“तू सदा जवळी रहा…” आत्या की मैत्रीण? भाग – १९

“तू सदा जवळी रहा ….”
आत्ता पर्यंत आपण वाचलात,  
भाग -1  एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  …….  भाग -2 बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण….
भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….
भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….
भाग -5  रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  आईची परीक्षा. प्रश्न नव्हते:निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.   भाग – 6  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचे वि…..  सदृश्य जीवन.  
भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार – अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना ?  अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…
भाग-  8* आईचं मानस  दर्शन,  
राजेशची प्रकर्षाने आठवण आली. 
भाग -9  राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ?”, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार?  भाग – 10 साखळी, मंदिर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गाव देवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तीन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला, आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग- 12*   सुचिताची  प्रश्नावली, श्री… आणि  विनिता,  घराचं घरपण कस टिकवतात, रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का? चंदाला आकाशात काय दिसलं?  
भाग -13* @रश्मी खोटं बोलते पण…. ?  @ चंदा कुठे राहिली? @ चांद्रयाला पाटलीण बाई चप्पलन का मारते?
भाग -14 * काय दिल गुरुजींनी? कोणती दिशा दिली गुरुजींनी? काका आजोबांचा दिलासा, सुट्टी कशी गेली? विनिता रश्मीच्या सरना का भेटली? सरनी पेढे का मागीतले?
भाग -15 * मध्ये आपण वाचलात, वेगळी वाट, मन कप्प्यात बंद गोष्टी, पण ते इतक सोपं होत का? रश्मी बद्दल प्रश्न??? कॉलेज प्रवेश, सरू ताईचा सल्ला, रश्मी मॅडमना पाहून गप्प का झाली? विनिताचा चेहरा का काळवंडला? रश्मी पुतळी लायब्ररीत का बसत?
भाग-16 * विनिताला कसली काळजी होती? काय उपाय मिळाला शेवटी? का वेगळं वाटलं वातावरण? रविवारी कुठे गेल्या मैत्रिणी? शांतीच्या डोळ्यात काय वाचलं रश्मीन? दिवाळी सुट्टीत कुठे गेल्या तिघी बहिणी?
भाग- 17 @ दिवाळीचा म्हणजे काय ? @ स्वप्नात रश्मी का 😭 रडते? @ पाठी येणाऱ्या टोळीचा निषेध करते का रश्मी? @ कुसुमताई, सर, विनिता दरवाजा बंध का करतात? केदार काका, रश्मी कुठे गेले? काका, काकू रश्मी कुठे गेले?
भाग – 18 तरुण मुलगी घरात असणं? खंडाळा भेट, चिनूचे प्रश्न,
भाग -19, आत्या की मैत्रीण?,
फिरकी?, Urge to learn, अतरंगी बंटी,
🙏🌹

आत्या, रश्मीला कुठे घेऊन गेल्या?

काळ्या पाषाणातील प्रचंड आकाराची अवाढव्य शिवपिंढी पहिल्यांदाच पाहिली रश्मीने.  वेटोळे घालून आपल्या फण्याचे छत्र पिंढीवर धरणारा  पितळेचा भलामोठा नागराज; फणिवरधर,  स्वच्छ घासून झळझळीत केलेला तांब्याचा कलश, कलशातून संतत धार पिंढीवर झिरपत रहायची.  हवाहवासा वाटणारा मन आणि शरीराला प्रसन्न करणारा गारवा मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला जाणवायचा.  मंद प्रकाश,  पिंढीवर वाहिलेली पंढरी शुभ्र फुलं☘️💮 आणि बिल्वदळं,  समई मधील पाचही ज्योतींच्या प्रकाशात एक प्रकारची वेगळीच प्रसन्नता जाणवायची.  “ओम नमः शिवाय” चा प्रतिध्वनी गाभाऱ्यात  घुमायचा आणि हृदयापर्यंत ♥️ पोहोचायचा आणि हात जोडून 🙏😚 नेत्र मिटले जायचे. 

