“तू सदा जवळी रहा…. ” भाग -12. अर्थात बालमनातील प्रश्न आणि वर्षा

  भाग -1*  एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते. रश्मीचं देवघर आणि चर्चगेटची सैर ……. 

 भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….

 भाग-3 * शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….

भाग  – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुम ताई …अनुभूती घेतलीत  कुसुम ताई,   सई, चंदाच्या बालपणातील आठवणी….

* भाग -5 * रश्मी आणि कुटुंबियांवर आबा गेल्याचा आघात,  विनिता आईची परीक्षा. प्रश्न नव्हते निशब्द शांतता,  प्रार्थना  बळ देते  रश्मीला आणि कुटुंबियांना… 🙏.  

भाग – 6*  रश्मीच्या आईबद्दलच्या संगीतमय आठवणी,  आणि रश्मीचं वि…..  सदृश्य जीवन.  

भाग -7 * एक सक्षम महिला असून पण रश्मीन गप्प राहून का सहन केलं सार — अन्याय,  प्रतारणा,  आर्थिक,   सामाजिक,  मानसिक,  नैतिक अवहेलना.   अमूल्य शिक्षण, राजेशची पार्श्वभूमी…

भाग-  8* आईचं मानस  दर्शन,  
राजेशची प्रकर्षाने आठवण आली.  भाग -9 * राजेश – एक विचित्र रसायन, “मम्मी, माणुसकी म्हणजे काय गं ? “, देविशाची ट्युशन टीचर, रश्मीचं काय होणार? 
भाग – 10* साखळी, मंदीर आणि कोंबडा, खो खो, तुळशी वृन्दावन आणि राजू, गावदेवीच्या मंदिरासमोर गोल करून का उभे होते यात्रेकरू? राजेश रश्मीला घेऊन गावी जातो. पहिलीचा वर्ग आणि शब्दनिष्ठ विनोद.
भाग -11* मालिनी वाहिनी – वनिता भेट, नाडकर्णी वाडा सोडून कोठे गेल्या विनिता, रश्मी, …., …? एकच जेवण तिन वेळेस कसे जेवले पुट्टु काका? विनिता – रांगोळी कला, विनिता – गायन कला आणि लोचन आणि रश्मीचा जन्म.
भाग -12*   सुचिताची प्रश्नावली, श्री आणि  विनिता घराचं घरपण कसं टिकवतात❓️ रश्मी झोपेत का घाबरली, दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का?  

      सुचीताची प्रश्नावली ❓️❓️❓️


संजू, सूची, लहानगी लोचन आणि मालीनी वहिनी मळ्यात आल्या खऱ्या. सुचीतानं प्रश्नांची मालीका सुरु केली. एक प्रश्नाचं उत्तर द्यावे तर त्यातून इतर प्रश्न निर्माण झालेले असतं.

विनिता काकू आणि सर्वजण वाडा सोडून का गेले?
वाटणी झाली म्हणून वाडा सोडून काकू का गेली? मग बाकी सर्व लोक वाड्यात का राहत आहेत?

वाटणी म्हणजे काय? वाटणी का करतात? काकूकडे इतकं कमी सामान का आहे? काका नसताना, माझ्या लहान बहिणींची काळजी कोण घेणार? शाळेत कसे जाणार? रश्मीला एकटीला मळ्यातून, गावातल्या शाळेत जाताना भीती नाही का वाटणार? तिचे पाय नाही का दुखणार? ताईआजी सारखी रडते का? रात्री लाईट गेले तर भीती नाही का वाटणार ? दुकानातून सामान कोण आणणार? काका नाहीत, तर काकू पैसे कुठून आणणार? सूची आणि संजूच्या छोट्या मेंदूला केवढे सारे प्रश्न पडले होते …

विनिता आणि मालीनी बोलत असताना रश्मीने, आण्णा काका आणि ताई आजी बद्दल अर्धवट आणि ओझरते काहीतरी ऐकलं आणि मोठी संजू अक्काला प्रश्न विचारला. “संज्जू अक्का, आण्णा ताईची आई? ” रश्मीच्या प्रश्नावर सगळेचं हसायला लागले. ओषाळुन संजू अक्काच्या ओंजळीत तोंड लपवलं रश्मीने …
संजू, ” रश्मी, ताईआजी अण्णांची आई आहे. तू प्रश्न उलटा विचारलास”.

