भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️
भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”, बालिका प्रार्थना, बालिकांचे अंजनी स्तोत्र, काकु मरत का नाही लवकर❓️
भाग – 43* रेक्टर काकूंनी का धारेवर धरलं रश्मीला ❓️ कुठे गेल्या साऱ्याजणी ❓️किती कावळे उडाले ❓️ कोणासाठी खरेदी ❓️
भाग – 44 * “ती…..”, एस. टी. मध्ये रश्मीला अश्रु अनावर का झाले ❓️मार्क्स, मेरिट इतके महत्वचे आहेत का ❓️ अनंत की, अँथोनी मामा ❓️
भाग – 45 * रश्मी जीवनदात्री कशी ❓️ गजकटी, सिंहगती ? माझं बाळ मिळालं/ आईचं प्रेम ❗️शुभाने कोंडी फोडली❗️करण मिळालं ❗️पुढे काय❓️
अनोखा बालदिन ❗️
भाग – 46* ‘… मुssखडा दिखा दो’ असं संजय कोणाला म्हणतो? मयूर वसाहत, डोंगरावरचा महागणपती❓️मानो या न मानो ‼️
भाग – 47* नेत्रा, लता कित्ती प्रश्न ❓️❓️सौगंध : रश्मीला चक्कर..❓️ चांदीचे ताट, मोह, वेळीच धडा मिळाला, मोह कुठे नेतो ❓️ खूपच फ्रेश वाटतय आता❗️
भाग – 48* भक्तरंगी रंगणारा मायबाप तू अभंग, 🔯प्रेम♥️🌺 भक्ती 🌺🙏🔯, घर सोडणं पहिला आघात ❗️, मळ्यातल्या खोपीत राहणं दुसरा आघात‼️
अनोखं बाळंतपण ❗️, असा उन्हाळा नाही पहिला❗️🌕, घात झाला 😭
भाग – 49* दुसरे ग्रह पे नही जाना हैं ❗️, दीदीचा सल्ला‼️🌺, शासन आणि निर्णय बिर्णय, ज्ञान – विज्ञान, भेटायलाचं घेऊन यायचं ❗️
भाग – 50 * पंचवीस रुपये थाळी अर्थात
एक ताट, पन्नास वाट्या ❓️नियम बियम : लेट एन्ट्री आणि फाईन, गेट वे अन् क्वीन्स नेकलेस ‼️ रश्मी साठी मोठं सरप्राईझ ‼️ नाना आत्या ‼️ नाना आत्याच्या नाना आठवणी.., अण्णा – अधुरी एक…?
हादगा, खिरापत अन्.
भाग – 51 मंथन, बलुतेदार – थोडंसं, निसर्ग नियम, 👣 काळाची पाऊले -1, 👣 काळाची पाऊले -2, 👣 काळाची पाऊले – 3
भाग – 52 * कल 👩🦳 – आज💃 – कल 👶, विश्वास – बिश्वास 🤔❓️”कोणती ऐकणार❓️चांगली 👌की वाईट👎‼️” तुमचा हात पकडणार नाहीं, मॅडम ‼️यांच्या पासून सावध रहा, सूची‼️
भाग – 53* अर्थार्जन अन् अर्थ साक्षर, तुळसीमाळेतील मणी हसले ‼️
निरक्षरता ❓️ कोणती ❓️❓️ परिणाम 🤭
अर्थार्जन अन् अर्थसाक्षर ‼️💰1+2-3÷4×5
विचार आणि मते; पक्की आणि बुद्धी प्रगल्भ होण्यासाठी भरपुर वाचन, उच्च शिक्षण, अनुभव या गोष्टी मदत करतात.
पूर्वी लग्नाच्या वेळी मुलीचे वय लहान असे. नवं विवाहितेला स्वतः विचार करून निर्णय घेणे, तो अमलात आणणे या गोष्टींची आवश्यकता भासत नसे. एकत्र कुटुंबातील बुजुर्ग माणसे नवीन नवरीला अनुभवाचे बोल सांगून हळूहळू जबाबदारी देत असत.
