मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
अगोदरचे भाग वाचण्याकरिता लिंकवरती क्लिक करा 👉 भाग (क्रमांक)
👉भाग -31* अर्थात अडचणींवर मात मध्ये, पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलासचे पैसे चोरीला गेले. समस्या, ऋता आणि रश्मीपुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली,
👉भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेसमधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
👉भाग – 33* फरक : एका वेलांटीचा फरक – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
👉भाग -34* बोबडकांदा, मीच शहाणी झाले‼️ स्ट्रिक्ट टिचर.
👉भाग- 35*वाचन ‼️ वचन ‼️पाव भाजी, इंटरव्ह्यू का आठवला ❓️
भाग – 36* भेट वस्तू – संकेत‼️ देवी माँ, वंदे मातरम् 🙏 नाटकी रश्मी❓️
सई का नाचली ❓️ आणि .…
• भेटवस्तू – संकेत
“अरे, अरे ‼ ऐसे कैसे जा सकते हैं एक, एक कर के ❓ अब रश्मीका भी सत्कार करो ❗️” कार्यकर्त्यांच्या निघून जाण्यामुळं नाराजीनं, संस्थाचालक कधी नव्हे ते उपरोधिक झाले. हौसेनं निरोप देण्यासाठी एकत्र झालेले शिक्षकवृंद आणि मुलांनी थोडं नाराजीनचं निरोपाचा कार्यक्रम लांबणीवर टाकला.
परंतु मुलांनी स्वतःच्या हातानी बनवलेलं केन – बांबूच्या दोन मजली घराची सुबक कलाकृती पाहून रश्मीटिचर हरखून गेली. मुलांनी स्वतःच्या हातानं, मेहनत अन् मनं लावून इतकी सुंदर, सुबक आणि आकर्षक, प्रेमानं बनविलेली वास्तूभेट रश्मीच्या हृदयात रुतून बसली, कधीही न विसरण्यासाठी. “वास्तू भेट किती टिकेलं माहिती नाही, पण रश्मीटिचरच्या स्मृतीत कायम राहिल हे मात्र नक्की” रश्मीने हसत घरं ताब्यात घेतलं. मुलांच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं तिला. रश्मीला, तिच्या पिढीत आणि मुलांच्या पिढीत झालेले बदल प्रकर्षाने जाणवले. मुलांची समयसूचकता, वैचारिक पातळी, टिचरबद्दल आदर व्यक्त करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी होती. रश्मीच्या लहानपणी ती स्वतः जो विचार करत होती त्यामध्ये आणि आताच्या पिढीमध्ये फ़रक स्पष्टपणे दिसून आला. आताच्या मुलांचा दृष्टीकोन वेगळा आणि प्रगल्भ वाटला. शिक्षक वृंदानी आग्रहानं दिलेलं वॉलक्लॉक : “रश्मी मॅडम जीं, अपका अच्छा टाइम और अच्छा हो! जिंदगी मे सब मंजिले हंसील किजीये. खूब सारी शुभकामनाये ‼️” म्हणून असंख्य, अमूल्य शुभेच्छावर्षाव केला. माता भगवतीच्या मंदिरातं डोकं टेकून भरभरून आशीर्वाद घेऊन यशस्वी जीवनाच्या नव्या वाटेवरील प्रवासासाठी रश्मी निघणार होती. आता विचार काय करायचा? शाळेतील शिक्षकपदाचा राजीनामा दिला तीने. “अगोदर नव्या जॉबला जॉईन व्हायला निघा मॅडम”, सर्वांचा एकचं सल्ला घेऊन रश्मी गाडीत बसली पण निघाली भलत्याचं दिशेला. कुठे निघाली रश्मी???
सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण करूनं कुठे चालली ही?
होता, तो जॉब सोडला. नवीन जागी जॉईन झाली नाही. काय आहे हिच्या मनातं ❓️
कोणाच्याही प्रश्नाला❓️ उत्तर द्यायला तयार होती रश्मी पण प्रत्यक्षात कोणी विचारलं नाही. जो पर्यंत कोणी काही विचारत नाही तो पर्यंत काही बोलणे नाही. पण सुज्ञ जाणतो.
