“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनीस्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी.मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या ना मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कोठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯प्रेमभक्ती ❤ 🌺🙏🔯, घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पाहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️, दीदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मीसाठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., आण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्.
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडंसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
भाग – 52 * कल 👩‍🦳 – आज💃 – कल 👶, विश्वास – बिश्वास 🤔❓️”कोणती ऐकणार❓️चांगली 👌 की वाईट👎‼️” तुमचा हात पकडणार नाही, मॅडम ‼️ यांच्या पासून सावध रहा, सूची‼️
भाग – 53* अर्थार्जन अन् अर्थसाक्षर, तुळसीमाळेतील मणी हसले ‼️
निरक्षरता ❓️ कोणती ❓️❓️ परिणाम 🤭

भाग – 54 * विवाह ❤ विचार, संस्कार 👏 ‼, अम्हाला माहीत आहे रश्मी‼😃😀, गीतने शब्दातुन काय उलगडले❓, मळवट भरतोस का तू पूर्वेच्या भाळी?
सांभाळा तुमची फळे ‼🥭🍈🍊🍎, नाते नितळ, लखलखीत ‼, चेहरा 🎃 वाचणे, माणसे 👩‍🦰🤰👨‍🦱🤵जाणणे ‼, मी – आम्ही‼ तुझे👈🤰 – 👫👉आपले ‼, ‘दी मॉरल ऑफ दी स्टोरी इज…..”‼😊,
भाग – 55* ⚫ स्पोठ स्मृती, जिंदगी के साथ ‼ — बाद ‼☺, काळ सोकवतो, 🌍 विश्वची माझे घर 🏠 केव्हा वाटेल ? सरस्वतीला शाप ❓
               ⚫ स्फोट स्मृती 🤒

जीवन एकदम सरळ रेषेत चालले तर त्याला जीवन कसे म्हणता येइल ? पण म्हणून काही जीवघेणी संकटांची मालिकाही अपेक्षीत नसते. रश्मी नोकरीला लागली त्याच्या आदल्या वर्षीची घटना.

स्मृती, आठवण चांगली की वाईट हा प्रश्न कधी उद्भवलाच नाही. कारण शिक्षण आणि त्यावर आधारित घेतली जाणारी परीक्षा ही शंभर टक्के स्मृतीवर असते. वर्षभर काय शिकलात ❓️ किती शिकलात❓️ यांचा लेखा – जोखा तीन तासाच्या परीक्षेत केला जातो. त्यामुळे स्मृती, आठवण, लक्ष्यात ठेवणे हे जीवनाचे महत्वाचे, अपरिहार्य अंग असाच विचार केला रश्मीने. पण इथे तोच नियम लागू कसा होईल ❓️ कारण इथे, स्मृती म्हणजे अपंगत्व, अपल्या माणसाना गमवणे, अश्रू, वेदना, आक्रोश, निशब्दता…. आणि….
“शब्दांचे अर्थ प्रसंगनुरूप ठरतात तसेच स्मृतीचेपण हा नवा अर्थ उमगला.”


बॉम्ब स्फोटातील माणसांचे विदारक आणि भयानक मृत्यु, रश्मीच्या कार्यालयातील काही लोकानी जवळून पाहिले होते. मनामध्ये खोलवर रुतलेल्या ताज्या जखमा घायाळ करुन गेल्या होत्या. आठवणीने मनाच्या जखमा भळभळत होत्या. रक्ताळलेले आणि विखूरलेले मानवी शरीराचे अवयव 👩‍🦱👨‍🦳🦶🦵✋🤟🤳👃👂🦵चेतनाहीन झाले होते. सांडलेले गरम रक्त, इतस्थत: विखरुन काही वेळेत सुकले होते. लाल डाग मनाची जखम ओली करत होते. बोचणारी अस्वस्थता नजरेला, मनाला नम बनवीत होती तर काही मनांचे संवेदनाहिन दगड़ात रुपांतर झाले होते.

“स्फोटात मेले ते सुटले रश्मी मैडम. पण जे जखमी होऊन वाचले किंवा वाचवले गेले त्यांची अवस्था म्हणजे जिवंतपणी नरक यातना.”  घशातुन बाहेर पडताना शब्द  स्वत:चे वजन वाढवत होते. भयानक सत्य बोलताना सहकारी आनंदजींची जीभ 👅आणखिनच जड झाली होती. 
“मरणाच्या भितीने धावताना 🏃‍♀️ 🏃‍♂️ एक तर त्यांचा पाठलाग मृत्यु करत होता किंवा अपंगत्व. पण “त्या” क्षणी प्रतेकजण फक्त तेथून पळायचा प्रयत्न करत होते.” मधुजी भयाण वास्तव सांगत होते.  डोळ्यासमोर 😟 ते सर्व प्रसंग पुनश्च उभे राहुन भय वाटत होते.