कालांतराने या साऱ्या गोष्टी बदलल्या. कालौघात एकत्र कुटुंब पद्धती ही जवळ जवळ नष्ट झाली. लग्नाचे वय बदलले. मुलीं शिक्षण घेऊन स्वावलंबी बनू लागल्या. आर्थिक स्वावलंबनामुळे इतर बऱ्याच गोष्टींसाठी कवाडे खुलविली गेली. भरल्या पोटी तत्वज्ञान सुचते. तसेच पैशाने भरलेला खिसा, हातात खुळखुळणारा पैसा माणसाला; नेहमीपेक्षा वेगळा आणि नावीन्यपूर्ण निर्मितीक्षम विचार करायला प्रवृत्त करतो.
नोकरदार महिला कुटुंब, मुले – बाळे यांना सांभाळत नोकरी, व्यवसाय करु लागल्या. महिलांच्या कार्यकक्षा रुंदावल्या. अष्टावधानी बनून कुटुंबहिताबरोबर समाजहीत, देशहित किंबहुना मानव जातीच्या हितासाठी महिला मोठ्या प्रमाणात झटू लागल्या. आवडीच्या क्षेत्राची निवड करण्याची संधी मिळू लागली. संधीचे सोने करण्यासाठी लक्ष्य ठरवून त्यादृष्टीने जीवापाड मेहनत करत लक्ष्याप्रती वाटचाल सुरु झाली.
अर्थार्जन करणे म्हणजे आर्थिक स्वावलंबन असे म्हणता येईल का ❓️ उत्तर नाही असे येईल. अर्थार्जन करणारी प्रत्येक व्यक्ती अर्थसाक्षर असतेच का ❓️ या प्रश्नाचे उत्तर पण नाहीं असेच येईल. त्यासाठी व्यक्तीला अर्थसाक्षर व्हावे लागेल. अर्थसाक्षरतेचे शिक्षण कोठे मिळते ❓️ शाळेत
अर्थसाक्षरतेचे शिक्षण मिळते का ❓️ उत्तर नाही असेच असेल. जीवनभर ज्या गोष्टीची साथ असते त्या पैशाबदद्ल औपचारिक शिक्षण शाळेत शिकविले जात नाही. आपण अर्थसाक्षर नसलो तर काय होते ? याचे भयानक अनुभव कसे सहन करावे लागतात ? आणि त्यामूळे स्वतःलाच नव्हे तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या कुटुंबियांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते ? याला इतिहास साक्षीदार आहे. किंबहुना कमावणारी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक उपभोक्ता “अर्थसाक्षर” असायलाच हवा.
लहान – मोठा, स्त्री – पुरुष, घरातील, समाजातील प्रत्येक घटक “अर्थसाक्षर” असायलाच हवा. खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक अवाक असलेल्या असामीच अर्थसाक्षर असाव्यात असंच काही नाही. अर्थ सक्षरतेला वयाची अट नाहीं. लहानपणी मुलानां मिळणाऱ्या पॉकेट मनीच “योग्य नियोजन” हा अर्थसाक्षरतेचा छोटासा भाग होऊ शकतो. तसंच लाखो, करोडो रुपये आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती कामावणाऱ्या व्यक्तीसाठी अर्थसाक्षर असणे, अर्थ नियोजन करणे हे अपरिहार्य घटक आहेत. नियोजन, साक्षरता आणि आवश्यक गोपनीयता नसेल, सारं राम भरोसे असेल, तर त्यांचे दूरगामी परिणाम संबंधिताना कोणत्या गोष्टीचा सामना करायला लावतील याचा भरोसा काय ❓️ ❓️❓️
@@@@@@@@@@@@
निरक्षरता ❓️ कोणती ❓️❓️ परिणाम 🤭
“ए, राजा ❗️चल, चालता हो घरातून. तुला ना घरातील वस्तू मिळणार, ना बिजनेसमधील वाटा. आताच्या आत्ता नीघ.” प्राण आपल्या मोठ्या भावाला एकेरी तर बोललाच पण त्याच्या आवाजाची धार राजेंद्रचे काळीज आणि मन रक्तबंबाळ करत गेली.
