“तू सदा जवळी रहा ….” भाग – ३

रंजना राव यांची … “तू सदा जावळी रहा …”
भाग १. रश्मी, एक आई, बायको आणि नोकरी करणारी महिला सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी धडापडत असताना दिसते. देवघरात तिला प्रसन्न वाटत . पण वास्तवता वेगळीच दिसते .

भाग २. रश्मीच्या बलमैत्रिणीची भेट, राजेश चे प्रताप, रश्मीच्या आईची चिंता, आणि पंचविशी ची रश्मी , कॉलेज ला जाणारी रश्मी …
आणि आता

” तू सदा जावळी रहा ….

भाग – ३ कॉलेज मधील मोकळा स्वभाव नडला❓️

अशी कोणती घटना घडली ज्या मुळे रश्मीच्या स्वभावात गांभिर्य आलं ?

का आठवली ज्योतीला आपली बाल मैत्रीण?

भाग -3

कॉलेज मधील मोकळा स्वभाव नडला❓️

             आणि इकडे रश्मी गेलीच भूतकाळात.. ते कॉलेजचे दिवस, नव्या मैत्रिणी, नवे क्लास, तालुक्याच्या ठीकाणी शिफ्ट होणं. अवखळ वय आणि मैत्रिणींवर भरोसा, गावातला वागण्यातला मोकळेपणा तसाच ठेवला तिनं. तिला थोडी पण शंका आली नाही की, तिच्यावर कोणीतरी पाळत ठेऊन आहे. कोणीतरी तिचा पाठलाग करतय.

एक दिवस मैत्रिणीँ च्या आग्रहाखातर जवळच्या यात्रेला गेली. तेव्हा तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या पाठी आहे. तिने शेवटी संध्याकाळी घरी पोहोचताना मैत्रिणीला स्पष्ट विचारलं.
“अगं ते तर रोज पाठलाग करतात तुझा…… ” अनवधानाने मैत्रीण बोलून गेली, मग मात्र जीभ चावली तिने. हळूच एक डोळा बारीक झाला तिचा. रश्मीला किळस आला तिच्या वर्तनाचा. रागातच तिनं घरं गाठलं. आईला पाहिल्यावर हुंदका अनावर झाला रश्मीचा. प्रथम तिनं आईला सर्व कल्पना दिली. स्वतःचे मन हलके केलं. पण आईचं काय? तिला कोण धीर देणार.
          दुसरे दिवशी कॉलेजला, क्लासला, मंडई मध्ये जाताना तिची खात्री झाली, मोटर बाईक वरून कोणी तरी तिचा पाठलाग करतयं. आता ती, आई किंवा बहिणी बरोबर मार्केट मध्ये जाऊ लागली. पण पाठलाग करणाऱ्याची भीड चेपली. अति झाल्याने रश्मीनं निषेध म्हणून, त्या व्यक्ती कडे पाहुन झोरात थुंकली आणि बोलली, “कुत्र्या सारखे पाठलाग काय करताय?” हे करताना तिचं सर्वांग रागानं थरथरत होतं. तिला माहित नव्हता याचा काय परीणाम असेल.

आता कॉलेज, क्लास आणि घराच्या बाहेर कुठंही जाताना बऱ्याच बाइक्सचे आवाज यायला लागले. बाइक्सचे आवाज खूप जवळून यायला लागले. रागाची जागा भीतीने घेतली. रात्री झोपेत अस्वस्थ होऊन तळमळू लागली रश्मी. भीती हळुहळू कोश आवळत होती तिच्या भोंवती. अभ्यासातून लक्ष्य उडाले तिचे. सगळं हसरं घर गंभीर झालं. ….

    विनिताने ओळखिच्या काकूंकडे मदत मागितली. कुसुम काकूंनी जे सांगितलं ते ऐकून बधिर झाली रश्मीची आई. “विनी, हे हलकट, नीच लोक पोरींबाळींना नासवतात आणि ह्या निरागस पोरीबाळी आड – विहीर जवळ करतात. “कानात उखळतं तेल टाकल्याची वेदना झाल्या विनिता आईला. मती कुंटीत झाली विनिताची. पुढचे शब्द ऐकायला येत नव्हते आईच्या ह्रदयाला. तु रश्मीला इथं ठेऊ नको. ताबडतोब हलव तिला इथून.

स्वावलंबी, स्वाभिमानी विनिताला नियतीनं पुन्हा आसवं दिली. पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलींना वाढवताना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं होत; हे फक्त तिलाच माहीत होते. पतीच्या निधनानंतर आपल्याच लोकांनी फिरवीलेली पाठ, वाढविलेल्या अडचणी, कोर्ट प्रकरण ई. मध्ये परत नवा पेच निर्माण झाला. कोणाकोणाची मदत घ्यावी लागली विनिताला. विचार करून करून काळवंडली विनिता. जुने आजार तोंड वर काढू लागले. दिर व जावेला आणि नातेवाईक यांना विनवण्य…करून मागितली मदत. आणि रश्मीचे सर आले धाऊन मदतीला. केदार काका म्हणजे विनिताने विकलेल्या मळयाचे नवीन मालक आले मदतीला आणि रश्मीने गाव सोडला. प्रत्यक्षात एक दिवसही आई, बहिणींना न सोडणारी, ज्योती, वैजू या मैत्रिणी बरोबर असणारी रश्मी नेमकी इतकी का रडत होती ते केदार काकांना कळेना. आश्रु वहात होते गालावरून … मोठ्याने बाजूच्या कर्ण्यातून येणाऱ्या गाण्याच्या शब्दाने हुंदका बाहेर पडला. ” हम तो चले परदेस, हम परदेशी हो गये sss.

