भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोऱी .. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 33* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
भाग – 34* बोबडकांदा …, मीच शहाणी झाले❗ मीटिंग , स्ट्रिक्ट टिचर
भाग – 35* वाचन❗️ वाचन ❗️ पावभाजी, इंटरव्ह्यू.
भाग – 36* भेटवस्तू – संकेत‼️ देवी माँ, नाटकी रश्मी ❓️, सई का नाचली ❓️
भाग -37 * काय मिळालं साडेचार वर्षात.. ❓️विचार मंथन, स्वामी आणि विंचू, रश्मीच्या किंकाळीने काय साधले ❓️
भाग – 38* क्षणचित्रे, दीदी ती दीदींच, कार्यालय आणि बरंच कांही, लोकल, फेरीवाले आणि किन्नर, लोकल मधील प्रसाद, “रश्मी नाडकर्णी इथंच राहतात का?” पोलीस….
भाग – 39 * साठी नंतर पण…., खरेदीचा उत्साह, अष्टलक्ष्मी व्रत उद्यापन 🙏🌹
भाग – 40 * मार्गशीर्ष, तुम्ही पूजेची तयारी करा मॅडम❗️, भेदाभेद अमंगळ, “आकाशात पतितं तोय्ं….” 🙏
भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, का… मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्कस् , मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, ऍंथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळं मिळालं❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बाल दिन ❗️
भाग – 46* ‘… मुखssडा दिखा दो’ असं तो कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा गणपती❓️मानो ❗️या न मानो❗️
‘.. मुखssडा दिखा दो|’ तो कोणाला म्हणतो ?
रश्मी गावी गेली आणि आपल्या ठराविक मैत्रिणींना भेटली नाही असं होणारच नाही. राणी तिची खास मैत्रीण ❗️राणी – रश्मीचा फक्त काही काळाचा सहवास होता पण मैत्री इतकी घट्ट की, राणीला भेटलं नाही तर गावी गेल्याचा फील नाही यायचा. काहीतरी चुकल्यासारखं वाटे. प्रशस्त घर होतं राणीचं. राणीची मोठी बहीण कलाकार होती. अक्का काही गोष्टी अशा बनवायची की बस पाहतच राहावं ❗️ कोणी शो पीसची ऑर्डर देई, कोणी रुखवताची, कोणी बास्केट, बॅग, पडदे, द्राक्षाचे घोस, कोणी वॉल पीस असंख्य कलाकृती राणीच्या अक्काच्या नाजूक बोटातून साकारत असतं. त्याचं अक्काने, रश्मीला अगदी आनंदाने बास्केट विणायला शिकविले होते. अक्काने रश्मीला बी. एड. ला असताना लोकरीची शाल वि णायला शिकविली होती. अक्काची बोटं लाल; लोकर बरोबर अशी काही सरसर फिरायची की बस. दोनच दिवसात मस्त शाल तयार झाली होती. अशी ही अक्का आणि राणी दोघीही पिक्चरच्या शौकीन. रश्मीला सहा, सात वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.
एस. वाय. च्या परीक्षा संपल्या होत्या. रिझल्ट येण्यासाठी अजून बराच अवकाश होता.
सुट्टीत घर कामात मदत करणं, साफ – सफाई करणं, पेपर वाचण्यासाठी लायब्ररीत जाणं, वाचण्यासाठी पुस्तकं आणणं अशा काही ना काही गोष्टी चालू असत.
शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी अजून, खूप वेळ होता.
नेहमीसारखं आज रविवारी रश्मीला, मैत्रिण राणीला भेटायचे होते.
“आई, मी राणीला भेटून येतेय”, रश्मी; विनिता आईला सांगून निघाली. राणीची अक्का, जमिनीवर सतरंजी टाकून बास्केट विणत बसली होती. राणी तिच्या आईला स्वयंपाक घरात मदत करत होती. राणीची छोटी बाहीण नुकतचं मार्केटमध्ये जाऊन अक्कासाठी तिच्या कामाच्या काही वस्तू आणि भाज्या, फळे घेऊन आली होती.
“ये रश्मी, बैस इथं. कशी आहेस ❓️” अक्कानं हसत स्वागत केले आणि जवळ बसण्यासाठी सतरंजीवरील जागेकडे निर्देश केले. अक्काच्या नाजूक बोटांच्या विणीतून सुंदर बास्केट तयार होत होतं.
