्वामींना? आणि तेथे कर माझे जुळती 🙏🌹पुढील भागात.

माझ्या poems वाचायच्या असतील तर येथे क्लीक करा. 👇

https://bit.ly/3lP8OI4

माझ्या इतर stories वाचायच्या असतील तर 👇 येथे क्लिक करा.

https://bit.ly/2Z1r33u

आणि HOW TO साठी येथे क्लिक करा 👇

https://bit.ly/3jNAUl5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More