“तू सदा जवळी रहा… ” भाग – 23

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  …….  भाग -2*  बालमैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण…. भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई …अनुभूती घेतलीत  कुसुमताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी…. भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न ? ? नव्हते निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.   भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वैधव्यसदृश्य जीवन.   भाग -7 *  एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?  अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी… भाग-  8*  आईचं   मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली.  भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?  भाग – 10*  साखळी, मंदीर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12*   सुचिताची  प्रश्नावली, श्री आणि  विनिता  घराचं घरपण कसं टिकवतातं ? रश्मी झोपेत का घाबरली ? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?   भाग -13*   @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चंद्रयाला पाटलीणबाई चप्पलनं का मारते?  भाग -14 *  काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबांचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरांना  का भेटली?  सरांनी पेढे का मागितले?   भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतकं सोपं होत का? रश्मीबद्दल प्रश्न ??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी; मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी, पुतळी लायब्ररीत का बसत होत्या ?  भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?  भाग- 17 *@ दिवाळी म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंद का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले?  भाग – 18  तरुण मुलगी घरात असणं ?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न, भाग -19,   आत्या की मैत्रीण,  फिरकी? अतरंगी बंटी,   भाग – 20 *  कोणाची परीक्षा? कोण होता मोनादादा?  उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनादादा?  भाग -21 * विनिताचं नेमकं काय आणि कोठे चुकलं?    श्यामदादांचं विनिताला अश्वासन …! भाग -22  * रश्मीचं नवीन घर आणि वातावरण, कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदान, लायब्ररी…, हास्य , आनंद म्हणजे … वहिनी, रोहन आणि खेळ

कॉलेज, जिम, रक्तदान

कॉलेजमध्ये आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स तीनही फॅकल्टी होत्या.  अकरावी पासून पोस्ट ग्रॅजुएशनपर्यंतचं शिक्षण एकाच कॅम्पसमध्ये मिळत होतं. बस स्टॉपपासून तसच पुढे जाणाऱ्या रस्त्यावर मुला, मुलींकरिता होस्टेलची व्यवस्था होती. कॉलेजमध्ये प्रशस्त वर्गखोल्या होत्या. मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या. भरपूर सूर्य प्रकाश 🌕🌞आणि नैसर्गिक हवा होतीच आणि पंख्यांची पण  सोय होती. कॉलेजला  मोठा  जिमखाना होता. खेळासाठी खूप सारे साहित्य ⚽️⚾️🥎🏀🏈🏉🎾🎳🏏🏑🏒🏸🥍उपलब्ध होतं.  पी.  टी.  शिकवणारे सर  मुलांमध्ये विशेष प्रिय होते.  काही विद्यार्थी खेळामध्ये उत्कृष्ठ होते. ते  तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विजयी 🏆🏆 होऊन येत असतं. त्यांच्याबद्दल सर्वांना कुतूहल आणि आभिमान वाटायचा. आम्ही मुली  तिथं कधीतरी कॅरम खेळायला जायचो. अभ्यास आणि खेळामध्ये समन्वय साधून या मुलामुलींना दोन्ही गोष्टी कशा काय जमतात? या बद्दल रश्मीला नेहमी कुतूहल वाटे. खेळ जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 🏏⚽️ खेळ शिकण्यासाठी तेवढीच इच्छाशक्ती हवी. खेळ शरीराला आणि मनाला तंदुरुस्त ठेवतो. खेळामुळं मुलांमध्ये खेळकर 🤸🤸‍♂️⛹️‍♂️⛹️‍♀️🤾‍♀️आणि आनंदी वृत्तीच निर्माण होते.  खेळ बैठे असोत किंवा मैदानी, तरुण मुलांमध्ये असलेली शक्ती💪💪 योग्य ठिकाणी वापरून त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्टया गुंतवून ठेऊ शकतोच पण  त्यामुळे मुलं  भरकटत नाहीत.  म्हणजे दोन्हीदृष्ट्या फायदाच असतो. इच्छा असेल तर मुलं करिअरपण त्याच फिल्डमध्ये करू शकतात.   