“स्फोटा मुळे इमारतीच्या🏢 काचा फुटून रस्त्यावरून चलणाऱ्या माणसांमध्ये घुसल्या होत्या. सैरभैर झालेली माणसे🕺🏃‍♀️🏃‍♂️🚶‍♀️🚶‍♂️ अंगावर काचांचे तुकडे आणि भळभळणाऱ्या जखमा घेउन कशासाठी धावताहेत❓ हेच त्याना समजत नव्हते,” वैष्णवी मैडम☹ रूद्द कंठाने बोलायचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या आवाजात कम्पने जाणवत होती.

           जिंदगी के साथ‼ — बाद

“जेवण 🥗🍚🍜 झाल्यावर नेहमीप्रमाणे केळी खाण्यासाठी आम्ही सहाजण इकडे आलो होतो. केळीवाल्या बाईला पैसे देऊन सहा 🍌🍌🍌🍌🍌🍌केळी दे, असे सांगत असताना पलिकडच्या इमारतीतून धड़ाम आवाज आला. आगीच्या लोळाबरोबर खळ्ळ करुन काचा फूटल्याचा आवाजा आला. आवाजाबरोबर किंकाळया ऐकू आल्या.” फ्रूट सलाडच्या शेजारी केळीची टोपली घेउन बसलेल्या भैयाकडे बोट दाखवत रोमेश बोलले. आता भैय्या बसला आहे, तिथेच केळेवाल्या काकू बसायच्या.

“आता त्या बाई येत नाहीत केळी विकण्यासाठी. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, आमच्या सर्वांच्या कानाला 👂दडी बसली. केळीवाल्या🍌🍌 बाई ठार बहिर्या👂👂 झाल्या. नीधीशची अवस्था पाहुन वाचा 🥵 गेली त्यांची. गाडीचे🚘 हॉर्न, ट्रेन मधील 📢 अनौंन्समेन्ट ऐकू येत नाहीत, त्यामूळे घरीच 🏠थांबतात त्या. आम्ही जातीने त्याना घरी भेटायला गेलो तेव्हा केळेवाल्या काकू नजर शुन्यात 👀🙄 लाऊन बसल्या होत्या. चेहऱ्यावर उदासी 😣😔😞 होती. चेतनाहीन डोळ्यात 👁👁 कोणतीच भावना दिसत नव्हती.

“त्या दिवशी नेहमी सारखे केळी 🍌घेण्यासाठी नीधीश आला नव्हता. पण…..” उजाला मध्येच पॉज घेत दीर्घश्वास घेउन थांबली.
“पण काय उजाला ? सांग ना, काय झाले ? हा नीधीश कोण आहे ?” केळीवाल्या बाईंची अवस्था ऐकुन रश्मीचे डोळे 😪 गच्च भरले होते. आवाज घशातून बाहेर पडताना जड,  दुु:खी आणि खरखरित  झाला होता.

 
“नीधीश 🏃‍♂️, बाजुच्या कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा तरुण. उमदा, प्रेमळ, देखणा आणि संस्कारी होता. पंचवीस, सतावीसीचा मुलगा. आमच्या अगोदर कार्पोरेट ऑफिस जॉईन केले त्याने. लंच ब्रेकमध्ये
कधी बँकेत🏬, कधी केळी🍌🍌 घेताना, कधी पोस्टात🏰 दिसतो. आय मीन दिसायचा.” उजाला एवढच बोलू शकली. तिला आवंढा गिळताही येइना.

“कानटळया बसवणाऱ्या आवाजामुळे केळीवाल्या बाई एकदम धडपडत उठल्या आणि धावण्यासाठी पावूले उचलणार तेवढ्यात, समोरुन जिवाच्या आकांतने धावत येणारा नीधीश दिसला.”
“आपली मैत्रीण, ख्यातीला👱‍♀️ भेटण्यासाठी 🤝 गेलेला निधीश विचित्र अवस्थेत 🏃‍♂️धावत परत येताना पाहुन पायाखालची 🦶🦶 जमीन हलली. 🏢📈📉     
🏢📈📉   स्फोटामुळे  आपल्याला माहीत असणारा, रोजच्या पाहण्या – बोलण्यात असलेला माणुस त्या अवस्थेत पहाणे हे दूर्दैव की शिक्षा❓ हे पण समजले नव्हते. ती माऊली,  त्या तरुण, होतकरू, देखण्या नीधीशची अवस्था पाहुन मटकन खाली बसली. शर्ट फाडून जाड, टोकदार काचा हातात🤳🖖, पायात🦵🦵, पोटात, पाटीत, चेहऱ्यावर 😵 घुसल्या होत्या. रक्त भळभळ वहात होते. नीधीश नेमका केळेवाल्या बाईंसमोर येवून पालथा पडला तेव्हा लक्षात आले की, पाठीमागुन डोक्यात 👨‍🦲 🧠 मोठी काच घुसली होती. आणि शेवटची हालचाल करत नीधीशचा श्वास 👃थांबला आणि पाय 🦵🦵ताठ झाले. केळेवाल्या 🍌🍌काकूंच्या डोळ्यातून ना पाणी 😭 वाहिले ना हुंदका 😵 फुटला.
केळेवाल्या काकू तेव्हापासुन एकदम निशब्द, ध्वनीहिन👂 जीवन जगत आहेत. त्या स्वत:च्या मुखातून ना आवाज काढू शकत आहेत ना शब्द. त्या कनानी ऐकू शकत नाहीत. जन्मापासुन सोबत असलेला आवाज साथ सोडून गेला. त्यांच्या साठी सगळच शांत झाले आहे.

