“तू सदा जवळी रहा… ” रौप्य मोहोत्सवी, अर्थात भाग – 25

  भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  ……. भाग -2*  बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….भाग-3*  शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई …अनुभूती घेतलीत  कुसुमताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….भाग -5*  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा, प्रश्न नव्हते निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वैधव्यसदृश्य जीवन.  भाग -7 *  एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…भाग-  8*  आईचं मानस  दर्शन,  राजेशची प्रकर्षाने आठवण आली. भाग -9*  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? भाग – 10*  साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृंदावन आणि राजू, गावदेवीच्या मंदिरा समोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद. भाग -11*  मालिनी वहिनी – विनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.भाग- 12* ,  सुचिताची  प्रश्नावली, श्री आणि  विनिता,  घराचं घरपण कस टिकवतात ? रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @  चंद्रयाला पाटलीण बाई चप्पलनं का मारते? भाग -14 *  काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी?   काका आजोबांचा  दिलासा,  सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सराना  का भेटली?  सरानी पेढे का मागितले?  भाग -15 * वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश,  सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसतं? भाग- 16* विनिताला कसली काळजी होती?  काय उपाय मिळाला शेवटी?  का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी?  शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीनं ? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी? भाग- 17 * @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई,  सर,  विनिता दरवाजा बंध का करतात?  केदार काका, रश्मी  कुठे  गेले?   काका, काकू रश्मी कुठे गेले? भाग – 18  * तरुण मुलगी घरात असणं?  खंडाळा भेट, चिनुचे प्रश्न,भाग -19* आत्या की मैत्रीण,  फिरकी? अतरंगी बंटी,  भाग 20* कोणाची परीक्षा? कोण होता मोनदादा?  उपाय काय ? रश्मीला घेऊनं कोठे गेला मोनदादा?  भाग -21 * विनिताचं नेमकं काय आणि कोठे चुकलं?    श्यामदादांचं विनिताला आश्वासन..!  भाग – २२ * रश्मीचं नवीन घर आणि वातवरण, कॉलेज प्रवास, पाऊस सोहळा, तंबाखू आणि बरचं काही, खोडकर सरला आणि इतर मैत्रिणी, अभ्यास पद्धती. भाग -23 * कॉलेज, जीम, रक्तदांन, लायब्ररी…, हास्य , आनंद म्हणजे … वहिनी, रोहन आणि खेळ भाग – 24 * परिक्षा हॉल, सुट्टीतील आनंद, महान व्यक्ती आणि विचार, हृषि 💑❤ पद्मिनी, 1*श्रध्दा असेल तर…, नाग पंचमी – अष्टमी, 2 श्रध्दा असेल तर
भाग 25 अर्थात रजत महोत्सवी 💐🙏 वॉटर डॅमला सहल, कॉलेज लेक्चरमधील गंमती, कॉलेज लेक्चर, गॅदरिंग, फिश पॉन्ड, महान व्यक्ती, खेबुडकर, तुझी अक्का मागून छान दिसते ! लेक्चर बंद ❗️❓️❓️, surprise रा➖️➖️➖️ ❗️🌹🌷🙏🙏 चमत्कार घुंगरू, ग्लास, बर्फ,

वॉटर डॅमला सहल — ❗️😃

फर्स्ट इयर पूर्ण होता, होता बस स्टँडला जाणाऱ्या रस्त्यावर एक नवीन मोठं कपड्याचं दुकान उघडलेलं दिसलं.  आता कपडे नवीन दुकानातूनच घेऊ असं ठरवलं आणि सिलेक्शन एम्पोरियममधून ड्रेस मटेरियल घेतलं तिघींनी.  चंदानं  नेहमीप्रमाणे स्वतःच्या पसंतीचं मटेरियल आणि साडी घेतली.  तिला पिवळ्या रंगाची सोनेरी काठाची साडी सुंदरच दिसत होती.  रश्मीनं बेबी पिंक रंगाचं  ड्रेस मटेरियल आणि लाईट पिंक कलर आणि पांढऱ्या सायटीन रिबनची बॉर्डर आणि डिजाईन असलेली ट्रान्सपरंट  टिश्यू साडी घेतली.  चंडूलाल शेटजीच्या दुकानापेक्षा येथे साड्या, कपड्यामध्ये वेगळेपण, आधुनिक डिझाईन आणि वाजवी किंमत आणि खूप सारी व्हरायटी पाहायला मिळायची.  