एक दिवस असचं जिमखान्यात गर्दी दिसली. चौकशी केली तर, रक्त दान 🩸शिबिर असल्याचं समजलं. “रक्तदान म्हणजे जीव दान”, “तुमच्या एका चांगल्या कामामुळे दुसऱ्याचा जीव वाचेल”, “चला एक कामं करू, संधी मिळता उतराई होऊ”, “रक्ताचा प्रत्येक थेंब मूल्यवान, चला करू रक्तदान” अशी रक्तदानाची महती लिहिलेली आव्हानात्मक स्लोगनस् , पोस्टर्स मुलांना आकर्षित करत होती. स्लोगन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
पाहून, लगेच मुला, मुलींच्या रांगा लागल्या. परंतु बऱ्याचं मुला, मुलींना परस्पर बाहेरच्या बाहेरच निघून जायला सांगत होते. बऱ्याच मुला, मुलींची इच्छा असून पण त्यांना रक्तदान करता येत नव्हतं. काही मुलं म्हणजे तर फक्त हाडं आणि त्वचा इतकंच दिसायची. शरीरात मूठभर मांस👊 नव्हतं पण त्यांना रक्त दान करायची जबरदस्त इच्छा दिसत होती. काही चांगलं करण्याची संधी चालून आली तर आपण त्याचा लाभ घ्यावा म्हणजे इतर कुणाला तरी नक्कीच फायदा होईल एवढाच विचार करुन भलीमोठी रांग नागमोडी वळण घेताघेता झिग झॅग झाली आणि कॉलेजच्या स्टफ रूम समोर थांबली. रांगेमध्ये समोर असणाऱ्या तीन मुलींना रक्तदान करण्यास अयोग्य ठरवलं म्हणून रश्मी हिरमुसली. पण कार्यकर्त्यांनी रश्मीला हॉलमध्ये पाठवलं तसा तिला खूप आनंद झाला. आपण काहीतरी चांगलं काम करतोय. कोणाला तरी उपयोगी पडतोय याचा आगळा आनंद चेहऱ्यावर दिसतं होता.
घरी पाऊल ठेवल्या, ठेवल्या चंदानं विनिता आईला रश्मीच्या रक्तदानाबद्दल सांगितलं. विनिताचा चेहरा लगेच काळजीनं झाकोळला. तिला वाटलं लगेच अशक्तपणा आला तर? पण तीची समजूत घालावी लागलीं की, तसं काही होणार नाही.
“आई, तू बिलकुल काळजी करू नको, हे बघ मी किती स्ट्रॉंग 👉💪💪 आहे”, असं म्हणून रश्मीने आपल्या दंडातील बेटकुळी 💪💪दाखवली आणि दंडाला हात लावून दंड किती मजबूत आहेत तें बघायला सांगितलं तस, आई, रश्मी आणि चंदा हसायला लागल्या.
हसल्या मूळ वातावरणात हलकेपणा आला. 😀😂🤩 हास्य हे जीवन वृक्षाचे फ़ुल आहे. जीवनात हसण्यामुळं शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात. शरीरातून आनंद लहरी स्रवतात. हसण्यामुळं स्वतःला तर चांगलं वाटतच पण आसपासच्या सर्वाना बरच वाटत. आपण हास्य वाटलं तर समोरचा पण हास्यच वाटतो. किती साद, सोपं आणि सरळ असतं. त्यातल्या त्यात लहान मुलांचं हास्य
तर सर्वांना आवडतं आणि भावतं. बाळाच्या हास्यातील निरागसता सर्वांच्या चेहऱ्यावर तसंच निरागस हास्य पसरवते.
हास्य गुणाला थिल्लर समजणं , त्याचा मजाक उडवणं, हास्याबद्दल टोमणे मरण, किंवा त्याचा वेगळा अर्थ काढणं हे सारे प्रकार हास्याचं सौंदर्य कमी करू शकत नाहीत.