“रश्मी, सुट्टी आहे ना गं तुला❓️” अक्कानं बास्केट वीणताना वायरचा लांब धागा फिरवता, फिरवता विचारलं.
“हं, होय अक्का; सुट्टीच सुरु आहे. आज रविवार, त्यामूळे लायब्ररी पण बंद आहे. माझ्या जवळचं लायब्ररीचे पुस्तक पण वाचून झालय. बोला नं अक्का, काही विशेष आहे का आज❓️” रश्मीने राणीच्या आक्काला विचारले.
“रश्मी, अगं राजश्रीला, “एक फूल दो माली” नावाचा पिक्चर लागलाय. त्यामध्ये सुंदर गाणी आहेत. ‘ए परssदा हटा दो, तेरा मुखssडा दिखा दो’ आणि, ” तुझे, सूरज कहूँ या चंदाss, दीsssप कहूँ या ताssराsss , मेरा नाsssम करेगा रोशन…..” अक्काने दोन्ही गाणी तालात गुणगुणली. “आज, तीनच्या शो ला जाऊया का ❓️” अक्कानं अगदी स्पष्टच आणि वेळ न घालवता विचारलं. रश्मीजवळ नाही म्हणण्यासाठी काही कारण नव्हतं. “आईला सांगायला हवं” रश्मी पुटपुटली.
“तीनचा शो आहे. दोन सव्वादोन पर्यंत निघू शकतो,” मैत्रीण, राणी उत्साहने बोलली. अशा वेळी रश्मीला अकरावीला असताना आईला न सांगता पाहिलेला अमिताभ बच्चनचा, “याराना” पिक्चर आणि त्यानंतरचा प्रसंग हमखास आठवे. रश्मी विचारात असताना राणी बोलली,
“चल रश्मी, तुझ्या घराशेजारीच, मला शीतलच्या दुकानात पार्सल द्यायला जायचं आहे. तू , विनिता काकूंना विचार मगचं पिक्चरचं ठरवू.” राणीने रश्मीच्या मनातील संदीग्धता दूर करण्यासाठी मदत केली. रश्मी आणि राणी दोघी बाहेर पडल्या. ऊन, मी म्हणत होतं. परंतु पिक्चर पाहायला जायच्या उत्साहामुळे, उन्हाची प्रखरता सौम्य वाटली.
“हं, आईच्या परवानगीने पिक्चर पाहायला गेले की, मला बरं वाटेल. कमीत कमी तिला अगोदर सांगायलाच हवं.” रश्मी बोलली.
आता दीड वाजून गेला होता. रश्मी जेवून तयार झाली तसा, “रश्मी चल, लवकर निघू.” खालून राणीने आवाज दिला.
आणि तिघींनी राजश्री थिएटर गाठलं. रश्मीला, “एक फ़ुलं”, शब्द प्रयोग गोंधळात टाकणारा वाटला. पण दोन्ही गाणी कर्णमधुर होती.
संजय, साधनांच ‘परदा हटा दोss’ हे उडत्या चालीचं गाणं मस्तच होत.
कित्येक वर्षानंतर आज
रश्मीला, राणीच्या घरी जाताना, सुट्टीत राणीची अक्का आणि राणीबरोबर पाहिलेला, ‘एक फ़ुलं दो माली’ पिक्चर आठवला. सहा सात वर्षे झाली होती त्या घटनेला.
सिने ❤️ मे सिनेमा
💯💯💯💯💯
खेड्यापासून शहरांपर्यंत हिंदी, मराठी पिक्चरच गारुड आणि प्रभाव लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांवर तेवढ्याच प्रमाणात वर्षानुवर्षे आहे, होतं आणि राहणार आहे. काळाच्या पुढे जाऊन विचार करणं, त्यावर सृजनात्मक काम करणं आणि सुंदर कलाकृती तयार करून सादर करणं हे आव्हान सातत्याने पेलणारी फिल्मी दुनिया नेहमीच सर्वांचे आकर्षण ठरली आहे. तिची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्या इंडस्ट्रीमधुन सातत्याने नितनव्या कलाकृतींची भर पडत राहते. खूप लोकांना कामं मिळत राहते. सिनेसृष्टी लोकांचं मनोरंजन करत राहते. पिक्चर पाहणाऱ्या प्रत्येकाला वास्तवापासून वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची किमया साधण्याची पद्धत अफलातून आहे. संघटित कामाची सृजनात्मक कलाकृती आणि प्रभावी परिणाम साधण्यासाठी थिएटर सिस्टीमचा सहभाग मोठया प्रमाणात आहे.