“जय उत्तरेश्र्वराय नमःsss” आत्याच्या मुखातून बाहेर पडलेले स्वर, प्रतिध्वनीने  गभाऱ्यात पुनश्च ध्वनिमुद्रित झाले. मंदिरातील ब्राम्हण पुजाऱ्याने प्रसाद, पुष्प🌺 आणि बिल्वदळं ☘️ आत्याच्या हातात ठेवलं . पुनश्च ‘नमः शिवाय’चा उच्चार करून प्रसाद मस्तकी स्पर्शून बॅगेत 👜 ठेवला तीनं आणि आम्ही बाहेर पडलो. 

तसं घरापासून जवळचं होतं मंदिर. पण कामाच्या व्यापातून कधीतरी बाहेर पडायच्या आत्या. रश्मी आल्यामुळे कधी महालक्ष्मी मंदिरात, कधी वांगी बोळ, कधी मावशी आजीकडे, कधी भाजी मार्केट, कधी दुकानात खरेदीला, कधी सुप्रसिद्ध तलाव असं सवडी आणि गरजेप्रमाणे बाहेर पडत होत्या. आत्यानी कॉलेजला जाऊन मानसशास्त्रा मध्ये पदवी घेतली असेल का एवढा तिचा अभ्यास असावा असं जाणवत होतं.  अन्यथा स्वतः होऊन फारसं बाहेर नं पडणारी आत्या काही नं काही करणं कडून स्वतः रश्मीला बाहेर  घेऊन जात होती. आपली भाची कोणत्या मनस्थिती आहे आणि तिला तणावातून  बाहेर  काढण्यासाठी काय करायला पाहिजे? हे ती जाणून होती. ती त्या दृष्टीनं प्रयत्न करत होती. काहीवेळेस  शिक्षण,  काही वेळेस  जीवन अनुभव कामाला येऊ शकतो.  शिक्षण आणि अनुभव दोन्हीही एकत्र असेल तर सोन्याहुनं  पिवळं.   तिच्या बोलण्यातून कधी खंत बाहेर पडायची कधी लहानपणीच्या गंमती जंमती. वर्गातील मुलींच्या डोक्यातील ऊवा आपल्या डोक्यात जातील म्हणून शाळेला मारलेली दांडी किंवा खूप लहानपणी आपल्या आईला म्हणजे ताई आजीला  स्वयंपाक करताना छोटू काकां कसे पदर धरून पाठी पाठी फिरायचे किंवा लहानपणी काढलेला फोटो आणि गावच्या वाड्यात भावंडांबरोबर खेळलेले खेळ,  केलेली दंगामस्ती आणि बरंच काही बोलत राहायच्या आत्या. पण आताशा त्या कधीकधी कामानिमित्ताने  बाहेर पडत होत्या. 

” Urge to learn !”

अन्यथा घरी सातत्याने नातेवाईकांची वर्दळ असे.  छोटे, मोठे काका, दोघी आत्या, सर्वाची मुलं आणि प्रणवच्या आत्या, काका, भावंड वगैरे अगदी निसंकोचपणे घरी येत असतं. सुहासी, गुंजन, उन्मेष, राम, लखन, मन्मथ, कुंतल , कुंजन, रौनक, सिमंती आणि बरीच चुलत,आत्ये आणि जवळ – दूरची प्रणवदाची भावंड आत्याकडे येत असतं. त्यात  कोणी इंजिनिअरिंग, कोणी डॉक्टर, कोणी नुसतच ग्रॅज्युएशन, कोणी सी. ए. कोणी बी.एम. एस.कोणी कसले कोर्स करत होते. त्यांचं हे सारं सहज  शिक्षण होतं. त्यांच्या शैक्षणिक सत्र, अभ्यास, करिअर, कॉलेज कॅम्पस, आणि इतर गोष्टींवर चर्चा करताना रश्मीला कळत नकळत बऱ्याच गोष्टी समजायच्या. शिक्षणाची आस आणि अभ्यासाचा ध्यास त्यांच्या बोलण्यातून सहज दिसून येत होता. “Urge  to learn” त्यांच्या मनात मुरून कृतीतून उतरताना दिसत होती.  शासन कायदे खूप करतंय पण त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, तळा पर्यंत नेणारी यंत्रणा सक्षम आहे का? याच उत्तर “होय” दिसत होतं.  सर्वत्र युवा पिढी घडवताना,  पालकवर्ग मुलांचे  शिक्षण आणि भवितव्याबद्दल सजग दिसून येत होता. आणि ही गोष्ट नक्कीच स्पृहणीय होती. “शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी” 