हसता, हसता रश्मीला पुतळीची आठवण आली 👭.
पूर्णपणे कन्नड बोलणारी पुतळी, अकरावीला जेव्हा रश्मीच्या सहवासात आली तेव्हा आवर्जून मराठी बोलायची. वर्गामध्ये एकदा पोलिटिकल सायन्सच्या तासाला मुळवाडे सरनी जोक सांगितला आणि मुलं खूप खूप हसत होती.
ती म्हणायची “सगळं क्लास पडून पडून हसल,” तिचं बोलणं ऐकून आम्ही हसायला😂🤩😁 लागलो की म्हणायची, “सॉरी, सॉरी सगळं क्लास हसून, हसून पडलं” आणि आम्ही हसत हसत तिच्या मराठी बोलण्याला प्रोत्साहन द्यायचो. प्रकर्षाने झालेल्य पुतळीच्या आठवणीने रश्मीला प्रसन्न वाटले.

जीव, रसायन आणि फिजिक्स विषयासाठी स्वतंत्र, प्रशस्त आणि अद्यावत सुसज्ज प्रयोगशाळा होत्या. प्रयोगशाळेमध्ये विविध प्राणी काचेच्या बरणीत केमिकलमध्ये ठेवले होते.  हाडाचा सापळा काचेच्या कपाटात होता. 

 ग्राउंड फ्लोअरला आधुनिक असं  सुसज्ज ग्रंथालय होतं. एनसायक्लोपिडियाचा वापर कसा करायचा हे तिथचं शिकायला मिळालं. पुस्तकांचा प्रचंड खजिना पाहून खुश झाल्या रश्मी, चंदा. कधी कधी वाटायच ‘असा काही चमत्कार व्हावा आणि लायब्ररीतील सर्व पुस्तकांमध्ये असलेलं ज्ञान आपल्या मेंदूत साठवावं आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करावा‘. पण तें कस श्यक्य होतं?   ज्ञान तर कणाकणानं वेचावं  लागतं तरचं त्याचं  महत्व लक्षात येतं.  मेहनतीला शॉर्टकट नाही हेच सिद्ध होतं शेवटी. माहिती मात्र भसाभस गोळा करु शकतो. आता आपली जबाबदारी होती. काय घ्यायचं ?  किती घ्यायचं ?आणि कसं घ्यायचं ? अफाट ज्ञानाचं भांडार होतं समोर. पण बऱ्याच गोष्टीवर मर्यादा यायच्या. कारण बोर्ड एक्झाम म्हणून मुख्य अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करावं लागायचं. इथं जास्त पुस्तक वाचन किंवा अभ्यास केलेला दिसला  तर पुस्तकातला  किडा म्हणून ओळखलं जायचं.  व्यवहार श्युन्य राहून चालणार नव्हतं.  जगात दोन गोष्टींमधून आपण खूप काही शिकू शकतो एक वाचलेली पुस्तकं आणि दुसरं  भेटलेली माणसं. हे सत्य होतं.  निसर्गामध्ये आणि मानव निर्मितीमध्ये सातत्याने काही ना काही मिळत असतं. सारचं आपल्यायोग्य आहे का?  आणि मुख्य म्हणजे विधायक आहे का?  हे आपण ठरवायचं.  आणि तेच ठरवण्याची क्षमता वाचन,  शिक्षण यांच्यातूनच मिळतं असते. जसजसं समजत जातं,   कळत जातं, तसं  आपल्याकडे असलेलं ज्ञान किती कमी आहे हे समजतं आणि मग आपण इतर कोणत्याही व्यसनापेक्षा ज्ञानार्जनाच्या  व्यसनातं का पडू नये?  असा विचार मनात डोकावून जाई. लायब्ररीत जाताना रश्मी,  नेत्रा आणि लता नेहमी एकत्र  जायच्या. 