सहकार्यांच्या बोलण्यातून सारे चित्र समोर उभे राही. बोलताना कर्यालयातील सहकार्यांचा आवाज👄 कधी कातर बने, कधी जड. प्रतेकाचे डोळे 👀 पाणावताना पाहून रश्मी अबोल होई . तिचे मन आक्रंदत राही. “अमानवी 🥶🤢 कृत्यामुळे माणूसकी घायाळ,” होताना ऐकुन रश्मीच्या अंगावर शहारे उठत. मनाची ही अवस्था कोणती ⁉️ हे जाणता येत नव्हते. सगळे समजे पण उमजत नसे.

ही कोणती भावना असेल ❓जी दुसऱ्याच्या मनाला, शरीराला घायाळ करते. समोरच्याला ओळखत नाहीत, जाणत नाहीत, कोण आहे ? कोठून आला आहे ? माहित नाही. तरी फक्त समोरच्याला मारायचे असते. का ❓️ घडलेली घटना काही घरांमध्ये कायमचा अंधार करुन गेली. साऱ्या स्मृती पोटात दडवून मुंबई पुर्ववत होत होती.

🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒

जिंदगी के साथ भी l जिंदगी के बाद भी ।। स्लोगन समोर स्माईली ☺ पुर्वीसारखीच हसुन सर्वांना आव्हान करत होती.

कामासाठी  🏠🏃‍♂️ बाहेर पडणारा प्रत्येक मुंबईकर अपल्या घरी परत येइल 🏠🏃‍♂️ या बाबत साशंक🤔 असे. सगळ्या प्रयासातून घरी पोहोचला की, प्रत्येक मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडत होता.
क्रूरता👹, सूड,👺 द्वेष ☠ यानां कोणताही चेहरा नसतो. असा चेहरा कुठे असेल तर खुपच विद्रूप, भयाण आणि तिरस्करणीय असेल.
रिकाम्या शेतात उत्तम 🥑🍓🥜 बियाणांची लागवड न करता तसच पडीक ठेवले तर अनावश्यक तण 🍀☘उगवु देऊन निसर्ग आपले काम चोख बजावतो.
मनाला योग्य विचारखाद्य, 🧠 बुद्धीला
योग्य वळण आणि हाताला✋ योग्य 👌 काम नसेल तर निरर्थक किंवा विघातक विचार त्या व्यक्तीचेच नव्हे तर सामाजाचे आरोग्य बिघडवू शकतात हे सत्य वारंवार अधोरेखीत होत होते.

माणूस हा प्रथम प्राणी 🦍 आहे, नंतर तो समाजशील प्राणी  झाला. परंतू काही घटनांमुळे मनुष्य प्रथम प्राणी आहे याची प्रचीती येत रहाते.

कॉलेजमध्ये असताना जोशी सरानी, “होती आणि बोबोचा” लेसन शिकविताना इतर काही उदाहरणे सांगितली होती. कच्चे मांस खाणारे👱‍♂️👨‍🦳  बाबा होती आणि मुलगा बोबो यांच्याबद्दलची गोष्ट होती. 

 जंगलात लागलेल्या आगीत🔥 भाजल्यामुळे आडव्या पडलेल्या डुक्कराला, मुलगा बोबो हात लवून उठवायचा प्रयत्न करतो. प्राणी तर उठला नाही पण बोबोचे बोट भाजले.  बोबो पटकन तेच बोट तोंडात घालतो. त्या प्रसंगी प्राण्याचे मांस भाजुन जिभेला जास्त चवदार लागते हे कळले. तेव्हा पासुन भाजणे, शिजवणे प्रकार सरु झाले. असाच कधी अपघाताने, कधी प्रयत्नाने माणुस सिविलाइझ होत गेला.