सेकंड इयर सुरु होऊन टर्म संपत आली आणि दिवाळी सुट्टीत अगोदर वर्गात  अशाच गप्पा मारताना एक वेगळी गोष्ट घडली.  सर आणि आम्ही सारी मुलं,  एकदम मूडमध्ये होते. नुकताच पावसाळा संपला होता आणि सर्वत्र हिरवळ पसरली होती.  पाऊस पडून त्यानं आपलं काम केलं होतं आणि सर्वत्र  रानफुलं डोलत होती.  निसर्गाचा वेगळा अविष्कार डोळ्यांना सुखावणारा आणि मनाला भारून टाकणारा होता.  वॉटर डॅम  आणि वॉटर फॉल पाहण्यासाठी ट्रिप काढायची ठरली आणि सुरु झाली धमाल.  कर्नाटकमधील दोन्ही ठिकाण प्रसिद्ध होती.  शॉर्ट डिस्टन्स असल्याने एका दिवसासाठी योग्य ठिकाण होतं.  आज वर्गामध्ये डॅम पाहायला  ट्रीप  जाणार अशी अनाऊन्समेंट केली तेंव्हा, पूर्वीच्या ट्रिपच्या सगळ्या गोष्टी  आणि त्या वेळी केलेल्या गंमतीपण आठवल्या. 

गावातील शाळेत असतानापण  डॅमफॉल्स आणि झुलता पूल येथे  जाऊन आली होती रश्मी.  आणि झुलत्या पुलावरून जाताना भोवळ आली म्हणून गुरुजींच्या हाताला धरून हलणाऱ्या पुलावरून आल्याचं आठवलं.  
हायस्कुलमध्ये  नववीला असताना,  पुण्याला ट्रिपला जाताना बोगदा लागला तर रश्मीसहित साऱ्या मुली एकमेकींचे हात घट्ट पकडून साखळी केली आणि सर्व जणी जोरजोरात किंचाळत होत्या, “कारण बोगदा आला की,  चोर गाडीत शिरून लुटालूट करतात पण आपण ओरडलो तर चोर येणार नाहीत,” असं लीला नावाच्या मैत्रिणींनं  सांगितलं होतं.  सरानी जेव्हा आवाज ऐकला तेव्हा त्यांनी,   “चोर वगैरे असं काही नसतं,  तुम्ही शांतपणाने बसा.  आम्ही बाजूच्या डब्यात आहोत,  गरज पडली तर,  हाक मारा,” असं पाटील सरांनी सांगितलं.  मग मात्र आम्ही  शनिवारवाडा,  आळंदी आणि आसपासची ठिकाणं पहिली होती. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहताना एक वेगळा आनंद मिळत होता.  शनिवारवाडा पाहताना पुस्तकात वाचलेली पात्रं आठवत होती.  थोरले बाजीराव,  माधवराव पेशवे,  मस्तानी,  समशेर आणि इतर घटनांची प्रकर्षाने आठवण झाली.  “आळंदीला जाऊन,  विठ्ठल रखुमाईचा फोटो आणलास रश्मी !” असं काकूंनी विचारलं. रश्मीला एवढ्या दूर,  पाच,  सहा दिवसाच्या सहलीला पाठवलं याचं,  गावात किती कौतुक झालं विनिताचं. रश्मीच्या मनात विनिता आई बद्द्ल कृतज्ञता भाव दाटून आले.  बेबीजान आणि वैजूसाठी पुण्याहून आणलेली भेट देताना ट्रीपमधल्या गमती बदल गप्पा करताना वेळ कसा निघून जाई हे समजत नव्हते.  आणि आतापण वैजयंतीची आठवण झाली.  काही प्रसंगी ती  हमखास आठवते. चौथीपासून भेटलेली वैजू , रश्मीची खास  मैत्री  दहावी पर्यंत होती. कधी कधी भांडण होऊन कट्टी होत असे.  काही वेळेस मीच पहिल्यांदा का बोलू ❓️ असं म्हणून आठ – आठ दिवस कट्टी राही.  पण मग दोघीना चैन पडत नसे.  आणि एकदा का बट्टी झाली की बोलणं संपत नसे.   तीनं  रश्मीच्या मनामध्ये खास जागा निर्माण  केली  होती.  मैत्रिणीची व्याख्या असेल तर तिच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हती.  आज शॉर्ट ट्रिप अनाउन्स केल्या मुळं  त्यावेळी केलेल्या गमंती पण आठवल्या.  डॅमच्या ट्रिपमध्ये  औपचारिक पणा कमी होऊन आम्ही खूप गप्पा मारल्या.  आमचे प्रोफेसर  मुलांबरोबर त्यांच्या वयाचे होऊन कधी आपल्यातले एक झाले ते समजलचं नाही.  
मुलामुलींमध्ये बोलण्यात थोडा का असेना पण मोकळेपणा दिसू लागला.  अन्यथा मुले – मुली फारसे बोलत नसत.  आणि कितीतरी दिवस या ट्रिपच्या आठवणी मनात घोळत राहिल्या.   