वडिलांच्या निधनानंतर बिझनेसची सर्व सूत्र राजेंद्रने आपल्या हातात घेतली. वाडवडिलांपासून चालत आलेला कपड्यांचा व्यवसाय मेहनतीने वाढवला. एकाची चार दुकानें झाली. राजेंद्रचा लहान भाऊ प्राण शिक्षण घेत पैशाचे सर्व व्यवहार सांभाळत होता. प्राणने ग्रॅज्यूएशननंतर एम. बी. ए. पुर्ण केलं.
प्राण आता पूर्ण वेळ घरच्या बिझनेसमध्ये लक्ष्य घालून पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत जून्या दुकानांचे एम्पोरियममध्ये रुपांतर केले. करोडो रुपये खर्च करुन इंटेरीयर डिझाईन करुन एम्पोरियमची आकर्षकता वाढवली. वेगवेगळे कपडे परिधान केलेले मैनेक्यूची ग्यलरीचं तयार केली. तो प्रयोग इतका यशस्वी झाला की, येणारे, जाणारे लोक गाड्या थांबवून मॉलमध्ये फेरफटका मारु लागले. आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाहुन एम्पोरियममध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्तेक ग्राहकाच्या चेहरऱ्यावर खुशी दिसून येत असे. सर्व प्रकारचे कपडे, लोकांच्या विशेष करुन महिलांच्या आग्रही मागणीवरुन ऐक्सेसरीज़, लहानांसाठी, कॉलेजगोइन्ग तरुणी, तरुणांसाठी चोइसेबल सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने बिझनेस आणखी मोठया प्रमाणात वाढला. छोट्या, मोठया शहरात मॉलची साखळी तयर झाली. सहाजिकच छोट्या, मोठया शहरात मागणी प्रमाणे बिझनेस वाढवला गेला.
थंडगार ए. सी., मंद संगीत, सुगंधीत हवा, स्वछता आणि निर्जंतूक स्वछता गृहे, टापटीप याना प्राधान्य दिले. आर्जवी भाषा आणि आदरातिथ्य पाहुन येणारे ग्राहक खुश असत, आनंदाने आणि सढळ हाताने खरेदी करत.
दरम्यान राजेंद्र आणि प्राण दोघांची लग्ने होऊन घरात मुलांचे गोकुळ तयार झाले होते.
प्रतेक मॉलसाठी उच्च शिक्षित व्यवस्थापक नेमून जबाबदारी ठरवून दिली होती. राजेंद्रशेठने कधी प्रत्यक्ष भेट तर कधी ऑनलाइन मीटिंग घेउन स्वत:ला आणि स्टाफला अद्यावत ठेवले होते. पैशाचे सर्व व्यवहार प्राणच पहात होता.
सगळ व्यवस्तीत चालू होते. सकाळपासून रात्रीपर्यंत दोघे भाऊ आणि त्यांचे प्रामाणिक नोकर जीवतोड मेहनत करत होते.
“प्राण, उद्या मी औरंगाबादच्या साइट वर जाऊन येतो,” डायनिग टेबलजवळ जेवणासाठी सर्वजण एकत्र बसले असताना राजेंद्रने प्राणला सांगितले.
बोलल्याप्रमाणे राजेंद्र मुंबईहून फ्लाईटने औरंगाबादला जाऊन सर्व नियमित कामे करुन दोन दिवसानी परतला. राजेंद्र्शेठच्या मनाला
काहीतरी सुटल्याची, महत्वाचे काहीतरी काम राहुन गेल्याची बोच लागून रहिली पण नेमकं काय राहिलं ते लक्षात येइना.
