नाही म्हणणार, “धन्यवाद” ना मानणार “आभार”

“आई,” शब्दाला खूप सारे पर्याय आहेत.  पण आईला पर्याय आहे का?   उत्तर स्पष्ट आणि दोनच अक्षरात देईन मी, “नाही.” मा जैसी इसलिये, ‘मासी.’ असं मावशीला म्हणतात. जवळ राहून  सांभाळणाऱ्या स्त्रीला “दाई मा” म्हणतात.  बाबाच्या “पराक्रमाने” घरात् आलेल्या बापाच्या दुसऱ्या बायकोला जबरदस्तीनं आई म्हणायला लावतात.  पण हे सगळे दुय्यम झालं.  ही माझ्या आई सारखी आहे.  हा माझ्या मुला सारखा आहे,  मुली साराखी आहे.  हे “सारखं,  सारखं” – सारखच राहत.  ते सा र ख …   खरं झाल तर… ❓️  
जन्मल्या नंतर बाळाच्या मुखातून बाहेर पडलेला हा अमृताहून गोड असलेला शब्द ऐकण्यासाठी प्रत्येक आईचे कान,  हृदय,  मन आणि आत्मा आसुसलेले असतात.  ते “आई” म्हणेल,  “अम्मा” म्हणेल, ताई म्हणेल, “मम्मी”, “मॉम” म्हणेल.  शब्द वेगळे उच्चार वेगळे पण भाव एकच. आई दोन्ही अक्षर स्वरच आहेत. उच्चरायला सोपा पण आचरण… प्रत्येक आईच जाणते.  


बाळ मुखातील, “आई”   शब्द ब्रह्म हे स्वर,   ओंकाराहून श्रेष्ठ नाद,    मान्य करिती सुर, असुर.


आपल्या पोटात एक जीव आहे आणि शंभर टक्के तो आपल्यावर आवलंबून आहे हे खूप चांगल्या पद्धतीने जाणून असते बाई.  बाई आणि आई  मधली रेषा पुसट होतं जाते आणि तेथे फक्त आणि फक्त आईच असतें. नाळेने  नाभीला जोडलेला जीव,  एका न दिसणाऱ्या बंधानं  एकाच वेळी हृदय, मन आणि आत्म्याला जोडला जातो ते फक्त आईला दिसत मनानं, पाहता येत डोळ्यानं आणि  जाणवतं पंचेंद्रियां पलीकडच्या इंद्रियांन. आणि बाळाला जाणवतात आईच्या स्पर्शातून. हे बंध  कालांतराने समजतात. बऱ्याच जणांना उमजतात.  काहीच जण आचरतात.  काही जण विसरतात.  काही जणांना विशेष करून बऱ्याच जणींना विसरवायाला भाग पडतात.