देवी मा !
या पृथ्वीतलावर एक स्वर्ग आहे. त्या स्वर्गात एक सुंदर ठिकाण आहे. तिथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक देवी आहे. त्या देवीच्या मनाद्वारे, तनाद्वारे, श्वासाद्वारे, उत्च्छवासाद्वारे, तिच्या पापण्यांच्या उघड -झापेतून, उठण्यातून – बसण्यातून, चालण्यातून- उभे राहण्यातून तिच्या अस्तित्वातूनचं रश्मीला अखंड आशीर्वाद मिळत होता. मिळत आहे आशा देवीच्या दर्शनाला निघाली रश्मी.
आपला आत्मा परमात्म्याला जोडलाय असं म्हणतात तर रश्मीचा आत्मा “ती” च्या परमात्म्याला जोडलेला होता “जी”च्या दर्शनाला रश्मी निघाली होती. “जी”च्या मुळे रश्मीचं अस्तित्व अधोरेखित होत होतं, त्या “महा अस्तित्व”च दर्शन घेण्यासाठी रश्मी निघाली. रश्मीचा आनंद हाच “जी”चा आनंद होता, रश्मीला झालेल्या त्रासामुळं “जी”ला त्रास होतं होता, रश्मीला झालेल्या दुःखा मुळं “जी”ला दुःख होतं होतं, रश्मीचा अपमान हा “तिला” अपमान वाटत होता, रश्मीचं यश हे स्वतःचं यश समाजत होती. रश्मीला काटा टोचला तर वेदना “तिला” होतं होत्या. रश्मीच्या पंख पसरण्याने “ती”च्याकडून भरारी घेतली जाई. “जी”चं संपूर्ण अस्तित्व रश्मीसाठी होतं “त्या देवीच्या” चरण दर्शनासाठी, भेटीसाठी निघाली रश्मी. “देवीमातेचं” दर्शन घेण्यासाठी. आपल्या नवीन नोकरीला जॉईन होण्यापूर्वी रश्मीला देवीच्या अस्तित्वामुळं स्वर्गाचा दर्जा प्राप्त झालेल्या गावाला, आणि “जीच्या” मुळं मंदिर बनलं त्या ठिकाणी, देवीमातेचं दर्शन घेण्यासाठी निघाली.
वंदे मातरम् 🙏
नेहमीसारखं पहाटे पाच वाजता उठली विनिता. ब्रश केला. चेहऱ्याला पाणी लावलं. संतूर साबण लावून चेहरा, हात, पाय स्वच्छ धुवून शुभ्र पंचाने पाणी टिपलं.
उंबरा धुवून दरवाज्यात पाणी शिंपडून घेतलं. उंबऱ्यावर रांगोळी काढून दरवाजात रांगोळी काढली. हळद, कुंकू आणि कण्हेरीची फ़ुलं उंबऱ्यावर आणि रांगोळीवर ठेवली. दरवाजात दिवा लावून ठेवला . देवापुढे समई आणि तुपाचा दिवा लावला. दोन्ही हात जोडून देवघरातील देव मूर्तींवर नजर फिरवून दत्त मूर्तीवर स्थिरावली. “ओम श्री गुरुदेव दत्त!”, म्हणून क्षणभर डोळे बंद केले. बंद डोळ्यापुढे रश्मीचा हसरा चेहरा दिसला विनिताला. डोळे उघडुन, दत्त मूर्तीवर नजर स्थिर करून “सर्व कल्याण” प्रार्थना केली. ओठातून प्रार्थनेच्या ओळी उमटल्या.
प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा.
“सई, काल रात्रीपासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडतेय.” विनिता अर्धवट झोपेत असलेल्या सईला सांगत होती. “हं, आई, तुझ्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडतेय खूप चांगली गोष्ट आहे. पण माझी झोप अजून पुरी झाली नाही. मला झोपू दे ना”, म्हणून रजई तोंडावर ओढून सईण पुन्हा ताणूनं दिलं.
