“तू सदा जवळी रहा… ” भाग – 22

आत्तापर्यंत आपण वाचलात,   भाग -1*  एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ….…  भाग -2*  बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं लपण…. भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुमताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणींची … भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, विनिता आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.   भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वि…..  सदृश्य जीवन.   भाग -7 *  एक सक्षम महिला असूनपण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सारं — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी… भाग-  8*  आईचं मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली.  भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय ग?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?  भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, लोचन आणि रश्मीचा जन्म. भाग- 12*   सुचिताचि  प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कसं टिकवतात? रश्मी झोपेत का घाबरली? दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?   भाग -13* @ रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चंद्रयाला पाटलीणबाई चप्पलनं का मारते?  भाग -14 *    काय दिलं गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबांचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना  का भेटली ?  सरांनी पेढे का मागितले?   भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होतं का? रश्मीबद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी, मॅडमना पाहून गप्प का झाली ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी, पुतळी लायब्ररीत का बसतं होत्या ?  भाग-16 *   विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ?  दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?  भाग- 17 @ दिवाळी म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @ पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले?  भाग – 18  तरुण मुलगी घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न, भाग -19,   आत्या की मैत्रीण,  फिरकी? अतरंगी बंटी,   भाग 20,   कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा?  उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा?  भाग -21,  विनिताचं नेमाक काय आणि कोठे चुकलं?    श्याम दादाचं विनताला आश्वासन..!   भाग – २२ * रश्मीचं नवीन घर आणि वातावरण, कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती

वाचा, अभिप्राय द्या आणि share करा 🌹💐🙏

रश्मीचं नवीन घर आणि वातावरण

आशिष बिल्डिंग समोर, बाबा मंजिल होती.  बाबा मंजिल मोठी दोन मजली आणि या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत मोठी  जागा  व्यापून राहिली होती.  मंजिलचे मालक बिडीचा कारखाना चालवायचे. एक वर्षाच्या बाळापासून साठ वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीपर्यन्त कुटुंबात  तीन पिढ्या एकत्र  दिसायच्या. संध्याकाळी कधी, कधी एक प्रौढ, स्थूल स्त्री दारात बसलेली असे.  संपूर्ण कुटुंबावर त्यांचं लक्ष असे आणि सर्वजण त्यांना बडी भाभी म्हणून ओळखायचे.  

बाबा मंजीलच्या कॉर्नरला, रोज संध्याकाळी  एक हातगाडी लागायची.  तिथं फक्त कांदाभजी तळून विकली जायची आणि चवदार  भजिला खूप मागणी होती. तो पदार्थ खेकडा भजी म्हणून विकला जाई. हातगाडी लागली की,  टेप रेकॉर्डवर उस्मानभाई मोठमोठ्यानं  हिंदी गाण्याची कॅसेटस् वाजवायचे आणि वातावरणात गजबज निर्माण व्हायची. घराच्या समोर असणारा चौक, नेहमी गजबजलेला असे. चारी बाजूंनी वाहनं आणि माणसांची वर्दळ असे. 