या म्हणी प्रमाणे उत्तम ज्ञानबीज रोवणाऱ्या  उत्कृष्ट युवापिढी निर्मितीचं वातावरण आणि त्यादृष्टीनं  चाललेलं कार्य  उज्वल भारताचं स्वप्न  साकार करणारं होत. हे कामं सातत्याने  वर्तमान  काळामध्ये होणाऱ्या सकारात्मक आणि सृजनात्मक बदलांची भर टाकून  नित्यनेमानं  चालणार  कार्य होतं.  आपण पण त्या प्रकियेचा सक्रिय भाग असावं अशी जबरदस्त मनीषा उरात निर्माण होऊन, मनोमन काहीतरी दृढ संकल्प केल्याचे रश्मीच्या चेहऱ्यावरून वाटत होत. आता फक्त योग्य वेळेची वाट पाहणं आणि प्रज्वलित झालेलं स्फुलिंग ज्वलंत ठेवणं आवश्यक होतं.

रश्मीची फिरकी ?

 कटंजनला रेलून  बराच वेळ शून्यात नजर लावून  रस्त्याकडे पाहणाऱ्या रश्मीला, दोनदा आवाज देऊनही  तिनं प्रतिसाद दिला नाही, म्हणून ओंकारला तिची फिरकी घ्यायची लहर आली. 

“दुपारी,  घरात बसून आराम करायचं सोडून: अशी गॅलरीत कोणाची वाट पाहते आहेस?  अँ अँ?” भुवया उंचावून चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत ओंकारनं  विचारलं आणि हीही sss, हीहीही sss हसला. रश्मीला आलेल्या स्थळाबद्दल ओझरतं  काहीतरी ऐकून तो फिरकी घेण्याच्या उद्देशानं बोलला.  

“अंह, कुठं काय?  काही नाही,”   म्हणून आत निघून गेली रश्मी. 
आत्या शिवलीलामृत वाचत होत्या. त्यांनी पोथी रश्मीकडे दिली आणि वाचायला सांगितलं तिला. 
सुंदर शिव – पार्वती,  गणेश आणि कार्तिक स्वामींचे रंगीत चित्र होतं मुखपृष्ठावर. हात जोडला रश्मीन🙏. खणखणीत स्पष्ट आवाजात रश्मीने वाचन सुरू केलं …..

ओम नमोजी शिवा अपरीमिता,  आदी अनादी मायातीता | पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता, हेरंभ ताता जगद्गुरू ||  ज्योतिर्मय स्वरूपा,  पूराण पुरुषा अनादी सिद्दा,  आनंद वनविलासा | माया चक्र चाळका  अविनाशा अनंत वेशा जगत पते || जय जय विरुपाक्षा पंच वदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या |  मनोज दमना मन मोहना कर्म मोचका विश्वंभरा ||……………… ………………………….. ………………………….. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड | स्कंद पुराण ब्रम्होतर खंड | परीसोत सज्जन अखंड | 
|प्रथमाध्याय गोड हा ||
||श्री सांभसदशिवार्पणमस्तू ||
 

 मृग व्याध,  कल्माष पाद, गोकर्ण,  विमर्शन नृप,  भद्रसेन, वज्रबाहू, श्रियाळ,  शंकराचार्य… आणि एक एक करून सर्व पंधरा अध्याय झाले.