          काळ सोकावतो 🕧🕐

या ना त्या कारणाने प्राणीत्व 🦍 मध्येच डोके वर काढी आणि आपण समाजशील आहोत याचा विसर पडे.
प्रत्यक्ष हत्ये अगोदर मनाने, डोळ्याने अशा संहारात्मक गोष्टीचे मनन केले जात असताना नक्किच संस्कारी मेंदू परिणामांची जाणिव करून असणार. पण हेतूपुरस्सर चांगल्या विचारावर वाईट विचार मात करवले जात असतील. अन्यथा जन्मताच कोणी वाईट असूच शकत नाही.

जसे ‘शुद्ध बीजा पोटी फळे 🍓🍎🥭 रसाळ गोमटी’ असतात तसे, 
अशुद्ध बीजा पोटी फळे कुजकी🍪, नसकी ?’ असतील का  ?  नेमके काय समजायचे ??? रश्मी प्रश्नांच्या फेर्र्या त पुर्णपणे गुरफटली….❓💫 तिच्या का ❓ला उत्तर मिळेना.

                 विध्वंसक वृत्तीवर एकच उत्तर

शिक्षकांद्वारे उत्तम संस्कार,  विध्वंसक वृत्तीवर एकच उत्तर. मुलांमध्ये स्वत:प्रती प्रेमभाव जागृत करणे हे कुटुंब आणि शिक्षकांचे काम. मुले मोठी होऊन जगाच्या पाठीवर कोठेही गेली तरी आई, वडील, कुटूंबियांनी दिलेले संस्कार आणि शिक्षकांकडून मिळालेली शिकवण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर विसरूच शकत नाहीत. सुदृढ समाज घडविण्यासाठी
मुलानां शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार पुर्वी आवश्यक होते, आत्ताही आवश्यक आहेत आणि भविष्यात सुद्दा आवश्यक असणार आहेत. चांगल्या संस्काराना पर्याय नाही. तेथे कोणतीही पळवाट नाही.

विश्वची 🌍 माझे घर 🏠 केव्हा वाटेल ?


शनिवारी दुपारी केळी आणि शेंगदाणे घेण्यासाठी जात असताना सहकाऱ्या स्फोटाची प्रत्यक्ष पाहिलेली घटना रश्मीला सांगितली होती. तेव्हांपासून रश्मी विचारत बुडून गेली होती. नियमित कामे यंत्रवत सुरु होती. पण मनाला असंख्य वेदना होत होत्या. झाल्या घटनेबादद्ल कोणीच काही करु शकत नव्हते. पण अशा घटनांची पुनरावृती होऊ नये यासाठी काय ? तिला तिच्या कॉलेजमधील जोशी सरनी शिकविलेली Where The Mind Is Without fear ही कविता आठवली. मानवी मनात कटू अनुभवांमुळे निर्माण झालेली भिती घालविण्यासाठी ही स्वातंत्रपुर्व काळात लिहिलेली कविता आत्तासुददा लागू असेल का? ती साऱ्या विश्वासाठी लागू होते. मनातील संकुचित विचार जातीपाती आणि निरर्थक रुढी, रिवाजांचा त्याग करुन सत्य मार्गाचा अवलंब करावा म्हणजे जग कायमचे सुंदर राहील असाच कांहिसा अर्थ होता कवितेचा.
काही निष्कर्षाप्रत येताना रश्मी मनाने शाळेत पोहोचली.
निष्पाप चेहऱ्याची मुले पाहुन रश्मीला अपल्या देशाचे भविष्य उज्वल असेल यात तीळमात्र शंका राहिली नाही. लहान मुलांकडून जणू सकारात्मक उर्जा मिळली. मनावरील नकारात्मक मळभ बाजुला होऊन सकारात्मक, सतेज सुर्य मन:आकाशात तळपू लागला.
“मुलांमध्ये स्वत:प्रती प्रेमभाव जागृत करणे गरजेचे आहे.”
जो स्वत:वर प्रेम करतो तो साहजिकच आई, वडील, भावंडे, कुटुंबियांवर, इतरांवर प्रेम करु शकतो. समाजावर आणि राष्ट्रावर प्रेम करु शकतो. ही मुलेच तर उज्वल भरताचे उज्वल भवितव्य आहेत.

“म्हणजेच विश्वातील सर्व शाळांमधील मुलांमध्ये स्वत:प्रती प्रेमभाव जागृत करणे गरजेचे आहे.” उमलत्या, निष्पाप मुलांचे मन सकारात्मक भाव प्रेम, माया, आदर, शान्ती, आपुलकी या मानव हितवादी भावनानी भरले की वाईट गोष्टीनां जागाच उरणार नाही. रविंद्रनाथांचा, साने गुरूजींचा भारत सत्यात उतरेल. जगत् शांतीचा धडा शिकविला आणि तो अमलात आणला गेला आणि सातत्याने अमलात येत राहिला की,  सर्व जग सकारात्मक भावना प्रसवेल.

