भाग -31* अर्थात अडचणींवर मात, पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चो.. समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईच बाळ, ऋता रुळली,
भाग – 32* रंग किती❓️ ओळखा पाहू, मेस मधली गजबज, रश्मीचं भरलं वांगं, कांदेपोहे.
भाग – 3* फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय, रश्मीला हातात काठी का घ्यावी लागली❓️ सालंकृत कन्यादान.. ❓️जबाबदारीं ❓️
फरक : एका वेलांटीचा – दोन्ही प्रिय
के. एस. आर. टी. सी. ची बस, 🚒 एन् .एच् . फोरवरील नदीवर बांधलेला पूल ओलांडत होती. जेंव्हा पाण्यावर लाटा, निर्माण करणारा गारेगार वारा शरीराला स्पर्श करत होता तेव्हा गोड शिरशिरी जाणवली. “येथे महाराष्ट्राची हद्द संपत आहे” बोर्ड दिसला, तसं आपली माता आणि गावच्या मातीच्या आठवणीने रश्मीचं मन रुद्ध झालं. असंख्य आठवणी रुंजी घालू लागल्या. आपल्या शिक्षणातील अडथळे दूर झाले. शिक्षण सुरु करून, ग्रॅज्युएशन पूर्ण करून देणार गाव, त्या नंतरचा कोर्स पण तिथे राहूनचं केला रश्मीने. त्यामुळं हे गाव, रश्मीच्या मनात हळवा कोपरा निर्माण करूनं बसलेले होते . आपली माता वास्तव्यास असलेल्या मातीपासून; तब्बल पंधरा महिने शरीराने दूर होती रश्मी.
आपली माता आणि गावची माती, फरक : एका वेलांटीचा – पण दोन्ही प्रिय, हृदयस्थित ❤️ आणि मनस्थित आहेत.
मन मात्र विनिता आईला रोज कित्तेक वेळी भेटत होतं. संवादपण व्हायचा मनोमन. पण तो संवाद एकतर्फी संवाद होता. दरम्यान कितीतरी घटना घडून गेल्या होत्या. आपल्या चुलत, मावस भावंडांची लग्न झाली. भावंडांच्या घरी; कोणाकडे करगोटा, कोणाकडे छुम छुम वाजणारे पैंजणस्थित चिमुकली पाऊले अवतरली. मित्र, मैत्रिणी चांगल्या नोकरीत स्थिर स्थावर होऊन बोहोल्यावर चढून पुढील इंनिंग सुरु झाली होती. रश्मीला नातेवाईक आणि ओळखीच्या इतर लोकांच्या प्रश्नांची सवय झाली, आणि रश्मीच्या उत्तरांची प्रश्नकर्त्यांना.
कोणत्या प्रश्नांना आणि प्रसंगाला किती महत्व द्यायचे ? हे माणसाला परिस्थिती शिकविते. परिस्थितीसारखा परखड गुरु नाही. डोळ्यात अंजन घालण्याची आणि तावून सुलाखून काढण्याची, प्राप्त परिस्थितीची वेगळी पद्धत जाता; जाता माणसाला सुवर्ण झळाळी देऊन जाते.
रश्मी, या साऱ्या आव्हानातून निर्धारानं मार्गक्रमण करत होती.
ज्या संस्थेमध्ये ती काम करत होती, तिथे सन्यस्थवृत्तीनं काम केलं जाई. “गरज असेल तेवढंच आणि तितकंच संग्रह करावं. हाताची ओंजळ आणि पोट यांचा ताळमेळ साधण्याइतपंतचं गरज असते. बाकी संग्रह असतो. गरज पुरविली जावी. संग्रहाला थारा नसावा” हा अलिखित, सर्वमान्य समज आणि त्याप्रमाणेच संस्थेचं काम चाले. रश्मी स्वखुशीने या वातावरणात रुळली होती. आणि अशा वातावरणात काम करताना, व्यवहारी जग, जगराहाटी, आणि इतर अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन कामावर लक्ष्य केंद्रीत केलं जाई. पण प्रत्येकवेळी गावी गेलं की विनिताआई, स्वखर्चाने बऱ्याचं वस्तू भरभरून देई. साबणापासून फराळापर्यंत आणि कपड्यापासून चादरीपर्यंत. म्हणजे मदतीचा ओघ उलटा सुरु झाला आणि हे पण पचनी पडत नव्हतं. त्यात आजचा कांदे पोह्याचा प्रसंग म्हणजे ध्यानीमनी नसताना इतरांना त्रास दिल्याची भावना रश्मीच्या मनात निर्माण झाली.