कॉलेज लेक्चर्स, गॅदरिंग,  फिशपॉन्ड …

नाडकर्णी सर इकॉनॉमिक्स शिकवत असताना आवर्ती ठेव आणि त्याची पद्धत आणि  फायदे शिकवून गेले. वेगवेगळ्या अर्थ तज्ज्ञांचे मत,  तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणव मुखर्जी,  आर्थिक धोरण, त्यांची ग्रंथसंपदा आणि नव्याने समाविष्ट झालेला ग्रंथ- Beyond servaival….. Economy ई. बाबत चर्चा आणि संदर्भग्रंथ वाचनाबाबत सांगत असत.  आता  पॉलिटिकल सायन्सबरोबर क्रिटिसिझम,  फोनॉलॉजी, पोएटरी, लिटरेचर असे विषय आले. पोएट्री शिकविणारे सर  एखादी लाईन घेऊन त्यावर पूर्ण पिरियड बोलत राहायचे आणि संथगतीने  शिकवणं चालू राही.   प्रत्येक वर्षी एक तरी विषय कठीण असायचाचं आणि तो  विषय नाकात दम आणत असे.  अशा कठिण विषयासाठी खास वेळ द्यावा लागे.  आणि ट्युशनचा आधार घ्यावा लागे.  वाचन प्रचंड वाढवलं तरी  स्पोकन,  कम्यूनीकेशनमध्ये दुर्लक्षच होत होतं.  
शेक्सपिअर आणि त्याचे ड्रामा जेवढे रंजक आणि इंटरेस्टिंग होते, तेवढी भाषा कठीण होती पण पाटील सरांच शिकवण्ं अफलातून होतं. त्यांच्या बोलण्यातून धमाल आणि अखंड माहितीचा ओघ सहजपणे बाहेर पडत असे.   त्यांच्या प्रत्येक वाक्यातून त्यांच्या अभ्यासाची  आणि विषय ज्ञानाची प्रचिती यायची.  सर शिकवणं एन्जॉय  करायचे.  शिकवण हा त्यांचा व्यवसाय नव्हता तर  पॅशन होतं. शेक्सपिअरच्या ड्रामामधलं एखाद् वाक्य,  एखादा डायलॉग घेऊन एक एक तास बोलू शकतं होते. नावामध्ये सेx असणाऱ्या लेखकाबद्दल सरांकडे प्रचंड माहितीचा साठा होता आणि त्या बद्दलच्या चर्चेत त्याची वैशिष्ट्ये दिसून येतं. सगळं व्यवस्थित चालू होतं. खेड्यपाड्यातून येणाऱ्या मुलांना कॉलेज लेक्चर आणि वर्गामधील शिकवण हेच शिकण्याचं साधन होतं. काही वेळेस,  बेस चांगला नसताना पण हिमतीनं वेगळा विषय घेऊन त्यामध्ये प्राविण्य मिळवायचा प्रयत्न करत होते सर्वजण.   