वाड्यात राहणारी सीमा💃, कॉमर्सला शेवटच्या वर्षाला होती.  लांबसडक आणि काळे भोर केस होते सीमाचे. जाड दोन वेण्या घालायची.  सावळी सीमा खूप हुशार आणि  गोड स्वभावाची होती. सीमा आपल्या आईसारखी दिसायची. लांब नाक, बोलके  डोळे, बारीकशी जिवणी आणि शरीराची बारीक चण होती तिची.  सीमाच्या सगळ्या बहिणी ग्रॅज्युएट होत्या. त्यांची लग्न होऊन सासरी गेल्या होत्या.  तिचा लहान भाऊ शाळेत शिकत होता. वाड्यात राहणारी  उमा 💃एकदम हुशार,  बारीक चण, गोड आवाज आणि बोलक्या स्वभावाची होती. विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता, त्यामुळे प्रॅक्टिकल आणि थेअरीसाठी पूर्ण दिवसभर कॉलेज असे. ‘दहावीपर्यंत गोबरे असणारे गाल  तीन वर्षात एकदम  आत गेले आणि  ती सडपातळ दिसत होती’, असं काकू म्हणायच्या. आता ती बी. एस. सी. सेकंड ईअरला होती.  रश्मीला ती शाखेत घेऊन जायची.  
रश्मी राहत असलेल्या आशिष बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर दोन्ही बाजूची घरं रिकामीच होती.  प्रशस्त गॅलरी आणि नळाला सकाळ, संध्याकाळी भरपूर पाणी येत असे.  गॅलरीत उभं राहील की चौकातून माणसं आणि गाड्यांची वर्दळ दिसे. बिल्डिंगमधून खाली आलं की बेकरी होती आणि बाजूला वाण्याचं दुकान होतं. पिठाची गिरणी आणि लॉंड्री पण अगदी जवळच होती. दवाखाना,  मेडिकल स्टोअर आणि आवश्यक सर्व सुविधा जवळपास उपलब्ध होत्या.  
मुख्य म्हणजे शाळा दहा मिनिटाच्या अंतरावर आणि  कॉलेज पण  जवळ होतं. सईचं ऍडमिशन कन्या शाळेत झालं. पिस्ता रंगाचं हिरवं स्कर्ट आणि शुभ्र ब्लाउज असा तिचा गणवेश होता.  समोरच्या चौकात एक लक्ष्मी मंदिर होतं आणि येता जाता लोकं  घंटानाद करून दर्शन घेत असतं.  थोडं पुढ गेलं की उजव्या हाताला मारुती मंदिर होतं.  गुरुवारी आठवड्याचा बाजार भरत असे.  आसपासच्या गावातून भाज्या,  धान्य आणि बऱ्याच वस्तू विकाण्यासाठी आणल्या जात असतं. एस. टी. स्टॅन्डच्या रस्त्यावर भलीमोठी बाजारपेठ होती.  तिथे कपडे, भांडी, सोने, चांदी,  वाण्याची दुकानं,  दवाखाने आणि सार्वजनिक वाचनालय, कार्पोरेशन, स्टेट, इंडिया, मॉडर्न बँका, पोस्ट ऑफिस ई.  होते.  कपड्यांची खूप मोठी बाजारपेठ होती तिथं आणि दूरदूरहुन लोकं कपडे खरेदी करण्यासाठी येत असत.  गुजर आणि जैन लोकवस्ती खुप मोठया प्रमाणात होती. देवाची चांदीच्या रथातून मिरवणूक निघत असे.  कन्नड़,  मराठी शाळा होत्या. कर्नाटक मंडळाचं आणि महाराष्ट्र मंडळाचं कॉलेज  होतं.  आजूबाजूच्या  कर्नाटक, महाराष्ट्राच्या  खेड्यातून शिकण्यासाठी बरेच विदयार्थी येत असत.

तंबाखू आणि बरंच काही
याच गावात तंबाखूचा खूप मोठा व्यापार चाले.  कॉलेजचे जे ट्रस्टी होते ते स्वतः मोठे शेतकरी होते. त्यांच्या शेतातून तंबाखूचे विक्रमी पीक काढलं जायचं.  वर्षानुवर्षे  विक्रमी पीक काढण्याचा विक्रम  आसपासच्या कोणत्याच शेतकऱ्यानं मोडला नव्हता. त्यांच्या शेतात पाच फुट उंचीचं तंबाखूचे झाडं असायचं. आसपासचे लोक कौतुकानं तंबाखू लागवड पाहण्यासाठी यायचे.  ते तंबाखूचे व्यापारी होते. भारताच्या पंतप्रधान, सन्माननीय इंदिरा गांधीजींच्या हस्ते सोन्याचं तंबाखूचं पान देऊन त्यांचा सत्कार केला होता असं विनिता आई सांगायाची.  तंबाखूची सर्व गोडावूनस् गावाबाहेर होती.  त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होता.   महिला मोठ्या प्रमाणात बिडी वळण्याचं काम करत होत्या.   


