भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते… भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण.. भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट… भाग – 4* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई…, अनुभूती घ्या  कुसुमताईच्या कृपेची, सई, चंदाच्या बालपणीच्या आठवणी….                भाग -5* रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात, आईची परीक्षा. प्रश्न नव्हते: निशब्द शांतता, प्रार्थना बळ देते  🙏 रश्मीला आणि कुटुंबियांना…        भाग – 6* रश्मीच्या आईबद्धलच्या संगीतमय आठवणी, आणि रश्मीचं वि… सदृश्य जीवन.                               भाग -7*  एक सक्षम महिला असून पण रश्मीनं गप्प राहून का सहन केलं सार  अन्याय, प्रतारणा, आर्थिक, सामाजिक, मानसिक, नैतिक अवहेलना ?  अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…          भाग-  8* आईचं मानस – दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण        भाग -9* राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा🐔, खो-खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गाव देवाच्या 🔱🎪 मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश, रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11* मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी 🏰 वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – 🎵🎶 गायन कला, लोचन🤹♀️ आणि रश्मीचा🧘♀️ जन्म. भाग- 12*  सुचिताची  प्रश्नावली❓️❓️❓️, श्री…  आणि विनिता 💑 घराचं घरपण कसं टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली❓️ दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का ? चंदाला आकाशात काय दिसलं?  भाग -13* रश्मी खोटं बोलते पण….?, चंदा कुठे राहिली ? चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलने का मारतात ?  भाग -14 * काय दिलं गुरुजींनी? कोणती दिशा दाखवली गुरुजींनी ? काका आजोबांचा दिलासा,  सुट्टी कशी गेली ? विनिता, रश्मीच्या सराना का भेटली ? सरानी पेढे का मागितले?  भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का ? रश्मी बद्धल प्रश्न??? कॉलेज🏬 प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली  ? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी आणि पुतळी लायब्ररीत का बसत होत्या ? भाग-16 *  विनिताला कसली काळजी होती ?  काय उपाय मिळाला शेवटी ?  का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या 👭🏃♀️👭मैत्रिणी?  शांतीच्या 🙄डोळ्यात काय वाचलं रश्मीने ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी ? भाग- 17* दिवाळी म्हणजे काय? स्वप्नात रश्मी का 😭 रडते? पाठी🧔🧔👨👨 येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी ? कुसुमताई,  सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी  कुठे गेले? 👪 काका, काकू रश्मी कुठे गेले👣? भाग – 18 * तरुण मुलगी💃 घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न🤹♂️❓️❓️ भाग -19*   आत्या की मैत्रीण, 💮फिरकी? अतरंगी😂 बंटी  भाग -20*   कोणाची परीक्षा ? कोण होता मोनदादा? उपाय काय? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा ?  भाग -21* विनिताचं नेमाकं काय आणि कोठे चुकलं? श्याम दादाचं विनिताला आश्वासन..!  भाग – २२ * रश्मीचं  नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस ⛈️⛈️ सोहळा, तंबाखू आणि बरंच काही, खोडकर 🤣💃सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदान🩸, लायब्ररी…, हास्य, आनंद म्हणजे …वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24* परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि  💑❤ पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी,    2 – श्रध्दा असेल तरच ❗️ भाग -25* वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चर, गॅदरिन्ग, फिशपॉंड, महान व्यक्तीं खेबूडकर, तुझी अक्का मागून खूप छान दिसते ! लेक्चर बंद ❓️❓️❓️surprise रा —! चमत्कार 🌹🙏🌷, घुंगरू, ग्लास, बर्फ.. भाग – 26*, दुसरं वर्ष आणि बरंच काही .., आमिष, पाणी ! पाणी !! पाणी !!! आई आणि वहिनींचा सल्ला, कोर्ट केस नव्हे, नात्यांची चिरफाड, सईचं कॉलेज.
भाग – 27 *  नेत्राने उपोषण का केलं ? रश्मीला निर्मलाची आठवण का आली? 
काय ठरवलं रश्मीने शेवटी ? डॉक्टर,  काय म्हणाल्या रश्मीला ? सर्व ठिकाणी रश्मीला इतकं सावध राहायला का लागायचं ? भाग – 28*  👉  आंडं, कोंबडी, अनुभव काय त्रांगड आहे ?     सुकलेलं बकुळफुल” पार्ट – 1    भाग – 29 * “सुकलेलं बकुळफुल”  पार्ट – 2,  दत्त आणि अष्टलक्ष्मी तसबीर…,  प्रचंड  उत्साही  विद्यार्थी आणि शिक्षक,  राम नाम….,  मदर  तेरेसां 🌷,  डॉक्टरांसाठी शिबीर,  तुम्ही  कुठं कुठं घेऊन फिरणार तसबीर ?   गुरुमंत्र आणि मानसपूजा विधी,                        भाग – 30*  वा च न,   जिऑग्राफी टीचर,  नाटक,  गाणं,  सावध मनाची मदत,  गुरु तारी त्याला कोण…. ?   भेसूर  रश्मी,   रश्मीची केरळ ट्रिप,  “तेथे कर माझी जुळती…🙏”
वा च न, जिऑग्राफी टीचर 🌍, नाटक, गाणं…
मुंबईला जाऊन लायब्ररीसाठी खूपसारी पुस्तकं 📚📚 आणून मुलांसाठी आणि स्वतःसाठी एक शिरस्था ठरवला रश्मीने. वाचन मोठ्या प्रमाणात वाढवलं. प्रश्न ❓️ होता, सीलॅबस सोडून इतर वाचन, लेखन कम्युनिकेशन स्किल वाढवणे. प्रॉब्लेम तिथं होता आणि उपाय शोधून अंमबजावणी करणं सुरू झालं.