गॅदरिंग झाल. बऱ्याच मुलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव देणारं  गॅदरिंग जबरदस्त झालं.  
ऐसी लागी लगन,  मीरा हो गई मगन,  मीरा गोविंद गोपाल गाने लगीsss”ची धून उतरायच्या अगोदरचं 
अंधेरी रातो मे सुनसान राहो पर  एक मसीहा निकलता है,  उसे लोग शहेनशहा केहेते है ”  ऑर्केस्ट्राची झिंग उतरायच्या अगोदर, 
वॉशिंग पावडर निरमा” म्हणत निरमा बेबी,   निरमाच्या स्वच्छतेचा प्रकाश स्टेजवर पसरवायची.   निरमा परी गायब झाली. निरमाचा झगझगीतपणा बाजूला ठेऊन आली,
 “चिंगी महिन्याची झाली नाही तोच,” म्हणत,  चिंगीची आई…..  आणि एक  महिन्याची पण नसलेल्या चिंगीच्या लग्नाच्या गोष्टी करून धमाल आणली. 
मुलीचा जन्म आणि तिचं जीवन कहाणी सांगणारा    स्ट्रीट ड्रामा,  “मुलगी झाली होss” इथं पण विचार करायला लावून गॅदरिंग संपलं. 
फिशपॉन्ड हा प्रकार पहिल्यादा ऐकला रश्मीने. मुलं,  मुली एकमेकांना  संगीतामधून कधी चारोळीमधून किंवा एखाद्या नवख्या पद्धतीने डोळ्यात झणझणीत अंजन घालत होते.  पण यातून आपल्या शिक्षक मंडळीना पण सोडलं नाही.  
“चंद्र वाढतो कलेकलेने आणि अनु वाढते किलो किलोनं,- अनु” या फिशपॉन्डवर अनु स्वतः पण खळखळून हसत होती.   “लावा पावडर,  लावा स्नो रंग माझा वेगळाच,  खाल्ला सुंठ अन चघळला जेस्टमध आवाज माझा भसाडाचं, संगी..” मेल्यानो, म्हणून सं….  पण हसायला लागली. टापटीप राहणाऱ्या सावळ्या साहिलला,  “दुरून पाहिलं तर इस्त्री कडक जवळ गेलं तर डांबरी सडक.”, रंगावरून शे ला टी… “मी नाजूक,  वळते मी  विड्या,  नजर माझी खाली, काय शोधते ही छा…?”  छा… लाजून चूर झाली.  
 नेहमी खाली मान घालून चालणाऱ्या सरांना विचारलं,  “सर तुमचं काय हरवलय?  मी शोधायला मदत करू का? “
 “कॉलेजच्या शेजारी वाहतो ओढा —- सर तुम्ही इन  करायचं सोडा”……… 🤣😂 सरांनीपण स्वतावर केलेले विनोद हसण्यावर नेले.

महान व्यक्ती…  खेबूडकर 

आणि अचानक सरप्राईज मिळालं.  कायमच आठवणीत राहील असं.  ज्यांची गाणी पिक्चरमध्ये पहिली, ऐकली होती,  रेडिओवर ऐकली होती ते महान संगीतकार जगदीश खेबुडकर.  आss हाss हाsss…  काय त्यांचं ओघवतं भाषण,  कविता गाणी आणि  गाण्याच्या चाली.  “माझ्याकडं चाल आहे,  गाण्यासाठी प्रसंग आहे.  बाग, फ़ुलं पान,  धुक सगळं आहे.  त्यामध्ये शब्द तू भर” असं म्हणू एक फिल्म प्रोड्युसर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी चाल सांगितली….. डाडाss,   ड डा डाss,  डा डाss ड डा डाsss डा ड ड डss ड ड ss,  ड ड  ड ड ड डा…. आणि मराठीमध्ये एक अजरामर गीत तयार केलं.  मर्यादित स्वतंत्र्यं असताना अमर्याद आणि अफाट कल्पनाशक्ती वापरून तयार झालेलं गीत म्हणजे…..  “धुंदी काळ्यानाsss धुंदी फुलांनाsss,  शब्दरूप आलेsss,  मुक्या भावनांनाsss..  ” म्हणून धुंद प्रेमभाव जागवला. 
 आणि तीन वर्षांपूर्वी  संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा आणि प्रत्येकाच्या मनात अष्टसात्विक भाव जागृत करणारा,  वसंतरावांच्या  तोंडून, “प्रथम तुला वंदितो” म्हणूनं  आळवणी करणारं गीत गाजलचं पण,  “पहिला गणपती अहा sss “  म्हणून महाराष्ट्र दुमदुमवला त्या गीताची निर्मिती कथा ऐकायला मिळाली. अष्ट विनायक अजरामर चित्रपट,  अजरामर गाणी,  अजरामर गीतकार. आम्हीसर्वजण एक समृद्ध अनुभव घेत होतो. 🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏

तुझी अक्का,😄 मागून छान दिसते…❗️❗️❗️


आज सगळ्या मुलींनी ठरवलं साड्या नेसून यायचं.  जय्यत तयारी केली सर्वांनी.  पहिल्यांदा कॉलेजमध्ये साडी नेसून जाणार म्हणून  चंदा आणि रश्मी खूश होत्या.  नेल पेंट,  गुलाब साडी आणि सर्व मॅचिंगसह गुलाबी रश्मीची तयारी झाली.  पिवळी साडी,  🌹गुलाब आणि क्लिपपासून चंदाची तयारी झाली.  
आज बस स्टॉप वर गजरेवाला बराच वेळ रेंगाळत होता आणि खूप मुली त्याच्या कडून गजरे घेत होत्या.  वेगवेगळ्या फुलांचा🌷🌹🌺🥀🌸💮🌻🌼 वास एकत्र मिसळून एक सुगंधी वातावरण तयार झालं होतं.   जणू सर्व रंग एकत्र नांदत होते आणि रंगपंचमी अवतरली होती.  जणू अप्सरा उतरल्या कॉलेजमध्ये.  एकीच्या साडीचा रंग छान तर एकीच्या साडीची बॉर्डर छान,  काहींना साडी शोभून दिसत होती.  काहींचं  साडीमुळे सौंदर्य खुलून दिसत होतं.  काही वेळेस दोन्ही एकमेकाला पूरक होतं. सुजा, मंजिरी,  वर्षा,  वैशूसारख्या सुंदर मुली आणखीनचं सुंदर दिसत होत्या.  
चंदाला, तिची मैत्रीण  स्वामींनीनं,  “तुझी रश्मी अक्का पाठीमागून कित्ती छान दिसतेय❗️👌” म्हंटल. “विनिता आई  आणि मी वारंवार सांगूनही, रश्मी चेहऱ्यावर आलेल्या पुटकुळ्यांना नख लावू नको म्हंटल तर ऐकत नाही” याबद्दल रश्मीचा, चंदाला खूप राग आला.  घरी आल्यावर चंदान, ळयाळ रश्मी अक्काला जरा आवाज चढवुन दम  दिला.  “आता चेहऱ्याला नखं  लावूनच बघ?”  चेहऱ्यावर मुरम पुटकूळयामूळे डाग आलेल्या रश्मीला पुन्हा तेच  सांगितलं. 