श्री… आणि विनिता : घराचं घरपण..

रश्मीनं नुकतीच सात वर्षे पूर्ण केली होती. विनिताचं परिस्थितीशी झगडणे सुरु झालं. आपली माणसं म्हणून, ज्या घरात आणि सर्वांच्या मनात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं तिथं आपलं कोण? असे प्रश्न मनात उठू लागले. जे स्वतःला घराचा कर्ता पुरुष समजत होते त्यांचे खरे रूप दिसून आले. रश्मीच्या बाबांबरोबर घराचं घरपण, माणुसकी, एकी सर्व संपले होते. प्रत्येकजण स्वत: पुरता अर्थात कोता विचार करताना दिसत होता. भावंडांच प्रेम बेगडी होतं. आता नाडकर्णीचा वाडा म्हणजे बडा घरं, पोकळ वासा झालं होतं आणि रश्मीच्या वडिलांचे महत्व मरणोत्तर अधोरेखित झाले.
“काहीही न बोलता सारं कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची, प्रेमाने सर्वांना सांभाळून घेण्याची क्षमता श्री… आणि विनितामध्येच होती. श्री.. कधी बोलून दाखवत नसे.” ताई आजी बोलली. “जो करतो तो बोलत नाही. पण हे सार खूप सुंदर पद्दतीने श्री… आणि विनीने सांभाळलं. विनी तू मात्र आपल्या मुलींना श्री.. आणि तुझ्या सारखेच वाढवं. असेच संस्कार दे त्यांना. एकी राहूदे सर्वांमध्ये. मी संस्कार करायाला, शिकवण द्यायला कमी पडले. सगळे खूप कोत्या वृत्तीनं विचार करतात. मी, माझी बायको, माझी मुलं या पलीकडे विचार नाही करू शकतं हे लोक.” सूचीच्या प्रश्नांमूळे ताई आजी अस्वस्थ झाली. तशी विनिता जवळ जाऊन आजीचा हात हातात घेऊन दाबला व मुलांसमोर अशा गीष्टींची चर्चा नको करायला म्हणून सूचविलं. विनिता ताई आजीकडे पाहून बोलली, “मालिनी वाहिनी केवढ्या आत्मीयतेनं भेटायला आल्या आपल्याला. बरं वाटलं त्यांना पण आणि आपल्याला पण,”
दरम्यान शेतीची कागद पत्र तपासणं, नाव बदलणं घराच्या सामानाची वाटणी ई. प्रकार सुरु झाले. सगळ्यात त्रास झाला तो ताई आजीला. विनिताला हे सगळं अनोखं आणि अनपेक्षित होतं. आपलं माणूस गमावलेल्या विनीताला घरातील सामान वगैरे सारं गौण वाटत होतं. बाहेरची मंडळी पंच म्हणून आली. वाटणी हा प्रकार भयंकर वाटत होता. माणसं दूर जातात पण घायाळ होऊन. कोणाला आनंद झाला या साऱ्या प्रकारानं? बाहेरच्या लोकांसमोर नात्यांची चिरफाड होते. मनं दुखावतात. वस्त्र फाटलं तर टाके घालता येतात. मन म्हणजे काचेच्या भांड्या सारखं. ते कस सांधता येईल. ताई आजीचा जळफळाट झाला.

त्यांनी जेव्हा सर्वांबरोबर विनितानं पण काही हजार रुपये काकांना द्यावेत असं ठरवलं तेव्हा प्रश्न आ वासून उभा राहिला. छोटे काका, मोठे काका, आणि घरातील सर्वजण नोकरी करत होते. पण विनिता तिचे काय होणार ? कसे होणार ? फक्त कांही एकर जमिनी व्यतिरिक्त तिच्या कडे कांहीच नव्हत. रश्मी सात वर्षांची, चंदा चार वर्षांची आणि सई लहान बाळचं होती. राहायला मळ्यात बांबूच्या खोपीतं तेही गावापासून दोन मैल दूरवर.