नवीन आलेल्या हिस्टरी, जीऑग्राफी टीचरनं आपल्या विषयाबरोबरचं शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. आता पर्यंत, “मी हाय 🐟🐬🐠 कोली, सोरिल्या होरी मुंबैच्या किनारी, आम्ही ठाकर ठाकर, या रानाची 🦜🦚🦉पाखरं, डोंगराचे आरून 🌄🌅 एक बाई चांद उंगवला, चांद🌙 उंगवला आणि चांदण्या☀️🌟⭐️ बघावं निघाल्या” पर्यंतचं गाणं, नाच चालायचा. परंतु नव्या टिचरनी, खट्याळ सून नाठाळ सासूच भांडण स्टेजवर गाजवतं “मला नको तुमच्या हातभर बांगड्या मी रिष्टवॉच ⌚️ वापरीनं,” असं म्हणता, म्हणता त्यांनी मुलांद्वारे एकांकिेका स्पर्धेत भाग घेऊन मुंबईमध्ये दामोदर हॉल आणि शिवाजी मंदिरातील स्टेजवर पिपाणीचे सूरsss 🎺🎶🎵 वाजवत दे धडक, बे धडक आणि फाडू परफॉर्मनस् दिलाच आणि बक्षीसं 👑🥇🥈🏆 पण घेऊन आली. मुलांचा, शिक्षकांचा, पालकांचा, कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. नेहरू प्लानोटेरीयम, सायन्स सेंटर भेट या आणि इतर अभिनव कल्पना राबवून मॅप रिडिंग 🌎🌏🌍, रात्रीच्या वेळी आकाश 🌗🌘🌟⭐️🌠 दर्शन, My Very Educated Mother Just Shows Us Nine Planets म्हणून Mars, Venus, Earth, Moon, Jupiter, Sun, Uranus, Neptune, Pluto वेगळ्या आणि सोप्या पद्धतीनं मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवत होत्या. किल्ले भेट, ऐतिहासिक वास्तू भेट आणि संकल्पना समजून घेणेवर भर दिला जाई. त्याकरिता संस्थेतर्फे शिक्षकांना त्या त्या विषयात अद्यावत आणि एक्स्पर्ट ठेवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाना देश, विदेशातून🌎🌍 पाचारण केले जाई. विज्ञान दृष्टिकोन विकासासाठी प्रदर्शन भरवून जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांना पाचारण केलं जात असे. विज्ञान जत्रा, विज्ञान मेळाव्या बरोबर मुलांमध्ये प्रश्न❓️❓️❓️ विचारण्याची क्षमता विकसित करुन कोणत्याही गोष्टीच्या कार्यकारण भावातून विज्ञान दृष्टिकोन प्रगल्भ करणे या गोष्टींवर भर दिलं जाई. “गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणेन आरतीला हे चंद्र🌙, सूर्य☀️, तारे🌟…” 💫✨ ऐकताना मातृभूमी बद्धलचं प्रेम मनात, हृदयात ♥️ आणि मेंदूत भिन्नलं आणि कृतीतून उतरू लागलं ते समजलं नाही. सर्व शिक्षक, पालक, कार्यकर्ते, संस्थाचालक आणि प्रकल्प अधिकारी हातात हात घालून मुलांच्या प्रगतीसाठी किंबहुना भारत निर्माण आणि उत्तम नागरिक घडविण्यासाठी झटत होते. सर्वजण कार्यशील होते. मुलांना मार्क्स वाढविण्यासाठी परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना, माझा विद्यार्थी एक माणूस, एक सुजाण नागरिक, एक संवेदनशील व्यक्ती, एक देशप्रेमी कसा होईल, स्वावलंबी कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष्य असे. मुलांना नैतिक मूल्यबीजं रुजवताना, फक्त परीक्षार्थी नव्हे तर ज्ञानपिपासु विद्यार्थी, एक माणूस म्हणून घडवताना पुनश्च विचार पक्के होत होते आणि एक वेगळी रश्मी घडत होती. तिच्या व्यक्तिमत्वाचा वेगळ्या वातावरणात, वेगळ्या पद्धतीने विकास होत होता. काही गोष्टीमध्ये डळमळीत असणारी मतं पक्की होत होती. परिस्थिती आणि विचाराची सांगड घालून वेगळ्या अँगलनं विचार करून पारखून मगच निर्णय घेतला जाई. अनुभवातून येणार शहाणपण आणि माणसांची पारख यामुळे अंतर्गत राजकारणापासून रश्मी स्वतःला दूर ठेवत होती.
सावध मनाची मदत 
 निर्माण किंवा नवनिर्माण कार्यात सतत  विचारशृंखला   चालू राहिली की मेंदू थकतो.   मेंदूचा दुबळेपणा,  थकवा  कमी करण्यासाठी  काही  वेळेस  सतत विचार करत राहण्याऐवजी,  मेंदूला वर्तमान काळात आणणं आणि रुळवणं गरजेचं असतं.   पुनश्च् ताजातवाना मेंदू आणखी उत्तम विचार प्रसवू शकतो. आणि मन त्याचं  काय?  थकतं  का कधी?  “मने मना सावधान” म्हणजे नेमकं काय म्हणायचंय महाराजांना?  मनचं मनाला कसं सावध करू शकतं ?  मन म्हणत, “मला बाहेर फिरायला जायचंय,  तेच मन  सावध पवित्रा घेत म्हणतं,  पण परिस्थिती फिरण्यायोग्य नाही.”  म्हणजे मन  इच्छा व्यक्त करतं  आणि इच्छेमुळे  होणाऱ्या परिणामाचा विचार काही क्षणात करून,  निर्णय बदलतं. एक मन वेगवेगळी भूमिका  पार पाडतंय. याचा सूक्ष्म विचार आपोआप सुरु असतो. कधी कळलंय का मन कोणाला❓️ माझ्या मनासारखं 😊झालं !  माझ्या मनाविरुद्ध झालं 😭कधी नाराजी😴,  कधी राग😬,  कधी 😊 आपुलकी,  कधी तिरस्कर 🤯.  मानवी मन विचित्र आहे.  त्याचा थांग कोणालाच लागत नाही.  या मानाचं काही खरं नाही. कधी वाऱ्यावर स्वार होतं,  कधी आकाशाला  ☁️ गवसणी घालतं , कधी इंद्रधनू 🌈 होऊन सप्तरंगानी सजतं,  कधी पाऊस ⛈️😭 होऊन डोळ्यातून बरसतं ,  कधी नदी होऊन दुथडी  वाहतं,    कधी सागर होऊन विचार मासोळ्यांना 🐬🐟 विहरत ठेवतं,  कधी आकाश होऊन  भाव पक्षानां 🦜🐦🐥🐤  मुक्त विहारायला देतं,  कधी संकुचित होऊन स्वतः भोवती काल्पनिक भिंत बांधतं,  कधी वाटतं मला उमजलं,  कधी वाटतं समोरच्याला समजलं,  कधी स्वतःला हुलकावणी देतं,  कधी दडी  मारून बसतं.  