नेहमीप्रमाणे कामात गुंतल्यामुळे राजेंद्रशेठ औरंगाबादच्या साईटच्या कामाबद्दल विसरुन देखील गेले.
एक दिवस अचानक औरंगाबादच्या साइटवरिल मॅनेजरचा फोन आला आणि…..
“राजेंद्र शेठजी, संपुर्ण मॉल शार्टसर्किटने जळुन खाक झाला. आपली अग्नीशमन यंत्रणा कुचकामी ठरली. अग्निशमन यंत्रणेचे नुतनीकरण करायचे राहुन गेले होते.” हताश आणि भयभीत अभिजित मैनेजर
नेमकं बोलून थांबला. आणि राजेंद्रशेठच्या मनाला लगलेली बोच आठवली. एव्हाना आगीच्या लोळाबरोबर बातमी सोशल मिडियावर पसरली आणि मॉल मालकाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं गेलं.
जीवित हानी झाली नव्हती तरी कंपनीच्या रेप्यूटेशनवर परिणाम होणार हे निश्चीत होत. सोशल मिडियावर ऍग्रेसिव होवुन बातमीदार प्रश्न❓️ विचारत होते. याचा एकदम गंभीर परिणाम सर्वत्र झाला होता. आणि या वरूनच प्राण आणि राजेंद्र यांच्यामध्ये वाद झाला आणि तो विकोपाला गेला. वाद कसला, एकटा प्राण बोलत होता अणि बाकी सारे ऐकत होते.
सर्व पैशाचे व्यवहार प्राणच्या हातात होते आणि तो बेभान होऊन सांगत होता, “ए, राजा ❗️चल, चालता हो घरातून. तुला ना घरातील वस्तू मिळणार, ना बिजनेसमधील वाटा. आताच्या आत्ता निघ. नुसता मनस्ताप झालाय. निकम्मा कुठला.”
“प्रचंड उत्साही, सर्जनशील, नवनिर्माणमध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तीला जबरदस्तीने निष्काम ठरवणे हे एकदम वाईट ‼️ याचा अर्थचं शरीराबरोबर मनाला आणि आत्म्याला दुख:वणे.” प्राणच्या बोलण्याने राजेंद्रचे
मन रितेपणाने भरुन आले.
राजेंद्रशेठ स्वत:ची बायको; मंजिरी, दोन्ही मुले मित्राय अणि शचीला घेवुन वाड्याबाहेर पडला खरा पण कोठे जाणार ? कोठे राहाणार ? काय करणार ? माहीत नव्हते. राजेंद्रशेठमधल्या शेठला; भाऊ प्राणने संपवले होते. राजा आणि इंद्र फक्त नावातच राहिले. आता तो एक भणंग आणि कफल्लक अतीसामान्य मनुष्य होता. फक्त रंकच, ना पतीचे ना पित्याचे कर्तव्य पार पाडू शकत होता. बायको मुलांची फरफट पाहावत नव्हती.
“सगळे व्यवहार मनापासून केले मी, पण जन्मभर अर्थनिरक्षर राहिलो. आज माझी अर्धांगीनी मंजिरी अणि दोन्ही मुले माझ्या अर्थनिरक्षरतेचा बळी ठरली” राजेंद्रशेठ स्वत:ला दोष देत राहिला.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
तुळसी माळ बोलली, टाळ वाजले ‼️
संजन आपला भाऊ, बायको, मुलांबरोबर सुखाने रहात होता. संजन स्वत: उच्चपदस्थ शासकीय अधिकारी होता. जोडीला गावच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न असल्यामुळे खाऊन, पिऊन समाधानाने रहाणारे सुखवस्तू व्याख्येमध्ये गणले जाणारे कुटुंबिय. संजनचे कुटुंबीय खुपच संस्कारी होते. घरच्या मोठ्यांकडून किंवा छोटयांकडुन अवाजवी मागणी किवा अपेक्षा कधीच नसे. नाकासमोर चालणारा संजन आणि त्याचे सरळमार्गी कुटुंबीय अशीच समाजात ख्याती आणि प्रतिष्ठा होती. नियमित सण – उत्सव, पाहुणे – राउळे, लग्न – मुंजी आणि आल्या – गेल्यांचा पाहुणचार संजन आणि त्याची पत्नी दिया मनपूर्वक व्यवस्थित सांभाळत असत. त्यांचे कुटुंबं सुखी, समाधानी, आनंदी होते.