थिएटरचे बंद दरवाजे अन् लाईट, समोरच्या पडद्यावर एकामागोमाग घडणाऱ्या आभासी घटना आणि त्यावरच केंद्रीत होणारे डोळे, मन आणि मस्तीष्क, पिक्चरचा आवश्यक परिणाम साधून जातो. अंधारात बंद थिएटर इतका, उघड्यावर दाखविलेले सिनेमे प्रभाव पाडूच शकणार नाहीत.
आता अक्का लग्न होऊन सासरी गेली होती. राणीचं लग्न ठरलं होतं. राणीला मनं पसंत राजा भेटला होता.
कित्येक दिवसांनी राणी – रश्मी भेटल्या होत्या.
ती आता खरेदीच्या गडबडीत होती. तिने लग्न समारंभसाठी खरेदी केलेले कपडे, शालू आणि दागिने रश्मीला उत्साहाने दाखविले. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. राणीच्या लग्नाला जाणं शक्य नव्हतं रश्मीला. तिला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन रश्मी निघाली.
*******************
🦚🦚 मयूर वसाहत 🦚🦚
राणीला भेटून रश्मी घरी पोहोचली तेव्हा विनितानं रश्मीला एक चिठठी दिली. विजूची आई, विनिताला भेटून गेली होती.
ती चिठठी, रश्मीची मैत्रीण विजूबदद्ल होती. विजू, रश्मीची बी. एड. कॉलेजमधील बेस्ट फ्रेंड. विजूच्या आईने रश्मीला उद्देशून चिठ्ठी लिहिली होती.
बारीक शरीर यष्टीची, सावळी विजू एकदम स्मार्ट आणि हुशार होती. विजूला मुलगी झाली होती. नातीचं बारस होतं म्हणून विजुची आई बारशाचं निमंत्रण देऊन गेल्या होत्या.
रश्मीला, कॉलेजमध्ये हिरीरीने सर्व स्पर्धामध्ये भाग घेणारी विजू आठवली.
बी. एड्. कॉलेजला असताना एका ठिकाणी नोकरीसाठी अँप्लिकेशन लिहून घेतलं तिनं. एनव्हलपमध्ये घालून तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या रश्मी आणि विजू. बस्स, तो एनव्हलप चिकटवून पोष्ट बॉक्समध्ये टाकायचा होता. एका टेबलवर निळ्या रंगाच्या बॉटल मध्ये लांब दांड्याची काडी ठेवली होती. ठिकठिकांणी गम लागून टेबल कळकट्ट झाला होता. टेबलचा मुळ रंग ओळखणे कठीण होते.
“विजू मॅडम, या टेबलचा ओरिजिनल कलर ओळखलात नं, तर मी तुम्हाला चहा देईन आज❗️”
रश्मीला विजू मॅडमची फिरकी घ्यायची हुक्की आली होती.
“ते पांढरच असणार की ओss. नाहीतरी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये रंग कुठे असतात.” कन्नड हेल काढत विजू मॅडम बोलल्या. “अं हं, चूक आहे. यु गेसड् रॉंग. ओरिजिनली इट वॉज ब्लू.”
रश्मीच्या टिपणीवर विजू मॅडमनी रश्मीकडे पाहत ❓️ प्रश्नार्थक
मुद्रा केली. रश्मीने विजू मॅडमचे उत्तर रॉंग असल्याचे ठासून सांगितले.
त्या एनव्हलपला खूप मोठ्या प्रमाणात बॉटलमधील गम चोपडत होत्या. “अरे, विजू मॅडम, किती डिंक वापरताहेत तुम्ही ❓️ एवढ्या डिंकाची अजिबात गरज नाहीय.” रश्मीने विजू मॅडमना सावध केले. “गव्हर्नमेंटकडून गमशिवाय, दुसरं काय फुकट मिळतंय का ❓️ विजू मॅडमनी रश्मीलाच प्रश्न विचारला. “पण कोणतीही गोष्ट, इव्हन गम तरी फुकट का पाहिजे आपल्याला❓️ ख़ुशी फुकट घ्या ❗️🤣😂” रश्मीने प्रतिप्रश्न केला आणि कोटी पण केली. टेबल अजून जास्त ओलसर चिकट आणि काळपट दिसतं होतं.