कधी  हिमालयाइतकं  उतुंग होतं,  तर कधी समुद्राइतकं 🏄♂️गहिरं वाटतं, कधी कापुससारखं  हलकं  होऊन निर्बंध भटकतं,   कधी पाषाणाइतकं जड,  कधी हिऱ्यासारखं कडक तर कधी मेणासारख मऊ,  कधी वज्रासारखं  कठोर  कधी साईसारखं स्निग्ध.   हे आहे काय नेमकं?  दिसतं कसं?  घन आहे की द्रव? असतं कुठं?    हायस्कुलमध्ये असताना माटेच्या कथेमध्ये  रश्मीने  वाचलं होतं ते “रु” म्हणजे कापसासारखं असतं आणि कानापाठी बसतं.   जाणवलं नाही कधी. पण लक्षणं  मात्र दिसतात,  जाणवतातं,  समजतातं. एक मात्र खरं ते  खट्याळ होऊन खोड्या काढतं.  नाठाळ होऊन बेलगाम होतं  उधळतं. वेळीच  खोड्याला बंधन आणि नाठाळाला वेसण नाही घातलं तर नुकसान करतं  ते.  म्हणून बहिणाबाई म्हणायच्या,  मन वढाय वढाय उभ्या पिकातीलं ढोर,  किती हाकलं हाकलं फिर येई पिकांवर…   जन्मापासून मनाची आणि विचारांची घडण होते. या जगात राहूनचं आंतरिक अवधान टिकवणं आणि सावधान असणं  हे साधनेमुळं जमते.  मनानेच निर्माण केलेला भ्रम मनानेच निर्दालन करू शकतो. मन सावध झालं की अवधान टिकून रहातं. त्यासाठी मनाला सावध करत राहिलं पाहिजे.  लागलाय का थांग?  जिथं सृष्टी निर्मात्याला प्रश्न❓️❓️ पडतो तिथं सामान्य माणसाचं काय?  जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या हातात नसतात,  तिथं गप्प राहणं शहाणपणाचं ठरत.  त्या प्रमाणे काही  गोष्टींचा विचार करणं सोडून दिलं आणि आपलं काम करत राहिली रश्मी.  
गुरु तारी तिला कोण……..?
रश्मीचा पगार जसा बँकेत जमा होऊ लागला, तसं तिनं बँकेत रिकरिंग अकाउंट ओपन केलं आणि वर्षाकाठी जमा होणाऱ्या रक्कमेतून काही विशेष करत असे. या वर्षी तिनं आपल्या शाळेतील काही मुलं आणि सहकाऱ्यांबरोबर महाराष्ट्रातील चार ज्योतिर्लिंग दर्शन, अजिंठा, वेरूळ लेणी पाहिली आणि अडीच शक्तीपीठांचं दर्शन घेतलं होतं.
🌹🙏
शुक्रवारी सकाळी रश्मीने झाडू मारून कोबा केलेली जमीन स्वच्छ  पुसून घेतली.  देवासमोर सुंदर रांगोळी रेखाटली.  श्री दत्तगुरु आणि अष्टलक्ष्मीचे  फोटो स्वच्छ पुसून घेतले. निरांजन आणि समया प्रज्वलित केल्या. अगरबत्ती लावली.  हळद,  कुंकू,  चंदन वाहिलं. बाजूला ताटलीत ठेवलेली फ़ुलं वाहिली. देवाची पंचोपचारी पूजा केली. गुरुमंत्र पठण झालं. रश्मीने स्वतःच केलेली देवपूजा डोळे आणि मन भरून पाहुन घेतली. 
प्रसन्न मन आणि हसऱ्या चेहऱ्यानं पुढील पूजा सुरु झाली.  ओंकार उच्चारण करत  डोळे बंद केले. रश्मीने स्वतः दिव्य रेशमी  वस्त्रे आणि अलंकार परिधान केले.  शांतपणे अनुलोम – विलोम झालं.  ओंकार उच्चारण झालं आणि श्वासावर लक्ष्य केंद्रित करून आपल्या हृदयमंदिराचं  द्वार खुलं केलं. अगरबत्तीच्या टोकावरून धूम्र वलये हृन्मंदिर सुवासिक बनवत दत्त चरणांना सुगंध अर्पण करत होती. सुवर्ण निरांजन आणि सुवर्ण समईमधील वाती प्रज्वलित केल्या. ज्योतीतून स्रवणारा  प्रकाश: पूजेच्या सुवर्ण कलश,  समई,  निरंजन प्रसादाची वाटी ई. सर्व सुवर्ण वस्तूंवर  पडून परावर्तित झाल्याने हृदयमंदीर सुवर्णप्रकाशमान दिसत होतं.  स्थापनेसाठी योग्य जागा पाहून तिथं पादुकांची स्थापना केली.  सुवर्ण प्रकाशामुळं   दत्तगुरूंच्या पादुका मनोहारी दिसत होत्या. काळ्या पाषाणाच्या पादुकांवर  सप्त नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सुवर्ण कलशाने  अभिषेक केला.  काळ्या पाषाणाच्या पादुका सप्त नद्यांच्या जलामुळे ओल्या आणि जलमय दिसत होत्या. सुवर्ण पात्रातील पंचामृत दत्त चरणांवर वाहून,  पंचामृताभिषेक झाला.  चंदनाच्या लाकडाने अग्नी प्रज्वलित करून सुवर्ण कलशातील जल थोडं गरम केलं आणि  उष्णजलाभिषेक केला.   स्वच्छ,  शुभ्र, तलम वस्त्राने हळुवार हातानी पादुका पुसून कोरड्या  केल्या.  दोन पादुकांच्यामध्ये राहिलेली ओल  कपड्याने टिपली. अनावृत्त दत्त पादुकांवरून रश्मीने हळुवारपणे हात फिरवला,  रश्मीला पादुकांमध्ये  उबदारपणा  जाणवला. आपल्या हातानी कोमलपणे दोन्ही पादुकांवर बोटांच्या ठिकाणी  उगाळलेल्या चंदनाच्या  गोळ्या ठेवल्या. संपूर्ण  पादुकाना थंड  चंदन लेपन केलं. सुवर्ण चाफा, रक्त कमळं,  मोगरा, जाई,  जुई, चमेलीची पुलं चरणांवर वाहिली.  मंजिरीसहीत असलेली काळी आणि हिरवी तुळसीदलं  चरणांवर वाहिली.  हळद कुंकू वाहून ओम श्री गुरुदेव दत्त म्हणून करकमल🙏 जोडले रश्मीने. हातात  एकमुखी,  एकशे आठ  रुद्राक्षाची माळ घेतली आणि  गुरुमंत्राचा जप केला. पाचही प्रज्वलित सुवर्ण निरांजनं  सुवर्ण तबकात ठेऊन आरती सुरु केली. 