*******************************
रश्मी, एस. टी. स्टॅण्डवर उतरली तेंव्हा सकाळचे सव्वा सात वाजले होते. स्टॅण्डवर कॉलेज बसची पहिली फेरी पूर्ण झाली होती आणि दुसऱ्या फेरीसाठी बस सज्ज झाली होती. फ्रेश मूडने मुले लाईनमध्ये उभी होती. ओळीने एक एक करून बसमध्ये चढत होती. रश्मी बॅग उचलून रिक्षा स्टॅंडकडे गेली आणि रिक्षातं बसून निघाली. एक एक क्षण महत्वचा वाटतं होता तिला. घरांसमोर रस्त्यावर नुकत्याचं टाकलेल्या साडयांमुळे मातीचा सूगंध भरून राहिला होता. काही ठिकाणी रांगोळीवर ठेवलेली फुले आणि अगरबत्तीचा सुवास मातीच्या सुगंधात मिसळून चित्तवृत्ती पुलकित करणारा वेगळाच गंध दरवळत होता. त्यात कोवळी उन्हं घरासमोरील रांगोळ्या उजळवत होत्या. शाळा, कॉलेजला जाणाऱ्या मुला – शिक्षकांचे प्रसन्न चेहरे, कोवळ्या उन्हाचा मधेमधे होणारा शिडकावा; माती, फुलं, अगरबत्तीचा
संमिश्र गंध मन प्रसन्न आणि शरीर पुलकित करतं होतं. मुख्यरस्ता सोडून रिक्षा डावीकडे वळून मधल्या रस्त्यावरून धावू लागली. परत वळण घेऊन कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, भांड्यांचं, स्टेशनरी दुकान करतं सिलेक्शन एम्पोरियमपर्यंत पोहोचली.
सकाळी बँका, दुकानं बंद होती. दिवाळीच्या कपडे, साड्यांची खरेदी तिथंच केली जायची. रश्मीला तिचा प्लेन पिंक कलरच ड्रेस मटेरियल आणि त्या वर एकचं तिरपा पट्टा असलेला आवडता ड्रेस आठवला. तो ड्रेस आवडतो म्हणून कॉलेजला जाताना सलग आठवड्यातून दोन वेळेस तोच ड्रेस घातला गेला. याचं रस्त्यावर कोणीतरी पाठीमागून आवाज दिला. “ए, माईल्ड, माईल्ड; पिंक युनिफॉर्म आला रे❗️,” तेंव्हा कांही दिवस मंदा, सारला आणि रश्मी कॉलेज बस पकडण्यासाठी वेगळ्या वाटेवरून जात असे. मेन रोडला जाऊन तिकडून बसस्टॅन्ड गाठतं होत्या. बऱ्याच दिवसांनी रस्ता जवळचा म्हणून पुन्हा त्याच रस्त्यावरून नेहमीप्रमाणे प्रवास सुरु झाला. वेगळ्या पद्धतीने दखल घेणाऱ्या कंमेंट्स यायच्या. त्यावेळी रश्मीने, आपण बरं; आपल काम बरं, म्हणून दुर्लक्ष केलं.