रश्मी स्वत: प्रश्न निर्माण करत होती. स्वत:च उत्तरेही मिळवत होती. होस्टेलमध्ये रश्मीने प्रवेश केला तेव्हाही तीचा चेहरा काळजीयुक्त होता.

   नियतिचे प्रश्न ?

“साऱ्या विश्वातील मानवानां  ज्ञानेश्वर माऊलीसारखे, ‘हे विश्वची माझे घर’ केव्हा वाटेल ?” रश्मीच्या मनात प्रश्न निर्माण झाला.
त्याच विचारात होस्टेलचे गेट ओलांडून रश्मी आत आली. जिना चडून वर आली. स्वत:च्या रूमचा अर्धवट उघडलेला दरवाजा ढकलून आत आली. बैग कपाटात ठेउन गाऊन👘 आणि टॉवेल घेउन बाथरुममध्ये गेली.

टॉवेल दोरीवर टाकत, “अंघोळ केल्यानंतर आता हलकं  वाटतय.” रश्मी स्वत:शीच पुटपुटली.
******************************

“जगद् गुरु शंकराचार्यानी, कलीयुगाचा उच्चार करून सरस्वतीला का आणि कोणता शाप दिला ?”

शिवगंगाकडे पाहत नियतीने प्रश्न केला. रविवारी निवांतपणे खिडकीतून बाहेर रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे पहात, गाड्यांची रहदारी पहात बसलेल्या रोजने प्रश्न ऐकुनपण न ऐकल्या सारखे केले. ती खिडकीबाहेर पहात बसली. शिवगंगाने “सरुsss,” म्हणून हाक मारुनपण तीने लक्ष दिले नाही.
“हाय सरु डीयर ! हाऊ वाज द डे ?” पाठी मागुन रोजला कुणीतरी हाक मारली. ओळखीचा आवाज आपल्याला हाक मारतोय हे रोजच्या गावीही नव्हते. ती हाक रोजच्या कानाद्वारे मेंदूपर्यंत गेलीच नाही. हाकेची जाणिव मेन्दुला झालीच नाही.
सरु जरी खिडकीशेजारी बसुन बाहेर डोकावत होती तरी तीचं मन दुसरीकडेच होते.

“बडबडी सरु इतकी शांत का ? स्वत:च्या विश्वात असली तरी चेहऱ्यावर खुशी दिसत नाही.” गंगाने सरुकडे पहात नियतीला प्रश्न  विचारला आणि सरुच्या मूडबाबत जाणून घेण्यासाठी चाचपणी केली.
“नाही बोलत आहे, सरु. ती गप्प, गप्पच आहे.” नियती उतरली.
“बाय द वे, नियती वेन डिड यू कम फ्रॉम बेंगलुर ?” गंगाने नियतीकडे रोखून पहात प्रश्न विचारला.
ऐडवांस् ड़ विचार – आचार असलेली मॉडर्न नियती पुराण कथेबद्दल प्रश्न काय विचारतेय ? गंगा स्वत:शीच पुटपुटली.
“आपल्या पुर्वजानी गीता, पुराण, उपनिषदे, वेद यामध्ये जे काही लिहिलय ते वायफळ नाहीय गंगा. अधुनीक पाद्द्तीने जीवन जगत असताना, वैद्न्यनीक दृष्टीकोन जागृत ठेवून जुन्या ठेव्यांकडे पाहिलेस की समजेल कित्ती वैभव आहे या पौराणिक ठेव्यात. उज्वल भविष्यकाळासाठी या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघायला हवे. सुर्य, सत्य आणि ज्ञान या तीन गोष्टी खुपवेळ झाकुन ठेवल्या जावू शकत नाहीत.” नियतीच्या बोलण्यातून आज वेगळा पैलू, तिचे व्यक्तिमत्व अजुनच ठाशीव बनवत होते. गंगाने नीयतीच्या बोलण्यावर फक्त हुंकार भरला.      

सरस्वतीला मिळालेला शाप ?📚

“शंकराचार्य आणि सरस्वतीबाबत विचारलेला प्रश्न त्याच अनुषंगाने येतो.
तिथे वर्णव्यवस्था अपेक्षीत नाही. मला कोण देऊ शकेल या प्रश्नाचे उत्तर ?” नियतीने चाचपणी करण्याचा प्रयत्न केला.
गीत आणि परम 💃💃बाहेरुन आल्या आणि चार वाजता सर्वजणीमिळुन बाहेर जात असल्याचे जाहिर करुन टाकले.