एक एक समस्येला तोंड देत विनिता उपाय शोधत होती. समस्या सोडवतं होती. मदत करायच्या ऐवजी हे लोकं समस्या वाढवताना दिसायला लागले.
शेवटी विनिताला तोंड उघडावं लागलं, “मला पैसे देण शक्य नाही. सर सकट सगळ्यांना एकच नियम कसा लावू शकता तुम्ही? ” शंभर टक्के या इतक्याच शेतीवर मला पूर्ण कुटुंबाचा भार सांभाळायचा आहे”. विनिता आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत होती. ” भटजी पंच मध्येच बोलले, ” गव्हा बरोबर आळी चिरडली जाते. तुला पण पैसे द्यावेच लागतील”. “कमाल करतात भटजी बुवा, “आळीची लस खाताना किळस, लाज नाही का वाटत?”
वाटणीच्या नावावर खच्चीकरण चालू होतं, पंचाद्वारे. तीनही मुलीचं. काय करायला शेतीवाडी, घरदार? कुठं तर काम करून गुजराण करावी ही मानसिकता आणि हा डाव ओळखला विनितान आणि आजीनं पण. आणि असे प्रसंग एन केन प्रकारें सतत चालू झाले.
जी जमीन श्री.. च्या नावे होती ती विनिताच्या नावे करता येऊ नये यासाठी पण प्रयत्न केले गेले. पण अज्ञान मुलींची पालनदार म्हणून नाव बदलायला तीन वर्षे गेली आणि ते पण हितचिंतकांच्या मदतीने.
आता रश्मीबरोबर चंदा शाळेत जायला लागली होती. रश्मी आणि चंदा दोघी एकत्र शाळेत जात असतं. चंदा खुप चुणचुणीत, हुशार आणि हजार जबाबी मुलगी होती. तिच्या हुशारीमुळे साडेचार वर्षाच्या चंदाला पहिलीत प्रवेश मिळाला. रोज दोन मैल चालून शाळेत जाणे आणि तेवढंच अंतर चालत परत येणं चार वर्षाच्या लहानग्या चंदा बाळाला जड जात होतं. त्यामूळ चंदाबाळ आणखी बारीक दिसायला लागली.
दुष्काळ पडल्यामूळ विहिरीचे पाणी कमी झाले. बागायती शेतीमध्ये पीकं कमी प्रमाणात आली. जनावरानां ओला चारा मिळणं बंद झालं.
केळीची बाग सुकून गेली. काळ्या जमिनीत मोठ्या भेगा दिसू लागल्या. मोठी मोठी मातीची ढेकळ प्रचंढ उन्हामुळं टणक झाली होती. सर्वत्र उसासे ऐकू येऊ लागले.
कोणत्याही परिस्थितीत शाळेचे युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या आणि फी इत्यादी मध्ये कधीही विनितानं मागचा पुढचा विचार केला नाही. तसेच शाळा दूर आसल्या मुळे आणि रस्ता तापलेला असे. इतक्या दूर चालत जाणार शाळेत, तर चप्पल हवीच.
दुष्काळाची झळ सर्वांना होरपळवत होती. परंतु विनितानं धीर सोडला नाही.

रश्मी झोपेत का घाबरली?