नवनाथ सार,  स्वामी समर्थांचे दास बोध वाचून झाले.  आत्याचं ऐकून नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या पण पाठ झाल्या. 

“आत्या,  मयूरांगीचे व्यर्थ नयन  तैसे नेत्र  तयाचे’  म्हणजे नेमकं काय? 
मला वाटलं सुंदर स्त्री,  जी शिव दर्शन करत नाही तिचे  डोळे काय कामाचे?  असं तर ब्रम्हानंद स्वामींना म्हणायचं नाही ना? ” 
रश्मीचा प्रश्न ऐकून आत्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं आणि बोलली,  तू चुकीचं समजतेस,  म्हणून प्रश्न चुकीचा विचारतेस.  आणि स्वतःचं, अर्थ पण चुकीचा लावतेस”. 


आत्याच्या सडेतोड उत्तरानं रश्मीला प्रश्न पडला.  ‘मला  चुकीचं काय समजल?’ रश्मीच्या मनातील गोंधळ चेहऱ्यासार स्पष्ट दिसत होता.  आता आत्याच्या बोलण्याची वाट पाहत होती रश्मी. प्रश्नार्थ मुद्रा आजिबात बदलली नाही.  मयूर + अंग  आणि ग ला इ  कारान्त म्हणजे गी केला आणि संधी केली”. अगदी व्याकरणासहित सांगितलं आत्यानी. “हूं,  आत्या,  आता समजलं मला. त्यांना असं म्हणायचे आहे,  मोर पंखावर असलेले डोळे काही पाहू शकत नाहीत म्हणून त्यांना नयन म्हणण व्यर्थ आहे, असा अर्थ होतो”. 

परीक्षा संपल्यावर ओंकार आणि आदित्यनं ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांच वाचन चालू होतं. पुस्तके वाचनाची आदित्यची आवड आणि ओमकारची आवड  भिन्न असली तरी अधाशासारखं पुस्तकं वाचून संपवली जायची. 

  सुस्तपणा काय कामाचा?   शरीराला चपळ ठेवायचं असेल तर चालणं,  आणि शरीराला कामाची पण सवय हवी.  रश्मी, आत्याच्या हाताखाली अष्टावधानी होत होती.  संकटाचं  संधीतं  रूपांतर होत होतं!

“जे होतं ते बऱ्या करता” असं  म्हणतात काही घटनाचं अशा घडत गेल्या की रश्मीचं काय सगळं घर दार  बदल पाहत होतं.  आतून बाहेरून बदल जाणवत होते आणि ते बदल नक्कीच चांगलं भवितव्य दाखवत होते. रश्मीला स्वतःला असच जाणवायला लागलं. अवांतर वाचन,  दुकान; बाजाराचे काटेकोर व्यवहार, घरात येणाऱ्या माणसांशी आत्याचं  वागणं, बोलणं, भावंडांच एकमेकांशी असलेलं घट्ट नातं आणि त्यातून घेता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी टिपत होती रश्मी. काकांच्या जाण्याने, घरात निर्माण झालेली पोकळी भरून येणार नव्हती पण आलेल्या परिस्थितीशी  धैर्यानं सामना करत, मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून पाहत होत्या आत्या.  इथ अजून एक गोष्ट प्रकर्षानं समजली रश्मीला. परीक्षा झाल्यानंतर लोळत पडणं, टिवल्या बावल्या कारण, नक्या, चौक्यावर उभ राहणं, नुसतच पुस्तकं वाचत आराम कारण हे काहीच गावी नव्हतं भावंडांच्या. सुट्टीमध्ये सगळी भावंडं अनुभव घेण्याकरिता काही न काही काम करत होती. नियमितपणे शाखेत जाणं, सूर्य नमस्कार घालणं, अवांतर वाचन,  आईला  मदत करणं आणि फावल्या वेळेत व्यावसायीक कामाचा अनुभव घेणं हे सारं करत होती रश्मीची भावंडं. कष्ट, वेळ आणि पैशाचं महत्त्व या भावंडांकडून शिकावं. कधी अत्याला, आपल्या वागण्यामुळे तक्रार करण्याची संधी दिली नाही त्यांनी. जबाबदारीची जाणीव जरा जास्तच आणि लौकर झाली हे स्पष्ट दिसत होत. कौतुक वाटायचं सगळ्यांना तिघांचं पण. त्यांच्या समजूतदारपणाचं उदाहरण दिलं जायचं.  