आईचं आश्चर्य वाटलं, “आज अचानक तिच्या अनुपस्थितीत ठेवलेला कांदे – पोह्याच्या कार्यक्रमातुन, कोणता हेतू साध्य करायचा होता आईला ?” रश्मीच्या मनात प्रश्न डोकावून गेला. भेटल्यानंतर समजेल आपल्याला. तिच्या मनात काय आहे”. काका आणि आत्या इतक्या घाईत आणि ऑड वेळी कार्यक्रम ठेवण्यासाठी का प्रवृत्त झाले? प्रश्न निर्माण झाले रश्मीच्या मनात.
“कोरडा कार्यक्रम, आत्या आणि काकांना आपल्यामुळे त्रास झाला असेल”. रश्मीला वाईट वाटलं. जोरात लागलेल्या ब्रेकनं रश्मीची विचारांची तंद्री भंग झाली. हायवे सोडून गाडी आत वळली आता दहाचं मिनिटात गाडी स्टॅन्डमध्ये पोहोचेल. आईचा चेहरा झळकला रश्मीच्या मनात. मनाद्वारे पाहिलेला आईचा चेहरा नेहमीसारखा हसरा वाटला नाही. “झाकोळला का माझ्या आईचा, चंद्रासारखा 🌕 प्रसन्न, टवटवीत हसरा चेहरा?” साऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळतील, आणि एकच व्यक्ती देऊ शकेल. गाडीने वळण घेतलं आणि धुरळा उडवत बसस्टॅन्डच्या गेटमध्ये प्रवेश केला. गाडी दहा मिनिट्स थांबून पुढील प्रवासासाठी निघणार असल्याचं कंडक्टरनं अनाउंस केलं. रश्मीने बॅग उचलली आणि आणि एक, एक पायरी उतरत जमिनीवर पाय ठेवले. आपला गावं आहे हा, शिक्षण नगरी, वाकून मातीला हात लावला.
शिक्षण घ्यायचं म्हणून वडिलोपार्जित भू – मातेला मुकावं लागलं. नोकरीसाठी आई राहतं असलेल्या गावापासून दूर जावं लागलं. कुठे नेणार आहे ? हा जीवनाचा प्रवास “तो”च जाणे. ओलावलेल्या नेत्र कडा घेऊन रिक्षा स्टॅन्ड गाठलं आणि नेहमीच्या रस्त्यावरून घरी जाण्यासाठी रिक्षाने वेग पकडला. चार वर्षे याचं रस्त्यावरून कॉलेज बस पकडण्यासाठी जायची रश्मी. बदल झालेत बरेच पण गीतांजली, राजश्री, प्रभात आणि चंद्रमा मूवी थेटर त्यांच्याबाहेर ठेवलेली पोस्टर्स बदलतात जागा तशीच आहेत. प्यार झुकता नही, नवरंग, राम तेरी गंगा मैली, तोहफा आणि इतर पिक्चर्स स्वप्नातल्या जगात सैर करून आणायचे. कांही वेळासाठी वास्तवापासून दूर नेऊन तणावमुक्त करायचं सामर्थ्य होतं त्या सिनेमांमध्ये. स्वप्नाळू वय असतं कॉलेजचं. अभ्यास हेच ध्येय होतं आणि पिक्चर म्हणजे तीन तासांचं मनोरंजन इतकंच महत्व दिलं रश्मीनं. ते जुने पिक्चरसुद्धा मनात घर करून आहेत, हे आज जाणवलं. आपण मैत्रिणी, आई, बहिणी, दादाबरोबर पाहिलेले पिक्चर अजिबात विसरलो नाहीं अद्याप. स्वतःच्या स्मरणशक्तीचं आश्चर्य वाटलं. जे आठवणीत ठेवणं आयुष्यभरासाठी, वेळप्रसंगी उपयोगी येणारी पुंजी म्हणून जपलं जावं अशा महत्वाच्या गोष्टी विसरतं आणि ज्याचा फारसा काही उपयोग नसतो ते बाकी व्यवस्थित आठवत राहतं. रिक्षा आशिष बिल्डिंग जवळ थांबली आणि रश्मी बॅग उचलून तडक, धाड धाड जिना चढून मधल्या घरासमोर आली. दरवाजा लोटून आत पाऊल ठेवलं आणि थिजली. आई एकटीच पडून होती अंथरुणावर. “आई ss, आई sss गं ” म्हणून विव्हळत होती. सई बाहेर गेली होती. घर, ओटा स्वच्छ होता.