काळभोर तोंड, चेहऱ्यावर काळे केस, बारीक रोकलेले काळ्या चकचकीत मण्यासारखे डोळे, शुभ्र दात, भूऱ्या रंगाचं धिप्पाड शरीर, लांब शेपूट या झाडावरून त्या झाडावर उडी मारत, दातांचा कराकरा आवाज करत त्यांचा घोळका मळ्यात शिरला. पोटाला घट्ट चिकटलेली छोटी बाळं पण होती. खूप साऱ्या माकडिणी घेऊन मोठा हुप्प्या जोरजोरात, “हुप्प sss हुप्प sss” करून वर्दी देत काळतोंडी झुंड हिरव्यागार मळ्यात आली. खूप साऱ्या चिंचा खाऊन, पेरू, आंबा नारळाच्या बागेत उड्या मारत, मस्ती करत नासधूस करत होती. पण जेव्हा खोपी जवळच्या चिक्कूच्या झाडावर आली तेव्हा धावत आत आली रश्मी आणि चंदा. तर छप्परावर आवाज आला. खापर तुटल्याचा खळ्ळकन आवाज आला. रश्मीनं घट्ट डोळे झाकून घेतले. हळूच मान वर करून पहिलं तर मोठा हुप्प्या कौल बाजूला करून दात विचकून खोपीत रश्मीकडे पहात होता. भीतीने बोबडी वाळलेल्या रश्मीचा आवाज घशातून बाहेर पडेना. आणि झोपेत अर्धवट आवाज बाहेर आला, “आssssई …, चंदाsss” आणि आईच्या स्पर्शानं जागी झाली. माकडांनी मळ्यात नुसता हैदोस घातला होतं. कौल तुटली हाती. पण रश्मीला आता स्वप्नात पण माकडाची भीती वाटू लागली आणि गेले तीन दिवस घाबरून उठत होती.
“आज तिसरी रात्र, पोरीची भीती कमी होतं नाही. तिला डॉक्टरकडे घेऊन जा”. ताई विनिताला आग्रहानं सांगत होती. आता विनिताची कसोटी होती, लहानग्या रश्मीच्या मनातील भीती कशी काढायची. दुष्काळा मूळ माकडांची उपासमार आणि पाणी मिळत नव्हतं. खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधत आली होती झुंड…
गावात सामान आणण्यासाठी निघालेल्या यल्लाप्पा वाटेकऱ्याला बोलावून विनितान यांच्या हातात चिठ्ठी दिली. “हा, जी, वैनीसाब, आणतो जी ” म्हणून तो निघून गेला तासाभरात एक पिशवी भरून काहीतरी घेऊन आला.
रश्मी, चंदा प्रश्नार्थक मुद्रेनं पिशवीकडे पाहत होत्या. “आता गंमत बघा !” म्हणत माचीस आणि पिशवी घेऊन, “चला बाहेर चिंचेच्या झाडाखाली ” म्हणत पेटलेली अगरबत्ती दिली मुलांच्या. हातात यलप्पा त्याची मुलं, रश्मी, चंदा आवाज न करता चिंचेच्या झाडाखाली आले. दिवसभर पाटाचं पाणी पी, चिंचा खा, कच्चे चिक्कू तोड, पाण्याच्या पाईपला लोंबकळ, पेरू खा, छोटे नारळ तोडून चाख, नुसता धिंगाणा घालत होती काळतोंडी. सीताफळ आणि रामफळच्या झाडाकडे मात्र ढुंकूनही पाहिलं नाही झुंडींन. खेळ झाला, पोट भरलं. लहान माकड दमून आईला चिकटून डुलकी घेत होती. काही पिल्लाचे माकडचाळे सुरु होते. काही आईसमोर बसून उवा साफ करत होते. आणि उवा साफ करताना हालचाल केली तर पंजाने सपासप मार मिळत होता. ते सर्व आपल्यात गुंतून काहीतरी कारनामे करत होते.
पिशवीतून फटाक्याच्या लडी बाहेर काढल्या आणि पेटलेली अगरबत्ती दिली मुलांच्या हातात. आणि सर्व मुलांनी एकाच वेळी फटाक्यांच्या लडी पेटवून धावत आत येऊन दरवाजा पुढे ढकलला…. एका पाटोपाट आलेल्या आवाजाने झाडावर धांदल उडाली. लहान पोर आईच्या पोटाला चिकटली आणि सैरभैर होऊन चिंच, पेरू, बाभूळ, नारळ एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारत मळ्याबाहेरचा रस्ता पकडला. जाताना हुप्प्याने एक वेगळा आवाज दिला आणि आपल्या पाठीमागं कोणी माकड राहिली नाहीत याची खात्री केली आणि झुंड निघून गेली. घाबरून तारंबळा उडालेल्या माकडांची धावपळ पाहून रश्मी, चंदाची भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि सर्वजण मळ्यात फेरफटका मारायला बाहेर पडले..