  रश्मीपुढं दोन कॉलेज पैकी कोणतं निवडायचं? हा संभ्रम होता. कर्नाटक मंडळाच्या कॉलेजला रश्मी जाईल आणि दोन किलोमीटवर असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या कॉलेजमध्ये चंदा अकरावीला एडमिशन घेईल अशी मोघम चर्चा करून कामाला लागले. चंदाचं एडमिशन तर झाले. सर्व र्विद्यार्थी ईबिसी फॉर्म भरायचे. त्यामुळे चंदाचा  सारा प्रश्न सुटला.  
मोनादादांचा मुलगा त्याचं कॉलेज मध्ये शिकत होता. “गरज लागली तर राजूची मदत आवश्य घे, असं मोनादादांनी चंदाला सांगितलं.  “एकाच गावात राहून  दोघी, दोन वेगवेगळ्या कॉलेजला का जाणार?” हा मोनादादानी विचारलेला प्रश्न? रश्मीला विचार करायला लावणारा वाटला.  रश्मीनंपण निर्णय बदलला आणि चंदाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायच ठरवलं. 
कॉलेज प्रवेश ❗️
 महाराष्ट्र मंडळाच कॉलेज, गावापासून  साधारण दूर दोन किलोमीटर वर असेल. “कॉलेजच नाव, असं तर सुचवत नसेल ना ? आपल्या विद्यार्थांना देवाचा आशीर्वाद घेऊन चंद्राला🌙🌙🌕 गवसणी घालण्याच  काम करा ! आकाश     🌠☄️🌈🌏💫   कवेत घेऊन, भरारी घेणाऱ्या गरुडाची 🦅🦅 झेप असुदे तुम्हा सर्वांची! …  मी द्रोणाचार्यां सारखं शिकवेन या अर्जुनाच्या नगरीत. तुम्ही प्रत्येकजण चंद्राला गवसणी घालण्याचा प्रयत्न करा. सातत्याने दिलेला, देत असलेला आणि भविष्य काळात हाच संदेश देणार कॉलेज ! कॉलेज गेटवर सुंदर मराठी अक्षरात कॉलेजचं नाव लिहिलेली अर्ध चंद्राकर कमान होती.   कॉलेज बस स्टॉप वरून  तसच पुढे जाताना लागणारी सुंदर बाग होती. मेंदीच्या झुडूपाच दाट कूंपण होतं बगीचाला. तसच पुढे चालत गेलं की बिल्डिंग. बिल्डिंगमध्ये प्रवेश केला की समोर “आहाहा ….! पांढरं शुभ्र कमळ, आणि कमळात उभी सुंदर, मनोहारी, सहाफुट उंच, गोड, सात्विक चेहरा आणि हसतमुख, कपाळावर लालभडक चमचम करणार कुंकू लावलेली, शुभ्र सरस्वतीची मूर्ती .🙏🌹 
या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता |  या विणावर दंडमंडीत करा या श्वेत पद्मासना | या ब्रह्मार्चित शंकर प्रभु तिभिर देवै सदा वंदिता |  समांपातू सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा ||🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
प्रतेक विद्यार्थी नतमस्तक होऊन पुढे जायचा. मातेचा आशीर्वाद घेऊन, पवित्र मनानं आपलं भवितव्य बनवणाऱ्या इमारतीमध्ये, सरस्वतीच्या भक्तांकडे : ज्ञानामृत सेवनासाठी. 
 ऍडमिशिन तर झालं. चौधरी काकांनी फी पावती देता देता, “ट्रांसफर सर्टिफिकेट आणून दे आणि उद्या आयडेंटिटी कार्डसाठी पासपोर्ट साईझ फोटो  घेऊन ये”, असं सांगितलं. रश्मीने घरी पाऊल ठेवलं तसं आईच्या चरणांना स्पर्श केला. …”हेच ते चरण👣 अखंड चालत राहणारे, अखंड  धावपळ करणारे, आपल्या अपत्यांना शैक्षणिक यशाच्या वाटचालीसाठी आशीर्वादाची अखंड बरसात करणारे, आपल्या पुरचुंडी👛👜 मधील ठेव न