संजन आज कामावरून घरी आला तेव्हा तो भलताच खुश होता.
नेहमी वायफळ आणि अनावश्यक खर्चासाठी कुरकुर करणारा संजन आज येताना भरपूर खाऊ, मुलगा विहानसाठी खेळण्यातली रिमोटची महागडी कार, पत्नी दियासाठी डिझायनर ड्रेस, स्वतःसाठी व्हिस्कीची बॉटल आणि भावासाठी महागड्या सिगरेटचे पॅकेट घेऊन आला. पत्नी; दियाला त्याच्या या खरेदीच रहस्य समजलं नाही. घरात कोणतीही खरेदी करताना पत्नीला बरोबर घेऊन जाणारा संजन अचानक काहीही न बोलता न सांगता इतकी सारी खरेदी एकट्यानेच केली हा दियासाठी पहिला धक्का होता. व्हिस्कीची बोटल हा दुसरा धक्का होता. या अनावश्यक गोष्टींसाठी एवढा खर्च ❓️मनात निर्माण झालेला प्रश्न दियाने मनातच दडपून ठेवला.
चेरी रेड रंगाच्या रिमोट कारबरोबर खेळणाऱ्या विहानच्या
चेहऱ्यावरील ख़ुशी पाहून आनंदाने चमकणारे संजनमधील बापाचे डोळे पाहून; पत्नी दियाने स्वतःच्या मनातील प्रश्न अलगदपणे बाजूला सरकवला. अगोदरच संकोची स्वभाव असलेली दिया, दीर आणि मुलासमोर नवऱ्याला स्पष्टपणे स्वतःच्या मनातील प्रश्नपण विचारू शकत नव्हती.
तरीपण दियाच्या नजरेतील प्रश्न संजनपर्यत पोहोचलेचं.
आपली पत्नी दिया क्षणिक सुखाचा विचार करून निर्णय घेणारी किंवा निर्णय घेऊ देणारी नाही. तत्वाशी तडजोड करणारी तर बिलकुल नाही. आजच्या खरेदीबाबत पत्नीच्या मनात निर्माण झालेले प्रश्न काही काळ बाजूला सारू शकतो पण कायमचं टाळू शकत नाही हे संजन जाणून होता.
“बाबा, एवली मोठी गाली तुला कुठून मिळाली ❓️” मध्येच बोनस मिळाला का तुला ❓️” लाल गाडीच्या रिमोट बरोबर खेळता खेळता मुलगा विहानने प्रश्न विचारला.
गेल्याच महिन्यात संजनची बदली उपनगरात झाली होती. दियाला तिची मैत्रिण; पंखुडीने बोललेले वाक्य आठवले.
“अरे, वो एरियामे जानेवाले अच्छे अधिकारीयोंकॊभी उधर के लोकल लोग, खिला – पिला कर बिघाड देते है |” पंखुडी सहज बोलून गेली.
“लेकिन क्यूँ “? दियाच्या मनातील प्रश्न तितक्याचं सहजतेने बाहेर पडला.
“ऐसे लोगोंके काम मे परफेक्टनेस नाही रेहता हैं| आधे अधुरे, गलत कामपर का ध्यान हटाने के लिए, सरजी, मॅडमजी कर के जबरदस्तीसे बडदास्त रखते हैं |” पंखुडीने कार्य आणि कारण भाव दोन्हीही सांगितले.