दुसऱ्यांदा निसर्ग कोपणार का?

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या सात तारखेला येणारा पाऊस त्या वर्षीचा जून महिन्याचा शेवट आला तरी पावसाची काही चिन्ह दिसेनात. सूर्य नुसता आग ओकत होता🌞🌞🌞. जमीन पाण्यासाठी आसुसलेली होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ सारे आकाशाकडे डोळे लावून पाहत होते. आकाश एकदम निरभ्र होतं. एकही काळा ढग दिसत नव्हता. झाडं एकदम स्थब्ध होती. प्रचंढ उकाड्यामुळे साप बिळातून बाहेर थंडावा शोधण्यासाठी झाडाच्या सावलीचा आधार घेत होते. आणि असेच दिवस आठवडे चालले. जुलै उजाडला सर्वत्र फक्त अस्वस्थ उकाडा भरून राहिलेला होता.
वातावरण आणि जीवघेणी गरमी. सलग दुसऱ्या वर्षी सुका दुष्काळ, विनिताला कल्पनेनंच असह्य झालं. आकाश एकदम निरभ्र बघून तिला तिच्या लहानपणी वडिलांनी कधीकाळी बोललेला वरूण मंत्र आठवला. मनामध्ये खूप आशा आणि विश्वास ठेऊन तिनं संकल्प सोडला. आणि रोज फक्त एक फळ खाऊन तिचा जप सुरु झाला, धृढ विश्वासाने….

नमो वरूण देवाय, जलाधी पतये विभो |
त्वमेव सर्व जिवानां, जीवनम देइमे जलम || 🙏

एक दोन तिनं…… दिवसभर जपमाळ फ़िरत राहिली..

एक दिवस पूर्ण झाला, दुसरा दिवस काळे ढग आले, गडगडाट झाला. ⚡️ वीज, वारा आला पण एक थेंब नाही आला. आज उपवास आणि वरूण जपाचा तिसरा दिवस होता. दुप्पट विश्वासान आणि श्रद्धेनं जप माळ फ़िरत होती. सकाळ संपली. ऊन मी म्हणत होतं. भाजून काढत होतं जमिनीला, घरांना, झाडांना, वेलींना, जनावरांना, पाखरांना. “काय म्हणावं या उन्हाला?” ताई आजी डोळे बारीक करून, डोळ्यावर हात धरून आकाशाकडे पाहत बोलली. दुपारचे दोन 🕑 वाजले. आणि वारा सुरु झाला. झाडं बुंद्यासकट हलायला लागली🥀🥀🌴🌳🌲. वाऱ्याचा धुमाकूळ जवळ जवळ एक तास चालू होतं. वादळच होतं ते. आणि आकाशात काळे ढग जमा होताना दिसले. हळू हळू वाऱ्याचा वेग मंदावत सारीकडे स्तब्धता पसरली. सूर्याला ढगांनी पुरता झाकून टाकला 🌚. आकाशात झळाळणारी वीज अगोदर दिसली⚡️⚡️ काळ्या मेघातून चकाकणारी वीज, तीचं लखलखित तेज पाहून डोळे दिपले सर्वांचे. आकाशात सळाळणारी,⚡️⚡️ झळाळणारी वीज अगोदर दिसली आणि कडकडाट आवाज करत जोरात वीज कडाडली, क्षणभर थरकाप उडाला. ताई आजीचा हात चंदाने घट्ट पकडला आणि तिला खेचत आत आणायचा प्रयत्न करत होती. समोरून एक पांढरा गोल येऊन रश्मीच्या पायाजवळ पडला. मग दोन, तिनं आणि खूप सारे गोल, गार, गोळे पडायला लागले तडा तडा आवाज करत पांढरं झालं आंगण सार.. “आई, गारा देतयं आकाश”, चंदा जोरात आईला हाक मारून सांगत होती. आणि आकाशातून ⛈️⛈️⛈️⛈️ पाण्याचे थेंब जोरात खाली यायला लागले. 💧💧💧💧💧💧💧
झाडं स्तब्ध राहून चिंब भिजत होती. टपोरे थेंब जमिनीवर पडल्या पडल्या लुप्त होतं होते आणि माती सुंदर सुगंध उधळत होती. जमिनीवर पडलेल्या थेंबाचा आवाज वेगळा, छपरावर पडलेल्या थेंबाचा आवाज वेगळा, झाडाच्या पानावर पडलेल्या थेंबाचा आवाज वेगळा होतं. समोर नजर जाईल तिथं काळीभोर जमीन दिसत होती पाणी पिताना, तृप्त होईपर्यंत.