रिक्षाने पुढे संघवी कापडं दुकानाच्यासमोरून वळसा घेतला. कॉलेज मैत्रीण: गौरी कुलकर्णीचं घर, स्टेट बँक, नॉव्हेलटी आणि ज्या कॉलेजमध्ये डिग्री घेतली त्या कॉलेज ट्रस्टीनी कॉलेजच आणि कापड दुकानाचं एकच नाव ठेवलं होतं ते कापडं दुकानं, सोन्या चांदीच्या दागिन्यांची दुकानं, किराणा सामान, अडत दुकान, मेडिकल, सजावट – तोरण, कपडे, भांड्याची आणि इतर नेहमी गजबजलेली दुकानं शांत होती. गांधी चौक एकदम प्रशस्त आणि शांत होता. ना भाजीवाले, ना रिक्षावाले, ना वस्तू विकणारे ना विकत घेणारे कोणीच्ं नव्हते. सारं शांत होतं. निर्मलाच्या भावाचं इलेट्रॉनिक वस्तूंचं दुकान, न्हाव्याची दुकानं, चहाची टपरी, पानपट्टी अद्याप उघडले नव्हते. मारुती मंदिर मात्र उघडलेलं होतं. ठणं ठण आवाज आणि त्या पाठोपाठ, “भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती” चा स्वर घुमला. हात जोडून नमस्कार करता, करताच स्तोत्राचा आवाज कमी, कमी होत गेला. महालक्ष्मी मंदिराजवळ रिक्षा थांबवून रिक्षावाल्यांनं विचारलं “नेमकं कुठं वळवायची रिक्षा, की सरळ घ्यायची? ही मॉडर्न बेकरी उजव्या हाताला आहे.” एकदम सरळ, थोडं पुढे घेऊन उजव्या हाताला थांबवा.” रिक्षा थांबली आणि रश्मीने वीस रुपयाची नोट रिक्षा ड्रायवरला दिली. “राहूदे मॅडम, तुम्ही रश्मी नाडकर्णी ना?” नोट हातात नं घेता त्यांनी नावाचा उल्लेख केला. “हं, होय, रश्मी नाडकर्णी मीच आहे. पण तुम्ही… को sss ण? माझ्या नावानिशी ओळखता?” रश्मीने समोरचा चेहरा निरखून पाहात विचारलं. तिला दूर दूर पर्यंतचा विचार करुन पण चेहरा आठवेना.
रश्मीच्या मनातला गोंधळ चेहऱ्यावर पाहून तोच पुढे बोलला, “तुम्ही नाहीं ओळखणार मला. तुम्ही हायस्कुलमध्ये असताना माझा मोठा भाऊ, अब्बास तुमच्या वर्गात होता.” त्यांन आपली ओळख करून दिली.
“पण तुमची मोठी बँड कंपनी आहे. रिक्षा का चालवतातं? ते पण एवढ्या दूर येऊन? हे पैसे ठेवा बोहनीला नाहीं म्हणू नये. सर्व पंचक्रोशीत कोणचही लग्न, मुंज, शुभकार्य असलं की तुमचाच बँड लागतो.” रश्मीने आस्थेनं अब्बास बद्दल चौकशी केली. सिझनमध्ये जातो गावी. इथं मावस बहीण आहे आणि माझी बीबी आणि छोकरा पण इथंचं असतात. तो बोलला. “तुमचं नाव नाहीं सांगितलं की, जुनिअर अब्बास बोलू मी😊?” रश्मीने हसत विचारलं. “हुसेन नाव आहे माझं, मॅडम,” त्यांन आदबीनं ओळख करून दिली. हुसेन जी, नमस्ते, आणि थँक्स” म्हणून हात जोडले. गुलाब पुष्प रेखाटलेली रिक्षा किक् मारून स्टार्ट केली आणि धूर सोडत, सुसाट वेगात दूर डोळ्याआड गेली.
***********************
शब्द छल 😇😇😅
अंगणात, जिन्याखाली, विनितानं पाणी शिंपडून गाठीची रांगोळी काढली होती. क्षणभर रश्मी गाठीची रांगोळी कोठून सुरु केली असेल? कोठे संपली असेल याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. आणि आई, विनिताची चतुराई लक्षात आली. तिची फिरकी घेण्याची पद्धत आवडली. करणं जिथून सुरुवात होते तिथंच येऊन शेवट होतो. किती सोपं होतं. शब्द छल होता तो.
******************
“एका पाटावर सोsssळा ब्राह्मण तर सोsssळा पाटावर किती?” 🤣😂 “व” चा उच्चार हळुवार असे.
समोरचा सोळा गुणिले सोळा असा हिशेब करतं राही. मोठा दादा, मीराताई, सूचीताई, उमा, वनिता, छाया ताई प्रयत्न करून पण उत्तर येत नाही म्हणून नाराज होत .
“उत्तर चुकलं तुझ. परत सोडवं कोडं,” म्हणून सहजासहजी पटकन विनिताकडून उत्तर मिळत नसे. “विनिता काकु तूच सांग ना, एका पाटावर सोळा ब्राह्मण कसे काय बसू शकतील?” 😇😇मीरा, उमा, सुचिता विनिता काकु भोवती उत्तरांची वाट पाहात घुटमळत राहतं.