“आई ssss”, रश्मीने आईला हळुवारपणे आवाज दिला. तिच्या पाटीवर हात ठेवला. का गं विव्हळत आहेस? काय होतय तुला नेमकं? तुझं अंग गरम आहे. औषधं घेतलंस का? काय खाल्लस का सकाळपासून? ”
प्रश्न विचारत आईच्या हातातील, स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तिला कोमट पाणी दिलं प्यायला.
सईनं बनवून ठेवलेला भात थंड झाला होता. रश्मीने हातपाय धुवून पीठ मळून भाकरी केल्या. आजारपणात भात, पोळी, पेज अशा गोष्टींपेक्षा तिला भाकरी खाण आवडायचं त्यामुळं कफवाढीला आळा बसतो असं विनिता आईकडूनचं ऐकल्याचं रश्मीला आठवलं. तूप, मीठ, भाकरीचा वरचा पदर काढून घास भरवला. भाजी, दूध, तूप आणि भाकरी खाल्यानंतर तिचं डोकं चेपुन दिलं. (आपल्या लहानपणी तापाने फणफणाऱ्या आईच्या डोक्यावर हातांच्या बोटाना जोर लाऊन डोकं चेपून देत होती रश्मी. तिचं तापलेलं मस्तक ठणकतं असायचं. तेंव्हा तिला, आपल्या तिघींची काळजी वाटायची. पण आता का मस्तक शूळ होतो हिला ? रश्मी विचार करत राहिली.) डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा डोस दिला. आईच्या अंगावर पांघरूण घालून रश्मी बाजूला बसून डोक्यावरून हात फिरवत राहिली. तापलेलं डोकं पंधरा मिनिटांनंतर घामामुळं नॉर्मल झालं होतं. विनिता आईचा ताप निवल्यामुळे, आता रश्मी थोडी रिलॅक्स झाली. दार किलकिलं करून सई आत आली. डॉक्टरनी लिहून दिलेल् प्रिस्क्रिप्शन घेऊन मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन आली सई. आवाज न करता, दोघी आईजवळ बसून होत्या. दोघींच्या नजरा विनिताच्या चेहऱ्यावर स्थिरावल्या. विनिता शांतपणे झोपली होती. आता आईचा चेहरा वेदना मुक्त वाटला. आपलं, दुसऱ्याच असं मनात न आणता सातत्याने सर्वांच्या गरजेला आपण होऊन मदत करणारी आई, तापाने फणफणत होती. घसा पाण्याविना शुष्क पडला होता आणि उठून पाणी घ्यायचं त्राण नव्हत तिच्या अंगात. काय अवस्था झालीय तिची? का अशी आजारी पडतेय ती? एव्हढा का धसका घेतला तीनं ? घडलेल्या घटनेचं रश्मीला बिलकुल दुःख वाटतं नव्हतं. मग आई का सावरत नाहीं ? एखादी गोष्ट मनाला इतकी का लावून घ्यायची ? पुढे जाऊन कांही वैचारिक गोंधळ होऊन मन दुखवायच्याऐवजी समोरून, अगोदर अपेक्षा समजली आणि अपेक्षा पूर्ण करू नाहीं शकतं हे रश्मीने स्पष्ट सांगितलं. प्रश्न मिटला. तिथं दुःख करायचं, रडायचं, किंवा हां जी, हां जी करण्याचा प्रश्नच कुठे येतो. कसं समजवायचं हिला? तिच्या दृष्टीनं, माझं इकडं नेहमीसारखं न येण्याचा अर्थ वेगळाच तर निघत नसेल ना?
सालंकृत कन्यादान❓️ जबाबदारी❓
रश्मीला प्रसंग जसाच्या तसा आठवला.