देव सर्वत्र जाऊ शकतं नाही म्हणून त्यांन पृथ्वीवर आई पाठवली म्हणतात. पण आई घडवतो तो बाळ असतो.   आपल्या गोड अवलंबित्वातून, पराधीनपणातुन  बाळ आणि आई मध्ये एक असं नातं तयार होतं आणि ते त्या उभयतांना माहित असत.  जन्म झाल्यावर एक गोड आनंदाची आणि एक नं कळणारी अति सूक्ष्म लहर असते, भावना असतें प्रत्येक आईच्या मनात. बाळाचं  मूर्त रूप समोर पाहून होणारा आनंद आणि दुसरी भावना, आता तो शंभर टक्के माझ्यावर अवलंबून असला तरी, तो एक स्वतंत्र जीव आहे. त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचा श्वास, हातापायांची हालचाल, आवाज, हुंकार, डोळे उघडुन पाहणं,  चेहऱ्यावरचे भाव,  शब्दांविना संवाद सुरु होतो. हवं नको पाहणं, ऐकणं,  शब्द ऐकणं स्वप्न पाहणं सुरु होतं. बाळाच्या स्पर्शाने दुधाचा पान्हा फुटतो तसं मनात वात्सल्य भावना जागृत होते. जी आईच्या अंतापर्यंत विश्वातील प्रत्येक आई जपत असते.  त्याच्या विषयी,  त्याच्या बाबत,  त्याच्यासाठी स्वप्न पाहणं खूपच छान. त्याच्या डोळ्यांत,  मनात स्वप्न निर्माण करून त्या मार्गावर सोडणं हे पण छान.  पण  आपण आपल्याशी त्याची सतत तुलना करत राहतो. आमच्या लहानपणी आम्ही असे,  तसें सांगत राहणे म्हणजे त्याच्या स्वप्नाला मर्यादा घालणे असं नाही का वाटत❓️ दुसऱ्या गुणवान मुलांशी तुलना करतो. आणि नकळत पणे दुसऱ्याच्या चांगल्या बाळासारखा व्हावे असं त्याला सांगत असतो. तशीच अपेक्षा करतो.  दडपण आणायचा प्रयत्न तर नक्कीच कारतो आपण. आणि हे विसरतो कि, प्रत्येक व्यक्ती वेगळी, संस्कार,  आवडी,  निवडी,   कुवत,  स्वप्न पाहणं, स्वप्न दाखवणं वेगळं असतं. मग आपण असं कस म्हणु शकतो ❓️ की, “तू त्याच्या सारखा / सारखी हो.” चांगले गुण आत्मसात कारण,  दुसऱ्याकडील सर्वोत्तम गुण आत्मसात करायला कसला आलाय कमीपणा?  पण आपल्याला  वाटत,  ” हिला दुसऱ्याच  कौतुक”   पण असं म्हणण्या मागची भावना, तळमळ लक्षात घेतली की, उद्देश समजतो. पण एवढे समजूतदार असतो का आपण?  मला वाटत हे समजून घ्यायला कमी पडतो आणि  नाकारात्मकतेकडे वळतो. जे खूप त्रासदायक,  धोकादायक आणि भविष्य बरबाद करणारे ठरते . म्हणून प्रत्येक पालकानं, पालकाची भूमिका सोडून कधी सवंगडी,  कधी मित्र, कधी सखा,  कधी गुरु, कधी मुलाच्या भूमिकेत शिरून पहाण आणि ते पण आपली भूमिका वेळेवर बदलून, इतर भूमिकेत शिरणं फार गरजेचं आहे.  स्वतंत्र व्यक्तीच्या जीवनात सतत डोकावण चांगलं नव्हे तसेच त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पण चांगले नव्हे. आपण आपल्या मुलांना न  विचारता दोन गोष्टी कारतो. एक त्याला न  विचारता जन्म देतो,  दुसरं  त्याचं नाव ठेवतो. प्रत्येक पालकांकडून घडत आलेलं वैश्विक सत्य. सारं स्वताःसाठी करत असतो.  पण मग सुरु होते मालिका. आईनं तुझ्याचसाठी हे केले,  बाबांनी इतके कष्ट घेतले आणि नकळत बोजा लादतो मुलावर. त्या पाठीमागे हेतू हाच असतो की, कष्टाची जाणीव असावी.  


या सगळ्या पलीकडे जाऊन आपण आपल्याला शरीर, मन, संस्कार,  शिक्षण, अचार,  विचार सर्वार्थाने पूर्ण  माणूस बनवणाऱ्या आईला कोटी कोटी प्रणाम करूया. तिनं सर्वार्थानं स्वावलंबी बनवलं.  तिनं मला यशस्वी मुलगी बनविली. आज जे आहे ते फक्त आणि फक्त्त तिच्या मुळेच.  आई नेहमी तू देतच आलीस, देत आहेस आणि देत राहणार. तुझी ओंजळ नेहमी भरलेली आणि दातृत्वाची आणि आमची तुझ्या ओंजळीखाली हात पसरलेले, दान घेण्यासाठी.  मी, तुझा विसर पाडूनये  असं म्हणणार नाही.  तू आज आठवलीस असही म्हणणार नाही. तूच माझं तन, अन तूच माझं मन,  तूच माझं हृदय अन हृदयाची धडधड.  अन तूच आत्मा जोडलेला परमात्म्याला. तूच माझा श्वास अन उच्छवासही तूच. मग सांग बर,  मी माझं मन,  हृदय,  आत्मा अन परमात्म्याला,  श्वासाला विसरेन का?  अन विसरले तर पृथ्वीवर असेन का? 