लेक्चर बंद ❓️❓️❓️❓️

आणि अचानकपणे, पहिल्यादा आम्हा सर्वाना वेगळा आणि भयानक  प्रत्यय आला आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे धाबं दणाणलं. काय होता हा प्रकार?  शैक्षणिक वर्ष सुरु असताना  हे असं करू कसं शकतात?  विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आणि विद्यार्थी आहेत म्हणून आपण आहोत असं म्हणणारे सर्व शिक्षक एकदम कठोर कसे होऊ शकतात?  म्हणजे कॉलेज सुरु होतं. विद्यार्थी,  शिक्षक कॉलेजमध्ये येत होते.  पण शिक्षक वर्गात जाऊन लेक्चर देत नव्हते.  एक,  दोन…… दहा,  पंधरा…. दिवस असेच गेले.  आता कॉलेजला येण्या जाण्यासाठी वेळ वाया घालवू नये असं वाटायला लागले. आणि वाटायचं संप आज मिटेल,  उद्या मिटेल असा विचार करून  आज तरी लेक्चर सुरु होतील म्हणून  रोज कॉलेजला जातं असू.  आणि तीन आठवडे  झाले  तरी संप काही मिटायची लक्षणं दिसेनात. 
संप म्हणजे अचानक काम बंद. रोज चालणार काम अचानक का बंद केलं जातं ? कोण काम बंद करत ? का काम बंद केलं जातं? असं कोणतं कारण होऊ शकतं ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचारच केला जातं नाही?  नेमकं शैक्षणिक वर्ष सूरु  असताना  कसा काय संप करू शकतात?  प्रश्न अनेक होते. समोर समस्या दिसत होती.  आम्हाला आमच्या भवितव्य अधांतरी वाटत होतं.  समस्या कशीही असली तरी उपाय शोधायला हवा.   काय असेल उपाय?  कोण मदत करेल? ❓️❓️…..प्रश्न….❓️❓️  प्रश्न……❓️❓️प्रश्न……❓️❓️. 
शेवटी रश्मीसहित सगळेजण मिळून,   एक दिवस स्टाफरूममध्ये जाऊन विचारलं,  “सर पोर्शन संपवणार कधी?,  पोर्शन संपल्याचं डिक्लेर  कधी करणार?, सर आमची स्टडी लिव सुरु  कधी होणार?”, समोरच्या सरानी दिलेलं उत्तर ऐकून अगतिकता जाणवली. मजबुरी जाणवली.  “शिक्षक म्हणजे गुरु,  त्यांना फक्त आणि फक्त विध्यार्थ्यांच्या कल्याणाची चिंता असते हा भ्रम दूर झाला.” “हे काय,  आता डिक्लेर करतो पोर्शन संपल्याचं. लगेच तुमची स्टडी लिव पण सुरु झाली… ” निर्विकार चेहऱ्यांनी सर बोलले…   आणि  आता आलेल्या परिस्थितीचा सामना आपल्याला स्वतःलाच करावा लागेल याची जाणीव झाली.  आणि गाईड आणि  तत्सम गोष्टींची मदत घ्यावी लागणार हे अधोरेखित झालं. जुन्या  नोटस् मिळतात का याची चाचपणी सुरु झाली…. कोणतंही  संकट आलं तरी आता भिडायचं एवढच डोक्यात ठेवलं.  आणि सुरु झाला अभ्यास…..  

रा➖️➖️

रा मा य ण❗️🌹🌷🙏🙏 चमत्कार..

त्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात एक महान चमत्कार घडला. रस्ते दुकान, बाजारपेठा चिडीचूप. हे असं निर्जन रस्ते, शांत बाजारपेठ, दुकानात कोणीही नसताना सोन्या चांदीच्या पेठेतील दुकानांचे दरवाजे सताड उघडे.. अरे चाललंय काय? कोठे आहेत दुकानदार, ग्राहक, लोकं? छोटं गाव असो की तालुका प्लेस, जिल्हा असो की राजधानी, सर्व जाती धर्माचे, सर्व पंथांचे, लहानांपासून वृद्धांपर्यंत स्त्री, पुरुष आहेत कोठे?????? असं कोणीही विचारत नव्हतं..
करणं सर्वाना माहिती होतं…. काय माहिती होतं?
रविवारी सकाळी एक तास— “अमीर हो या हो गरीब,
बच्चा हो या हो बुढा, नर हो या हो नारी रविवार सुबह हैं सबको प्यारी..

पर क्यो????