रश्मीच्या स्वभावात गांभिर्य

         केदार काकांचे शब्द कानावर पडल्यामुळे ती सावरली. काकुळतीला आले ते आणि कन्नड मधून म्हणाले , “आक्का गोळरी अळब्याडरी. ” (कन्नड मधून “आक्का जी, रडू नका.” ) आईची अशी केविलवाणी अवस्था करण्यास आपण जबाबदार आहोत, ही टोचणी मनात होती रश्मीच्या. तिच्या स्वाभिमानाच्या आड आपण येतोय हे समजण्या इतकी मोठी नक्कीच होती ती. आईची आपल्या तिघिंच्या शिक्षणासाठी चाललेली धडपड दिसत होती तिला. आईला कामात मदत करावी, तिला आपला भक्कम आधार द्यावा हे जमलंच नाही रश्मीला. इतर लोकांसारखे आपण तिच्या अडचणी वाढविल्याची बोच घेऊन बाहेर पडली रश्मी … विचार विचार विचार ……..

सुटेल का गुंता विचारांनी ?
धुवेल का कर्म विचारांनी ?
मिळेल का उत्तर विचारांनी ?
का भोग हे मम मातेच्या जीवनी ?

           विनिताच्या जीवन वाटेवर खडतरपणा पेरून ठेवलेला होता. फक्त आणि फक्त खडतर जीवन.

आईच्या जिद्दी स्वभावामुळे साऱ्या गावातून आणि नाडकर्णी कुटुंबातून कॉलेजला जाणारी रश्मी एकमेव मुलगी होती.

तिला वाटाणे गुरुजींचं वाक्य आठवल,” बाकी कोण किती शिकेल माहीत नाही. पण रश्मी खूप शिकेल, पुढे जाईल.” रश्मीने मनानेच गुरुजींना नमस्कार🙏 केला . गुरुजींचा हा विश्वास, रश्मीच्या आईच्या, म्हणजेच विनिताच्या जिद्दीला बळकट करणारा आशावाद होता. तिला आईंन सांगितलेला किस्सा आठवला. पहीलीमध्ये असताना कील्लेकर नावाचे शिक्षण अधिकारी शाळा भेट आणि तपासणीसाठी आले होते.

इतर मुलांनी, रश्मी सारखं स्वच्छ, टापटीप, नीटनेटक राहावं” असं सर्व मुलांना सांगितलं होत. आईला, हे रश्मीला सांगताना कित्ती आनंद झाला होता. एक हाती मुलींना सांभाळताना, संस्कारी बनवताना, विनिता साठी कामाची पावती होती. तिचं मन आणि हृदय आनंदाने भरून आलं होतं. आपल्या तिन्ही मुलींचे असेच कौतुक व्हावे, शैक्षणिक प्रगती व्हावी अशी प्रार्थना केली विनिताने.
आपल्या हट्टापाई आण्णा काकांनी लिहून दिलेले भाषण रश्मीने, मोठ्या संजू आक्का कडून शिकून घेतले आणि स्वातंत्र्यदिनी बोबड्या बोलात बोलली पण … बरेच दिवस तिची आक्का आणि दादा तिला चिडवायचे.

बाल मैत्रीण

रश्मीला शब्द आठवले. “…….. आपण मोठ्यांचा आणि आपल्या देशाचा मान राखला पाहिजे. खूप खूप अभ्यास केला पाहिजे …( आपल्या मोठ्या ताईच्या मैत्रिणीकडे पाहून ) कळाले का गंगा? कळाले का यमुना? जयहिंद‼,” आणि आपला छोटासा हात हवेत उंचावला. बोबड्या बोलानी केलेल्या भाषणाची मग आवर्तनं झाली. हळदकुंकू समारंभ, गावच्या सरकार, वहिनि साहेब, शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांनी केलेले भाषणाच कौतुक सांगताना विनिता आईचा आनंदाने, कौतुकाने खुश झालेला चेहरा आठवला.
           रश्मीला आपली आई म्हणजे दैवतच होते. आदर्श, प्रेमळ, मूर्तिमंत देवीच होती तिची आई. आईन सांगितलेली कोणतीही गोष्ट टाळत नसे. आईभक्तं होती रश्मी. वडिलांमागे आईने कष्टाने वाढविले होते. भावनिक गुंतवणूक होती. त्या मागचे कारण सर्वांना माहीत होत.

          छोट्या काकांचं गाव आलं तस केदार काकांनी हाक मारली ( रश्मी आक्का उर बंत री … ) गाव आल जी.

पण आता पुढे काय?

कोठे गेली रश्मी आईला व बहिणींना सोडून? गावातून बाहेर पडल्यामुळे रश्मीच हरवलेलं मनःस्वास्थ्य परत मिळाले का?

वाचा पुढील भागात.

रंजना कुलकर्णी  राव

6 Responses

  1. धनयवाद मॅडम नंदा . आपले मत मला भविष्या मध्ये उत्तमोत्तम लिखाण करण्यास प्रेरणा दायक असेल.
    पुनश्च आभार .

  2. धन्यवाद. आपलं मत भविष्यातील चांगल्या साहित्य निर्मिंतीस प्रेरणादायी ठरेलं.

  3. Very engrossing, emotional story with simple, lucid language. Leaving the reader with a yearning to read non stop till the end.

      1. Maam sujata, आपण दिलेले अभिप्राय मला उत्तम लिखाणासाठी प्रेरणा देतील. धन्यवाद. 🌷🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More