पाहता उधळण्यासाठी तयार असणारे, भविष्याकडून स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न करणारे, पण भविष्यामध्ये आपल्या तीनही आपत्याना सुजलाम, सुफलाम करण्याचा वसा घेतलेल्या चरणांना स्पर्श करताना रश्मीच्या मनातील कृतज्ञता भाव न बोलता स्पर्शातून जाणवले विनीताला. शिक्षणापासून वंचित राहत असलेलं आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच पुनश्च शिक्षणाच्या वाटेवर आलं”.
“चल, देवाला नमस्कार कर ! पुस्तकं, नोटबुक आणि आवश्यक गोष्टी आणायच्या आहेेत.
आय. कार्ड साठी फोटो काढायचा आहे. बाहेर जाताहेत तु आणि  चंदा तर देवासाठी फुलपुडी घेऊन ये. “विनिताने रश्मीच्या मस्तकावर हात ठेवला.” रश्मीच्या आग्रहाखातर आई विनिता आणि चंदा अशा तिघी बाहेर पडल्या. मॉडर्न बेकरीला वळसा घालून वाण्याचं दुकान, पाणपोई, लाँड्री, पिठाची गिरणी, चित्राचं घर ओलांडून पुढे आल्या विनिता आई, रश्मी आणि चंदा. बऱ्याच दिवसांनी दोघी आई बरोबर नव्या वाटा, नवी जागा, नव्या गावात, नव्या उमेदीने  वाटचाल करत  होत्या. पाठीमागून  कोणीतरी हसत, हसत 😄 बोललं, “आरे,  आपल्या गावची लोकं संख्या वाढली रे”! आता रश्मी😩,  चंदान😀 एकत्र वळून पाहिलं. “ही, त्याच कॉलेज मधली मुलं आहेत जिथं मी एडमिशन घेतलय”. चंदा  हसून  😂 बोलली.  यर्नाळकर वाडा पार करून  तसच काही  पावलं पुढ आल्या दोघी  आणि   दत्त मंदिर पाहून आत शिरल्या. शांत होतं मंदिर.  फारसं कोणी नव्हतं मंदिरात. दत्त मूर्तीच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. प्रदक्षिणा घालून तिघी पुढे निघाल्या. सोनाली, रुपाली लेडीज गारमेंट 👚🎽👕👗👖आणि  स्टेशनरी  दुकानं ओलांडून, कुलकर्णी  पुस्तकालयात  पुस्तकं, वह्या, डिक्शनरी  आणि गरजेची 📄📝📒📖📕 स्टेशनरी घेऊन फुलवाल्याच्या दुकानात जाऊन फुलं आणि गजरे घेतले. लालभडक सुंदर गुलाब🌹🌹 खुणावत होते चंदला, “बेबीss, फक्त दोन रुपये,  हे घ्या!” त्यानं  गुलाब पॅक करताना चंदानं तीन गुलाब फ़ुलं पाहिजेत, असं मधली तीन बोटं उंचावून सांगितलं आणि स्वतःसाठी हातात  🌹 फुल घेतलं “अगोदर फोटो स्टुडिओमध्ये जाऊ.” 🎬🎞️🎥चंदा म्हणाली. स्टुडिओ मधून बाहेर पडून बाटा 👞👡👠👟चप्पलच्या दुकानात गेल्या. तेथून बाहेर पडल्या आणि मेडिकल स्टोअर मधून आईसाठी औषध  घेऊन घरी पोहोचल्या. 
 पाऊस सोहळा 
कॉलेज बस 🚌 कॉलेजच्या स्टॉपवर जशी थांबली, तसा एक एक विद्यार्थी बसच्या शेवटच्या पायरीवर उभं राहून छत्रीचं 🌂☂️☂️🌂⛱️🏖️ टक करून बटण दाबायचा. त्या बटण दाबण्यात एक लय असायची. रिपरिप 🌨️⛈️🌩️🌦️पडणाऱ्या पावसाच्या आवाजात टक, टक, टकची लय अशी काही मिसळायची की सुंदर गाण्याच्या  पार्श्वसंगिताचा ठेका तयार व्हायचा. 
 उघडलेली  छत्री ⛱️🏖️☂️🌂 डोक्यावर पकडून पावसापासून बचाव करण्याचा व्यर्थ प्रयत्न मजा😂😄
आणायचा. रंगीबेरंगी कपडे घालून  रंगीबेरंगी छत्र्या चालत असल्याचा भास व्हायचा.