काळेभोर लांब पण कूरळे केस. जाड, रेखीव, काळ्या भोर, धनूष्याकृती भूवया. लांब नाक. नकाचा शेंडा किंचीत वर वळलेला होता. डार्कमरुन लिपस्टीक, काजळ कोरलेले डोळे. सावळा रंग, काठा – पदराची डार्क कलरची साडी. त्यावर मैचिंग मण्यांचा हार आणि कानातले लोलक, डाव्या मनगटावर रिष्टवॉच, उजव्या मनगटावर सिंह मुखी ब्रेसलेट, बोटात अंगठ्या आणि वाढविलेली पॉलीशड् नखे, उंच टाचांच्या सैंडल. तिचे बाह्य व्यक्तिमत्व आकर्षक दिसत असे. नियती एक परीपुर्ण व्यक्तिमत्व वाटे. तीचे वावरणे ग्रेसफूल वाटे. एक दरारा असे.
रश्मी तिला कधी डेष्टीनी म्हणे कधी दैव म्हणून हाक मारीत असे.
🧚‍♂️🧚‍♀️🧚‍♂️🧚‍♀️🧚‍♂️🧚‍♀️🧚‍♂️🧚‍♀️🧚‍♂️🧚‍♀️🧚‍♂️
नियती शब्द उच्चारला की, नेमकी पी. के. सरांची आठवण येई. रोमिओ ज्युलियेट शिकवताना वेगवेगळ्या घटनांचा क्रम पहिला की, “डेष्टींनी ओवर रूलस् ऐण्ड थिंग्स गो ऑन. रोमियो जूलीयेट, नोन ऐज स्टार क्रॉसड टीन एज लवर्स स्टोरी. दुर्दैवी नसिब आणि हुकलेल्या वेळा आणि दु:खद अंत. ऐट द एंड, दे बोथ मीट् दि डैथ.” वर्गातील सर्वांच्या मनांमध्ये विषण्णता भरुन ठेऊन,पी.के. सर क्लासबाहेर निघुन गेले.
प्रतेक वर्षी विद्यार्थी नवीन पण पी. के. सर त्यांच्या बोलण्यातून त्याच आर्ततेने नाटकातील प्रतेक सीन उभे करायचे. गारुड, संमोहन की काय म्हणावे समजत नसे.

ते कॉलेजचे दिवस, सरांचे अनकंडीशनल अँड जस्ट एक्सलंट लेक्चरस् ‼ सारी बँच तहान, भुक, वेळ विसरुन पी. के. सरांचे ड्रामाटीचिंग एन्जोय करायची.
😻😻😻😻😻😻😻😻😻😻

डे ष्टी नी ने शिवगंगा, रोजकडून रश्मी आणि जितकडे मोर्चा वळविला.
“रश्मी, जीत  मला दोन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मदत करा न प्लिज.” नियती स्वत:च्या प्रश्ना बाबत खरच गंभीर दिसत होती.
“एक्सक्युज मी प्लिज. मी आलेच हं !” म्हणून रश्मीने स्वत:चा मोर्चा दुसरीकडे वळविला.
होस्टेलमध्ये नियती एक परफ़ेक्ट व्यक्तिमत्व म्हणून परिचित होती. तीचं असं प्लिज बोलून मदत मागणे जीतला अजिबात रूचले नाही.
जीतने नियतीला स्वतःच्या बाजूला बसायला सांगितले.  नियतीशी काही गोष्टी बोलून तिला काही कानमंत्र दिला. “ओके डन👍. लेट अस मीट ऐट दि डायनिंग टेबल बाय 9-00 पी.एम.” म्हणून नियती आणि जीत दोघीनी पर्समधून बूक्स काढून वाचनात गढून गेल्या.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

खिडकीबाहेर पहात असुनपण शुन्यात नजर लावून बसलेल्या रोजच्या खांद्यावर रश्मीने डावा हात ठेवला आणि रोजचे हात आपल्या उजव्या हातात घेतले.
ढग बरसावे तसे रोजचे डोळे बरसत राहिले.
आकाश नीरभ्र होईपर्यंत काळे ढग बरसतात आणि मग सारीकडे स्वछ दिसते, तसेचं कांहीसे रोजच्या बाबतीत घडत होते.
रोजच्या गोऱ्या गालावरून आसू ओघळत होते. नाकाचा शेंडा, गाल लाल झाले होते. गुलाबी डोळे बरसत होते. दोघी निशब्द होत्या.

😭😚😭😚😭😚😭😚

हातात पुस्तक घेउन जीत आणि नियती रायटर बद्दल बोलत असताना हसत खिदळत दोघीनी रूममध्ये प्रवेश केला. परम आणि गीत यानी अनाउन्स केले, “आज चार वाजता सर्वजण बाहेर जाणार आहोत. साडे तीन वाजता तयार होऊन खाली हॉलमध्ये भेटू.”
कोणीच संध्याकाळचा विशेष प्रोग्राम ठरविलेला नव्हता.
परम आणि गीत ने केलेल्या अनाउन्समुळे बाहेर एकत्र वेळ घालवायला मिळेल म्हणून सगळ्याच खुश झाल्या.