कॉलेजमध्ये कॅप्टन, जी.एस. निवडीसाठी प्रत्यक्षात निवडणुका चालायच्या.  एरवी एकाच वर्गात असून पण मुलं – मुली कधीच फारशा गप्पागोष्टी करत नसत. किंबहुना एकमेकांशी  बोलत सुध्दा नव्हते.   परंतु निवडणुकीच्यावेळी आपल्या उमेदवाराला मत देण्याविषयी आग्रहानं घरी येऊन सांगायचे.  विजयी उमेदवार ओळखीचा असेल तर  कट वडा,  मिसळची पार्टी देत असे.  

कॉलेजमध्ये बस स्टॉपपासून बरोबर कॉलेज बिल्डिंगच्या विरूद्ध दिशेला कॅन्टीन होत. तिथं चार, पाच बाकडी आणि टेबल ठेऊन बैठक व्यवस्था केली होती. आणि चटईचीच भिंत होती.  तिथली झणझणीत मिसळ आणि कट वडा प्रसिद्ध होता. नाका,  डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू व्हायच्या मिसळ वाड्याच्या  कटमुळे. पण तसचं सुर ssss, सुर ssss करत आवडीनं खायची कॉलेजमधील मुलं आणि मुली. काही वेळेस, माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप खास कॉलेज कँटीनमध्ये कट – वडा खाण्यासाठी चक्कर मारत असे.  
गावातून काही वेळेस प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबियांना घेऊन कट- वडा  खाण्यासाठी आणि कॉलेज जवळ असणारा पाणीपुरवठ्याचा तलाव पाहायला गर्दी करतं असतं. कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर तर सुसज्ज होतच. जुनिअर कॉलेजमध्ये   शिकविणारे प्रोफेसर  बारावीच्या परीक्षेची आणि परीक्षा पद्धतीची सातत्यान आवश्यक माहिती देत होते.  सात वाजता कॉलेजला निघायचं,  साडेबारा,  एक दरम्यान कॉलेज संपलं की परत कॉलेज बसनं  गावात यायचं. घरी  न जाता कुलकर्णी  सरांकडे ट्युशनला  जायचं आणि तिथून घरी यायचं.  या नित्यक्रमात एक, दोन म्हणता म्हणता सहा महिने संपले. 

वहिनी 

आता शेजारच्या घरातून पावणे सहाला विचारला  जाणारा नेहमीचा,  रोहन कोठे आहे?  असा प्रश्न येत नव्हता.  त्यांना माहिती होतं रोहन कुठे असणार ते.  तो  कधी सई ताईबरोबर,  कधी  चंदा ताईसोबत खेळत असायचा.  शेजारच्या वहिनी,  आईची मोठी मुलगी आणि आमच्या घरची मेंबर कधी झाल्या तें समजलं नाही. दिसायला गोरीपान, छान, मनानं निर्मळ होत्या. मुलांबरोबर मुलं, मोठ्यां बरोबर मोठं होणं त्यांना सहज जमत होतं.  विनिता आई त्यांना वहिनी म्हणायची आणि त्या विनिता आईला वहिनी म्हणायच्या.  त्यादोघी एकमेकींच्या मैत्रिणी पण होत्या.  बऱ्याच वेळेस वाटायचं, बोलायला यांच्याकडे काय विषय असतील जे कधी संपतच नाहीत? आणि मग छोट्या रोहनच्या  बोबडं बोलण्याच्या कॅसेट पासून त्यांच्या पूर्वीच्या ब्यळवडी  गावातील गोष्टी, वहिनींच्या   कॉलेजमधील  गंमती,  हॉस्टेलमधील वास्तव्य आणि वेगवेगळे अनुभव अव्याहतपणे सांगत राहत. त्यांच्याकडे नं संपणाऱ्या गोष्टी आणि अनुभवाची गाठोडी असे. बोलकं  माणूस म्हणजे नेमकं कसं असतं याच उदाहरणं म्हणजे वहिनी. माहेरबाबत अखंड नं संपणारी बडबड करणारी व्यक्ती म्हणजे वहिनी. सासरबद्दल प्रेम आणि आदराने बोलणारी व्यक्ती म्हणजे वहिनी. स्वयंपाकात  एक्स्पर्ट,  पदार्थातं चव आणि वैविध्य आणणारी व्यक्ती म्हणजे वहिनी. कोणाला,  कोणता रंग  छान दिसेल हे सांगायच्या.  एखादा पिक्चर पाहून आल्या की त्याची स्टोरी मस्त सांगायच्या. गोष्टी सांगण्याची कला त्यांना खूप छान अवगत होती.  लहानपणीच्या, बहीण रेखा आणि भाऊ राजूबरोबरच्या  गंमतीजमती  सांगत असतं.  त्यांच्या जवळ असंख्य विषय होते आणि बोलायची आणि गोष्टी सांगायची कलापण होती. पहिल्या टर्मचा शेवटचा दिवस संपवून घरी आल्यानंतर नेहमी सारखं दुपारी गप्पा चालू होत्या.  
“काय रश्मी,  चंदा उद्यापासून कॉलेजला सुट्टी आहे ना?”  वहिनींनी दारातून आत येता येता विचारलं.  
“हं,  होय वाहिनी,  दिवाळीची  सुट्टी सुरु होतेय  उद्यापासून,” चंदा बोलली.