बागेतलं प्रतेक 🌹💐🥀फुल, कळी, पान, ☘️🍀🌿🌱🥀वेली, झाड,🌵🌴🌳🌲🌾 आणि जमिनीचा प्रतेक भाग नैसर्गिक रीतीने  असंख्य बाहू पसरून “पाऊस”  या निसर्ग दानाचं स्वागत करत होता. कधी तळपणारा सूर्य🌞,  कधी शीतल चंद्र 🌙,  कधी आकाशात  चमकणाऱ्या असंख्य तारका🌟⭐️,  कधी लाल, गुलाबी भगव्या छटा धारण करणारं, कधी गडद निळ्या रंगावर सोनेरी काठ 🌪🌠🌤लेऊन वाऱ्या बरोबर हुंदडताना गडगडटानं  🌤भीती घालणारे  ढग,  🌈 कधी रंगीत कमानीचं इंद्रधनू लेऊन सजणारं,  कधी लखलखाट करून कोसळणारी वीज🌠,  कधी फिका निळा रंग लेऊन,  कधी पक्ष्यांचे थवे  कवेत घेऊन,  कधी गरुडझेपेला त्यांची भरारी 🦅🦅आणि  उंच वृक्षांना 🌴🌴त्यांची मर्यादा  🎄दाखवून   देणाऱ्या अनेक गोष्टीचा समावेश असलेल्या  आकाशात 🌀🪐🪐🌚 पसरलेल्या असंख्य काळ्या⬛ नभातून आनंद ⛈️🌨️🌦️🌧️ ठिबकतो आहे,  ज्याला आपण “पाऊस” मानतो. हा आकाशाचा आनंद बरसणारा सोहळा म्हणजे “घन💧💧 वर्षा”. आकाशा एवढा आनंद घेऊन “घन वर्षा” ⛈️⚡️ आपलं आणि आपल्या सहाद्याईंचं आयुष्य आनंदी बनवू दे. 🌹🙏आकाशाकडे पाहत काही थेंब चेहऱ्यावर घेतले रश्मीने.  चेहरा रुमालानं न पुसता तसचं चालत पुढे बस स्टॉप वरून जवळ असलेल्या शुभ्र कॉलेज बिल्डिंगमध्ये प्रवेश करायचा. तोपर्यंत कपडे पूर्ण ओले झालेले असतं. अंगावर पडलेले पावसाचे थेंब झेलत कॉलेज कन्या, उन्मिलित गुलाब कळ्यांची  🥀🥀🥀आठवण करून द्यायच्या.  “मामा, 🚌 बस कॉलेज बिल्डिंग जवळ घ्या. सर्वजण तिथंच उतरतील, पुढच्या फेरीपासून” कुलकर्णी सर बोलले. कंडक्टर मामांनी आपली जाडजूड मान हलऊन  होकार दिला. अकरावी पासून पदवी, पदव्युत्तरच्या सर्व विद्यार्थ्यांचेचं नव्हे तर सर्व स्टाफचे पण मामा होते. कॉलेजचे मामा  म्हणून ओळखले जायचे ते. एकदम गोलमटोल, गरगरीत मोठा देह पण हृदय मात्र प्रेमळ होते. जणू  सख्खा मामाचं … दोन हजार मुलांचा आणि प्रोफेसर मंडळींचा. मामांच वैशिष्टय हे होत की, आपल्या नोकरीच्या काळात सर्वात सुरक्षित 🚌 बस कंडक्टर म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले. आणि आता स्पेशली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देऊन कॉलेज बसवर  ड्युटी लावलेली. सेवेची बावन्न वर्षे पूर्ण झाली तरी मामा उत्साही होते अजुन.