पण “कांही गोष्टी लपविण्यासाठी नियमाना बगल द्यायला भाग पाडणारा तेवढाच जबाबदार असू शकतो, जो या ना त्या कारणाने नियम तोडतो किवा त्यातून चुकीच्या पद्धतीने पळमार्गाने जातो.” हातात हात घालून आनंदाने एकत्र नांदणाऱ्या मानवी हिताच्या काही गोष्टी वेगळ्या झाल्या की, कली शिरलाच म्हणून समजून जावे. “सत्य, प्रामाणिकपणा, आत्मसन्मान आणि कार्याप्रती
असलेली निष्ठा यांचा बळी जाण्यासाठी एका हाताने टाळी वाजत नाही, हे सत्य असले तरी त्यामागे कदाचीत मजबुरी असू शकते. ”
इकडे संजनला सकाळचा तो प्रकार आठवला. त्याच्या हातात जबरदस्तीने टेकवले गेलेले जाडजूड ब्राऊन कलरचे पाकीट आणि,
“अरे, आप ए क्या कर रहे हैं❓️” असा घशातून निघालेला क्षीण आवाज” पूर्णपणे बाहेर पडायच्या अगोदर शरीर, मन, बुद्धी तिघांची घालमेलं स्पष्ट जाणवत होती. ‘त्याच्या शरीराची कंपने, हृदयाचा चुकलेला ठोका, मनाची दोलायमान अवस्था आणि स्थिर बुद्धीची हललेली पाळेमुळे, तळ हाताला सुटलेला घाम अन् अंती झालेला क्षणिक आनंद ¡ ‘
“काय करू याचं ❓️❓️कित्ती जड आहे हे ❓️ ना हाताला ना मनाला पेलवत होतं.” संजन रुद्ध कंठाने स्वतःशीच स्वगत बोलला.
संजन तसा नाकापुढे पाहून चालणारा मनुष्य. आपल्या कमाईत समाधानाने राहणारा कुटुंबवत्सल, संस्कारी मनुष्य. माळकरी वडिलांची गळ्यातील तुळसी माळ, कपाळावर बुक्क्याच्या मधोमध लावलेला चंदनाचा टिळा, मुखात ज्ञानोबाच्या ओव्या आणि तुकोबाचे अभंग; आपल्या मुलांना वेगळे कांही सांगायची गरज आहे हे वडिलांच्या ध्यानीमनी नसे. संजन आणि त्याची बहीण सनईवर; बाबांच्या आचरणातून संस्कार
झिरपत गेले. संजन आणि सनईच्या बाबांचा सावळ्या रंगाकडे झुकणारा वर्ण पण मन अगदी शुभ्र दुधासारखे. वाईट आचरण दूरच राहिले. मनातच काय स्वप्नातसुद्धा वाईट विचार शिरकाव करू शकत नव्हते. बोलण्या आणि वागण्यात तफावत ❓️ छ्या ‼️अश्यक्य कोटीतील बाब”.
बाबांनी संजनला, ‘हे चांगले ❗️हे वाईट ❗️’ असं कधी सांगितलं नाहीं. ‘हे कर❗️ हे करू नको ❗️,’ असही कधी बोलले नाहीत. शहाणा संजन आणि समजूतदार, शहाणी सनई ; आपल्या नेत्रांनी बाबांची वागणूक, स्पर्शातून प्रेमळपणा, बोलण्यातून स्नीग्धाता टिपत राहिले.
कधी, कधी बाबा आकाशा एवढा मोठा वाटे. संजन, सनईला त्यांची नजरसुद्धा आकाशायेवढ्या बाबापर्यंत पोहोचतच नाही असे वाटत राही. मग बाकी इतर गोष्टी बाजूलाच राहतात. खंत वाटायलासुद्धा बाबाचा मोठेपणा अकळायला हवा.