बंटीनं, कोठून कमाई केली?

उमेश दादा गावाकडून आला तेच नरम प्रकृती घेऊन. कणकण वाटत होती त्याला. आत्या आणि मी तडक दादाला घेऊन डॉक्टर वाडकरांच्या दवाखान्यात  गेलो. पुढे दवाखाना आणि पाठी भलंमोठं घर होत त्याचं. एकत्र आणि मोठं कुटुंब होत डॉक्टरांचं. डॉक्टरांचा पुतण्या मनोज, प्रणवदादाचा वर्गमित्र तर  बंण्टी आदित्यचा वर्गमित्र होता.  त्यामुळे ते आत्याच्या परिचयाचे होते.  बंण्टी,  आदित्य बरोबर कधी अभ्यासासाठी, कधी खेळण्यासाठी घरी यायचा. बरीच भावंड एकत्र राहत होती. डॉक्टर, वडीलधारे आणि प्रेमळ असल्यामुळे मूलं त्यांच्या अवती भोवती फिरत आणि गप्पागोष्टी करत.  वाडकर डॉक्टर आणि  बापूकाका खूप जवळचे मित्र होते त्यामुळे दोघांचे कौटुंबिक संबंध खूप चांगले होते. अगोदर त्यांनी अत्याची आणि मुलांची चौकशी केली. उमेश दादाला तपासून औषध दिलं आणि हलका आहार देण्यास सांगत असताना मध्येच…..

डॉक्टरना हाक मारत बंटी 😆आत आला.

“शू sss! शू sss! आवाज कमी” डॉक्टर बंटीकडे  पाहून आपल्या तोंडावर बोट ठेऊन आवाज न करण्याविषयी सुचवत होते.

पण काका या तर प्रणव दादाच्या मम्मी आहेत. आपल्याच आहेत. मी कालच भेटलो त्यांना. बंटी ओझरती दृष्टी फिरवून परत डॉक्टर काकांकडे वळला. “काका, काकाss , पहिल्यांदा माझ ऐका!” बंटी आपल घोडं पुढं दमटत बोलला. 

डॉक्टर जरा त्रासिक 🙄😵😖 स्वरात त्याला थांबायला सांगत होते. 

पण शेवटी आत्याच बोलली, “हं, बोल बंटी, पहिल्यांदा तू बोल, मी नंतर औषध घेते”. 

“काका, ही बघा माझी आजची कमाई”  दोन रुपयाचं नाण डॉक्टर काकांसमोर धरत बंटी बोलला. 

“कमाई? कसली कमाई?” डॉक्टर न समजून विचारते झाले. चेहऱ्यावर भाल मोठं प्रश्न चिन्ह ❓️❓️ होत त्यांच्या.  

“हां विसरलात ना? सकाळी कोण म्हटलं मला, मनोज दादा डॉक्टर होणार पैसे कमावणार, आणि तू असाच राहणार, तुम्हीच बोललात ना?” बंटी आपला मुद्दा ठासून मांडत होता. चेहऱ्यावर मिश्किल आणि मी कसं दादा अगोदर पैसे मिळवले? चे भाव होते.
डॉक्टर ना सकाळचे बोलणे आठवले… 

आठ – नऊ वर्षाच्या मस्तीखोर बंटीला मुद्दामहून डॉक्टर चिडवत होते. “मनोज दादा खूप मोठा डॉक्टर होणार. तो खूप पैसे कमावणार. तुझ काय? तू नुसतं सायकल वरून हुंदडत असतोस” वगैरे वगैरे. पण त्या दोन रुपयाच्या नाण्याच कोड काही सुटेना. 