खोडकर सरला ❗️आणी इतर मैत्रिणी  

वर्गातील 💃 राणी ही रश्मीला पहिल्या दिवशी कॉलेजला जाताना भेटलेली पहिली मैत्रीण, जी नेहमीच आवर्जून नवख्या रश्मीला मदत करत असे. काही वेळेस रश्मी, राणीच्या घरी जायची तेव्हा तिची ताई बास्केट, शो पीस, पडदे इत्यादींचे विणकाम, भरतकाम असं काही ना काही कला कुसरीच्या कामात मग्न असायची. राणीची आई आणि ताई नेहमी हसतमुखाने स्वागत करायच्या.  तशीच मंजू,  सरला, ललिता, नेत्रा आणि बऱ्याच मैत्रिणी बारावीच्या वर्गात होत्या. मार्केटमध्ये जाताना कींवा सई शाळेत जाताना बऱ्याच वेळेस मंजु, सई, चित्रा भेटायच्या. खोडकर सरला एकदम हसतमुख होती. बारावीचं वर्ष म्हणून सरला अभ्यासात मग्न असायची. ती बऱ्याच वेळेस विनोद सांगून हसावायची. तिच्या विनोदामूळं वातावरण हलकं फुलकं व्हायचं. तिला  पुस्तकं मोट्यानं वाचायची सवय होती.  जाड भिंगाचा चष्मा वापरायची. सरालाचे केस एकदम दाट, लांब सडक होते. तिच्या वेण्या एकदम जाडजूड असायच्या. कधी कधी गमंतीन ती आपल्या गळ्या भोवती वेण्या गुंडाळून म्हणायची, “वत्स, बोलो हम नागधारी भगवान शंकर, अती प्रसन्न है | आपकी  मागं अभी पुरी कर सकते हैं |  आपको क्या चाहिए बोलो !” सरलाचा एक हात आशीर्वाद देण्यासाठी उचललेला असे आणि दुसऱ्या हाताने चष्मा सांभाळला जायचा.  तिला कधी लहर आली की मुद्दामहुन सईला चिडवायची. “हां हां रश्मी आक्का अभ्यास करतं बसलेय ना? ती काय बाई स्कॉलर आहे?” चंदा काय करते? त्या नाही भाजी आणतं ? तू एकटी जातेस बाजारातं?” सरालाची चौकशी नेहमीची होती. घरी येऊन सई जसच्या तसं सांगायची. “ठीक आहे.  आईला मदत करते, जेवण बनवायला, असं सांग” चंदा, सईला  बोलली. लहानग्या सईला दुसरे दिवशी पिठाच्या गिरणीत सरला दिसली. सरला काही विचारायच्या आधीच सई बोलली, “सरला, रश्मी आणि चंदा आक्का अभ्यास नाही करत आहेत. त्या आईला स्वयंपाक करण्यासाठी मदत करत आहेत.” सईच  बोलणं  ऐकून  सरला जोरजोरात 😄🤣😅😇 हसायला लागलीं. पण त्यानंतर तीनं अभ्यासाबद्दल सईला कधी छेडलं नाही. पण सईला बघितलं की सरला गोडं हसायची. 🥰😍🤩