खूप दूरच्या नातेवाईकांचं कुटुंबं होतं ते. कॉलेजसाठी या गावात आल्यापासून रश्मी पाहत होती त्यांना. रश्मीचं कॉलेज, त्या नंतरचा कोर्स, नोकरीसाठी चाललेली भटकंती, आताची असलेली समाज सेवी संस्थेतील तुटपुंज्या वेतनाची नोकरी. तिथं शिकायला खूप मिळायचं पण आर्थिकदृष्ट्या ना दुसऱ्याला मदत करू शकतं होती, ना स्वतः सक्षम होती. समोरून, स्वतः होऊन रश्मीसाठी घातलेल्या मागणीच्या आनंदापेक्षा त्यांनी ठेवलेली अट वेदनादायक होती. जेव्हा विनिता चेहरा पाडून बसली होती तेंव्हा, रश्मीने ताडलं आणि खोदून खोदून विचारल्यानंतर जें ऐकलं ते, विचित्र होतं. माणुसकीपासून कोसो दूर होतं, काळिमा फसणार होतं. अशी अट रश्मी कधीच मान्य करणार नव्हती, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर. आपण कांही जगा वेगळ करतोय असं अजिबात समजायची गरज नाहीं. स्पष्ट सांगून पण विनिताच्या पचनी पडत नव्हतं. आणि त्रागा करून सतत आजारी पडत होती.
“स्वतःलाच त्रास करून घेत असते आई.” रश्मी स्वगत बोलली.
“मी आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाल्या शिवाय अजिबात लग्न करणार नाहीं. आणि जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी तुला त्रास होईल, मान खाली घालायला लागेल असं कोणतही कृत्य घडणार नाहीं. तू माझी बिलकुल चिंता करू नकोस.” रश्मी खूपसं स्पष्ट आणि टोकाचं बोलली होती. या घटनेला सव्वा वर्ष झालं होतं. आपण समोर असलो की ती आपलीच चिंता करतं राहते हे ताडून रश्मी स्पष्ट बोलली. “शाळेमध्ये दहावीची पहिली बॅच असणार आहे. आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाना, रविवारी शिकवायला येत असल्याचं दिलेलं वचन या कारणामुळे मला या इतर साऱ्या गोष्टीसाठी बिलकुल वेळ नाहीं. तू, माझी काळजी करणं सोड आई.” रश्मी निघताना आईला सांगून निघाली होती. उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत, रश्मी आली नाहीं भेटायला. उद्देश आईने सावरावे हा होता. झालं उलटंच. उद्देश योग्य होता पण पद्धत चुकीची होती का आपली?
“आम्हाला मुलगी पसंत आहे पण…. ”
पण काय? स्पष्ट बोलावं जरा आपण, काका आणखीन नरम होऊन विचारतं होते. विनिता समोरून आलेल्या पण… मूळे सावध झाली. दोन अटी आहेत आमच्या.”
पण पुढचं नं बोलता, “आम्ही आमच्या नातेवाईकांकडून निरोप पाठवतो” म्हणून समोरची बैठक संपली. काका, काकु, आई निघाल्या तिकडून. काकु, काकांनी आईला कांही सांगितलं नाहीं. आणि परस्पर एक अट मान्य केली. पण दुसऱ्या अटीबाबत विनिता वहिनींशी बोलणं आवश्यक वाटलं. शेवटी काका, काकुनी विनिता वहिनींची भेट घेऊन समोरच्या मंडळींचं बोलणं ऐकवलं तेंव्हा विनितासमोर आपला नवरा, श्री… नंतर मुलींना वाढवितानाचा एक – एक दिवस दिसतं होता. समोरच्या मंडळींनी सांगितलेल्या दोन्ही अटीपैकी, कोणतीही गोष्ट झाकून, चोरून रश्मीला न सांगता पूर्ण करूचं शकतं नाहीं, हे काका, काकु, विनिता तिघेही जाणत होते.
आणि नेमकं पत्रं मिळालं, आईच्या ट्रँकेत ; घडी करून ठेवलेल्या: साडीखाली ठेवलेलं कार्ड मिळालं. त्यावरील, “आम्हाला मुलगी पसंत आहे. आपल्या कडून, “सालंकृत कन्यादान” अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त कांही गोष्टी मध्यस्थी बरोबर कळवण्यात येतील.