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नं ये ध्याना  ||  जयदेव जयदेव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळिता हरली भव चिंता…. || ………………………………
कर्पूर गौर करुणावतार ………………………. तुज वंदी 🙏
ओम यज्ञेन  यज्ञ  मजयंती देवस्थाणी धर्माणि …. …….  अविक्षितस्य कामप्रेरविश्वदेवा …  श्रीगुरुदेव दत्त 🙏    पंच पक्वान्नाच सुवर्ण ताट  पाण्याने केलेल्या मंडलावर ठेवलं. पाणी ताटाभोवती फिरवून महानैवेद्य अर्पण केला.  
हळू, हळू रश्मी डोळे उघडायचा प्रयत्न करत असताना घरच्या छपराच्या बाजूने सर्रर्रर्रर्र सर्रर्रर्र आवाज आला एकदा,  दोनदा,  तीनदा.     पण दुर्लक्ष्य करून  बॅग घेऊन शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली.  दार ओढून कडी लावली आणि शाळेच्या रस्त्याला लागली.  
शनिवारी पण मानसपूजा संपताना घरच्या छपरातून  जरा जास्तच सर्रर्रर्र सर्रर्रर्र असा आवाज जाणवला…  पण  वेळेत शाळा गाठायची म्हणून रश्मीने आवाजाकडे दुर्लक्ष केले.  उन्हाळा सुरु झाला की  बोअरवेलचं  पाणी कमी कमी होत जाई.  हल्ली पाण्याची समस्या सुरु झाल्यामुळे रात्री पाणी साठलं की गरजेपुरतं पाणी पहाटेच भरावं लागायचं.  रश्मीने  रविवारी पहाटे उठून नेहमीसारखं  घागरी आणि बादल्या भरून ठेवल्या.    लायब्ररीतील          सर्व पुस्तकं वाचून झाली होती.                                                    दहा वाजे पर्यंत अंथरुणात पडून  Black Beauty   पुस्तकं  दुसऱ्यांदा वाचत होतीे. रविवार,  संथ गतीने सुरु होत असे.  कोणाला वेळेचा हिशेब द्यायचा नव्हता.   पुस्तकावरून नजर हटत  नव्हती.  आणि पुन्हा सर्रर्रर्र,  सर्रर्रर्रर्र आवाज आला.  पण आज  छतावरून नव्हे तर किचनच्या ओट्या कडून आवाज येत होता आणि भांड्यांचा आवाज आणि सरपटण्याचा आवाज   सर्रर्रर्रर्र फटाक,  सर्रर्रर्रर्रर्र फटाक  एकत्र येत होता.   थोडी चलबिचल झाली पण पुस्तकं वाचन थांबवावं वाटेना.  पण परत जो आवाज आला त्यामुळे रश्मीच्या अंगावर काटा उभा राहिला.   अंगावरची चादर बाजूला करून सावध झाली रश्मी.  हळुवार पावलं टाकत आवाजाचा मागोवा घेत बाहेरच्या खोलीतूनच किचनमध्ये डोकावली.  शांत होतं.  फोटोवरची फ़ुलं सुकली होती.  उघड्या खिडकीतून सुकलेली वेताची दोन, चार पानं आतल्या खोलीत पडली होती. किचनच्या रुमला लागून बाहेर बाथरूम आणि टॉयलेट  रूम होती.  हळूच दरवाजा उघडुन प्रथम ब्रश केला आणि आत आली रश्मी.  कपाट उघडुन  चहा पावडर आणि साखरेचा डबा ओट्यावर घेतला. ओट्या खालून  पातेलं घेण्यासाठी वाकली तर चाकाकीपणा  आणि हालचाल जाणवली. परत तोच आवाज…. आणि  फुसsssss  फुसsssss फुत्कार…. 
प्रचंड मोठा,  लांबसडक…..  साप…. जोरजोरात श्वास घेऊन पण रश्मीला श्वास पुरेना. बोबडी वळली. तोंडातून आवाज बाहेर पडेना.   त त, प प   करतं   राहिली.   शेजारी राहणाऱ्या कुटुंबात नवरा, बायको आणि त्यांची  छोटी मुलगी आणि मुलीचे काका  राहत होते.  रश्मी त्यांना जोरजोत हाक मारू लागली.  घशातून आवाज बाहेर पडेना.  धावत बाहेरच्या खोलीतून अंगणात धापा टाकत आली.  “दादाsss,  राम  दादाssss ” 
मॅडम जोरात का हाका मारतात ❓️❓️ म्हणून बाजूच्या घरातून दादा,  वहिनी बाहेर आले.  समोरच्या दुकान वजा  घरातून सर्वजण  बाहेर आले.  रश्मीचा  पांढराफटक चेहरा आणि घाबरलेली नजर बरंच कांही सांगून गेली.  आता रश्मी थोडी सावरली आणि किचनच्या ओट्याखालच्या कपाटात साप असल्याचे सांगितलं.  लाठ्या,  काठ्या वापरून मारू नका.  त्याला  घरातून बाहेर काढून  जंगलात सोडा,  त्याही परिस्थितीत रश्मीने  भूतदया आणि   संस्थेचे  अलिखित नियमांचे पालन  करण्यास  सांगितलं.  नेमकं रविवार साधून तिनंही सर्पमित्र बाहेर गेले होते.  कितीही प्रयत्न केलातरी  किचन आणि बाहेरची खोली सोडून सापोबा  घरातून बाहेर पडेना.  