अभ्यासाच्या पध्दती 📖

आई विनिताच्या बहिणीचे दिर, जाऊ आणि मावशीची मुलगी त्याच गावात रहात होते. कधी मावशी भेटायला आली की आम्हा सर्वांना खूप आनंद व्हायचा. आम्ही मावस भावंडं आता सुट्टीमध्ये भेटू शकतं होतो. 
ऍडमिशन झालं पण राज्य बदललं तसा  सिलॅबस बदलला. आता बेसिक गोष्टी, कॉन्सेप्ट आणि अकरावी बारावीच्या अभ्यासातील लिंक समजून घेण्यासाठी रश्मीनं आकारावीचा सिलॅबस नजरे खालून घालवला आणि रेग्युलर अभ्यास सुरु झाला.  कधी मैत्रिणीची मदत घे, कधी कॉलेजमध्ये सरांना प्रश्न विचार अशा प्रकारे अभ्यास चालू होता. बरीच मुलं सर्रास गाईडचा वापर करायची. प्रकरण आणि कॉन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा मुलांकडून  उत्तरं पाठ करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जायचा. कॉलेजमध्ये आणि कॉलेजबाहेर सुद्धा अभ्यासाव्यतिरिक्त क्वचितच इतर विषयांवर चर्चा किंवा बोलणं व्हायचं. आता कॉलेज मधून ट्रान्स्फर सरटिफिकेट देण्याबाबत पुन्हा स्मरण देण्यात आलं आणि रश्मी पुन्हा तणावग्रस्त झाली. आता अभ्यासात कोणत्याही प्रकारे अडथळा नको होता. मुलीचा चेहरा आणि मन वाचू शकणार नाही ती आई कसली ? “तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, गरज पडली तर मी स्वतः  बंगळूरला जाऊन ट्रान्स्फर सर्टिफिकेट घेऊन येते त्या करता तुला आजिबात  टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही” विनितान दिलेले आश्वासन रश्मीला निर्धास्त बनवलं. काही मुलं ट्युशनला जायची. इंग्रजी बाबत मनात धास्ती दिसून यायची. कॉलेज सकाळचं असल्यामुळे चंदा आणि रश्मी सकाळी सात वाजता घर सोडायच्या आणि दुपारी परत यायच्या. आकराविला होणाऱ्या टीटोरियलसमध्ये मिळणारे मार्कस चंदाचा उत्साह द्विगुणित करायचा आणि  ती अजून मग्न होऊन अभ्यास करायची. मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर अभ्यासावर चर्चा व्हायची त्यामुळे चंदाच्या ग्रुपमध्येच बरेच प्रश्न सुटले जायचे. हुशार चंदाच निरीक्षण खूप चांगलं होत आणि स्मरणशक्ती पण जबरदस्त होती. आवडते विषय आणि मस्त मैत्रिणींचा ग्रुप होता. कॉलेज एंजॉय करत होती चंदा. आता कॉलेज सुरू होऊन साधारणपणे दीड महिना होऊन गेला होता. नेहमीप्रमाण रश्मी आणि चंदा कॉलेजला जाऊन आल्या. तर जिन्या जवळच्या घराचा दरावजा उघडा दिसला. नेहमी प्रमाणे जेवण करून आपल्या अभ्यासात रश्मी अणि चंदा दोघी व्यस्त राहून जमलं तर आईला मदत करतं होत्या. चंदा रात्री उशिरापर्यंत जगून अभ्यास करायची आणि रश्मी पाहटे उठून अभ्यास करायची आणि रात्रभर लाईट सुरूच राहत असे. पहाटे उठून विनिता चहा, नाष्टा बनवायची. अंघोळ, चहा, नाष्टा करून दोघी कॉलेजला गेल्या की सई विनिताआईला सर्व कामात मदत करायची आणि दहा वाजता ती शाळेत जायची. 
कॉलेजमध्ये मराठी पांडे सर शिकवायचे. मराठी विषय इतका प्रभावीपणे शिकवायचे इतके रेफरन्स द्यायचे की बस. विषय कौटुंबिक असो की, संसृतीक, राजकीय असो की सामाजिक, साहित्याचा कोणताही प्रकार असो, अगदी सहजपणे सद्यस्थिती आणि पुस्तकातील स्थितीची सांगड घालायची हातोटी जबरदस्त होती. साहजिकच सरांच निरीक्षण प्रचंड होत आणि त्याचा प्रत्यय रश्मी आणि वर्गातील सर्वाना प्रतेक लेक्चरच्या वेळी यायचा आणि शिकता, शिकता धमाल करायचे सर्वजण. आज पण तेच झालं.  नळ आणि दमयंती जेव्हा विलग होतात तेव्हा विरहाने दमयंती, आपण कश्या अवस्थेत आहोत आणि ते नळ राजाला कळावे म्हणून ती वेगवेगळ्या माध्यमाद्वारे निरोप पाठवत असते. “नमन माझे म्हणे अनीला, माझी वार्ता जाणवी नळा, लोटूनी आणा मज जवळी, श्रेय घेई जीवाचे, पक्षी हो तूम्ही पक्षिबळ उडोनी शोधा माझा नळ वार्ता सांगोनी शीघ्र आणा मजपाशी .” बोलता, बोलता बरेच संदर्भ देत होते सर.  अज राजा आणि त्याची पत्नी इंदुमती आणि इंदुमतीचा मृत्यु … आकाशात नारद विणा वाजवत विहार करत असताना त्याच्या गळ्यातील माळेमधील एक फुल पृथ्वीवर पुष्प वाटिका मध्ये विहार करत असताना इंदुमतीवर पडते आणि तिचा मृत्यू होतो. म्हणजे किती नाजूक होती इंदुमती❗️ त्यांची चाल पण हत्तीसारखी आणि कमर सिंहासारखी होती. सिंह कटी आणि गज गती म्हणतात त्याला. आता कशा असतात मुली सात- पाचची कॉलेज बस पकडायची म्हणून गज कटी मुली सिंहाच्या आक्रमकतेने बस पकडायला धावताना दिसतातं सकाळी ….. आणि  सारा वर्ग हास्यात डूबून गेला असतानाच बेल झाली आणि आम्हाला सर्वांना हसत ठेऊन सर निघून गेले. मानस शास्त्र असो की इंग्रजी, इकॉनॉमीक्स असो की पॉलिटिकल सायन्स सर्व लेक्चर्स रंजक आणि माहिती पूर्ण असत.