9999900000999990000099999999

रात्री नऊ वाजता सगळ्या डायनिंग टेबलजवळ जमल्या. संध्याकाळच्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे सगळ्या फ्रेश मूडमध्ये होत्या. अद्याप वीणेचे स्वर आणि संगीताचे सूर यांची जादू काना, मनात गूंजत होते. तरी सरु जरा गप्प गप्पच होती.
नियतीने तिची गरज पुन्हा सांगितली.
“माझ्या मुंबईतील प्रोजेक्ट ऑफ़िसमध्ये सायन्स ग्राज्युएट कँडिडेट उद्यापासून हवा आहे. मी सकाळपासुन सांगायचा प्रयत्न करतेय पण…
पहिल्या वर्षी पाच हजार रुपयेच पगार असेल.आणि… ” नीयती, पॉज घेउन पुढे बोलण्याअगोदर रश्मी मध्येच बोलली.
“डोंट वरि डे ष्टि नी, रोज विल जॉईन युवर ऑफ़िस टुमारो.” रश्मी नियतीकडे पहात बोलली. नियतीने भूवया उंचावल्या. नियतिच्या हातातला डाळ भाताचा घास आ वासलेल्या तोंडासमोर राहिला.
रोजकडे पहात रश्मी म्हणाली, ” रोज, तुझे रिजाईन लेटर दे मला. सकाळी माझ्या ऑफिसला जाताना मी देते तुझ्या ऑफिसच्या बॉसकडे.”
रश्मीने ताटात राहिलेला शेवटचा डाळ भाताचा घास तोंडात सरकवत बोलली, “हं, बोल नियती तुझा एक प्रश्न सॉल्व झाला. दुसरा प्रश्न काय आहे?”
“रम्भा, उर्वशीला पृथ्वीवर मर्त्यलोकात जाऊन रहा म्हणून शाप मिळाला तसाच शाप शंकराचार्यानी सरस्वतीला दिला असेल का गं नियती?” गंगाने श्यक्यता वर्तवली.
“पटत नाही. पण उत्तर मला माहीत नाही.” गीत बोलली.

“पुर्वी वेद, उपनिषद, धर्मीक ग्रंथांवर चर्चा व्हायच्या. त्याला वादविवाद असे संबोधले जात असे. प्रतेक धर्माचे पंडीत अपल्या धर्माचे महत्व सांगत असत. अशा चर्चांमधून ग्रंथातील तपशील, अर्थ, उद्देश आणि इतर बऱ्याच गोष्टींवर आणि त्यामधून प्राप्त केलेल्या ज्ञानावर मंथन केले जाई. नवशिके, तज्ञ, जनता यानां त्याचा लाभ होत असे.” जीतने पंडीत, आचार्य यांच्यामध्ये चालणारे वाद आणि त्या मागचा उद्देश सांगितला.

“एकदा एक धर्म मार्तंड असेच संपुर्ण भारत फिरत स्वत:च्या दिव्य ज्ञानाने समोरच्या विद्वान पंडितांना चितपट करत सर्वत्र डंका मिरवत होते. त्यानी सरस्वतीला प्रसन्न करुन तिला बंदी बनविले होते. मंडनमीश्र पंडीतजीनी प्रत्यक्ष ब्रम्हाचे कन्यारत्न, सरस्वतीला अंकीत करुन तिच्याद्वारे विवाद सभा जिंकत होते. वेद, पुराण, उपनिषदे, गिता, महाकाव्ये कशावरही चर्चा करताना समोरचा विद्वानपंडीत हमखास हरत असे. याबाबत शिवलीलमृत नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामधे जगद्गुरु शंकराचार्य आणि पंडीत मंडणमिश्रजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेख आहे.” रश्मी नियतीकडे पहात बोलली.
संपुर्ण भारत वर्षात पंडीत मांडनमिश्र याना जिंकणारा कोणीच मिळाला नाही. पंडीतजीनी शेवटी वादविवादासाठी भारत वर्षातील धर्मपीठ प्रमुखाना आवाहन पत्रे पाठवली. आणि जगद् गुरु शंकराचार्यानी आव्हान स्विकारले.
अत्तापर्यंत संपुर्ण भारतवर्षात ज्या पंडीताना वादविवदात जिंकले होते त्याना मिश्रजीनी शिष्यत्व स्विकारायला लावले होते.
असे हे प्रकांड पंडीत आणि शंकराचार्य यांची सभा भरुन चर्चेला, प्रश्न- उत्तराना सुरुवात झाली. चर्चा उपनिषदे गीता, महाकाव्येआणि इतर विषयापेक्षा वेदांवर केली जाई. रिग्वेद पासुन चर्चा सुरु झाली. चर्चेदरम्यान आचार्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मिश्र पंडितजींकडून अचुक उत्तरे मिळाली. यजुर्वेद बाबत पण तेच झाले.
पृथ्वीतलावर अशाप्रकारे सर्व प्रश्नाची उत्तरे देणे कोणालाही श्यक्य नाही हे जगद् गुरु शंकराचार्य जाणून होते. प्रत्यक्ष ब्रह्म आणि सरस्वतीच इतक्या अचूकपणे उत्तरे देऊ शकतात हे सुददा त्याना माहित होते. साम वेदाच्या चर्चेच्या वेळी पण तीच अवस्था झाली. पण्डित जी नी सर्व प्रश्नांची अचुक उत्तरे दिली.

