वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🤾♀️
🎠🎠
कळत असल्या पासून, नकळतपणे, फुटले चक्र माझ्या दोन्ही पायांना,
🌀🌀🧿🧿 ✳️✳️👣
चालतेय गोल पृथ्वीवर 🌍🌎 कि,
फिरतेय माझ्या ध्येयाभोवती? 🚶🏻
नाही ना भरकटले, वाटेत? 🌈
नाही ना चुकला, रस्ता?🌈
कोण ठेवतय लक्ष्य?
चल तन, विचलित नाही ना
लक्ष्या पासून?
चंचल तारुण्य, भटकल नाही ना
ध्येय पासून? 💃💃
अवलोकन करते का सिंहा सारख? काही पावलं चालल्या नंतर
ऐटीत उभ राहून 🐅
की धावतच राहते ?
कधीच न थांबण्यासाठी.
चक्र🧿 लागलं चंचल मनाला,
लगाम मात्र ठेवला मेंदूच्या हातात,
भरकटल मन तर सांभाळणार तन.
भरकटल तन तर सांभाळणार मन.
अंमल मेंदूचा तना,मनावर,
नसेल गरज, तर, नको ! म्हणायला शिक;
अंमल मेंदूचा मनावर .
धावतंय मन, काबूत राहून,
आणि धावतंय तन,
काबूत राहून.
स्पर्धा नाही इतर कुणाशी, 🎠🎠
माझी स्पर्धा, माझ्या मनाशी,
माझी स्पर्धा, माझ्या तनाशी.
मना, तनाला नियंत्रण हृदयाचं,
आणि
तन, मन, हृदयावर नियंत्रण,
मेंदूचं,
म्हणतात तो (मेंदू) नाही भरकटत, तन,💃 मन, ह्रदया,❤️ सारखं …..
तना सारखं, वारं होऊन, वारं पित, स्वार होतं वाऱ्यावर..
मनासारखं, मनच होऊन, मनामागे, मनोवेगे धावडवतो
दिन गेले, महिने गेले,
गेली वर्षे चक्रावर,
🌀🌀🌀🌀🌀🌀
समजलच नाही मला अन् माझ्या सारख्या चक्रवीराना…
थांबला तो संपला ! म्हणत
न थकता, न शिणता.
धन्य मानतो धावत्या तनाला,
धावते मन माझे धन्य ते.
थांबत नाही हृदय !
अन् थांबत नाही मेंदू
जन्मल्या पासून, मरे पर्यंत
तेच तर तनाच अन् चंचल मनाचं ….
“चाल चाल बेटा,”…. 🐾🐾 म्हणताना पालक न कळतच,
देतात चक्र पायाना,☸️
देतात चक्र तनाला,☸️
चक्र मनाला चिकटलं☸️
चिकटलं चक्र विचारांना,☸️
…..
आणि सुरू होते
स्पर्धा निसर्गाशी,
स्पर्धा स्वतःशी,
स्पर्धा दुसऱ्याशी,
कधीच न संपणारी ..
?????????????????
आला विषाणू !आला विषाणू !
???????????????????
परीणाम पहा, परिणाम भोगा…
घेतली ताब्यात, सारी सूत्र.
धावण्याला लावली वेसण,
अन मन वारूला, केल स्तब्ध,
अन् तन गतीला, केलं स्तब्ध
निसर्ग चक्र सोडून इतर सारी चक्र,
स्तब्ध! ठप्प! गप्प! चुप्प!
चरण चक्र, गप्प!
तन वारू, ठप्प!
आणि फक्त
निसर्ग देतो चक्र हृदयाला,
निसर्ग देतो चक्र मेंदूला…
वापरा दोन्हीही आणि
आणि ऋणी रहा निसर्गाचे
अन् निर्मात्याचे
वेगावर ठेवा काबू,
👏👏👏👏👏
विषाणूचा होई पर्यंत नाश
विषाणूचा होई पर्यंत नाश…
रंजना कुलकर्णी राव
2 Responses
वास्तव जीवनाचे स्वप्न न०हे सूर्यप्रकाशा इतके सत्य कवितेत दिसते🙏
धन्यवाद नंदा मॅडम. एका वाक्यात मतितार्थ लिहिलात कवितेचा.🙏