“हो, बरोबर आहे तुमचं. एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स भरायचा आणि फुकट काहीच नाही म्हणून गम मिळाला तर तोच मोठ्या प्रमाणात वापरायचा, असाचं इरादा आहे ना तुमचा❓️ आणि फुकट घेऊन, घेऊन घेतलं काय ❓️तर गम❗️” पाठीमागून स्पष्ट, खणखणीत पुरुषी आवाज आला. विजू आणि रश्मी दोघीनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं. पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी पॅन्ट घातलेले सह अध्यायी, वूड बी सायन्स टिचर, अर्थात फाटे सर उभे होते. आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे का❓️ असच काहीसे विचारायचे होते, हे त्यांच्या भिवया उंचावण्यावरून जाणवत होते.
विजू खूप हुशार होती हे तिच्या हजरजबाबी स्वभावावरून वारंवार सिद्ध होतं होते. तिच्या मामानी आणलेला दिलखुष नावाचा पदार्थ जिभेला चावदार अनुभव देऊन गेला. फॉरेनमधून तिच्या मामाने आणलेली, एका मॅच बॉक्समध्ये मावेल एवढी, चेरी रेड रंगाची साडी विजूला खुलून दिसतं होती.
विजू मॅडमनी डिबेटमध्ये हुंड्या विरोधात इतकी जबरदस्त मतं मडली की, परिक्षकांसोबत हॉलमधील सारे लोक उभे राहून जवळ जवळ पाच मिनिटे टाळ्याचा कडकडाट करत होते. आपल्या खास मैत्रिणीचे विचार, रश्मीच्या मनात घर करून गेले होते. विजूने तिच्या विचारांची मांडणी खूपच ठामपणे केली होती. अशा या गुणी मैत्रिणीला मुलगी झाली होती आणि तिचं बारस होतं. मोठ्या उत्साहाने बाळ लेणी घेऊन रश्मी विजूच्या गावी जाण्यासाठी निघाली.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
मोरांची वसाहत होती गावाजवळच्या शेतात. बी. एड. कोर्ससाठी याच गावातून गाडी तालुक्याच्या ठिकाणी जायची. बऱ्याच वेळी सकाळी भारद्वाज पक्षी कुबुकsss, कुबुकss आवाज करत हिरव्यागार एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडताना दिसतं असे. कधी एखादा मोर नांगरलेल्या काळ्याभोर शेतात आपला सुंदर पिसारा फुलवून नाचताना दिसे, कधी खाण्यासाठी काही मिळतंय का ❓️ याचा शोध घेताना दिसे. लांब पिसे सांभाळत एक, एक पाऊल टाकत चालताना मोराचा ऐटबाजपणा आकर्षक वाटे. किंबहुना मोर, आणि त्यांचा थवा कोणत्याही स्थितीत चांगलाचं दिसत असे.
वन फॉर सॉरो, टू फॉर जॉय, थ्री फॉर लेटर, फोर फॉर थेटर…. असा संदेश देणाऱ्या डौलात, डोलत चालणाऱ्या ब्राऊन पंखाच्या अन् पिवळ्या चोचीच्या सोळंक्या चिंऊक् चिंऊक् आवाज करत खाद्य शोधण्यासाठी सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, नेहमी जोडीने भुर्रकंन छोट्या, छोट्या भरारी 🦅🦅🦅 घेताना दिसत.
रस्त्यावर मोरांचा जमा झालेला थवा 🦚🦚🦚आणि नाचणारा मोर 🦚पाहून ड्रायव्हरने थांबाविलेली एस. टी. आणि मनोहारी दृश्य जन्मभरासाठी आठवणाऱ्या सुंदर दिवसांच्या आठवणी, बाजूला बसलेल्या सईबरोबर शेअर करत होती रश्मी.
🥀🌴☔️🦚🦅🌲🌈🌺🌹👧😅🌈🥦🌴🥦🌲🥀🦜🦚
दरम्यान आभाळ भरून आले होते आणि एक💧, दोन💧💧, तीन 💧💧💧म्हणत टपोरे 💧थेंब थाड, थाड आवाज करत 💧💧आकाशातून खाली येऊ लागले. एस. टी बसवर थेंब पडताना त्याचा एक विशिष्ट लयीत आवाज येत होता. एकीकडे ऊन होतं आणि एकीकडे पाऊस सुरु होता.