रोहन, सोनी, ज्योती 🧎‍♀️👩‍🦯🧍‍♂️

“ताई आज तू माझ्याशी खेळायला ये”,  म्हणून रोहन चंदाची पाठ सोडेना. “मी तुझ्याशी काय खेळणार?  तू सोनी,  ज्योती,  सईशी खेळ”,  चंदानं रोहनची समजूत काढायचा प्रयत्न केला.  पण आज त्यानं ठरवलंच होतं.  तितक्यात सोनी,  ज्योतीपण आल्या. मग आमची सगळ्यांची मैफिल जमली.  

“एका गावात, आण्णा  पाटील  नावाचे गृहस्थ रहात होते.  पाटलांचा गावात खूप रुबाब होता. पाटील बुवा घरातून बाहेर पडताना आपल्या जाडजूड मिशाना तूप लावून,  पीळ देऊन त्यांना पिळदार आणि टोकदार बवायचये.  छाती बाहेर काढून,  मस्त रुबाबात गावातुन फेरी मारायचे.  मधेच मिशांना पीळ देऊन आणखी टोकदार करायचा प्रयत्न करायचे  पण स्वत:च्या घरी आले की त्यांच्या मिशा,  कुठला पीळ आणि कुठलं टोक?  म्हणजे पीळ,  टोक निघून जायचे आणि जाड मिशामुळे दोन्ही ओठ झाकले जायचे.  असं का होत असेल?” विनितानं मुलांना विचारलं आणि आम्ही सगळे विचार 😨🤓😴 करायला लागलो.  

“तुपाचा असर कमी झाला असेल”,  चंदा उतरली. 

 “नकली मिशा असतील”,  रोहन बोलला.

 “घरी तो बायकोला  घाबरत असेल”,  तारका वहिनी म्हणाल्या.  

“साफ चूक,  सगळी उत्तरं चुकीची”,  आम्ही सर्वजण आवाजाच्या दिशेने दाराकडे पाहिलं, देशपांडे वहिनी आत येता येता हसत  बोलत होत्या. “एकदम  सोप्प आहे तें,  आण्णा पाटलांची बायको त्यानां चहा गाळून देत नव्हती.  म्हणून घरी आल्यावर त्याच्या मिशा दोन्ही ओटावर यायच्या. जेणेकरून मिशाद्वारे ते, चहा गाळून पीत होते,”  हाss  हाsss हा sssहा sss 😛😜आता सगळे सुट्टीच्या मूडमध्ये आले होते.