मोठ्यांचा सन्मान, लहानांना आधार, प्रेम आणि त्याग, आदर आणि दरारा, स्वार्थ, निःस्वार्थ, सुखाच्या लहरी दुःखाच्या सरी, भावनेनं ओथंबलेली, प्रेमात भिजलेली, स्वार्थाने थिजलेली, आनंदानं न्हालेली, युद्धाचा खणखणाट, कपटाचा सन्नाटा सारं तुडुंब भरलेलं. आजपर्यंत फक्त वाचत आलो होतो त्या महान धर्म ग्रंथातील पात्र समोर दिसतं होती, आपापसात बोलत होती. समोर टीव्हीमध्ये शेषशायी महाविष्णू, माता महालक्ष्मी, शेषनाग, महादेव, ब्रह्माजी🙏 कांही तरी नियोजन करीत होते. काय होतं ते ? ग्रंथातील पात्राहुंन टी. व्ही. तील पात्र्ं उत्कट आणि मनाची पकड घेणारी वाटली. पुनश्च्य रामराज्य आलं. राजा दशरथ, त्याच्या राण्या आणि पुत्रकामेष्टी यज्ञ…..
यदा यंदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत…” म्हणत जन्म घेणाऱ्या श्रीराम, सीता मय्या यांची कथा… रामायण सुरु झालं होतं.
श्रीरामानं आपल्या अवतार काळात कांही लोकांचा उद्धार केला पण रामनामानं अनंतकाळा पासून असंख्य लोकांना तारलं, तारत आहे आणि भविष्य काळात तारत राहील. ती महान कथा…
कुठे होते घराघरात टी. व्ही.?? पण ज्यांच्याकडे होते तेथे सर्व आसपासचे जमत.
“चंदा, सई या सगळे. सुरु होतय रामायण” या वहिनींच्या हाकेसरशी, हातातील कामं सोडून धावत जाऊन बसायचं… .
कौसल्या मातेच दुःख घरातील वाटे, आणि तिला झालेला आनंद घरातल्या प्रत्येकाला होई. सर्व कथा माहिती असून पण टी. व्ही. पाहताना तेवढीच उत्कंठा आणि उत्सह वाटे. रामायण मनामनात, घराघरात, गल्लीत, गावात, तालुका, जिल्हा, राजधानी आणि देशात, संपूर्ण जगातचं काय विश्वात भरलेलं होतं. पिढयांना सुसंस्कृत बनवत होतं. सत्य रुजवत होतं, प्रेम रुजवत होतं. त्याग रुजवत होतं. संस्कार रुजवत होते आणि रुजवलेले संस्कार दृढ बनवत होतं. समोरच्या बाबामंजिल मधील छोटी मुलं आणि आम्ही एकाच रूममध्ये एकाच टीव्हीवर एकत्र बसून रामायण पाहत होतो. आणि एका रविवारी आशिष बिल्डिंगमधले सारे लोकं बाबामंजिलमध्ये बडी भाभी आणि त्यांच्या परिवाराबरोबर रामायण पाहिलं.


घुंगरू…  ग्लास…..  बर्फ….  


आता उन्हाळा वाढू लागला आणि घुंगूरूचा आवाज येऊ लागला.  कॉलेजमधून घरी येताना नजर आणि पाय आपोआप  वाजणाऱ्या  घुंगरूच्या दिशेने वाळू लागे !!  “मामा, अजून बर्फ द्या”,  म्हणून मंजू ग्लासमध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून,  टाकून पिऊ लागली.  ग्लासमधला रस संपला तरिसुद्धा र्फाची मागणी असे.   बाहेर पडताना तोंडात बर्फाचा तुकडा टाकून बाहेर पडे.  आम्ही तिला कधी कधी बर्फीली मंजिरी म्हणून चिडवत असू.   आss हाss हाsss,   गारss गारsss,  थंड गारsss रस द्या मामा,  म्हणून सरिता, मंजिरी,  नेत्रा,  रश्मी रसवंती गृहात घुसायच्या. अभ्यासानं तापलेलं वातावरण घुंगूरुच्या आवाजाने थोडं हलकं होतं असे आणि थंडावा निर्माण करत असे.
गॅदरींग झालं,  सहल झाली,  महान संगीतकार खेबुडकर यांची भेट झाली, साडी दिन झाला,    संप आणि त्याची झळ बसली. असं वेगवेगळ्या गोष्टीबरोबर दुसरं वर्ष परीक्षापर्यंत पोहोचलं. 
आता उशीरपर्यंत लायब्ररीत वेळ जाऊ लागला.  प्रश्न आणि त्यावर मैत्रिणींमध्ये चर्चा होऊ लागल्या आणि…..  तर्कशास्त्रानं घाबरवलं पण मोठी साथ दिली. आणि अशा तऱ्हेने दुसरं वर्ष संपल. 

दुसऱ्या वर्षानं काय दिलं? लेखाजोखा आणि तिसरं महत्वाचं वर्ष, काय असणार रश्मी आणि कुटुंबियांच्या भविष्यात… वाचा रजतोत्तर भाग 26 मध्ये… 🌹👍

One Response

  1. अतिशय सुरेख नात्याची गुंफण 👌🏻👌🏻💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More