“अक्का, आता आकाशात इंद्रधानुष्य दिसेल बघ.” साईने आपले मतं व्यक्त केले. उसातून कोल्हेकुई सुरु झाली. त्याच वेळी मुख्य रस्ता सोडून बसने वळण घेतले तशी रश्मीची नजर शोधक झाली. उसाच्या शेतीच्या बाजूला मोकळ्या काळ्याभोर रानात लांडोर आणि मोर खाद्य शोधत होते. बाजूला साळुंक्यांचा थवा भिरभिर करत इकडून तिकडे दोन्ही पाय उचलून पंख पसरून भरारी मारत होते. एक मोर पंख पसरवून डोलारा सांभाळत मॉंऊss, मॉंऊss मॉऊss आवाज करत होता. एकाच वेळी, एका पाठोपाठ एक आवाजामुळे रानात केकारव जोरात घुमू लागला.
दरम्यान ड्राइव्हरने गाडी बाजूला घेऊन थांबावली होती. “रश्मी अक्का, ते बघ; नाचणाऱ्या मोराचे तीन, चार लांब पंख खाली पडले. आणि तिथून पुढे बघ जरा, पिवळा नाग सळसळ करत कळ्या मातीच्या ढेकळावरून जवळच्या उसाच्या शेतीत चाललाय.” सई नाचणाऱ्या मोराकडून, सरपटणाऱ्या नागाकडे बोटं दाखवत बोलली. नग मोडी वळण स्पष्ट दिसतं होत. कुबुक, कुबुक करत लाल पंखाचे भारद्वाज पक्षीही सामील झाले. 🦅🦅 साळुंक्यांचा चिंऊक्, चिंऊक्, मोरांचा मॉंऊss, मॉंऊss मॉऊss🦚🦚🦚, कोल्ह्यांचा 🐩 कुइं sss, कुइंssss आणि भारद्वाज पक्षांचा कुबुकss, कुबुकsss, आणि सापाची सळसळ अशा आवाजात सुंदर पक्षांचा, प्राण्याचा रानात चाललेला अनोखा सोहळा एस. टी. ड्रायव्हर आणि प्रवासी थक्क होऊन पहात होते. त्याचं वेळी गडद निळे ढग सूर्य किरणंlचे फेटे लेवून 💫🌤️🌦️🌠🌥️⛅️ आणि सप्तरंगीं इंद्रधनुची कमान 🌈🌈 घेऊन आकाश ; हे पृथ्वीवर 🌎🌍 चाललेले पक्षांचे गाणे, नृत्य पहात होते.
“घन घन माला नभी दाटल्या कोसळती 🌦️⛈️धाराsss,” सई गुणगुणत होती….
विजूच बाळं गोडंच🧚 होतं. बाळाने रंग वडीलांचा आणि बाकी चेहरा विजुचा घेतला होता. एका घटनेनं तिचं आईपण अधोरेखित झालं. ती ज्या पद्दतीने काळजीपूर्वक त्या नवजात अर्भकाला हाताळत होती, ते पाहून तिच्यातली आई स्पष्ट जाणवत होती. बाळाला काहीच कळत नव्हतं. ना मान व्यवस्थित पकडू शकतं होतं, ना शरीरावर, ना नैसर्गिक विधीवर त्याचा ताबा होता. ज्याच्या हातात बाळं होतं ते त्याला काळजीपूर्वक हाताळत होते. फक्त किलकिले डोळे करून पहात होतं ते अर्भक. नाक, तोंड, डोळे आणि सर्व अवयव असलेला चक्क हाडा मांसाचा गोळा होता तो.
आपलं स्वतःच असं काय असतं❓️ मुळं दोन गुणसूत्र पण आपल्या आई, वडिलांकडूनच मिळतात. तिथूनच सुरुवात होते अस्तित्वाची. जन्मभर “धरा”, आपल्याला पोसत असते. मृण्मयी या कवितेचा अर्थ त्या क्षणी समजला रश्मीला. मातीतून मी आले वरती, मातीचे मम् अधुरे जीवन असं कवयित्री म्हणते त्यात किती खोल अर्थ दडलेला आहे. शरीर सर्व निसर्गाच्या पंचतत्वावर पोसत असते. शरीरात जल तत्वाचे प्रमाण जास्त असते इतकेच. ग्रहण केलेलं सर्व पदार्थ हे मातीनेच दिलेले असतात. जो पदार्थ आपण खातो तो आपल्यात इतका बेमालुमपणे मिसळून जातो की त्याचं वेगळं अस्तित्व राहतchn नाही.