व्यासपीठावर बैठक व्यवस्था नेहमीसारखी होती. व्यासपिठा वर प्रकांड पण्डित मंडण मिश्र जी याना बसण्यासाठी आसन ठेवले होते त्यामागे पडदा लवाला होता. गाद्यांवर शुभ्र चादरी पसरल्या होत्या. मंडपात जनतेला बसण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था केली होती.

सरस्वतीला प्रसन्न करुन घेउन मिश्रा पण्डितजिनी तिची स्थपना एका मध्याच्या घटात केली होती. त्या मुळे समोरुन आलेल्या प्रश्नांची अचुक उत्तरे दिली जात असत. पण मद्याच्या नशेमुळ चांगले – वाईट यातील फरक समजत नसे. सदर बाबीचा उल्लेख ग्रंथात केला आहे.
आता चर्चेसाठी शेवटचा अर्थात अथर्व वेद घेण्यात येणार होता. उत्कंठा वर्धक वातवरण. श्वास रोखून जनता आणि सर्व वीद्वान पण्डित या सर्वोच्य क्षणाची वाट पहात होते. जगद गुरु उपाधी असलेले श्री शन्कराचार्य आणि खुप मोठया सन्खेने मोठ मोठया पंडीताना वादविवादत जिंकून स्वत:चे शिष्यत्व पत्करायला लावणारे प्रकांड पण्डित मिश्र जी. दोघेही खणखणीत अन विद्वान. चर्चा करणे, मुद्दा मांडणे, खोडून काढणे ई. मध्ये अंतीम विजय टप्प्यात दिसू लागला.
अथर्व वेद अणि त्यावरील चर्चा सुरु करत असताना गुरुनी अगदी सुरुवाती पासुन शेवटच्या घटनेचे मनोमन पुन:स्मरण केले. पण्डित जिंच्या बाजुला असलेला पडदा अचार्याना खटकत होता. काय असेल पडद्या मागे?

अचार्यांच्या दृष्टीने मनात आलेली शंकचे समाधान करायचे असेल तर आज आणि आत्ताच करता येइल अन्यथा केव्हाच नाही.
अचार्यजीना सरस्वतीची एक उणा पॉईंट माहित होता. सरस्वतीला ग्रंथ मुखोद् गत होते. तिला सर्व प्रश्नांची उत्तरे माहित होती. ती प्रथम चरण बाबत उत्तर अचुक देई. त्या नंतर द्वितीय, तृतीय … असे क्रमाने प्रश्न विचारला तर ती झटपट उत्तर देत असे. परंतू त्रितीय चरणा ऐवजी मधेच आगोदरच्या चरणतील महीती विचारली तर तीला उत्तर देता येत नसे. नेमका हाच धागा पकडून अचार्यानी पुर्वी झालेल्या चर्चेचा दाखला देऊन आगोदरच्या टॉपिक वर प्रश्न विचारला. आणि अपेक्षे प्रमाणेच घडले. पण्डित मांडण मिश्र जी ना शन्कराचार्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.
अचार्य स्वत: जगेवरुन उठले आणि पडदा बाजुला सरकवला.
आश्चर्याची गोष्ट दिसली. पडद्या मागे घट स्थापन केला होता. त्या घटावर सरस्वतीचे मुख दिसत होते.

“आचार्य स्वत:च्या संतापावर नियंत्रण ठेऊ शकले नाहीत.
आणि त्यांच्या तोंडून ते कठोर शब्द बाहेर पडलेच.”
रश्मीने दिर्घ श्वास घेउन समोरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

पुढिल भागात वाचा……. संपुर्ण विश्वाची सिस्टिम् बदलणारा आचार्यांचे कठोर उद्गार आणि बरच काही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles
vithal

English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”

हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

Read More

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More