आणि दुसरी गोष्टी म्हणजे, रश्मीने बेजवाबदार मुलगी, बेजवाबदार बहीण व्हावं. आणि जबाबदार पत्नी, सून व्हावं. “समोरच्यांच्या शब्दात, रश्मीने माहेरची, आईची जबाबदारी घेऊ नये”. काकांनी पहिली अट मान्य का केली? त्यामुळं त्यांची हिम्मत वाढली. त्यावरून घरात चर्चा झाली आणि रश्मीचं ठाम मतं पुढे आलं आणि विषय तिथंच संपवला. त्याचा परिणाम विनिता भोगते आहे.
जबाबदारी ❓️
मी, रश्मी आई, विनिताची मोठी मुलगी आहे आणि मला दोन लहान बहिणी आहेत. हे रश्मीच्या मनावर कोणी बिंबवायची गरज नव्हती. सूर्य प्रकाशाइतकं सत्य होतं. आता जरी आर्थिकदृष्टया कमकुवत असली तरी स्वतःच्या मनाशी खूणगाठ व्यवस्थित बांधून घेतली होती रश्मीने. आणि इतर कोणतीही ओढून ताणून जबाबदारी वाढवायच्या मनस्थितीत नव्हती रश्मी. पण हल्ली असे कांही शब्द कानावर आले, प्रश्न उपस्थित केले जात होते. पण रश्मीच्या बाबतीत सोनाराने फुंकली नळी, इकडून तिकडे गेले वारे एव्हढीच किंमत होती आशा गोष्टीना. मला या बद्दल बोलायलाच हवं. रश्मीने स्वतःशीच निश्चय केला. आणि निश्चिन्त झाली.
पस्तीस मिनिटांनी जाग आली विनिताला.
“आई तू कशी आहेस आता ? तुला बर वाटतंय ना ?” रश्मीने आई ; विनिताच्या केसातून हात फिरवत विचारलं. लहान बाळाला हळुवारपणे थोपटून झोपवतात तसं रश्मी आपल्या आईला थोपटत होती. विनिताची “आई” झाली होती रश्मी.
“बर वाटतंय आता मला.” आई विनिताच्या आवाजात तरतरी जाणवत होती. सईनं पाणी गरम करून दिला आणि रश्मीने तिला मेडिकल स्टोअरमधून आणलेल्या गोळ्या दिल्या. चेहरा वाकडा करतं विनितानं गोळ्या गिळल्या आणि गरम पाणी प्यायली. सईनं कॉफी बनवली. रश्मीने, बशीमध्ये कॉफी ओतून विनिताला पाजवली. आता बरच फ्रेश वाटत होतं विनिताला.
काहीतरी काढायला सईने पुस्तकाच्या सेल्फला हात लावला आणि गोल सुरळी केलेला पेपरचा रोल घरंगळत आला. “काय आहे हे सई? माझी अक्षर दिसतात यावर…!” रश्मी घरंगळत आलेली पेपर्सची सुरळी हातात घेत रबर काढून पेपर्स पहिले. वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मंथली प्लानिंग बरोबर लेसन प्लॅन्सचे झेरॉक्स होते. इन्स्टिट्यूटमध्ये कामाला सुरू केल्यानंतर, रश्मी पाहिल्यांदा घरी गेली, मे महिन्याच्या सुट्टीत; तेंव्हा तयार केलेल्या नोट्स आणि प्लॅनिंग होते ते. ओरिजिनल प्लानिंग बरोबर घेऊन गेली रश्मी. आणि पुढचा कधीच नं विसरता येण्याजोगा प्रसंग आठवला तीला.