म्हणजे माझं, मी, मी पणा कसा आला❓️ शरीराला माझं शरीर, माझं अस्तित्व म्हणतो. जसं जन्म मिळाला तसं त्या शरीराला एक नाव पण मिळतं. मग संस्कार म्हणून प्रत्येकजण आपले ऐकलेले, वाचलेले विचार, आचरणात आणलेल्या गोष्टी त्याला सांगून संस्कार करत असतो.
मुलगा, मुलगी यावरून काही वेळेस वागणूक आणि संस्कारात त्या, त्या परिस्थितीनुसार बदल केले जातात. किंबहुना संस्कार हा काही विधी किंवा गोष्ट नाही. स्वतःच्या कुटुंबि्यांच्या आणि इतरांच्या वागण्यातून ते प्रतिबिंबित होतं असतात. आई, वडील, भावंड, घरातील, परिसरातील प्रभावी व्यक्ती, नातेवाईक यांच्या वागण्यातून संस्कार होत असतात. संस्कार हे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विधीतून, कार्यक्रमातून, वाचनातून होतं असतात. आणि त्याचा पगडा जन्मभर असतो. किंबहुना तिच व्यक्तीची ओळख बनते.
प्रत्येकाचं असच असतं. जन्मावरून जातं, धर्म, ठरत असते. बाळाच्या वास्तव्यावरून त्याचा देश परिणामी राष्ट्रीयत्व ठरत. आणि या पृथ्वीतलावर आल्यावर त्याला मर्यादामध्ये ठेवलं जातं, किंबहुना मनुष्य प्राणी जन्मभर या मर्यादाचे ओझे सहजपणे पेलत राहतो.
बाळाचं 🧚
बारस छानचं झालं. विजू आणि संजय यांची कन्या संयोजिताला बाय करून रश्मी आणि सई निघाल्या. परतीच्या वाटेवर सई – रश्मीनी, विनिता आई बरोबर बाहेरगावी जाण्याचा प्लॅन करून खुशीतच घरी पोहोचल्या.
🌺डोंगरावरचा गणपती🌺
🌺🙏🙏🌺
गजाननम् भूत गणादी सेवितम् |
कपित्त जंबू फल सारं भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाश कारणम् |
नमामि विघ्नेश्वरम् पाद पंकजम् |
🙏🌷🌺🙏🌷🌺🙏🌷🌺🙏
आज संकष्टी चतुर्थी. विनिता बरोबर रश्मी आणि सई पहाटे लवकरच बसने तालुक्याच्या ठिकाणी निघाल्या. बस मध्ये फारशी गर्दी नव्हती. गार वारा, आल्हाद दायक वातावरण आणि आदले दिवशी पडून गेलेला पाऊस यामूळे गारवा जाणवत होता. पावसामुळे झाडे, पाने, फुले आणि वेलीवरील धूळ धुतली गेली होती. धूळ नाहीशी झाली होती त्यामूळे, मुळ रंग खुलून दिसतं होता. कोवळी सूर्याची किरणे प्रत्येक वस्तूंला उजळवून टाकत होती.
“आज गणपतीचा उपवास असतो बऱ्याच लोकांचा.” सई बोलली. रश्मीला नेहमी संकष्टी चतुर्थी म्हंटले की, दिवाकर कृष्ण यांची आठवीत असताना, मराठी विषयामध्ये वाचलेली कथा आठवायची. कथेतील कॉलेजला जाणाऱ्या मुलाच्या शेजारी राहणाऱ्या वहिनी आणि त्यांची करूण कहाणी मनात कायमची घर करून राहिली. आता आणखी एक गोष्ट मनात ठाण मांडून बसली होती.
संकष्टी चतुर्थी म्हंटले की, रश्मीला कॉलेजच्या पहिल्या वर्षीचे दिवस आठवायचे. तालुक्याच्या गावी नवे ठिकाणं, नव्या मैत्रिणी, नवी उमेद घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणातील वेगळा टप्पा सुरु झाला होता.