*******************************
नाटकी रश्मी ❓️
रश्मीने बॅग उचलून दगडी पायरीवर ठेवली, आणि जिन्याचा दरवाजा ढकलून दोन क्षण थांबून विचार केला. इकडं रश्मी येणार म्हणून कोणालाच कल्पना नसल्यामुळे त्यांचं नेहमीचं रुटीन चालू असणार. रश्मीचं अचानक समोर दिसणं हेच सरप्राईज होतं. त्यानंतरचे धक्के वेगळे. आपण नर्व्हस असल्याचं नाटक करू. चेहरा पाडून तिच्यासमोर जाऊ. पण ती पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय रिऍक्ट नाहीं होतं. आपल्याऐवजी, तिच बऱ्याच वेळी सरप्राईज देत असते. पण मस्करी, मस्ती रश्मीच्या अंगात भरली होती. विनिताला कोड्यात टाकायचं ठरवलंचं रश्मीने. कोण कोणाला कोड्यात टाकतय ते पाहू❓️ 😳 रडवा चेहरा करून बॅग उचलायला वाकली आणि रश्मीची नजर समोरच्या बाबा मंझिलकडे गेली. बडी भाबी दिसली समोर. त्यानी बुरखा घातला नव्हता. रात्री पूर्ण झोप झाल्यामुळे त्या फ्रेश दिसत होत्या. प्रथमच त्यांना पंजाबी ड्रेसमध्ये पाहत होती रश्मी. त्यांचा चेहरा विलक्षण बोलका आणि लहान मुलासारखी नितळ कांती होती. ना लि पस्टिक, ना काजळ, ना पावडर ओरिजिनल सौंदर्य आणि वयोमनाप्रमाणे आलेला स्थूलपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाची शोभा वाढवत होता. “नमस्ते भाभीजी”, रश्मी झटकन वळून भाभीजीकडे पाहत बोलली.
“नमस्ते रश्मी, कैसी हो तुम?” बहुत दिन के बाद आई हो l” भाभीजींनी आलेली जांभई परतवून लावत जबडा पसरायच टाळून प्रश्न विचारला.
“मै ठीक, ऐसाही थोडा काम लेके आई हूं, दो दिन के लिये |” रश्मी बोलली आणि बॅग उचलण्यासाठी खाली वाकली.
“वैसे भी हमेशा, घाई घाई मे आती हो तुम, और निकल जाती हो |” भाभीजी बोलल्या.
रश्मी फक्त, “हं” म्हणून हसली आणि हात हलवून टाटा करतं बॅग उचलली.
भाबीजींना काय सांगणार? नोकरीसाठी दूर जावं लागलं. अन्यथा आईला सोडून का गेली असती रश्मी? इथं खूप ठिकाणी प्रयत्न केला तीनं नोकरीसाठी.
मुंबई चार – आठ दिवसा करता ठीक आहे. इथं आपल्याला राहायचा ठिकाणा नाहीं. पी.जी. की हॉस्टेल काय सोईचे माहीत नाही.
आताची ऑर्डर घेऊन इकडं जवळ कुठं तरी पोस्टिंग द्या म्हणून विनवणी केली की रश्मीने. आईला आपल्या जवळ ठेवता येईल या उद्देशाने रश्मीने ऑफिसरला विचारलं. ऑफिसरंन सांगितलं, जॉईन व्हायचं तर इथंच जॉईन व्हा,अन्यथा सोडून द्या. आई बरोबर राहायची उरली सुरली अशा मावळली. बॅग उचलताना पुन्हा मगाशीचा विचार पक्का करून चेहरा पाडून एक एक पायरी चढताना मुद्दाम धप धप आवाज करतं जिना चढू लागली.