सर्व काही अभ्यासासाठी

“तुम्ही  बेनटॉन  गोळ्या घ्या. केलेला अभ्यास विसरणार नाही. त्यानं स्मरण शक्ती चांगली राहते.” ट्युशन टीचरनी सांगितलं आणि मुलांनी ऐकलं. परीक्षेच्या दृष्टीकोनातून जे काही चांगलं वाटायचं ते करायची तयारी असायची. जस जसे दिवस जाऊ लागले तस तसा परीक्षेचा ताण दिसून येऊ लागला. वेळेचं महत्त्व आणि त्याचा उपयोग आणि वेळेचं व्यवस्थापन आणि केलेलं नियोजन फलवृदिसाठी खुप महत्वाचं आहे ! हे नाईक सर, सावंत सर सांगायचे. आता संध्याकाळपासून रात्रीपर्यंत  कोपऱ्यावर मोठंमोठ्यानं वाजणारी गाणी आणि माणसांच  येणं जाणं वाढल्यानं  कॉलेज संपल्यावर मैत्रिणीबरोबर लायब्ररीत बसायचं आणि संध्याकाळी घरी पोहोचायचं हा अलिखित नियम झाला. रमजानच्या वेळी मध्यरात्री आणि  पहाटे अजानचा  आवाज आणि गाणं म्हणत बाबा मंजीलाचा दरवाजा ठोटावला जायचा त्यामूळं आपोआप जाग यायची. मदतीसाठी जणू सगळे सामील झाले आणि प्रयत्नाला सगळ्यांचा हातभार लागतं होता. काही लोक कर्मानं भेटतातं तर काही पुण्याईमुळे भेटतातं किंवा आपण काही कारणाने कोणाला आवर्जून भेटतो. असेचं काही देवदूत लहानपणापासून भेटत होते.  आपलं काम करून मनात घर कारत होते. संस्कार बीज पेरत होते, काही शिकवण देत होते, काही धडा शिकवत होते. पण त्यातून फायदाच व्हायचा. अशा  देणाऱ्या व्यक्तीचे  आभार कधी शब्दात व्यक्त केले जायचे. काहीच्या मदतीसाठी आभार व्यक्त केले गेले नाहीत. पण म्हणून त्यांचं योगदान कमी होत नाही. काही  पुन्हा भेटत, काही पुन्हा कधीच भेटले नाहीत. ‘नेकी करो और भुल जाओ’ म्हणून ओळखले गेले. संध्याकाळी  जेव्हा घरी पोहोचली रश्मी तेव्हा जिन्याच्या समोरच्या घरातून आवाज आला. “ता…., रो…. कुठं आहे? बँकेतून आल्यापासून दिसत नाही.”ह….? विचारत होते. कोण होतं हे ह…., ता….. रो…..? वाचा पुढच्या भाग – 23 मध्ये… 🙏🌹

12 Responses

 1. खूपच मस्त
  ते कॉलेज ते वर्ग ते कॉलेज कँटीन तो तलाव ते ढब्बु मामा पास पंच करायचे वाटतय लेक्चर ला जाऊन वर्गात पहिल्या बेंच वर बसाव अप्रतिमच सगळ!
  keep it up

 2. खूप छान….
  पावसाचं वर्णन तर अप्रतिम….

 3. खूप सुंदर
  खूपच सुंदर!
  आणखी विस्तारित लिहा.
  प्रत्येक प्रसंग. त्यांना त्यांची identity द्या वी. जेणेकरून आणखी सुरस लेखन वाचावयास मिळेल.

  1. नमस्कार 🙏💐🌹. आपल्या अभिप्रायाचा नक्की विचार करू.. आणि रश्मीच्या आयुष्यात कोणत्याही कारणाने प्रवेश करणारी पात्रं, प्रसंग, नैसर्गिक, आसनी मानवनिर्मित घटनांना आवश्य आयडेंटिटी देऊ. धन्यवाद. 🙏

 4. मॅडम मस्तच.
  अफाट कल्पनाशक्ती आणि वर्णन करण्याची कला तुमच्या लिखाणात जाणवते.
  तुम्हाला आलेले विविध जीवनानुभव आणि तुमची निरीक्षणशक्ती तुमच्या लिखाणात reflect होते.
  वाचताना बारीक तपशिलांमुळे तुम्ही आम्हाला त्या स्थळाची सैर घडवता.
  कॉलेज च वर्णन वाचल्यावर मला पुन्हा कॉलेजमध्ये as a student म्हणून जावसं वाटलं!😊😃

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More