रश्मीनं कोणाला मारण्यासाठी हातात काठी घेतली❓
चारशे स्क्वेअर फीटचं घर, समोर सिमेंटच्या पत्र्याची शेड आणि आजूबाजूला दोनहजार स्क्वेअर फुटाची जागा. पूर्व पश्चिम दोन्हीकडे दरवाजे, प्रशस्त खिडक्या, बाहेरच्या भिंतीला लागून टॉयलेट, बाथरूम. पाहिल्या, पाहिल्या रश्मीच्या मनात घर केलं ते घर. पूर्वेच्या दारासमोर असलेल्या वेळूच्या खुप साऱ्या झाडांनी वाऱ्या बरोबर हलणारी पानं आणि झुडुपातून शीळ घालत; घरात येणारा वारा भावला रश्मील. संध्याकाळी पायरीवर बसलं तरी वेळूच्या झाडांची साथ वाटायची तिला. किचन प्लेटफॉर्म, भिंतीतील कपाट आणि एक कबर्ड होतं. कांही महत्वाची पुस्तकं, नोटस, प्लानिंग आणि सर्टिफिकेटस ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाई. कपाटाला कुलूप लावायचा प्रश्नचं नव्हता.
नोकरीला लागल्या नंतर, पहिल्याचं मे महिन्याच्या सुट्टीत रश्मी जेव्हा आईच्या घरी गेली तेव्हा, तीनं सर्व सिलॅबसची पुस्तकं बरोबर घेतली होती. गावी पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवसापासून नियमित एकाजागी बसून सर्व मायक्रो प्लॅनिंग, लेसन प्लानिंग तयार करून घेतलं. आई, सई, मैत्रिणी यांना तब्बल सात महिन्यांनी भेटत होती रश्मी. पण सुट्टी एन्जॉय करायच्याऐवजी, सुट्टीतील बराच वेळ प्लॅनिंगमध्येच घालवला. आई : विनिता, रश्मीवर थोडी नाराज झाली पण तसं दाखवलं नाहीं तीने. वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मंथली प्लॅन तयार झालं, आणि मायक्रो प्लॅनींग करून लेसन प्लॅन पण पूर्ण झाले. प्रत्येकाची झेरॉक्स काढून ठेवली. बॅगेत भरून ठेवलं आणि रश्मी बोलली, “हं आतां बोल कुठे कुठे जायचे ते”.
“आतां❗️❓️ समोरच्या कॅलेंडरमध्ये तारीख बघा मॅडम‼️” कालनिर्णय समोर धरत सईने विचारले.
“अरे हो , आज अठ्ठावीस मे. एक जूनला शाळा सुरु होतेय. तीस तारखेला निघावं लागेल. दिवस कसे गेले❗️❓️ समजलंच नाहीं मला.” रश्मीच्या वेळेच्या गणिताचे उत्तर समोरून आले.
नोटसची झेरॉक्स कॉपीची सुरळी दाखवत सई बोलली “असे दिवस गेले”. आणि ती झेरॉक्स इथंच राहून गेली आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला रश्मी संस्थेत पोहोचली होती.
नेहमीसारखी पुस्तकं आणि महत्वाचे पेपर्स कपाटात ठेऊन दिले आणि नियमित कामकाजात गढून गेलो रश्मी.
“आज सोमवार, आता मुख्याध्याकाना नोटस आणि प्लॅनींग देऊ” रश्मीनं विचार केला.
तब्बल आठ दिवसांनी सोमवारी सकाळी कपाटाच्या दरवाज्याला हात लावला तर कपाट किंचित उघड दिसलं. “आपण दरवाजा घट्ट बंद नाहीं केला वाटतं”. रश्मी स्वतःशीच पुटपुटली.
कपटाचा दरवाजा उघडला, तसं आतून महाशय बाहेर पडले, एक, दोन, तीन🐀🐁🐀 आणि त्यातल्या मोटोबाच्या तोंडात कागदाचा कपटा होता. रश्मीनं जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर पडलाच नाहीं.
महिनाभराच्या मेहनतीने तयार केलेल्या दोन्ही विषयाच्या प्लॅनिंगचे महाशायांनी तुकडे, तुकडे केले. रश्मीचा तीळ पापड,🙄😭 झाला.
त्या रात्री झोपताना, रश्मीने पोकळ बांबू उशाला ठेवला. आणि कपाटाचं दार तसंच किंचित उघड ठेवलं. जसं सामसूम झाली, तशी कपाटाजवळ हालचाल जाणवली. हळूच बांबू उचलून धपाक करून पाटीत घातला आणि बडबडली रश्मी, “मी महिनाभर आईला आणि बहिणीला नाराज करून मेहनतीनं काढलेल्या नोटस खातोस होय? आता खा पोकळ बांबूचा➖️ फटका.” म्हणून एकानंतर दुसऱ्याला पण फटका मारला. आणि ते दोन्ही जीव एकाचं वेळी गारद केले. पण तिसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. “ये, तू पण ये. तुला मी अशी सोडणार नाहीं. तू कुठं जाशील मेट्या🐁🐀?” रश्मी स्वतःशीच मोठमोठ्यानं रागात बोलत होती.
