Narmada parikrama Gujrat 2

आणि आम्ही परिक्रमा पूर्ण केली …

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

“आवो म्हारा गुजरात मा”,…. अशी महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी दिलेली हाक ऐकून वाटायचे चला गुजरातलां निघुया . दयानंदना त्यांचे मित्र श्री संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या श्री. प्रमोद केणे काकांचे , “दिव्यात्वाची जेथे प्रचिती” हे पुस्तक पुष्प वाचले . त्यातील काही प्रकरणांची पारायणे केली . परंतु दत्त पादुका दर्शनासाठी इतकी बिकट वाट मनाला रुचत नव्हती . सर्व खेळ मनाचे . शरीर साथ देईल का ? हा प्रश्न मनात आला . प्रत्यक्षात असे प्रश्न यायला नकोत . जेथे ओढ असते तेथे मन खोड काढत नाही . जिथे मन ठरवते की एखादी गोष्ट करायची तर शरीर साथ देते . पण वाटले की , नरसोबा वाडीला ( कोल्हापूर जवळ) जाऊन श्री दत्तचरणाचे दर्शन घेतले की, मन प्रसन्न आणि तन ऊर्जा घेऊन परतत असे . वाडीचा प्रवास सुरू झाला की, मन केव्हाच पोहोचलेलं असायच प्रवेशद्वारा पाशी . एक एक पाऊल पुढे टाकताना पेढ्यांच, अगरबती – कापूरचा सुगंध , नारळाचा ढीग , औदुंबर वृक्ष, कुंकू- हळदीचे ढीग सार मनचक्षू समोर दृश्य उभ राहात असे. कृष्णा नदीत हस्थ, पाय प्रक्षालान करून एक एक पायरी चाडून दत्त पादुकांचे दर्शन घेत असे . स्वामी आत्मबोधlनंद सरस्वती या गुरूंनी सांगितलेल्या मानसपूजे द्वारे कित्तेक वेळेस मनानेच वाडीला जात असते मी 👣. ध्यानी , मनी , स्वप्नी, “श्री गुरुदेव दत्त”, असे नामस्मरण ओघानेच येते .


परंतु आता गिरनारवरील पादुका दर्शनाची ओढ लागली . गुजरातला भेट देण्याची संधी मिळाली . फक्त 5, म्हणजेच अगदीच मर्यादित दिवसांसाठी पण अमर्याद उत्साह 💃💃 घेऊन आम्ही 12 लोक निघालो. 17 ते 62 वयोगटातील लोकांचा समूह . साने दाम्पत्य , रेश्मा आणि प्रशांत कुटुंबिय, आणि इतरांबरोबर निघालो आम्ही. कोणी नोकरीवाले तर कोणी व्यवसायवाले एक तर चक्क विद्यार्थी … .. . अर्चितच्या युवा-ऊर्जा शक्तीला सलाम .. आमचे लीडर श्री दिनेश हे माझ्या नावऱ्यlचे मित्र … खास नियोजन करून सर्वांशी सुसंवाद साधत होते . वैभवी व दिनेश हे आम्हा सर्वांना वेगवेगळी माहिती देत, आमचा उत्साह वाढवत , ज्ञानात भर टाकत होते . परिक्रमेत एणाऱ्या महत्त्वाच्या टप्यांबाबत , माहिती घेऊन मनाची तयारी झाली …..

आता वेळ आली प्रत्यक्ष परिक्रमेची . पायात स्पोर्ट्स शुज, गुडग्याना टोप्या (नी क्याप ), हातात बांबूची काठी व विजेरी घेऊन नर्मदे हर हर, जय गिरनारी जयजयघोषात , ओम श्री गुरु देव दत्त 👏 अशा नामस्मरणात आम्ही १२ जण दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता चालू लागलो. (काही लोकांकडून अकारण मिळालेली नकारात्मक ऊर्जा दूर फेकली ज्यांच्या मते परिक्रमा खूप अवघड असते आणि मनाचे खच्चीकरण करणारी माहिती देतात काही लोक. ) पूर्ण मनाची तयारी झाली होतीच पण थोडे टेनशन घेवून . देवाचे नामस्मरण, नैतिक धैर्य वाढवत होते. देव मनात , देव तनात , देव श्वासात , देव आसमंतात आणि ओढ परिक्रमा पूर्ण करण्याची जशी माणसांची नदी 🏃🏽‍♀🏃🏽‍♀🏃🏽‍♀🏃🏼🏃🏼🏃🏼 एका तालात वाहत होती .. डोंगर चढ – उतार , अगदीच निमुळता रस्ता, काही ठिकाणी खडकाळ रस्ता तर काही ठिकाणी चांगली पायवाट , काही ठिकाणी पावसामुळे अद्याप रस्त्यावर छोटे छोटे झरे वाहत होते. प्रथम बूट व सौक्स भिजले म्हणून थोडी हिरमुसले 😢.पण त्यामुळे पाऊलlना कोणताही त्रास झाला नाही . एका ठिकाणी शेकोटी 🔥पाहून बैठक ठोकली आणि गरमागरम चहा 🍵, बिस्कीट , कचोरी , गोड वाड्यावर ताव मारत असताना काही जण सोबतच्या काठीवर ➖➖➖➖🧦 सॉक्स टाकून शेकोटीवर सुकाविले … आणि पुढील परक्रमा सुरू झाली . कधी लिंबू सोडा 🍋, सरबत , नारळपाणी आणि सोबतचे इलेक्ट्रॉलचे पाणी पित- पित , काली मातेचे 👏दर्शन घेतले .


शिव मंदिराजवळ नागा साधू मोठ्या प्रमाणात होते . आम्ही ग्रुपने एकत्र पुढे निघालो …
तीनही डोंगर चढ उतार पूर्ण केले . आता रस्ता सरळ होता . आमच्यापैकी काहींनी वाफाळलेला ढोकळयाचा, उसाचा रस ई. आस्वाद घेत विश्रांती घेतली . छोटा अर्चीत परिक्रमा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बसला होता.


आणि आता शेवटचा टप्पा सुरू झाला . बोरदेवीचा टर्न सोडून आम्ही आता चालत चालत बाहेर पडण्याचा रस्ता पकडून संध्याकाळी 5 वाजता बाहेर आलो आणि हॉटेल वर येवून श्री गुरुदेव दत्त म्हणून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो . आणि अशातऱ्हेने आमची गिरनार परिक्रमा पूर्ण झाली. जय गिरनारी ! जय गिरनारी ! नर्मदा हर!👏👏


इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time

कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems

नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇

This image has an empty alt attribute; its file name is vratwork-logo-1.png

Artwork by VRatwork
Follow on Social Media:


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग – 53* अर्थात स्थित्यंतर पुर्व स्थिती

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

चिऊ आई🐤🐤

आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई  आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसून,करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 44 दादा, आजोबा भेट आणि ऍंथोनी मामा ❓️

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी, देवघरात 🕉️ 🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई; 

Read More

” तू सदा जवळी रहा…” भाग – 52

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More