सई का नाचली ❓️
बॅग घेऊन अगदी दमल्यासारखं धापा टाकत जिना चडून वर आली आणि, “हुशsss दमले गं बाई. संपली एकदाची मेहनत”, असं म्हणून हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून दोघींचा शोध घेतला. “रश्मी ssss” विनिता खुशीतच ओरडली. सईन तोंडावरचं पांघरूण दूर करून ओरडली, “अक्काsss”.
रश्मीने एकावर एक असलेले पेपर्स विनिताच्या हातात ठेवले. “आई मी नोकरी सोडली. हे रीलिव्ह सर्टिफिकेट.”
रश्मीने वाकून विनिताच्या पायाला स्वतःच्या हातानं स्पर्श केला. आणि रश्मी, विनिताच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत राहिली. सईनं विनिताच्या हातातला वरचा पेपर घेतला. तिचं लक्ष विनिताच्या हातात राहिलेल्या दुसऱ्या पेपर कडे गेलं.
सईनं ऑर्डर वाचली आणि💃💃 नाचायला लागली. विनिताला दोन्ही हाताला पकडून स्वतःबरोबर गोल गोल फिरवत राहिली. विनिताचे हात सोडले आणि रश्मीचे दोन्ही दंड पकडून गोल गोल फिरवलं. विनिताला समजेना, नोकरी सोडली तर ह्या आनंदानं गोल गोल का फिरताहेत. का नाचताहेत? शेवटी विनितानं, सईन बाजूच्या टेबलवर ठेवलेला पेपर उचलायला हात पुढे केला. तेवढ्यात सईनं पेपर उचलून हवेत उंचावून रश्मी अक्का, रश्मी अक्का म्हणत खांद्याजवळ अंगठा नेऊन तसंच मूठ वर उचलून जिंदाबादची ऍक्शन केली. कांही नं सांगता नुसता गोंधळ चालू होता आणि रश्मी आणि सई दोघी जोरजोरात हसत होत्या. हसता हसता रश्मीचा चेहरा बदलला. नाकाचा शेंडा आणि गाल लाल झाले. डोळे भरून वाहू लागले. डोळ्यातलं पाणी गालावरून टप टप पडू लागलं आणि चेहरा झुकवून रश्मीनं गुडग्यावर बसून आई विनिताचे पाय धरले. गरम अश्रू विनिताच्या पायावर पडले. “आई, फक्त तुझ्या मुळेचं हा दिवस पा …” एवढं बोलताना पण आवंढा गिळला. शब्द बाहेर पडून विनिताच्या कानातून मेंदूत पोहोचले.
सई पुढे बोलली, “आई, रश्मी आक्काला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची नोकरी मिळाली. ती पण मुंबईला. ऑर्डर घेऊन आलीय ती. नोकरीला जॉईन होण्यापूर्वी फक्त तुझा आशीर्वाद घेण्यासाठीच आलीय. प्रत्यक्षात तिला ताबडतोब जॉईन व्हायला सांगितलंय”. परत पेपर हवेत उंचावून, “ढिंक च्याक, ढिंक च्याक” करतं पेपर विनिताकडे दिला.
“हं घे आता. आता तुझी लेक ऑफिसर झाली❗️पुट्टु काकांच्या शब्दात रश्मीअक्का खरोखरच साहेब झाली.” सईनं सांगितलं.
“सगळ्यात वरची पोस्ट कुठली? प्रमोशन असतं ना इथं ? केव्हा प्रमोशन होतं इथं ❓️ थांब मी देवाला नमस्कार करते आणि साखर आणते.”म्हणतं ऑर्डर घेऊन विनिता आत गेली. रश्मी आणि सई तिच्या पाठोपाठ आत गेल्या. देवघरात मंद समई तेवत होती. अगरबत्तीची धूम्र वलये, देवघर आणि संपूर्ण घरात सुगंध पसरवत होती. आईचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता.