बाबा पासून किती अंतरावर आहोत हे माहीत असण्यासाठी तेवढी प्रगल्भता येणं बाकी होत. आपण त्यांच्यासारखे होऊ का ❓️ कदाचित नाही … याची खंत वाटे. बाबा आकळले की नाही ❓️ हे केव्हां सिद्ध होणार ❓️
सिद्ध होण्यासाठी माणसाला स्वावलंबी व्हावे लागते. स्वतः काही निर्णय घ्यावे लागतील. बाऱ्या वाईटची संकल्पना कितपत रुजली हे तेव्हाच समजेल.
आज स्पष्ट जाणवलं संजनला. समजलं आणि उमजल सुद्धा. कळलं आणि वळलं पण. जसे न बोलता बाबांच्या गळ्यातील माळ बरच काही सांगायची. तसंच मगाशी काही न बोलता बायको रियाची नजर बरेच प्रश्न ❓️❓️❓️विचारून गेली.
शेवटी एका ठाम निष्कर्षांप्रत आल्या नंतर जड मन शांत झाले आणि गुंतागुंतीच्या विचारांची खळखळ संथ झाली.
बाबांचे आणि आईचे संस्कार मनामध्ये इतके रुजले होते की, अटीतटीच्या वेळी त्यांचा चेहरा आठवे आणि प्रसंग निभाऊन जाई.
“सकाळी भेटीच्या दरम्यान पाकिटाबाबत घडलेला प्रकार पहिला अणि शेवटचा असेल आणि
यापुढेही असेच ठाम विचार राहतील”, संजन दीर्घ स्वास घेत बोलला. तेंव्हा त्याचा चेहरा तणावमुक्त वाटत होता.
तुळशीच्या माळेतील प्रत्येक मणी हसला,
आईचा सुरकुतलेला चेहरा स्नीग्धाळला,
प्रश्न पुसले जाऊन, पत्नीचा चेहरा उजळला,
अन् लहान मुलाना संस्कारच आकळला ||
आज समजले बाबा आकाशा एवढा,
आईचे संस्कार व्याख्येतुन काढा
पत्नीच्या जरबी नेत्राना निसंकोच भिडा
दूरदूर जाईल वाईट गोष्टींचा किडा ।।
मनावरचं मळभ असं अचानक दूर झालं
निरभ्र आकाशात दिवसा चांदण फुललं
जडाळलेल्ं मन, मस्तक हलकंफुलकं झालं
घरातील सर्वांच्या गाली मस्त कळी खुलली ।।
@@@@@@@@@@
“आपण स्वावलंबी आहोत. अर्थसाक्षर आहोत. शिकलेल्या आहोतच. वैचारीक प्रगल्भता आहे. हाव, आस आणि खंत नाही.
लग्नसंस्थे बाबत काही वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या विचित्र गोष्टींचा भुंगा मन कातर करत होता.
लग्न काही दिवसावर येऊन ठेपलय. लग्नाच्या अगोदर मन कसं छान प्रसन्न हवे पण अतिविचरामुळे मेंदू थकला होता. कसे असतील लग्नानंतरचे दिवस? सगळं ठिक होइल ना? या आणि अशाच काही प्रकारच्या प्रश्नांची मालिका ? ? ? रश्मीचा पिच्छा सोडत नव्हती.
“लग्ना अगोदर मनात भिती का डोकवतेय आपल्या?” रश्मी स्वत:शीच पुटपुटली. रश्मीची अवस्था तिची मैत्रीण रोजच्या लक्षात आली.
“जीवनात स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मैत्रीण रश्मीची मन:स्थिती नाजूक असुन तिला दिलासा देणारे शब्द आणि अश्वस्थ करणारा विश्वस्त हवा आहे,” या निष्कर्षाप्रत पोहोचली रोज आणि शांत झोपी गेली.
रश्मी विचार करुन शिणली आणि झोपेच्या अधीन झाली.
दोघी झोपी गेल्या पण वेगळ्या मनस्थितीत.
💰💰💰💰💰💰💰