पाण्याची बदली, घागरी आणि भांडी विस्कटली तासभर पुरुषमंडळी प्रयत्न करूनही तो काही घरं सोडेना आणि शेवटी नाईलाजाने त्याला मारावं लागलं.
असचं  एकदा 
 बाथरूममध्ये बसलेलं मांडूळ जातीचं सापाचं पिल्लू  काही केल्या बाहेर जाईना.   त्याची लांबी कमी असल्याने  तो  काठीवर  बसत नव्हता.  पण  शेवटी कठीवरून पडू नये म्हणून  स्वतःच बॅलन्स करत राहिला आणि   सर्पमित्रानी त्या मांडूळला समोरच्या जंगलात सोडून दिले. 
मनाची सावधानता आणि “त्या” ची कृपा असल्यामुळे रश्मी तीन दिवस घरात भला मोठं साप असताना आणि बाथरूम मध्ये आठ दिवस मांडूळ असताना सुद्धा कोणतीही इजा न होता सुरक्षित राहिली. पण तिकडे विनिता जास्तचं काळजी करू लागली.
              भेसूर 🎹🎶🎵 गायिका   रश्मी 
संगीत सरांचा  तास चालू असताना तेथून पाय नाही निघायचा.  पेटी आणि गाणं शिकायचा प्रयत्न तर केला,  पण रश्मीचा भेसूर आवाज कधी सुरीला झालाच नाही.  पेटीवर बोटं पण  सरसर फिरली नाहीत.  पहिली की,  वरची की,  खालची, काळी की पंढरी भेद समजलाचं नाही.. आणि फक्त्त एक,  दोन गाणी आणि  नोट्सवर समाधान मानावं लागलं.                                        साss  साss  निs  धs  पs  गs  मs  पs  गs  मs   गs रेs साsss 2 मs मs पs पs गs मs पs निs पs निs साss साss                नि s सा s मs ग s  रेss रे ss                                               सा s गs पs गs रेs निs साs                                              साss  साss  निs  धs  पs  गs  मs  पs  गs  मs  गs रेs साsss 2 
भज मन निस दिन श्याम सुंदर | सुखं सागर हरी श्री राधावर || सकल जगत के जीवन धन् प्रभू | करत कृपा नित निज भक्तन पर | भज मन निस दिन श्याम सुंदर ||
श्याम सुंदरss, श्याम सुंदरss, श्याम सुंदरsss🙏 मुलं तल्लीन होऊन आत्मसात करत होती.  आणि मग रश्मीला गाणं शिकायची इच्छा झाली म्हणून सरांच्या मदतीने प्रयत्न केला.  
सजन नयन नित धार बरसती 2                                           भाव गंध त्याजळी  मिसळती ||                                      वीणेचे स्वर ss अबोल झाले                                             गीता मधले काव्यही सरले,                                              तुझ्या मनाचे उगेचं आठव                                           मूक दिप ज्योतीसम  जळती ||
रश्मीला  कॉलेजला असतानाच किस्सा आठवला मराठी,  हिंदी कन्नड,  गाणी असू देत किंवा इंग्रजी पोएम्स तिला सुरात गाता येत नव्हतं. “आकाशात पतितं  तोयं यथा गच्छति सागरम…” तसं  गाण्याचा एकच  सूर आणि तालाच होतं असे. गाण्यातील शब्द माहित नसले तर आणखी धमाल यायची. स्वतः शब्द भरून गाणं म्हणायची.  “रश्मीचं गाणं म्हणजे  नगाला नग  शब्दांचा वापर करते.” आई विनिता बहीण चंदा, सई, संजू अक्का 
एकदा असचं रश्मी हिंदी गाणं गुणगुणताना विनिता आणि सई जोरजोरात हसायला लागल्या. पहिल्यांदा रश्मीला समजेना या इतक्या का हसताहेत. शेवटी विनिता बोललीच, ” रश्मी, गाणं थांबावं तुझं. प्लीज, तू गाऊ नको. “भम, भम” असा कुठं शब्द असतो का? पहिल्यांदा तुझं गाणं थांबावं.” आणि रश्मीने गाणं थांबवून पण हसू आवरत नव्हतं. शेवटी सई बोलली, शोमा आनंदचं गाणं म्हणतेस रश्मी अक्का, “मुझे पिने का शौक नही, पिती भम भम भुला ने को” पण ते असं नाही “मुझे पिने का शौक नाही, पिती हूं गम भुला ने को” तू, “हूं गम” च्या ऐवजी “भम भम” म्हणतेस पण “भम” असा कोणताही शब्दच नाही.” आणि आपल्याच अफलातून शोधाबध्दल रश्मीपण बराच वेळ हसत राहिली. पण कधी रश्मीचा गाण्यासाठी मूड झाला तर, “रश्मी तू गानसेन नको, कानसेन हो”, विनिता म्हणायची.
तालुक्याहून येताना नेहमी नवाकाळ घेऊन येणारे संगीत सर, प्राथमिकचे शिक्षक आणि असेच काही सहकारी भेटले ज्यांच्यामूळं रश्मीला न भूतो न भविष्यती मदत झाली. आजही आपल्याला ज्या ज्या लोकांनी मदत केलं त्यांची ऋणी असल्याचे तिच्या संवादातून दिसून येतं.