“मॅडम, काय नेम आहे तुमचा❗️ एका दमात दोघांना घेतलंत🤣 कोपच्यात. पण तिसरा राहिलाय अजून. आता तो नाहीं यायचा परत. आता झोपा.” फटा फट आवाजाने जाग्या झालेल्या हिस्टरीच्या मॅडम बोलल्या.
लाईट नेहमीसारखा ऑन ठेऊन दोघी अंथरुणावर पडल्या, पडल्या मॅडम बोलल्या, “आठ दिवसात नोटस सोडून, बाकी कशालाच तोंड लावलं नाहीं उंदरांनी. कपाटात आणि कपाटाबाहेरील सर्व वस्तू व्यवस्थित होत्या. “फक्त नोट्स खाल्ल्या. अभ्यासू 📃📕✏️✒️होते तिघे🤣😂, बिचारे; त्यातले दोघे गेले”, मॅडम हसत बोलल्या. पण रश्मीचा हसायचा मूड नव्हता आणि राग 🙄🤧पण थंड झाला नव्हता. मध्य रात्री, रश्मी किंचाळत उठली, करणं तिसऱ्या उंदीर महाशयांनी रश्मीच्या उजव्या हातांच्या, मधल्या बोटाचा कडकडून चावा घेतला. अंथरुणातून उठून रश्मी हातात काठी घ्यायच्या अगोदरच, दरवाज्यातून बाहेर पडायच्या अगोदर आपले बारीक मण्यासारख्या डोळे लुकलुक🐀 करतं रश्मीकडे रोखून पाहात होता तो चावरा उंदीर मामा. रश्मी समोरच्या लूक लूक डोळ्यांनी पाहणाऱ्या काळुंद्र्यावर फटका बसेल अश्या टप्प्यात आली, तेव्हा सुळकन सटकून बाहेर पडला आणि पोकळ बांबू लाकडावर जोरात आपटल्यामुळे रश्मीचं नेमकं तेच बोटं, झूम sss करून झिणझिण्या आल्यामूळ पुन्हा जास्त दुखावलं, ज्याला उंदराने चावा घेतला होतं.
रश्मीला उंदीरमामाचं🐀🐁 हे परत येण्याचं गणित नाहीं कळलं, ना स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्याचं, आपल्या सहकाऱ्याच्या मारेकऱ्याला शोधून 😳, चावा घ्यायचं त्याचं धाडस कळलं. 😇
———————————————————————
3 Responses
खूप छान…
रश्मी, रश्मीचे आई- विनिता आणि सई प्रत्येकाच्या भूमिका खरंच वैशिष्टय पूर्ण आहेत. मॅडम तुम्हाला कधी व कसा वेळ मिळतो.आणि प्रत्येक भागात काहीतरी नाविन्यपूर्ण वाचायला मिळतं…
खरंच तुमच्या लिखाणाला मानाचा मुजरा….
It’s a God Gift….🙏🙏ढचा भाग वाचायला नक्कीच आवडेल….
Great…,👍👍
संघर्ष, हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रामाणिक संघर्ष हा रश्मी च्या स्वभावाचा भाग बनला आहे. काही मिळण्यासाठी नाही तर, सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणुन.
खूप सुरेख व्यक्तिचित्रण. आपल्या लेखनातून आपण वाचकाला रश्मी बरोबर विविध ठिकाणी मानने वावरायला भाग पडता, अन आपण त्या प्रसंगांचे साक्षीदार असल्याचे वाचकाला जाणवल्या वाचून रहात नाही.
लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
खूप सुंदर!
नमस्कार जयश्री कुलकर्णी मॅडम. “तू सदा जवळी रहा” भाग – 34 वाचून आपण दिलेले अभिप्राय सुंदरचं आहेत. आपण व्यक्त केलेले अभिप्राय खूपच प्रेरणादायी आहेत. असच वाचत रहा. अभप्राय देत रहा. मी लिहीत राहीन. 🌹🙏