संथ, साथीच्या प्रवासात
टर्निंग पॉइंट होता वजा
जीवनात एकाकी चालण्याची
होती दुर्दैवी सजा ||१||
वळणावर मी होते वाट चुकले,
मम साथीस मी कायमची मुकले,
जाणले तेव्हा वेळ होती
टळलेली,
बऱ्याच दुर्दैवी जीवांनी वाट होती मळलेली|२|
मी पण चरफडत,
त्यांच्या सारखीच धडपडत,
अर्धवट एकाकी प्रवास,
चालले आहे तडपडत||३||
थकले मन अन् आंबले तन,
न संपणारी वणवण,
कोण आपले? कोण दुजे?
कशाची ना मज जाण || ४||
एकाकी पणाचा अंत नाही,
संपेना संथपणा; दिसेना काही,
का चालतोय? का धपडतोय?
याला काही उत्तर नाही||५||
अचानक हुशारी आली,
झापड ग्लानी विरून गेली,
डोळे उघडून पाहिले तर….,
सर्व सृष्टी आनंदमय || ६ ||
अचानक पुन्हा टर्निंग पॉइंट
चिन्ह मात्र होते बाकी,
प्रिय माझ्या साथी सोबत,
मी पण आता सदैव सुखी ||७||
————————————————————————
5 Responses
Theeeeeee Bestttt
Tahaaank youuuuu dinesh .
आपल्या अभिप्राय बद्धल मी ऋणी आहे .
आपले अभिप्राय मला पुढील गुणवत्तापूर्ण साहित्य आणि काव्य निर्मितीस प्रेरणा
देतील .
धन्यवाद.
Like!! Thank you for publishing this awesome article.
धन्यवाद,🙏