रश्मीची केरळ ट्रीप
मुलांनी संस्कृत नाटक आणि नृत्य सादर करून मुंबई गाजवलीच पण त्यासाठी खास केरळला सहल आयोजित केली. संस्थेमध्ये असलेल्या केरलाईट्स कंपूनं उत्तम तयारी केली. रश्मीसहित मुलं आणि शिक्षक; देवभूमी, निसर्गभूमी म्हणून प्रसिद्ध असलेलं केरळ  पाहायला निघाले. तेथील कार्यकर्त्यांच्या घरी  राहिल्याने लोकल संस्कृती समजून घेणं अभ्यासपूर्ण आणि आनंददाई  झालं. सगळ्यात फास्ट बोलली जाणारी मल्याळम्  भाषा,  शंभर टक्के साक्षर ही बिरुदं  मिरवणारे राज्य. नजर जाईल तिथपर्यंत डोळ्याला आणि मनाला आल्हाद देणारा (लश ग्रीन) रंग.  भात शेतीचे हिरवे हिरवे गार गालिचे, त्यापुढे थोड्या उंच केळीच्या बागा आणि त्याच्या पुढे उंच, उंच  नारळीची झाडं.  असं निसर्गरम्य वातावरण आणि  नितांत सुंदर परिसर.  सौंदर्य डोळ्यात साठवू?  हृदयात साठवू?  की मनात साठवू?   म्हणत मुलं आणि शिक्षक भारावून गेले.  मंदिर परिसरात अंघोळीसाठी असलेला  बांधीव तलाव हे आणखी एक वैशिष्टय होतं. तिथंच अंघोळ करून देवदर्शन घ्यायची पद्धत क्वचितचं इतर कुठे असेल. मंदिरात देव दर्शनासाठी स्त्रिया,  ऑफ व्हाईट रंगाच्या; सोनेरी काठाच्या साड्या वापरत. पुरुष ऑफ व्हाईट आणि भगव्या लुंग्यांचा वापर मोठ्या प्रमाणात  करताना दिसून येई. स्त्रियाचे  जास्त करून कुरळे आणि काळेभोर केस दिसत होते.  स्त्रिया, पुरुष देव दर्शनानंतर कपाळावर अडवे चंदन लावतं. खोबरेल तेलाचा जेवणात होणारा वापर वयस्कर व्यक्तीचेपण  केस काळे  ठेवण्यास मदतीचे असल्याचे दिसत होते. संस्कृती आणि संस्कृत दोन्हीही समृद्ध ठेवणारे राज्य म्हणून केरळ प्रसिद्ध आहेचं पण तिथलं आदरातिथ्य  वाखाणण्या जोगं होतं.  सुंदर काँक्रीट बंगल्याबरोबर फार्म हाऊसेस पण  आकर्षक होते.  एकूणच समृद्ध राज्य दिसत होतं. त्याचं  कारण प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती फॉरेनला नोकरी,  धंदा करत असे आणि भारतातील  आपल्या कुटुंबाला मदत करी.  गरजेनुसार इतर शिक्षित तरुणांना मदत करण्याची त्यांची वृत्ती खरोखर प्रशंसनीय होती. देश विदेशात विखरून तिथं ग्रुप बनवून “एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” म्हणून संपूर्ण राज्य,  समृद्ध राज्याच्या यादीमध्ये आणण्यात तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार होता.  कष्टाळू,  आणि आपल्या गरजू  माणसाला मदतीचा हात देण्याची मानसिकता हाच स्वभाव समृद्धी खेचून आणण्यासाठी कामी आल्याचे दिसून आले असं म्हंटल तर वावगे ठरणार नाही.   शासकीय सार्वजनिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येई.  रस्ते स्वच्छ,  दुतर्फा झाडांची गर्द सावली असे.  संपूर्ण सहली मध्ये एकही भिकारी दिसून आला नाही. मंदिर ताशीव दगडांचे आणि मंदिर परिसरात दगडी फरशा बसविल्या होत्या.  साधारण सर्व  मंदिरांची  बांधणी एकसमान दिसें.  नवीन नवरी  ऑफ  व्हाईट सोनेरी काठाची  साडी आणि सुगंधी फुलांचा  हार आणि नवरा शुभ्र कुर्ता नी ऑफव्हाईट लुंगी आणि गळ्यात सुंगंधी फुलांचा हार घालून  मंदिरात दिसतं तेव्हा स्वर्गातून शिव  पार्वती उतरल्याचा भासं होई.  मंदिर आणि तेथील चंदनाचा सुवास “आ हा हा !!!! चंदन आणि सुगंधी फुलांचा सुवास मंदिर आणि मंदिर परिसरात दरवळत राही.  एक दैवी वातावरण दिसें.  खेड्या पासून शहरापर्यंत फ़िरत मुलांनी स्वतःच नाटक सादर केलं. लोकल लोकांनी बसवलेली  नाटक,  कथ्थ्कली नृत्य आणि जोरजोरात वाजणारी वाद्यें, आणि नर्तक,  नर्तकीचे ठेके वातावरण भरून जाई. “संन्यासी पिटिका” नाटक एक वेगळाच परिणाम साधून गेलं.   कन्याकुमारीमध्ये वाळूत बसून सूर्य सौंदर्य न्याहाळत असताना जगन्नाथपुरीहून आलेल्या पंच्याऐशी/  नव्वद वर्षाच्या  आजीनी रश्मीच्या मस्तकावर  हात ठेऊन भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्या दिल्याचं  पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले !!
भात, इडली, डोसे, पुट्ट, अप्पलम आणि केरळी पदार्थ जिभेवर, चंदन सुवास घ्राणेंद्रियात आणि आदर प्रेम मनात रेंगाळत ठेऊनचं महिनाभराच्या ट्रिपनं मन भरून अनुभव आणि आनंद घेऊन आयोजकांचे आभार मानत परत निघाले रश्मी आणि मुलं आपल्या शाळेकडे. केरळ सहल एक समृद्ध अनुभवाचा तुरा खोऊन गेली.