बंटीचा अतरंगीपणा माहीत असल्याने डॉक्टरांनी चाचरत विचारलं, “त्या दोन रुपयाच्या नाण्याच काय?” 

“मी एस.टी. स्टँड वरून एका काकांची बॅग सायकलवरून त्यांच्या घरा पर्यंत नेली” बंटी बरळला   “मग?” थोडया जरबेन डॉक्टनी विचारणा केली. “त्या काकांन कडून दोन रुपये भाड घेतलं मी, 😇😂😂 बॅग घरी सोडण्याची 🤣🤣🤣 ह मा ली. केली की नाही मनोज दादा अगोदर पैशाची कमाई?” बंटी उताराला. डॉक्टर डोक्यावर हात ठेऊन हसत होते आणि मन हलवून 🙄बंटीकडे पाहत होते. आणि आम्ही सर्वजण त्याच्या प्रश्नावर हसत हसत बाहेर पडलो 😃😅

 आईकडे  असताना, घरकाम आणि इतर व्यवहारात  पूर्णपणे  दुर्लक्ष करणाऱ्या  रश्मीला स्वतःची लाज 😙 वाटत होती.  सातत्याने  आई कामात असताना,  आपण स्वतःहोऊन कोणतीच जबादारी घेत नव्हतो. ती किती  दमत असेल? शारीरिक श्रम,  आर्थिक जबाबदारी, मानसिक ताण, बाहेरचे व्यवहार आणि घर सांभाळून सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना कधी तिला मदत हवी आहे का याची दखल घेतली का?   दिवसभर किती कामं करते?  जेवली का?   तिच्या कष्ट आणि मेहनतीचा विचार केला का? तर नाही असं उत्तर होतं. प्रकर्षाने आईची आणि ती करत असलेले  कष्ट आणि मेहनतीची जाणीव नव्यानं झाली.  करणं रश्मी, दिवस रात्र आत्याची मेहनत पाहत होती. 

कसं स्वीकारलं आव्हान, दोघीनी?

एकाच दिवशी,  एकाच मुहूर्तावर, एकाच मांडवात लग्न होऊन आई, तालुक्यामधून नाडकर्णी कुटुंबात, खेड्यात आली आणि आत्या खेडे गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी गेली.   

आईच्या पदरात तीन लहान मुली ठेऊन उणापुरा आठ  वर्षाचा संसार  करून  अर्ध्यावरचं  डाव मोडून आबा निघून गेले. एकल हाती प्रयत्नाची पराकाष्ठा   करत विनिताची अक्षरशः लढाई चालू होती. मुलींना अज्ञानाकडून ज्ञानाकडे,  परावलंबित्वाकडून,  स्वावलंबित्वाकडे  नेण्यासाठी.  

सोळा वर्षांनंतर इकडे आत्याचा संसार असाच अर्ध्यावर टाकून, बापूकाका निघून गेले.  जोडीदार गमावल्याचे दुःख,  लहान मुलांची अचानक एकल हाती आलेली जबाबदारी आणि मुख्य म्हणजे भक्कम आधार नसल्यामुळे, आलेला खंबीरपणा,  हुं  की चूं  नं करता आपल्या वाट्याला आलेलं जे काही  दुःख,  भोग,  जबादारी,  आव्हान समर्थपणे पेलतानं  रश्मीनं स्वतःच्या डोळ्यांनी पहिला होतं. 
आता मी  काय करू?  कसं करू?  कोणी मदत करेल का?  असे प्रश्न निर्माण केले नाहीत. परिस्थितीनं पिडलं तरी या दोघीही फक्त परिस्थितीला भिडल्या. केव्हड धाडस?  कुठून आलं एव्हडं धाडस?  नवऱ्या पाठीमागे चालणाऱ्या या दोघी नारी, स्वशक्तीची जाणीव स्वतःलाच करून देऊन, आपल्या हातानी; आपल्या मुलांचं उज्वल भवितव्य तर लिहीत नव्हत्या?   मुलांची प्राक्तन बदलायला विधात्याला  भाग पडण्याचा त्यांचा  इरादा त्या विधात्याला तर माहित होता का?  