एस. टी. स्टॅन्ड जवळच पहिली पासून बारावी पर्यंतचे वर्ग चालायचे. प्रशस्त कॅम्पसमध्ये असलेल्या कॉलेजमध्ये जवळपासच्या गावातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असतं. कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा बोलणारे विद्यार्थी, शिक्षक याचा सीमा भागातील भाषेचा बाज वेगळाच होता. कधी, कधी चारी भाषा वापरून गंमतीशीर वाक्य रचना करून हसी मजाक चाले. ‘वंद हुडगी💃, कट्ट्यावर बसली होती, मैने पुछा, व्हॉट इज युअर नेम❓️’
‘नाम मे क्या रखा हैं❓️ asked the smiling girl😊, तिच्या मागे उभे हॊते, अवन नाल्क अण्णागोळरी.’ असो किंवा,
पोळी आणि चपातीच्या अर्था मधील गोंधळ असो
अशा वेगवेगळ्या गंमतीशीर आणि नवीन नवीन गोष्टीच्या माहीती बरोबर शैक्षणिक वर्षाच्या माध्यावर एक घटना घडली.
✡️🔯🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️✡️
सकाळच्या सत्रातलं कॉलेज संपलं होतं आणि दुपारच्या सत्रासाठी मुलं क्लासरूममध्ये जमा होतं होती. एक गुराखी मुलगा कॉलेज पाठीमागच्या भल्यामोठ्या डोंगरावरून खाली ओरडत, ओरडत धावत येत होता. अद्याप लेक्चर्स सुरु झाले नव्हते. ‘तो एवढा का धवतोय❓️, नेमकं काय झाल असेल त्याला ओरडायला❓️ त्याची गुरे, वासरे तिकडेच सोडून हा खाली का आला ❓️’ चेहऱ्यावरून तो घाबरलेला वाटत नव्हता. वर्गातील मुलांची उत्सुकता ताणली गेली आणि काही मुले वर्गाबाहेर जाऊन त्या धावत येणाऱ्या मुलाला गाठून त्याला विचारलं. धापा टाकतच तो बोलला, “गणपती बन्त री. गणेश गणपती मोरया 🙏” त्याने डोंगराकडे पाहून हात जोडले.
“येनं मताडती निवू❓️” यादव
नावाच्या एका उंच मुलाने विचारले. कॉलेजमध्ये त्याच्या उंची आणि हेअर कटमुळे ‘बच्चन’ म्हणून हाक मारत असतं. कॉलेज गॅदरिंग मध्ये यादवने, ‘पग घुंगरू बांध मीरा नाचिती’ या गाण्यावर खूप सुंदर नृत्य सादर केले होते. त्याला मिळालेलं ‘बच्चन’ हे टोपण नाव त्याने सार्थ असल्याचे सिद्ध केले होते.
“डोंगरावर गणपती प्रकट” झाल्याची बातमी कॉलेजमध्ये, तालुक्यामध्ये आणि आसपासच्या गावामध्ये पसरली. गणपतीच्या आकाराच्या मोठ्या पाषाणला सिंदूर लावला गेला. मंगळवार, शनिवार, संकष्टी चतुर्थी, आणि इतर दिवशी हातात पूजेचे ताट घेऊन डोंगरावर जाताना बायका दिसायच्या. नंतर लहानांपासून थो्रांपर्यंत सर्वजण दर्शनासाठी जाऊ लागले. ओबडधोबड डोंगर कोरून पायऱ्या घडविल्या गेल्या. रेलिंग लावले गेले. डोंगर पायथ्याला नारळ, मिठाई, फुलांची दुकानं थाटली गेली.
ना नदी, ना तलाव, ना गार्डन, ना फिरण्यासाठी चांगली जागा; साधचं गांव होतं ते. तालुका असल्यामूळे कोर्ट आणि संबंधित ऑफिसेस, दोन कॉलेजेस दोन हायस्कुलस होती गावात.
चारी बाजूनी डोंगर असणारे ओकं ओकं गांव होतं. सतत पाण्याचं दुर्भीक्ष आणि कोरडा तालुका म्हणूनच नाव मिळालं होतं त्या गावाला. अशा या तालुक्याच्या गावाला, गणपतीच्या आगमनामुळे वेगळेच महत्व प्राप्त झाले. संकष्टी चतुर्थीला, रंगीबेरंगी कपडे घालून गणपतीच्या
दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना पाहून गाव समृद्ध असल्यासारखं दिसत होते.
मानो❗️ या न मानो ❗️
नियमितपणे दर्शनासाठी येणारे भक्त असोत अथवा सटी सामासी येणारे भक्त असोत, मानवी स्वभावास अनुसरून केलेली प्रार्थना फळाला आली आणि विश्वासाचे रूपांतर दृढ विश्वासात झाले. मनोकामना पूर्ण झालेल्या अशा असंख्य भक्तांकडून, “डोंगरावरचा नवसाला पावणारा गणपती” असं नमाभिदान झालं. हौसे आणि नवसे भक्त त्या दयाळू बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत होते.