तुझ्यातुनच  तयार झालेलं हे तन,  हृदय, मन, आत्मा दातृत्व तुझचं,  मी लहान असताना बोबडं बोलून,   लहान झालीस माझ्या बरोबर.

तू वाचायला शिकवलंस,  शिकवलंस तू लिहायला,   आईच्या भूमिकेतून गुरु झालीस तू,  पुस्तकाबरोबर चेहरा अन त्या वरचे  हावभाव वाचायला शिकवलंस. 


 माणसातला माणूस,  अन हिंस्र वाघ,  लांडगा, भुंकणारा कुत्रा, तरस ,  सरपटणारा प्राणी अन डंख देणारा विंचू, माणसांच्या जंगलात अचूक ओळखायला शिकवलं तू.  
जपून पाऊल टाकायला शिकवलंस, 

  जपून पाऊलं टाकायला शिकवलंस शिकवलंस हसायला, खेळायला अन,  जीवनाकडे खेळकर दृष्टीने  पाहायला,  शिकवलंस मन मोकळ जगायला. 


ओंजळ नेहमी भरलेली,  आम्हा हाती,  राहिलीस ओतत सातत्याने, श्री कृष्णाने  द्रौपदीला दिलेल्या साडीप्रमाणं,   शेवट नसणार, अ मलीन तलम वस्त्राप्रमाणे. 


उत्तम आरोग्य दिलंस तू, दिलेस सुंदर बालपण, स्वप्न मनात,  स्वप्न डोळ्यात, स्वप्न हृदयात पेरलेस तू, त्या दिशेने   नअडखळता शिकवलंस चालायला. 


जीवन सुंदर अन अमूल्य असून,  माणसाशी, माणसासारखं नातं विणायला,   शिकवलंस सारं काही जे, जे हवे जिवनी,   आणि नकळत शृंखला तोडलीस. 


देह ठेवला पृथ्वीवर,  कार्य तुझ संपलं म्हणून,  आम्ही आकाशाकडे डोळे लावून पाहतो,  बाप्पाच्या घरात तुला कोणीही, “बाजूला सर” म्हणणार नाही निजधाम मिळालं तुला


मी म्हणणार नाही,  कितीही इच्छा झाली तरी,  “घे जन्म तू फिरोनि,  येईन मीही पोटी ”  अजून स्वार्थी होणार नाही,  नाही म्हणणार,   “धन्यवाद, अन “आभार” ही मानणार नाही.. 


नाही व्हायचंय मला मुक्त,  तुझ्या ऋणातून, जगू दे कणकण ऋणात अन्  मण मण ऋणात,  आणि संपूदे मला,  ठेऊन स्वतःला मातृ ऋणात, सदैव तुझ्याच ऋणात, मी तुझी ऋणी, त्रिवार ऋणी 🙏🙏

रंजना कुलकर्णी राव

10 Responses

    1. नीलिमा मॅडम धन्यवाद. आपण दिलेले अभिप्राय शिरोधार्य 🙏🌹

  1. खुप छान शब्दांकन केलेय.
    तोड नाही. तुमच्यातील साहित्यिक जागा करण्यासाठी “आई” हा शब्द पुरेसा आहे, हे कळले. माझा सलाम आहे तुम्हाला. सर्वच आयांना तुम्ही शब्दबद्ध केलेय. त्यामुळे प्रत्येकाला वाचताना आपल्या आईचे दर्शन होते. अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More