काय दडलंय भविष्यात?   रश्मी,  चंदा,  सईच्या आणि प्रणव, ओंकार आदित्यच्या नशिबात काय आहे या मुलांना माहित नसेल.  नणंद –  भावजय काय विचार करत असतील?  आणि “तो” सर्वांचा पिता म्हणवणारा,  त्याच्या मनात काय आहे? रश्मीला प्रश्नावर प्रश्न पडत होते. उत्तरं माहीत नव्हती. उत्तरं शोधण्या पेक्षा आता आवश्यतेनुसार कामाला, मुख्यत्वे अभ्यासाला भिडायचा जबरदस्त मानस तयार होतं होता. त्याव्यतिरिक्त बाकी कोणतेही  विचार डोक्यात यायचे नाहीत.  पण कसं शक्य होणार होतं?  कुठे जाणार होती कॉलेजला रश्मी?  कशी जाणार होती कॉलेजला? कोणाला माहीत होती सर्व प्रश्नांची उत्तरं? 
इथ एक गोष्ट अधोरेखित होताना दिसत होती. शिक्षणामध्ये आलेल्या अडथळ्याने काही काळ मन विचलित जरूर केलं, अडचण मोठी वाटली. आणि त्यामुळे मनात जिद्द निर्माण होतं होती. शिक्षणा बद्दल वेगळी अवीट गोडी निर्माण होतं होती आणि हे नक्कीच सकारात्मक ऊर्जेच लक्षण होतं.

जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतात, पण मधला काळ ज्याचं आपण अक्षरशः सोनं करू शकतो त्याच काळात आपण अनावश्यक विचारांच ओझं वाहुंन आपली प्रचंढ युवाशक्ती भविष्याचा नाहीतर लोक काय म्हणतील? याचा विचार करण्यात घालवतो. पण नेमकं युवा शक्तीच मर्म आणि वेळेच महत्व ज्याला समजत तोच, समोर उच्च कोटींच ध्येय ठेऊन त्या दृष्टीन वाटचाल करत राहतो, तोचं खरा ‘कर्मयोगी’. अन्यथा रोज नव ध्येय आणि रोज विचार बदलणारे, सारडा प्रमाणे रंग बदलतात, त्यांची धाव कुंपणापर्यंतच असू शकते. चला तर आपण कर्मयोगी गटात सामील होऊन, देश हित आणि पर्यायानं मानवहितासाठी युवाशक्ती आणि वेळेचा योग्य वापर करूया. या विचार मंथना बरोबर नेमकं काय हवं आहे आणि त्यासाठी काय करायला हवं हे दृष्टीपथात आलं. आणि खळखळ करणार मन शांत झाल्याचं भासलं.
काय असेल पुढचं पाऊल? आणि नेमकं कोण उचलेल पुढचं पाऊल? वाचा भाग 20 मध्ये.

3 Responses

  1. सुंदर !
    आकर्षक, उस्फुर्त मांडणी.
    आयुष्याला पडत असलेल्या पैलूंची उत्कृष्ट शब्दात गुमफण केली .
    खूप छान!

  2. अनुभवाच्या ओंजळ आपण थोडी सैल केली आणि लक्ष मोती घरंगळुन अंकुरल्या सारखे वाटले . उत्कृष्ट शब्द रचना !अलगद ने ऊन शुक्रवार पेठेतल्या घरी नेऊन सोडल्या सारख वाटल . खूप सुंदर! आपल्या शब्दात भूतकाळात मनाला रुंजी घालायला लावायचे सामर्थ्य आहे .

    1. आपण दिलेले अभिप्राय वाचून नवं निर्मितीला स्फूर्ती मिळते.🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More