“तेथे करं माझे जुळती 🙏”
पहिल्या दोनही वर्षी नकार देऊन रश्मीलाच वाईट वाटतं होतं.   जेंव्हा आश्रम शाळेच्या  सरांनी,  तिसऱ्या वर्षी दहावीच्या मुलांना शिकविण्याबाबत पुन्हा विचारणा केली तेंव्हा रश्मी त्यांना नाही म्हणू शकली नाही. रश्मी  शनिवारी नियमित शाळा संपल्यानंतर,  पाड्यावरील आश्रम शाळा गाठे आणि शनिवारी रात्री आणि रविवार दिवसभर शिकवून परतत असे.  आश्रम शाळेसाठी,  फक्त शनिवारची संध्याकाळ  आणि रविवारचा वेळ  देता येण श्यक्य होतं. प्रत्यक्षात सोमवार ते शनिवार  अडतीस, चाळीस   पिरिअड्स घेताना सुरुवातीला मजा वाटायची पण जशी वर्षे गेली तसं आठवड्याच्या शेवटी विशेष करून  शनिवारी बोलताना त्रास होऊ लागला. तोंडातून शब्द बाहेर पडताना त्रास होऊ लागला.  मग कृतियुक्त शिक्षणावर आणि लायब्ररीत पुस्तकं वाचन,  मुलांकडून पझल्स आणि इतर गोष्टींवर  खास भर दिला जाऊ लागला. लेसन मधील कॅरेक्टर्स शोधून डायलॉग लिहून मुलांद्वारे नाटक बसवणे,  कवितेतील पात्रांवर डायलॉग लिहून ते पाठ करून घेताना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आणि एक वेगळाच आनंद रश्मी टीचर आणि मुलं घेऊ लागली.  पण  ही  किमया घडायला मदत केली ती तेथील अधिकाऱ्यांनी.  विज्ञान विकास संस्था म्हणजे एक मोठं कुटुंब होतं. शंभर एकर जागेत  तिथं राहणारी कुटुंबं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागली असली तरी दिवसा प्रोजेक्टच्या ठिकाणी  येऊन काम करत असतं. साधारणतः  नियमित भेट होतं असे.  
रविवारी संध्याकाळी आश्रम शाळेतील शिकवणं संपवून, रश्मी बाहेर पडली आणि बस पकडून नेहमीप्रमाणे संस्थेपासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या कॉर्नरला उतरून झप झप पाऊले टाकत खाली मान घालून चालत निघाली. साडेपाच सहा वाजले तरी उन्हाची तिरीप भाजत होती. रस्ता तापलेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिलकुल सावली नव्हती. आज आश्रम स्कुलमध्ये शिकवलेल्या ग्रामर बाबत विचार करत चालत असताना कोणाचा तरी आवाज कानावर आला. “मॅडम, ….. ते बुडाले…” आपल्याला इथं कोण ओळखणार❓️ म्हणून दुर्लक्ष करून रश्मी आपल्याच तालात निघाली खरी. पण जणू त्यांना पाठलाग करून रश्मीला काहीतरी सांगायचं होतं. “मोठ्या मॅडम sss” पुनश्च्य जवळून आवाज आला. रश्मीनं वळून पहिलं. दूरदूर पर्यंत स्मरण शक्तीला ताण देऊनसुद्धा, कधी समोरच्या व्यक्तीला पहिल्याचं आठवलं नाही रश्मीला. “तुम्ही मला का हाक मारताय? काय सांगायचं आहे तुम्हाला? मी तुम्हाला ओळखत नाही.” अनोळखी माणूस, बस निघून गेल्यानंतर धुरळा बसला होता आणि आसपास कोणी नजरेच्या टप्य्यात दिसत नव्हत. रश्मी जरा त्रासिक आवाजात समोरच्या माणसाला एका दमात बोलली. “मॅडम तुम्ही …. ना ओळखता नं? ते पाण्यात बुडाले.” “काय बोलताय तुम्ही? तुम्हाला समजतंय का?” रश्मी जरा रड्या आणि चढ्या आवाजात त्वेषाने बोलली. तिला स्वतःला समझेना ती काय बोलतेय❓️ काय ऐकतेय ते. आणि माझ्या सहकार्यांनी पुन्हा तिचं बातमी सांगितली. जड आवाजात रश्मीने विचारलं, “दवाखान्यात नेलं होतं का त्यांना?” “व्हय, नेलं होतं. पण ते इथंच खल्लास झाले होते.” आवाज कठोर होऊन वज्राघात करत होते. आणि शक्तिहीन वाटलं क्षणभर.
त्यांची पत्नी,  शिवानी दीदीचा टाहो काळीज कापत गेला,  “रश्मी,  देखो ये क्या  हो गया !  ऐसा आधा अधुरा, बीच मझदार मे मुझे  छोड के चला गया !” दीदींचा आक्रोश संपतच नव्हता.  कोणत्या शब्दानं तिचं सांत्वन करणार होती  रश्मी ?  आपला स्पर्श,  हातात हात घेणं, तिच्या खांद्यावर हात ठेवणं तिचं दुःख कमी करायला पुरेसं होतं का?  आर्त sss हाक “त्या”च्या पर्यंत पोहोचत होती का?  
“आओ भगवन,  मेरे भगवन,  छुप  छुप के चले आओ ss ss,      चार ओर है घना अंधेरा,  आ के दिया जलाओsss, आके दिया जलाओsss,  आ के दिया जलाओ sss,  आ के….. “
दीदी  साद घालतचं राहिली,  बधिर,  निष्ठूर  निर्दयी,  “तो” आला पण नाही आणि दिप पण लावला  नाही. सर्वत्र अंधार, दुःख भरून राहिल.  दीदीची आर्त हाक हवेतच विरली आणि वाफ होऊन काळात मुरली…..  एक अकेली थक गई.   