रोहनला पण  जोक सांगायचा होता. ताई आता मी सांगणार जोक, म्हणून त्यानं सर्वाना शांत बसवलं. 
“एक टीचर असतात.  त्या वर्गामध्ये गणांविषयी माहिती देत असतात.  
देव गण म्हणजे काय? मनुष्य गण,  राक्षस गण,  त्याचे गुण दोष,  स्वभाव.  अशी सर्व माहिती देतात. चर्चा होते.  आणि बेल झाल्यामुळे मॅडम वर्गातून निघून जातात. दुसरे दिवशी वर्गात आल्या आल्या मॅडम आदल्या दिवशीचा अभ्यास रीवाईझ करतात. 

 मॅडम : एकूण किती  गण आहेत?  बरीच मुलं हात वर करतात. 

 मॅडम : हं सांग सोनी किती गण आहेत?  सोनी : तीन गण आहेत मॅडम.  

राहुल  : मॅडम,  तीन नाही; चार गण आहेत.  सोनी खोटं बोलते आहे? 

 मॅडम : “आं?”  (मनातच बोलतात) मी तर तीन गण सांगितले होते.  चार गण कोठून आणले राहुलने?  

“गणांची नाव तू सांग राहुल”.  मॅडम राहुलला सांगतात. राहुल : “देवगण,  मनुष्य गण,  राक्षस गण,  आणि ढुंगण गण..ही sss ही sss ही ssss”😁😄🤣😂😀😃🤣😇  रोहननं सांगितलेला जोक ऐकून….  रश्मीसहित सर्वजण जोरजोरात कितीतरी वेळ हसतं  होतो.  आणि हा पट्ट्या  सई,  सोनी, ज्योतीबरोबर खेळायला गॅलरीत गेला होता.  इकडं चंदा,  रश्मी,  दोघी वहिनी आणि विनिताआई सर्वजणी मिळून पत्याचा डाव टाकला.  फराळ करायचं ठरवलं.  दुसरे दिवशी  संध्याकाळी गार्डनमध्ये जायचं ठरवूनच दोघी वहिनी बाहेर पडल्या. छोटया रोहन,  ज्योती,  सोनी, सई बरोबर क्रिकेट,  🏏🏏रिंग खेळतांना मस्त धमाल केली सगळ्यांनी.  चंदा आणि दादा रिंग खेळतांना गार्डनमध्ये  चणे – शेंगदाणे विकणाऱ्या माणसाच्या डोक्यावरच्या  टोपलीत  रिंग 🥏जाऊन बसली आणि फेरीवाल्या काकांबरोबर सगळेच हसायला लागले. 

रोहन बडबडला…. 
क्रिकेट खेळता चेंडू गेला दूर,  पळ पळ सोनी पकड चेंडूं, 🏏🏀⚾️  घे विकेट ज्योतीची,

कर रन आउट आणि कर तूच बॅटिंग

आणि पाठव तिला भेळ आणायला ||
ज्योती उतरली….. 

खेळता खेळता बडबड फार, 

रोहन तूच आण भेळ चार  

चणे, शेंगदाणे अन आईस्क्रीम मस्त

 गोल गोल बसून सारे करू फस्त ||
सई म्हणाली……

रंगू दे नवा खेळ, प्रथम बसू गोलगोल  खेळू थोडा  नवा खेळ,  

गोल फिरून शोधू  काय? 

 “आईचं पत्र  हरवल,  📃

ते मला सापडले……    सारे कोरसमध्ये म्हणाले 
छोटे,  मोठे सारे आले 

गोल झाला मोठा छान 

आईचं पत्रं हरवलं म्हणून

 चंदान रुमाल टाकला आईच्या पाठी  ||

मुलांबरोबर मुलं झाली 

मोठी माणसं खेळात रमली

 खेळ रंगला  खूप मस्त

आईस्क्रीम, भेळ, चणे, अन शेंगदाणे झाले फस्त ||
चला चला घरी निघू , 

उशीर झाला फार, खूप केली मजा.