“रश्मीचा जन्म, तिचं रांगण, खेळणं, बागडणं, बोबडे बोल, चालायला लागणं, हट्ट करणं, मंडपणा, फुंकणीन दिलेला मार आणि पाढे पाट करून घेणं, तिच्या बोबडेपणामुळं अण्णाकाकांनी दिलेलं “र ” अक्षर विरहित भाषण, बोबडं कांदा आणि झालेला बदल, शाळा प्रवेश आणि तिचं होतं असलेलं कौतुक, वाढलेला हट्ट आणि रश्मीच्या बाबांचं रश्मीला पाठीशी घालणं, अचानक श्री….चं जाण आणि रश्मीला परिस्थितीची होतं गेलेली जाणीव, शाळा, कॉलेज, मळा विकण, घराचं शिफ्टिंग, शिक्षणातील अडथळा, शिक्षक, नातेवाईकांनी दिलेली साथ, पुढे सुरु ठेवलेल शिक्षण, बारावी, ग्राज्युएशन, टिचरचा कोर्स, नोकरीसाठी भटकंती, दूर जंगलात जाऊन राहणं…” सारंच आठवलं.
विनिताचा चेहरा न सांगता बोलत होता. एकाच वेळी ती स्वतःशी बोलत होती, ती श्री… बरोबर बोलत होती, ती दत्त गुरूंशी संवाद साधतं होती, महाविष्णू, कुलस्वामिनी तुळजा भवानी, सर्वांची ऋणी होती. आज तिचे हात आकाशाला लागले होते.
*********************
सई बँकेत जाऊन पैसे घेऊन ये म्हणून चेकवर कन्नडमध्ये विनिता श्रीराम नाडकर्णी म्हणून सही करून ठेवली. आणि बाजूला एफ. डी. चं सर्टिफिकेट काढून ठेवलं.
“आई एफ. डी. मोडू नको माझ्या जवळ थोडे पैसे आहेत. सई चेक आणि सर्टिफिकेट ठेऊन दे. आहेत त्यामध्ये चालवेन मी”,
रश्मीने समजावण्याचा प्रयत्न केला.पण व्यर्थ.
संध्याकाळी तिघी मार्केटमध्ये जाऊन चांगले रेडिमेड ड्रेस, अल्फा बॅग, वूलनची सोनेरी फ़ुलं असलेली लाल शाल, चपला आणि सुंदर पर्स, संतूर साबण, पावडर, लोशन आणि अफगाण स्नो, पॉइझन परफ्युम आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी केलं. साड्या फॉल, पिको साठी दिल्या. रश्मीचं मापाचे ब्लाउज देऊन दुसरे दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व कपडे शिवून तयार पाहिजे म्हणून सांगितलं. रश्मीच्या कल्पनेपलीकडचं होतं. इतके पैसे खर्च केले. सातत्याने घेतच आहोत आपण. त्या दोघींचा उत्साह ओसंडून वाहत होता. काय घेऊ आणि काय नको असं झालं त्यांना. विनिता – आईचा आणि सईचा उत्साह हून रश्मीचा मूड बदलला.
सईकडे असलेला गुलाबी रंगाचा ड्रेस पाहून रश्मीची मती फिरली. अक्षरशः रश्मीनं सईचा ड्रेस ढापलाच.
नवी सुटकेस भरली, बॅग खांद्याला अडकवून रश्मी विनिताच्या पाया पाडली. विनितानं बॅगेत बंडल ठेवलं. एवढे पैसे कशाला देतेस? माझ्याकडे पण आहेत. बँकेत आहेत. आर. डी. मॅच्युअर होतेय पुढच्या महिन्यात. नको देऊ इतके पैसे. रश्मी नुसती बोलताचं राहिली.
नव्या ठिकाणी जतेयस. तिथं कोणी ओळखीचं नाहीं. कधीही कसलीही गरज पडू शकते. पैसे असलेले बरे. ठेव तुझ्याजवळ. विनिता आणि सई समजावून सांगत होत्या.
घरातलं वातावरण उत्साहाने भरलेलं होतं.
रश्मीला त्या दोघीच्या प्रसंगावधान आणि दानतला काय म्हणावं समजेना. विनिता आणि सईकडून खूप सारा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन रश्मी निघाली.
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Website: http://vratwork.in/portfolio
Subscribe to their YouTube channel: https://bit.ly/2Yc9CN8
Follow on Instagram: https://bit.ly/349ffQ3