तीन वर्षे संस्थेमध्ये एकत्र काम करत होते सर्वजण. सचिव या नात्याने स्वतःचा प्रोजेक्ट सांभाळून इतर प्रोजेक्टमध्ये सरांच तेवढंचं लक्ष्य असे ज्यामुळे संस्थेची भरभराट होतं होती. गरजेला मार्गदर्शन करत होतेच पण जिथं खरोखर अडचण असे तिथे आवर्जून न कंटाळता, न थकता मदत करत होते. विविध भूमिका खुबीनं पार पडणारे सर, त्यांची एक भूमिका भावली, ती म्हणजे सर माझे गुरु. रश्मी जरी इंग्रजी घेऊन ग्रॅज्युएट झाली तरी संकोचामूळे आपल्या भावना आणि जे काही बोलायचं, सांगायचं असायचं ते व्यक्त करणे कठीण वाटे. व्यक्त करण्याची कला, अंगी बाणवली नव्हती. आणि या संकोची वृत्तीच्या भावनेतून तिला एक उत्तम गुरु मिळवून दिला. तो म्हणजे सचिव सर, जीवंत मूर्तिमंत अमोद. त्यांचं जगणचं एक सुंदर आमोद होतं. कामात अमोद मानणारे आणि अमोद वृत्तीनं काम करणारे सर, कृतीतून तिच शिकवण देतं होते. सदाचाराची सुंदर मूर्ती, अमोद माझे गुरु. सारे अंत्यविधी स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही ते अस्तित्वात नाहीत यावर विश्वास बसतं नव्हता.
एके दिवशी सहज,   mary ‘s lamb या poem वर critical appreciation लिहून वाचण्यास दिलं असताना अमोद सरांनी सांगितलं “रश्मी,  तुम्ही रोज काहीतरी लिहून दाखवा.” आता रोज काहीतरी म्हणजे नेमकं काय लिहायचं❓️❓️❓️ रश्मीच्या चेहऱ्यावरचं भलं मोठं चिन्ह पाहून सरांनी स्वतःच सुचवलं. “तुम्ही तेनालीरामन,  अकबर – बिरबल, विक्रमादित्य  किंवा तुमच्या स्वतःच्या गोष्टी लिहा,  कविता लिहा,  पण लिहा.”  बस,  इतके शब्द पुरेसे होते आणि रश्मीची गाडी निकल पडी. “MOTHER’S LOVE”, रश्मीनं  स्वतःची पहिली कथा लिहून भीत भीतचं वाचायला दिली. कथा वाचून झाल्यानंतर दादांकडे पाहून सर  म्हणाले,  आता थोड्याचं दिवसात आपल्याला एक चांगला writer मिळेल. आणि मग दुसरी,  तिसरी,  चौथी कथा रांगच लागली.  भरपूर वाचन असल्याने आयडिया मिळत गेल्या आणि रश्मी लिहीत गेली.  आज तिच्याकडे चाळीस कथा त्यातील  काही ट्रान्सलेशन्स काही ओरिजिनल,  आठ,  दहा कविता आणि दहा प्रू वर्ब्स आहेत. थोडक्यात बोलून, रश्मीच्या विचारांना चालना देणाऱ्या गुरुंमुळं हे शक्य झालं.  काही वेळेस रिपीट होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी शांतपणे सांगून नित्य प्रेरणा देत राहिले.  त्यांची  पत्नी; शिवानी  रश्मीची दीदी होऊन मदत करत राहिली.  काही वेळेस संध्याकाळी नदीकाठावर  पाण्यात पाय सोडून बसलेल्या रश्मीला साप दिसला की,  सरांनी केलेल्या विनोदाची आठवण येते.  “मॅडम,  मी एवढा मोठा साप पाहिला,” घाबरलेल्या  भूगोलच्या मॅडम प्रथम छातीवर हात ठेवला आणि नंतर हात लांब  करून बोलत होत्या.  फाईलमधील लक्ष्य मॅडमकडे वळवत सर बोलले,  “आता तो साप पण
घरी जाऊन सांगत असेल,  मी निळ्या साडीतील इतकी  मोठी बाई पहिली म्हणून,”  प्रसंगाचं  गांभीर्य गेल्यामुळे सगळेच जण खळखळून हसत होते.    अमोद सर गेले हे अर्ध सत्य आहे. अज्ञानांधकारातून ज्ञान प्रकाशाकडे  नेणारी अमोद ज्योत स्वयंप्रकाशरूप अनंतात विलीन झाली. कामात आनंद मानणारे आणि आनंदात काम करणारे सर पंचतत्वात विलीन होऊन आम्हा सर्वाना प्रेरणा देत राहतील. रश्मीच्या एका गोष्टीतील वाक्याला अधोरेखित चिन्ह करणाऱ्या सरांच व्यक्तिमत्व कसं होतं ते त्यांच्या बरोबर काम करणाऱ्यां सर्वाना पटेल.  “Work was worship,  work was God,  work was food and work was everything to him”. अशा या गुरुनी संस्थेतील सर्वांना कामाची गोडी लावलेल्या कर्म पुजाऱ्याला   शब्दांजली अर्पण करून माथा झुकविला  🙏.
रश्मीने आपण लिहिलेल्या श्रद्धांजलीचा पेपर शिवम सरांच्या हाती दिला. त्यांनी जेव्हा सर्वांसमोर वाचलं तेव्हा सर्वांनी सरांना माथा झुकवून आदरांजली अर्पित केली 🙏🙏🙏
काय झालं रश्मीला एकदम सर्वांपासून अलिप्त राहायला?  मे  महिन्यात,  दिवाळी सुट्टीत रश्मी गावी का गेली नाही ?  संस्थाचालकांनी अचानक त्यांच्या घरी मिटिंग का बोलावली?    रश्मी घेतेय सुट्टी महिना भरासाठी  पण का?   तुम्हीच गेस करा….  अपल्या भेटीसाठी पूर्ण  महिन्यानंतर येतेय.   म्हणजे नेमकं  काय चाललंय तिच्या मनात …. ?  तुम्ही विचार करा आणि सांगा. 
रंजना राव
 
															 
															







4 Responses
Very nice
आजचा भाग अतिशय सुंदर व विचार करायला लावणारा आहे, मनपूर्वक अभिनंदन!!!💐
“तू सदा जवळी रहा..” भाग 30 अर्थात धमाल, थ्रिलर, कमाल : वाचून आपण दिलेल्या अभप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
आजचा भाग प्रेरणा व चेतना निर्माण करणारा ,उतकठां वाढविणारा आहे. लेखिकेला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आपल्या लेखणास त्रिवार अभिवादन.