चंदाने काय पहिले आकाशात? ती का नाचत, गाणं म्हणत होती?

आकाश छप्पर फाडून कोसळत होतं… आणि माती – पाण्याचा सुगंध आसमंतात भरू उरला होता. जवळ जवळ दीड तास नुसता कोसळत होता. आणि एकदम लख्ख ऊन पडलं. मध्येच शार निळ्या ढगाला सोनेरी किनार झळाळून दिसत होती. पूर्वेला बोट करून चंदाने सप्तरंगी कमान दाखवली. निळ्या आकाशात दिमाखात इंद्रधनुष्य🌈🌈🌈🌈🌈🌈 दिसत होतं. बऱ्याच दिवसांनी आई आणि ताई आजीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसलं. चंदा इंद्रधनूची कमान पाहून नाचत होती आणि गुणगुणत होती. ….

विज चकाकली लख! लख! लाख !
सळसळली निळ्या आकाशात रेषा,
मग आला आवाज मोठा,
काडाड कड, कडाड कड !
धावून ताईचा हात पकड,
पळून जाईल भीती दूर…

गारा आल्या थाड, थाड, थाड,
वेचून घेऊ, साठवून ठेऊ..
एक दोन तीन….. नऊ, दहा,
अरे पण पहिली, दुसरी, तिसरी
कोठे गेले गोल, पांढरे गोळे?⛈️

सूर्य कुठे गेला? तळपणारा गोळा,🌕⛅️
ढगाला पाहून लपुन बसला,🌕⛅️🎆
गायब कुठे झाला तू?
मध्येच डोकावतोस गोड असा,
सोनेरी काठाचा बांधून फेटा,

गारा कोठून आल्या?
थाड, थाड, थाड,
कोठून आले टपोरे थेंब?💧
आवाज येतो टप, टप, टप…💧

कोठून आली ही सप्तरंगी कमान?🌈🌈
निळ्याभोर आकाशात दिसते छान..🌈

ते बघ आई, आजी आणि आक्का
फुलवून पिसारा नाचतो मोर !🦚🦚
फुलवून पिसारा नाचतो मोर !🦚🦚

रंजना कुलकर्णी राव 🙏

7 Responses

    1. धन्यवाद सर. तुमचे अभप्राय मला पुढील साहित्य निर्मितीस प्रेरणा देतील 🙏

  1. खूप सुंदर लिहिले आहे .
    वाचताना मी मळ्यात पोहोचले तसूभर ही चित्रात बदल नव्हता.
    शब्द देवता , माता सरस्वती तुझ्यावर प्रसन्न राहो.

    1. धन्यवाद सर. तुमचे अभप्राय मला पुढील साहित्य निर्मितीस प्रेरणा देतील 🙏

    2. मॅडम जयश्री, आपण माझी कथा वाचून दिलेल्या अभिप्राय मला पुढील कथा लेखनास प्रेरणा देतील. 🌹🙏🌈

  2. धन्यवाद सर. तुमचे अभप्राय मला पुढील साहित्य निर्मितीस प्रेरणा देतील 🙏

  3. मॅडम जयश्री, आपण माझी कथा वाचून दिलेले अभिप्राय मला पुढील कथा लेखनास प्रेरणा देतील. 🌹🙏🌈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

” तू सदा जवळी रहा…” भाग – 56

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतीतार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 55*

भाग – 41* सर्व गुणसंपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 54*

भाग – 41* सर्वगुण संपन्न, वेगळ्या पद्धतीने – दिन विशेष, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केले रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More