घरी जाऊन करा अंघोळ, गरम भात, 

लिंबू अन मेतकूट, वर धरू तुपाची धार.  गोष्ट ऐकत, ऐकत झोपा ढाराढूर .

म्हणून वहिनी घरी  जणांसाठी मुलांना आग्रह करू लागल्या. सई,  सोनी,  ज्योती,  रोहन कोणाचाच गार्डनमधून पाय निघत नव्हता. सुखी भेळ खाऊन मस्त मजेत घरी परतले सर्वजण.  

आनंद आनंद

आणखी एक  आनंदाची गोष्टी घडली, दिवाळीत. ती शब्दात व्यक्त करणं शक्य नाही.  मावशीचा मुलगा,  आनंद दिवाळीला घरी आला आणि आमची दिवाळी अतिशय आनंदात आणि खुशीत गेली. पहिल्यादा  भाऊबीजेला ओवाळून घ्यायला भाऊ आला होता.  आनंदपण बारावीलाच होता.  त्यामुळे तो खूप दिवस रेंगाळला नाही. नावाप्रमाणे सर्वाना आनंद आणि ख़ुशी वाटून निघून गेला. आता आम्ही त्याच्या भेटीसाठी मे  महिन्याची वाट पाहत होतो.  हेल  काढून मराठी बोलणं भावायचं आम्हाला. “आमच्याकडे काय वं,  आई वडील एकीकड,  बहीण एका काकांकडे, मी एका काककडे” म्हणून खंत बाहेर पडायची.  खेडेगावात शाळा नसल्यामुळे तो आणि त्याच्या बहिणी शिक्षणासाठी काकां कडे रहात होते.  आई मात्र, मुलींच्या शिक्षणासाठी काहीही करायला तयार असायची म्हणूंनं, मावशीला सॅल्यूट करायचा. आमच्या जीवनात आनंद आणणारा आनंद नियमित आनंद आणू लागला. 😄😃

“अगगबाई, शेवटी गॅसचा नंबर लागला” म्हणून वहिनींनी रश्मीला टाळी दिली.  करणं  गॅस नोंदणी करुन दोन महिने होऊन गेले होते आणि आज एकत्र दोघीच्या घरी गॅस शेगडी येणार होती.

 एक दिवस दादांनी टीव्ही आणला. वहिनी चित्रहार,  बातम्या,  रविवारी पिक्चर बघायला आवर्जून हाक मारायच्या.  बऱ्याच वेळेला टी. व्ही. वरच चित्र स्पष्ट दिसण्यासाठी अँटिनांची दिशा बदलावी लागायची. रथचक्र,  कॅम्पस, चुनौती,  काला जल या मालिका पण त्यांच्या घरीच पहिल्या होत्या.  

दिवाळी संपली आणि अभ्यास जोरात सुरु झाला.  ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळालं,  परीक्षेचा फॉर्म भरला.  “दिवस रात्र एकच ध्यास,  अभ्यास एक्के अभ्यास” सुरु झाला. घरी गजराचं घड्याळ नव्हतं म्हणून वाहिनी रात्री दरवाजा ठोटाऊन रश्मीला  जागं करायच्या आणि रात्रीचा अभ्यास सुरु व्हायचा.

 नेमकं पाय दुखतोय म्हणून रश्मी लंगडत चालायला लागली. परीक्षा तोंडावर असताना हे काय दुखण?  दोनच दिवसात डॉक्टरनी पायाच्या बोटाचं कुरूप कापून काढलं आणि पाय एकदम बरा झाला. 

चला, रश्मीला शुभेच्छा देऊ, परीक्षा आहे बारावीची, मामी आणि आणि सोमण सर बोलले. आणि आली   बारावीची परीक्षा………...  

8 Responses

    1. Thank nanda मॅडम. कथा भाग वाचून अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद. 🌹🙏

  1. कॉलेज आणि हॉस्टेल चे दिवस डोळ्यासमोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More