आता नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती झाली होती. एके दिवशी रश्मी, शांतला, रुही, पुतळी, गीता आणि मिता या दर्शनासाठी निघाल्या. तुरळक माणसे होती दर्शनासाठी. त्यामुळे शांतपणे दर्शन झाले.
त्या नंतर पुन्हा एकदा विनिता चंदा आणि सईबरोबर दर्शन झाले होते. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा आई विनिता आणि बहीण सईबरोबर डोंगरावरच्या गणपतीच्या दर्शनाला जाण्याचा योग जुळून आला होता.
आता एस. टी. तालुकाच्या स्टॅन्डवर पोहोचली होती.
“वॉटर बॉटलं / निर तगोरी, वेफर्स, चिक्की, लिमलेट गोळी तगोरी. मालेsss, मालेss हुवा मालेm, शेवंती गजराss तगोरी sss” म्हणून चार, पाच नेहमीचे फेरीवाले एस. टी. तुन उतरताना वस्तू घेण्यासाठी आग्रह करत होते. विनिताने सई आणि रश्मीसाठी
नेहमीप्रमाणे अबोली – मोगऱ्याचे गजरे घेतले. डोंगराच्या पायथ्याशी जास्वंद – दुर्वाचा हार मिळाला. आता ऊन वाढायच्या आत वर जाऊन दर्शन घेणं आवश्यक होतं करणं, डोंगरावर चढताना मध्ये ना झाडं होती ना सावली. आजही हौसे आणि नवसे भक्त त्या दयाळू बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे खूप लोकांची दर्शनासाठी गर्दी दिसतं होती. गणपतीचं दर्शन छान झालं. डोळे मिटून नमस्कार केला. काचेच्या रेशमी बांगड्यांचा किणकीण आवाज झाला कानाजवळ❗️जवळ पास कोणी काचेच्या बांगड्या घातलेली स्त्री नव्हती. मग….. काय होतं ते…. ❗️भास असेल म्हणून रश्मीने समोर मूर्तीवर आपली नजर आणि लक्ष्य केंद्रित केले.
🐁🐀🐁🐀🐁🐀
मूषक वाहन मोदक हस्त | 🐀
चामर कर्ण विलंबित सूत्र |
वामन रूप महेश्वर पुत्र |
विघ्न विनायक पाद नमस्ते |
🙏🌷🌷🌷🌷🌷🙏
शरीरात एक प्रकारची ऊर्जा आणि वेगळाच उत्साह जाणवत होता. मंदिर हेच साकारात्मक ऊर्जेच स्त्रोत असते. जिथं जे असते तेच आपल्याला मिळतं. मंदिरात गेलं की मन आणि तन सकारात्मक ऊर्जा खेचून घेत असतात. किंबहुना मंदीर परिसर, मंदिरात, गाभाऱ्यात प्रवेश केला की, ऊर्जा आणि सकारात्मक भावना, आणि आत्मिक आनंद या गोष्टी आपोआप प्राप्त होत असाव्यात. नव्या जोमाने पुढील काम करायला चैतन्य प्राप्त होतं. बाप्पाच्या दर्शनाने मनात वेगळाचं उत्साह निर्माण झाला. सकारात्मक सळसळती ऊर्जा घेऊन विनिता आपल्या मुलींसह घरी निघाली.
🌹🙏🌹
“तू सदा जवळी रहा..” भाग 1 ते 46 मधील आपल्याला आवडलेल्या प्रसंगाबद्दल, स्थळा बद्दल, व्यक्तीरेखेबद्दल कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा 🙏. आपले अभिप्राय शिरोधार्य
माझे इतर साहित्य वाचण्यासाठी खालील 👇link वर क्लिक कर
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
4 Responses
खूप छान मॅडम
hello Niranjan Giri sir. after reading “तू सदा जवळी रहा…” भाग – 4…” your comments are approved and appreciated .
Once again thanks sir.
उत्कृष्ट
नमस्ते सुधा मॅडम👏. “तू सदा जवळी रहा…” भाग ~ ४६ वाचून आपण दिलेले आभिप्राय मला गुणवत्तापूर्ण साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारेआहे. आपाल्याकडून माझ्या लिखाणसाठी काही सूचना असल्यास आवश्य सांगव्यात. मनःपूर्वक धन्यवाद